चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ७)

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
24 Apr 2021 - 11:34 am
गाभा: 

नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय.

हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत.

हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे.

कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

24 Apr 2021 - 12:04 pm | नावातकायआहे

चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे.

मदनबाण's picture

24 Apr 2021 - 2:00 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #BoycottRadhe

चंद्रसूर्यकुमार's picture

24 Apr 2021 - 2:49 pm | चंद्रसूर्यकुमार

तज्ञांनी डूम्सडेचे आकडे द्यायला सुरवात केली. वॉशिंग्टन विद्यापीठातील तज्ञांच्या मते मे महिन्यात दररोज ५ हजार मृत्यू भारतात होणार.

https://maharashtratimes.com/international/international-news/coronaviru...

असल्या तज्ञांनी मागच्या मे महिन्यातच लाखो लोकांना कोरोना होईल, इतके हजार लोक मरतील, २०२० च्या शेवटापर्यंत ३० लाख लोक भारतात मरतील वगैरे अंदाज व्यक्त केले होते. पण तसे काहीही न होता त्यांचे अंदाज चुकून सप्टेंबरपासून अचानक रूग्णसंख्या कमी का झाली हे काही त्यांना सांगता आले नव्हते. आता दुसर्‍या लाटेत असले तज्ञ लोक आता डूम्सडेचे आकडे द्यायला लागले आहेत. या तज्ञ लोकांचा पूर्वेतिहास लक्षात घेता हे भाकित खरे ठरण्यापेक्षा खोटे ठरायची शक्यता जास्त आहे. म्हणज असले अंदाज ते लोक देत असतील तर सध्याच्या काळात ती एक सकारात्मक बातमी म्हणावी का?

कॉमी's picture

24 Apr 2021 - 3:10 pm | कॉमी

नाही.

मराठी_माणूस's picture

24 Apr 2021 - 3:28 pm | मराठी_माणूस

ह्या तज्ञांचे त्यांच्या स्वतःच्या देशा बद्दल काय मत आहे ?

चंद्रसूर्यकुमार's picture

24 Apr 2021 - 3:46 pm | चंद्रसूर्यकुमार

ह्या तज्ञांचे त्यांच्या स्वतःच्या देशा बद्दल काय मत आहे ?

त्याविषयी माहिती नाही. पण भारताविषयी मात्र या लोकांचे कायमच डूम्सडेचे अंदाज राहिले आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी सुरवातीला वीसेक वर्षे भारत देश एक कसा राहू शकणार नाही, भारताचे कसे तुकडेतुकडे पडतील, राज्याराज्यांमध्ये दंगली कशा होतील असली भाकिते होती. त्यानंतर भारतात वाढत्या लोकसंख्येमुळे धान्य कसे कमी पडेल आणि कसे लाखोंच्या संख्येने भूकबळी पडतील असली भाकिते यायला लागली. त्यानंतर १९८० च्या दशकात पंजाब भारतापासून वेगळा कसा होणार, भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणावर शीख सैनिक असल्याने सैन्यात बंडाळी होणार वगैरे भाकिते केली गेली. मग १९९० च्या दशकात अशीच भाकिते काश्मीरविषयी केली गेली होती. गेल्या वीसेक वर्षात भारतात डूम्सडे कसा येणार याविषयी या ढुढ्ढाचार्यांना भाकिते करायला काही न मिळाल्याने ते बहुदा अस्वस्थ असावेत. ती संधी नेमकी कोरोनाने त्यांना दिली.

एक गोष्ट समजत नाही. या अमेरिकन ढुढ्ढाचार्यांना भारताचा इतका द्वेष का वाटतो? खरं तर लोकशाही, विविधता आणि इतर मूल्ये वगैरे गोष्टी लक्षात घेता असा द्वेष असायचे काही कारण नाही.

अर्धवटराव's picture

24 Apr 2021 - 6:14 pm | अर्धवटराव

भारत हा जागतीक पातळीवर लोकशाहीचा आधारस्तंभ आहे हेच कळत नाहि.

कदाचित भारतीयांच्या सार्वजनिक ठिकाणच्या बेशिस्त वर्तनावरून ही प्रजा कोणालाही सहजी न जुमानणारी , स्वयंशिस्त न पाळणारी आहे हे लक्षात घेऊन अंदाज बांधत असावेत.

चंद्रसूर्यकुमार's picture

24 Apr 2021 - 3:03 pm | चंद्रसूर्यकुमार

सप्टेंबर २०२० मध्ये माजी मंत्री रणजितसिंग पाटील यांनी विधानपरिषदेत ऑक्सिजनचा तुडवटा होऊ शकेल तेव्हा ऑक्सिजन प्लॅन्ट्स बांधण्याकडे लक्ष देण्यात यावे ही मागणी केली होती. पण तेव्हा महाभकास आघाडी सरकारपुढे कंगनाचे घर पाडणे, अर्णबला त्रास देणे, वाझेकडून कोट्यावधींची खंडणी उकळणे ही त्यापेक्षा बरीच जास्त महत्वाची कामे असल्याने ऑक्सिजन प्लॅन्ट्स उभारणे या किरकोळ गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2021 - 6:58 pm | अमरेंद्र बाहुबली

हेच माननीय पंतप्रधानांबद्दल ही लागू होईल. राहूल गांधीनी कोरोना स्फोट होईल असं जानेवारी की फेब्रूअरी २०२० मध्ये सांगीतले होते.

Ujjwal's picture

24 Apr 2021 - 3:25 pm | Ujjwal

https://youtu.be/9Ya32_1mRRI
विराफीन ला परवानगी

कॉमी's picture

24 Apr 2021 - 4:07 pm | कॉमी

ऑक्सिजन चा लोड कमी झाला तर भारीच.

अनिरुद्ध.वैद्य's picture

24 Apr 2021 - 7:26 pm | अनिरुद्ध.वैद्य

बेस्ट आहे न्युज. पण लवकर बाजारात उपल्ब्ध व्हायला हवी.

कॉमी's picture

24 Apr 2021 - 4:26 pm | कॉमी

तज्ञांच्या देशाचे नाव, आणि "अश्याच तज्ञांनी" मागच्या वेळेस केलेली भाकिते चुकली, म्हणून खोटे म्हणणे चुकीचे वाटते. त्यांचे जर स्टॅटिस्टिकल मॉडेल असेल तर त्यांच्या नॅशनॅलिटी चा संबंध नाही. भारताचा द्वेष वैगेरे फारच फार फेच्ड.

आयआयटी खरगपूरच्या मॉडेल नुसार आपण मे तिसऱ्या आठवड्यात किंवा थोडेसे आधी ग्राफच्या शिखरावर पोहोचू. तेव्हा ३५ लाखापर्यंत ऍक्टिव्ह केसेस असू शकतात. संग्राम पाटील नावाचे डॉक्टर यूकेतून व्हिडीओ बनवतात त्यांनी सुद्धा कालावधी जवळपास हाच सांगितलं आहे.शिखरानंतर हळूहळू वाढ कमी होईल.

https://www.financialexpress.com/lifestyle/health/indias-covid-graph-may...

अनिरुद्ध.वैद्य's picture

24 Apr 2021 - 7:25 pm | अनिरुद्ध.वैद्य

चेच मनिन्द्र अग्रवाल म्हनुन आहेत ट्विटरवर. त्यांचे मॉडेल सध्यातरी अक्युरेटली टॅली होत आहेत. त्यांच्यामते, पीक्स गाठले गेले असुन, बरेचसे मेजर सिटीज आता पीक क्रॉस करुन गेलेत किंवा पीकवर आहेत.

मूंबई ठाणे पीक क्रॉस झालेले सांगताहेत, तर पुणे ऑन पीक. तरी २ आठवडे अत्यंत काळजीपुर्वक रहाणे भाग आहे. एखादाजरी सुपर स्प्रेडर निसटला तर संपल सगळ.

(बाकी भारत द्वेश अन थर्ड वर्ल्ड कंट्री सिंड्रोम आहेत बर वेस्टर्न अ‍ॅकेडेमिक्सममध्ये)

कॉमी's picture

24 Apr 2021 - 7:40 pm | कॉमी

ट्विटर बघितले. शहरवाईज ग्राफ जास्त लॉजिकल वाटतंय. त्यांचे मॉडेल बरोबर असो अशी आशा.

वेस्टर्न अकॅडेमिक्सचा बायस वैगेरे स्विपिंग स्टेटमेंटला काही अर्थ नाही. ज्या पर्टीक्युलर अकॅडमीची चर्चा आहे तिचा बायस दाखवा, तर अर्थ. नाहीतर आपल्याला आवडणारा वेस्टर्न रिसर्च स्वच्छ, नावडणारा साला कोलोनियल पिग.

माझा पण साधारण हाच अंदाज आहे. Lockdown च्या पहिल्या आठवड्यात केस वाढत असतात, त्यानंतर कमी व्हायला लागतात असा अंदाज आहे..
आणि आता अनलॉक झाले तरी देखील लोक बाहेर पडतील असे वाटत नाही, कारण करोनाची भयानकता जवळ जवळ प्रत्येक कुटुंबाने या ना त्या मार्गाने अनुभवली आहे.

कॉमी's picture

24 Apr 2021 - 8:32 pm | कॉमी

अग्रवाल यांचे देशभरासाठीचे मत आहे की मेच्या पहिल्या आठवड्यात पीक गाठणार आहोत.

https://news.abplive.com/videos/news/covid-second-wave-will-be-at-its-pe...

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Apr 2021 - 8:58 pm | अनिरुद्ध.वैद्य

बऱ्याच शहरांबाबत अन राज्यांबाबत वेगवेगळे आहेत. कमी अधिक प्रमाणात मे पहिला दुसरा आठवडा दाखवतात पीक बाबत.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2021 - 7:01 pm | अमरेंद्र बाहुबली

मागच्या श्रीगुरूजींच्या धाग्याने कमी वेळात विक्रमी अशी ३५० प्रतिसादांची धावसंख्या ऊभारल्या बद्दल गुरूजींचे धणूष्यबाण, वाघाची प्रतिमा आणी हातात शिवबंधन बांधून अभिनंदन. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2021 - 7:07 pm | अमरेंद्र बाहुबली

*सावध व्हा अन्यथा आपली स्थिती भारतासारखी होईल! पीएम इम्रान खान यांचे पाकिस्तानला आवाहन*

हेच पहायचं राहीलं होतं :(

https://pudhari.news/news/International/Pakistan-PM-Imran-Khan-s-appeal-...

...... पुणेकर उद्योजकाच्या पुढाकारातून सिंगापूरमधून येणार ३५०० व्हेंटीलेटर्स; मोदी सरकार करणार ‘एअर लिफ्ट’ .....
--------------

https://www.loksatta.com/pune-news/3500-ventilators-and-8000-oxygen-conc...
--------------

मुक्त विहारि's picture

24 Apr 2021 - 7:28 pm | मुक्त विहारि

.....अनिल देशमुख यांच्या घर, कार्यालयांसह विविध ठिकाणी सीबीआयची छापेमारी.....

https://www.loksatta.com/maharashtra-news/parambir-singh-letter-cbi-has-...

-------------

CBI ला जर चौकशीची परवानगी दिली तर, अजूनही बरेच काही बाहेर येऊ शकते.... कदाचित महाराष्ट्र राज्यात घरोघरी भात तरी नक्कीच मिळेल ......

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2021 - 7:45 pm | अमरेंद्र बाहुबली

नेते लोकही हुशार झालेत. लगेच पक्श बदलतात आणी अभय मिळवतात. :)

मुक्त विहारि's picture

24 Apr 2021 - 8:05 pm | मुक्त विहारि

अब्दुल सत्तार, हे उदाहरण डोळ्यासमोर आहेच ....

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2021 - 9:18 pm | अमरेंद्र बाहुबली

:) तरी सुध्दा सत्ता मिळवू शकले नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2021 - 10:11 pm | अमरेंद्र बाहुबली

लादेन ने वेळीच "राष्ट्रीय पक्षात" पक्ष प्रवेश केला असता तर त्यालाही "क्लीन चिट" मिळाली असती :)

बापूसाहेब's picture

24 Apr 2021 - 11:10 pm | बापूसाहेब

लादेन ने वेळीच "राष्ट्रीय पक्षात" पक्ष प्रवेश केला असता तर त्यालाही "क्लीन चिट" मिळाली असती :)

बरोबर..!!!
अमेरिकेने खूपच लवकर मारले लादेन ला.
नाहीतरी ओसामाजी आणि हाफिज साहेब म्हणणारी टोळीचे प्रयत्न वाया गेले.
इमेज क्लीन करण्याची सुरवात केलीच होती तेवढ्यात अमेरिकेने लादेन ला जन्नतवासी केले.

तीच बाब झाकीर नाईक या देवमाणसाबाबत.. झाकीर नाईक जी एक्तत्मेचा आणि मानवतेचा संदेश घेऊन कामं करतायेत असे भर सभेत बोलणे, मिठ्या मारणे, त्यांच्या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणे अशी कामे देखील एक पक्ष अगदीआत्ताआत्तापर्यंत करतच होता.. त्याला फक्तं पक्षात घेणच बाकी राहिले होते.. !!!

