प्रशस्तपाद भाष्य

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
12 Feb 2021 - 9:30 am

नमस्कार दोस्तांनोतुमचा माझ्या ब्लॉग्सना उदंड प्रतिसाद असतो, प्रेम असते (प्रेम वगैरे विषयांवर न लिहिताही! ) याबद्दल आभारी आहे. 
आईन्स्टाईन वगैरे संबंधी गोष्टी लिहायला सुरुवात झाल्यानंतर आता सलग पणे १९-२०व्या शतकातल्या फिजिक्सविषयी लिहायला लाईन लागेल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. याला कारण झाले प्रशस्तपाद भाष्य या पुरातन भारतीय ग्रंथाचे माझे पुढे थोडे झालेले वाचन आणि माझी एक जुनी इच्छा. 
वैशेषिक दर्शन ही भारतीयांची पदार्थविज्ञान किंवा रूढार्थाने  फिजिक्स  जाणून घेण्याची विचारपद्धती होती असे मी डोंगरे सरांनी लिहिलेल्या पुस्तकात वाचले होते. डोंगरे सरांविषयी माझ्या ब्लॉगवर मी लिहिले होते. फिजिक्स आणि संस्कृत या दोन्हींवर पांडित्य असल्याने त्याला महत्व. पण त्यांनी ज्या प्रशस्तपाद भाष्याचे संदर्भ दिले होते तो ग्रंथ अतिदुर्मिळ(आता विकीवर आहे! ) पण सारंच संस्कृत. म्हणजे आउट ऑफ बाउन्ड. पण त्याचेही इंग्लिश मध्ये भाषांतर झाले होते हे नेटवर कळले आणि पुढचा शोध सुरु राहिला.
        
वैशेषीक परंपरेतील मूळ विचारवंत म्हणजे कणाद ऋषी इसपू ३००-४०० वगैरे . पदार्थ धर्म संग्रह  किंवा प्रशस्तपाद भाष्य हा ग्रंथ (अंदाजे) ४थ्या -५व्या शतकात लिहिला गेला. प्रशस्तपाद यांनी तो लिहिला.  त्या वैशेषीक परंपरेत त्यावर नंतर अधिक भाष्ये झाली.   त्यावर १९१५ साली काशीचे पंडित महामोपाध्याय गंगनाथ झा यांनी त्याचे भाषांतर केले (त्यासोबतच न्याय कंदली आणि किरणावली यांच्या टीकेचेही भाषांतर त्यांच्या पुस्तकात आहे ). हे इंग्रजी भाषांतर बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या लायब्ररी मध्ये होते आणि संस्थान खालसा झाल्यावर तो ग्रंथसंग्रह बडोद्याच्या हंसा मेहता लायब्ररी मध्ये ट्रान्सफर झाला. त्यांच्या 'रेअर बुक कलेक्शन' मधला तो ग्रंथ कोण्या पुस्तक प्रेमी माणसाने स्कॅन करून नेटवर अर्काइव्ह वर अपलोड केला आणि आमच्या`हाती लागला.(अजूनही आहे अर्काइव्ह वर. ज्यांना स्कॅन केलेल्या कॉपीची PDF कॉपी पाहायची असेल त्यांनी पुढील लिंक वर जावे आणि हवे असल्यास डाउनलोड करावी. हेवी फाइल आहे!!https://archive.org/details/prashastapadabhashya) असो. या अर्काइव्ह च्या कृपेनेच मला घरबसल्या ही कॉपी मिळाली!!!

पण एवढा अट्टाहास का? मी तुम्हाला का सांगतोय? तर संस्कृत पंडित/डेक्कन कॉलेज वगैरेंना त्यातल्या संस्कृत किंवा इंडॉलॉजी मध्ये रस. इंडॉलोजि मध्ये काहीच माहिती नसल्याने त्यात फिजिक्स कसे बसते वगैरे पूर्णच अज्ञान आहे माझे. फिजिक्स एक्स्पर्ट कडे जावं तर त्यांनी ही 'बॉर्डर लाईन केस आहे. डोन्ट वेस्ट युअर टाइम ' असं सांगावं. मग हे पुस्तक वाचणार कोण आणि त्यात लॉजिक/फिजिक्स आहे हे बघणार कोण? ज्या दयानंद सरस्वतींनी त्यांच्या काळात या ग्रंथाची स्तुती केली होती त्यांच्या एका आर्य समाजी अनुयायाला विचारलं तर 'हे पुस्तक वाचून काय करणार आहात? काय उपयोग करणार आहात? ' असाच प्रश्न विचारला गेला. अर्थात ही मंडळी चांगल्या मनाचीच असून त्यांना हातातल्या कामांतून फुरसत नसल्याने किंवा या विषयात रस नसल्याने तसे म्हट्ली असतील. नो हार्ड फिलिंग्स!!!

