रंजन आणि कल्पनाविस्तार (३)

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
30 May 2021 - 1:42 pm
गाभा: 

भाग १

भाग २

कल्पना लढवा !
खाली एका मराठी नियतकालिकातील लेखामधले काही निवडक शब्द देत आहे. ते नीट वाचल्यानंतर काही प्रश्न विचारतो. त्यांची कल्पनेने उत्तरे द्यावीत.

शब्द :
अर्धशतकात, कमावत्या, वरचढ,
घरच्या, मनोवृत्तीत, परंपरेने,

अलिखित, कमाईवरच, निर्णयाधिकार,
सांगकाम्या, फंदात, भूमिका, समानता.

प्रश्न :
१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा.
२. लेखाला सुयोग्य शीर्षक सुचवा.

३. लेखावरून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा ( वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, ‘सांगता येत नाही’, इत्यादी)
४. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (पाच वर्षांचा टप्पा) काय असावा ?
५. लेख प्रकाशनाचे माध्यम कोणते असावे ? ( दैनिक / साप्ताहिक/ मासिक इत्यादी).

मूळ लेखाच्या शीर्षकात असलेले दोन महत्त्वाचे शब्द जाणीवपूर्वक दिलेले नाहीत. तुमच्या उत्तरांमध्ये विविधता दिसावी हा त्यामागचा हेतू आहे. प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही.
शक्यतो प्रश्न विचारू नका.

आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.

मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !
……………………………

प्रतिक्रिया

१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा.
कुटुंब/महिला अधिकार ह्या विषयावरील लेख आहे असे वाटतो आणि त्याला काही तरी आर्थिक बाजू आहे असे वाटते.
२. लेखाला सुयोग्य शीर्षक सुचवा.
अधुनिक काळांतील गृहिणीची अवस्था
३. लेखावरून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा ( वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, ‘सांगता येत नाही’, इत्यादी)
वय साधारण ४५ ते ५५ मध्ये असेल. लिंग स्त्री. लेखिका अकॅडेमिया मधील असावी असे वाटते.
४. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (पाच वर्षांचा टप्पा) काय असावा ?
मागील एक वर्ष
५. लेख प्रकाशनाचे माध्यम कोणते असावे ? ( दैनिक / साप्ताहिक/ मासिक इत्यादी).
हे सांगणे शक्य नाही.

गेल्या अर्धशतकात कमावत्या स्त्रीवर्ग वाढलाच नसून थोडा वरचढच असा वर्ग दिसतो.
घरच्या लोकांच्या मनोवृत्तीत कमालीचा बदल घडून परंपरेने
अलिखित असे काही नियम बदलून त्यांना स्वातंत्र्य दिले आहे. फक्त कमाईवरच परिणाम झाला नाही तर स्त्रीयांची निर्णयाधिकार क्षमताही विकसित झाली आहे.
स्त्रीया सांगकाम्या न राहता स्वतः च्या भूमिका मांडत असून समानता आता नांदावी.

गॉडजिला's picture

30 May 2021 - 3:57 pm | गॉडजिला

गेल्या अर्धशतकात घरातील कमावत्या व्यक्तीबाबत स्त्रीवर्गात रोष वाढलाच नसून थोडा थोडा करत भांडणे आणि आढ्यातखोरपणा यात थोडा वरचढच असा हा वर्ग झालेला दिसतो. घरच्या लोकांच्या मनोवृत्तीत कमालीचा बदल घडून परंपरेने अलिखित असे काही नियम बदलून त्यांना स्वातंत्र्य दिले आहे या भ्रमक भासातुन बाहेर पडण्याऐवजी त्यांना वादविवादात विशेष उत्साह निर्माण झाला यातुन त्यांच्या फक्त कमाईवरच परिणाम झाला नाही तर स्त्रीयांची निर्णयाधिकार क्षमताही बेबंद विकसीत झाली आहे.
स्त्रीया जरी सांगकाम्या न राहता स्वतः च्या आग्रही भूमिका मांडत असून समानता आता नांदावी या मुळे उद्देशाला हरताळ फासण्यात वरचढ होत आहेत. या जिथे अधिकारात नसतात तिथे या समानतेची सोज्वळ भुमीका घेतात पण थोडे संख्याबळ प्राप्त झाल्यास यांना काडीमोड अथवा स्वताचा राखीव फ्लॅट आवश्यक होउन जातो.