अशी जातीय "घाण" हुंगत हुंगत जाणे आणि तिला पक्षात घेणे किंवा छुपे समर्थन देणे , दाढी कुरवळणे इ बाबतीत एकच पक्ष १९४७ पासून ( तस तरं त्याआधी पासून) भरीवकार्य करत आलेला आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2021 - 12:12 am | अमरेंद्र बाहुबली

छुपे समर्थन देणे , दाढी कुरवळणे इ बाबतीत एकच पक्ष १९४७ पासून ( तस तरं त्याआधी पासून) भरीवकार्य करत आलेला आहे.>>>

असे मॅसेज २०१४ पर्यंत चालायचे. आता पब्लिक हुशार झालीय. :)

बापूसाहेब's picture

25 Apr 2021 - 12:30 am | बापूसाहेब

असे मॅसेज २०१४ पर्यंत चालायचे. आता पब्लिक हुशार झालीय. :)

बरोबर बोललात.
हो ना. पब्लिक आता हुशार झालिये.. कारण पाहिले फक्तं मेसेजेस चालायचे पण आता बहुतांश लोकं बोलतात , लिहितात, आवाज उठवतात आणि आज त्याचाच परिणाम आहे की ३०० पार झालेत.

असो तुम्ही मुळ मुद्द्याला बगल दिऊन गाडी तिसरीकडे नेलीत..
अश्या घाणेरड्या धार्मिक प्रवृत्तीना प्रोत्साहन देणे, मदत करने , कायदेशीर मदत करणे, आणि इमेज क्लीन करणे ही कामं करणार्या पक्षाच नावं मी घेणार नाही.. कारण तुम्ही ते ओळखले असेल. !!!

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 6:24 am | मुक्त विहारि

आणि दुसर्याचे बघायचे वाकून

ह्या आघाडीने, कुठलेही भरीव काम केलेले नाही...

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 6:19 am | मुक्त विहारि

हे शिवसेनेत आहेत...

अब्दुल सत्तार, यांच्या बाबतीत माहिती मिळवलीत तर, फारच उत्तम.....

Youtube वर क्लिप्स उपलब्ध आहेत...

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2021 - 11:10 am | अमरेंद्र बाहुबली

अब्दूल सत्तारच ऊदाहरण आहेत. राष्ट्रहीताचे सोंग आणणार्या पक्शात येऊन कोण कोण पावन झालं? अर्थात तिकडे दुर्लक्श करूयात ;)

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 2:10 pm | मुक्त विहारि

नाव सांगा

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2021 - 4:23 pm | अमरेंद्र बाहुबली

फार भोळे तुम्ही. मेगाभरती केली तरी १०५ वरंच अडकलात. :)

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 4:41 pm | मुक्त विहारि

अज्ञानी असलेले कधीही उत्तम...

अर्थात, तुम्ही पळपुटेपणा करणारच, हा अनुभव आहेच ...

अजूनही तुम्हाला ह्या राजवटीतली कामे सांगता आली नाहीत ...

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2021 - 5:05 pm | अमरेंद्र बाहुबली

१०५ घरी बसवल्याचा राग किती दिवस मनात ठेवनार?? आता ऊभी हयात विरोधी पक्शातच जाणार आहे. अजून द्या “क्लिन चीट“ :)

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 7:14 pm | मुक्त विहारि

गोल गोल राणी ....

प्रदीप's picture

24 Apr 2021 - 10:01 pm | प्रदीप

वास्तविक असल्या स्टोरीज (अनेक तद्दन खोट्या, इतर काही अतिशयोक्त, अजून काही मोडतोड केलेल्या...) काही ठराविक माध्यमे इतकी करतात व तथाकथित विद्वान, विचारवंत इत्यादी. त्या लगोलग उचलून पसरवतात, की ह्या अनेक माध्यमांची विश्वासार्हता, निदान माझ्या दृष्टिने तरी संपूर्ण संपलेली आहे. ह्यात बर्‍याच भारतीय आणि काही जुन्या, नावाजलेल्या पाश्चिमात्य मीडियांचा समावेश आहे.

आता 'द वायर' हे खरे तर साम्यवादी बाजूचे न्यूज पोर्टल. अर्थात, ह्याला कमर्शियल दृष्टिकोन असण्याची जरूरी नाही, म्हणजे क्लिक्सवर अवलंबून राहून त्यांना जाहिराती मिळवून पैसा करण्याची जरूर नाही (किमानपक्षी, साम्यवादाच्या बांधिलकीमुळे तशी ती नसावी. असलीच तर ती स्वतःशीच प्रतारण आहे). तसे असल्यास, एकादी बातमी 'ड्यू डिलिजन्स' न करता देण्याची त्यांना घाई नसावी. पण तरीही राजनाथ सिंगांच्या तोंडी काही खोटे वक्तव्य खपवल्यावर, ते तसे करावेसे त्यांना वाटले- अथवा तसे करणे त्यांना भाग पडले. मग दिलेली बातमी मागे घ्यावी लागली व हा खुलासा द्यावा लागला. असा खुलासा देणे हेही नसे थोडके. इतरस्त्र तेही केले जात नाही.

.

कॉमी's picture

24 Apr 2021 - 10:43 pm | कॉमी

द वायर साम्यवादाकडे झुकते म्हणजे काय समजले नाही. डावीकडे झुकणारे आहे, पण साम्यवादी कशावरून आहे ? (डावे म्हणजे कॉमी हे जुने मिसकनसेप्शन आहे.)

आता साम्यवाद/समाजवाद ह्या छत्रीखाली अत्यंत भिन्नभिन्न अनेक विचारधारा आहेत. त्यापण सशस्त्र क्रान्ती वाला टिपिकल कॉमी ते निओ लिबरल अर्थव्यवस्थेत राहूनच सरकारने लोकांचे भल्यासाठी कामे करावीत म्हणणारा फ्री मार्केट पुरस्कर्ता सोशलिस्ट, इतकी भयंकर व्हास्ट रेंज आहे. आणि असावीच. इतक्या पूर्वीचे तत्वज्ञान, इतक्या देशांमध्ये इतक्या काळापासून इटक्यांदा चर्चिले गेले आहे कि त्याचे रूप बद्दलणारच. त्यामुळे साम्यवादाची प्रतारणा वैगेरे फार ब्रॉड विधान झाले. वायर टीमचे काय विश्वास आहेत हे जास्त महत्वाचं, प्रतारणा आहे की नाही पाहण्यासाठी.

वायरने खोटी बातमीचा खपवली/खपवायला लावली ह्याची इतकी खात्री का ? चूक सुद्धा असू शकतेच.

हे मीडिया हाऊस असे असे वाईट आहे, हे फारच अपुरे आहे. एखाद्या बातमीची पडताळणी त्या बातमीच्या सोडून इतर कोणत्या संदर्भाने करू नये. त्यातल्या रिपोर्टेड फॅक्टस ची तरी.दिलेल्या गोष्टी खऱ्या आहेत का, आणि पूर्ण आहेत का, हे इतर सोर्सेसशी पडताळणी करून पाहणे. त्यातल्या मताबद्दल मीडिया हाऊस च्या संदर्भाने विचार होऊ शकतो. पण त्यातले तथ्य निर्विवाद असतील तर मीडिया हाऊसचे नाव आणि त्यांची मते इरिलेव्हन्ट आहेत.

प्रदीप's picture

25 Apr 2021 - 9:59 am | प्रदीप

हे मीडिया हाऊस असे असे वाईट आहे, हे फारच अपुरे आहे. एखाद्या बातमीची पडताळणी त्या बातमीच्या सोडून इतर कोणत्या संदर्भाने करू नये. त्यातल्या रिपोर्टेड फॅक्टस ची तरी.

कुठल्याही व्यक्तिची, व्यक्तिसमूहाची, आस्थापनाची विश्वासार्हता असते, व ती आपण आपल्या अनुभवांवरून बनवत असतो.

मी २०१३ सालापासून काही परदेशी व भारतीय बातम्या देणार्‍या मीडियागृहांना जवळून पहात आलो आहे. तेव्हा माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरून, मी त्यांच्या विश्वासार्हतेविषयी मते बनवली आहेत. मी इतके ठामपणे सांगू शकतो की ही मते वरवर कुणीतरी काहीतरी सांगितले म्हणून, अथवा, 'एकाने- दुसर्‍याला-माहिती-दिली/मत-सांगितले, दुसर्‍याने-तिसर्‍याला.... 'अशा तर्‍हेने बनवलेली नाहीत. न्यू यॉर्क टाईम्स, गार्डियन, सी. एन. एन,. फायनॅन्शियल टाईम्स ही परदेशी आस्थापने व भारतांतील एकाद-दुसरे सोडून इतर सर्वच आस्थापने सातत्याने अतिशय एकांगी बातम्या देतात, 'ओपिनियन' ह्या नावाखाली काहीबाही लिहीतात, अनेकदा बातम्या चूक असतात (तथ्याला धरून नसतात), इतकेच नव्हे, त्या रचलेल्या असतात-- हे सर्व मी प्रत्यक्ष अनुभवले आहे, व त्यावरून मी हे मत बनवलेले आहे. बरे, हे त्यांचे रीपोर्टिंग, भारताविषयीच नव्हे तर मी राहतो तेथील घटनांच्या बाबतीतही तसेच आहे व होते.

तेव्हा, मी ही सदर घटना व अशा पुढे होणार्‍या घटनांविषयी ह्या आस्थापनांना 'बेनेफिट ऑफ डाऊट' देणार नाही. तसे प्रत्येक गोष्तीच्या बाबतीत करणे मलातरी जरूरीचे अजिबात वाटत नाही.

प्रदीप's picture

25 Apr 2021 - 10:27 am | प्रदीप

हे गृहस्थ, एड्वर्ड ल्यूस, फायॅन्शियल टाईम्सचे ज्येष्ठ वार्ताहर आहेत. "Associate Editor, Financial Times, US-based writer/columnist. Former DC & India bureau chief."

.

ही असली बातमी आपण कुठेही, कधीही ऐकलेली नाही, ना पाहिलेली आहे. पण हे ट्वीट आले, की तात्काळ मी त्याची सत्यासत्यता मूळापासून तपासून घेणार नाही, तसे करणे निव्वळ वेळ व शक्तिचा अपव्यव आहे. पण मी वर लिहील्याप्रमाणे, फाटाचे सर्वच रिपोर्टिंग असलेच आहे हे मी नेहमीच पहात आलेलो आहे.

ह्या फाटाला मी तर, स्किफोफ्रेनिक वर्तमानपत्र म्हणतो. म्हणजे, मुख्य विभाग सगळा, ईकॉनॉमी, कंपन्या, कॅपिटल्स, बाँड्स, इन्वेस्टमेंट्स, इत्यादींवर असतो. मग दर वीकांतास इतर सेक्शन्स असतात- लाईफ अँड आर्ट्स-- ह्यांत एक मुलाखत, बहुधा कुठल्यातरी डाव्या, अतिडाव्या व तथाकथित लिबरल व्यक्तिची. ही मुलाखत 'लंच विथ एफ. टी.' अशी असते, जिचा जेवणाचा खर्च एफ. टी. करते. हा खर्च अनेकदा बर्‍यापैकी असतो, पण गप्पा मात्र डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍या. ह्या सेक्स्नमधे पुढे आर्ट्स विभाग असतो, ज्यात अतिशय उच्च किंमतीच्या जुन्या-नव्या आर्ट्वर्क्सविषयी माहिती असते, कुठला पुढील लिलाव कुठे आहे, ह्याची माहिती असते. अजून एक सचित्र विभाग 'हाऊस अँड होम' हा पाश्चिमात्य देशांतील उच्च घरांच्या माहितीबद्दल असतो. आणि सर्वांत कहर म्हणजे, दर दुसर्‍या वीकांतात अजून एक स्पेशल विभाग असतो, त्याचे नावच 'हाऊ टू स्पेंड'. नावाप्रमाणेच हा विभाग अतिशय उच्चभ्रू वस्तू अथवा, जागांविषयी असतो. म्हणजे, पैसा मिळवण्याचे स्त्रोत सर्व भांडवलदारांच्या कंपन्यांकडून, आणि स्वतःचा सूर अतिशय डावा.

ह्या सगळ्याच पाश्चिमात्य तथाकथित लिबरल मीडियांच्या मागे एक सूक्ष्म धार्मिक सूरही असतोच असतो.

मीडिया हाऊसच्या आयडियोलॉजी बद्दल आणि विश्वासार्हते बद्दल मत जरूर असावे, शंका जरूर असावी. तशी माझीही मते आहेतच.

पण औट ऑफ हँड उडवून लावणे अत्यंत अयोग्य. उदा, तो स्क्रोल लेख तुमि जशी चिरफाड केली त्याशिवाय उडवणे अयोग्य नाही का ?

Op India हे भयंकर कचरा रिपोर्टींग करते असे माझे मत आहे, तरी त्यांच्या आर्टिकल्स ची उडवाउडवी चूकच.

तुम्हाला कुठले मीडिया हाऊस भारतात आणि बाहेरचे आवडतात ? तुम्ही याबद्दल बराच विचार केलाय म्हणून विचारतो.

प्रदीप's picture

25 Apr 2021 - 12:58 pm | प्रदीप

ऑपइंडियाच्या बातम्या अतिरंजित, खोट्या अथवा चुकीच्या असतात, असे माझ्यातरी पहाण्यात आलेले नाही. पण त्यांची रिपोर्ट्सच्या मांडणीची पद्धत अतिशय वाईट आहे- शब्दबंबाळ, इकडे- तिकडे पसरलेले -- थोडक्यात रिपोर्ट्सची कॉपी कशी लिहू नये, ह्याचे ते आदर्श उदाहरण आहे.

भारतांत मी इंडियन एकस्प्रेस, लाईव्हमिंट व थोडेफार फर्स्ट्पोस्ट वाचतो; तसेच फेबु व ट्विटरवरूनही बरीचशी चांगली माहिती मिळते. परदेशांत वॉल स्ट्रीट जर्नल (धूमे सोडून) मला आवडते. व्हिऑन स्ट्रीमींगही चांगले असते.