म्हणून मग शेवटी पुस्तकाचे भाषांतर मूळ संस्कृत श्लोक (विकिस्रोत) - पंडित गंगानाथ झा यांचे श्लोकानुसार इंग्रजी भाषांतर(वर दिलेल्या फाइलमधून घेऊन) आणि मला जसे कळले तेवढे मराठी अशी भाषान्तरे मी ब्लॉग वर टाकली. अजूनही नंतरच्या काही धड्यांची भाषांतरे टाकायची आहेत. तेव्हा म्हणले हे तुमच्या समोर आणावे आणि मांडावे. माझ्या ब्लॉग च्या लिंक खाली देत आहे. 

हेतू हाच की संस्कृत पंडित आणि फिजिक्स एक्स्पर्ट यापैकी आपण कोणी असाल तर आपण पहा. फिजिक्स एक्स्पर्ट असाल तर विशेषत्वाने पाहावा आणि या ग्रंथांतल्या विचारांचा आधुनिक फिजिक्स मध्ये किती रेलेव्हन्स आहे हे पाहावे. माझ्या मते प्री-न्यूटन फिजिक्स मध्ये तो आहे आणि न्यूटन ज्या पदार्थावर 'एक्स्टर्नल फोर्स ' लावतो तो पदार्थ समजून घेण्यात या विचार पद्धतीचा उपयोग करण्यासारखा आहे. आपण शिक्षक असाल तर मुलांना फिजिक्स मध्ये न्यूटन शिकवण्याआधी यातील 'रेलेवंट' आणि जोडलेल्या अपडेटेड गोष्टी शिकवल्या तर न्यूटन कळायला मदत होईल. पुढचं फिजिक्स समजेल. विजुअलाइज होइल. आपण इंडॉलोजिस्ट वगैरे असाल तर याचे समीक्षण त्या पद्धतीने करू शकता. बडोद्यात असाल तर या हंसा मेहता लायब्ररीत ही प्रत आहे की नाही, कशी दिसते..गायकवाड महाराजांच्या पुस्तकांच्या खजान्यात अजून अशी किती आणि कोणती दुर्मिळ रत्ने आहेत हे पाहू शकता.

आपण यापैकी काहीच नसाल(म्हणजे माझ्यासारखे!) तर आपण एक पुरातन भारतीय पुस्तक आणि त्यातील फिजिक्स संबंधी विचार तुम्हाला कसे वाटतात आणि ते फिजिक्स संबंधी कितपत वाटतात, कितपत लॉजिकल वाटतात असा स्वतः:पुरता आनंद घेऊ शकता. त्यावर कॉमेंट्री - टीका किंवा स्तुती - करू शकता. यातून होईल इतकेच की अनेक नष्ट झालेल्या पुस्तकांमधील एका पुस्तकाचे विचार तरी आपल्यापर्यंत पोहोचतील. (टीका करण्या आधी किंवा स्तुती करण्याआधी पुस्तक वाचले  तर बरे!) तुम्हाला काही त्यात करावे वाटल्यास अडचण यायला नको म्हणून सारे संदर्भ दिले आहेत. 

अर्थात मी म्हणतो म्हणून ऐकण्या पेक्षा आपण थेट भाषांतर पाहून ठरवावे. तर ही पाहा भाषांतरे खालील लिंक्स वर.     
(भाषांतर जोडणीचे काम पूर्ण)
प्रशस्तपाद भाष्य - पुस्तकाविषयी

