चालू घडामोडी ऑक्टोबर २०२१ - भाग ३

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
22 Oct 2021 - 10:44 am

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक एन.सी.बी प्रमुख समीर वानखेडेंवर भलतेच संतापलेले दिसत आहेत. समीर वानखेडेंनी खोट्या केस टाकून आर्यनला अडकवले आहे तसेच आपल्या जावयाला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली आहे त्याच्याकडे अंमली पदार्थ नव्हते तर हर्बल वनस्पती होत्या वगैरे वगैरे तारे तोडले आहेत. काल तर समीर वानखेडे वर्षभरात नोकरी गमावून तुरूंगात गेलेले असतील हे भाकितही नवाब मलिकांनी केले आहे. इतकेच नाही तर देशातील लोक वानखेडेंना गजाआड गेलेले बघितल्याशिवाय शांत बसणार नाहीत असेही मलिक म्हणाले आहेत. काल तर मलिकांची जीभ पूर्णच घसरली. समीर वानखेडेंचा बाप बोगस होता, घरचे बोगस होते वगैरे तारेही त्यांनी तोडले आहेत. एक गोष्ट कळत नाही- एखाद्याचा बाप आणि घरचे बोगस होते हे त्याला तुरूंगात टाकायचे कारण कसे होऊ शकेल?

1

आता यात एक अडचण झाली आहे. महाविकास आघाडी समर्थक नेहमीप्रमाणे समीर वानखेडेंना 'महाराष्ट्रद्रोही' म्हणत असतीलच. पण समीर वानखेडे हे कोकणी मुस्लिम आहेत असे पुढे आले आहे. आता त्यांना विरोध केला म्हणून विरोध करणारे अल्पसंख्यांकांचे विरोधी असे का म्हणू नये? हे मी म्हणत नाहीये पण कोणत्याही प्रकरणात अल्पसंख्यांक व्यक्तीला विरोध केला तर मग तो अल्पसंख्यांक समुदायालाच विरोध असे तारे तोडणारे लोक पुरोगामी कळपातलेच असतात. अर्थातच असे दोन्ही म्हणणे हे चुकीचे आहे. समीर वानखेडे हे कायद्याला प्रमाण मानून आपले काम निर्भिडपणे करणारे अधिकारी आहेत. त्यांना दाद दिलीच पाहिजे.

प्रतिक्रिया

आताच कसा कर्तुत्व पणाचा किडा चावला.

रात्रीचे चांदणे's picture

22 Oct 2021 - 1:23 pm | रात्रीचे चांदणे

कदाचित, चांगलं काम केलं तर सरकार सपोर्ट करतय असा विश्वास त्यांना आला असेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Oct 2021 - 1:48 pm | चंद्रसूर्यकुमार

वा. काय लॉजिक आहे.

समीर वानखेडे एन.सी.बी चे प्रमुख आहेत. कोणीही अधिकारी अनेक वर्षे काम केल्यानंतरच असा प्रमुख होत असतो हे वेगळे सांगायला नको. प्रमुख काय करतो त्याची बातमी येते पण कनिष्ठ अधिकारी काय करतो त्याची बातमी येत नाही. याचा अर्थ कनिष्ठ अधिकारी काहीही करत नाहीत का? आता या प्रकरणात आर्यन सारखा सेलेब्रिटीपुत्र असल्याने आणि एन.सी.बी च्या सर्वोच्च पातळीवरून कारवाई झाली असल्याने त्या कारवाईला प्रसिध्दी जास्त मिळाली. आजही एन.सी.बी मधील कनिष्ठ अधिकारी आहेत ते नक्की कुठे धाडी घालतात याविषयी आताही बातम्यांमध्ये काही येते का? तसे येत नसेल तर समीर वानखेडे कनिष्ठ असताना कर्तुत्व दाखवत नव्हते असे कोणत्या आधारावरून म्हणणार?

