चालू घडामोडी एप्रिल भाग २

साहना's picture
साहना in काथ्याकूट
7 Apr 2021 - 1:46 am
गाभा: 

चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा.

- कपिल शर्माला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तृषान असे ठेवले आहे. हे नाव पूर्ण पणे निरर्थक आहे. आपल्या अपत्यांना चांगली नवे द्यावीत. गुगल वर अवलंबून राहू नये. आमचे मित्र श्री नित्यानंद मिश्रा ह्यांचे सुनाम हे पुस्तक विकत घ्यावे आणि अपेक्षित पालकांना भेट म्हणून द्यावे.

- बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आणि डॉक्टर श्रीमती स्वप्ना पाटकर ह्यांनी महाराष्ट्रांतील थोर, साक्षांत वाचस्पती श्री संजयजी राऊतजी ह्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला अश्लील कॉल केले, मानसिक छळ केला इत्यादी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अक्ख्या महाराष्ट्राला विद्वत्ता पुरवणाऱ्या ह्या माणसाला काय काय सहन करावे लागते हे वाचून डोळे पाणावतात.

- फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. आपण सुद्धा ह्यांत आहात तर इथे तपासून पहा : https://haveibeenfacebooked.com/

- चीन ने सायबर युवान ह्या १००% डिजिटल पैश्यांची सिस्टम सुरु केली आहे. (ह्याचा क्रिप्टो करन्सी शी संबंध नाही). https://www.wsj.com/articles/china-creates-its-own-digital-currency-a-fi...

- आनंद महिंद्रा ह्यांनी आपला शब्द पाळत इडली अम्माला तिचे स्वतःचे घर आणि किचन बनवून दिले
https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/tamil-nadu-...

- बायजु ह्या कंपनीने आकाश ट्युटोरिअल ह्या कंपनीला १ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले. भारतीय शिक्षण क्षेत्रांत ज्या गोष्टी सुदैवाने अद्याप सरकारी नियंत्रणाखाली नाहीत तिथे भारत वेगाने प्रगती करत आहे.

- पुनावाला ह्यांनी आपली कंपनी प्रचंड मेहनत करून दिवसाला २ दशलक्ष व्हॅक्सीन्स बनवत आहे असे सांगितले. सध्या भारत दिवसाला २-३ दशलक्ष वॅक्सीन देऊ शकत आहे त्यामुळे वॅक्सीन ची निर्यात बंद झाली आहे. वॅक्सीन क्षमता वाढवण्यासाठी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे असं SSI ने सांगितले.

- मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे.

- एप्रिल २०२३ मध्ये भारतीय रेलवे वर खाजगी रेल्वे ऑपरेटरच्या रेलवे धावतील अशी अपेक्षा आहे. साधारण १५१ रूट्स वर खाजगी ऑपरेटर आपल्या रेल्वे चालवतील.

- सौदी अरेबिया ने कृत्रिम रित्या तेलाच्या किमती वर ठेवल्याने भारतीय कंपन्यांनी सौदी कडून तेल घेणे ३०% नि कमी केले आहे.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

7 Apr 2021 - 10:59 am | मराठी_माणूस

सध्याचा ज्वलंत आणि सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न
https://www.loksatta.com/mumbai-news/traders-on-the-streets-against-rest...

तारे तारका यांच्या पोरांच्या नावात रस असणारे रिकामटेकडे खूप आहेत म्हणून ते टवीत करतात अन् लोक वाचतात, व्यक्त होतात. मधे बाळ तैमूरच्या भावाचे नाव काय असेल याचीही चर्चा होती. :(

फेसबुक डेटा दाखवणारी वेबसाईट इकडे चालत नाही..!
(451 - Unavailable For Legal Reasons )

> नावात रस असणारे रिकामटेकडे खूप आहेत

सर्वच मंडळी रिकामटेकडी नाहीत. नित्यानंद मिश्रा व्याकरण शास्त्री असून विविध शब्द, त्यांची व्युत्पत्ती आणि अर्थ ह्यांच्यावर लिहीत आहेत आणि अक्खे पुस्तक लिहिले आहे. अनेकदा सामान्य मंडळी सेलिब्रिटींचे अनुकरण करत असल्याने नावांसह अर्थ लोकांसमोर आणणे अवश्य आहे नाहीतर मंडळी "आरव" सारखे घाणेरडे नाव आपल्या मुलांना देतात. (किंवा ईशानी)

बिटाकाका's picture

7 Apr 2021 - 11:50 am | बिटाकाका

उत्सुकता, तुम्ही म्हणताय ती नावे घाणेरडी का आहेत?

आरव (अक्षयकुमारच्या पोराचे नाव) चा अर्थ होतो वेदनेने विव्हळणे.

ईशानी - कापसाचे झाड

बिटाकाका's picture

7 Apr 2021 - 12:05 pm | बिटाकाका

गल्लत होतेय का? आरव म्हणजे नाद. जसे की गुंजारव म्हणजे भुंग्याच्या गुनगुनन्याचा आवाज. आणि ईशानी हे तर दुर्गेचे नाव, सत्ताधीशीनी या अर्थाने.

बिटाकाका's picture

7 Apr 2021 - 12:51 pm | बिटाकाका

काही कळले नाही. एखाद्या गोष्टीचा तालबद्ध आवाज म्हणजे नाद. त्यात वाईट काय ते कळले नाही. तेच ईशानी बाबतीत. तुम्ही दिलेलं संस्कृत संकेतस्थळ ईशान चा अर्थ राज्य करणारा (राज्य करणारा ईश, महादेव या अर्थाने) असा दाखवत आहे. आणि ईशानी चा अर्थ मात्र कापसाचे झाड? हे काही कळले नाही. ईशानी हे दुर्गेच्या/महालक्ष्मीच्या १००० नावांमध्ये येते. थोडक्यात ठेवणार्याने आरव म्हणजे नाद आणि ईशानी म्हणजे दुर्गा असे नाव ठेवले असल्यास चूक ते काय?
*************
अर्थात बरीच लोकं विचित्र नावे ठेवतात हा मुद्दा मान्य. पार्थिव हे नाव का ठेवले जाते ते अजून समजलेले नाही.

मुक्त विहारि's picture

7 Apr 2021 - 6:55 pm | मुक्त विहारि

रजस्वला, ह्या नावाचा किस्सा वाचलेला आठवतो...

एक अतिशय शिकलेले जोडपे, आपल्या मुलीला हे नांव ठेवणार होते ...

राघव's picture

7 Apr 2021 - 7:01 pm | राघव

हे राम

स्वलिखित's picture

7 Apr 2021 - 7:23 pm | स्वलिखित

एक अतिशय इंग्रजी शिकलेले जोडपे
असे वाचावे

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2021 - 8:08 pm | श्रीगुरुजी

काही मुलांचे "शर्विल" असे नाव असते. या नावाला तसा अर्थ नाही. "मृच्छकटिक" नाटकातील एका चोराचे नाव "शर्विलक" असे आहे. तेव्हापासून शर्विलक म्हणजे चोर असे समजले जाते.

रिहान, सोहा अशी मुस्लिम वाटणारी नावे सुद्धा ठेवली जातात.

दिगोचि's picture

8 Apr 2021 - 8:57 am | दिगोचि

मृण्मयी हे हे नाव ही का ठेवले जाते? अनेकांना संस्कृत भाषा व त्याभाषेतील नावांचा अर्थ माहीत नसेल हे कारण असावे..

कानडाऊ योगेशु's picture

8 Apr 2021 - 12:43 am | कानडाऊ योगेशु

आर्यन हे नाव ही तसेच.तद्दन फिल्मी नाव वाटते ते. कार्तिक आर्यन चे मूळ आडनाव तिवारी आहे पण तिवारी हे अगदीच गरीब नाव वाटत असल्याने त्याने ते आर्यन असे बदलले.

उपयोजक's picture

8 Apr 2021 - 3:17 pm | उपयोजक

नावाचा गुटख्याचा पाऊच प्रसिद्ध होता.अल्पशिक्षित लोक त्याला आयर्न म्हणायचे.

फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला.
याच बरोबर हे देखील समोर आले की स्वतः मार्क झुकरबर्ग हा व्हॉट्सअ‍ॅप न वापरता सिग्नल मेसेंजर वापरतोय. :)))
=========================================================================

करोनामुळे सामान्य जनतेची पार पुंगी वाजली असुन त्यांच्या नोकरी धंध्याचा पार बाजार उठला असुन अनेक जण आयुष्यातुन उठले असुन अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मध्यम वर्ग पिचला गेला असुन येणार्‍या काळात समाजातील मोठ्या वर्गाची आर्थिक परिस्थीती अजुन खालावली जाणार आहे ! :(

जाता जाता :- परवाच माझ्या पेक्षा वयाने मोठा असलेल्या सोसायटी मधील मित्राची बायको भेटली. [ मी आणि बायडी बाहेरुन घरी परत येत असताना. ] माझा तो मित्र हॉटेल लाइन मध्ये आहे. ती म्हणाली तो ८ महिने घरी होता आणि या काळात त्याला पगार मिळाला नाही, तीचा मुलगा कॉलेज मध्ये आहे त्याचा शिक्षणाचा खर्च आणि घर चालवण्याच्या खर्चात बचतीचे जवळपास सगळे पैसे उडाले. आता हा परत मिनी लॉकडाऊन, ती म्हणाली या महिन्याचे वाण सामान देखील देखील तीला टाकता आले नसुन असे कुढत जगण्या पेक्षा एक प्रलय येउन त्यात जाउन कायमचे सुटलेले बरे. :(
माझ्या माहितीत असलेल्या अनेकांची अवस्था अतिशय कठीण झालेली आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mera Saaya Saath Hoga... :- Mera Saaya

मुक्त विहारि's picture

7 Apr 2021 - 6:51 pm | मुक्त विहारि

हाॅटेल लाईन, कपडे, भांडी, ह्या व्यवसायांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे ...

इतर राज्यांत जर ही परिस्थिति नसेल तर, ह्या गोष्टीला, महाराष्ट्र सरकारच जबाबदार आहे...

उपयोजक's picture

7 Apr 2021 - 1:29 pm | उपयोजक

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लसीकरण सुरू आहे आणि येत्या 3 दिवसांनंतर लशींचा तुटवडा होणार आहे. दुसरीकडे अदर पुनावाला म्हणतायेत जूनपासून लसी पुन्हा एकदा एक्स्पोर्ट करू शकतो ... काय कळेना झालंय .. भारतीय नागरिकांना द्यायच्या आहेत की नाही केंद्राला ? नेमका प्रॉब्लेम कुठे आहे ? घोडं अडलंय कुठे ?

मुक्ता चैतन्य (फेबुवरुन साभार)

बिटाकाका's picture

7 Apr 2021 - 7:20 pm | बिटाकाका

केंद्रीय मंत्री यावर काय म्हणत आहेत पहा-

https://timesofindia.indiatimes.com/india/deplorable-centre-slams-mahara...

