आमच्या सोसायटीत कुत्र्यांचा भरपूर त्रास आहे. कुत्री प्रेमी भटक्या कुत्रांना अगदी घरात ३ ऱ्या ४ थ्या मजल्यावर नेऊन खायला देतात. त्यामुळे त्या कुत्र्यांना आता सवय लागली आहे. येता जाता मग ती कुत्री जिन्यात लोकांच्या दारासमोर घाण करत आहेत. ती घाण काढणे हा माझा रोज सकाळ चा कार्यक्रम झालाय. पुणे मनपा ला कळवले तर त्यांनी कुत्री पकडून त्यांची नसबंदी करून परत आमच्या सोसायटीत सोडून दिली. कुत्र्यांचे भुंकणे हे त्यांची नैसर्गिक गोष्ट आहे तिच्यात पालिका काही करू शकत नाही असे मला सांगितले गेले आहे.
आपल्या संविधानात आर्टिकल ५१ (a) g आहे. त्यानुसार
to protect and improve the natural environment including forests, lakes, rivers and wild life, and to have compassion for living creatures;
या नुसार आपण या कुत्रे प्रेमींना त्यांना सोसायटीत वा घरात घेणे , खायला देणे यावर बंधने आणू शकत नाही. आता खरे तर संविधानातील आर्टिकल हे आपण कसे interpret करतो त्यावर बरेचसे अवलंबून आहे. कुत्रे प्रेमींनी रस्त्यावरील एकेक कुत्रे स्वतः रीतसर पाळावे आणि त्याच्या साठी आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करून घ्यावी आणि सोसायटी स्वच्छ राहील असे बघावे असे आम्ही त्यांना सुचवले. पण ते घरी कायमचे कुत्रे पाळण्यास तयार नाहीत. कुत्रे प्रेमींना कुत्र्यांना खायला घालायचे असेल तर हरकत नाही पण ते त्यांनी रस्त्यावर सोसायटीच्या बाहेर घालावे अशी विनंती आम्ही आमच्या सोसायटीतील कुत्रे प्रेमींना केली. पण त्यानी ५१ A (g ) चा आधार घेऊन आम्ही त्यांना अडवू शकत नाही असे सांगितले. मी वकिलाचा सल्ला घेतला तर जवळपास सर्व कायदे प्राणी प्रेमींच्या बाजूने आहेत असे समजले.
इलेक्ट्रॉनिक डॉग रिपेलंट वापरायचा माझा विचार आहे. पण हे कितपत परिणामकारक असतात ते इथे कोणास माहित आहे का ? आणि जर मी हे रिपेलंट वापरले तर आर्टिकल ५१ A (g) चा भंग केल्या सारखे होईल का ?
यावर मध्यम मार्ग कोणता ?
शिवाय "एक नागरिक म्हणून आपल्याकडून समाजातील इतर लोकांना उपद्रव होणार नाही अशी दक्षता मी घेईन " अशा अर्थाचे ही काही आर्टिकल संविधानात आहे का ?
प्रतिक्रिया
25 May 2021 - 9:55 am | Ujjwal
जास्त त्रास होत असेल तर गुपचूप पेढा द्या
25 May 2021 - 3:17 pm | पिनाक
कुत्रेप्रेमी लोकांना पण पेढा द्यायला हवा असे माझे मत आहे.
25 May 2021 - 10:04 am | प्रकाश घाटपांडे
बाकी काही नसल तरी स्वच्छता या मुद्द्यावर कायद्याचा नक्की सपोर्ट असेल. बाकी श्वान द्वेष्टे श्वानप्रेमी व श्वानतटस्थ असे लोक समाजात आदिम काळापासून आहेत.
25 May 2021 - 10:15 am | सुबोध खरे
आपल्या घराच्या आसपास किंवा दारासमोर कुत्रे बसत असतील तर आपल्या दारासमोर/ जिन्यात डांबर गोळ्यांचे (नॅपथॅलीन) बारीक तुकडे करून ठेवा.
त्याचा उग्र वास कुत्र्यांना सहन होत नाही. यात कोणत्याही कायद्याचा भंग होत नाही.
हा उपाय बहुसंख्य वेळेस काम करतो असा माझा स्वानुभव आहे.
25 May 2021 - 10:53 am | बापूसाहेब
खरे सरांनी सांगितलेल्या उपयाचा फायदा होतो. पण काही दिवसांनी पुन्हा पुन्हा त्या गोळ्या ठेवाव्या लागतात.
तसेच त्याचा वास उग्र असल्याने, बंदिस्त पैसेज, पार्किंग इ ठिकाणी आपल्याला देखिल त्रास होउ शकतो.
डॉग रेपलंट तुमच्या फ्लॅट च्या किंवा पार्किंग जवळ लावल्यास कोणी आक्षेप घ्यायचा प्रश्न नसावा. पण ते कितपत परिणामकारक आहे ते जाणकार सांगु शकतील.
माझ्या या धाग्यावर याआधी बराच उहापोह झालेला आहे. पण सोलुशन काही निघत नाही.
एकवेळ कुत्रे परवडले.. पण कुत्रप्रेमी लोक नको.
https://www.misalpav.com/node/44838
25 May 2021 - 11:10 am | ज्ञानोबाचे पैजार
खरेतर कुत्तरडी, मांजरड्या आणि कबुतरे पाळीव असो किंवा भटकी नुसती दिसली तरी डोक्यात जातात.
आता विषय भटक्या कुत्र्यांचा आहे म्हणून त्यांच्या बद्दलच बोलू, पाळीव प्राण्यांच्या मालकांबद्दल लिहायला लागलो तर मिपाचा सर्व्हर कमी पडेल (आणि मालकिणींबद्द्ल लिहायला घेतले तर.... जाउ दे... सध्या विषय वेगळा आहे...)
