१० सप्टेंबर २०२१.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९४३.
अर्थात गणेश चतुर्थी.
आणि मिपाचा वर्धापनदिनदेखील!
दरवर्षी आपण गणेशोत्सवामध्ये अकरा दिवस श्रीगणेश लेखमालेचे आयोजन करतो. यंदाही आपण श्रीगणेश लेखमाला आयोजित केलेली आहे. आणि अर्थात, ती शक्य होणार आहे आपल्या सर्वांच्या सहभागाने.
नियम वा अटी अशा काही विशेष नाहीत, गणेशोत्सव हा आनंद आणि चैतन्याचा सोहळा असल्याने लेख सुखद असावेत, त्यात हिंसा, क्रौर्य, वातावरण अन् मन कलुषित करणारे लेखन नसावे, एवढीच अपेक्षा.
आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिमार्फत पाठवा, किंवा sahityasampadak डॉट mipa अॅट gmail.com या पत्त्यावर ईमेल करा. लेखन पाठवण्याची अंतिम मर्यादा- ३१ ऑगस्ट २०२१!
कविता, पाककृती, बाप्पासाठी नैवेद्य, कथा, भटकंती, फोटोग्राफी, चित्रकला .... जरूर पाठवा. यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क साधा.
टीप : श्रीगणेश लेखमालेत लेखांच्या संख्येवर आपोआप थोडी मर्यादा येते, त्यामुळे काही उत्तम लेखन या उत्सवात प्रकाशित नाही करता आले तरी आपण ते मिपा दिवाळी अंक - २०२१ साठी राखून ठेवणार आहोत. ते लेखन दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात येईल.
प्रतिक्रिया
20 Jul 2021 - 9:52 pm | गुल्लू दादा
नक्की भाग घेण्याचा प्रयत्न असेल. आयोजनाबद्दल आभारी आहे. धन्यवाद.
21 Jul 2021 - 9:05 am | ज्ञानोबाचे पैजार
गलेमा मस्त होतील यात काहीच शंका नाही.
अनेकोत्तम लेख, कथा, कविता, पाकृ आणि विडंबने या लेखमालेत वाचायला मिळो ही गणराया चरणी प्रार्थना
पैजारबुवा
21 Jul 2021 - 9:27 pm | सस्नेह
विडंबनांस पैजारमाऊलींचा कळफलक-भार लागावा, ही अपेक्षा !
31 Jul 2021 - 11:37 am | चांदणे संदीप
डिट्टो!
सं - दी - प
21 Jul 2021 - 9:28 pm | सस्नेह
गलेमाच्या मेजवानीच्या प्रतीक्षेत,
स्नेहा.
22 Jul 2021 - 6:30 am | प्रचेतस
तुमचाही लेख येऊ द्यात हो.
8 Aug 2021 - 8:44 pm | सस्नेह
प्रयत्न करत आहे :)
22 Jul 2021 - 6:30 am | प्रचेतस
उत्तमोत्तम लेखांच्या प्रतिक्षेत.
31 Jul 2021 - 2:09 pm | नावातकायआहे
बाडिस...
25 Jul 2021 - 8:44 am | जेम्स वांड
वाचन मेजवानीसाठी सरसावून बसलो आहोत.
25 Jul 2021 - 11:18 am | रंगीला रतन
उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!
1 Aug 2021 - 10:55 pm | जागु
सहभागी होणार.
2 Sep 2021 - 1:09 am | श्रीगणेशा
एक प्रश्न:
श्रीगणेश लेखमालेसाठी निवडलेले लेखन गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रकाशित केले जाते का?
3 Sep 2021 - 3:09 pm | तुषार काळभोर
गणेश चतुर्थी पासून रोज एक किंवा दोन लेख/कविता प्रकाशित केले जातात.
2 Sep 2021 - 11:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आले लगेच गणपती. गलेमासाठी शुभेच्छा आहेतच. उत्तम उपक्रम.
-दिलीप बिरुटे
7 Sep 2021 - 7:01 am | सुधीर कांदळकर
वाट पाहात आहे. धन्यवाद.
14 Sep 2021 - 11:15 pm | बिपीन सुरेश सांगळे
गणेश लेख मालेसाठी सर्व मिपाकरांना , लेखकांना अन संपादकांना खूप शुभेच्छा !