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे स्टेटमेंट बेजबाबदार आणि संकुचित वृत्ती चे आहे.देशाचे आरोग्य मंत्री स्वतःची जबाबदारी टाळू शकत नाहीत.
राज्यांना टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याचे राजकारण केंद्रीय आरोग्य मंत्री करत आहेत.
महाराष्ट्रात देशभरातील करोड लोक राहत आहेत देशातील सर्व राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची संख्या महाराष्ट्रात देशेतील बाकी राज्यांपेक्षा अती प्रचंड आहे.
त्या मुळे विविध राज्यातील corona badhit-
महाराष्ट्रात महाराष्ट्रात येत असल्या मुळे इथे corona जास्त वाढत आहे.
देशातील लोकांना रोजगार देणे ही केंद्राची जबाबदारी आहे ती जबाबदारी महाराष्ट्र ला निभवावी लागत आहे.
अनेक देशातून अनेक प्रकारचे covid चे
विविध strain mumbai maharashtra मध्ये च प्रवासी लोकांमुळे आले आहेत.
बाहेरच्या देशातून दुसऱ्या राज्यातील लोक येत आहेत ती पण मुंबई मध्येच उतरून नंतर त्यांच्या राज्यात जात आहेत.
केंद्राला जे सर्व माहीत नसेल तर धन्य ते केंद्र सरकार.
आणि धन्य ती bjp जी मेलेल्या माणसाच्या टाळू वरचे लोणी खाण्याचे राजकारण करत आहे.

बिटाकाका's picture

7 Apr 2021 - 10:25 pm | बिटाकाका

नेहमीप्रमाणे बिनबुडाचा प्रतिसाद. कोण संकुचित वृत्तीचं आहे ते तर लपूनच नाही.

दिगोचि's picture

8 Apr 2021 - 9:02 am | दिगोचि

मायबोली या संकेतस्थळावर हे व इतर काही नेहेमी बाहजपाच्याविरुद्धा लिहीत असत. आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याच्या आरोपावर हे सर्व गप्प आहेत.

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Apr 2021 - 11:08 pm | अनिरुद्ध.वैद्य

आदर भाऊ त बोलले की अमरिका अन युरोप न कच्चा माल थांबवला, आता लशी काय बनत नै म्हणून?

https://www.loksatta.com/desh-videsh-news/serum-institute-ceo-adar-poona...

नमोजी साहेबांनी उगाच सगळीकडे लशी पाठविल्या.

देशमुखांनी मागितली होती २ कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट...

https://www.loksatta.com/desh-videsh-news/sachin-vaze-writes-letter-to-n...

ह्या चौकशीतून अजून काय काय बाहेर येईल, ते सांगता येत नाही...

Rajesh188's picture

7 Apr 2021 - 9:56 pm | Rajesh188

मीडिया रिपोर्ट गंभीर पण घ्यायचे नसतात .
मीडिया रिपोर्ट सत्य स्थिती पासून खूप दूर असतात ..
त्या मुळे न्यूज वाले काय सांगतात ते गंभीर पने घेण्याची गरज नाही.

बिटाकाका's picture

7 Apr 2021 - 10:28 pm | बिटाकाका

डोळे उघडून बातमी वाचा, मग कळेल कुणी तसा दावा केलाय. मीडियाचा काय संबंध?

> “२०२० मध्ये मला पोलिस दलात घेण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण शरद पवारांचं मतपरिवर्तन करू. त्याचबरोबर गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती करू, असं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला नागपूरमधून फोनवर सांगितलं होतं. या कामासाठी देशमुख यांनी मला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा दावा वाझे यांनी पत्रात केला आहे.

हे वाचून प्रचंड धक्का बसला. फवारांच्या मत्परिवर्तनाची किंमत फक्त २ कोटी रूपये ? बारामतीत इतकी कठीण परिस्थिती ? लोक तर ह्यांना अखिलकोटी ब्रह्मांडनायक समजत होते.

मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे.

एक व्हिडिओ लिंक देत आहे वेळ असेल तर नीट ऐका. २ पैसे जास्त खर्च करुन जर गरजु आणि गरिबाला अन्न मनरेगातुन मिळत असेल, आणि हिच योजना नफा आणि तोटाच्या पट्टिवर मोजायची असेल तर, २०१४ नंतंरची सद्सद् विवेकबुध्दीची व्याख्या पुन्हा शोधावी लागेल

https://www.youtube.com/watch?v=6UB9pdhLCiw

एकाचे पैसे चोरून दुसऱ्याला रोटी देण्याचे धंदे जास्त दिवस चालत नाहीत.

Rajesh188's picture

8 Apr 2021 - 1:50 am | Rajesh188

संपत्ती ची हक्क मूलभूत हक्क नाही सरकार कधी पण तो हक्क नाकारू शकते.सरकारी सार्वजनिक यंत्रणा,कायदे,सुविधा ह्याचा फायदा घेवून च संपत्ती निर्माण केली जाते.
ह्या सर्व यंत्रणाच फायदा न घेता एक रुपया सुद्धा कोणी कमवू शकत नाही
त्या मुळे माझी संपत्ती हा प्रकार अस्तित्वात नसतो जो पर्यंत मान्यता आहे तो पर्यंत ती संपत्ती व्यक्ती ची असेल.
सार्वजनिक कोणत्याच सुविधा ,यंत्रणा ह्यांचा फायदा घेवू नका ,अगदी बाजाराचा सुद्धा फायदा घेवू नका आणि संपत्ती कमवा मग ती तुमची संपत्ती
नाही तर नाही .
कोणती ही खासगी मालमत्ता समाज हित साठी सरकार ताब्यात घेवू शकते .
आता कोविद काळात खासगी हॉस्पिटल ताब्यात घेण्याचा सरकार ल पूर्ण अधिकार आहे .एका आदेश नी सरकार ती ताब्यात घेवू शकतात..
आणि जागतिक प्रतेक देशातील सरकार नी तो अधिकार कधी ना कधी वापरलेला आहे.

गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी असताना गुजरात ला करोना डोस 80 लाख
आणि महाराष्ट्र ची लोकसंख्या गुजरात पेक्षा जवळपास दुप्पट 12.30 कोटी असताना करोना डोस 85 लाख

याचा अर्थ काय?

महाराष्ट्राला जास्तीची लस देणार नाही, gst चे पैशे पण देणार नाही , निधी राज्याला नाही तर देशाला देणार..
lock down करू नका म्हणून पण ओरडणार ,
केस वाढल्या की तिकडून पण बोंबा मारणार.

हा कोणालाच नीच पणा वाटत नाहीये का?

जेंव्हा मागे भारतात केसेस वाढल्या तरी त्याला जवाबदार मोदींना मी तरी धरले नव्हते, ना कि करोना मुळे अर्थ व्यवस्था वाईट असताना वाढवलेल्या पेट्रोल वर पण करोना मुळे मी चूक नाहीच हे मत दिलेले..

पण दुटप्पी भूमिका का?

अनन्त अवधुत's picture

8 Apr 2021 - 12:50 am | अनन्त अवधुत

जावडेकर मात्र वेगळा आकडा (१ कोटी+) सांगत आहे:

कालपासुन न्यूज पाहतोय, मला वाटते त्या हि बंद कराव्यात..
पुर्ण मराठी न्यूज चॅनेल वरती - साताऱ्यात लसी संपल्या, पुण्यात ३ दिवस पुरेल असा च फक्त साठा.. मुंबईत चार दिवस पुरतील एव्हड्याच लसी..

मग या न्यूज चॅनेल फेक न्यूज देत असतील तर त्यावर बंदी का नाही?

अशीच एक न्यूज..

https://www.hindustantimes.com/india-news/not-enough-covid-19-vaccine-do...

---

बरं आपण मान्य करू व्यवस्थित लस येतायेत केंद्राकडे.. जसे जावडेकर म्हणतायेत ते मान्य करू..

पण बाकीचे काय,
Gst चे पैसे लवकर द्यायचे नाही..
Pm care ला पैसे टाका म्हणुन पण सांगायचे..
Lockdown केला तरी ओरडायचे..
आणि cases वाढल्या तरी ओरडायचे..

हे सुद्धा दुटप्पी पणा नाहीये काय?

बाकी काय बोलू..

माझे म्हणणे इतकेच आहे, जेथे जास्त गरज तेथे जास्त लस पाठवाव्यात..
आणि विरोधकांनी राजकारण करू नये..
सत्ता कोणाचीही असो त्याला साथ द्या..

गणेशा's picture

8 Apr 2021 - 7:16 am | गणेशा

Lockdown मला वयक्तिक रित्या फालतू गिरी वाटते..

हे माझे म्हणणे गेल्या वर्षी हि सेम होते आणि या वर्षी हि..

ते का तसे वाटते मला तर लिहितोय...

माझे म्हणणे आहे, lockdown हे या साठी पाहिजे कि सरकार ने त्यांच्या कडे असलेल्या सोई सुविधा, सेवा यांच्यात managment करायला, त्याला वाढावायला पुरेसा वेळ मिळावा म्हणुन या lockdown चा वापर करावा..

पण असल्या कसल्याही गोष्टीं न करता lockdown म्हणजे साखळी तोडण्याचे हत्यार असे समजुन एका नंतर एक लॉक डाऊन करने काहीच फायड्याचे नाही..

त्यामुळे केंद्राने केलेले मागाच्यावेळेस आणि राज्याने केलेले आता दोन्ही lockdown मला योग्य वाटत नाही..
जर या lockdown नंतर हि गेल्या वर्षी सारखे आपण आपल्या आरोग्य सेवा सुविधा व्यवस्थित व्यवस्थित वाढवू शकलो नाही तर असे हजार lockdown पण व्यर्थ आहेत करोना रोखायला..

हे माझे वयक्तिक मत आहे.. कोणाला नसेल पटत तर सोडून द्यावे..
पण मोदी नी केले कि बरोबर आणि उद्धव किंवा आघाडी ने केले कि चूक असला दुटप्पी पणा माझ्याकडे नाही..

रात्रीचे चांदणे's picture

8 Apr 2021 - 7:39 am | रात्रीचे चांदणे

मोदींनी केलेला lockdown हा गरजेचा होता, कारण त्या वेळी करोना बद्दल जास्त माहिती नव्हती. PPE किट नव्हते तर टेस्टिंग ची सुविधाही नव्हती. गेल्यावर्षी सोलापूर , उस्मानाबाद इत्यादी ठिकाणी चा एखाद्या करोना संशयिताचा swab हा सोलापुर हुन पुण्याला यायचा तेही जर तो दुपारच्या आदी घेतला तर,नाहीतर तो दुसऱ्या दिवशी पुण्यात जायचा. पुण्यातही जास्त लॅब नव्हत्या. रेपोर्ट येण्यात कमीत कमी 3 दिवस जायचे. साध्याला अशी परिस्थिती नाही, अगदी एका दिवसात रिपोर्ट येतो. अत्ता लसीकरणाची प्रक्रिया ही चालू आहे, त्यामुळे अत्ता lockdown गरजेचा वाटत नाही.
लसीचा खरोखरच तुटवडा चालू आहे, माझ्या गावाकडे गेल्या 3 दिवसांपासून लस नाही म्हणून लोकांना माघारी पाठवत आहेत, आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटतेय की काल आपल्या आरोग्य मंत्र्यांनी आपल्या राज्यात फक्त 3 दिवस पुरेल इतकाच साठा आहे आस सांगितलंय परंतु राज्याच्या काही भागात गेल्या 2-3 दिवसांपासून लसीचा तुटवडा चालू आहे. याचाच अर्थ लस उपलब्ध आहे पण तिचे ग्रामीण भागात योग्य वितरण योग्य नाही. कदाचित मुंबई , पुणे नागपूर साठी डोस साठवून ठेवले असतील.