बाकी. समीर वानखेडे काही काळ कस्टम्समध्येही होते. त्यावेळी त्यांनीच नियमानुसार परवानगी दिल्यापेक्षा जास्त सामान शाहरुखने भारतात आणले आणि तो सीमाशुल्क न भरता बाहेर निघत होता म्हणून विमानतळावर अडकवून ठेवले होते. या माजलेल्या सेलेब्रिटी लोकांना कायद्यानुसार धडा शिकवायचे धैर्य त्यांनी पूर्वीच दाखवले होते हो.

हे लॉजिक कुठून शिकलात? की सामना वाचून स्वतः ते लॉजिक बनवलेत का?

कुणाकडून लॉजिक ची अपेक्षा ठेवताय, त्यांचा इकडे फक्त टाईमपास चालू असतो.

रामदास२९'s picture

22 Oct 2021 - 1:19 pm | रामदास२९

आताच कसा कर्तुत्व पणाचा किडा चावला.

बरोबर .. पण कोणाची मुल आहेत त्यावरून कारवाई करायची का? कान्ग्रेस ने हेच तर केल ईतके वर्ष.. त्यान्च्याकडे सबळ पुरावे आहेत त्याशिवाय कोर्ट अशी कारवाई करणार नाही..

mangya69's picture

22 Oct 2021 - 1:40 pm | mangya69

जामीन नाकारणे म्हणजे गुन्हेगार
जामीन मंजूर होणे म्हणजे निरपराध

असेही काही नाही आहे

पिक्चर अभि बाकी है

सुबोध खरे's picture

22 Oct 2021 - 6:57 pm | सुबोध खरे

जामीन नाकारणे म्हणजे गुन्हेगार
जामीन मंजूर होणे म्हणजे निरपराध

असेही काही नाही आहे

हे तर्कशास्त्र कर्नल पुरोहित याना ९ वर्षे हिंदू दहशतवादाच्या कुभांडात अडकवून सोडवले तेंव्हा कुठे गेले होते?

तेंव्हा तुमच्या लाडक्या पक्षातील हरामखोर नेते काय षडयंत्र करत होते त्याबद्दल तुम्ही काहीच बोलणार नाही
Why Army honoured and reinstated Malegaon blast accused Lt Col Purohit

Those accusing the Indian Army for not doing enough must realise that it refused to suspend or terminate his services throughout the period of his arrest.

https://www.dailyo.in/politics/lt-col-prasad-shrikant-purohit-bail-maleg...

mangya69's picture

22 Oct 2021 - 7:01 pm | mangya69

कर्नल पुरोहित , साध्वी , आर्यन हे फक्त आरोपी आहेत.

सुबोध खरे's picture

22 Oct 2021 - 7:06 pm | सुबोध खरे

तुम्ही सगळ्याच बोटाना थुंकी लावत जा म्हणजे इकडची थुंकी तिकडे करावी लागणार नाही.

हे वाक्य प्रचंड आवडले आहे . . कॉपीराईट घेउन टाका . . .

mangya69's picture

22 Oct 2021 - 10:31 pm | mangya69

करोना जाऊ दे आधी

सुबोध खरे's picture

23 Oct 2021 - 6:26 pm | सुबोध खरे

थुंकी स्वतःचीच लावायची आहे दुसऱ्याची नाही.

mangya69's picture

23 Oct 2021 - 6:35 pm | mangya69

इकडून तिकडे तिकडून इकडे फिरायला माझी थुंकी म्हणजे अक्षयकुमारचे नागरिकत्व नव्हे.

अ

अक्षय कुमारचे नागरिकत्व नव्हे.म्हणताय?

मग थुंकी सारखी या बोटांवरून त्या बोटावर कशाला करत असता?

कारवाई करताना bjp शी संबंधित लोक बरोबर असणे,मीडिया समोर काहीच पुरावे नसताना आरोपी ची नाव उघड करणे.bjp नेत्यांना अगोदर च कारवाई ची माहिती असणे .ह्या वर आक्षेप आहे.

आपल्याला या प्रकरणाची काय आणि किती माहिती आहे?