खरेतर ही भटकी कुत्तरडी परवडतात कारण ती थोडी तरी सभ्य असतात, त्यांना "हाड" म्हटले की ते लांब तरी जातात पण त्यांना खायला घालणार्या भटकेकुत्रप्रेमी लोकांना मात्र दुरुनच नमस्कार करावा कारण हे लोक सदानकदा आवेशातच वावरत असतात, त्यांना काही सांगायला गेले की भुंकतच अंगावर येतात, यांच्याशी जास्त भांडण करायला ही नको वाटते कारण रागाच्या भरात हे लोक चावायलाही कमी करणार नाहीत अशा अविर्भावातच ही मंडळी आपल्यावर गुरगुरत असतात.
हे आर्टिकल ५१ ए जी वगेरे सांगणे हा याच उद्दम पणाचा एक प्रकार आहे.
कुत्तरड्यांना खायला घालताना त्यांच्या चेहर्यावर असे भाव असतात की आपण हे फारच महान कार्य करत आहोत. कुत्तरड्यांशी ही मंडळी गप्पा काय मारतात त्यांना कुरवाळतात काय? हे दृष्य नुसते पाहिले तरी ओकारी येते.
खरे तर या भटक्या कुत्र्यां मधे आणि गल्लीतल्या गुंडांमधे काही फरक नसतो. सार्वजनिक शांततेचा भंग करणे आणि दहशत माजवण्याचे काम हे दोन्ही घटक इमाने इतबारे करत असतात. भटक्या कुत्र्यांना खायला देणारी ही मंडळी उद्या भूत दया म्हणून गल्लीतल्या गुंडांचे मुके घ्यायलाही कमी करणार नाहीत.
या भटकेकुत्रप्रेमी लोकांकडे जेवढे दुर्लक्ष होईल तेवढे ते माजत जाणार आहेत. बघाना... पूर्वी मनपा भटक्या कुत्र्यांना पकडून नेउन मारुन टाकत असे. आता या लोकांच्या दहशती मुळे फक्त त्यांची नसबंदी करुन त्यांना स्वगृही परत पाठवतात. (हे नसबंदी करणे तरी कितपत विश्वासाहार्य असते कोण जाणे? कारण नसबंदी झाल्याची कोणतीही खूण मनपा या कुत्र्यांवर करत नाही.) (खरतर नसबंदी केलेल्या कुत्तरड्याचा एखादा पाय तोडून टाकायचा म्हणजे त्याच त्याच कुत्तरड्यांयाची पुन्हा पुन्हा नसबंदी करण्याचा खर्च मनपाला वाचवता येईल).
या भटकेकुत्रप्रेमी लोकांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर उद्या हेच लोक आपल्या डोक्यावर बसायला कमी करणार नाहीत. हे लोक उद्या असा कायदा काढतील की भटक्या कुत्र्यांना खायला घालणे, त्यांची शी काढणे, त्यांना अंघोळ घालणे हे प्रत्येक भारतिय नागरीकाची सांविधानिक जबाबदारी आहे, जर एखाद्या भटक्या कुत्र्याला तुमच्या घरत येउन तुमच्या सोफ्यावर किंवा पलंगावर लोळायची इच्छा झाली तर तुम्ही त्याला असे करण्या पासून रोखू शकत नाही.
असल्या विंचवांचा वेळीच बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे.
तुम्हाला पैसे जास्त झाले असतील तर ते डॉग रिपेलंट वगेरे घेउन बघा पण त्याचा उपयोग फार काळ होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे.
त्या पेक्षा पोतभर कुत्रखाद्य विकत घेउन त्यात पिंपभर जालिम विष ओतून ते खाद्य आपल्या घराच्या पाच किलोमिटर च्या परिघातल्या कुत्तरड्यांना खायला घाला.
अर्थात कुठेही वाच्यता न करता हे कार्य गुप्तपणे उरका. म्हणजे कमीत कमी महिनाभर तरी तुम्हाला शांतता लाभेल. या कटाचा जरा जरी वास आला तरी हे भटकेकुत्रप्रेमी तुमचे जगणे हराम करुन टाकतील. उलट जेव्हा हे लोक मेलेल्या कुत्र्यांना श्रध्दांजली वहाण्यासाठी मेणबत्त्या वगेरे लावण्याचा कार्यक्रम करतील तेव्हा आपणही तिकडे जाउन एखादी मेणबत्ती लावून यायची आणि महिन्याभराने हाच प्रयोग पुन्हा करायचा (अर्थात गुप्तपणे).
ना रहेगा बास ना बजेगी बांसुरी.
पैजारबुवा,
25 May 2021 - 3:03 pm | शलभ
नवी मुंबई मधे तरी नसबंदी केलेल्या कुत्र्याचा कान थोडा कापतात. ओळखू येतात लगेच.
25 May 2021 - 9:31 pm | तुषार काळभोर
कुत्रा द्वेष्टा असल्याने या प्रतिसादातील भावनेशी सहमत, पण प्रतिसादकर्त्याचे नाव वाचून धक्का बसला. :)
अवांतर: माध्यमात कुत्रा आणि डुक्कर यांना पॉलिटिकल करेक्टनेस दाखवून श्वान v वराह म्हणणे सुद्धा डोक्यात जाते. कुत्र्याला कुत्रा म्हणण्याने त्या कुत्र्याच्या संवेदनशील भावना दुखावल्या जातात का?
