Rush Limbaugh ह्याने एका रेडीओ शो वर ही मुक्ताफळे उधळली. मूळ बातमी इथे वाचता येईल -
http://business.rediff.com/report/2009/apr/14/us-radio-host-indians-are-...
"There's a reason [these jobs] aren't coming back. They're outsourced for a reason, an economic reason, and they're not coming back,"
ह्या वाक्यात निश्चितच तथ्य आहे, पण त्याच उत्तरात पुढे त्याने भारतीयांचा उल्लेख अगदीच हेटाळणीच्या सुरात 'स्लमडॉग ' असा केला -
"If you're sitting out waiting for a job that's now being done by a slumdog in India, and you're waiting for that job to be cancelled, for the slumdog to be thrown out of work, and you to get the job, it ain't going to happen. It's not the way economics works."
आर्थिक फायदा हे जरी आउटसोर्सिंग्चे प्रमुख कारण असले, तरी किमान गुणवत्ता/दर्जा असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करून घेतले जात नाही. ही प्रतिक्रिया केवळ द्वेष आणी उद्विग्नतेतून आली असेल का? तेथील स्थानिकांचे हे प्रातिनिधीक मत म्हणता येईल का? तुम्हाला काय वाटते? तिथे काम करणार्या भारतीयांचा काय अनुभव आहे?
प्रतिक्रिया
14 Apr 2009 - 9:48 pm | शब्देय
कुणी निंदा कुणी वंदा
आमचा स्वहिताचा धंदा
जय हो...!!!!!
14 Apr 2009 - 10:07 pm | कपिल काळे
आय टी वाल्यांना आधी आय टी कूली म्हणायचे. तिथून थेट स्लमडॉग??
14 Apr 2009 - 10:45 pm | चकली
फार चर्चा करून अशा कमेंट्सना मोठे करू नये असे माझे मत. आपण आपले काम चोख केले तर कोण कुठला "Rush Limbaugh" ?
चकली
http://chakali.blogspot.com
14 Apr 2009 - 10:50 pm | पिवळा डांबिस
आणि रश लिंबाहला फारसं सिरियसली घेऊ नये...
अशी वादग्रस्त विधानं करायची त्याला जुनी सवय आहे...
काही दिवसांपूर्वीही त्याने ओबामांच्या संदर्भात, "आय वॉन्ट धिस प्रेसिडेन्ट टू फेल!!" असं स्वतःच्या राष्ट्रांध्यक्षांबद्दल विधान करून टीका ओढवून घेतली होती.....
15 Apr 2009 - 12:47 am | भाग्यश्री
सहमत..
कदाचित त्याला स्लमडॉगला मिळालेल्या ऑस्करची लोकप्रियता एन्कॅश करायची असेल! :)
15 Apr 2009 - 11:21 am | मेघना भुस्कुटे
सहमत आहे. कुणी कितीही जळजळीत प्रतिक्रिया दिली, म्हणून आपल्याकडे येणारं काम काही जात नाही. आणि उद्या कदाचित अमेरिकनांच्या जागी आपण असू. अजून स्वस्तात आणि कदाचित त्याच दर्जाचं काम करून देणारे नवे गरीब देश असतीलच. हातातलं काम जातं म्हणताना भल्या भल्या लोकांचं ताळतंत्र सुटतं, जीव जळफळतो - त्यातलाच प्रकार म्हणायचा हा. त्याला किती महत्त्व द्यायचं?
15 Apr 2009 - 3:39 am | Nile
Rush Limbaugh म्हणाला आहे म्हणुन नाहि तरी सध्या हा विषय महत्त्वाचा नक्किच आहे.