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2021 - 7:27 pm | श्रीगुरुजी

शून्य

अजुन NCb ला त्या प्रकरण बद्द्ल पूर्ण माहिती नाही.म्हणून तर जमीन देण्यास विरोध करत आहेत.अजुन चोकशी करायची आहे त्यांना.
म्हणजे त्यांचीच चोकशी अजुन अपूर्ण आहे.

सुबोध खरे's picture

23 Oct 2021 - 6:31 pm | सुबोध खरे

हे तुम्हाला माहिती आहे तर प्रत्येक ठिकाणी राजेश उवाच कशाला?

mangya69's picture

22 Oct 2021 - 2:10 pm | mangya69

Tamil Nadu Chief Minister M.K. Stalin on Wednesday virtually launched the preliminary work towards the melting of gold ornaments, in temples under the control of the Hindu Religious and Charitable Endowments (HR&CE) Department, and converting them into gold bars.

https://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/stalin-launches-prelim...

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Oct 2021 - 2:20 pm | चंद्रसूर्यकुमार

निखिल वागळेसारख्या चाटू पत्रकारालाही नवाब मलिकांचे बरळणे आवडलेले दिसत नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Oct 2021 - 2:22 pm | चंद्रसूर्यकुमार

आणि विश्वंभर चौधरी सुध्दा

घटनांचे चे क्रम बघा,.केंद्रीय एजन्सी.Ed,Cbi, आणि ही ड्रग वाली.
ह्यांच्या भूमिका आणि सक्रियता बघा.
मीडिया मधून प्रचार,bjp नेत्यांची नाटक.
हा सर्व घटनाक्रम जुळवला तर जी फिल्म तयार होते त्या मधून हा सरळ अर्थ निघतो.केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार विरूद्ध कट कारस्थान करत आहे.
फक्त आर्यन आणि शाहरुख इतकेच बघू नका.

आणि महाराष्ट्रात च कायद्याचे राज्य नाही असा बालिश प्रचार मीडिया करत आहे.
देशात जितके कायदे अस्तित्वात आहेत त्या कायद्यांनी चालणारे एक पण राज्य,एक पण व्यक्ती ह्या देशात अस्तित्वात नाही.
महाराष्ट्र थोडा तरी बरा आहे बाकी राज्यात कायदे आणि कायद्याचे राज्य बिलकुल अस्तित्वात नाही
उत्तम दर्जाचे चे कायद्याचे राज्य महाराष्ट्र व्यतिरिक्त बाकी राज्यात आहे आणि इथे नाही हस हास्यास्पद भ्रम आहे.
ड्रग फक्त मुंबई,महाराष्ट्रात च वापरले जाते.
हा अवॉर्ड winnig जोक आहे.
गोवा राज्यात ड्रग शिवाय एक पण विदेशी पर्यटक येणार नाही.
हे शेंबड्या पोराला पण माहीत आहे.
पण तिथे कधी कारवाई होते का,?

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Oct 2021 - 2:53 pm | चंद्रसूर्यकुमार

गोवा राज्यात ड्रग शिवाय एक पण विदेशी पर्यटक येणार नाही.
हे शेंबड्या पोराला पण माहीत आहे.
पण तिथे कधी कारवाई होते का,?

हे घ्या. मागच्या महिन्यात मुंबई बरोबर गोव्यातही ड्रगविषयी कारवाई झाली आहे.
https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/ncb-arrests-four-from-...

फरक इतकाच की गोवा सरकारने खुळ्यासारखं ड्रगवाल्यांवरील आरोप आपल्या अंगावर घेऊन कारवाईला विरोध केलेला नाही. जो त्रिखंडातील सर्वोत्तम महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षांनी केला आहे.

आरोप कोणावर तर आर्यन खान आणि अन्य काहींवर. कारवाई कोण करत आहे? तर एन.सी.बी. त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही आणि महाराष्ट्र सरकारशी सुध्दा. महाराष्ट्राच्या स्वाभिमान वगैरेंशी तर या प्रकाराचा दुरान्वयाने संबंध नाही. तरी असले उडते बाण काही कारण नसताना खुळ्यासारखे अंगावर घ्यायची महाविकास आघाडीला काय हौस आहे समजत नाही.

mangya69's picture

22 Oct 2021 - 3:14 pm | mangya69

भारती सिंग म्हणून एक कॉमेडियन आहे म्हणे, तीलादेखील एन सी बी ने रंगेहात पकडले होते.