25 May 2021 - 10:16 pm | Ujjwal
खरेतर ही भटकी कुत्तरडी परवडतात कारण ती थोडी तरी सभ्य असतात, त्यांना "हाड" म्हटले की ते लांब तरी जातात पण त्यांना खायला घालणार्या भटकेकुत्रप्रेमी लोकांना मात्र दुरुनच नमस्कार करावा कारण हे लोक सदानकदा आवेशातच वावरत असतात
भटक्या कुत्र्यांविषयी असलेल्या मताशी सहमत. आणि पाळीव कुत्र्यांबद्दल बोलायचं तर कुत्र्यांपेक्षा त्यांच्या मालकांची जास्त चूक असते. कुत्र्याची नॅचरल इन्स्टिंक्ट हि अनोळखी व्यक्ती आणि लोकांवर भुंकण्याचीच असते. पण त्याला ट्रेनिंग देऊन शिकवता येते. ज्याचा भारतीय कुत्रे मालकांमध्ये अत्यंत अभाव आहे.
अन्यथा अशी कुत्री कुणाला आवडणार नाहीत ?
27 May 2021 - 9:31 pm | स्वलिखित
जलील पण पाळीव कुत्री अश्या श्वान प्रेमींच्या अंगावर सोडा , किंवा हाताळायला द्या , भूत दया 50 टक्क्याने कमी होईल ,
25 May 2021 - 11:29 am | कपिलमुनी
भटकी कुत्र्यांना विरोध करणे तात्काळ बंद करा , त्यांना जगण्याचा अधिकार आहे.
त्यांना खायला घालणार्यांना सपोर्ट करा.
आमच्या गावचे दुष्ट लोक विषारी औषध घालून कुत्रे मारायचे आणि जे खायला घालतात , त्यांच्यावर नाव घालायचे. असे करणे चुकीचे आहे.
सोसायटीत एकजणाचा कुत्रा कुठेही घाण करायचा, तर एका तिरस्ट माणसाने त्याच्या घरासमोर अपरात्री संडास केलि व कुत्र्यावर आळ घेतला. असे दोन तीन दारावर केल्यांनतर लोकांनी कुत्रा सोडायला भाग पाडले.
असे काहीही करु नये , भूतदया दाखवावी.
25 May 2021 - 1:01 pm | माहितगार
होय ना कुत्र्यांच्या उपद्व्यापाने त्रस्त होणार्या भूतांवरही जरा दया दाखवून, आपल्या सन्मान्य भूतदयेचा भाग म्हणून किती हजार लाख कुत्री दत्तक घेऊ शकाल ते पत्त्यासहीत व्हॉट्सअॅप व्हायरलने जाहीर करावे म्हणजे अखिल भारतीयांना सर्व परिसरातील कुत्री पार्सल करता येतील. हा.का.ना.का.
25 May 2021 - 3:05 pm | शलभ
हा शरद पवार स्टाईल प्रतिसाद आहे. :)
25 May 2021 - 3:10 pm | शलभ
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड होतं. ते नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे इमारतीत येणं अवघड व्हायचं. या झाडामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती.
त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे गेले. शंकररावांनी , " छेछे, हे बेकायदेशीर काम आहे. झाड न पाडण्याचा नियम आहे, तो तोडता येणार नाही. नियम आहे त्याचे पालन झाले पाहिजे. झाड पाडता येणार नाही. मी यात मध्यस्ती करू शकत नाही. प्रवेशद्वार दुसरीकडे काढा " असा सल्ला दिला
पदाधिकार्यांनी त्यांना नकाशे दाखवले जी दहाफुट चिंचोळी जागा आहे तिच्या मध्यावरच हे झाड आहे , हे पाडले तरच कुंपण आणि प्रवेशद्वार बांधता येईल ,अन्यथा खूप गैरसोय होईल हे शंकररावांना पटवण्याचा प्रयत्न केला ,पण ते काही ऐकूनच घेईनात. बेकायदेशीर कामाला मी कधीही होकार देणार नाही असे ठणकावून सांगत त्यांनी पदाधिकार्यांना मार्गी लावले.
त्या दिवशी शरद पवार नेमके दिल्लीत होते. जिथे गृहमंत्री काही करू शकत नाही तिथे दुसरं कुणी काही करीन याची काहीच शक्यता नव्हती तरी पदाधिकारी पवार साहेबांकडे गेले, त्यांना त्यांनी सगळे सांगितले. नगरपालिका झाड पाडू देत नाही, त्यांचा तसा नियम आहे हेही त्यांनी पवारसाहेबांना सांगितले.
हे ऐकून पवारसाहेबही " अरे जर पालिकेचा नियम आहे तर झाड पाडता येणार नाही. आणि मीही यात काही करू शकत नाही. उलट माझा सल्ला आहे की हे झाड पाडू नका, त्याला पार घाला, खतपाणी घालून वाढवा. झाड ही नैसर्गिक संपत्ती आहे तिचे जतन करा. मी सगळीकडे हेच सांगत असतो. पण लोक ऐकत नाहीत आमच्या बारामतीत तर काही लोक एकमेकांच्या बांधावरच्या झाडाच्या बुंध्यात मोरचुदाच्या पुड्या गाडतात. महिन्याभरात झाड मरते. मालकाला झाड का मेले, कुणी मारले ते जन्मात कळत नाही. पण त्यामुळे किती नुकसान होते हे लोकांना कळत नाही. तीअडाणी आहेत . आपण शिकलेली माणसं आहात तुम्ही झाड जपलं पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला सांगायला पाहिजे का ?" असे सुनावून आलेल्यांना चहापाणी देवून कटवले ......
पदाधिकार्यांनी पवारसाहेबांचे बोल ध्यानदेवून ऐकले होते , त्यांनी त्या झाडाला छानसा पार बांधला , त्याला ते रोज पाणी घालू लागले.अर्थात पुढच्या एक महिन्यात ते झाड आपोआप मेले, पदाधिकार्यांनी पालिकेला कळवले, पालिकेची गाडी आली आणि ते मेलेले झाड त्यांनी काढून टाकले. जागा साफसूफ करून दिली. पदाधिकार्यांनी पवारसाहेबांच्या हस्ते भूमिपूजन करून कुंपणाची भिंत आणि प्रवेशद्वार बांधून काढले. ...