मोदींनी केलेला पहिला lockdown एकवेळ ठीक मानू नंतर तो जो वाढवला तो चुकीचाच.. पहिल्या lockdown लावण्याच्या वेळा याबद्दल बरेच दा चर्चा झाली आहे, ते नाही करत..

मोदींनी केलेला बरोबर आणि आता चुकीचा असले काही नाही..
Lockdown म्हणजे साखळी तुटण्यासाठी केलेले आहे हे किती चुकीचेच आहे हे सर्वांना माहित आहे..

तबाकी गावाकडे तुटवडा आहे हे नशिब सांगितले, कारण न्यूज खोट्या आहेत आणि जावडेकर खरे बोलतायेत असे वाटलेले मला..

टोपे म्हणत आहेत, पुण्या मुंबई मध्ये तीन दिवस पुरेल येव्हडाच साठा आहे, सातारा हे पुण्या पासून जवळ आहे तेथे हि साठा संपला आहे..

कदाचीत शहरी भागाला जास्त साठा allocate केला असेल कारण तेथे जास्त लोक घनता आहे..

माझे मुळ म्हणणे हे आहे. केंद्र, राज्य फलाना राजकारण करू नका..
केंद्राने महाराष्ट्राला अतिरिक्त साठा द्यावा..
आणि नसेल तर ते मान्य करा.. यात कोणी लगेच अपराधी तुम्ही म्हणत नाहीये...

पण राज्य सरकार कसे बेजबाबदार हे दाखवण्यात काय हाशील?
जसे मोदी जनतेसाठी करतात तसेच इतर हि करत आहेत..
कोविड मुळे ना मोदींना ना उद्धव ला ना कोणालाच लोकांना मरायला सोडायचे आहे असे वाटत नाही..

राजकीय मते वेगळी असतील हि, पण म्हणुन लोकांना कोणी मरू देणार नाही..

पण आताचे राजकारण पाहता..

Lockdown लावले तरी चूक..
करोना केसेस वाढल्या तरी चूक..
पैसे pm care ला द्या..
लसी केंद्राने दिल्यात.. राज्य सरकार चूक

हे सगळेच मला चूक वाटत आहे..

मिळून लोकांचे आयुष्य वाचवन्यात सरकार लक्ष देत असेल असे मानतो.
आणि आधी वितरणात तूट असेल तर ती भरून काढून जिथे जास्त गरज तिथे जास्त लस असे समीकरण निदान ठेवले जाईल हि अपेक्षा बाळगतो..

असो..

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Apr 2021 - 11:12 pm | अनिरुद्ध.वैद्य

लस द्यायची नाही म्हणून!

चौकस२१२'s picture

8 Apr 2021 - 9:54 am | चौकस२१२

Lockdown मला वयक्तिक रित्या फालतू गिरी वाटते..
जगात एवढे घडतंय तरी आपण हे म्हणता याचे वाटले ..आश्चर्य .. लोकडवून कधी करावा कसा किती प्रमाणात याबद्दल मतभेद असू शकतात पण हा एक उपाय म्हणून विचारच करायचा नाही कि काय?
खालील ३ गोष्टी गृहीत धरून पुढे प्रतिसाद देतो
१) करोना हेच थोडांत आहे असे काही आपले मत नसावे ...फक्त त्यावर चाल्लेलले उपाय यावर आपण बोलत आहात
२) यात राजकरण जरा बाजूला ठेवत आहोत
३) लोकडोवन चे २-३ प्रकार गृहीत धरुयात, जमावबंदी, प्रवास बंदी आणि प्रवासानंतर गृहबांदी ( हॉटेल QUARANTINE )
तर
जमावबंदी हा अनेक पैकी एक उपाय कुचकामी आहे असे आपले म्हणेन दिसतंय परंतु तो आपण म्हणता तसा अगदि कुचकामी "नसावा"
आपण खालील गोष्ट पण जरा विचारात घ्या
- कोणताही साथीचा रोग संपर्क द्वारे पसरतो म्हणून संपर्क कमी करणे हा उपाय जगभर वापरला जातोय
- खूप लोकसंख्या आणि जिथे " प्रत्यक्ष गेल्याशिवाय बरीच कामे होत नाहीत " अशी परिस्थिती असेललाय भारतासारख्य देशात वरील बंदी एकीकडे अवयषयक पण आहे आणि ती राबवणे हे पण जास्त अवघड दोन्हि नाही का?
- "बंदी " नको असे धोरण सुरवातीला राबवलेल्या स्वीडन सारख्या देशाचे काय झाले !
- रोग फार झपाट्याने पसरलं तर उपचार यंत्रणेवरील भार सांभाळता येणार नाही म्हनुन तो मुळातच पसरवू दयायचा नाही हि रणनीती जगभरचे "हेल्थ डिपार्टमेंट चे तज्ज्ञ वापरात आहेत ते सगळेच चुकीचे ?
- परदेशातून आलेल्या परंतु निरोगी असेल्यालनवार सक्तीची केलेली हॉटेल QUARANTINE.. उदाहरण देतो : माझ्य देशातील राज्यात गेली काही महिन्यात झालेल्या रोगप्रसारापैकी जवळ जवळ ९०% हे "परदेशी प्रवासी " होते १०% फक्त स्थानिक प्रसारण .. आता सांगा हे जर हॉटेल QUARANTINE सक्तीचे नसते तर या लागण झालेल्या लोकांनी अजून रोग पसरवलं नस्ता का?

जगभर लोकडवून चा त्रास सगळ्यांना होतोय फक्त भारतात नव्हे पण केवळ आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे याला विरोध करणे कितीपत यौग्य आहे?
प्रत्येक देशात वेगळे प्रश्न असतात
हेच बघा कसा विरोधाभास
भारत लशीकरण बऱयापैकी हाताळलं जातंय पण रोग प्रसरण आटोक्यात नाही
ऑस्ट्रेलिया: रोग प्रसारण जास्त आटोक्यात पण लशीकरना डगमगतंय ...सरकार म्हणताय यूरोप ने लक्ष पाठवली नाही आणि स्थानिक लास उत्पादनाला वेळ लागतोय ..
अमेरिकेत पण सध्या तरी लशीकरण बऱयापैकी हाताळलं जातंय पण रोग प्रसरण आटोक्यात नाही

गणेशा's picture

8 Apr 2021 - 11:58 am | गणेशा

@चौकस सर,

माझे मत तसे का हे हि त्या वाक्याखाली लिहिलेले होते

माझे म्हणणे आहे, lockdown हे या साठी पाहिजे कि सरकार ने त्यांच्या कडे असलेल्या सोई सुविधा, सेवा यांच्यात managment करायला, त्याला वाढावायला पुरेसा वेळ मिळावा म्हणुन या lockdown चा वापर करावा..

पण असल्या कसल्याही गोष्टीं न करता lockdown म्हणजे साखळी तोडण्याचे हत्यार असे समजुन एका नंतर एक लॉक डाऊन करने काहीच फायद्याचे नाही..

करोना थोतांड नाही हे माझे हि मत आहे..

तुम्ही सर्व लिहिलेले बरोबर आहे.. पण फक्त lockdown करणे हे चूक नाही का?
Lockdown म्हणजे साखळी तुटते का?
टाळ्या वाजवून बाजूला अंतरनाद होऊन करोना मरतो का?
थाळ्या वाजवून कोणत्या dr. चे कौतुक होते का?
Cosara सारख्या नव्या कंपनीच्या kit साठी वेळ घालवून इतर कंपनीला त्यापासून वेळ लावण्यात काही अर्थ होता का?

त्यामुळे आरोग्य सुविधा वाढवणे हेच lockdown मध्ये सरकारला करता आले पाहिजे ते नाही केले तर अशी १००० lockdown काय कामाची

असे ते पुर्ण वाक्य आहे माझे..
तुम्ही अर्धेच घेऊन लिहले आहे.

जर lockdown मुळे करोना आटोक्यात येत असेल तर ती चूक आहे..

मोदी नी केला तेंव्हा हि माझे हे मत होते तेंव्हा मी मोदीविरोध करतोय असे म्हंटले गेले
आता मी हेच बोलतोय तेंव्हा हि राजकारण वाटत आहे..

पण खरेच माझे हे मत राजकीय पक्ष बघुन नाही..

मला माहित आहे, अजूनही lockdown मोदी यांनी केला तर लोक त्याला पाठींबा देतील.. किंवा महाराष्ट्रामुळे असे करावे लागले अशी दुषणे देतील..

पण आपली मते चूक असु शकतील कदाचीत पण ती पक्ष नेते बघुन बदलतात का हे प्रत्येकाने बघावे.. माझे हे मत राजकीय नसून सामाजिक पद्धतीचे आहे..

असो.. माझे मत चूक असु शकेल पण त्यात राजकारण नाहीये..
खरेच फक्त lockdown ने साखळी तुटत नाही..
हॉस्पिटल, खाटा, आरोग्य विषयक किट्स, ज्ञान, लस अश्या अनेक गोष्टी जास्त लोकांसाठी तयार करायला वेळ मिळावा म्हणुन lockdown असावा, ना कि साखळी तुटते म्हणुन..

Lockdown हे करोना ला थांबवू शकत नाही...

असो.. राग लोभ नसावा.. माझे म्हणणे नक्कीच जास्त विरोधी नाहीये

चौकस२१२'s picture

8 Apr 2021 - 1:19 pm | चौकस२१२

१) टाळ्या वाजवून बाजूला अंतरनाद होऊन करोना मरतो का?
२) थाळ्या वाजवून कोणत्या dr. चे कौतुक होते का?

हे कुठं यात.. आपण फक्त लाकडाउन उपायांबद्दल बोलतोय ना? पण आपण हा विषय काढलातच म्हणून
१) "टाळ्या वाजवून " नक्कीचं नाही मरत..केवळ एक सामूहिक मनोबल वाढवण्यास मनुष्य असे काहीतरी सार्वजनिक करीत असतो ..
२) "थाळ्या वाजवून" अरे बापरे .. अहो ते ते केवळ प्रतीकात्मक होता हे का कोणी लक्षात घेत नाही ? वैद्यकीय काम करणाऱ्यांना धन्यवाद म्हणून... आणि केवळ भारतातच नाही तर इतर देशात हि असे सार्वजनिक प्रतीकात्मक केलं गेले..जसे मूक मोर्चे किंवा काळ्या फिती किंवा ठराविक रंगाच्या गोष्टी एकाचवेळी सर्वांनी परिधान करणे ई...

