फारसी , बेने इस्राएली

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
27 May 2021 - 4:46 pm
गाभा: 

फारसी , बेने इस्राएली भाषा , शोध आणि बोध

मिपाचं नुकत्याच झालेलय ऑनलाईन भेटीत श्री मनो यांनी एक उल्लेख केला आहे ( ते करीत असलेल्या एका फारसी पुस्तकांचे मराठी भाषांतर ) त्यात त्यांनी कुठेतरी असे म्हणाल्याचे मला स्मरते ते म्हणजे " महाराष्ट्रातील काही कोकणस्थांची आडनावे फारसी आहेत ..:
तर थोडे त्यासंबंधी
- मराठी मध्ये फारसी शब्द आहेत आणि ते फारसी आहेत हे कदाचित कळत हि नाही हे जरी खरे असले तरी अशी आडनावे फारसी आहेत ?
मी ऐकले ते चुकीचे होते कि त्यांनी खरे तसेच म्हणले ?
तसा काही संधर्भ / उदाहरण मनो तुम्ही द्याल का ... एक कुतूहलाचा विषय म्हणून विचारतोय
बर या संधर्बाहत बघायला गेला तर "कोकणस्थांचे मूळ कोणते " यात इतके वेगळ्या दिशेचे शोध / विधाने ऐकली आहेत .. त्यात ते पर्शिया तुन आले पासून ते ते मूळचे जु इथपर्यंत
( सध्या म्हणजे जर कोना इरानिया किंवा इस्राएलीमाणसाला सांगितले कि तुम्ही मूळचे एकच तर त्यन्न भोवळ नक्की येईल )
- https://www.youtube.com/watch?v=ZR8DC7y2Uj0 हा विडिओ पहा कोणाला रस असल्यास .. यातील सादरकर्ते कोकणस्थांचा संबंध जु धर्माशी लावतात ...
- पण जगात जु भारतीय दिसणारे पण आहेत आणि इथिओपिअन पण आहेत आणि गोरे युरोपिअन पण आहेत ! त्यामुळे ती थेअरी पण काही फारशी पटत नाही

खरं काय कोण जाणे

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

27 May 2021 - 5:29 pm | सौंदाळा

कोकणातील लोकांशी कोकणस्थ ब्राह्मणांची शारीरीक वैशिष्ट्ये मिळती जुळती वाटत नाहीत त्यामुळे ते मुळचे कोकणातले नसावेत.
अभ्यासक अजुन सांगु शकतील.

कोकणस्थांचे मूळ कोणते?
अंबाजोगाईचा काय संबंध ते पण जाणकारांनी सांगावे.

चौकस२१२'s picture

28 May 2021 - 4:53 am | चौकस२१२

हे हि एक कोडंच आहे... कोकण कुठे आणि अंबेजोगाई कुठे! अर्थात महाराष्टरातील कायस्थ प्रभू चे कुलदैवत कलकत्याच्या कालीमाता हि असते ,, पण निदान त्यात काही तरी तर्क दिसतो कारण बंगालात कायस्थ आहेत

माहितगार's picture

27 May 2021 - 6:27 pm | माहितगार

आजच्या काळात अन्सेस्ट्री जेनेटीक टेस्टींग सहज साध्य व्हावे आणि बर्‍याच कोकणस्थ मंडळींना ते आर्थिक दृष्ट्या शक्यही व्हावे. किमान काही कुटूंबात खर्च शेअर करून तसे करण्यास हरकत नसावी . इतर चर्चा होऊन गेल्या आहेत आता तंत्रज्ञानाचा मार्ग काय तो शिल्लक असावा.

गॉडजिला's picture

27 May 2021 - 7:08 pm | गॉडजिला

आता तंत्रज्ञानाचा मार्ग काय तो शिल्लक असावा.
तो तर सगळ्यात जास्त गोंधळ दायक, भल्या पिढ्यान पिढ्या अभिमानी असणार्‍या फिरंग्यांचे पुर्वज आफ्रिकन चायनिज अन अजुन बरेच कोण कोण निघाल्याने त्याना बसलेला धक्का दाखवणारी क्लिप फिरत होती... तंत्रज्ञान काही म्हणजे काहीच लपवुन ठेवत नाही. :)

सुबोध खरे's picture

27 May 2021 - 7:45 pm | सुबोध खरे

डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे यात कोकणस्थांच्या उदगमा पासून त्यांच्या जनुकीय क्रम आणि डी एन ए बराच उहापोह केला आहे.

हे काही काळ मिपावर सक्रिय हि होते.

https://www.bookganga.com/ebooks/Books/details/5034106587215189051?BookN...