तुमचेही असे काही सांगा.

लोकसत्ता ताज्या घडामोडी वाचायला. न्यूजलाउंड्रीचे ग्राउंड रिपोर्टींग चांगले असते. ते वाचतो. बाकी जी गोष्ट रोचक वाटते त्यासंदर्भात जिथे लिहिले आहे तिथे वाचतो. प्रिंट चे कट द क्लटर चांगले विश्लेषक असते. मागचे राजकीय संदर्भ कळतात.

अमेरिकन राजकारण करमणूक म्हणून फॉलो करतो. त्यांचे लेफ्ट- राईट डिबेट असतात त्या पाहतो. सॅम सिडर, चार्ली कर्क, बेन शापिरो, सेक्युलर टॉक विथ काईल कलिनस्की, डेव्हिड पॅकमॅन, डेस्टीनी, हसनआबी वैगेरे. चांगली करमणूक होते. त्यातला जेस्सी ली पिटर्सन नावाचा मुलाखतकार आहे, त्याच्या मुलाखती इतक्या भन्नाट असतात की हसून हसून पुरेवाट व्हावी.

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Apr 2021 - 9:01 pm | अनिरुद्ध.वैद्य

म्हणजे सनातन प्रभात ची इंग्लिस आवृत्ती वाटते :D

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Apr 2021 - 2:19 pm | चंद्रसूर्यकुमार

या असल्या मंडळींनी अनेकदा अशा खोट्या गोष्टी पेरल्या आहेत. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर कॅन्सरचे कुठलेसे औषध ७ हजार रूपयांवरून एक लाख रूपये झाले आहे अशी बातमी या लोकांनी पेरली होती. तसेच कुमारी मातांना आपल्या मुलांसाठी पासपोर्ट काढायचा असेल तर आपल्यावर बलात्कार झाला होता का ही बातमी पासपोर्ट फॉर्ममध्ये देणे या कुमारी मातांना बंधनकारक असेल अशीही बातमी यांनी आणली होती. या सगळ्या बातम्या खोट्या होत्या हे सांगायलाच नको. पनवेलला एका चर्चच्या कामावरून काढलेल्या कर्मचार्‍याने रागातून दगड मारून चर्चच्या खिडकीची काच फोडल्यावर तो अगदी राष्ट्रीय कटाचा भाग असावा अशाप्रकारे त्यांनी अपप्रचार केला होता. राजदीप सरदेसाईला आपण खोटे बोललो होतो असे हैद्राबादच्या कोर्टामध्ये कबुल करावे लागले होते. अशा कित्येक कथा आहेत.

एकूणच हे सगळे पुरोगामी मिडियावाले (एक तर काँग्रेस समर्थक असतील, समाजवादी असतील किंवा डावे असतील) असलेच थर्डक्लास असतात. त्यातही 'द हिंदू' किंवा 'फ्रंटलाईन' किंवा वायर किंवा स्क्रोल सारखे डावे सगळ्यात हलकट. लाल रंगाच्या अगदी फिक्या छटांपासून सगळ्यात गडद छटांपर्यंत सगळ्या छटांचे लोक थोड्याफार प्रमाणाने तसलेच असतात आणि कम्युनिस्टांविषयी मला जितका संताप आहे तितका संताप असलेले कोणीही मिपावर नाही याचा मला सार्थ अभिमान आहे.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 2:26 pm | मुक्त विहारि

Morning Walk नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता .
लांबून एक इसम लंगडत येताना दिसला .

एक डॉक्टर म्हणाले " याला काय झालं असेल हो ? "

डॉक्टर १ :left knee arthritis ."

डॉक्टर २ :नाही ,अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis ".

डॉक्टर ३ :" काहीतरीच काय !Ankle sprain असणार ."

डॉक्टर ४ : अरे बाबानो जरा नीट पहा ,त्याला एक पाय नीट उचलता येत नाही . foot drop असणार त्याचे lower motor neurons बिघडले असणार ."

डॉक्टर ५ : मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय .

डॉक्टर ६.............काही बोलणार....

तोपर्यंत तो इसम जवळ आला आणी अत्यंत नम्रतेने विचारू लागला ,
.
.
.
.

इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणात पाय भरलाय.....

आजची मीडिया देखील असेच अंदाज लावत बसते......

मदनबाण's picture

24 Apr 2021 - 11:34 pm | मदनबाण

पण भारताविषयी मात्र या लोकांचे कायमच डूम्सडेचे अंदाज राहिले आहेत.
आकडे किंवा इतर सांखिकी बद्धल मला विशेष काही माहित नाही, परंतु सध्य काळात मृत्यू चे प्रमाण हे करोनाच्या सुरुवातीच्या काळा पेक्षा नक्कीच अधिक आहे. आजु-बाजु स्थिती आणि एकंदर बातम्या पाहिल्यावर स्थिती भयावह आहे हे लगेच कळते.
रुग्णालयाच्या पायरीवर लोक मृत्यूमुखी पडलेली पाहतो आहे,यावरुन मला करोना काळाच्या आधीची परिस्थिती आठवते, तेव्हा ऑफिस चालु होते आणि चीन मधले लिक झालेले व्हिडियो मी डाउनलोड करुन फॉरवर्ड करत होतो,अगदी हापिसात देखील लोकांना चीन मध्ये काय घडतय ते सांगत होतो. तेव्हा चीन मध्ये लोक असेच रस्त्यात मरुन पडतानचे काही व्हिडियो मी पाहिले होते. आज तशीच काहीशी परिस्थिती आपल्या इथे निर्माण होताना दिसते. माझ्या ओळखितले, फार लांबचे नातेवाईक / ओळखीतले लोक करोनामुळे गतप्राण झालेले आहे. करोना नंतर वर्क फ्रॉम होम सुरु झाले त्यानंतर माझ्या नविन बॉस ने कार्यभार सांभाळायला घेतला,आमच्या टिम मधल्या कोणालाच त्यानी पाहिले नव्हते ना आम्ही त्यांना फक्त फोन आणि व्हॉइस मिटिंगवर जवळपास रोज बोलणे असायचे. हा बॉस माझ्याच कॉलनीच्या आत कुठे तरी एका सोसायटीत राहतो आणि मी त्याच्या इतक्या जवळ आहे हे एकदा मोकळ्या गप्पां मधुनच आम्हा दोघांना समजले. नंतर कंपनीने लॅपटॉप वितरीत करण्यास सरुवात केली,त्यावेळी मी नुकताच करोना मधुन सावरत होतो. तेव्हा माझा लॅपटॉय याच बॉस ने आमच्या सोसायटीच्या वॉचमन केबीन मधे आणुन ठेवला. नंतर काही काळाने हापिसात शिफ्टिंग होते तेव्हा आमच्या अजुन एक सिनियर बॉसने फोन केला की काही व्यक्तिगत सामान डेस्क मध्ये असेल तर सांगा ! मी सांगितले माझ्या डेस्कटॉपवर लालबागच्या गणपतीचा एक साधा फोटो आहे [ तो बाप्पा माझ्या बरोबर इतके वर्ष प्रत्येक प्रोजेक्ट फिरतो आहे. ] तो मला मिळाला तर फार आनंद होइल. ते देखील माझ्या साहेबाने केले, तो फोटो देण्यासाठी आमचे एक दोन वेळा बोलणे झाले पण या-ना त्या कारणाने भेटीचा योग जुळुन येत नव्हता. शेवटी एक दिवस त्यांचा मला फोन आला, त्यांच्या कुटुंबा सोबत ते बाहेर जाणार होते तेव्हा जाताना माझ्या कॉलनीतुन बाहेर पडताना तुला तो फोटो देतो असे त्यांनी मला कळवले.मला अत्तरांची भारी आवड ! आमची पहिली भेट लक्षात रहावी म्हणुन माझ्याकडची अगदी मधाळ सुगंधाची कुपी घेउन ठेवली, त्यांची माझी भेट झाली आणि बाप्पाचा फोटो घेतल्यावर त्यांना मी अत्तर लावले. ही आमची पहिली आणि शेवटची भेट ठरली !
बॉस म्हणणे त्यांना चुकीचे ठरावे,कारण बॉसिंग न करणारा,मनमोकळा आणि दिलखुलास व्यक्तिमत्व असणारा राजा माणुस तो. ते हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट झाल्याचे अचानक कळले, त्यांना त्यांच्या मोबाइलवर फोन लावला तेव्हा तो उचलुन बोलण्याच्या स्थितीत ते होते,म्हणाले रेमडेसिवीरचे इंजेक्शन दिले आहे, [ या नंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला पण नंतर परत अ‍ॅडमिट करावे लागले. ] २ दिवसांनी हापिसच्या व्हॉट्सग्रुप मध्ये त्यांना रक्ताची [प्लेटलेट्सची गरज असल्याचा मेसेज वाचला ] गरज असल्याचे समजले. हॉस्पिटल मध्ये फोन लावला तर ती गरज भागल्याचे डॉक्टरांकडुन कळले आणि व्हेंटिलेटर वरुन काढले असल्याचे कळले .मला वाटले आता धोका कमी झालेला दिसतोय फक्त श्वास घ्यायला त्रास होतोय, पण एकदोन दिवसातच ते गेल्याचे समजले ! एक व्यक्ती एक वर्षासाठी माझ्या आयुष्यात आला आणि एकदाच भेट होउन कायमचा दुरावला ते कधीच न भेटण्यासाठी ! :(
हे सगळ कठीण आहे, दु:खद आहे, वेदनादायी आहे आणि अस्वस्थ करणार आहे, रोज मृत्यूच्या बातम्या, रोज होणारे लोकांचे हाल, अपुर्‍या पडणार्‍या ववस्था या सर्व गोष्टींचा एक अनामिक ताण मनावर आहे. खरतर मन कुठे तरी दुसरीकडे वळावं, ताणातुन काही काळ का होइना मोकळीक मिळावी म्हणुनच खरं तर मी हे वेब सिरीज, चित्रपट पाहण्याचा धडाका लावला आहे,कारण मनावरील ताण कमी करणे गरजेचे आहे. अगदी आत्ता देखील आचार्य अत्रे यांचे केवळ भाषण ऐकत बसलो होतो. विनोदा सारखे दुसरे उत्तम औषध मनावर सध्या तरी उपलब्ध नाही !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #BoycottRadhe

कॉमी's picture

25 Apr 2021 - 8:45 am | कॉमी

फार रिलेटेबल प्रसंग आहे हो.

फारशी ओळख नसणारे, येता जाता हाय हॅलो पुढे इन्ट्रॅक्शन नसणारे लोक अचानक दिसेनासे झाले की भयंकर वाटतं.पहिल्या लोकडावून संपल्या नंतर आमच्या ऑफिस मधल्या एका तरुण मुलानं (२२-२३) अचानक आत्महत्या केली. आदल्या दिवशीपर्यंत संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत ऑफिस मध्ये इतर मुलांसोबत सोबत हसत खेळत नीट होता, आणि दुसऱ्या दिवशी बातमी आली. काय कारण माहित नाही. हा सुद्धा कोव्हिड बळीच असावा. तो नुकताच तीन महिन्यांपूर्वी जॉईन झालेला, ओळख फारशी नव्हतीच. हसतमुख, जरा गंभीर इन्ट्रोव्हर्ट माणूस होता. आपल्याला वाटत असते की घाई काय आहे, यांची ओळख करून घ्यायला अजून खूप दिवस आहेत. आता हुरहूर लागते.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Apr 2021 - 1:16 pm | चंद्रसूर्यकुमार

सध्य काळात मृत्यू चे प्रमाण हे करोनाच्या सुरुवातीच्या काळा पेक्षा नक्कीच अधिक आहे. आजु-बाजु स्थिती आणि एकंदर बातम्या पाहिल्यावर स्थिती भयावह आहे हे लगेच कळते.

हा वेगळा मुद्दा आहे आणि यात नाकारण्यासारखे काहीच नाही.

माझा मुद्दा हा की मोठे ढुढ्ढाचार्य तज्ञ लोक जेव्हा सगळीच वाट लागेल असे अंदाज व्यक्त करतात तेव्हा तसे काही होत नाही हा पूर्वेतिहास लक्षात घेता आता जर असे अंदाज परत यायला लागले असतील तर ती एक सकारात्मक बातमी समजावी का? कारण या मंडळींचे अंदाज कधीच बरोबर येत नाहीत.

मदनबाण's picture

25 Apr 2021 - 7:36 pm | मदनबाण

माझा मुद्दा हा की मोठे ढुढ्ढाचार्य तज्ञ लोक जेव्हा सगळीच वाट लागेल असे अंदाज व्यक्त करतात तेव्हा तसे काही होत नाही हा पूर्वेतिहास लक्षात घेता आता जर असे अंदाज परत यायला लागले असतील तर ती एक सकारात्मक बातमी समजावी का? कारण या मंडळींचे अंदाज कधीच बरोबर येत नाहीत.
ओक्के. मला मात्र यावेळी परिस्थिती अधिक खराब होइल अशी खरचं भिती वाटत आहे. नविन करोना स्ट्रेन हा अधिक काळ हवेत स्थिर राहत आहे असे सध्या तरी समजत आहे आणि जो इन्फेक्शन रेट आहे तो देखील पहिल्या लाटे पेक्षा अधिक वाटत आहे.
असो... येत्या काळात चित्र अधिक स्पष्ट होइलच. हिंदूस्थाना विषयी आणि त्याच्या प्रत्येक गुणा बाबत परदेशी मिडिया नेहमीच पक्षपाती राहिलेला आहे, हे राष्ट्र कधीच सामर्थशाली होउ नये आणि हिंदूंच्या विरुद्ध जे काही करणे आणि लिहणे शक्य आहे ते त्यांनी नेहमीच केलेले आहे.