माफ करा गणेश पण हे घंटानाद वैगरे वरून एकूण जी चेष्टा लोक करातात ना ते हा यातील मुळ मुद्दा ना लक्षात घेता केवळ "या सरकारने" सांगितले म्हणून चेष्टेचा विषय राजकीय हेतूने प्रेरीत होऊन केलेलि केवल टिका वाटते ( अप्लाय मनात नसेल तसे कदाचित )
असो
तर
लाकडाउन ने साखळी तोडली जाते का.. मी जे अनुभवलंय त्यात हो असे म्हणणे इस्टर ला येथे ४ दिवस एकूण सुट्टी असते त्यामुळे प्रवास वाढतो .. + शाळेला सुट्ट्या ... त्याआधी परत रोग पसरला होता ( २० लाख शहरात १३- २० रुग्ण ) तरी राज्य सरकरने येथे हे शार ३ दिवस लोकडोवन मध्ये ठेवले.. फायदा झालाच ..
येथे हे मला नमूद केले पाहिजे कि येथे आरौग खाते २ प्रकारचं रोग पसरनायबद्दल लक्ष ठेवून आहे
१) आंतरराष्ट्रीय प्रवासी कि ज्यांच्यावर १४ दिवसाचं हॉटेल QUARANTINE मुले सहज रित्या लक्ष ठेवता येते
२) स्थानिक रोग प्रसार ज्याचे स्तोत्र सापडत नाही

यातील क्रमांक २ च्या साथीला सरकार जास्त घाबरून आहे, कारण उगम दिसत नाही

भारतात कदाचित आता एकूणच इतकं हाताबाहेर जातंय कि कुठलेच उपाय लागू होतं नसावेत .. पण म्हणून सरसकट जगात लोकडॉन हे शस्त्र उपयोगी नाहि असे म्हणू नये एवढेच ..

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Apr 2021 - 11:55 am | अनिरुद्ध.वैद्य

लस अन औषध फरक असतो. हा आरोप तेव्हाच मान्य असता, जेव्हा औषध अस्ते ;)

१५ मार्चपासुन केंद्र सरकार ओरडत होते, की कोरोना वाढतोय, गर्दी कमी करा. पण नाही. आता काय कप्पाळ फोडुन ओरडायच?

अन जीएस्टीचे पैसे घेउन काय महाराश्ट्र सरकार पैसे वाटणारे का जॉब गेलेल्यांना?

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2021 - 2:20 pm | श्रीगुरुजी

गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी असताना गुजरात ला करोना डोस 80 लाख
आणि महाराष्ट्र ची लोकसंख्या गुजरात पेक्षा जवळपास दुप्पट 12.30 कोटी असताना करोना डोस 85 लाख

उत्तर प्रदेशची लोकसंख्या २३ कोटी, पण डोस मिळाले फक्त ७६ लाख (म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मे).

राजस्थानची लोकसंख्या ८ कोटी, पण डोस मिळाले ७८ लाख (म्हणजे महाराष्ट्राच्या दीडपट).

देश संकटा तून जात असताना सुद्धा नीच राजकारण bjp करत आहे ,ह्यांचे आरोग्य मंत्री अत्यंत फालतू स्टेटमेंट देत आहेत
महाराष्ट्रात bjp अत्यंत नीच राजकारण खेळत आहे..लोकांना सर्व समजत आहे
अंध भक्त अंध च असल्या मुळे त्यांना काही दिसण्याचा प्रश्न च नाही .
भारतीय लोकांनी एवढे नीच राजकारण पहिल्यांदाच पाहिले आहे .
कधी एकदा लोकसभेच्या निवडणुका होतात आणि ह्या राष्ट्र द्रोही पक्षाचे सरकार हाकलून देतो असे जनतेला झाले आहे.

Rajesh188's picture

8 Apr 2021 - 2:05 am | Rajesh188

जे धागे काढले जात आहेत ते सर्व अंध भक्त काढत आहेत .
चालू घडामोडी म्हणजे मोदी साहेबांचा उदो उदो आणि bjp चे गुणगान करणे हाच अंतर्गत हेतू ह्या लोकांचा आहे
मी bjp अंध भक्त नाही असे सांगायचे आणि त्या नंतर फक्त सत्य स्थिती शी विपरीत दावे करून bjp च प्रचार करायचा हा उद्योग येथील ठराविक आयडी करत आहेत...
बाकी लोकांनी अशा धाग्या पासून लांब च राहवे ..ह्या अंध भक्तांना आपसात च चर्चा करू ध्या.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Apr 2021 - 4:11 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

मुक्त विहारि's picture

9 Apr 2021 - 4:20 pm | मुक्त विहारि

कोविड रोग आटोक्यात आणण्यात आलेले राज्य सरकारचे अपयश, हे सगळे विषय चर्चेला आणले तर, त्यात सामान्य माणसाचा काय दोष आहे?

मुळात, पोलीसांना आणि साधूंना त्याच वेळी संरक्षण देणे, ही राज्य सरकारचीच जबाबदारी होती...

कोविड पसरू नये ह्यासाठी, योग्य ती खबरदारी घेणे, ही पण राज्य सरकारचीच जबाबदारी आहे...

https://www.loksatta.com/nagpur-news/27-show-cause-notice-to-deepali-abn...

ह्या राजवटीत, अजून काय काय बघायला मिळेल, कुणास ठाऊक?

https://www.loksatta.com/desh-videsh-news/union-health-minister-harsh-va...

इतर राज्यांपेक्षा, महाराष्ट्राची परिस्थिति गंभीर आहे...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

8 Apr 2021 - 9:11 am | माईसाहेब कुरसूंदीकर

डॉ. हर्षवर्धन योग्यच बोलत आहेत. गेले एक वर्ष राज्य सरकारला आरोग्य सेवासुधारण्याची संधी होती. पण बराचसा वेळ नट-नट्यांवर टिपण्णी करणे, उखाड दिया वगैरे.. ज्यात काडीचेही ज्ञान नाही अशा चीन-पाकिस्तान/कश्मिर विषयावर बोलणे/बेळगाव सीमा प्रश्न ह्यात सरकारच्या मंत्र्यांचा वेळ गेला. बाकीच्या राज्यांचे मंन्त्री वर्षभर मान खाली घालुन काम करत असताना महाविकास आघाडीचे मंत्री नको त्या कारणांसाठी हेडलाईन्समध्ये होते.

राज ठाकरे यांनी एक प्रश्र्न विचारला आहे की,

उद्धव ठाकरे यांच्या हातमध्ये राज्य आलंय, की, त्यांच्यावरती राज्य आलंय?

Bhakti's picture

8 Apr 2021 - 9:46 am | Bhakti

हा हा...काल हे ऐकून अर्धा तास हसत बसले होते.आज परत आठवण करून दिली बर केलं..हा..हा.हा. ;)

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2021 - 11:08 am | श्रीगुरुजी

राज ठाकरेंंच्या हातात राज्य नाही आणि त्यांच्यावर राज्यही आलेले नाही. मुळात ते खेळातून केव्हाच बाद झालेत. त्यामुळे आता मैदानाबाहेर बसून निर्रथक कोट्या करणे एवढेच ते करू शकतात.

हे सगळं ठीक आहे.पण मध्यंतरी मासे व्यापारी, सिनेमावाले अजून बर्याच संघटना राज ठाकरेंकडे गार्हाणे मांडायला गेले होते , ते सत्तेत नाही आणि येणार नाही मग ते लोक का गेले?
कधी कधी ऐकून घेणार आणि दोन सुनावणारही पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2021 - 12:34 pm | श्रीगुरुजी

या paid news असतात. आपल्यात अजून थोडी धुगधुगी शिल्लक आहे हे दाखविण्यासाठी असे दिखाऊ सोहळे घडवून आणले जातात.

Bhakti's picture

8 Apr 2021 - 12:36 pm | Bhakti

अच्छा!

झालं ते झालं... राजकारण गेलं चूलीत..पुढचं काही दिवस महाराष्ट्रासाठी खुप महत्वाचे आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घोषित केले आहे की या बगल्याच्या डागडुजीसाठी 3800 कोटी रुपये खर्च होणार आहे. याबाबत काय वाटते?

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 9:24 am | मुक्त विहारि

80% लोकांनी, शिवसेनेला मतदान केले न्हवते..

.... स्वत:च्या नागरिकांनाही प्रवेश नाकारला.....

https://www.loksatta.com/desh-videsh-news/new-zealand-temporarily-suspen...

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात नव्याने आढळून आलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण हे भारतातून न्यूझीलंडमध्ये दाखल झालेले प्रवासी आहेत. त्यामुळेच भविष्यात ही संख्या वाढू नये म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुढील दोन आठवडे परवानगी नाकारण्यात आलीय.

चौकस२१२'s picture

8 Apr 2021 - 1:23 pm | चौकस२१२

स्वतःचं नागरिकांवर असे बंधन घातले जात नाही सहसा ... खरं तर जेसिका ताई तश्या उदारमतवादी पक्षाच्या आहेत पण कसे काय असे केले ! पण जेव्हा पूर्वी परत प्लेग भारतात आला होता तेव्हा सुद्धा अनेक देशांनी हे बंधन घातले होते

..... एनसीबीकडून अटक....

https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-news-ncb-arrests-21-year-...

ड्रग्सच्या व्यवसायात, मुस्लिम लोकांचे जास्त आर्थिक संबंध आहेत का?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

8 Apr 2021 - 10:54 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"ड्रग्सच्या व्यवसायात, मुस्लिम लोकांचे जास्त आर्थिक संबंध आहेत का?"
हे म्हणजे अंडरवर्ल्डमध्ये मराठी लोकांचे आर्थिक संबंध आहेत का ? असे विचारण्यसारखे. दोघांचेही उत्तर 'हो' असे आहे पण सरसकटीकरण अयोग्य वाटते. अनेक कारणे आहेत त्यामागे.

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 11:47 am | मुक्त विहारि

नोटेड

रेमडेसिवीर प्रोडक्टशन कंपन्यांशी आरोग्य मंत्री टोपे आज बैठक घेणार.याचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य , केंद्र दोघांचीही जबाबदारी आहे.

मराठी_माणूस's picture

8 Apr 2021 - 11:08 am | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/kolhapur-news/shivaji-university-tops-in-qualit...

शिवाजी विद्यापीठाचे अभिनंदन.

अभिनंदन वगैरे करायला आपली हरकत नाही. अभिनंदन!
पण हे सगळे घडवून आणता येते हे आपल्या माहितीसाठी सांगतो. वास्तविक पाहता सगळीकडे दर्जा खालावत चालला आहे.

सध्या पुण्यातली सुमार अभिमत विद्यापीठ सुध्धा असेच मानांकन मिरवतात.. मग त्यांचाही दर्जा चांगला म्हणावा लागेल!

मराठी_माणूस's picture

9 Apr 2021 - 9:25 am | मराठी_माणूस

नविन परीक्षण पध्दतीत हे सर्व करणे खुप अवघड आहे.

काय आणि कुणाला अवघड आहे कळलं नाही!!

मराठी_माणूस's picture

9 Apr 2021 - 2:47 pm | मराठी_माणूस

मानांकन मिळवणे .

खेडूत's picture

9 Apr 2021 - 2:55 pm | खेडूत

ओक्के.
मग अवघड काम करून दाखवले म्हणून अभिनंदन करूयात.
दर्जा आहे म्हणून नको ...!

एक शंका, अवघड आहे ( नक्की काय अवघड देवाक ठाऊक) ते सोपं करायचा प्रयत्न का करत नाहीत ही विद्यापीठे?

मराठी_माणूस's picture

9 Apr 2021 - 3:00 pm | मराठी_माणूस

तुमच्या दृष्टीने कोणते दर्जेदार ?

खेडूत's picture

9 Apr 2021 - 3:19 pm | खेडूत

सोप्पंय..
ज्यांना असे मानांकन मिळवणे अवघड जात नाही ती!