प्रकरण १ - ग्रंथारंभ आणि उद्देश 

प्रकरण २ - पदार्थाची ६ अंगे 

प्रकरण ३ - पदार्थाच्या  ६ अंगांमधील सारखेपणा आणि वेगळेपणा 

प्रकरण ४ - द्रव्यपदार्थ निरूपण आरंभ 

प्रकरण ४.१ पृथ्वी किंवा स्थायूंविषयी 

प्रकरण ४.२ आप किंवा जला विषयी

प्रकरण ४.३ तेज किंवा उष्णते विषयी 

प्रकरण ४.४ वायू  विषयी

प्रकरण ४.५ महाभूते - निर्मिती आणि विनाशाची प्रक्रिया 

प्रकरण ४.६ आकाश तत्वाविषयी 

प्रकरण ४.६ काल तत्वाविषयी

प्रकरण ४.८ दिक तत्वाविषयी 

प्रकरण ४.९ आत्मा तत्वाविषयी

प्रकरण ४.१० मन तत्वाविषयी

प्रकरण ५. १ गुणपदार्थ निरूपण - द्रव्यांच्या गुणांविषयी परिचय

(भाषांतर जोडणीचे काम अपूर्ण)
प्रकरण ५. २ द्रव्यांच्या गुणांविषयी सविस्तर 

प्रकरण ६ : कर्म पदार्थ अर्थात पदार्थांच्या हालचालींविषयी   

प्रकरण ७ : सामान्य पदार्थ अर्थात पदार्थांचे वर्गीकरण 

प्रकरण ८ : विशेष पदार्थ अर्थात पदार्थांचे विशेष गुण 

प्रकरण ९ : समवाय पदार्थ अर्थात पदार्था-पदार्थातले संबंध 

कळावे लोभ असावा.
अनिकेत

प्रतिक्रिया

कंजूस's picture

12 Feb 2021 - 6:57 pm | कंजूस

या ग्रंथांचे वाचन आणि समजून घेणे अगत्याचे आहेच. पण तुम्ही म्हणता तसे संस्कृत कळायला कठीणच. मग कुणी भाषांतर केल्यामुळे एक मोठे काम झालेच.
पण पदार्थविज्ञान अध्यात्माला जोडण्याचा उद्योग फारच नकोसा वाटतो. आणि वाचन सोडावे लागते.

गामा पैलवान's picture

13 Feb 2021 - 4:30 pm | गामा पैलवान

कंजूसकाका,

पण पदार्थविज्ञान अध्यात्माला जोडण्याचा उद्योग फारच नकोसा वाटतो. आणि वाचन सोडावे लागते.

वैशेषिका हे अध्यात्म नाही. जरी आत्मा वगैरे शब्द असले तरीही हे अध्यात्म नव्हे. कारण की अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे.

आ.न.,
-गा.पै.

पूर्वी लॉजिक, बायोलॉजी, फिजिक्स हा एकच सब्जेक्ट होता बहुतेक..आजकालच्या पुस्तकात इतिहास, भुगोल, नागरिकशास्र एकाच सोशल स्ट्डिज विषयात असतात तसे..:)
पण अध्यात्म हा इल्लॉजिकल विषय नाही हे मात्र खासच खरं आहे..अध्यात्माची रोकडी प्रचिती..
केपलर, कोपर्निकस वगैरे फिजिसिस्ट हे इतर वेळेस धर्मप्रसार सुद्धा करायचे..त्यांच्या इतकी सूट भारतात नाही असं कुणी सांगितलं! सगळे आपल्या सोयीने सर्व करतात..

अनिकेत कवठेकर's picture

15 Feb 2021 - 8:48 pm | अनिकेत कवठेकर

Johannnes Kepler, the 17th century astronomer, embodies one of the best example of the reconciliation and integration between science and faith. Discovery of the three mathematical laws of planetary motion, known as “Kepler’s Laws” is the most important achievement of Kepler along with this ideas of the elliptical orbital patterns of planets. He endorsed Copernicus’s heliocentrism.

For Kepler, the universe was sacred with a divine origin. He wrote in 1599: ‘the world is the corporeal image of God and the soul is the non-corporeal image of God.” He referred to the universe as the “bright temple of God.” Kepler saw the reflection of the three Persons of the Holy Trinity in the universe.
(http://lightoftruth.in/column/kepler-astronomer-priest/)

आपल्या कडे मात्र फिजिक्स म्हणजे नास्तिकच असले पाहिजे अशी काहीशी सक्ती आहे..

निनाद's picture

13 Feb 2021 - 7:53 am | निनाद

वैशेषीक परंपरेतील ज्ञानचे दालन या रूपाने तुम्ही उघडले आहे असे वाटते. पहिला प्रशस्तपाद भाष्य - पुस्तकाविषयी हा भाग पाहिला. खूपच रोचक आहे. जमेल तसे वाचन नक्कीच करेन. तुमचे कार्य अतिशय महत्त्वाचे आणि चांगले आहे. पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!

अनिकेत कवठेकर's picture

15 Feb 2021 - 8:56 pm | अनिकेत कवठेकर

@वैशेषीक परंपरेतील ज्ञानचे दालन या रूपाने तुम्ही उघडले आहे असे वाटते.

हे खरे तर डोंगरे सरांनी उघडले होते. पण फार लोकांसमोर आले नाही. लोकांनी या आणि अशा ग्रंथांचे परिशीलन केले पाहिजे आधुनिक द्रूष्टीने..