============================================================================================

ऑक्सिजन :-

05 JAN 2021 5:02PM by PIB Delhi

PM CARES Fund Trust allocates Rs.201.58 crores for installation of 162 dedicated PSA Medical Oxygen Generation Plants in public health facilities
19.Maharashtra 10
महाराष्ट्राला १० प्लांट साठी पैसे मिळाले, मग किती प्लांट उभारले गेले सांगा बरं ? उभारले नसले गेले तर ते पैसे कुठे गेले ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KHAIRIYAT (BONUS TRACK) :- CHHICHHORE

महाराष्ट्राला १० प्लांट साठी पैसे मिळाले, मग किती प्लांट उभारले गेले सांगा बरं ? उभारले नसले गेले तर ते पैसे कुठे गेले ?

Pm cares मधून पैसे ऍलोट होण्याचा अर्थ त्या पैशांची खर्चाआसाठी उपलब्धता करणे असा आहे. ते पैसे राज्यांना खर्च करण्यास दिले असा नाही
तुम्ही दिलेल्या दुव्यात procurment cmss कडून होणार आहे असे लिहिले आहे. हि केंद्र सरकारची संस्था आहे.

नावातकायआहे's picture

25 Apr 2021 - 7:55 pm | नावातकायआहे

कुणी आडवले होते?

कॉमी's picture

25 Apr 2021 - 8:32 pm | कॉमी

?

नावातकायआहे's picture

25 Apr 2021 - 8:39 pm | नावातकायआहे

कॉमी सर, अलॉट झाले तर खर्च करायला काय हरकत होती हा प्रश्न आहे!

कॉमी's picture

25 Apr 2021 - 8:56 pm | कॉमी

मागील भागात प्रदीप ह्यांनी टेंडर डॉक्युमेंट दिले आहे. ते उघडा. त्याचे पान 45 काढा. त्याआधी तुम्ही स्वतः दिलेलं डॉक्युमेंट उघडा. त्यात प्रोकर्मेंट ( अर्थ- वस्तू मिळवणे, वाटाघाटी करणे, किंमत ठरवणे, इतर अटी ठरवणे.) कोणाकडे आहे ते पाहा.

ठीक.

१. प्रोकर्मेंट- केंद्र सरकार करणार आहे.

२. पैसे- ४०% माल मिळाल्यावर आणि ६०% प्लांट उभारून तसे नक्की झाल्यावर.
बिल निघणार- केंद्राच्या नावावर. (Cmss)

अलोकेशनचा अर्थ पैसे देणे असा होत नाही तर खर्चासाठी तरतूद करणे होतो. हा खर्च करणे प्रोक्युर्मेंटचाच भाग आहे.

मग, वस्तू मिळण्यापासून उभी होण्यापर्यंत पैसे खर्च करण्याचा आणि राज्य सरकारचा काहीही संबंध येत नाही. मुळात, केंद्राने पैसे राज्याला दिले हा निष्कर्ष कुठून निघतो ? जे वाचले त्यावरून cmss स्वतःच सप्लायर ना पेमेंट करणार आहे असे दिसते.

प्लांट का बांधून झाले नाहीत ह्याची उदाहरणार्थ करणे स्क्रोल लेखात आहेत.

प्रदीप's picture

25 Apr 2021 - 9:03 pm | प्रदीप

तुम्ही इथे लिहीलेले बाकी सर्व बरोबर आहे. फक्त

वस्तू मिळण्यापासून उभी होण्यापर्यंत पैसे खर्च करण्याचा आणि राज्य सरकारचा काहीही संबंध येत नाही

इथे मात्र थोडी गडबड झालीय का? उपकरणांची खरेदी व प्रत्यक्ष उभारणी ह्यांचे पैसे CMSS ही केंद्राची संस्था देणार आहे, हे अगदी बरोबर आहे. पण साईट तयार करण्याची जबाबदारी त्या त्या राज्यांची असेल ना?

बरोबर. पैसे द्यायचा संबंध येत नाही, असे म्हणायला हवे होते.

नावातकायआहे's picture

25 Apr 2021 - 9:41 pm | नावातकायआहे

धन्यवाद!

नावातकायआहे's picture

25 Apr 2021 - 7:54 pm | नावातकायआहे

५ महिने होउन गेले पैसे मिळून.

https://www.lokmat.com/maharashtra/bjp-prasad-lad-criticises-thackeray-g...

प्रोक्युरमेन्ट जर केंद्र सरकारने केली तर राज्य सरकारला कसे काय पैसे मिळतात ? फक्त १० प्लांट साठी पैसे असे का म्हणतायत ? किती पैसे दिले का नाही बोलत ?

पीडीएफ मध्ये लिहिले आहे प्रोकर्मेंट केंद्र सरकार संस्था cmss करणार आहे.

.... पोलिसांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांनी कारवाई नेमकी कशी केली?

https://www.tv9marathi.com/maharashtra/navi-mumbai/navi-mumbai-police-ca...
-------------
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही...

रात्रीचे चांदणे's picture

25 Apr 2021 - 9:54 am | रात्रीचे चांदणे

https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-situation-handling...

देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, आरोग्य सुविधांसह औषधांचा तुटवडा, करोनाबाधितांचे होत असलेले हाल… यावरून मतं मांडणाऱ्या आणि करोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते व अभिनेत्यांसह काही जणांनी केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यास केंद्राने ट्विटरला सांगितलं. त्यावरून काही अकाऊंटवरील ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आहेत.

जर ह्या बतमीमध्ये तथ्य असेल तर भाजपा सरकार चुकीच्या वाटेने जात आहे.

शा वि कु's picture

25 Apr 2021 - 10:23 am | शा वि कु

एवढे मोठे संकट असताना ट्विटर वर तक्रार करायला वेळ काढणारे सरकार... धन्य आहे.

तसेही ट्विटर वर कसे असावे ह्याचे चकाकते उदाहरण पक्ष प्रवक्ते वारंवार देत असतातच.

कंटेंट रीमुव्हल रिक्वेस्ट लूमन डेटाबेस वर स्टोअर होतात. ठठे भार्ट्सरकार्ने कोणकोणते ट्विट्स काढायला सांगितले त्यांची यादी आहे. आता हे ट्विट भारतातून पाहता येत नाहीत. बाहेरच्या देशात दिसतात.

जवळपास ५० ट्विट्स होते. त्यातले काही खोट्या माहितीवर आधारित होते असे वायर म्हणते.

काही ट्विट्झ मध्ये मोदी मेड डीजास्टर असा हॅश टॅग होता. काही ट्विट मध्ये मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली होती. काही ट्विट मध्ये माहिती अशी काही नाही, फक्त मोदींच्या कामाबद्दल असंतुष्टी होती. पवन खेरा ह्यांनी तब्लीघी जमातीवर इतका गदारोळ झाला आणि कुंभ मेळ्याबद्दल काहीच नाही असे कसे, असा प्रश्न विचारला होता. हि सगळी ट्विट भारत सरकारने ट्विटर ला काढून टाकायला सांगितली.

https://m.thewire.in/article/tech/as-covid-19-crisis-deepens-twitter-tak...

आग्या१९९०'s picture

25 Apr 2021 - 10:13 am | आग्या१९९०

कायमच त्याच वाटेने जाते. म्हणून तर बिजेपी समर्थक गप्प बसले आहेत.

कोरोना समस्यावर केंद्र सरकार आता दिवसेंदिवस धोरणांच्या बाबतीत अधिक विनोदी होत चाललेले दिसत आहे, देशात आता मुक्तकंठाने केंद्रसरकारच्या धोरणावर टीका होत आहे, आता ती टीका जागतिक स्तरावरही होतांना दिसून येत आहे. परदेशी दैनिकांमधून आत्मगौरवाचे, आत्मसंतुष्टकांचे वाभाडे काढलेले दिसत आहे. "मोदींचा अतिआतिविश्वास भोवला, भारताने दुसर्‍या लाटेला जो प्रतिसाद दिला त्याने अनेक कच्चे दुवे आहे, यातून इतर देशांनी धडा घेण्यासारखे आहे'' - द गार्डियन. (दुवा दी गार्डीयन) करोनाचा संसर्ग होत असतांना गंगास्नान कुंभमेळ्यावर टीका केल्याचे दिसते. ट्रम्प प्रमाणे निवडणुका मोदींनी सोडल्या नाहीत. मोर्चे रॅली यावरही ही टीका दिसून येते. मोदींनी आपलं अपयश झाकण्यासाठी त्यांचं खापर राज्यांवर कसे फोडले त्याचंही वर्णन दी गार्डीयन करतांना दिसते. (सविस्तर पोष्ट वाचावी)

चुकीच्या निर्णयांनी भारताने करोनाचा पेच आणखी गंभीर केला त्यात आत्मसंतुष्टाही भोवली. करोना रोखण्यातील भारताच्या सातत्याचे अपयश हे जागतिक परिणाम करणारे आहे. (न्युयॉर्क टाइम्स)
अशा प्रकारच्या केंद्र सरकारच्या नेतृत्वाच्या चुकांचा पाढा या दैनिकांनी वाचलेला दिसून येतो. पंतप्रधान यांनी त्यांच्या स्वतःच्या आकलनाने काही निर्णय घेतले. तज्ज्ञांच्या इशा-याकडे दुर्लक्ष केले त्यांच्या चुकांच्या परिणाम भोगावे लागत आहे. नरेंंद्र मोदी यांच्या अतिआत्मविश्वासामुळे हे सारे घडले. मा.मोदींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्बंध कसे राखावेत असे म्हटले आहे. मंत्रीमंडळातील मंत्रीही मोंदींची खुशामत करतात वगैरे असे म्हटले आहे. असे दोन्ही वृत्तपत्रातील संपादकीयचा आशय दिसतो.

वाशिग्नटन पोष्टनेही असेच वाभाडे काढलेले दिसत आहेत. क्रिकेट, कुंभमेळा, आणि सरकारच्या ढीसाळ कारभारावर टीका केलेली दिसते.

एकतर या सर्व दैनिकांनी विरोधी पक्षाशी संगनमत केले असावे अशी शंका आहे. जगभराच्या दैनिक आणि तज्ज्ञांच्या मी एक लक्षात आणून देऊ इच्छितो की आदरणीय पंतप्रधान मा.मोदी हे स्वतःच एक मोठे तज्ज्ञ असल्याने आम्हाला कोनाच्याही सल्ल्याची आणि सल्लागाराची गरज नाही, गरज पडत नाही. आम्ही आमचं पाहून घेऊ. मला वाटतं, या दैनिकांच्या मागे सीबीआय चौकशी लावावी मग नीट होतील, असे माझे व्यक्तीगत मत आहे. एवढे बोलून दोन शब्द संपवतो. ;)

-दिलीप बिरुटे

कॉमी's picture

25 Apr 2021 - 11:48 am | कॉमी

टाईम मधला हा ऍड करा.
https://time.com/5957118/india-covid-19-modi/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Apr 2021 - 1:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कालपासून छापील वृत्तपत्र आणि मीडिया चक्क सरकारच्या धोरणा विरोधात दबक्या आवाजात बोलत आहेत, पॅकेज संपलं की काय ? पॅकेज रिचार्ज करा म्हणावं. तसंही माध्यमे सरकार बदलले की सरकारच्या बाजूने होतात. अपवाद आहेतच, बाकी, अधुन मधुन सरकारविरोधात बोलले म्हणजे बदल झाले की पुन्हा सरकारच्या वतीने माध्यमे प्रवक्ते म्हणून बोलायला हजर.

आपलं भारतीय मीडिया संशोधनाचा विषय आहे.

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

25 Apr 2021 - 11:46 am | आग्या१९९०

परदेशी वृत्तपत्र काय म्हणतात ह्यापेक्षा मोदींच्या कार्यपद्धतीचा फटका त्यांच्या समर्थकांनाही बसला असल्याने ते सध्या गप्प आहेत ह्यातच सगळे काही आले.

मुख्यमंत्र्यांचा खास शिलेदार गोत्यात येण्याची शक्यता.....

https://m.lokmat.com/politics/cbi-should-question-anil-parab-says-bjp-le...
--------------

कर नाही त्याला डर कशाला? होऊ दे की CBI चौकशी ....

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Apr 2021 - 2:52 pm | चंद्रसूर्यकुमार

सचिन वाझे हा काय ओसामा आहे का वगैरे तारे मामुंनी तोडले होते तेव्हा वाझेचे समर्थन करायला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख होतेच पण त्याबरोबरच हे अनिल परबही होते. अनिल परब हे परिवहनमंत्री आहेत. पोलिस खात्यात कोणाला परत घेतले वगैरे गोष्टींचा त्यांच्या खात्याशी काडीमात्र संबंध नव्हता. तरीही ते वाझेचे समर्थन करायला पुढे होते. याचाच अर्थ वाझेबरोबर या परबांचेही काही साटेलोटे होते का हा प्रश्न नक्कीच पडतो.

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2021 - 2:57 pm | श्रीगुरुजी

पूर्वी एकमेकांना दिलेले शिव्याशाप विसरून सध्या हे तीनही पक्ष एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले आहेत. अर्थात उद्या भाजप-सेना किंवा भाजप-राष्ट्रवादी एकत्र आले तर असेच होईल यात शंका नाही.