धन्य ते साहेब, आणि धन्य ते राजकारण....
27 May 2021 - 9:17 pm | स्वलिखित
तेव्हा हे डिटेक्टिव्ह मीडिया नव्हते , नाहीतर तेव्हाच छडा लावला असता , पवार साहेब हुकले
25 May 2021 - 12:03 pm | माहितगार
* ५१ A (g ) नुसार कंपॅशन फॉर compassion for living creatures ठिकच आहे.
* भारतीय घटनेने वागू इच्छिणार्यांना कोणतेही स्वातंत्र्य अधिकतम पण अनिर्बंध नसावे हे विवेकपूर्ण बारकाव्यांसहीत समजून येण्यास अजून प्रगतीस बराच वाव म्हणून कालावधी आहे.
* ५१ A (g ) नुसार कंपॅशन फॉर compassion for living creatures असूनही लस निर्मीतींच्या प्रयोगात प्राणी वापरावेच लागतात, जनावरे हलाल करणे ते तामिळनाडूती जलीकट्टूसही ५१ A (g ) मधून पळवाटा शोधल्या जातातच. पण नंतरच्या दोन उदाहरणांपेक्षा पहिले लसिकरणाचे उदाहरण मनुष्यास इतर प्राण्यांपेक्षा अधिक प्राधान्यता देण्याशिवाय पर्याय नाही.
* प्रत्येक (भारतीय) व्यक्तीस जिवीत संरक्षण आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार देणार्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१ची व्याप्ती भारतीय न्यायसंस्थेने वेळोवेळी वाढवलेली आहे. त्याचाच आधार घेऊन रात्री दहा नंतर ध्वनीप्रदुषण करू नये सारखे नियम बनले आहेत.
* भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१ची व्याप्ती वाढूनच तुमचा खासगीपणाचा आधिकार घटनात्मक अधिकार झाला आहे. आणि हा खासगीपणाचा आधिकार केवळ घरातच नव्हे तर सार्वजनिक स्थानीसुद्धा विस्तारीत होतो. अर्थात या नव्या प्राप्त व्याप्तीचा उपयोग करून ५१ A (g ) शी बॅलन्स साधून देण्याची मागणी कुणी कुत्रात्रस्त व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात जाऊन करत नाही तो पर्यंत या बद्दल कुत्रात्रस्त व्यक्तींसाठी कायदेविषयक लढाई कठीणच राहील.
* पैजार बुवांनी सांगितलेला उपाय आहे पण तसा उद्देश्य ठेऊन वर्तन कायदेशीर दृष्ट्या जोखीमीचे होऊ शकते पण पालिकेला परिसरात उंदरांचा वावर वाढला असून प्लेगची भिती वाढल्याची नोटीस देऊन उंदीर विरोधी बंदोबस्त कायद्याच्या मर्यादेत बसावा असा अंदाज आहे पण कायदेतज्ञांकडून खात्री करून घेणे श्रेयस्कर असावे.
* लॅटरल थिंकिंग वापरावयाचे झालायस एक वेगळा उपाय असा कि एखाद्या गोष्टीचे टोक गाठले गेल्या शिवाय जनता बर्याचदा भानावर येत नाही त्यासाठी आर्थिक आणि व्यवस्था दृष्ट्या शक्य असल्यास पैजार बुवा म्हणाल्या प्रमाणे एकदम कुत्राप्रेमी होऊन पल्टी मारा चारसहा महिने दुसर्या वस्तीत राहण्यास जा आणि कुत्राप्रेमीवस्तीत एखादा कुत्र्यांना खाऊ घालणारा गडी ठेऊन इतर कुत्र्यांना घालवून लावतील अशी प्रोफेशनल शिकारी कुत्री मोकळी सोडून वस्तीस तंग होऊ द्या किंवा साधी भटकीच पण हजारभर कुत्री प्राणी संरक्षण या नावा खाली वस्तीत आणा. आणि याचा खर्च कुत्रीप्रेमाच्या नावाने सार्वजनिक चंदा घरोघरून अॅडव्हान्समध्ये गोळा करून ठेवा, घरोघर फिरून चंदा गोळा करायचा प्रयत्न केल्यास कुत्रा प्रेमी आणि कुत्रा विरोधी यांची यादीही आपोआप बनेल आणि हाच पैसा भरपूर झाल्यास कोर्टकेसाठी ही वेगळा काढून ठेवता येईल
हा.का,ना.का.
उत्तरदायीत्वास नकार लागू
25 May 2021 - 12:27 pm | कपिलमुनी
उत्तरदायीत्वास नकार लागू
25 May 2021 - 1:08 pm | माहितगार
* अजून एक लिहायचे टाळले होते, वन्यजीव आणि गायीव्यतरीक्त प्राण्यांच्या मांसाहारास भारतीय कायदा बहुधा मज्जाव करत नसावा, एखादा कोरीयन किंवा व्हिएअतनमीज माणूस नाममात्र गुरु करून घेतला की धार्मीक आधारही घेता यावा, केवळ उद्देश्य बदलला की व्यवस्था बदलेल. अतिरेक कोणत्याही बाजूने टाळले पाहीजेत गायी जगवाव्यात पण स्वतःपाळून भतकाववयास सोडून नव्हे त्याच प्रमाणे कुत्रीही स्वतः जगवावीत. भटकणारी एखाद दुसरीही चालू शकतात पण अती झाले की दुसर्याबाजूचाही संयम कुठेतरी सुटणार हे कथित कुत्राप्रेमींनी लक्षात घेणे गरजेचे असावे किंवा कसे.
