गाभा:
नमस्कार
परवा जाहीर झालेल्या म्हाडाच्या लॉटरीत मला घर लागले आहे , ते घ्यावे कि न घ्यावे या द्विधा मनस्थितीत असल्याने हा खटाटोप.
घराचा प्रकार - LIG , १ BHK , १५ वा मजला. ४५० sqft.
ठिकाण - विरार बोळींज, स्टेशन पासून अंदाजे २ किमी.
किंमत- २६ लाख रुपये
सध्या मी राहत असलेले ठिकाण - नवी मुंबई.
घर घेण्याचे कारण - गुंतवणूक.
गेली ३६ वर्षे मी नवी मुंबईत राहिलो आहे, आयष्यात कधीच विरारला गेलो नाही, मात्र तिथल्या गर्दीच्या आणि प्रवासाच्या सुरस कथा ऐकल्या आहेत.
राहण्यासाठी मला घर आहे , गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे.
मागे एकदा दुधाने तोंड पोळले असल्याने आता ताकही फुंकून प्यावे म्हणतोय.
अनुभवी लोक मार्गदर्शन करतील ऐसी अपेक्षा करतो.
प्रतिक्रिया
16 Oct 2021 - 12:30 pm | चौथा कोनाडा
स्टेशन पासून फक्त २ किमी आहे, किंमत तुलनेने कमी आहे म्हणजे गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते असा अंदाज व्यक्त करतो आणि खाली बसतो.
आता जाणकारांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत !
16 Oct 2021 - 1:00 pm | Nitin Palkar
मला जाणवत असलेल्या काही बाबी ....
तयार ताबा आहे का? अथवा ताबा कधी मिळणार?
ताबा मिळण्यास सहा महीने किंवा अधिक कालावधी असल्यास तो अनिश्चित काळापर्यंत वाढू शकतो.
केवळ स्टेशन पासूनचे अंतर हेच महत्वाचे नसून, आजूबाजूचा परिसर विकसित झाला आहे का?
चांगलेसे हॉस्पिटल, बँक, atm, मंडई एखादे सुपर मार्केट इत्यादि नजीक आहेत का? (यात शाळा कॉलेज पण अंतर्भूत करू शकता पण ते सापेक्ष आहे).
सर्वात महत्वाचे - गुंतवणूक जवळ असलेल्या पैशातून करणार की कर्ज घेऊन.
स्थावर मालमत्ते मधील गुंतवणुकीबाबत सध्या बरेच संभ्रमित चित्र आहे तेव्हा अतिशय सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
17 Oct 2021 - 12:30 pm | सतिश पाटील
ताबा तयार आहे.
आजू बाजूचा परिसर विकसित आहे असे मला वाटते.
हॉस्पिटल , बँक जवळ आहे, १ किमीवर डी मार्ट आहे.
शाळा कॉलेज जवळ आहे का नाही माहित नाही.
गुंतवणूक कर्ज घेऊन करणार आहे.
16 Oct 2021 - 2:49 pm | mangya69
घेऊन टाका
भाडेकरू लगेच मिळतात
16 Oct 2021 - 2:52 pm | mangya69
आता म्हाडा स्वतः तुमच्या तोंडाला मसाला दुधाचा ग्लास लावत आहे. घ्या.
हे नको असेल तर मग 26 लाखात तुमच्या हारबर लाईनला काय मिळते का बघा
विरार नवी मुंबई आता फार लांब नाही
अलिबाग विरार कॉरिडॉर व मेट्रो सुरू होईलच की
17 Oct 2021 - 12:31 pm | सतिश पाटील
हार्बर लाईनला २६ लाखात सध्या काहीच मिळत नाही.
17 Oct 2021 - 12:35 pm | mangya69
उलवे , बामनडोंगरी इ इ
17 Oct 2021 - 2:00 pm | कपिलमुनी
भाडे वजा हप्ता परवडत असेल तर नक्की घ्या, मुंबईत 26 लाखाला घर हा उत्तम व्यवहार आहे.
17 Oct 2021 - 2:13 pm | सोत्रि
बिंधास्त घेऊन टाका!
२६ लाखात उत्तम लॅाटरी आहे! विरार (आगाशी)ला वयाची २७ वर्ष घालवली आहेत त्यामुळे हा व्यवहार बेस्ट आहे हे एका विरारकराचं मत आहे.
- (आगास्कर) सोकाजी
19 Oct 2021 - 5:06 pm | श्री
म्हाडा लॉटरी लागल्याबद्द्ल प्रथम अभिनंदन.....
जास्त किंमत, ऊंचीला कमी इ. कारणांनी २ वर्षापुर्विच्या विरारच्या लॉटरीतल्या विजेत्यानी फ्लॅट घेतले नव्हते. आत्ताची लॉटरी नेमकी त्याच जागांसाठी आहे की दुसरीकडे याची कल्पना नाही. तुम्ही प्रत्यक्ष साईट वर जाऊन निर्णय घ्या, भाड्यावर देऊन जास्त लाभ होईल असे नाही.
21 Oct 2021 - 11:35 am | सतिश पाटील
धन्यवाद !
साधारण ४ वर्षांपूर्वी मी म्हाडाचा फॉर्म भरला असता मला याच ठिकाणी घर मिळाले होते . तेव्हा विरार मध्ये ३५०० घरांची सोडत होती आणि माझा वेटिंग नंबर ४५० होता, तो एक वर्षांनी क्लियर होऊन मला अलोट झाले होते. तेव्हा या घराची किंमत २२ लाख होती. पण तेव्हा आपला नंबर लागला नाही असे समजून दुसरीकडे घर घेतल्याने मी म्हाडाचे ते घर नाकारले होते. तेव्हा ३५०० घर होते, आणि आता अंदाजे १५०० घर आहेत.
22 Oct 2021 - 11:10 am | सौंदाळा
अभिनंदन
विरारचे माहिती नाही पण पिंपरी-चिंचवड मधे तरी म्हाडाच्या सर्व जागा अगदी उत्तम लोकेशनला आहेत.
म्हाडा (आणि एम.टी.डी.सी) बद्दल त्यांच्या जागा नेहमीच चांगल्या लोकशन्सला असतात असे ऐकत / बघत आलेलो आहे.
त्यामुळे ही जागा तुम्ही घ्यावी असे वाटत आहे.