पण तिने कमळछाप पट्टा घातला , आता ती बाहेर आहे

.

Aryan Khan’s Rejection Of Bail Is ‘Clear Harassment’, Bharti Singh Was Bailed On The Same Day, Says KRK
Aryan Khan was arrested by NCB on October 3 during a drug raid conducted on a Cordelia cruise ship off the Mumbai coast

https://www.koimoi.com/bollywood-news/aryan-khan-rejection-of-bail-is-cl...

mangya69's picture

22 Oct 2021 - 3:16 pm | mangya69

मी बीजेपी जॉईन केली तर मलापण मिसळपावच्या संपादक मंडळात घेतील का ?

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2021 - 6:09 pm | श्रीगुरुजी

तू कोठेही घुसण्याचा प्रयत्न केलास तरी तुझ्या नशिबी फक्त हकालपट्टीच आहे. भाजपमधूनही तुला मानगूट धरून हाकलतील.

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2021 - 6:07 pm | श्रीगुरुजी

ही पुढची बातमी सांगण्यास विसरलास का रे?

भारतीला जामीन मिळवून देण्यास अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या दोन घरभेद्या अधिकाऱ्यांनी मदत केली होती. त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

https://www.google.com/amp/s/www.thequint.com/amp/story/entertainment/ce...

mangya69's picture

22 Oct 2021 - 6:58 pm | mangya69

त्यानापण भाजप जॉईन करायला सांगायचे.

mangya69's picture

23 Oct 2021 - 4:53 pm | mangya69

भारतीसिंगकडे 86.5 ग्रॅम गांजा सापडला होता

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2021 - 9:52 am | श्रीगुरुजी

गांजा नसून ती एक प्रकारची हर्बल वनस्पती होती.

- तहहयात भावी ...

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Oct 2021 - 3:27 pm | चंद्रसूर्यकुमार

देशात खरोखर १०० कोटी कोरोना लसीचे डोस दिले गेले आहेत का असा प्रश्न श्री.रा.रा.संजय राऊत यांनी विचारला आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-mp-sanjay...

ही मोदींची लस आहे हा प्रचार विरोधकांनीच केला होता. योग्य तपासण्या न करता सरकारने लशीला परवानगी देऊन जनतेचे आरोग्य धोक्यात आणले आहे का असा प्रश्नही अगदी शशी थरूर यांनी (चुकून सगळ्यांना समजतील असे इंग्लिश शब्द वापरून) विचारला होता.

अखिलेश यादव सुद्धा 'मी बीजेपीची लस घेणार नाही' असे म्हणाले होते.

म्हणजेच तुम्हीच 'ही मोदींची लस आहे' असा प्रचार केला होता. जर का लसीकरणात काही गोंधळ झाला असता, काही लोकांचा मृत्यू वगैरे झाला असता तर त्याचा सगळा दोष मोदींच्या माथी मारून सगळ्या विरोधकांनी हलकल्लोळ केला असता. तेव्हा जर तसे काही झाले नसेल आणि सुरवातीला उपलब्धतेचे प्रश्न होते त्यानंतर सगळे काही सुरळीत झाले असेल तर त्याचे श्रेय पण जनता मोदींनाच देणार.

बहुदा हे लक्षात आल्यामुळे मग आता संजय राऊत मुळात १०० कोटी लशींचे डोस दिले होतेच का हा प्रश्न विचारत आहेत. म्हणे ३३ कोटी लोकांनाच दोन्ही डोस देऊन झाले आहेत. पण उरलेल्यांना एक डोस तर झाला आहे ना? आणि त्यांना दुसरा डोस मिळाला की मग ३३ कोटी हा आकडा भराभर वाढणार नाही का?

बरखा दत्त म्हणत आहे की स्त्रियांना कमी डोस दिले गेले आहेत.