उत्तरदायीत्वास नकार लागू
25 May 2021 - 1:29 pm | राघव
काही ऐकीव उपाय -
. नॅफ्थेलीन गोळ्यांचा चुरा करून घराजवळ ठेवणे. वर खरे सरांनी देखील ते सांगीतलेले आहे. फक्त कचरा काढतांना हा चुरा त्यात निघून जाण्याची दाट शक्यता असते.
. डॉग रिपेलंट वापरणे. गूगल केल्यास बर्याच वेगवेगळ्या स्प्रे आणि फळांबद्दलची माहिती सापडेल. इलेक्ट्रॉनिक रिपेलंट काम कसे करते हे माहित नाही.
. जंगलाकडील कुणी ओळखीचे असल्यास वाघ/बिबळ्याची वाळलेली विष्ठा/मूत्र मागवावे. ते आजुबाजूला टाकून ठेवल्यास, इतर जनावरांना तो वास समजल्याने ते जवळ येत नाहीत. विदर्भात जिथं शेतांत रानडुकरं, हरीण फार त्रास देतात तिथं जाणकार हा उपाय वापरतात. अगदी गाय-म्हशी देखील घुसत नाहीत. अर्थात् काही दिवसांनी ते परत टाकावे लागते. पण इथेसुद्धा कोरड्या विष्ठेचा भुगा कचर्यात निघून जाण्याचा संभव आहे.
जाता-जाता:
काही एशियन देशांतील लोक्स कुत्री खातात असेही ऐकलेले आहे. कबुतरांचाही जाच असाच बंद करायला हवाय. कॉण्ट्रॅक्टच द्यायला हवा..
25 May 2021 - 2:21 pm | प्रचेतस
महाभारतात चांडाळ आणि विश्वामित्र ह्यांच्यातील कुत्र्याची तंगडी खाण्यावरून होणारा संवाद प्रसिद्ध आहे.
25 May 2021 - 2:44 pm | राघव
सध्या कलियुगच आहे म्हणतात. त्यामुळे चांडाळांची कमतरता न भासावी! 😉
25 May 2021 - 1:38 pm | सोत्रि
ह्या बद्दल साशंक आहे. बर्याच जणांना हा त्रास असेल तर सोसायटीच्या एजीएम मध्ये तसा ठराव बहुमातसाठी ठेवून निर्णय घेता यावा.
- (कुत्रे अजिबात न आवडणारा) सोकाजी
25 May 2021 - 1:48 pm | सौंदाळा
तळ्कोकणात माकडांमुळे खुप त्रास होत आहे.
घरचे नारळ, अननस, केळी, चिकु, आंबे काहीच हाती लागत नाही. फणस, सुपारी, मिरी आणि रातांबे मात्र माकडे अजुन तरी खात नाहीत.
पुर्वी टाळ्या वाजवल्या की पळुन जायची पण आता मात्र फटाके लावुन पण जात नाहीत. भरगच्च झाडी असल्याने वरच्या वर पळुन जातात.
कोवळे नारळ, शहाळी पाणी पिऊन खाली टाकुन देतात. केळीचे झाड केळी खाताना मोडुन टाकतात.
यांचा बंदोबस्त कसा करावा. काही लोकांचे पोटच दारचे २, ४ माड, आंबे, काजु यावर अवलंबुन असते त्यांचे तर खुपच हाल होतात.
खुपच मोठ्या टोळीने धाड घालुन प्रंचड नुकसान केले तर कधीतरी नगरपालिका, ग्रामपंचायत बाजारभावच्या पावपट रकमेने भरपाई देतात (५,६ रुपये एक नारळ)
ही माकडसंख्या पण नियंत्राणात आणली पाहिजे.
25 May 2021 - 2:12 pm | माहितगार
गूगल करून पहावे उपाय मिळावयास हवा.
उत्तरभारतातही काही शहरातून हा माकडांचा उपद्रव असावा माकडे पकडून टेंम्पोतूने पुन्हा जंगलात लावणार्या माणसाला व्यापारी मिळून पैसे देतात असे केव्हातरी युट्यूबवर पाहिल्या सारखे वाटते.
26 May 2021 - 10:26 pm | कपिलमुनी
माकडांच्या मार्गात खांब रोवून माईल्ड शॉक देणाऱ्या तारा लावाव्या .
झटका बसला की माकड घाबरते . पुन्हा फिरकत नाहीत.
झाडाला सुद्धा बांधता येतील .
शॉक लागून माणूस मरू नये एवढी काळजी घ्या.
25 May 2021 - 2:55 pm | कंजूस
ते बंद करण्यासाठी तळ मजल्याला जिन्यापाशी किंवा प्रवेशास गेट लावून घेणे हे सोपे उत्तर आहे. निरनिराळे कायदे, पाळीव प्राणी या वादांत न जाणेच उत्तम. जिथे लिफ्टस आहेत तिथे जिन्यांचा फारसा वापर होत नाही तिथे कुत्री मांजरी आराम करायला येतात. आमच्याकडे गेट लावल्यापासून प्रश्न कायमचा सुटलाय.
कुत्रा मेल्यास संशयावरून पोलीस कुणावरही गुन्हा दाखल करू शकतात. गंभीर गुन्हा आहे.
_____________________________
पटलं तर घ्या.
25 May 2021 - 6:13 pm | माहितगार
कायद्याचे संरक्षण मांजरींना पण असते का? माझ्या मांजरीला तुमच्या कुत्र्याने दुखावले म्हणून नुकसान भरपाईचे दावे आणि केस करता येते का? म्हणजे नैसर्गिक मेलेली मांजर कुत्रामालकाच्या कुत्र्यास घाबरून हार्टाटॅकने गेली असा आरोप केला तर नेमके काय होत असेल ते कायदे तज्ञांना विचारले पाहिजे.