खेडूत's picture

30 May 2021 - 4:06 pm | खेडूत

१. विषय..कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष समानता शक्य आहे का
२. शीर्षक... नव्या शतकातील स्त्रीयांची आव्हाने आणि निर्णयक्षमता
३. लेखक...पन्नाशी ओलांडलेला पुरुष, व्यवस्थापन सल्लागार
४. काळ..२००० ते २००५
५. माध्यम..साप्ताहिक. किस्त्रिम परिवार, माहेर, साप्ता. सकाळ वगैरे. किंवा अश्या वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी.

टीप:
मी २००८ नंतर सर्व मुद्रित माध्यमे वाचणे बंद केले असल्याने असे लेख गेल्या दहा वर्षांत वाचलेले नाहीत! त्यामुळे अंदाज चुकण्याची शक्यता मोठीच आहे. :)

खेडूत's picture

30 May 2021 - 4:08 pm | खेडूत

१. विषय..कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष समानता शक्य आहे का
२. शीर्षक... नव्या शतकातील स्त्रीयांची आव्हाने आणि निर्णयक्षमता
३. लेखक...पन्नाशी ओलांडलेला पुरुष, व्यवस्थापन सल्लागार
४. काळ..२००० ते २००५
५. माध्यम..साप्ताहिक. किस्त्रिम परिवार, माहेर, साप्ता. सकाळ वगैरे. किंवा अश्या वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी.

टीप:
मी २००८ नंतर सर्व मुद्रित माध्यमे वाचणे बंद केले असल्याने असे लेख गेल्या दहा वर्षांत वाचलेले नाहीत! त्यामुळे अंदाज चुकण्याची शक्यता मोठीच आहे. :)

गुल्लू दादा's picture

30 May 2021 - 5:32 pm | गुल्लू दादा

विषय:- स्त्री-पुरुष समानता

शीर्षक:- वेळेची समानता

लेखकाबद्दल:- स्त्री, 30-35 वयोगट, 10 वर्ष आधी तिने कष्ट करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. आज तिची यशोगाथा आपण सगळे वाचत आहोत.

काळ:- 2016 ते 2021

माध्यम:- दैनिक (सदर:- माझी संघर्षगाथा).

टीप:- कुमार सरांनी कल्पित लेख विचारला नसला तरी माझी कल्पना इथे चिटकवत आहे. धन्यवाद ;)

'कमावत्या' नवऱ्याची चिता समोर जळत होती. मागे फक्त 2 लेकरं आणि पोटाचा प्रश्न ठेवून तो चालता झाला झाला होता. 'परंपरेने' चालत आलेला व्यवसाय करावा असा विचार तिच्या मनात आला. पण सासरच्या लोकांना 'अलिखित' नियम मोडला असे वाटेल. गेल्या 'अर्धशतकात' बरीच स्त्री-पुरुष 'समानता' आली. पण, यांच्या 'मनोवृत्तीत' कधीच बदल व्हायचा नाही. ही आपल्याला 'वरचढ' ठरू पाहते असे त्यांना वाटेल. नवरा होता तेव्हासुद्धा आपल्याला 'निर्णयाधिकार' नव्हताच. त्याच्या 'कमाईवरच' गुजराण करायची. स्त्री सुद्धा कमाई करू शकते ही 'भूमिका' यांना कधी रुचलीच नाही. 'सांगकाम्या' सारखं पडेल ते काम 4 भिंतीत आटपायचं. पण आता नाही. या 'घरच्या' 'फंदात' आपण पडायचं नाही. सर्व बंधने झुगारून तिने नवऱ्याच्या सायकलला पायडलं मारलं आणि जोरात आरोळी ठोकली, "भाजी घ्या भाजी".

गुल्लू दादा's picture

31 May 2021 - 9:00 am | गुल्लू दादा

वयोगट:- 50 ते 55 असे वाचावे.

कुमार१'s picture

30 May 2021 - 6:04 pm | कुमार१

आतापर्यंत....
सर्वांनीच आपापल्या मनातले आणि अगदी मनापासून लिहिलेले आहे.

त्याबद्दल अंतरिम आभार !

कुमार१'s picture

31 May 2021 - 10:58 am | कुमार१

तीन तास मुदत आहे

निवडणुकीत जेमतेम झालेल्या जागांच्या अर्धशतकात काकांना सत्ता भलतीच दूर भासत होती, गेली पाच वर्षे सगळ्या कमावत्या वाटा बंद झालेल्या होत्या आणि "ना खाउंगा ना खाने दूंगा" म्हणणारे वरचढ झाले होते.