एकूणच काय की आपल्याच कर्मामुळे लोक या लशींचे श्रेयही मोदींना देतील हे लक्षात आल्यावर ही सगळी झालेली धावपळ आहे. त्यापेक्षा सुरवातीलाच 'आमचा आमच्या देशातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञांवर विश्वास आहे. त्यांनी लस वापराला योग्य आहे असे प्रमाणित केले असेल तर त्यावर आमचा विश्वास आहे' असे म्हटले असते तर मग आता श्रेय मोदींना मिळायचे काही कारण नव्हते. आताही खरे श्रेय लस बनविणार्‍या डॉक्टर आणि शास्त्रज्ञांचेच आहे. पण विरोधकांच्या खुळेपणामुळे विनाकारण ते श्रेय मोदींना मिळत आहे.

सुक्या's picture

22 Oct 2021 - 10:38 pm | सुक्या

नाकर्त्या लोकांना कुठेही काहीही खुस्पट काढायची सवय असते . .. असली खुसपटे काढणे राउतांची अपरीहार्यता आहे. पापी पेट का सवाल. उगीच सामना कारांनी लाथ मारली तर खायचे वांधे होतील. पेंशन कुठवर पुरणार आहे?

हेच काम जर "रागा*" मंडळीनी केले असते तर हेच राउत सकाळी सकाळी काकडआरतीला गेले असते . .
थरुर बर्‍याचदा भानावर असतात ... कधीकधी बरळतात . .
अखिलेश यादव / बरखा दत्त यांवर न बोललेले उत्तम ... टंकनश्रम वाचले तेव्हडेच. .

https://www.sumanasa.com/go/B93g76
३०० कोटीच्या लाचेची ऑफर.

Rajesh188's picture

23 Oct 2021 - 2:22 pm | Rajesh188

काँग्रेस मध्ये प्रवेश दिल्या मुळे काँग्रेस चा काही फायदा होईल असे वाटत नाही.तो पण फक्त बोलबच्चन आहे.
प्रत्यक्षात त्यांनी पण त्याच्या मतदार संघात काहीच काम केलेले नाही.
हा स्वतः बोल बच्न न आणि हा कान्हेया दुसऱ्या वर आरोप करायला लागला तर ह्याच्या वर विश्वास कोण ठेवणार.
आणि त्याचे बॅक ग्राउंड पण चांगले नाही.
काँग्रेस स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहे.
Bjp नी महाराष्ट्रात विविध पक्षातील नेत्यांना bjp मध्ये घेतले पण त्या सर्व नेत्यांचे ग्राउंड वर काम आहे.विकास कामात त्यांचा सहभाग आहे.
त्यांची अशी एक खास ओळख आहे.

mangya69's picture

23 Oct 2021 - 8:17 pm | mangya69

नशील्या द्रव्यांविरुद्ध कायदा भारतात 1985 साली राजीव गांधी (म्हणजे आमच्या पप्पूचे पप्पा) ह्यानी अमलात आणला.

2015 नंतर ( म्हणजे यु नो हु !!) सत्ताधारी पक्षाचेच नेते गांजा , भांग , अफूवरील बंधने उठवा म्हणून सतत संसदेत चर्चा करत आहेत.

https://en.m.wikipedia.org/wiki/Cannabis_in_India

mangya69's picture

23 Oct 2021 - 8:31 pm | mangya69

कदाचित आर्यनची केस स्टॅण्ड व्हायच्या आत ह्यांनी नशिले पदार्थ कायदेशीरच केले तर मग प्रश्नच मिटेल

सुबोध खरे's picture

23 Oct 2021 - 8:53 pm | सुबोध खरे


अफूवरील बंधने उठवा

हे कुठे वाचलं ?