चामुंडराय's picture

27 May 2021 - 9:05 pm | चामुंडराय

हे डॉ. जय दीक्षित वेगळे दिसताहेत.
हे द्विभुक्त डाएटवाले डॉ. जगन्नाथ दीक्षित नाहीत बहुधा.

गॉडजिला's picture

27 May 2021 - 7:02 pm | गॉडजिला

आणि त्यांचि राजभाषाहि काही काळ फारसीच होती... जाणकारांनी या माहितीत तथ्य आहे का नाही ते अवश्य स्पष्ट करावे

माहितगार's picture

27 May 2021 - 8:16 pm | माहितगार

हे एका विदुषीच तुलनेने अलिकडील पर्यंतच्या संशोधनावर आधारीत स्कीन पिगमेंटेशन उत्क्रांती बाबत अत्यंत रोचक व्याख्यान आहे. दुवा एवढ्यासाठी देतोय की स्कीन पिगमेंटेशन आणि इतर शारीरीक फिचर साधर्म्यावरून निष्कर्षांच्या उड्या मारणे निष्कर्ष घाई न करणे श्रेयस्कर असावे.

जेनेटीक स्टडी हा त्यातल्या त्यात उत्तम मार्ग आहे अर्थात त्या शास्त्रासही बरीच प्रगती करायची आहे. पण आत्तापर्यंतच्या संशोधनावरून तुमचे पुर्वज कुठकुठल्या ठिकाणी फिरुन आले तरी जेनेटीकली मुख्यत्वे एकाच मानवॉ वंशाचे आहेत.

http://www.misalpav.com/node/28816

त्यात चित्पावन ब्राह्मण व्यक्तींच्या इ.स. ८५० मधे सापडलेल्या सांगाड्यांबद्दल लिहिले आहे. चित्पावनांचा यानंतरची महाराष्ट्राला असलेली नोंदकृत माहिती म्हणजे १७ व्या शतकात भट घराणे म्हणजे पेशवे घराणे. पण मग एक प्रश्न उरतो की ८५० नंतर थेट १७ व्या शतकातच या जातीबद्दलचा उल्लेख का येतो? त्यानंतरच्या ७००+ वर्षांमधे चित्पावनांबद्दल काहीच माहिती उपलब्ध का असू नये?

श्रीरंग_जोशी's picture

27 May 2021 - 8:19 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या माहितीप्रमाणे 'नवीस' आडनावात असेल तर तो शब्द फारसी आहे.

फडणवीस आडनावाबाबत बिंगून मिळालेली माहिती.

Fadnavis / Phadnis / Phadnavis Phadnavis refers to the “maker of lists,” and is derived from two Persian elements, “Fad” and “Navis.” It was an important administrative position during in the kingdoms of Maharashtra.

फडणवीस (अपभ्रंश होऊन फडणीस), पारसनविस (अपभ्रंश होऊन पारसनीस) अन कदाचित कारखानिस पण असेच असू शकेल. ही आडनावे हुद्द्यांमुळे मिळाली असल्याने कोकण, देश, खानदेश अशा सर्वच ठिकाणची मंडळी यात येत असतील.

मनो व इतर जाणकारांच्या प्रतिक्रियांची प्रतिक्षा करुया.

शेखरमोघे's picture

28 May 2021 - 5:07 am | शेखरमोघे

याच तर्‍हेची इतर आडनावे: वाकनीस ,हजरनवीस, खासनीस

चौथा कोनाडा's picture

29 May 2021 - 12:21 pm | चौथा कोनाडा

या वरुन बाटलीवाला, काचवाला, दारूवाला अशी व्यवसायावरून पडलेली पारशी / बोहरी आडनावे आठवली !

मी मागे याबद्दल लिहिले होते

http://www.misalpav.com/node/42140

पूर्वी आडनावे प्रचलित नव्हती. राज्यकारभारात फार्सीच्या वापरामुळे जी नवीन आडनावे प्रचलित झाली ती फार्सीच्या प्रभावाखाली आली असे मला म्हणायचे होते. त्यावरून भाषेचा अति-अभिमान बाळगू नये एवढेच.

इराण (फार्सी) आणि इस्राएली एकाच शीर्षकात पाहून मजा वाटली, कारण दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत.

प्रचेतस's picture

27 May 2021 - 9:39 pm | प्रचेतस

११ व्या शतकातल्या दिवेआगर ताम्रपटात घैसास इत्यादी चित्पावन आडनावे दिसतात.