स्वतःच्या घरच्या लो़कांबद्दल सुध्दा आता काही खात्री वाटत नव्हती, त्यांच्या मनोवृत्तीत होत चाललेले सुक्ष्म बदल चाणाक्ष काकांनी बरोबर हेरले आणि शेवटचा उपाय म्हणून परंपरेने सुरु असलेले राजकारण बाजूला ठेवत एक नवाच धोबीपछाड डाव खेळायचे त्यांनी ठरवले.

इतिहास हा नेहमी जेत्यांचाच असतो हा अलिखित नियम त्यांना चांगलाच ठाउक होता, पण यशस्वी जुगार खेळण्यात त्यांचा हात कोणीच धरु शकत नव्हते. शिवाय यापूर्वी केलेल्या कमाईवरच आता गदा यायची चिन्हे स्पष्ट दिसू लागली होती, त्यांना चहुबाजूने घेरण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली होती. शेवटी त्यांनी सगळी लाज शरम बा़जूला ठेवत आपला निर्णयाधिकार वापरला आणि अनेक तडजोडी आणि तोडफोडी करत सत्ता पदरात पाडून घेतली.

मला "मैद्याचे पोते" असे लाडाने म्हणणार्‍या तुझ्या बाबांचे स्वप्न आपण पूर्ण करुया असे सांगत, एका सांगकाम्याला त्यांनी पदावर बसवले आणि सर्वोच्च पदाच्या फंदात न पडता सुध्दा सगळे लोणी आपल्याच ताटात पडेल याची पक्की सोय करुन घेतली. आता सोयिस्कर रित्या सल्लागाराची भूमिका बजावायला ते मोकळे झाले होते. त्यात ही आपण समानता कशी जपली ये उच्चरवाने जनतेला सांगायला मात्र ते विसरले नाही.

लेखक :- सुमार तस्कर

वर्तमान पत्र :- अर्थातच "टॉयलेट पेपर"

काळ :- बहूतेक सकाळची घाईची वेळ "हग्रलेख टाकायची"

पैजारबुवा,

सौंदाळा's picture

31 May 2021 - 12:07 pm | सौंदाळा

कहर,
फुटलो :)

बेकार तरुण's picture

31 May 2021 - 12:17 pm | बेकार तरुण

लोल....
प्रचंड हसलो :)

Bhakti's picture

31 May 2021 - 1:09 pm | Bhakti

अगं आई गं ;);)
खरच मैद्याचे पोते म्हणत का? गुगलवर सर्च केले :) इन्टरेस्टिंग नाव !

बबन ताम्बे's picture

31 May 2021 - 1:25 pm | बबन ताम्बे

जबरदस्त कल्पना विस्तार केलाय !!

गॉडजिला's picture

31 May 2021 - 1:59 pm | गॉडजिला

_/\_

हा हा हा.....

संजय पाटिल's picture

31 May 2021 - 2:06 pm | संजय पाटिल

असला कल्पनाविस्तार फक्त पैजारबुवाच करू शकतात...

अनन्त्_यात्री's picture

31 May 2021 - 2:14 pm | अनन्त्_यात्री

असे अफलातून "कर्व्ह फिंटिंग" करणे व इतकी छप्परतोड कल्पनाभरारी मारणे केवळ आपल्यालाच जमू शकते_/\_

गुल्लू दादा's picture

31 May 2021 - 2:17 pm | गुल्लू दादा

भारी एकदम;)

खेडूत's picture

31 May 2021 - 2:22 pm | खेडूत

एकदम भारी बुवा...
तुम्ही आमचा दिवस सुंदर बनवलाय!
आता मूळ उत्तराची उत्सुकता फार कमी उरली आहे. :)

नावातकायआहे's picture

31 May 2021 - 4:05 pm | नावातकायआहे

बाडिस!

Bhakti's picture

31 May 2021 - 5:03 pm | Bhakti

बाडिस
कालपासून मुड खुपचं खराब होता,पैजरबुवांचा कल्पनाविलास वाचून लयी हसू आले :)

गणेशा's picture

31 May 2021 - 2:24 pm | गणेशा

हा हा हा

तुषार काळभोर's picture

31 May 2021 - 5:18 pm | तुषार काळभोर

२०२१- प्रतिसाद ऑफ द यिअर!

कुमार१'s picture

31 May 2021 - 1:41 pm | कुमार१

उत्तरांमधील विविधता आणि कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्यांमुळे एकंदरीत धमाल येत आहे !