वाचा: http://www.businessweek.com/globalbiz/blog/globespotting/archives/2009/0... (do read comments as well.. gives a good perspective, though I wouldn't say authors comment are believed to be true as of now)
अर्थात असेही आहे: http://www.nytimes.com/2009/04/12/business/12immig.html?_r=5&pagewanted=1
People in US have started talking against foreign workers. पण भारतापेक्षा परिस्थिति वाईट होईल असे मला वाटत नाही
(कारणः Manus/MNS/Thackeray don't want Bhaiyas in Mumbai.
Karuna and his clowns don't want Northies/Kannadigas in TN.
Communists in West Bengal don't want any form of development (they are happy with their barren lands).
Kashmiris don't want people from other states in "their" land (Article 370 forbids it anyway).
Kannada Rakhshana Vedike and other such orgs in KA want reservation for kannadigas in IT and BT.
Mayawati wants dalits
Arjun Singh wants OBCs (not so long ago an Indian Brain was on sale on e-bay!)
Barkha,Sagarika,Rajdeep et al want Sickulars (aka Hindu Bashers)
Muthalik, Bajrang Dal and other such useless orgs want "moral" folks.)
याशिवाय, अजुन तरी अमेरिकेत, वारकरी म्हणाले द्या राजीनामा कि दीला, गुंडानी पोस्टर्स जाळली की सिनेमा बंद असले प्रकार होत नाहीत.
15 Apr 2009 - 10:36 pm | अजय भागवत
वाचा: http://www.businessweek.com/globalbiz/blog/globespotting/archives/2009/0... (do read comments as well.. gives a good perspective, though I wouldn't say authors comment are believed to be true as of now)
दुवा वाचला. खोलवर अमेरीकन लोकांच्या मनात जे चाललंय ते उफाळून आलंय. त्या लेखाला आले ल्या प्रतिक्रिया जास्त वाचनीय आहेत. नमुन्यादाखल दोन प्रतिक्रिया खाली दिल्यात-
१. The typical H[indu]-1B is undereducated, lacks social skills, can’t communicate in a professional manner, and will say and do anything to stay in America. In short, they cannot be trusted to do the work an American can and should be doing. The best and the brightest came here a long time. We are now left with the greedy and desperate.
Americans should no longer be forced to deal with inept, surly developers in the workplace, and marble-mouthed call-center operators offshore. We need to reject the pervasive decline of a once proud profession just because corporate America and India Inc tells us to
२. Indians discriminate against all non-Indians..they come to these US companies, gain management positions, and then bit by bit transform their IT departments into all Indian IT departments..once again, do not take my word, do your own independent research, except, rather than talking to Indians, talk to displaced americans. It has reached the point where Americans do not even waste their time pursuing careers in IT
So, if India receives rage and anger from Americans, it is very well deserved.
खासकरुन ही टिप्पणी पहा- ...and then bit by bit transform their IT departments into all Indian IT departments
हे आपल्याकडेही काही मंडळी करतात. तेच ते तिथे करत असावेत पण करु देणारेही अमेरीकनच आहेत हे ही भान ठेवणे आवश्यक आहे.
16 Apr 2009 - 1:49 am | Nile
सध्या आमची चर्चा "अश्या तिरस्काराने भरलेल्या अमेरिकेत राहणे पसंत कराल (जर तर), कि नविन 'land of apportunities' शोधाल, वा परत मायदेशी जाणे पसंत कराल?" ईथपर्यंत आली आहे. पण वर म्हटल्या प्रमाणे मायदेशात तर जास्तच तिरस्कार आहे!
16 Apr 2009 - 2:02 am | बेसनलाडू
हाहाहाहा ... वरील निवडक अमेरिकन प्रतिक्रिया वाचून जामच करमणूक झाली.
H[indu]-1B यावरूनच कळते किती हाय् ली एज्युकेटेड् आहेत हे लोक. यांच्यासाठी पृथ्वीच्या पाठीवरचा प्रत्येक हिंदू 'इंडिया' मध्ये नि प्रत्येक मुसलमान मध्यपूर्वेत - इराक, अफगाणिस्तानात आहे, असेच दिसते ;)
आणि यांच्याच विद्यापिठांमधून शिकून सवरून बाहेर पडलेले भारतीय undereducated !!! हाहाहाहा ... लऽय भारी बॉ!