आग्या१९९०'s picture

25 Apr 2021 - 3:15 pm | आग्या१९९०

आजपासून 'मन की बात बंद झाले '. ' जन की बात ' सुरू झाले. कानाचा वापर सुरू झाला, त्याचा प्रवास " उत्तोरत्तर " दिशेने होईल अशी आशा करूया.

https://youtu.be/Ys7N6nYfpoU

व्हिडिओखालील कॉमेंट्स वाचण्यासारख्या आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2021 - 8:58 pm | अमरेंद्र बाहुबली

३५ वर्षे ज्या सेनेबरोबर काढले त्या सेनेला आज भाजपेयी सत्तेतून हकलले म्हणून शिव्या घालत आहेत. ऊद्या सेने बरोबर सत्ता बनवायची वेळ आली की परत सेना गोड वाटू लागेल. भाजप सारखा विश्वास घातकी पक्श नाही. त्याना सत्तेसाठी पीईपी पासून राष्ट्रवादीपर्यंत कोणीहा चालतं फक्त सत्ता हवी बास! असा पक्श कधीच सत्तेत येऊ नये

सॅगी's picture

25 Apr 2021 - 9:42 pm | सॅगी

३५ वर्षे ज्या खांग्रेसला शिव्या घालण्यात धन्यता मानली, त्यांच्या बरोबर सत्ता बनवायची वेळ आली म्हणून खांग्रेस गोड वाटु लागली का?
शिवसेने "सारखा विश्वास घातकी पक्श नाही. त्याना सत्तेसाठी पीईपी पासून राष्ट्रवादीपर्यंत कोणीहा चालतं फक्त सत्ता हवी बास! असा पक्श कधीच सत्तेत येऊ नये"
.
.
.
वरील वाक्य तुमचेच आहे, फक्त भाजप च्या जागी शिवसेना आहे :)

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2021 - 10:10 pm | अमरेंद्र बाहुबली

चुकीची माहीती. सेनेने काॅंग्रेसच्या चुकीच्या धोरणांना विरोध आणी चांगल्या धोरणांना पाठींबा दिलाय. आणी जे केलं ते खुलेआम, चोरून लपून नाही.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 10:13 pm | मुक्त विहारि

अजून येऊ द्या ....

सॅगी's picture

25 Apr 2021 - 10:19 pm | सॅगी

शतकातला सर्वोत्तम विनोद..

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2021 - 10:20 pm | श्रीगुरुजी

आपल्याला शिवसेनेचा १९६६ पासूनचा इतिहास कणभरही माहिती नाही असं दिसतंय. तो आधी माहिती करून घ्यावा.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2021 - 10:26 pm | अमरेंद्र बाहुबली

आणीबानीला पाठिंबा ते प्रतिभाताईना पाठिंबा प्रसंगी युती. सेनेने ३५ वर्षे शिव्या दिल्या वगैरे खोटं आहें

सॅगी's picture

25 Apr 2021 - 10:31 pm | सॅगी

खोटं बोल पण रेटून बोल.

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2021 - 10:52 pm | श्रीगुरुजी
श्रीगुरुजी's picture

25 Apr 2021 - 2:47 pm | श्रीगुरुजी

शरद पवारांवर अजून एक शस्त्रक्रिया

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ncp-chief-sharad-pa...

कॉमी's picture

25 Apr 2021 - 4:04 pm | कॉमी

१. नीती आयोग प्रोजेक्शन- पीक मे मध्यावर,म्हाराष्ट्रानंतर यूपी हॉटस्पॉट होण्याची शक्यता. मिड मे मध्ये दिवसाला ५ लाखांपर्यंत केसेस देशभरात वाढू शकतात.

प्रोजेक्शन नुसार दिल्ली आणि युपीत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर शोरटेज वाढणार. आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर्सची संख्या दोन्हीकडे अत्यंत झपाट्याने वाढणे गरजेचे आहे.

केंद्राने ऑक्सिजन सप्लाय ३३०० mt प्रतिदिन वाढवला आहे. म्हणजे तो आता ६६००+३३००=९९०० mt असावा. आणि त्याव्यतिरिक्त (७२००-६६००=६०० mt) इंडस्ट्रीयल वापरासाठी आहे.

रेमिडीसीव्हीर चे प्रोडक्शन मार्चचे आणि मेचे प्रोजेक्टड पहिले तर २.५ पट वाढवले आहे.

२. केंद्र यापूर्वी लस निर्मात्यांकडून लस खरेदी करून राज्यांना वाटत होते. आता राज्यांना थेट लस खरेदीची परवानगी आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात नवाब मालिकांनी मोफत लसीकरण जाहीर केले आहे.

https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/coronavirus-outbreak/...

https://www.ndtv.com/india-news/maharashtra-to-give-coronavirus-vaccine-...

महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस; ठाकरे सरकारची मोठी घोषणा

https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-vaccination-drive-...
------------

अतिशय उत्तम निर्णय...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Apr 2021 - 5:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''मेलेल्या सरकारी व्यवस्थेचा माहूत '' या शीर्षकाखाली एका ऑष्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रसिद्ध जागतिक व्यंगचित्रकार डेव्हीड रोवे यांनी आपल्या आदरणीय मा.पंतप्रधान यांच्या कार्यप्रणालीचं रेखाटलेले व्यंगचित्र प्रसिद्ध झालं म्हणे, लिंक वगैरे सापडली नाही. हत्तीवर कोण बसलेले आहे त्यावरुन व्यंगचित्र ओळखलं. सद्य परिस्थितीवरील उत्तम भाष्य म्हणून व्यंगचित्र आवडलं.

संपादित

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2021 - 5:34 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

वामन देशमुख's picture

25 Apr 2021 - 5:47 pm | वामन देशमुख

भारत गणराज्याचा मानबिंदू असलेल्या तिरंगी राष्ट्रध्वजाचा या व्यंगचित्राद्वारे केलेला अवमान अजिबात आवडला नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Apr 2021 - 5:57 pm | चंद्रसूर्यकुमार

भारत गणराज्याचा मानबिंदू असलेल्या तिरंगी राष्ट्रध्वजाचा या व्यंगचित्राद्वारे केलेला अवमान अजिबात आवडला नाही.

मोदींवर टीका केली जात आहे ना? मग असल्या गोष्टी गौण समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे असते.

आग्या१९९०'s picture

25 Apr 2021 - 6:07 pm | आग्या१९९०

बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा झेंडा उलटा लावला हे बघायला वेळ नसतो, कधी शेक हॅन्ड करतो असे होते.

इथे प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज काढून आंदोलनजीवींचा झेंडा फडकावला तरी चालते.. त्यावर कोण अवाक्षर नाही काढत, पण अशा आंदोलनजीवींचे गोडवे मात्र किती गाऊ आणि किती नको असे होते.

वामन देशमुख's picture

26 Apr 2021 - 12:07 am | वामन देशमुख

बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा झेंडा उलटा लावला हे बघायला वेळ नसतो, कधी शेक हॅन्ड करतो असे होते.

मी असं कधीही केलेलं नाहीय.

राष्ट्राच्या पवित्र ध्वजाच्या अवमानाचे समर्थन कोणत्याही युक्तिवादाने होणार नाही. तो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही. तो अवमान आहे तो आहे. तो करणारा राष्ट्रप्रेमी असूच शकणार नाही. तो राष्ट्रद्रोहीच असेल.

या विषयावर यापुढे प्रतिसाद नको.

तुमची स्ट्रॅटेजी चुकली आहे. का ते आग्या उद्या सांगतील. Lol

गोंधळी's picture

25 Apr 2021 - 5:57 pm | गोंधळी

यहा भारत मे सब चंगासी....
बाकी भारतीयांचे नशीब एव्हडे थोर आहे की त्यांना असे पंप्र लाभले.

नावातकायआहे's picture

25 Apr 2021 - 6:08 pm | नावातकायआहे

निवडुन आलेत! छापा काटा करुन नाही आले.

आग्या१९९०'s picture

25 Apr 2021 - 6:02 pm | आग्या१९९०

प्रथम मंगळावरील " इंज्यूनटी " हेलिकॉप्टरमध्ये बसले असे वाटले, ती अंबारी आहे हे नंतर लक्षात आले. ( छदम विज्ञान प्रगतीमुळे तसा गैरसमज झाला. )

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Apr 2021 - 9:08 pm | अनिरुद्ध.वैद्य

अररर बेक्कार हानलाय! निस्ता धूर अन जाळ संगटच!

आजानुकर्ण's picture

26 Apr 2021 - 1:12 am | आजानुकर्ण

बिरुटे सर खूपच मार्मिक व्यंगचित्र. खास लॉगिन करुन प्रतिसाद द्यावा वाटला. रंगा आणि बिल्लाने भारत गणराज्याचा मानबिंदू असलेल्या भारतीय नागरिकांना श्वासास मोताद केलेले अजिबात आवडलेले नाही. रंगा-बिल्लाने अशी ठासली आहे की भक्तमंडळी आता patriotism is the last refuge of a scoundrel या न्यायाने राष्ट्रध्वज, राष्ट्रद्रोह वगैरे आळवून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतीलच. पण ग्राऊंड रिएलिटी त्यामुळे बदलत नाही. व्यंगचित्रकारास खास सलाम!

कॉमी's picture

26 Apr 2021 - 7:55 am | कॉमी

मार्मिक वाक्य आहे.

patriotism is the last refuge of a scoundrel

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2021 - 10:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब-याच दिवसानंतर तुम्हाला लॉगीन आणि मिपावर पाहून मलाही आनंद झाला.येत राहा.

बाकी सध्याचं संपूर्ण मंत्रीमंडळ म्हणजे मा.मोदी आणि देशाचे गृहमंत्री हे दोघेही सरकार म्हणून करोनाची दूसरी लाट हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, अपयशाचं खापर राज्यांवर कसे फ़ोडता येईल त्याचं प्लानिंग ते माध्यमांतून करतील, ते सुरुही आहे. गेली वर्षभर आपल्या लॉकडाऊनच्या चुकांवर पांघरुन घालून, तिस-या लाटेची कोणतीही पूर्वतयारी न करता, केंद्र आणि राज्यसरकार यांच्यात अशा संकटकाळी समन्वय असला पाहिजे, दोन चुका आमच्या दोन चुका तुमच्या सोडून पुढे जायला हवं. यांचं याही काळात राजकारण सुरु आहे.

बाकी प्रचार, मोर्चा, कुंभमेळे, शेतक-यांच्या आन्दोलनातील दोनशे पेक्षा अधिक मृत्यू याकड़े लक्ष न देता, 'दीदी, ओ दीदी' असा थिल्लर प्रचार करीत एव्हाना सर्व पदाचं गांभीर्य आणि प्रतिष्ठा गमावणे सुरु आहे. यातून बाहेर पड़ायचा एक मार्ग म्हणजे राष्ट्रवाद, देशावर संकट, एकजूट, ''संकटकी घड़ी में हमे एक होना है'' चा काही तरी जुमला आणतील असे माझं मत आहे, तो जुमला काय असेल याची मला उत्सुकता आहे.

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 10:11 am | आग्या१९९०

गेल्या १०००० वर्षात इतके मार्मिक व्यंगचित्र बघितले नव्हते.
अहंगंडामुळे गंडस्थळ जमिनीला टेकले म्हणून राष्ट्रध्वजाचा अपमान झाला आहे. तरीही माहूत खूष दिसतो आहे हे खटकत नाही का?

सुबोध खरे's picture

26 Apr 2021 - 12:25 pm | सुबोध खरे

भारत देश मृतप्राय झाला आहे हे दाखवणारे परदेशी व्यंगचित्र मिपा वर आलेले अजिबात आवडणारे नाही.

केवळ श्री मोदींवर टीका करण्याच्या नादात बिरुटे सरानी भारत देशाचा आणि जनतेचा अवमान केला आहे याबद्दल त्यांचा त्रिवार निषेध.

द्वेषाची पातळी इतकी खाली जाईल असे वाटले नव्हते.

चंद्रसूर्यकुमार's picture

26 Apr 2021 - 12:29 pm | चंद्रसूर्यकुमार

द्वेषाची पातळी इतकी खाली जाईल असे वाटले नव्हते.

याविषयी सहमत नाही. हे लोक यापेक्षाही खालच्या पातळीला जाऊन द्वेष करू शकतात हे वारंवार सिध्द झाले आहे. मोदी या एका माणसाच्या द्वेषामुळे भारत देशाला, देशाच्या हितसंबंधांना धोका पोहोचला तरी त्यांना चालतो हे गेल्या ७ वर्षांत अनेकदा त्यांनीच दाखवून दिले आहे. आणि त्या कारणाने टिका केली तर मग मोदींना विरोध केला म्हणून देशद्रोही म्हणतात अशी उलटी कोल्हेकुई करण्यातही हेच लोक सर्वात पुढे असतात.

कॉमी's picture

26 Apr 2021 - 12:39 pm | कॉमी

हे लोक यापेक्षाही खालच्या पातळीला जाऊन द्वेष करू शकतात

उदा. The only good अमुकतमुक is a dead अमुकतमुक

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2021 - 12:43 pm | अमरेंद्र बाहुबली

मोदी या एका माणसाच्या समर्थनामुळे भारत देशाला, देशाच्या हितसंबंधांना, आणी नागरीकांच्या जिवीताल् धोका पोहोचला तरी भाजप समर्थकांना चालतो गेल्या ७ वर्षांत अनेकदा दिसले आहे.