मराठी_माणूस's picture

9 Apr 2021 - 3:44 pm | मराठी_माणूस

ह्यांनी ते घडवुन आणले असे तुम्ही कशावरुन ठरवले ?

ह्यांनी घडवून आणले असं कुठं वाचलत?
माहितीसाठी सांगितलं की असं बरीच विद्यापीठे करतात त्यामुळं मानांकन मिळणे म्हणजे चांगल्या दर्जाची खात्री नव्हे.
नंतर असं सांगत होतो की त्यात अवघड काहीच नाही.
(असो. इथे थांबतो)

मराठी_माणूस's picture

9 Apr 2021 - 4:12 pm | मराठी_माणूस

असं बरीच विद्यापीठे करतात.

ह्यांनी सुध्दा असेच केले असेल असे प्रतिसादा वरुन वाटले. थांबालात हे बरे केलेत . मीही थांबतो.

महाराष्ट्र सरकार कसे कुचकामी आणि केंद्रातील bjp सरकार कसे कर्तृत्व वान अशी मत वाचायचा आता विट आला आहे.
Bjp च प्रचार इथे चालू आहे का

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Apr 2021 - 11:57 am | अनिरुद्ध.वैद्य

आवडत नसेल तर न वाचणे हा एक उत्तम उपाय आहे.

बिटाकाका's picture

8 Apr 2021 - 12:08 pm | बिटाकाका

अहो यांचे शेंडा न बुड असलेले प्रतिसाद वाचण्याचा किती विट येत असेल याचा विचार कोण करणार? :)

मी देखील आता, बटाट्या पासून सोने बनवणारे मशीन कधी येणार आहे? ह्याची वाट बघत आहे...

बाय द वे, शिवभोजन थाळी घरपोच मिळते का?

चौकस२१२'s picture

8 Apr 2021 - 1:27 pm | चौकस२१२

सेम तू यु आणि शेम तू यु पण ( आपल्या आधीच्या काही "दर्जेदार कमेंट" बद्दल )
( नुकताच बीजेपी आयटी सेल चा पगार आला म्हणून उत्सहाने लिहित आहे एवढेच )

संभाजी भिडेंचे दिव्य विचार

https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhide-statement-on-co...

कपिलमुनी's picture

8 Apr 2021 - 2:04 pm | कपिलमुनी

आज महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी लसीकरण बंद पडले आहे.
फसवणीस तर केंद्राचा पिल्लू असल्या सारखा बोलतोय.

नुसती टीका करतोय , त्याला जनतेशी काहिही देणे घेणे नाहीये

बिटाकाका's picture

8 Apr 2021 - 2:16 pm | बिटाकाका

तीन दिवसांचा साठा एक दिवसात संपला व्हय?

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Apr 2021 - 11:20 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Apr 2021 - 2:30 pm | चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्रात रेमेडिसिव्हीर औषधाचा आणि नाशिकसारख्या काही ठिकाणी ऑक्सिजनचाही तुटवडा आहे असे बातम्यांमध्ये सांगत आहेत. हे औषध आणि ऑक्सिजन नक्की कुठून येतो? तो पण केंद्राकडूनच येतो का?

दुसरे कोणत्या राज्याला किती लशी द्याव्यात हे नक्की कसे ठरवले जाते? म्हणजे जिल्हास्तरीय प्रशासन (जिल्हाधिकारी किंवा आरोग्याधिकारी वगैरे) जिल्ह्यात एकूण किती लसीकरण केंद्रे आहेत, किती लोक लस घ्यायला पात्र आहेत (४५ वरील वय) आणि किती लोकांना दररोज लस देता येईल अशी यंत्रणा उपलब्ध आहे तसेच लस साठविण्यासाठी किती यंत्रणा जिल्ह्यात उपलब्ध आहे याचा अंदाज घेऊन प्रत्येक जिल्ह्यात किती लसी पाहिजेत हे requisition राज्य सरकारला दिले जाते आणि सगळ्या जिल्ह्यांचे आकडे एकत्र करून ते केंद्राला दिले जाते किंवा कसे? म्हणजे महाराष्ट्रात लोकसंख्या आणि रूग्णांची संख्या दोन्ही जास्त म्हणून जास्त लसी दिल्या जाव्यात ही अपेक्षा ठीक आहे पण या लसी अशाप्रकारे requisition मिळाल्यानंतर केंद्राकडून पाठवल्या जातात की अशाच पाठवल्या जातात? लसी अशाच पाठवल्या जात असतील ही शक्यता जरा कमी. तसे असल्यास महाराष्ट्र सरकारने 'आम्हाला अमुक इतक्या लसी हव्या आहेत' हा आकडा पाठवला त्यापैकी किती लसी प्रत्यक्षात पाठवल्या गेल्या, इतर राज्यांत किती पाठवल्या गेल्या ही तुलना करता येईल.

फेसबुकवर वाचले की गुजरातमध्ये लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कमी असूनही २०० लसीकरण केंद्रे जास्त आहेत. हा आकडा कितपत विश्वासार्ह आहे याची कल्पना नाही. याविषयी कोणाला काही माहित आहे का?

बिटाकाका's picture

8 Apr 2021 - 3:02 pm | बिटाकाका

माझ्या अंदाजाने राज्याच्या लोकसंख्येचा आणि दिलेल्या लसींचा काही संबंध नाही. प्रत्येक राज्यात पात्र लोकसंख्या किती आहे यानुसारच लसी दिल्या जात असाव्यात.
************
मंदभक्त आणि गुलामांना, या माहितीशी काहीही देणे घेणे नाहीये आणि वरून आव असा आणतात की जणूकाही यांनाच जनतेची फार काळजी आहे. केंद्राने आकडेवारीसह स्पष्ट केले आहे की कुठल्या राज्याला किती लसी दिल्या जात आहेत. कालच ३ दिवसाचा पुरवठा आहे असे असताना आज लगेच केंद्र बंद कशी पडतात? आणि केंद्राकडून राज्याकडे लसी आल्यानंतर केंद्रापर्यंत वितरणाची जबाबदारी कुणाची? असले प्रश्न मंदभक्तीच्या नादात पडत नसावेत.

Rajesh188's picture

8 Apr 2021 - 2:47 pm | Rajesh188

फडणवीस आणि एकंदरीत राज्य bjp ल राज्याच्या जनतेच्या हिताशी काही ही देणेघेणे नाही असं त्यांचे वागणं बघुन वाटत.
त्यांना फक्त सरकार कधी अडचणीत येतंय आणि फडणवीस बाशिंग बांधून कधी बोहल्यावर चढतात ह्या विषयी च इंटरेस्ट आहे.
ह्याची फळ त्यांना नक्की भोगायला लागणार आहेत.

1. साधू हत्याकांड आणि भाजपचा काही संबंध आहे का?

2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, ह्या गोष्टीचा आणि भाजपचा काही संबंध आहे का?

आधी ह्या साध्या प्रश्र्नांची उत्तरे दिलीत तर उत्तम ....

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2021 - 5:55 pm | श्रीगुरुजी

ठाकरे सरकारने वारंवार भाजपला फुलटॉस चेंडू टाकले आणि भाजपने त्यावर षटकार मारल्यानंतर पंचाच्या नावाने खडे फोडणे सुरु आहे.

.... न्यायालयाने पुरातत्व खात्याला दिली सर्वेक्षणाची परवानगी...

https://www.loksatta.com/desh-videsh-news/varanasi-civil-court-allows-as...

आता, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, काय प्रतिसाद देतात, हे बघणे रोचक ठरेल.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2021 - 5:58 pm | श्रीगुरुजी

स्वागतार्ह निर्णय

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Apr 2021 - 5:32 pm | चंद्रसूर्यकुमार

आज सर्वोच्च न्यायालयाने तीन निर्णय दिले आहेत त्यामुळे समस्त पुरोगाम्यांना भोकाड पसरायची संधी मिळणार आहे.

१. अनील देशमुख आणि महाराष्ट्र सरकारने देशमुखांच्या सीबीआय चौकशीविरोधात केलेले अपील नाकारले आहे.
२. जम्मूतून रोहिंग्यांची म्यानमारला परतपाठवणी करण्याला स्थगिती द्यायला नकार दिला आहे.
३. काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूलाच ग्यानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण करायचे आदेश पुरातत्व खात्याला दिले आहेत. या तथाकथित मशीदीचा पुढील फोटो बघायला मिळाला

a

डावीकडे मंदिराचे खांब अगदी स्पष्ट दिसत आहेत.

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 5:45 pm | मुक्त विहारि

परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष काय म्हणतात, हे बघणे रोचक ठरेल...

Rajesh188's picture

8 Apr 2021 - 7:06 pm | Rajesh188

उत्तर प्रदेश मध्येच जास्त असले प्रकर झाले आहेत .तेथील हिंदू नी अन्याय च विरोध केलाच नाही असे वाटत.
सर्वात जास्त हिंदू ची लोकसंख्या उत्तर प्रदेश मध्येच असेल तरी ही अवस्था.

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 7:14 pm | मुक्त विहारि

एकजूट महत्वाची असते ...

इतकेसे इस्त्रायल, अरब राष्ट्रांना पुरून उरले ते एकी मुळे...

दुसर्या महायुद्धाच्या काळांत, ज्यू लोकं आर्थिक दृष्टीने संपन्न असूनही, एकी नसल्याने बळी पडली...

ज्यू लोकं इतिहासातून शिकले, हिंदू कधीच शिकले नाहीत...

घराणीच तुटतात तिथे समाजाचे काय घेऊन बसायचे?

मशिदीच्या पायर्‍या देवळातले शिलालेख, मुर्ती तोडुन बनवल्या होत्या आणि काही वर्षांपुर्वीपर्यंत ते दिसत पण होते असे वाचनात होते. नंतर झिजुन गुळगुळीत झाले.
कदाचित त्याचे फोटो पण सापडतील.
रोज हे शिलालेख मशिदीत येणार्‍यांच्या पायाखाली यावे अशी 'पवित्र' इच्छा होती.
बाबरीच्या मानाने हे खुपच अलीकडील काळात झालेले (औरंगजेबाच्या वेळी) काम आहे लवकरच या केसचा योग्य तो निर्णय लागावा.

कारण, कट्टर हिंदू हितवादी मतांचे, भाजप कडे, धृवीकरण होत आहे...

पण काही उदारमतवादी हिंदूंनी, भाजप कडे वळू नये, ह्यासाठी कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, मोडता नक्कीच घालणार नाहीत...ह्यावेळी कॉंग्रेसची अवस्था, सहनही होत नाही आणि सांगता पण येत नाही, अशी झाली आहे...

ह्या निर्णयांचा फायदा, (मंदिर असो वा नसो, रोहिंगे असो वा नसो) दोनच पक्षांना होणार... भाजप आणि MIM.....

हिंदूंच्या मतांना दिलेली शून्य किंमत, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना आता मोजावी लागेलच...

हिंदू जागा होत आहे....

छत्तिसगडमध्ये काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी सी.आर.पी.एफ च्या २२ जवानांना चकमकीत ठार मारले. त्याबरोबरच राकेश्वरसिंग मनहास या कोब्रा कमांडोचे अपहरण केले होते. त्याची त्यांनी सुटका केली आहे.