25 May 2021 - 7:51 pm | अंतु बर्वा
आमच्या सोसायटीतही हा अनुभव आहे. आमच्याकडे वाहन पार्किंगचा एक भाग असा आहे जो जवळ जवळ शंभर ते दिडशे मीटर्सच्या अंतरात रात्री बारानंतर पुर्णपणे निर्मनुष्य असतो. इथे रात्री उशिरा परतणार्यांना १०-१२ कुत्र्यांनी एकटे गाठुन पळता भुई थोडी करण्याचे प्रकार घडले आहेत, पण त्याचा या प्राणीप्रेमी लोकांवर काडीचाही परिणाम होत नाही. इथे नवीन असताना एकदा मुलाची पाण्याची बाटली गाडीत राहिली. मुलगा त्या बाटलीबद्दल अतिशय पसेसिव असल्याने रात्री ३ वाजता तो त्याच बाटलीतुन पाणी प्यायचं म्हणुन रडत बसणार, हे माहित असल्याने मी ११.३० ला खाली गेलो त्यांनी मला आस्मान दाखवलं. तेव्हापासुन परत काठी किंवा तत्सम काहितरी हातात घेतल्याशिवाय रात्री दहानंतर जाणं बंद केलयं.
स्वताच्या पाळीव कुत्र्यांना सर्विस लिफ्ट मधुन न नेता इतर लिफ्ट्ने नेणं, त्यांनी चुकुन लिफ्ट्मधे सुसु केल्यास काहीही नं झाल्यासारखं वागणं हे तर नेहमीचचं. अर्थात ही जनता संपुर्ण श्वानप्रेमी लोकांच्या १-२ टक्केच आहे पण त्यांचं उपद्रवमुल्य एवढे जास्त आहे की सर्वच श्वानप्रेमींच्या नावाला काळीमा फासला जातोय.
आपण काय करु शकतो? काहीच नाही. संपुर्ण कायदा यांच्या बाजुने आहे. कायद्यानुसार कोणत्याही प्राण्याला त्याच्या "नॅचरल हॅबिटॅट" मधुन हाकलता येत नाही, त्यांना इजा होइल असं वागता येत नाही. असं केल्यास जबर दंड आहे. याचा अर्थ, तुम्ही पुर्ण किंमत देउन घेतलेला फ्लॅट असलेल्या सोसायटीत अशा भटक्या कुत्र्यांची territory असेल, आणि त्यातल्या एखाद्या कुत्र्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही आणि तुमचं नशीब. आमच्याकडे प्राणिप्रेमी लोकांनी पोलिस केस करुन सोसायटीच्या गेटवर आदेशानुसार कुत्र्यांना आत येउ न देणार्या सिक्युरिटीला अडचणीत आणले होते आणि सोसायटीलाही पेटा अंतर्गत या सगळ्यामधे गोवण्याची धमकी देत असतात. कशीबशी गयावया करुन त्यांना सोसायटीबाहेर कुत्र्यांना खाउ घालावे म्हणुन राजी करण्यात आले आहे.
25 May 2021 - 8:57 pm | माहितगार
आमच्या सोसायटीत कुत्रेमालक कमी आहेत, त्यांच्या मुलांचा बाकी गोंधळ असला तरी सोसायटीतील कुत्राविषयक उपद्रव मुल्य बरेच कमी राहीले आहे. पण सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर रात्रीच्या जेवणानंतर गार हवेतील फेरफटका मारणे जिकीरीचे होऊन जाते, त्या शिवाय मॉर्नींग वॉक होत नसल्याने रात्रीचा वॉक बरा पडतो पण रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने बर्याचदा रस्ता कुत्र्यांच्याच ताब्यात असतो आणि अनेक वॉक अर्धवट सोडून अनेक वेळा चक्क परत फिरावे लागते.
मला वाटते अनेक कुत्रा मालक घरात दिवसभर बांधून ठेवलेली कुत्री रात्री बिनधास्त मोकळी सोडतात. बर्याचदा कुत्र्यांचे आपण सरळ लक्ष्य नसलो तरी दिवसभर बांधून ठेऊन रात्री मैदानात म्हणजे रस्त्यावर येणारी आणि भटकी कुत्री यांची जोरदार जुंपताना दिसते. त्यांच्या आपापसातील भांडणातही ती केव्हा अचानक आपल्या अंगावर येणार नाहीत ना असे होऊन जाते.
25 May 2021 - 9:01 pm | माहितगार
एकतर्फी कायद्यांना खासगीपणाच्या अधिकारात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता कायदे तज्ञांसोबत पडताळून पहाणे गरजेचे असावे.
25 May 2021 - 9:51 pm | पिनाक
१. भटक्या कुत्र्यांना विष घाला आणि कुत्रेप्रेमींनी घातलेल्या जेवनातून विषबाधा झाली अशी तक्रार महापालिके कडे करा.
२. पाळीव कुत्र्यांना सुद्धा (सीसीटीव्ही वगैरे नसेल आणि शक्य असेल तर) विष घाला. आणि मग महापालिके कडे मालकाविरुद्ध तक्रार करा.
26 May 2021 - 6:08 am | चौकस२१२
कायद्यानुसार कोणत्याही प्राण्याला त्याच्या "नॅचरल हॅबिटॅट" मधुन हाकलता येत नाही
कायदा बाहेर सार्वजनिक रस्त्यावर / मैदानात लागू शकतो एकवेळ पण खाजगी सनादिकेच्या आवारात कसा काय लागू होऊ शकतो ?
असा प्रश्नहे सगळं वाचल्यावर पडलाय.. यावर काही विचार?