mangya69's picture

24 Oct 2021 - 8:43 am | mangya69

Narcotic Drugs and Psychotropic Substances (NDPS) Act चे पुनरावलोकन करण्याच्या सूचनेमध्ये, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ड्रग वापरकर्ते आणि व्यसनाधीन व्यक्तींसाठी तुरुंग टाळून अधिक मानवी दृष्टिकोन ठेवण्याची शिफारस केली आहे. काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या शिफारशीत मंत्रालयाने वैयक्तिक वापरासाठी अल्प प्रमाणात ड्रग्ज सोबत बाळगणं गुन्हेगारीमुक्त करण्याची मागणी केली आहे. जे अंमली पदार्थांचा वापर करतात किंवा त्यांच्यावर अवलंबून आहेत अशांना पीडित समजण्यासाठी, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनासाठी संदर्भित केले जावे आणि तुरुंगावासाची शिक्षा होऊ नये यासाठी NDPS कायद्यात सुधारणा सुचवल्या आहेत.

NDPS कायद्यांतर्गत कमी प्रमाणाचा अर्थ केंद्र सरकारने अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट केलेल्या प्रमाणापेक्षा कमी आहे. उदाहरणार्थ, सरकारने गांजासाठी १०० ग्रॅम आणि कोकेनच्या बाबतीत २ ग्रॅमची मर्यादा निश्चित केली आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh/drug-use-ndps-act-social-justice-mi...

कॉमी's picture

24 Oct 2021 - 4:18 pm | कॉमी

चांगले आहे.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2021 - 4:37 pm | श्रीगुरुजी

हर्बल वनस्पतींसाठी किती ग्रॅमची मर्यादा आहे?

मंत्री नवाब मलिक असे संतापले आहे की जसे काही आर्यन हा शाहरुख चा पोट्टा नसुन याचाच आहे ! :))) मला वाटतं मंत्री साहेबांचे जावई बराच काळ एनसीबीच्या कोठडीतील पाहुणचार घेउन हल्लीच बाहेर पडले आहेत, त्यामुळे देखील कंठ फुटलेला असु शकतो.
कराचीवुडवाल्यांना सिंघम चित्रपट बनवायला आवडतो, परंतु रिअल लाईफ मधला सिंघम जेव्हा यांची चांगली पाचर मारुन पाळेमुळे खणु लागतो तेव्हा सगळ्यांना हाच खरा हिरो व्हिलन वाटु लागतो...यांचे कच्चेबच्चे,बगलबच्चे अडकले की यांना ते सहन होत नाही ! हे एकजात १ नंबर चे ढोंगी आहेत.
P1
चरस है तो गांजा भी है | गांजा है तो कोकेन भी है |
ड्रग्स है तो लत भी है | पार्टी है तो नशा भी है |
कानुन है तो मुश्किलें हैं | मुश्किलें हैं तो अंडरवर्ल्ड है |
हौसला है तो विश्वास है क्यूंकि 'नशेडी' हमेशा जीतता है |

आर्यन खानच्या अटकेवरुन जावेद अख्तर यांचं मोठं विधान, म्हणाले “बॉलिवूड इंडस्ट्री…”
हा हिंदू द्वेष्टा ढोंगी जावेद म्हणतो, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी, दिग्गज कलाकार यांसह इतरांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. पण ड्रग्स घातक आहेत ते युवा पिढीने घेउ नयेत असे म्हणत नाही. याच ढोंगी जावेदची बायको शबाना वरच्या फोटोत WE HATE DRUGS असा बोर्ड धरुन बसलेली आहे. बहुतेक जावेदला बायकोनेच केलेल्या आंदोलनाची विस्मृती झाली असावी असे दिसते ! बरं अनेक लोक अनाकलनिय मुद्दे घेउन बचावाला आले, येडा अण्णा म्हणाला बच्चा है,पण अण्णा ड्रग्स घेऊ नका तो गुन्हा आहे आणि तो करु नका हे सांगु शकला नाही. कोण म्हणतं शाहरुख मुसलमान आहे म्हणुन त्याला टारगेट केले जाते आहे, पण आर्यन बरोबर पकडले गेलेले बाकीचे हिंदू देखील आहेत हे ते बोलत नाही. बरं इस्लाम मध्ये तर दारु,ड्रग्स हराम आहेत ना ? मग हेच कृत्य आखाती देशात केलं असत आणि आर्यन पकडला गेला असता तर काय शिक्षा झाली असती ? आपल्या देशात कराचीवुड वाल्यांचे आणि धर्मांध जिहादी लोकांचे फार फाजिल लाड झाले आहेत त्याचीच ही फळे आहेत.