सौंदाळा's picture

26 Apr 2021 - 12:34 pm | सौंदाळा

पुर्ण सहमत

कॉमी's picture

25 Apr 2021 - 6:43 pm | कॉमी

झेंडा रिऍक्शन मिळायचे हमखास साधन आहे.बरेच ऑफेन्ड होणारे असतात. झेंडा लक्ष विचलित करण्याचे सुद्धा उत्तम साधन आहे. झेंड्याचा ऑफेन्स झाला असे वाटल्यास चित्रातल्या इतर भागाकडे दुर्लक्ष करणे फारच सोप्पे असते. झेंड्यामधून कशाही प्रकारचे युक्तिवाद करता येतात. उदा, आधी तो हत्ती म्हणजे मोठ्ठा गजराज होता, आता इतक्या मोठ्या संकटामुळे तो मृतावस्थेत गेला आहे. म्हणजे हत्तीवरचा झेंडा गतकाळातल्या वैभवाची याद देतो. एक अभिमानास्पद गोष्ट सुद्धा आहे, त्याच चित्रात.

जर हत्तीवर मोदी नसते तर झेंड्याचा ऑफेन्स थोडा कमी झाला असता, असे म्हणण्यास जागा आहे. अर्थात हे सगळ्यांबाबत खरे नाही. ,काही लोकांना जेन्युइन्ली झेंडा, राष्ट्रगीत ह्या सगळ्या प्रतिकांवर मनापासून विश्वास असतो. पण झेंडा हा त्यातल्या १३६ कोटी लोकांचे प्रतीक असते. ते मरत असताना, आपल्या नेत्याच्या वर्चस्वाखाली काही लोकं मरत आहेत, त्याच्या कृती मुळे, किंवा ती न केल्यामुळे असे चित्रातून सूचित केले आहे. झेंड्यापेक्षा ते मला व्यक्तिष: फार जास्त ऑफेनसिव्ह वाटलं आहे आणि त्यावर प्रश्न करावे वाटते. इतरांना तिथे ऑफेनसिव्ह झेंडा वाटणे काही सूचित करतंय काय ?

मला काय ऑफेनसिव्ह वाटले ?

मोदीजी स्मित हास्य करत आहेत आणि प्रचारात करतात तसे अभिवादन करत आहेत. इथे मोदी प्रचारात गुंतले आहेत हे ध्वनित केले आहे. त्याच्यात काही चूक नाही. मोदी जी प्रचारात सहभागी होतेच. पण त्यातून मोदीजी मृत्यूच्या बाबतीत उदासीन आहेत असे म्हणले आहे. Simply not true. मोदीजी काही स्टार वॉर्स मधले व्हिलन नाहीत. For all his shortcomings, he does not seem to be indifferent.

अर्थात, माझ्या ऑफेन्स ने काही फरक पडायचे कारण नाही. आमच्या दुखवण्याने जगावर कोणताही भौतिक फरक पडावा अशी आमची इच्छा नाही. या बाबतीत आम्ही कॉमी नसून लिब्रांदू आहोत.

धनावडे's picture

25 Apr 2021 - 11:50 pm | धनावडे

बंगाल मध्ये प्रचार फक्त बीजेपी च करत होती का? बाकीच्या पक्षांनी प्रचार केला नाही का?

कॉमी's picture

25 Apr 2021 - 11:58 pm | कॉमी

कार्टून मोदींवर आहे. बरोबर ?

आणि मोदी पंतप्रधान नात्याने जास्त जबाबदार राहतात. त्यांनी रॅलीमध्ये मास्क न घालता भाषण देणे हे अत्यंत चुकीचे वर्तन आहे.

अमर विश्वास's picture

26 Apr 2021 - 10:59 am | अमर विश्वास

तुमचा हत्ती पाहून एक हिंदी म्हण आठवली

चले चालसे हाथी अपने कुतर भुकत है .. भौकाने दो

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 11:04 am | आग्या१९९०

इकडे हत्ती मरून पडला आहे, चालत असता तर ती म्हण वापरता आली असती.

नावातकायआहे's picture

25 Apr 2021 - 6:50 pm | नावातकायआहे

डेथ राईड्स पेल एलिफंट हे काय सुचवते आहे?

सतिश गावडे's picture

25 Apr 2021 - 8:32 pm | सतिश गावडे

नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय.

किती ती कळकळ मिपाचा मेन बोर्ड हलता ठेवण्याची :)

वामन देशमुख's picture

26 Apr 2021 - 12:08 am | वामन देशमुख

किती ती कळकळ मिपाचा मेन बोर्ड हलता ठेवण्याची :)

भावना पोचल्या. :)

प्रदीप's picture

25 Apr 2021 - 9:20 pm | प्रदीप

.

सदर गृहस्थ कुणी माझ्यासारखे ऐरेगैरे नव्हेत. ते आहेत 'द प्रिंट' ह्या मीडिया हाऊसचे संस्थापक व प्रमुख संपादक. तत्पूर्वी ते इंडियन एक्स्प्रेसचे प्रमुख संपादक होते.

तर ६० सालापासून आलेल्या अनेकनेक आपत्तींमधे म्हणे सरकारचे अतिशय चांगले नियंत्रण होते, कंट्रोल रूम्स असत जिथे जबाबदार व्यक्ति उत्तरे देत. ह्यात त्यांनी दोन युद्धे समाविष्ट केलीत. मीही त्या काळात भारतांतच जगलोय. त्या सगळ्याच काळांत-- युद्धे व अन्य काही (स्थानिक दंगेधोपे नव्हेत, तर एकदम राष्ट्रीय स्तरावरची आपत्ती) -- अशी काही जरूरी सामान्य माणसांना पडली नाही. युद्धे सीमांवर होत होती; अधूनमधून काही शहरांवर बॉम्ब्स टाकण्यासाठी शत्रूची विमाने येत, तेव्हा सायरन वाजे, सर्व चिडीचूप होई. ते झाल्यावर, शत्रूची विमाने निघून गेल्यानंतर पुन्हा सायरन वाजे-- बस इतकेच. अन्यथा सामन्य माणसांपर्यंत त्या युद्धांची झळ पोचली नाही.

आणि ते 'अन्न- तुटवडा' ही म्हणतात? ही कुठली अतिशय गंभीर स्वरूपाची आपत्ति होती, की जिच्यात सामान्य माणसास कुठल्यातरी कंट्रोल रूम्ला फोन करण्याची जरूर यावी, हे एक फक्त कूप्ताच जाणोत.

आता, स्थानिक शहरांतील दंगली म्हणाल, तर माझ्या शहरांत, मी तिथे असतांना १९६८ ची दंगल झालेली आठवते. त्यावेळी कुणी, कुठल्या कंट्रोल- रूमला फोन केली ह्याविषयी मला माहिती नाही. पण १९९३ सालच्या दंगली, व २००८ सालांतील मुंबईवरील हल्ला, ह्या राष्ट्रीय आपत्तिंच्या वेळी मी तिथे नव्हतो, तरीही त्या दोन्हींविशयी जे वाचले आहे, त्यावरून तेव्हाही कुठे केंद्रात सरकार आहे, ते तत्परतेने कारवाई करते आहे, असे चित्र मनात उभे रहात नाही-- विशेषतः २००८ च्या वेळी! जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकावा.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Apr 2021 - 9:49 pm | चंद्रसूर्यकुमार

एक मूलभूत प्रश्न-

पूर्वीच्या आपत्तींच्या वेळी कंट्रोल रूम्स होत्या असे गुप्तांना म्हणायचे असेल तर त्यावेळी भारतात असे कितीशा लोकांकडे फोन होते? त्यामुळे अशा कंट्रोल रूम्स चालू केल्या जरी असत्या तरी त्याचा किती लोक फायदा घेऊ शकले असते? समस्त पुरोगामी जमात या सॅम पित्रोदांचा भारतात टेलिकॉम क्रांती आणली म्हणून उदोउदो करत असते त्या पित्रोदांची टेलिकॉम कमिशनमधील कारकिर्द संपली तेव्हाही फोन मिळायला १०-१० वर्षे प्रतिक्षायादी असायची आणि भारतात टेलिफोनची घनता केनिया, पाकिस्तान, श्रीलंका वगैरे देशांपेक्षाही कमी होती. १९८६ मध्ये घाटकोपरला राहणार्‍या माझ्या काकांचे एके दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तेव्हा त्यांच्या आणि आम्ही राहात होतो त्या इमारतीत एकेक फोन होता त्यामुळे आम्हाला तो निरोप लगेच कळला. पण डोंबिवलीला राहणार्‍या दुसर्‍या काकांकडे किंवा त्यांच्या इमारतीतही फोन नव्हता. तेव्हा घाटकोपरहून कोणालातरी निरोप द्यायला पाठवले. त्यांना दुसर्‍या काकांचे घर शोधायला रात्रीच्या वेळेला त्रास झाला आणि जेव्हा त्यांना निरोप मिळाला तेव्हा मुंबईला जाणार्‍या शेवटच्या गाडीची वेळ होऊन गेली होती. त्यामुळे त्या काकांना घाटकोपरला जायला सकाळी चारची पहिली गाडी सुरू व्हायची वाट बघावी लागली होती. मुंबईबाहेर तर दुसर्‍या दिवशी सकाळी तारा पाठवल्या तेव्हा दुसर्‍या दिवशी संध्याकाळी किंवा तिसर्‍या दिवशी सकाळी समजले. असे अनुभव या ना त्या कारणाने अनेकांना आले असतील.

गुप्ता नक्की कोणत्या कंट्रोल रूम आणि फोनविषयी बोलत आहेत?

नो कंट्रोल रूम्स टू टॉक चा अर्थ पूर्वी कंट्रोल रुम होत्या असा नसावा. आज उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर झाला नाही असा असावा. चूक भूल द्या घ्या.

मला व्यक्तिगत रित्या ह्यातले काहीच आठवत नाही. त्यावेळेस राजकारणाबाबत रिसेप्टीव्ह नव्हतो.

आजानुकर्ण's picture

26 Apr 2021 - 1:17 am | आजानुकर्ण

मूळ मुद्द्याला बगल द्यायचे प्रकार चालू आहेत. शेखर गुप्ता हे क्लासिक कॉमी नसल्याने आता त्यांचा प्रतिवाद कसा करणार? कुठलातरी निरर्थक मुद्दा काढून शेखर गुप्तांचे ट्विट कसे इर्रिलिवंट आहे हे आडून आडून सांगणे हे वरच्या दोन प्रतिसादांचे गमक आहे.

आजानुकर्ण's picture

26 Apr 2021 - 1:15 am | आजानुकर्ण

शेखर गुप्तांच्या ट्विटचा अर्थ हा - या परिस्थितीतील निद्रिस्त सरकार आणि कुठेही अकाऊंटिबिलिटी नाही - हा आहे. कंट्रोल रुम आणि 1984 नंतर फोन आले वगैरेंचा शब्दच्छल करत कीस काढणे हे फक्त मूळ मुद्द्याला कलटी मारायचे प्रकार आहेत.

प्रदीप's picture

26 Apr 2021 - 8:23 am | प्रदीप

सर्वप्रथम, मी सामान्य माणूस आहे, कुठलाही 'ओपिनियन मेकर' नाही. शेखर गुप्ता तसे आहेत आणि म्हणून त्यांच्या ट्विटचे महत्व आहे. दुसरे, मी काही कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता, प्रचारक वगैरे नाही. माझी काही राजकीय मते आहेतच, पण तरीही मी, मला मिळत असलेल्या, माझ्या दृष्टिने विश्वासार्ह असलेल्या स्त्रोतांकडून आलेल्या, माहितीच्या आधारे माझी मते बनवतो, व जरूरी असल्यास ती बदलतोही.

इथे मी केवळ चर्चा करण्यास आलेलो आहे, कुठलाही अभिनिवेष घेऊन नाही. तेव्हा मूळ मुद्द्याला 'कलटी' वगैरे मारण्यातून मला काहीही साध्य करण्यासारखे नाही. हा तुमचा आरोप तुमच्याकडेच ठेवावा.

शेखर गुप्ता आता सुरू असलेल्या आपत्तीची, पूर्वी आलेल्या आपत्तींची स्वःहून तुलना करतात, ते मी त्यांच्या तोंडी घातलेले नाही. वास्तविक ह्या करोनासारखी आपत्ति माझ्या जन्मी तरी-- म्हणजे, आता सुमारे ७० वर्षांत-- मी तरी अनुभवली नाही, आपल्या देशांतच नव्हे, तर सर्व जगांतच! करोनाच्या पहिल्या लाटेने उ. अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी व यू. के. इथेही अतिशय हलकल्लोळ माजवला, तो अभूतपूर्व होता. तसेच दुसर्‍या लाटेने यू. के. व जर्मनीतही वाईट परिस्थिती उद्भवली आहे. ह्यापूर्वी अशी परिस्थिती युरोपांत दुसर्‍या महायुद्धांत व आपल्या उपखंडांत, फाळणीच्या वेळी झाली असावी. पण आपण इथे त्यांचा विचार करत नाही आहोत. (गुप्तांनीच भातापुरते बोलतांना फाळणीनंतरचे, असे म्हटले आहे). म्हणून सदर आपत्तिची कुठल्यातरी पूर्वीच्या (६० सालानंतरच्या) आपत्तींशी तुलनाच मुळात अतिशय चुकिची आहे. आपल्या मुद्द्याखातर गुप्ताच, दोन युद्धे व कुठलीतरी 'अन्न- आपत्ती' चे हवाले देतात. हे अन्न- आपत्ती प्रकरण काय आहे, त्यांचे तेच जाणोत. तसेच अगदी त्यांतल्या त्यांत राष्ट्रीय आपत्त्या पहावयाच्याच, तर २००८ च्या मुंबईवरील हल्ल्याचा विचार करावा? तरीही सर्वच तुलनेने आताची आपत्ती अतिभीषण आहे.

