हे कोणी सांगेल का?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
28 May 2021 - 7:10 am
गाभा: 

करोना आणि लॉकडाऊनसंबंधी या प्रश्नांची खात्रीशीर किंवा निदान बर्‍यापैकी तर्काला धरुन उत्तरे कोणी देईल का?

१) १ जून २०२१ नंतर सर्व जीवनावश्यक नसलेले या गटात येणारे व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यास परवानगी मिळू शकेल असे वाटते आहे का? समजा नसेल मिळणार तर १ जूननंतरदेखील जीवनावश्यक नसलेल्या व्यवसायांसंबंधीची दुकाने/आस्थापने खुली करण्यास असणारी मनाई ही त्यानंतर किती दिवस वाढवली जाऊ शकेल असे वाटते आहे?

२) १ जूननंतर जीवनावश्यक नसलेले व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी न दिल्यास व्यापारी काय करु शकतात? करोना पसरला तर त्याची जबाबदारी संबंधित व्यापारी घेणार आहेत का? या प्रश्नावर व्यापार्‍यांकडे खात्रीशीर उपाय/उत्तर आहे का?

३) लसीकरण हाच जर करोनावरचा खात्रीशीर इलाज असेल तर संपूर्ण भारत देशाचे लसीकरण पूर्ण व्हायला किती महिने/वर्षे लागू शकतात? इतका कालावधी जीवनावश्यक नसलेले व्यवसाय राज्य/केंद्र शासन बंद ठेवेल का?

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 May 2021 - 9:39 am | माईसाहेब कुरसूंदीकर

आणखी १५ दिवस लॉकडाउन वाढ्वला जावा असे आमचे मत आहे. लॉकडाउन उठण्यासाठी व्यापारी उतावीळ झाले आहेत हे मान्य मात्र भारतात सर्वात जास्त करोना मृत्यु महाराष्ट्रात आहेत हे लक्षात घ्यायला हवे.

गॉडजिला's picture

28 May 2021 - 12:01 pm | गॉडजिला

आणी कदाचित जुनचा पहिला आठवडा लोकडोवन जैसेथेच असेल

रात्रीचे चांदणे's picture

28 May 2021 - 10:03 am | रात्रीचे चांदणे

लसीकरण हाच जर करोनावरचा खात्रीशीर इलाज असेल तर संपूर्ण भारत देशाचे लसीकरण पूर्ण व्हायला किती महिने/वर्षे लागू शकतात? इतका कालावधी जीवनावश्यक नसलेले व्यवसाय राज्य/केंद्र शासन बंद ठेवेल का?

करोना ची साथ संपण्यासाठी कदाचित संपूर्ण भारत देशाचे लसीकरण करण्याची गरज नसावी, ठराविक लोकसंख्येचे लसीकरण झाले की साथ आपोआप आटोक्यात येईल. लोकसंख्येच्या किती प्रमाणात लसीकरण झाले की साथ आटोक्यात येईल हे त्या क्षेत्रातील तज्ञच सांगू शकतील.

भारतात कशाचाच योग्य आणि नीट नेटका डाटा नाही.
१) टेस्ट किती झाल्या हे सांगतील .पण त्या मध्ये rt pcr test किती केल्या आणि antigen टेस्ट किती केल्या ह्याची माहिती मिळणार नाही.
२) corona मुळे मृत्यू किती झाले ह्याचा खरा आकडा खूप साऱ्या राज्यांनी लपवलं आहे त्या मुळे कोणत्या राज्यात किती corona ni नी मृत्यू झाले ह्याची खरी माहिती सरकार कडे नाही.
कोणतीच खरी माहिती नसेल अर्धवट माहिती असेल तर तज्ञ लोकांचे अंदाज चुकतात त्यांना कोणताच निष्कर्ष काढता येत नाही.
जागतिक संस्था भारतावर ह्या मुळे तर नाराज आहेत.

पिनाक's picture

28 May 2021 - 12:11 pm | पिनाक

1.1. https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/uttar-pradesh-up-cm...

1.2. सरकार नंबर देतंय
ICMR chief Balram Bhargava on Thursday said India would do 45 lakh tests daily by the end of June in which RATs would account for 27 lakh tests (60 percent) and RT-PCR Tests would account for 18 lakh tests (40 percent).

As on May 14, out of a capacity of about 19 lakh daily tests in the country, 12 lakh tests are being done through the RT-PCR mechanism, translating to over 60 percent and RAT’s account for 7 lakh tests.

1.3. https://www.moneycontrol.com/news/india/govt-now-prefers-rapid-antigen-t...

2. चला हे खरं आहे असं म्हणूया. तर खरा आकडा किती आहे? आणि तो कसा calculate केला? एखादं उदाहरण?

3.

जागतिक संस्था भारतावर ह्या मुळे तर नाराज आहेत.

कोणत्या जागतिक संस्था? नक्की कुठल्या पत्रकात / पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलंय की त्या नाराज आहेत?