सी.आर.पी.एफमध्ये कोब्रा कमांडो सगळ्यात प्रशिक्षित कमांडो असतात असे ऐकले आहे. अशा कमांडोचे अपहरण होणे ही धक्कादायक घटना होती. अर्थात एकदम ३००-४०० नक्षलवाद्यांनी घेरल्यावर कितीही वाकबगार असला तरी कोब्रा कमांडोचेही चालणे कठीणच होते. त्याची सुटका झाली हे चांगले आहे.

जाताजाता एक गोष्ट लिहितो. २०१० मध्ये छत्तिसगडमध्ये असाच एक भयानक हल्ला झाला होता आणि त्यात ७५ जवानांची हत्या झाली होती. तेव्हा जनेयुमध्ये तो हल्ला साजरा केला गेला होता असे वाचल्याचे आठवते. जर कोणत्यातरी कोपर्‍यात चर्चवर कोणीतरी दगड मारले तर त्याचा जाब समस्त मोदीसमर्थकांना विचारला जातो त्याप्रमाणेच असा काही प्रकार होत असेल तर त्याचा जाब जनेयुमधील विचारवंतांना का विचारला जाऊ नये? जर पुलवामामध्ये सी.आर.पी.एफ च्या तुकडीवर हल्ला झाल्यानंतर सरकारने हुर्रियतच्या नेत्यांची सुरक्षा आणि त्यांना दाखवला जाणारा नेवैद्य बंद केला असेल तर असे काही झाल्यावर जनेयुतल्या निदान काही प्रोफेसरचे सरकारकडून दिले जाणारे पगार का बंद केले जाऊ नयेत?

https://timesofindia.indiatimes.com/india/chhattisgarh-ambush-maoists-re...

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 7:03 pm | मुक्त विहारि

कुठल्याही प्रकारचा साॅफ्ट काॅर्नर, माझ्या मनांत नाही...

भाजप उमेदवाराची गाडीत इव्हीएम सापडली तरच गोंधळ करायचा, इतर वेळेस मूग गिळून गप्प बसायचे. हे पुरोगाम्यांचे, भाजप विरोधकांचे आणि स्वयंघोषित निष्पक्ष लोकांचे दुटप्पी धोरण क्षणाक्षणाला उघडे पडतेच पडते.
https://www.hindustantimes.com/elections/west-bengal-assembly-election/w...

*भारतात गलिच्छ राजकारणाचा उदय !!!*
**************************
*प्रल्हाद वामन कुलकर्णी*(राजकीय विश्लेषक) यांचा हा लेख
कोरोनाची दुसरी लाट पुन्हा जबरदस्त पद्धतीने येताना दिसत आहे. ट्रेन सुरु करा, मंदिर सुरु करा, अमुक सुरु करा तमूक सुरु करा. नाहीतर आंदोलन करू, ठिय्या करू सरकार विरोधात बोंब मारू. भाजपने हि गोष्ट करून करून नियंत्रणात आणलेल्या कोरोनाला वाढीस लावण्यासाठी खतपाणी घातले. आज महाराष्ट्रात कोरोनाचे दरदिवशी ३५ -४० हजारांच्या घरात रुग्ण सापडत आहेत. आता घेणार का याची जवाबदारी भाजप ? सत्ता पिपासु असणाऱ्या भाजपने सत्ता गेल्यावर अक्षरशः बाजार मांडला. सकाळी सोमैय्या, दुपारी शेलार, संध्याकाळी राणे, रात्री फडणवीस यांच्या पत्रकार परिषदांनी अक्षरशः सरकार सह जनतेला त्रास देण्याचे काम केले. कोरोना काळात स्वतःचा निधी महाराष्ट्राच्या सी.एम फंडाला ला नं देता, पी.एम फंडाला देऊन महाराष्ट्रद्रोह तर केलाच. पण त्याचवेळी कोरोना काळात राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याचे सोडून उलट महाराष्ट्र राज्याच्या बदनामीचे धिंडवडे देशभर काढत सुटले.
उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाचा अनुभव नसताना ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. लोकांना धीर दिला, परिस्थितीचा वेध घेऊन टप्प्या टप्प्याने सर्वात अगोदर लोकडाऊन केला, राज्यात कोरोना साठी इतकी मोठी हॉस्पिटलची यंत्रणा उभी केली. एक जवाबदार मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे, त्यापेक्षा अधिक कार्य नवनिर्वाचित असतांना केले. बोंबा-बोम करणे आणि कामं करणे यात जमीन अस्मानाचा फरक असतो. उद्धव अत्यंत शांत पद्धतीने एक एक पाऊल अगदी योग्य टाकत गेले. आज जर फडणवीस मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राची बजबजपुरी झाली असतील.
एकीकडे उद्धव एक एक पाऊल उचलत होते तर भाजपवाले टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, काळोख करा, दिवे लावा अशी बालिश कामं करून जनतेला मूर्ख बनवत होते. खरं तर सत्ता गेली हें भाजपला सहनच नाही झालंय. पचनी पडायलाच तय्यार नाही आणि त्या वैफल्यग्रस्त भावनेतून महाराष्ट्र सरकारला लक्ष करायचे प्रयत्न सुरु आहेत. सुरवातीला सुशांत सिंग प्रकरणात सरकारवर आणि मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले. नंतर सी.बी. आय चौकशी लावली. मग आता काय झाले त्या सी.बी.आयच्या चौकशी अहवालाचे ?? त्या अहवालात स्पष्ट्पणे सीबीआयने म्हटले आहे कि, यात कुठेही सुशांत चा खून झाला असा सूक्ष्म बिंदू देखील नसून ती आत्महत्या आहे. यामुळे सणसणीत चपराक बसणाऱ्या भाजपने तो सी.बी.आय चा अहवाल आजपर्यंत दाबून ठेवला.
झी न्यूज, रिपब्लिक भारत, इंडिया टीवी, आज तक सारखे विकत घेतलेली मीडिया हाताशी धरून हि मीडिया भाजपची अक्षरशः लाळ गळेपर्यंत चाटत आहे. जो विरोधात बोलणार त्यावर इ.डी, सी.बी.आय, सी.आय.डी, इन्कम टॅक्स सारखी यंत्रणा लावून तोंड बंद करायची कामं सुरु आहेत. सत्तेचा हा अफाट दुरुपयोग करून भाजप देशाचे राजकारण खराब करत आहे. काही मुद्दा नाही मिळाला तर हिंदू मुसलमान वाद उकरून काढायचा, सोशल मीडिया मध्ये असे मेसेज पसरावायचे कि हिंदू मुसलमान यांच्यात द्वेषाची भावना तयार होईल. म्हणजे भाजपला ध्रुवीकरण करून मतांचे राजकारण करायला बरे.
जे हैदराबादचे एम.आय.एम चे ओविसी हिंदूंच्या विरोधात गरळ ओकतात आणि त्यांना भाजपवाले टीव्ही वर विरोधात बोलतात. त्या ओविसी च्या अत्यंत मर्जीतल्या जवळच्या असणाऱ्या कंपन्यांन कडे केंद्र सरकारची तब्बल १४ हजार कोटींची टेंडर आहेत. आता विचार करा यांचे काय लागेबांदे आहेत ते. ओवीसींना सांगायचे हिंदूंना शिव्या घाल, आम्ही तुला शिव्या घालतो. म्हणजे अल्पसंख्यांक मुसलमान तुला मतदान करतील आणि बहुसंख्य हिंदू भाजपला मतदान करतील. यामुळे काँग्रेसची व्होटबँक असणारी अल्पसंख्यांक मतं त्यांना नं मिळत तुला मिळून, तुझ्या थोड्या जागा निवडून येतील आणि बहुसंख्यांक हिंदूंची मतं घेऊन आम्ही निवडून येऊ. अत्यंत गलिछ राजकारण करून सध्या भाजप देशाचा सत्यानाश तर करत आहेच, पण विरोधी पक्ष संपवून टाकून लोकशाहीचा खून करत आहे. सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा जी बेधुंद अवस्था होते आणि मस्तवालपणा येतो तो आज भाजपा मध्ये आणि त्यांच्या नेत्यानं मध्ये निर्माण झालाय.
भाजपने या भारतात गलिच्छ राजकारणाचा उदय जरी केला असला तरी, हे सर्व फार काळ टिकत नसते. पण लोकांना समझ येई पर्यंत देश अदाणी अंबानीच्या हातात जाऊन देशाची संपत्ती विकून खासगीकरण होऊ नये म्हणजे झाले.
*प्रल्हाद वामन कुलकर्णी*
(राजकीय विशेलषक, लेखक)

गणेशा's picture

8 Apr 2021 - 7:53 pm | गणेशा

इंडियन एक्सप्रेस'च्या बातमी नुसार ...
"According to official data, four states and the Union Territory of Jammu and Kashmir have reported wastage above the national mark of 6.5 per cent: Telangana (17.6 per cent), Andhra Pradesh (11.6 per cent), Uttar Pradesh (9.4 per cent), Karnataka (6.9 per cent) and J&K (6.6 per cent)."
सरकारचा ऑफिशीयल डाटा म्हणतो देशभरात ज्या काही लसी वेस्ट झाल्या आहेत त्याचे संपूर्ण देशात ६.५% आहे ज्यात
तेलंगणा लस वेस्ट प्रमाण -१७.६%
आंध्र प्रदेश लस वेस्ट प्रमाण -११.६%
उत्तर प्रदेश लस वेस्ट प्रमाण -९.४%
कर्नाटका लस वेस्ट प्रमाण -६ .९%
जम्मू काश्मीर लस वेस्ट प्रमाण -६.६%
अस आहे म्हणजे यात महाराष्ट्र कुठे पण नाही मग महाराष्ट्रात रोज ५ लाख लस बर्बाद केल्या जात आहेतआणि त्यामुळे महाराष्ट्र राज्यात लसीचा तुटवडा आहे याला आधार काय प्रकाश जावडेकरजी ?

मि हे आकडे पडताळले नाहीत, कोणाकडे सोर्स आहे का ?

आजचे केंद्र सरकार कडुन डोस पुरवठा
#महाराष्ट्र ७ लाख ४० हजार
उत्तर प्रदेश ४४ लाख
मध्य प्रदेश ३३ लाख
गुजरात १६ लाख
कर्नाटक २३ लाख
हरियाणा २४ लाख

गणेशा's picture

8 Apr 2021 - 8:12 pm | गणेशा

जर हे खरे असेल, आणि तरी अजुनही महाराष्ट्रातील लोक याला ही काहीतरी मोदी आणि बीजेपी च्या बाजुने कारणे देणार असतील तर याला लाचारीचे उच्च टोक म्हणावे लागेल..

जर हे खोटे असेल तर असे कुठलीही माहिती स्त्रोत न देता पसरवणार्‍या लोकांवर कारवाही करावी..

रात्रीचे चांदणे's picture

8 Apr 2021 - 8:30 pm | रात्रीचे चांदणे

काल पर्यंत तरी महाराष्ट्रा मध्ये सगळ्यात जास्त लसीकरण झालेले होते, म्हणजेच लसीचे डोस पण जास्तच मिळाले असणार. वरचे आकडे हे फक्त काल किंवा परवा मिळलेल्या लसींचे आहेत. तरी पण परिस्तिथी पाहता महाराष्ट्रा ला आणखीन जास्त डोस मिळायला पाहिजे.
सध्या आपल्या राज्यात अक्सिजन बरोबरच Rendemcivir चा पण तुटवडा आहे. आणि हे जर खरे असेल तर मग हा दोष कुणाचा?