आणि त्यांत केंद्राची गाफिली आहेच त्याचबरोबर राज्य सरकारे व माझ्या मते, जनतेचीही तेव्हढीच आहे. ह्याविषयी सविस्तर चर्चा व्हावी पुढेमागे.

एक्सप्रेस लेख भारत देशाचा कोव्हिड रावैय्या उत्तम दाखवतो. किती गलथानपणा करावा. हे सगळे लोकांनी वाचणे खूप महत्वाचे आहे.

प्रदीप's picture

26 Apr 2021 - 8:45 am | प्रदीप

आणि इथे कुठल्याही प़क्षाच्या राज्य कारभाराचा संबंध नाही. ही भारतीय मानसिकता आहे. साधे मास्कचे पहा- अनेकजण मास्क न लावतांच फिरतांना दिसतात, काहीजण मास्क वरखाली करीत असतात. मास्क जर नाकाखाली करून ठेवायचा आहे, तर तो लावायचाच कशाला? दुसरे, हे असे करतांना मास्कला हात लावला जातो, तो अगोदर नीट सॅनिताईज करून घेतलेला असतो का? तर बहुधा नाही. थोडक्यात ही अतिशय मूलभूत बाब, जी प्रत्येक व्यक्ति सहज करू शकेल, तीही ती आपण करत नाही. जनता काळजी घेत नाही, व इतरस्त्र आलेल्या लाटेचे आपण मनावर घेतले नाही. आणि त्यांतून, सामाजिक भान नसल्यामुळे, शक्य होईल तिथे, समाज्स्वास्थ्याला हानी करत करत, स्व्तःसाठी पैसा करण्याच्या आमिषाने परदेशांतून आलेली माणसे क्वारंटीन न होताच, गफलत करून समाजात मिसळून सोडली जातात. ह्या सर्वांचा मिळून परिपाक म्हणजे ह्या लाटेची भीषणता.

शा वि कु's picture

26 Apr 2021 - 8:54 am | शा वि कु

ह्यात पक्षाचा संबंध नाही असे नाही. सर्व राज्य आणि केंद्र सरकारने जागतिक तज्ञांची मते घेऊन "टिपिकल भारतीय मेंटलीटी" च्या वर राहून काम करणे अपेक्षित आहे. सरकारे प्रधान मंत्री मुख्यमंत्री कोणीही अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, एपिडेमोलॉजी ह्यात तद्न्य नसतात. त्यांनी तज्ञानच्या सल्लाम्सलतीने काम करणे अपेक्षित आहे. बहुसंख्य जनतेची चूक असली तरी सरकारी चूक ओव्हरलूक करायची नाही. तिथे अकौंटेबिलिटी हवीच. आणि त्या त्या राज्याने आणि देशाने रिस्पेक्टिव्ह राज्य आणि केंद्राकडे जाब मागावाच.

कॉमी's picture

26 Apr 2021 - 9:02 am | कॉमी

तंतोतंत सहमत. भारतीय मेंटलीटी हे सगळे सरकार साठी कारण नाही.

प्रदीप's picture

26 Apr 2021 - 10:38 am | प्रदीप

तिथे अकौंटेबिलिटी हवीच. आणि त्या त्या राज्याने आणि देशाने रिस्पेक्टिव्ह राज्य आणि केंद्राकडे जाब मागावाच.

अगदी, नक्कीच. पण आपले, म्हणजे भारतीय समाजाचे कसे आहे, आपणांस अधिकार हवेत. पण आपणांस जबाबादारी नको.

मी जे मास्कचे म्हटले आहे, ते इतके क्षुल्लक नाही. मी ज्या जागेत रहातो, तेथील सांगतो-- कारण अर्थातत, इथले असे व तिथले तसे ही तुलना होत रहातेच, व ती रास्तही आहे. इथे माणसे सरकारने सांगितलेले/ त्याच्या गाईडलाईन्सही व्यवस्थित, खळखळ न करता पाळतात. २००३ च्या सार्समधे आम्ही येथे प्रचंड मार खाल्ला. तेव्हापासून सर्दी झाली, विशेषतः खोकला, की घराबाहेर पडतांना माणसे मास्क लावूनच पडतात. तेव्हा ह्या परिस्थितीत मास्क लावून फिरणे, येथील जनतेला सहज शक्य झाले. येथे मास्क न लावता बाहेर फिरणारी व्यक्ति दिसतच नाही. बोलतांना, माईक समोर बोलतांनाही, माणसे मास्क लावूनच बोलतात. कोठेही मास्क सारखा खालीवर करत नाहीत. ह्यामुळे, मला तरी वाटते, येथे करोना आटोक्यात येण्यास बरीच मदत झाली.

दुसरा भाग सरकारच्या कार्याचा. येथे पॉसिटिव्ह झालेल्या प्रत्येक केसचा, होईल तितका पाठपुरावा केला जातो. म्हणजे, तिचे ट्रेसिंग केले जाते, त्याप्रमाणे कुटुंबातीलच नव्हे, तर त्या व्यक्तिच्या घनिष्ट संपर्कात आल सर्वच ठिकाणची सर्वच व्यक्तिंना सरकरच्या क्वारंटिनमधे पाठवली जातात. इतरांची तेस्ट केली जाते. येथे करोना बर्‍यापैकी आटोक्यात येण्याचे हे दुसरे प्रमुख कारण.

आपल्या येथे हे इतके करणे सरकारांना (केंद्र व राज्ये) जवळजवळ अशक्य आहे. एकतर ट्रेसिंग कुठेकुठे व कसेकसे करणार? दुसरे आपणांस सर्वांनाच-- आणि विशेषतः हे मध्यमवर्गीय व उच्चस्तरीय वर्गास विशेष लागू आहे-- कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रत्येक नियमातून स्वतःपुरते एक्सेप्शन हवे असते. गेल्या लॉकडाऊनच्या वेळी, देशांतील अनेक भागांतील पोलीस, रस्त्यांवरून भटकणार्‍यांना चोप देतांना दिसले. पण असा चोप खाणारे गरीब, सायकल अथवा टू- व्हीलरवरून जाणारे होते. कारमधून जाणार्‍यांशी गोडीगुलाबीने बोलून सोडले जात होते, असे बरेच व्हिडीयोज पहाण्यात आले. मी भारतांत आलेल्या प्रत्येक वेळी पाहिले, रस्त्यावरच्या लोकांना लाईनीत उभे रहा, शिस्त थोडीफार पाळा, असे समजवता येते,. पण मध्यमवर्गीय व उच्च समाजांतील लोकांना तसे करणे शक्य होत नाही. त्यांतील अनेकांना मग्रूरी असते, व ती ते सहज दर्शवतात.

तर, ही 'अधिकार हवेत, पण जबाबदारी नको' अशी मानसिकता दूर होत नाही, तोंवर कुठलेही सरकार काहीही फारसे करू शकणार नाही. ही लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे, एकट्या सरकारांनीच नव्हे.

कॉमी's picture

26 Apr 2021 - 11:14 am | कॉमी

पहिल्या लोकडाऊन ला ज्या फेरोसिटी ने नियम पालन करून घेतलेले, त्या त्याचे काही टक्के तरी आत्ता करायला काय हरकत होती ? सरकार समोर इतके अजस्त्र रिसोर्स आहेत, माहिती आणि सल्लामसलत करण्याचे मार्ग आहेत. त्यामुळे प्रायमरी जबाबदारी जनतेची होत नसते, सरकारांचीच होते.

सरकार दरबारी सुद्धा स्वतःच्या रॅल्या, धार्मिक उत्सव चालूच होते. प्रोत्साहन पण होते (clean & safe kumbh) मग जनतेने यातून काय बोध घ्यावा ? भारतात आप्रोक्स २२% दारिद्रीरेषेखाली आहेत. पहिल्या लॉकडाऊन मध्ये अपरिमित हाल सोसून, पोलिसांच्या लाठ्या खाऊन नियम पाळलाच ना त्यांनी ? हे सगळे विसरून दुसऱ्या वेव्ह मध्ये आपले नेते मास्क न लावता रॅलीत भाषण देत होते. ह्याचा विचार करूनच संतापाची तिडीक जाते मस्तकात. त्यामुळे शिस्त बसवणे हि अशक्य गोष्ट नाही. ती प्रायोरिटीच नव्हती. लिडिंग बाय एक्साम्पल असते. जे स्वतः नियम फ्लॉन्ट करतात ते काय हक्काने इतरांकडून अपेक्षा करणार ?

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 11:34 am | आग्या१९९०

जे स्वतः नियम फ्लॉन्ट करतात ते काय हक्काने इतरांकडून अपेक्षा करणार ?

मोदींनी काही केलं तरी लोकं नावच ठेवतात, असं काही जण चंद्र, सूर्य,तारे तोडतील.

प्रदीप's picture

26 Apr 2021 - 12:24 pm | प्रदीप

तुम्ही तीन मुद्दे उपस्थित केले आहेत.

१. लॉकडाऊन का नाही केला: पहिल्यावेळी लोकांनी बर्‍यापैकी असोशीने तो पाळला. पण तसे सर्वव्यापी देशभर पुन्हा पुन्हा करणे अशक्य आहे, कारण मग लोक नक्कीच पेटून उठतील, व त्यांतून देशव्यापी दंगे होतील. तुम्ही म्हणता तशी सल्लामसलत केंद्राने केली नसेल, कशावरून? अर्थात, सध्याच्या केंद्र सरकारने काही करायचे ठरवले की, निव्वळ त्याच कारणामुळे त्याला विरोध करणार्‍या बहुतांशी राजकीय पक्षांबरोबर ती केली नसावी, कारण त्यांतून काहीही निष्पन्न होणार नाही, ह्याचा त्यांना खात्री असावी? पण इतर काही समाजघटकांशी केली असावी? त्याचप्रमाणे, आडून आडून त्यांनी जनमानसाचा कानोसा घेऊन देशव्यापी लॉकडाऊन न करण्याचे ठरवले असावे-- हा माझा तर्क आहे.

पण चंद्रसूर्यकुमारांनी म्हटल्याप्रमाणे, स्थानिक स्तरीय लॉकडाऊन लावण्याचे शक्य होते, ते राज्य सरकारे व त्याहीपेक्षा खालील पातळीवरील स्वराज्यसंस्थांचे काम आहे. त्याबद्दल केंद्राने, मला वाटते, राज्यांना अगोदरच सूचित केले होते?

कसे आहे, देशव्यापी लॉकडाऊन लावला, व तो ही दुसरी लाट थोपवण्यात यशस्वी झाला, तर बहुतांश लोक, तो का लावला, त्यामुळे काय फायदा झाला वगैरे म्हणतील (तसे ते पहिल्या लॉकडाऊनच्या वेळीही म्हणालेच). कारण अशी एक्स्ट्रीम अ‍ॅक्शन यशस्वी होते, तेव्हा तिच्यामुळे चांगला (पॉसिटीव्ह) परिणाम दिसला, हे सहज लक्षांत येत नाही. पण तसा तो न लावल्याने, आता आपण 'तसा का नाही लावला' असे विचारत आहोत.

२. दुसरा मुद्दा - कुंभमेळ्याच्या परवानगीचा. तर हे असे चुकिचे आहे, पण इतरस्त्र अनेक मेळावे, राजकीय आंदोलने (इशाज्ञ दिल्लीच्या प्रदीर्घ रस्ता रोकोपासून सुरू होऊन, मग पुढे तथाकथित 'शेतकर्‍यांची आंदोलने'), अजमेर शरीफचा उरूस, हैद्राबादेतील रमझानच्या निमीत्ताने झालेली गर्दी, केरळामधील कुठल्यातरी हिंदू देवळाची जत्रा, मुंबईतील काही मुस्लिमबहुल भागांतील वर्दळ... अशी अनेक उदाहरणे आहेत की. ह्या सर्वच ठिकाणी अतिशय कठोरपणे निर्बंध लावले पाहिजे होते ना? तसे ते नाही गेले ह्याला आपली राजकीय सिस्टीम कारणीभूत आहे.

३. मास्क-- नेत्यांनी मास्क न लावता गर्दीतच काय, अगदी इतरस्त्र वावरणेही चूकच आहे. हे मान्य केले तरी 'लीड बाय द एक्झँपल' हे आपल्या समाजासाठी सर्वच बाबतीत, फारसे लागू नाही. आता पहा, ह्या बंगालच्या निवडणूकांपर्यंत मोदी स्वतः नेहमीच - म्हणजे, मार्च२०२० पासून गेल्या एकाद दोन महिन्यांपर्यंत व्यवस्थित मास्क लावून वावरतांना दिसले आहेत. पण म्हणून काही देशातील शिकली- सवरलेली जनता, त्यांचे उदाहरण घेऊन, मास्क लावून तेव्हापर्यंत फिरत होती काय? मी जे काही विडीयोज पहातो, त्यावरून ते तसे नव्हते हे इतक्या दुरूनही सांगू शकतो.

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2021 - 8:48 am | श्रीगुरुजी

आणि त्यांत केंद्राची गाफिली आहेच त्याचबरोबर राज्य सरकारे व माझ्या मते, जनतेचीही तेव्हढीच आहे. ह्याविषयी सविस्तर चर्चा व्हावी पुढेमागे.