पुण्यात तरी सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत, तेव्हा अज्जन 15 दिवस तरी lockdown असणार आहेत हे नक्की आहे

श्रीगुरुजी's picture

30 May 2021 - 2:13 pm | श्रीगुरुजी

एका नगरसेवकाने सांगितले की टाळेबंदी उठविली तर राखीव जागांसाठी मराठा संघटना मोर्चे काढतील व आंदोलन करतील आणि त्यातून पुन्हा एकदा प्रसार वाढेल. त्यामुळे वातावरण थंड होईपर्यंत टाळेबंदी सुरू राहील.

आणि डिसेंबर पर्यंत कडक निर्बंध लागू करा करा.अंतर राज्य वाहतूक पूर्ण बंद,अंतर जिल्हा वाहतूक पूर्ण बंद.तरच भारत corona मुक्त होईल.
अंतर राष्ट्रीय वाहतूक oneway ठेवा फक्त भारत सोडून कुठे हो जावू शकतं.पण भारतात प्रवेश करता येणार नाही.
अजागळ प्रशासन असलेल्या ह्या देशात लसीकरण कधीच पूर्ण होणार नाही.
लस येईल आणि corona जाईल ह्या खूपच मोठ्या अपेक्षा झाल्या .

गॉडजिला's picture

30 May 2021 - 2:39 pm | गॉडजिला

रेशन द्या, मोबाइल रिचार्ज द्या अन घरात गप पडुन रहा. लस घरात येउन दिली जाइल.

माझा परिचित आजारी आहे कोरोनाने. त्याला रोज तब्येत चौकशीचा फोन येतो पालिकेकडुन, रिसीव्ह नाही केला तर पुन्हा तासाभराने खणाणतो, मग तीथे लक्षणे / प्रश्न विचारले जातात ज्याला बटने दाबुन येस अथवा नो मधे रिप्लाय द्यायचा असतो... आता यासाठी रोज ३ मिनिटे जातात व हा फोनही यांत्रीक असतो सर्विस सेन्टरच्या फोन प्रमाणे... आता त्याला रेकोर्डेड प्रश्न व क्रम पाठ झालेत त्यामुळे फोन आला की काहीही न ऐकता तो पाच वेळा २ हे बटन दाबुन १० सेकंदात चौकशी करणारा यांत्रीक फोन कट करुन टाकतो. त्याच्याकडे तपासणील येणार्‍यास पिपिई किट बंधनकारक आहे ज्याचे रुपये ५०० पेशंटला म्हनजेच मित्राला द्यावे लागतात. पहिल्या दोन विसीट नंतर पिपिइ किट घातले गेले नाही व त्याबदल्यात मित्राकडुन रुपये १०० फक्त घेतले गेले... सगळंच साटंलोटं... त्याला विनंती केली बाबा हे किटचे ५०० आणी वरुन हे १०० खास तुला...पण किट घालत जा म्हटले तरीही काही फरक पडला नाही आता जर हे असेच चालणार असेल तर साथ आटोक्यात येणार ?

रात्रीचे चांदणे's picture

30 May 2021 - 2:57 pm | रात्रीचे चांदणे

किती दिवस घरात बसणार? लसीकरण हाच एक उपाय सध्यातरी दिसतोय. नाही नाही म्हणता 21 कोटी लसींचे डोस आत्तापर्यंत दिलेत. काही दिवसांनी स्पुटनिक च्या लसींचे पण उत्पादन भारतात सुरू होईल. भारत बायोटेक पण उत्पादन वाढवतय. Pfizer, moderna बरोबर पण बोलणी चालू आहे. कदाचित सरकार म्हणतेय त्याप्रमाणे डिसेंम्बर अखेर बहुतांश लोकांचे लसीकरण होऊन करोना आटोक्यात येईल.

कदाचित डिसेंबर पर्यंत लसीकरण पूर्ण होईल पण.
1) पण लस दिल्या नंतर मिळणारे संरक्षण सात आठ महिनेच टिकते असे सांगतात.
लसीकरण पूर्ण होण्याच्या आत च सुरवतीला लस घेतलेल्या व्यक्ती ना लसी मुळे corona पासून मिळणारे संरक्षण मिळणार नाही.
ते रोगाला परत बळी पडतील .आणि साथ continued राहील.
२) व्हायरस बदलत जात आहे लसी ला पण न जुमानता रोग प्रसार करण्याची क्षमता व्हायरस प्राप्त करेल.
परत सर्व प्रयत्न विफल होईल.
पण लॉक down मुळे प्रसार पूर्ण थांबेल variant निर्माण होणारच नाही.
आताच सर्वांनी बघितले लॉक down मुळे देशातील बाधित लोकांची संख्या प्रचंड कमी झाली आहे.मुंबई मध्ये तर हजार पेक्षा कमी रोज ची संख्या आहे.
लसी मुळे असा जबरदस्त रिझल्ट मिळेल का.