ज्यां कोणी अमेरिकन् महाशयांनी प्रतिक्रिया दिली, त्या महोदयांच्या नोकरीवर कुर्हाड आली असावी आणि/किंवा त्यांचा साहेब भारतीय असावा.
(भारतीय!)बेसनलाडू
16 Apr 2009 - 6:42 am | मराठी_माणूस
will say and do anything to stay in America
काम कमी झाल्यामुळे ऑनसाइट वर असणार्या काही कर्मचार्याना परत भारतात बोलावण्यात आले तर तिथेच रहणासाठी त्यानी जे जे उपद्व्याप केले त्यावरुन वरील वाक्य पटते.
15 Apr 2009 - 3:50 am | नंदा
आतल्यांनी बाहेरच्यांना आपल्या गरजेनुसार तळ्यातून मळ्यात घ्यावे किंवा पुन्हा तळ्यात ढकलून द्यावे, कधी निंदावे, कधी वंदावे हा तर जागतिक मनुष्यस्वभाव आहे. भारतीयांना हिणवणार्या लिंबॉची आणि मुंबईतील परप्रांतीयांविरूद्ध 'आंदोलन' करणार्यांची जातकुळी एकच!
15 Apr 2009 - 11:01 am | नितिन थत्ते
येथे स्लमडॉग हा शब्दच फक्त आक्षेपार्ह वाटला. बाकी "आर्थिक व्यवहार असे चालत नसतात" हे विश्लेषण योग्यच आहे.
"त्या बिहारी भय्याला हाकलून देउन ते काम तुम्हाला दिले जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर ते होणार नाही. आर्थिक व्यवहार असे चालत नसतात" आणि "for the slumdog to be thrown out of work, and you to get the job, it ain't going to happen. It's not the way economics works" हे शब्दशः सारखे आहे.
स्लमडॉग शब्दातला आणि बिहारी भय्या या शब्दातला टोन तंतोतंत सारखा.
खराटा
(रंग माझा वेगळा)
15 Apr 2009 - 11:10 am | मनिष
१००% सहमत. माझ्याही मनात हेच आले होते. बाकी प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे.
15 Apr 2009 - 11:07 am | नितिन थत्ते
येथे स्लमडॉग हा शब्दच फक्त आक्षेपार्ह वाटला. बाकी "आर्थिक व्यवहार असे चालत नसतात" हे विश्लेषण योग्यच आहे.
"त्या बिहारी भय्याला हाकलून देउन ते काम तुम्हाला दिले जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर ते होणार नाही. आर्थिक व्यवहार असे चालत नसतात" आणि "for the slumdog to be thrown out of work, and you to get the job, it ain't going to happen. It's not the way economics works" हे शब्दशः सारखे आहे.
स्लमडॉग शब्दातला आणि बिहारी भय्या या शब्दातला टोन तंतोतंत सारखा.
खराटा
(रंग माझा वेगळा)
15 Apr 2009 - 11:09 am | चिरोटा
बरोबर.असंघटीत आणि आर्थिकद्रुष्ट्या कमकुवत लोकांविरुध्ध बोंबलणे सोपे असते.'आपली वाट लागण्यास हेच लोक कारणीभूत्'असा बर्याच लोकांचा समज त्यामुळे होतो.रंग्,भाशा,संस्क्रुती ह्यात जाणवण्यासारखा फरक असेल तर अश्या समजाला राजकिय पुढारी आणि त्याची पिलावळ जास्त खतपाणी घालते.प्रशासन आणि पोलिस व्यवस्था बळकट असेल तर ह्या गोष्टीना थारा दिला जात नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
15 Apr 2009 - 11:29 am | नितिन थत्ते
लेखाचे शीर्षक वाचून असा समज होतोय की त्या माणसाने आय टी वाल्यांना स्लमडॉग म्हटलंय. पण मला वाटते त्याचा रोख सर्व प्रकारच्या आउटसोर्सिंगबद्दल आहे. यात कॉलसेंटरपासून मोटारींचे सुटे भाग निर्यात करणारे, बुटांचे भाग निर्यात करणारे सारेच येतात.