म्हणजे असे कि :
१) एखाद्या स्वतंत्र बंगला मालकाने "माझ्य आवारात कुतरा नको " असे ठरवणे आणि
२) सोसायटी ने बहुमताने "आपल्या आवारात मोकळा कुत्रा ठेवू शकत नाही ( कुतरा हा फिरवयायचा असेल तर तो दोरीने बान्धलेलाच असला पाहिजे )"
असा निर्णय घेणे या, दोन्ही गोष्टी तांत्रिक दृष्टया एकच नाही का ? (येथे मोकळ्या कुत्र्यांसंबंधी म्हणजे दोन्ही कोणीच वाली नसलेल्या आणि पाळीव पण आवारात मोकळ्या सोडलेल्या या दोन्हीचा समावेश आहे .. )
"माझ्य घरात कोण येणार हे मी ठरवणार " हे जे स्वातंत्र्य आहे तेच हे स्वातंत्र्य
26 May 2021 - 6:51 am | चौकस२१२
"नॅचरल हॅबिटॅट"
नवीन बांधलेली वास्तू हि कुत्र्यांची "नॅचरल हॅबिटॅट" (आणि ते सुद्धा बीण मालकाच्या ) कशी काय होऊ शकते ?
अजब आहे !
उद्या कार्यालयाच्या जागेत, सरकारी किंवा किंवा पाळीव कुत्री चालतील का? ( राखणी साठी ठेवलेली नाही तर हि मानवतावादातून मोकाट राहिलेली कि ज्यानं हात लावयायाचाच नाही नाही असला अगम्य कायदा लागू होणारी )
( तळ टीप: मी कुत्रा मालक होतो आणि काही कुत्राद्वेषी नाही.. पण स्थानिक नियमांप्रमाणे त्याला फिरायला घेऊन गेलं तर पट्टा असणे , त्याची शी उचलण्यासाठीची पिशवी बाळगणे" या नियमांची सवय आहे )
26 May 2021 - 9:30 am | आनन्दा
आयला आयडिया बरी आहे..
सगळी कुत्री गोळा करून कोर्टात किंवा पेटा वाल्यांच्या घरी नेऊन सोडायची !!
नैसर्गिक अधिवास!
25 May 2021 - 11:12 pm | माहितगार
कुत्र्यांनी त्रस्त झालेली मंडळी किती झालेतरी, कुत्रेप्रेमींप्रमाणे सहज पणे एकत्र येऊन न्यायालयीन लढाई कुणि लादल्या शिवाय स्वतःहून लढणार नाहीत. पैजारबुवांनी म्हटल्याप्रमाणे कुत्राप्रेमी म्हणून केसेस आणि कायदेशीर तक्रारींची संख्या पोलीसांना वेळ मीळणार नाही आणि कुत्रात्रस्त माणसे अजून त्रस्त होती एवढी वाढवावी आजीमाजी न्यायाधीश पोलीस आधिकारी खासदारसुद्धा कुत्र्यांबाबत जरासे चुकले कले म्हणजे त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने केस करत सुटावे म्हणजे याने आपण सुद्धा त्रस्त होतोय हे कळाले की लोक बदलावयास लागतील.
26 May 2021 - 10:03 am | उपयोजक
26 May 2021 - 2:45 pm | टवाळ कार्टा
बाईकवरून रात्री उशीरा हापिसातून घरी येताना कुत्री मागे लागलेली आहेत....जबडे पायाजवळ आणून पाठलाग करतात साली...*ड फाटते भें**
जर अश्या परिस्थितीत बाईक जाउन कुठे ठोकली तर कुणाबद्दल तक्रार करायची
26 May 2021 - 2:54 pm | गॉडजिला
असे म्हणतात की पळणाऱ्या कुत्र्यास थांबल्या खेरीज वेग कमी केल्या खेरीज चावा घेता येत नाही तोंड कडकडून मिटता येत नाही... त्यामुळे आहे त्या वेगाने वा शक्य असल्यास वेग वाढवून जात आहोत त्या दिशेने जात राहावे कुत्राचे तोंड जरी पायाला स्पर्शून गेले तरी घाबरून जाऊ नये.
अर्थात हे विधान ऐकीव आहे यामागील तथ्य नेमके ठाऊक नाही.
26 May 2021 - 3:16 pm | सुरिया
कुत्रे नुसते धावताना नव्हे तर हवेत उडी मारल्यावर देखील चावू शकते. हवेत उडी मारून फ्रिसबी पकडणारे कित्येक कुत्रे दिसतील. इव्हान चावल्यावर देखील ते फरपटत येते पण जबड्याची पकड सोडत नाही असेही पाहण्यात आहे. ३० किमी स्पिडला माझ्या स्कूटर फूट बोर्डवर लावलेली पिशवी पकडून फरपटात १० १२ फूट येऊन पिशवी घेऊनच ते बाजूला पडले होते.
26 May 2021 - 4:28 pm | गॉडजिला
उडी मारल्यावर कुत्रे चावा घेऊन भक्ष पकडू शकते ही बाब नक्कीच तथ्य आहे. आपण सांगितल्याने मी जास्त काळजी यापुढे नक्कीच घेईन
26 May 2021 - 7:48 pm | तुषार काळभोर
जिथे कुत्री मागे लागतात, हे माहिती आहे, अशा ठिकाणी गाडी आधीच हळू करावी. हळू म्हणजे वीस- तीस किमी प्रति तास वेग.
कुत्री गुरगुरतात, पण शक्यतो धावून येत नाहीत.
तरीही कुणी भुंकुन धावून आल्यास, गाडी अचानक ब्रेक दाबून थांबवावी. कुत्री आपला नाद सोडून देतात.*
गाडी जोरात पळवल्यास कुत्री अगदी चाळीसहून अधिक वेगाने 200 मीटर पेक्षा जास्त पळू शकतात. रस्त्यात अडथळा, स्पीड ब्रेकर, वळण अशा कारणाने जर वेग कमी केला तर आपण त्यांच्या तावडीत सापडू शकतो.