गोंधळी's picture

8 Apr 2021 - 9:12 pm | गोंधळी

हे जर खरे असेल तर मग हा दोष कुणाचा?

खरचं खुप राग येतो आहे सध्या देशातील व महाराष्ट्रातील परीस्थितीचा. अस वाटत आहे की जगातील महामुर्ख जनता फक्त भारतातच आहे.

दोष हा फक्त महामुर्ख असलेल्या जनतेचा आहे.

बिटाकाका's picture

8 Apr 2021 - 9:19 pm | बिटाकाका

लसीचे डोस मिळालेले टॉप ३ राज्ये (ही अधिकृत आरोग्य खात्याची माहिती) -
महाराष्ट्र - १ कोटी ६ लाख २० हजार.
गुजरात - १ कोटी ५ लाख २० हजार.
राजस्थान - १ कोटी ४ लाख ९५ हजार.

पूर्ण देशात झालेले लसीकरण - ९ कोटी १० लाख (साधारणपणे ३ महिन्यांत).
उपलब्ध असलेला लस साठा - ४ कोटी ३० लाख
उपलब्ध पैकी राज्यांना वितरण चालू असलेला साठा - १ कोटी ९० लाख.

कालच राज्याला ३ दिवस पुरेल एवढा साठा होता, आज केंद्र बंद का? मध्यप्रदेश दिवसाला ३.५ ते ४ लाख लसीकरण करत आहे, त्यांच्याकडे उपलब्ध साठा, ६ लाख. त्यांच्या मंत्र्यांचे म्हणणे, केंद्राच्या नियोजनानुसार उद्यापर्यंत २० लाख डोस उपलब्ध होतील. आपल्या बाबतीत केंद्राचे नियोजन काय आहे हे मंत्र्यांनी उघड सांगावे, की केंद्राने उद्या, परवा, तेरवा जेव्हा कधी आणि किती पुढील साठा द्यायचे ठरवले आहे. आमच्याकडे अमुक एवढा साठा आधीच असावा हे धोरण का? हेही सांगावे. केंद्रातील जबाबदार अधिकाऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की प्रत्येक दिवसाचा अधिकतम (optimal) वापर व्हावा याच अनुषंगाने प्रत्येक डोसचे वितरण चालू आहे.

अमुक राज्याला एवढे का?, तमुक राज्याला एवढे का? असले प्रश्न आपल्यासारखी अतिसामान्य जनता विचारत असेल तर ठीक आहे, पण जबाबदार लोकांनी नेमकी आकडेवारी द्यावी ना? की केंद्राने अमुक एक निष्कर्ष ठरवला आहे, त्यानुसार राज्यात अमुक एवढे पात्र लोक आहेत, त्यानुसार दिवसाला अमुक एवढे डोस देण्याची आपली क्षमता आहे, त्यानुसार अमुक एवढे डोस आम्हाला पुढील दिवसासाठी उपलब्ध असणे गरजेचे आहे, परंतु केंद्राचे त्या दिवशी आम्हाला ते डोस पुरवण्याचे कुठलेही अधिकृत नियोजन नाही, हे आमचे चौकशी पत्र, त्यावर हे उत्तर मिळाले/मिळाले नाही. का नाही हे सर्व दाखवून केंद्र सरकारला उघडं पाडत? आणि अशी कुठलीही माहिती नसताना कुठल्यातरी संकेतस्थळावरील आकड्यांच्या आधारे, इतक्या महत्वाच्या विषयात गदारोळ उडवून देण्याची लाचारी कुठल्या टोकाची म्हणायची?

ही अधिकृत आरोग्य खात्याची माहिती

Plz हि अधिकृत माहिती स्रोत द्यावा.. जेणे करून कायम पडताळणी करता येईल..

बिटाकाका's picture

8 Apr 2021 - 9:41 pm | बिटाकाका

आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन ऑफिस आणि MoHFW चे अधिकृत ट्विटर हँडल.

गणेशा's picture

8 Apr 2021 - 10:07 pm | गणेशा

https://www.mohfw.gov.in/

मी या site वर शोधत आहे, मला सापडत नाहीये.. Plz help.

बाकी हर्षवर्धन ऑफिस आणि टोपे ऑफिस दोन्ही आरोग्य मंत्री आहेत ना? मग वेगवगेळ data का?
नीच राजकारण वाटत नाहीये का?

असो, थांबतो..

आत्ताच कधी महाराष्ट्र ५ लाख डोस वाया घालवतो प्रकाश जावडेकर बोलले होते, अधिकृत data मध्ये तर तसेही नव्हते..

हा खेळ मुद्दाम खेळला जातोय काय?
कोणालाच वीट येत नाही का असल्या राजकारणी लोकांचा?

बिटाकाका's picture

8 Apr 2021 - 10:56 pm | बिटाकाका

वेबसाईटचं माहीत नाही, ट्विटर हँडलवर दिवसभर वेगवेगळया बाबतीतील माहिती येत असते. बाकी टोपे ऑफिसची आकड्यांची माहिती मी बघितलेली नाही त्यामुळे वेगळी का हे सांगू शकणार नाही. तुम्ही ती माहिती टाका म्हणजे किती वेगळी आहे ते तरी कळेल.
**************
जावडेकरांचा दावा योग्य नाहीये पण तो चुकीचा आहे का हे मला माहित नाही. तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये जी राज्ये दिली आहेत ती राष्ट्रीय सरासरी (जी ६.५% तो लेख आला तेव्हा म्हणजे १५ दिवसांपूर्वी होती) च्या वर आहेत म्हणून दिली आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रात वेस्टेज नाहीये असा का धरावा? राष्ट्रीय सरासरीने धरले तर ५ एक लाख वेस्टेज येतेच ना? महाराष्ट्राची नक्की टक्केवारी किती ते कळण्याचा स्रोत माझ्याकडे तरी नाही. पण ५ लाख वेस्ट का केल्या हे फक्त महाराष्ट्राला विचारणे योग्य नाही.
**************
मला, वैयक्तिक, कोण नीच राजकारण करतंय जाणून घेण्यात नक्कीच रस आहे (मी आधीच अमुक एक बाजू नीच राजकारण करतेय हे ठरवले नसल्यामुळे) कारण त्यावर मला कोणाला मतदान करायचे हे ठरवायचे आहे. त्यामुळे विट येण्याचा प्रश्न नाही.
**************

गणेशा's picture

8 Apr 2021 - 11:06 pm | गणेशा

मी तुम्हाला zee ची पण link दिली आताची आहे.

WoHmf पण पाहिले..

असो वयक्तिक नाही..

तुम्ही जे वेस्ट केल्या म्हणताय हे केंद्राला माहिती आहे.

हे घ्या त्याचे म्हणणे जे जानेवारी तील आहे..कि १०% खराब होणार ते.

https://www.businesstoday.in/coronavirus/10-covid-19-vaccines-will-be-wa...

एव्हडे सगळे असून कोण खोटे आरोप करते आहे.. कोण नीच पणा करतेय ते कळत आहे..

असो.

प्लिज या राजकारण विषयात मी बंद केलेले बोलणे..
आज मात्र हद्द झाली..
आणि असे एक लिहिले कि लिहितच बसावे लागते..

गेले २ तास मी यात घालवले आहे..

खरेच आपण bjp, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी चे गुलाम नाही, जे चूक ते चूक का आपण बोलत नाही..

असो..
प्लिज थांबतो..

असे नाही कि माझ्याकडे data नाही, परंतु मला वेळ नको वाटतोय घालवयाला..
हे घडामोडी धागे, काय घडते आहे त्या पेक्षा bjp कसे बरोबर आणि शिवसेना कशी चूक यावरच चालतात..

Are जे चूक ते चूक..

असो good night..

बिटाकाका's picture

8 Apr 2021 - 11:05 pm | बिटाकाका

ही एक दिवसाची माहिती आहे ना? आतापर्यंत च्या लसीकरणामध्ये महाराष्ट्र एक नंबरच आहे ना? तो एक नंबर ला कमी वितरण झाल्यामुळे गेला असावा का? आणि यापुढचे नियोजन कसे असणार ते कसे कळणार? साठा का करावा याबद्दलही काही माहिती नाही. आणि ऍक्टिव्ह रुग्णांच्या आणि लसींच्या पुरवठ्याचा संबंध लक्षात आला नाही, ऍक्टिव्ह असो की नसो पात्र लोकसंख्येनुसार वितरण होत असावे असे मला वाटते.

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 9:42 pm | मुक्त विहारि

जनतेला देता आली नाही, ते काय राज्य करू शकणार?

आलं अंगावर तर ढकल केंद्रावर, हीच रणनीती आहे...

ह्या सरकारच्या कुठल्याही दाव्यावर, माझा तरी विश्र्वास नाही....

80% लोकांनी नाकारलेला पक्ष, म्हणजे शिवसेना...

गणेशा's picture

8 Apr 2021 - 10:38 pm | गणेशा

हा घ्या zee चा मी वरती म्हणतोय तो report

https://zeenews.india.com/marathi/mumbai/shortage-supply-of-corona-vacci...

गणेशा's picture

8 Apr 2021 - 9:35 pm | गणेशा

https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/maharashtra/sambha...

भिडे - अवघड आहे .. मूर्ख लोक आहेत हे..

काल पासून न्यूज पहायला आणि वाचायला लागलेलो होतो..

असली बकवास गिरी आणि असले बकवास राजकारण या कारणामुळे
बातम्या पाहणे पुन्हा बंद करत आहे...

केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार आहेत.. पण कुराघोडीचे गल्लीच्छ राजकारण चालू आहे..

इतक्या खालच्या लेवल चे राजकारण मी भारतात आधी कधी हि पाहिलेले नव्हते..

बस.. न्यूज बंद करतो आहे.. न्यूज वाचायचे हि बंद..

असली सगळी नालायक लोक पाहून लाज वाटतेय..

त्या पेक्षा डोळ्या अंधारी तिकडे काय पण करावे त्यांनी..

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2021 - 10:28 pm | श्रीगुरुजी

भिडे अत्यंत वाचाळ आहे. मुर्खासारखे बरळणे हे व्यवच्छेदक लक्षण आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Apr 2021 - 6:56 am | अनिरुद्ध.वैद्य

त्यांचे शिष्योत्तम आहेत म्हणे गृहमंत्री?

म्हातारपणी, विचारशक्ती हरवून जाते

कानडाऊ योगेशु's picture

9 Apr 2021 - 8:22 am | कानडाऊ योगेशु

पूर्ण संदर्भ (कॉन्टेक्स्ट) काय आहे हे बघावे लागेल. कारण भिडे गुरुजींना विनाकारण आलंकारिक आणि प्रतिकात्मक वाक्ये वापरायची सवय आहे.
मागच्या वेळी सुध्दा त्यांना म्हणायचे होते काही वेगळेच आणि आंबा व मुले हा संबंध विनाकारण वापरल्याने काही भलतेच बोलले अशी बातमी झाली होती.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2021 - 8:30 am | श्रीगुरुजी

ही पहिली वेळ नाही. ते अनेकदा वादग्रस्त बोलले आहेत.