चौकस२१२'s picture

28 May 2021 - 5:05 am | चौकस२१२

धन्यवाद मनो ...
बरीच आडनावे हि हुद्ययमुळे प्रचलीत झाली असावी ... संस्कृती आवडली म्हणून घेतली असे नसावे असे वाटते .. असो
बर दुसरी शंका अशी कि ... पर्शियन भाषा आणि अरबी या वेगळ्या आहेत मग त्यांची अदलाबदल कशी आणि केव्हा झाली ?
आज बघितला तर सुन्नी मुस्लिम अरबी बोलतात आणि शिया फारसी !

मी पुण्यात एक पेशवे आडनावाच्या मुलाला भेटलो , गृहीत धरले कि तो जातीने कोकणस्थ असावा , पण म्हणाला नाही मी देशस्थ आहे !
दुसरे असे कि आपण जे पुस्तक भाषान्तर करीत आहात .. साधारण त्याच धर्तीवरील एक " अंताजीची बखर " म्हणून पुस्तक आहे आठवणी प्रमाणे पानपतावरून निघून पुढे बंगाल प्रांतात गेलेला एक तरुण आणि त्याची रोजनिशी .. त्यांच्या वंशजाला मोडी मध्ये लिहिलेले जुने कागद सापडले आणि त्याचे त्यांनी भाषांतर केलं आहे ... जरूर वाचा
'किल्लेदार या नावावरून आठवले.. सासवड च्या " जाधवगड " या रिसॉर्ट मध्ये सुरवातीला देवडी मध्ये स्वागत कक्ष आहे .. तांब्याच्या चकचकीत पाट्या सगळीकडे त्यात एक पाटी होती " किल्लेदार" म्हणून मला वाटलं कि सहज किलैयासंबंधी माहिती चा भाग म्हणून लावली असावि पण ती पती "किल्लेदार = मॅनेजर " या अर्थाने होती !

फार्सी भाषा ही प्राचीन आहे, आणि फार्सी साम्राज्य इस्लामच्या उदयाच्या आधीपासून पसरले होते. सिकंदर अर्थात Alexander याच्याविरुद्ध लढणारा दरायस इराणचा राजा होता. त्यामुळं तेथील लोकांना आज धर्म जरी एकच असला तरी आपल्या वेगळ्या संस्कृतीचा अभिमान आहे. चित्रकला, गाणे, मद्य हे इराणी संस्कृतीमध्ये इस्लाम आल्यानंतरही टिकून राहिले. आपले महाभारत तसा त्यांना शाहनामेबद्दल अभिमान आहे. पण त्यांचा धार्मिक ग्रंथ कुराण अरबीत असल्याने त्याद्वारे धर्म विषयक आणि इतरही अरबी शब्द फार्सीच्या शब्दात सामील झालेले आहेत. कुराणात एकही शब्द कानामात्रा बदल न करता अगदी सर्व विरामचिन्हांसकट (नुक्ते वगरे जे इतर ठिकाणी गाळून टाकतात) दिलेला असतो, त्यामुळं अरबी शब्द टिकून राहतात. माझं तोकडं ज्ञान एवढंच आहे, कदाचित या दोन्ही भाषांचे किंवा कुराणाचा अभ्यास/पठण करणारे अजून काही सांगू शकतील.

अंताजींची बखर मुद्दामच वाचलेली नाही. कादंबरी असल्याने अर्थातच कल्पनास्वातंत्र्य घेतलेले आहे. काही जागा मग लगेच खटकतात, आणि त्याहूनही वाईट म्हणजे डोक्यात सत्य-असत्याचे एक मिश्रण तयार होते, म्हणून काही वर्षे फक्त अस्सल साधने आणि इतर संशोधनग्रंथ एवढेच वाचतो.

चौकस२१२'s picture

28 May 2021 - 6:48 pm | चौकस२१२

मला आठवतंय त्याप्रमाणे अंताजीची बखर हि कादंबरी नसावी ... रोजनिशी चे भाषांतर होते

अशी कुठलीच रोजनिशी नाही. इथे पाहिलत तर कादंबरी असंच म्हणलं आहे.

https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5689184093560571799

लेखनशैलीवरूनही ते उघड आहे. तुम्हाला खरी वाटली यात लेखिकेचे यश म्हणावे लागेल.

एकंदरीत कट्ट्यानंतर चांगले धागे मेन बोर्डावर दिसतायत, चला हा पण फायदा दिसतो आहे भेटल्याचा.

नंदा खरे ह्या लेखिका नाहीत तर लेखक आहेत.

हो, प्रतिसाद देण्याच्या गडबडीत चूक झाली :-) लेखक असे वाचावे.