यास्तव मुदत अजून ३ तास वाढवण्यात येत आहे .... :))))
धन्यवाद !

वामन देशमुख's picture

31 May 2021 - 3:50 pm | वामन देशमुख

😂

प्रकाश घाटपांडे's picture

31 May 2021 - 4:24 pm | प्रकाश घाटपांडे

स्त्री मुक्ती की मुक्त स्त्री?

कुमार१'s picture

31 May 2021 - 4:31 pm | कुमार१

अजून भराऱ्या..

आज भाप्रवे १८०० ला समारोप करूयात .

तुषार काळभोर's picture

31 May 2021 - 5:22 pm | तुषार काळभोर

माउलींनी धाग्याचा आधीच निकाल लावलाय (पन इंटेंडेड)

तरी..

१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा. >> स्त्रियांचं आर्थिक स्वातंत्र्य
२. लेखाला सुयोग्य शीर्षक सुचवा. >> आजच्या कमावत्या स्त्रीचं कौटुंबिक व सामाजिक स्थान

३. लेखावरून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा ( वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, ‘सांगता येत नाही’, इत्यादी >> ५०+, महिला, उच्च मध्यमवर्गीय, आर्थिक सुस्थितीत, कदाचित नावाजलेल्या विद्यालायात प्राध्यापिका, सुशिक्षित व आर्थिक सुबत्ता असलेली किमान दुसरी पिढी.
४. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (पाच वर्षांचा टप्पा) काय असावा ? >> १९८०-१९८५
५. लेख प्रकाशनाचे माध्यम कोणते असावे ? ( दैनिक / साप्ताहिक/ मासिक इत्यादी). >> दिवाळी अंक

कुमार१'s picture

31 May 2021 - 5:58 pm | कुमार१

सर्वच प्रतिसादकांचे मनापासून आभार !

तुमचा प्रत्येकाचा कल्पनाविस्तार स्वतंत्र व सुरेख आहे. कोणीही आधीचा प्रतिसाद बघून लिहिलेले नाही हे विशेष.

बुवांनी जी थेट उत्तर ध्रुवावर भरारी मारली त्याला सलाम !
त्याने धाग्याचा हेतू अगदी सार्थ झाला.

आता....
केवळ औपचारिकता म्हणून मूळ लेखाबद्दल माहिती :

शीर्षक : पुरुष आणि घरकाम ?
विषय: पतीपत्नी दोघेही मिळवते असले तरी घरकामातील पतीचे योगदान कमीच असणे. इथे समानता येण्याची गरज.

2002 मध्ये दैनिकात प्रकाशित.
लेखक : ४०+ शहरी पुरुष.

गुल्लू दादा's picture

31 May 2021 - 7:06 pm | गुल्लू दादा
गुल्लू दादा's picture

31 May 2021 - 7:07 pm | गुल्लू दादा
कुमार१'s picture

1 Jun 2021 - 7:53 am | कुमार१

हव्या आहेत.

अजून काही दिवसांनी नवा खेळ देताना स्वतंत्र धागा काढण्याऐवजी इथेच पुढे चालू करावे असे वाटते.
म्हणजे धाग्यांची संख्या उगाचच वाढत जाणार नाही.

शाम भागवत's picture

1 Jun 2021 - 8:34 am | शाम भागवत

धाग्यांची संख्या वाढली तरी चालेल, पण प्रत्येक खेळ वेगळाच असावा. पुढे सुध्दा कोणालाही कल्पनाविलास करता येऊ शकेलच की.
जर प्रमाण खूपच वाढलं व खूपच लोकप्रीय झालं तर त्यासाठी एक वेगळा विभाग केला की पुरेल.

कुमार१'s picture

1 Jun 2021 - 10:32 am | कुमार१

धन्यवाद !

दरवेळी नव्या धाग्याचा अजून एक फायदा दिसून आलेला आहे.
तो म्हणजे दरवेळी काही नवे वाचक यात सामील होत आहेत.

गणेशा's picture

1 Jun 2021 - 10:39 am | गणेशा

बरोबर..

त्याच बरोबर, चित्रा वरून कल्पना विस्तार जास्त मनोरंजक वाटला..
त्यामुळे शब्दा पेक्षा चित्रे जास्त असल्यास अजून मज्जा येईल..

धन्यवाद...

लई भारी's picture

1 Jun 2021 - 9:01 pm | लई भारी

नविन धागा असेल तर बरे पडेल.
यावेळी उशिरा बघितला पण चित्राची कल्पना जास्त चांगली आहे.