मुक्त विहारि's picture

13 Feb 2021 - 8:03 am | मुक्त विहारि

भौतिक शास्राची अजिबात आवड नाही...

पण, तुम्ही उत्तम काम करत आहात ...

मनापासून धन्यवाद

अनिकेत कवठेकर's picture

15 Feb 2021 - 8:57 pm | अनिकेत कवठेकर

धन्यवाद मुक्तविहारीजी..

त्या बद्द्ल पाहिले तुमचे अभिनंदन आणि भौतिकशास्त्र सारखा विषय सोप्या रिती नी इथे समजावता त्या बद्द्ल धन्यवाद.
पुरातन ग्रंथ कडे आउटडेटेड म्हणून बघण्या मुळे खूप मोठ्या अमूल्य माहिती ला आपण मुकतो.
प्रतेक गोष्ट समजून घेण्यातच खरा scientific दृष्टिकोन असतो आणि तो तुमच्या कडे.
लेखाबद्दल आभार.
हळू हळू वाचत आहे समजून घेत आहे.

मुक्त विहारि's picture

13 Feb 2021 - 12:08 pm | मुक्त विहारि

छान करत आहात....

भौतिक शास्राची अजिबात रस निर्माण झाला नाही...

अनिकेत कवठेकर's picture

16 Feb 2021 - 12:03 pm | अनिकेत कवठेकर

हे समजून घेणं ऑप्शनल आहे..सक्ती नाही..समजलं तरी परीक्षाही द्यायची नाहीये..पण समजलं तर बर्‍याच गोष्टींचे बरेच डॉट्स कनेक्ट करता येतील..सगळ्यांना हा खेळ आवडतोच खेळायला

@प्रतेक गोष्ट समजून घेण्यातच खरा scientific दृष्टिकोन असतो..

खरं बोललात..त्याने ओवरऑलच बर्‍याच न कळणार्‍या, न पटणार्‍या गोष्टी समजायला सुरुवात होते..समजतातच असे नाही..निदान आपल्याला हे समजत नाहीये हे तरी समजतं..

@प्रतेक गोष्ट समजून घेण्यातच खरा scientific दृष्टिकोन असतो..

खरं बोललात..त्याने ओवरऑलच बर्‍याच न कळणार्‍या, न पटणार्‍या गोष्टी समजायला सुरुवात होते..समजतातच असे नाही..निदान आपल्याला हे समजत नाहीये हे तरी समजतं..

गामा पैलवान's picture

13 Feb 2021 - 4:33 pm | गामा पैलवान

अनिकेत कवठेकर,

तुम्हाला प्राचीन ग्रंथ आधुनिक दृष्टीने वाचायची इच्छा होते हेच मुळात खूप आहे. या बाबतीत तुम्ही कृतीने आदर्श प्रस्थापित केला आहे. तुमच्या प्रयत्नांत यश लाभो. मी सुद्धा ग्रंथ जाणून घ्यायचा यथोचित प्रयत्न करेन.

धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

हे एकाचे काम नाही..अनेक हात लागले तर काहीतरी होणार..

उत्तम काम करत आहात. शुभेच्छा.

अनिकेत कवठेकर's picture

16 Feb 2021 - 12:24 pm | अनिकेत कवठेकर

कळावे लोभ असावा ही विनंती _/\_

मूकवाचक's picture

16 Feb 2021 - 1:09 pm | मूकवाचक

+१

अनिकेत कवठेकर's picture

4 Mar 2021 - 1:24 pm | अनिकेत कवठेकर

धन्यवाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Feb 2021 - 3:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुम्हाला अनेकोत्तम शुभेच्छा
सगळे वाचायला वेळ लागेल आणि समजायला तर त्याहून कितीतरी जास्त वेळ लागेल
तो पर्यंत ही पोचपावती
पैजारबुवा,

अनिकेत कवठेकर's picture

4 Mar 2021 - 1:27 pm | अनिकेत कवठेकर

समजण्याच्या प्रक्रीयेत वेळ लागेल आणि आशा आहे की मजा सुद्धा येईल.

चौथा कोनाडा's picture

17 Feb 2021 - 5:54 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त माहिती.
अशी माहिती आमच्या सारख्या सामान्यांपर्यन्त पोहोचवण्याचे आपले कार्य खरोखर थोर आहे !

अनिकेत कवठेकर's picture

4 Mar 2021 - 1:29 pm | अनिकेत कवठेकर

यातून काहीतरी चांगले तुम्हाला मिळेल अशी आशा आहे