*ट्राइड अन् टेस्टेड आहे. मलाही आधी कुत्र्यांजवळ गाडी हळू करायची या विचारानेच जीवाची भीती वाटायची. काही वेळा दुसऱ्या लोकांच्या मागे बसलेलो असताना प्रत्यक्ष अनुभव घेऊन खात्री केली आणि मग मी स्वतः ते अनुकरायला सुरुवात केली.
26 May 2021 - 8:56 pm | टवाळ कार्टा
मी पार्किंगमधून बाईक काढून सिंगल लेन रस्त्याला जवळपास ५ किमी/तास (१ला गियर) या वेगाने जात असताना कुत्रं मागे लागलयं
26 May 2021 - 9:15 pm | तुषार काळभोर
लैच दुर्दैवी तुम्ही.
26 May 2021 - 9:32 pm | माहितगार
मलाही पहिल्या गेयरवर असताना युटर्न घेताना किती कमी स्पीड असेल अनोळखी कुत्री अचानक अंगावर आल्याचा अनुभव घेतला आहे. गाडी अचानक गेयर्स बदलत दामटण्याशिवाय त्या कुत्र्याने दुसरा कोणताही पर्याय ठेवला नव्हता. रस्ता रिकामा होता हे सुदैव.
या वरून गेल्या पाचेक वर्षातील पुण्यातील सत्य घटना आठवली.
माझ्या परिचितांच्या गाडीला अॅक्सिडेट झाला, कारण काय तर आपोझिट साईडने येणार्या कारने अचानक ९० अंशात वळत धडक मारली, का? तर मालकाने ड्राव्हर सोबत पाठवलेले कुत्रे मागच्या सीटवर मोक्ळेच होते ते एकदम ड्रायव्हरच्या अंगावर गेले ड्रायव्हरचा तोल सुटला तो ९० अंशात वळून फोरव्हील ड्राईव्ह गाडीला धडक देता झाला. तो ड्रायव्हर स्वतः अपंग झाला. धडक दिलेली गाडीतली माणसे फोरव्हील ड्राईव्हची बांधणी मजबूत असल्याने वाचली पण एका स्त्री प्रवाशाचे मोठे ऑपरेशन करावे लागले , आणि नवी कोरी फोरव्हील ड्राईव्ह आतल्या प्रवाशांना वाचवताना निकामी झाली.
26 May 2021 - 9:20 pm | प्रकाश घाटपांडे
मला बाईकवर जाताना पिंडरी पकडायला एक कुत्रे धावत आले. मी गाडी स्लो करुन थांबवली व त्याला युयु केले. त्याला हे इतके अनपेक्षित होते कि त्याचे डोळेच तिरळे झाले. मग मी युयु करत राहिलो मग ते लांब पळून गेले.
26 May 2021 - 10:16 pm | Ujjwal
हाहाहा भारीच. प्रयोग करायला हरकत नै.
27 May 2021 - 9:24 pm | स्वलिखित
कुत्रा आपल्यामागे पळत नसून , आपण कुत्र्याला पळवत आहोत , आणि तो कुत्रा आपलाच पाळीव आहे अशा अविर्भावात त्याच्या सोबत वागावे , एकतर आपला आत्मविश्वास वाढतो , bp वाढत नाही , आणि कुत्राही गोंधळून जातो , ये चल क्या रहा है **,
फक्त त्या कुत्र्याला , मुझे मेरा मलिक मिल गया , असा टोबी सारखं वाटायला नको ,
26 May 2021 - 4:49 pm | माहितगार
हा प्रकार खरेच त्रास दायक आहे. अशी वेळ खूपदा नाही पण एकदा आली. आज पुण्यातील एका (कोविड) लसिकरण केंद्राच्या बाहेर एका महिलेचे कुत्रे, कावळे आणि कबुतरांना अन्नदान चालू होते. पलिकडे रिकाम्या पटांगणावर न करता फुटपाथवर बिस्किटे टाकणे चालू होते त्यातील बिस्किटे कावळे आणि कबुतरे घेऊन लसिकरण केंद्रांच्या आवारातील झाडावर मेनरोडवरून अत्यंत कमी उंचीवरनं जात होती जे वाहनांसाठी धोकादायक होतेच त्या शिवाय कबुतरांच्या पंखातून शिंपडले जाणारे पॅथोजेन फुफूस्सजन्य आजार आणि अॅलर्जी असणार्यांसाठी अत्यंत तापदायक असू शकतात किमान कोविड लसिकरण केंद्रात कबुतरांचा धुमाकुळ नसावा.
भूतदयेसाठी कोविडकाळात लोकांना काम मिळत नाही म्हणून किराणा दुकानांपाशी बरेच गरीब सध्या दिसतात, काम करून घेतल्याशिवाय भीक देण्याचा माझा स्वभाव नाही पण लॉकडाऊन काळात किराणादुकानापाशी कुणि मदत मागितली तर मी शंभर दोनशेचे सामान घेऊन देतो. मी अज्ञेय असूनही भगवान दत्तात्रेयांचा पुरेसा आदर ठेवून असतो कुत्र्यांच्या वाटेसे ते अगदीच आंगावर आल्याशिवाय जात नाही. कबुतर कुत्र्यांना काय भूतदया करायची ती ज्या टेकड्यांवर कुणि वॉकींगलाही जात नाही तिथे जाऊन करावी. स्वत: टेकडी चढणे जमत नसेल तर इतर टेकडी रोहकांकडून पाठवावी पण वस्तीत राहणार्यां पैकी कुणास त्रास होईल असे वागू नये.
नॅचर हॅबीटात म्हणून फुटपाथ रस्ते पार्कींग मध्ये म्हशी आणि गव्यांनाही खाद्य देता येईल पण कुत्रे प्रेमींना तसे हवे आहे का याचा त्यांनी विचार करणे श्रेयस्कर असावे किंवा कसे