माणदेशातील शिलेदार वारुगड

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
2 Feb 2021 - 9:54 am

माणदेशातील शिलेदार वारुगड । मराठी vlog

सातारा फलटण महादेव डोंगर रांगेत असलेला गिरिदुर्ग प्रकारातील, जवळपास ३००० फूट उंच असलेला किल्ला म्हणजे "वारुगड". विजापूरच्या वाहुतुकीवर नियंत्रणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी २ किल्ले बांधले , एक संतोषगड आणि हा वारुगड. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि दहिवडी पासून जवळ असेलेला हा किल्ला.

वारुगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी १० ते १५ मिनटे लागतात आणि जर जाधववाडी मार्गे आलो तर जवळपास २ तासाचा ट्रेक आहे. गडावरती जाण्यासाठी सिमेंट च्या पायरचा बांधकाम सुरु आहे. गडाच्या मुख्य दरवाजा जवळ भक्कम तटबंदी , दोन बुरुज व दरवाज्याचे अवशेष आहेत. गडावरती पोहचलं कि सदरचे अवशेष दिसतात. तसेच एक मंदिर , पाण्याचे टाके आणि स्थानिक सुरु केलेलं तटबंदीच काम असा बालेकिल्ल्याचा परिसर आहे.

गडावरून वारुगड गाव, वारुगड माची, सीताबाईचा डोगर, शिखर शिंगणापूर आणि जर वातावरण स्वच्छ असेल तर पुरंदर वज्रगड ही दिसतात. बालेकिल्ल्यावरन खाली येताना गडाचे ३ ४ बुरुजाचे अवशेष हि दिसतात. गडावरती एक पाण्याचे टाके , तिथे लिहलेल्या माहितीवरून समजलं कि ते पाण्याचं टाकं पांडवकालीन आहे , पांडवांनी ते एकाच रात्रीत बांधलं होत अशी आख्यायिका आहे.

आपण जर गडावर दुसऱ्या मार्गे आलो तर आपण फलटण दरवाज्यातून आत येतो. फलटण दरवाजाला भक्कम तटबंदी आहे आणि सोबतच दरवाजाचे अवशेष हि आहेत.
या रस्त्याने जर आलो तर आपल्याला १ ते २ तासाचा ट्रेक करावा लागतो.

वारुगड माची - वारुगडाला असलेल्या माचीला संपूर्ण तटबंदी आजही भक्कम स्थितीत आहे, तटबंदीवर काही बुरुजाचे अवशेष हि दिसतात.

वारुगड गावात एक भव्य भैरवनाथाचं मंदिर आहे. मंदिराच्या समोर २ ३ वीरगळी हि आहेत. तसेच दगडात कोरलेलं एक कासव पण आहे. तसेच मंदिर भव्य असल्यामुळे जर कोणी स्टे साठी जात असाल तर राहण्याची सोय पण होते. जेवण/खाण्या साठी हॉटेल नसल्यामुळे जेवण घेऊन जाणंच उत्तम.

गडावरची पाहण्याची ठिकाणे -

- वारुगड बालेकिल्ला
- वारुगड माची
- पांडव कालीन पाण्याचे टाके
- फलटण दरवाजा
- भैरवनाथ मंदिर

पोहचण्याचा मार्ग -

पुणे - शिरवळ - लोणंद - फलटण - वारुगड - १३७ कि. मी.
सातारा - कोरेगाव - पुसेगाव - निढळ - वारुगड - ६६ कि. मी.

अधिक माहितीसाठी संपूर्ण विडिओ लिंक आणि आपणास या गडाबद्दल अजून काही माहिती असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा -

प्रतिक्रिया

पाटील, भारीये फॉर्म्याट तुमचा, अजून येवुद्या व्हिड्यु असे

धन्यवाद , नक्कीच येत राहतील असे विडिओ ..