खराटा
(रंग माझा वेगळा)
15 Apr 2009 - 11:51 am | चिरोटा
आउटसोर्सिंगमुळे नुकसान होते असे ग्रुहित धरले तर अमेरिकेला(वा सर्व जगाला) सर्वात जास्त फटका चीनमुळे बसला आहे.पण भारत नजरेत भरतो कारण बर्याच अमेरिकन्/भारतिय कम्पन्या भारतीयाना अमेरिकेत आणतात आणि काही कालावधीने अमेरिकन लोकाना कामावरून काढून टाकतात्.विशेषकरुन L1 विसाचा वापर या कारणाकरिता केला जातो असे वाचनात आले.
H1-B व्हिसाचा खरा उद्देश त्या त्या क्षेत्रातील best and brightest लोकानी अमेरिकेत यावे असा आहे.पण बर्याच अमेरिकन आणि भारतिय कंपन्या स्वस्त लोक आणून त्याचा दुरुपयोग करतात असे व्हिसा विरोधकांचे म्हणणे आहे. संगणका सबंधीत बहुतांशी शोध अमेरिकेत(नंतर ब्रिटन/कॅनडा) लागले असताना अमेरिकेत कुशल संगणक तज्ञ नाहीत असे कसे होईल? असे व्हिसा विरोधकांचा सवाल आहे. L1 विसाचा उपयोग आउटसोर्सिंगसाठीही केला जातो असे व्हिसा विरोधक म्हणतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
15 Apr 2009 - 1:22 pm | केदार_जपान
अमेरिकेतले आउट्सोर्सिंग हे माहीती-तंत्रज्ञान आणि मॅनुफॅक्चरिंग मधे दोन्हीकडे प्रचंड प्रमाणात आहे, पण त्याना माहीती तंत्रज्ञानातले आउट्सोर्सिंग कमी करणे किंवा त्यावर बंधने आणणे जास्त सोयिचे आणि चटकन होणारे आहे (उदा, विसा वर बंधने आणणे वैगैरे..)...पण तेच चीन मधे बर्याच अमेरिकी कंपन्याच्या फॅक्ट्रीज आहेत्..प्लँट्स आहेत्.. (उदा: डेल कंपनी) ते सगळे कमी करणे लगेच तर शक्य नाही...त्याच्यात त्यांचा वेळ आणि पैसा फुकट जाइल्..म्हणुन आय्टी मधल्या लोकांवर बंधने आण्यायचा प्रयत्न केला जात आहे.. कदाचित यामुळे अमेरिकेतले किंवा इतर देशातले भारतिय लोक कमी होतिल, पण आउट्सोर्सिंग शिवाय अमेरिकेला तरी दुसरा तरणोपाय कुठे आहे ??
------------------
केदार जोशी
15 Apr 2009 - 12:01 pm | पर्नल नेने मराठे
माझ आइका न रश लिंबाहला लिम्बे फेकुन मारा ;)
चुचु
15 Apr 2009 - 1:04 pm | चिरोटा
पर्नल नेने मराठे ,
मी लिंबे फेकुन मारली.प्रत्युत्तर म्हणून त्याने नान्,पराठे भिरकावले.!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
16 Apr 2009 - 7:03 pm | टायबेरीअस
ज्याच्या नावातच 'लिंबू' आहे त्याचे एवढे मनावर काय घ्यायचे!
रश लिंबू झेलू बाई रश लिंबू झेलू...
-टायबेरीअस
मै तो अकेले ही चला था जानिबे ए मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"