+ १

आज फक्त मोदींना लक्ष्य केले जात आहे. विशेषतः काही परदेशी माध्यमे काही दिवसांपासून अचानक मोदींविरूद्ध सक्रीय झालेली दिसत आहेत, हे रोचक आहे. समजा मोदी पूर्ण नालायक आहेत असे क्षणभर गृहीत धरू या. पण मग या काळात राज्य सरकारे काय करीत होती? आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी काय केले? आणि जनतेची काहीच जबाबदारी नव्हती का? बंदी असूनही हिंजवडी येथे हजारोंच्या उपस्थितीत बगाड यात्रा आयोजित करणे, बैलगाडा शर्यती, जालीकट्टू, संजय राठोडने लाखभर माणसे जमवूनआयोजित केलेली पोहरादेवीची यात्रा इ. साठी मोदीच दोषी आहेत का? प्रचारसभा जशा मोदींनी आयोजित केल्या तशाच ममता, राहुल, साम्यवादी, महाराष्ट्रात अजित पवार वगैरेंनीही आयोजित केल्या. पण फक्त मोदींवरच दोषारोप का?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जितके दोषी केंद्र सरकार आहे तितकेच दोषी सर्व राज्य सरकारे व जनता आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

26 Apr 2021 - 9:44 am | चंद्रसूर्यकुमार

कोरोना संपला असेच डिसेंबर-जानेवारीमध्ये वातावरण होते- सामान्य जनता, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सुध्दा. ही ढिलाई सगळ्याच स्तरांवर झाली आहे.

बाकी सगळा मिडिया, विशेषतः स्वयंघोषित पुरोगामी, डावे, समाजवादी वगैरे किळसवाणे लोक एक अजेंडा ठेऊन टीका करत आहेत हे समोर दिसतच आहे. अधिकृत आकड्यांनुसार काल दिल्लीमध्ये २२,९३३ तर बंगालमध्ये १५,८८९ नवे रूग्ण आले. दोन्ही ठिकाणी रूग्णांच्या आकड्यांची लपवाछ्पवी करणारी सरकारे नसल्याने या आकड्यांवर विश्वास ठेवायला हरकत नसावी. दिल्लीच्या लोकसंख्येपेक्षा किमान ५-६ पटींनी बंगाल राज्याची लोकसंख्या आहे. त्यामुळे कोरोना हे संकट बंगालमध्ये आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी दिल्लीत आहे. दिल्लीच्या सीमांवर रिकामटेकडे दलाल लोक नोव्हेंबरपासून ठाण मांडून होते. तेव्हा या घाणेरड्या पुरोगामी डाव्यांना कोरोनाचे काय होईल हा प्रश्न पडला नव्हता. तर तेव्हा मोदी सरकारविरोधात इतके लाखो लोक रस्त्यावर आले म्हणून हे सगळे लोक टाळ्या पिटत होते. हे ढोंगी लोक काहीही झाले तरी मोदींविरोधातच गरळ ओकणार. त्यांना कितपत महत्व द्यावे? बंगालमध्येही मतदानाच्या पहिल्या चार फेर्‍या होईपर्यंत तिथे सभा चालल्या आहेत आणि सभांना लाखांची गर्दी होत आहे याविषयी हे विचारवंत काहीही बोलत नव्हते. पण बहुदा बंगालमध्ये भाजप जिंकायची शक्यता आहे हे समजल्याने मग सगळा गदारोळ सुरू झाला आहे. जगातील सगळ्यात घाणेरड्या लोकांमध्ये या विचारवंतांचा समावेश होतो हे नक्की.

मागच्या वर्षी जून महिन्यातच गरजेप्रमाणे काही बंधने लावायचा अधिकार राज्य सरकारांना देण्यात आला होता. आणि ते योग्यही होते. जर पूर्ण देशात लॉक-डाऊन लावायचा असेल तर त्यात केंद्र सरकार येणे समजू शकतो. पण स्थानिक पातळीवर गरजेप्रमाणे तसा निर्णय घ्यायची वेळ आली तर तो निर्णय दिल्लीवरून करायची काही गरज नाही- तो राज्यपातळीवर (खरं तर महापालिका पातळीवर) व्हायला हवा. ३१ डिसेंबरला गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स या ठिकाणी गर्दी होते म्हणून पोलिसांनी संध्याकाळी सहापासूनच तिथे असलेल्या सगळ्यांना तिथून हाकलले आणि परिसर पूर्ण निर्मनुष्य केला होता. असे निर्णय जिथेजिथे गर्दी होईल तिथेतिथे घ्यायला हवेच होते. हे निर्णय घ्यायची जबाबदारी मोदींची होती का? बाकी पी.एम.केअर्समधून जानेवारी महिन्यातच ऑक्सिजन प्लॅन्ट्स उभारायला राज्यांसाठी पैसे मंजूर झाले होते. त्याचे पुढे काय झाले?

मोदी कसे वाईट, मोदींचे कसे चुकले, मोदींचे काय चुकले असले लेख पाडत गेल्या जवळपास २० वर्षात कित्येक तथाकथित पत्रकारांची करिअर झाली आहे. आणि प्रत्येक वेळी सामान्य जनतेने या ढुढ्ढाचार्यांना मतदान यंत्रातून चांगलीच चपराक लावली आहे. असल्या विचारवंतांविषयी माझे मत कमालीचे टोकदार आणि वाईट आहे. आणि त्यात कानामात्रावेलांटीचाही बदल करायची गरज मला वाटत नाही. माझे या विचारवंतांविषयी- विशेषतः कम्युनिस्टांविषयीचे मत पुढील फोटोत देत आहे. या फोटोत तो बोर्ड घेऊन उभा असलेला माणूस म्हणजे मागच्या जन्मातील मी होतो.

communist

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2021 - 9:48 am | श्रीगुरुजी

Absolutely bull's eye.

वृषभाक्षाचा अचूक लक्ष्यभेद.

सॅगी's picture

26 Apr 2021 - 9:49 am | सॅगी

फोटो तर अजूनच भारी आहे.

आवडत्या सरकारवर टीका केली की कळप, समाजवादी, पुरोगामी हि रेलचेल मनोरंजक आहे.

डेड कॉम्युनिस्ट- धन्यवाद. तुमच्या अत्युच्च हिमालयीन वैश्विक रागाने परिस्थिती बदलत नाही. लगेच दिल्ली, पुरोगामी, शेतकरी असे whataboutism सुरु झाले आहे.

तुम्हाला सुद्धा तुमच्या विचारसरणीवरचा एक फोटो देतो. यवपुढे असल्या आतातायी, हातपाय आपटणार्या लहान बाळाच्या टन मधील प्रतिसादात काही सॉलिड ग्राऊंडेड लिहिले असेल तर वाचीन. तुमचे ट्रेडमार्क "धुढ्ढाचारी, डावे , फुरोगामी" रदारडी कडे दुर्लक्ष करीन.

Pm केअर्स बद्दल बरेच प्रतिसाद आहेत. डोळे उघडले तर दिसतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2021 - 10:43 am | अमरेंद्र बाहुबली

केरळ मध्ये केलेलं ऊत्तम व्यवस्थापन पाहून कम्युनिस्टांविषयी मत बदललंय.

कॉमी's picture

26 Apr 2021 - 10:50 am | कॉमी

धन्यवाद.
शिक्षण, हेल्थ केअर सगळ्या बाबतीत केरळ सरकार अतिशय सुंदर काम करत आले आहे. कोरोना आधी सुद्धा केरळ मधली आरोग्य व्यवस्था उत्तम होती. कम्युनिस्ट असूनसुद्धा लोकशाही आणि फ्री मार्केट देशात इतके उत्तम काम त्यांनी केले आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2021 - 12:31 pm | अमरेंद्र बाहुबली

चांगले काम करनार्या कम्युनिस्टांचा धिक्कार असो. बंगालात लाखोंच्या सभा घेऊन कोरोना पसरवनार्यांचा, आणी विरोधी पक्शाचे सरकार असलेल्या राज्यांची अडवणूक करनार्या दाढीवाल्या बाबाचा विजय असो.

सॅगी's picture

26 Apr 2021 - 12:34 pm | सॅगी

प्लॅस्टर वाला पाय घेऊन सभा घेणाऱ्यांना बाकी बरोब्बर विसरलात..
या विसरभोळेपणाचाही धिक्कार असो.

नावातकायआहे's picture

26 Apr 2021 - 12:41 pm | नावातकायआहे

चौकस....

सुबोध खरे's picture

26 Apr 2021 - 12:34 pm | सुबोध खरे

बंगालमध्येही मतदानाच्या पहिल्या चार फेर्‍या होईपर्यंत तिथे सभा चालल्या आहेत आणि सभांना लाखांची गर्दी होत आहे याविषयी हे विचारवंत काहीही बोलत नव्हते. पण बहुदा बंगालमध्ये भाजप जिंकायची शक्यता आहे हे समजल्याने मग सगळा गदारोळ सुरू झाला आहे. जगातील सगळ्यात घाणेरड्या लोकांमध्ये या विचारवंतांचा समावेश होतो हे नक्की.

बाडीस

रात्रीचे चांदणे's picture

26 Apr 2021 - 9:46 am | रात्रीचे चांदणे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जितके दोषी केंद्र सरकार आहे तितकेच दोषी सर्व राज्य सरकारे व जनता आहे.

सहमत दोष फक्त केंद्र सरकार ला देता येणार नाही, भाजपा च्या हातातील राज्य जाऊ द्या पण महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, पंजाब आणि छत्तीसगड ह्या राज्यात पण दयनीय परिस्तिथी आहे. गेल्या वर्षी सुरवातीला केरळ मधल्या कोरोना केसेस कमी झाल्या त्यावेळीं केरळ सरकार च्या समर्थनार्थ वर्तमानपत्रांमध्ये रकाने चा रकाने भरून येत होते पण आत्ता केसेस वाढल्या की दोष मात्र फक्त केंद्र सरकार चा.
26 जानेवारी ला दिल्लीत शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने मोर्चा काढला आणि सगळ्या विरोधी पक्षांनी पाठिंबा ही दिला. उलट फुकट wi-fi, मसाज ची सोय इत्यादी सोयी पुरवल्या व करोना वाढीला हातभार लावला.
त्यावर केन्द्र सरकार ने कुंभ मेळ्याला परवानगी देऊन करोना चा विस्फोट करून ठेवला.

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 9:49 am | आग्या१९९०

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जितके दोषी केंद्र सरकार आहे तितकेच दोषी सर्व राज्य सरकारे व जनता आहे.

सगळेच जबाबदार आहेत. परंतू गेल्यावर्षी देशात टाळेबंदी लावताना पंतप्रधानांनी जनतेला आणि राज्यांना विश्वासात घेतले होते का? केंद्राने वर्षभर नेमके काय नियोजन केले? का अजूनही व्हेंटिलेटर कमी पडत आहेत? ह्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वेळ मिळावा म्हणूनच टाळेबंदी लावली होती ना? लोकांना मास्क लावायला सांगायचे आणि स्वतः मास्क न लावता निवडणूक प्रचार करायचा,ह्यातून काय संदेश जातो जनतेत ह्याचा विचार केला होता का?
लस खरेदीपासून वितरणापर्यंत केंद्राकडे कुठलेच नियोजन नव्हते आणि अजूनही नाही. सगळी धरसोड वृत्ती.

सॅगी's picture

26 Apr 2021 - 9:55 am | सॅगी

गेल्यावर्षी देशात टाळेबंदी लावताना पंतप्रधानांनी जनतेला आणि राज्यांना विश्वासात घेतले होते का?

विश्वासात घेण्यासाठी वेळ होता का? तेवढा वेळ काढला असता तर वेळकाढूपणा केला म्हणून बोंबा मारल्या असत्या..

ह्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वेळ मिळावा म्हणूनच टाळेबंदी लावली होती ना?

मग मध्ये जेव्हा कोरोना केसेस कमी झाल्या होत्या तेव्हा राज्य सरकारे या सुविधा उभ्या करण्यासाठी काय करत होती? केंद्राच्या नावाने बोंब मारण्याखेरीज काय केले राज्यांनी?

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 10:17 am | आग्या१९९०

विश्वासात घेण्यासाठी वेळ होता का? तेवढा वेळ काढला असता तर वेळकाढूपणा केला म्हणून बोंबा मारल्या असत्या..
विश्वासात घेण्यासाठी किती वेळ लागतो हे सांगू शकाल काय ? ट्रंपचे स्वागत करायला , म.प्र मध्ये लुडबुड करायला वेळ कसा काढला?

सॅगी's picture

26 Apr 2021 - 10:30 am | सॅगी

एवढे नक्कीच सांगू शकतो.

आंधळा विरोध करणाऱ्यांना समजावणे हे एक दोन दिवसात होणारे काम नाही हे मला तरी नक्कीच माहीत आहे. त्यात मोदींनी काही केले म्हणजे त्याला विरोध करायचाच ही गुलामांची प्रवृत्ती बघता त्यांना विश्वासात घेईपर्यंत वेळ निघून गेली असती हे नक्की..

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 10:48 am | आग्या१९९०

विश्वासात घेऊन ते कधीच निर्णय घेत नाहीत. त्यांचा सगळा कारभार Ad hoc पद्धतीने चालतो. तरीही वर्षभरात पुरेसे व्हेंटिलेटर निर्माण करू शकले नाहीत.

विश्वासात न घेता घेतला ते बरेच झाले म्हणायचे.

Ad hoc पद्धतीने

म्हणजे कसा हो? मुंबईत आधी वाहनांसाठी कलर कोडचा निर्णय घेऊन नंतर रद्द करायचा तसा का?

बाकी,

मग मध्ये जेव्हा कोरोना केसेस कमी झाल्या होत्या तेव्हा राज्य सरकारे या सुविधा उभ्या करण्यासाठी काय करत होती? केंद्राच्या नावाने बोंब मारण्याखेरीज काय केले राज्यांनी?

या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले की सोयीस्कररित्या केले गेले?