जाता जाता :- समीर वानखेडे यांची एक मुलाखत मी सुशांत सिंह राजपूत भाग २ भागात दिली होती. इम्तियाज खत्री बद्धल सुशांत सिंह राजपूत वरच्या दोन्ही भागात उल्लेख केला आहे, या खत्रीलाच दुसर्‍यांदा समन्स पाठवण्यात आले आहे.
संदर्भ :- मुंबई: ड्रग्स केस में इम्तियाज खत्री को NCB ने किया दूसरी बार समन, 12 अक्टूबर को होगी पूछताछ
या खत्रीची व्यवस्थित छत्री उघडली गेली की बरीच मोठी माहिती समोर येइल असे दिसते !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Bina Jiya Jaye Na... :- Ghar

mangya69's picture

24 Oct 2021 - 10:40 am | mangya69

केस होऊन कियी दिवस झाले , अजून कुणाकडे काय किती ग्रॅम सापडले , हेही बाहेर आले नाही , ही केस नोटबंदीच्या दिशेने जात आहे , वर्षानुवर्षे झाली तरी सरकारलाच आकडा माहीत नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Bina Jiya Jaye Na... :- Ghar

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Oct 2021 - 4:37 pm | चंद्रसूर्यकुमार

युट्यूबवर प्रगत लोके वगैरे मंडळींनी युट्यूबवरून त्यांना किती पैसे मिळतात याचे व्हिडिओ टाकले होते. प्रगत लोकेचा तो व्हिडिओ मागच्या वर्षी एप्रिल महिन्यातला होता. त्यावेळी त्याला जितके व्ह्यू होते त्यापेक्षा भाऊंच्या चॅनेलला व्ह्यू आणि सबस्क्राईबर कितीतरी जास्त आहेत. त्यावरून मागे एकाने पाकिटाच्या मागे (बॅक ऑफ द envelop) केलेल्या आकडेमोडीवरून भाऊ नुसत्या युट्यूब चॅनेलवरून वर्षाला २० लाखपर्यंत कमवत असतील असे व्हॉट्सअ‍ॅपवर आले होते. खखोदेजा. व्हीलॉग वाले, शेअरमार्केटवाले, पॉझिटिव्ह थिंकिंगवाले असे अनेक युट्यूबवरून भरपूर कमावतात. त्याप्रमाणेच मराठीतून राजकारणावर व्हिडिओ करून टाकल्यास त्यातूनही पैसे कमावता येतात हे भाऊंनी दाखवून दिले (चॅनेल सुरू करताना त्यांचा पैसे कमावणे हा उद्देश कदाचित नसेलही पण त्यातून पैसे कमावता येतात हे मात्र त्यांनी दाखवून दिलेच). अनिल थत्ते जास्त व्ह्यू आणि जास्त सबस्काईबर्स मिळवायच्या उद्देशाने असे सनसनाटी व्हिडिओ करून टाकत आहे का? कल्पना नाही. फार पूर्वीची गोष्ट नाही. तीनेक महिन्यांपूर्वी अनिल थत्तेंनीच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात दिवाळी साजरी करतील असा व्हिडिओ टाकला होता. काय झाले त्याचे? पुढील ८ दिवसात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले तरच अनिल थत्तेंच्या व्हिडिओंमध्ये अर्थ आहे असे म्हणता येईल. बघू काय होते ते. पण तसे न झाल्यास मात्र थत्ते उगीच सनसनाटी व्हिडिओ टाकून जास्त व्ह्यू आणि सबस्क्राईबर्स गोळा करत आहेत का हा प्रश्न विचारायला नक्की जागा आहे.

भाऊंनी अनिल थत्तेंच्या अशा व्हिडिओला उत्तर का दिले हेच समजले नाही.