"भारताला बुद्ध नको, संभाजी महाराज हवे", "ज्ञानेश्वर, तुकाराम वगैरे संतांनी समतेचा विचार दिला. मनू त्यांच्या एक पाऊल पुढे होता.", "रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी ३२ मणाचे (म्हणजे १२८० किलो) सोन्याचे सिंहासन हवे", "माझ्या मित्राच्या बागेत असे आंब्याचे झाड आहे ज्याचे फळ खाल्ले तर संतती होते. मुलगा हवा असेल तर मुलगाच होतो." असली विचित्र विधाने करून ते काय मिळवितात समजत नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Apr 2021 - 11:34 pm | अनिरुद्ध.वैद्य

पब्लिकचा बुद्धिभेद करणे व्यवस्थित सुरुय!

रुग्ण जास्त तर लसी आम्हाला द्या म्हणजे जास्त. लसी काय रुग्णांवर उपचारासाठी हव्यात का? 35 ते 45 दिवसांनी अँटिबॉडी तयार होऊन इम्युनिटी येते.

तोपर्यंत कोव्हीड भूमितीय श्रेणीत वाढून कोट्यवधींच्या घरात पोचेल!

रेमडेसिव्हीर किंवा इतर औषधी अन ऑक्सिजनकडे लक्ष द्यायला हवे तर लसीच्या पुरवठ्याहून फालतुपणा चाललाय.

उधोजींना माझी ह्या बाबतीत सहानुभूती आहे. मोदी - उधोजी ह्यांच्यामध्ये काहीही भांडण असले तरी लस ह्या विषयावरून दोघे मंडळी भांडत बसतील असे मला वाटत नाही. मंत्री संत्री जे बरळत आहेत ते फक्त राजकीय सहानुभूतीसाठी.

मुंबई प्रचंड वेगवान आहे आणि प्रचंड लोकसंख्या असलेला प्रदेश आहे. इथे कोविड वाढणारच. त्याचवेळी संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगारासाठी मुंबई खूप महत्वाची आहे त्यामुळे मुंबईत काहीही गडबड झाली तर केंद्राच्या विविध आकडेवारीवर सुद्धा खूप वाईट परिणाम होतो.

अनेक नागरिक मात्र विनाकारण आणि गरज नसताना इथे इथे फिरत आहेत, पार्ट्या करत आहेत आणि अगदी सध्या सावधानी सुद्धा बाळगत नाही आहेत.

अर्धवटराव's picture

9 Apr 2021 - 1:16 am | अर्धवटराव

महाराष्ट्रात लसपुरवठ्यावरुन जो काहि शिमगा चाललाय ते बघुन हसावं कि रडावं कळत नाहि.
एक मात्र नक्की.. काहि वर्षांनी जेंव्हा हा करोना गोंधळ थांबला आणि देशाचा, राज्याचा इतीहास वगैरे लिहीला जाईल तेंव्हा उधोजी आणि मोदिजी, दोघांचही कौतुक होणार हे निश्चित. प्रशासनाचा शुण्य अनुभव आणि कट्टर विरोधी पक्षांचाच पाठिंबा या पार्श्वभूमीवर उधोजींचं कौतुक होईल. मोदिजींचं कौतुक करायला तर तसं कुठलही निमीत्त चालतं म्हणा :) शिवाय आपल्या बरोबर इतर देशांनाही लसपुरवठा करण्याचं कौतुक विशेष असेल :)

सुक्या's picture

9 Apr 2021 - 3:03 am | सुक्या

लसिकरण विदा इथे उपलब्ध आहे
https://www.mohfw.gov.in/pdf/CumulativeCOVIDVaccinationCOverageReport7th...

हा विदा 08 Apr’21 at 07:00 AM पर्यंत चा आहे. त्यानुसार महा. 89,49,560 इतके लसिकरण झाले आहे.

सध्या एक महत्त्वाचा विषय सुप्रीम कोर्टात आहे.

इंद्रा साहनी खटल्यातील 50% मर्यादेबाबत!
50% मर्यादेचा पुनर्विचार व्हावा या समर्थनाचा सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार ने युक्तिवाद केला आहे.

त्यात काही उलट सुलट verdict आले तर या निर्णयांपेक्षा खूप लॉंग टर्म परिणाम होऊ शकतात.

या स्थितीत वेळीच आवर बसत नसेल तर सरकार खाजगी क्षेत्रात आरक्षणाचे निर्णय पण घेऊ शकते (व्यावसायिक विरोध वगैरे करतील हा समज अनाठायी आहे, अनेक व्यवसायात सरकारला लाच देऊन काम करून घेणारे लोक ही असतात अशा वेळी, प्रो-gov रेग्युलेशन पाळणे ही काय मोठी अडचण नाही.)

एक फेबु पोस्ट

वाढती रुग्णसंख्या आणि लसींच्या पुरवठ्यावरुन सध्या राज्य सरकार आणि केंद्रामध्ये वाद सुरु असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट संदेश देत करोना महामारीशी लढत असताना आपण कोणत्याही प्रकारच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाला आपण समर्थन देत नसल्याचं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना स्थितीवर मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुरुवारी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“राज्यांमध्ये सध्या करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन जणू काही स्पर्धा सुरु आहे. हे राज्य पूर्णपणे निरुपयोगी आहे आणि त्यांची संख्या खूप जास्त आहे. ते राज्य खूप चांगलं काम करत आहे. राज्यांची तुलना करणं आजकाल एक फॅशन झाली आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकावर लसींच्या पुरवठ्यावरुन केलेल्या टीकेनंतर नरेंद्र मोदींनी हे विधान केलं आहे.

करोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या!

“जर रुग्णसंख्या जास्त असेल तरी तुम्ही जास्त चिंता करु नका असं मी सांगितलं आहे. रुग्णसंख्या जास्त असल्याने आपली कामगिरी खराब आहे अशा दबावात राहू नका. मी आत्ताही तुम्ही टेस्टिंगकडे लक्ष द्या असं सांगत आहे. रुग्णसंख्या जास्त असल्याने आपण खराब कामगिरी करत आहोत असा विचार करण्याची गरज नाही. तुम्ही टेस्टिंग वाढवलं तर रुग्णसंख्या अजून वाढताना दिसेल,” असं नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वस्त करताना सांगत होते.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत श्री नरेंद्र मोदी. ह्यांनी वरील वक्तव्य केले आहे.
ते अतिशय असून covid चे राजकारण करणाऱ्या अर्धवट बुध्दीच्या नेत्यांना त्यांनी योग्य संदेश दिला आहे.
ह्या मधून केंद्रीय आरोग्य मंत्री,फडणवीस(अर्थवट आणि स्वार्थी नेता)आणि बाकी राज्य bjp नी धडा घ्यावा आणि वागणूक सुधारावी..
श्री नरेंद्र मोदी चे अभिनंदन त्यांनी योग्य वेळी कान पिळले.

राघव's picture

9 Apr 2021 - 3:31 pm | राघव

त्यात कंपाऊंडर पण आलेत.

Rajesh188's picture

9 Apr 2021 - 4:24 pm | Rajesh188

हो नक्कीच.
त्या बरोबर राणे पिता पुत्र,संजय निरुपम, चंपा,हे सर्व आलेच त्या मध्ये

मुक्त विहारि's picture

9 Apr 2021 - 4:27 pm | मुक्त विहारि

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?

2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?

ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

प्रिन्स फिलिप..(म्हणजे राणी एलिझाबेथ २ हीचे यजमान) याचे ९९ व्या वर्षी निधन झाले अशी बातमी आलीय.

ब्रिटिश लोकं अजून या घराण्याला मानतात याची गम्मत वाटते कधी कधी.

दिगोचि's picture

10 Apr 2021 - 7:26 am | दिगोचि

ब्रिटिश लोकं अजून या घराण्याला मानतात याची गम्मत वाटते कधी कधी.>> यात काही नवल नाही भारतात अनेक जण अजुन गान्धी घराण्याला मानतात की. ब्रिटिश राजघराण्यातील अनेक जण उत्तम कामे करतात म्हणुन त्याना मान आहे. असे म्हणतात की आणखी काहि दशकानी जगात फक्त पाच राजे राहतील. पत्त्यामधले चार व ब्रिटिश राजा. ब्रिटिशाना त्यान्च्या राजघराण्याचा अभिमान आहे आणि म्हणुन ते अजुन शिल्लक आहे व राहीलही..

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2021 - 8:11 am | श्रीगुरुजी

महाराष्ट्रात सुद्धा अजूनही काही जणांचा श्रीमंत, छत्रपती, महाराज, राजे असा उल्लेख होतो व त्यांना काही जण जाहीर मुजरा सुद्धा करतात.

उपयोजक's picture

9 Apr 2021 - 10:13 pm | उपयोजक

सार्वजनिक सुट्ट्या भरपूर असल्याने आठवडाभर कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन लावावा असे सुचवले.

अमेरिकेचे ७ वे आरमार कोणत्याही पुर्व परवानगीशिवाय, पुर्व विनंतीशिवाय, भारताच्या आर्थिक समुद्री क्षेत्रात घुसुन मुक्त संचार केला.

याउपर याची माहिती अमेरिकी नौदलाकडुन देण्यात आली.

Rajesh188's picture

9 Apr 2021 - 11:37 pm | Rajesh188

मग ते चुकून आले असेल.प्रेमानी आले असेल.
चालायचे इथे आणि तिथे हा प्रकार कोणाला गैर
वाटणार नाही..
रोजी रोटी देणारा देश आहे तो.

सुबोध खरे's picture

10 Apr 2021 - 9:52 am | सुबोध खरे

India has lodged a strong protest against such a move by the US regarding the passage of US Navy ship John Paul Jones through its EEZ
https://www.livemint.com/news/india/pentagon-defends-its-navy-ship-asser...

मुक्त विहारि's picture

10 Apr 2021 - 10:17 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

अशा अडचणीच्या वेळी अडवणुक करणारया अधेकार्‍यावर राज्य सरकार काय कारवाई करते हे पाहणे रोचक होइल.

मुक्त विहारि's picture

10 Apr 2021 - 10:24 am | मुक्त विहारि

नक्कीच

नांदेडचे काँग्रेस पक्षाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोविडमुळे निधन झाले आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/congress-mla-raosah...

मराठी_माणूस's picture

10 Apr 2021 - 1:44 pm | मराठी_माणूस

https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/nashik-city/248/10042021/0/4/

ह्या पानावर सर्वात खाली , टाळेबंदीवर काही विचार करायला लावणारे प्रश्न उपस्थित केले आहेत.

मराठी_माणूस's picture

10 Apr 2021 - 5:27 pm | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/anyatha-news/loksatta-anyatha-article-on-kate-b...

निरुपयोगी उपाया संबंधी बाईंचे परखड मत

आपल्या देशांत कठोर संचारबंदी आणि ती पण फक्त एक महिना, पुरेशी आहे....

UK मध्ये, लोकं स्वतः होऊन, संचारबंदी पाळत होती

माझे काका, काकू आणि बहीण , गेले 7-8 महिने घरातच आहेत

महिन्यातून एकदाच, सामान आणत होते

मराठी_माणूस's picture

11 Apr 2021 - 11:19 am | मराठी_माणूस

आपल्या इथेही नियम पाळणारे बरेच आहेत पण माध्यमानी सतत गर्दीची ठिकाणे दाखवली.