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2021 - 5:12 pm | श्रीगुरुजी

तीनेक महिन्यांपूर्वी अनिल थत्तेंनीच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात दिवाळी साजरी करतील असा व्हिडिओ टाकला होता. काय झाले त्याचे?

दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने फडणवीस मुख्यमंत्री होणार, सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री होणार, अजितदादा केंद्रात मंत्री होणार, मोदी व पवारांच्या भेटीत असे ठरले आहे, आता पुढील काळात शहा व पवारांची भेट होऊन अंतिम मसुदा ठरेल . . . असे दावे करणाऱ्या २-३ चित्रफिती थत्तेने जुलै महिन्यात टाकल्या होत्या. नंतर २ महिने काहीच हालचाल न झाल्याने थत्तेने परत २ चित्रफिती टाकल्या व पवारांनी उद्धव ठाकरेंना पूर्ण ५ वर्षांसाठी पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे असा त्यात दावा केला आहे.

थत्तेचे सर्व दावे थापा आहेत.

अनिल थत्ते जास्त व्ह्यू आणि जास्त सबस्काईबर्स मिळवायच्या उद्देशाने असे सनसनाटी व्हिडिओ करून टाकत आहे का?
हा विचार मी देखील करुन पाहिला. [ व्हिडियो इथे शेअर करण्याच्या आधीच ] थत्ते टिकली मास्टर असले तरी त्यांची स्वतःची एक शैली आहे. ते अतिशयोक्ती करत असतील्,अगदी थापा देखील मारत असतील.
परंतु केवळ पाच मिनीटांचा व्हिडियो करुन केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा हिट काउंट वाढवण्यासाठी ते इतकी खालची पातळी गाठतील असे अजिबात वाटतं नाही. भाऊंच्या एका व्हिडियोत त्यांनी थत्त्यांच्याच एका व्हिडियोचा उल्लेख केला होता जो अजित दादांच्यावर धाडी पडणार या संदर्भात होता. थत्त्यांना ते फार आधीच समजले [बहुतेक कसे ? ] होते असं काहीस भाऊ म्हणतात... तेव्हा आत्ता थत्तेंनी फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी हा व्हिडियो बनवला असेल असं प्रथमदर्शनी वाटतं नाही.
अर्णब गोस्वामी प्रकरणी सध्याचे बिघाडी सरकार कोणत्या थरावर गेलं होत आणि जाउ शकतं ते आपणा सर्वांना पाहिले आहे. तेव्हा सध्य सरकार अस्तित्वात असताना आजच्या काळात काहीही होऊ शकते यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
जसा भाऊंच्या चाहता वर्ग फार मोठा आहे त्याच प्रमाणे त्यांचे निर्भिड आणि सत्यतेवर आधारीत असलेले मत प्रदर्शन ऐकुन काही वर्गाला पोटशूळ उद्भवु शकतो, तेव्हा त्यांच्या सारख्या व्यक्तीच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांना संरक्षण मिळालेले उत्तम !

जाता जाता :- सदरक्षणाय, खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्यावर महाराष्टातील लोकांचा आता विश्वास उरलेला नाही ! उरण्याचे कोणते सबळ कारण देखील दिसत नाही.अशीच शपथ घेतलेल्या आणि त्या शपथेवर खरे उतरणार्‍या आणि सत्यावर अटळ झालेल्या रवींद्र पाटीलची गत त्याच्याच खात्याने कशी केली हे ही आपल्या समोर आहे. अगदी आत्ता आपल्या समोर समीर वानखेडे सारख्या प्रामाणिक्,कर्तव्यनिष्ठ अधिकार्‍याचे चारित्र्य हनन करण्याचे प्रयत्न कोण करत आहे हे देखील आपल्याला दिसत आहे. भाऊ काय किंवा समीर, ही सर्व माणसे आपल्यासाठी / आपल्या देशासाठी मोलाची आहेत. तेव्हा अगदी सनसनाटी निर्माण करणारे असले तरी थत्तें यांचे विधान हलक्याने घेउ नये असे वाटते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ye Zamin Gaa Rahi Hai... :- Teri Kasam [ Soundtrack Version ]