प्रतिभा आणि त्यातली करिअर्स

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
26 Jan 2021 - 8:38 pm
गाभा: 

प्रतिभा म्हणजे मराठीत ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात त्याला भारतात सध्या किती महत्व आहे? पुढे किती असेल?

प्रतिभा नक्की कशाला म्हणावं? मीम्स बनवणं,व्हिडिओ एक नि त्यावर गाणे भलतेच चढवून खसखस पिकवणे यांना प्रतिभा म्हणता येईल का?

क्रिएटिव्हिटी आणि फालतूपणा यांना अोळखण्याच्या खूणा कोणत्या? त्या कालपरत्वे,वयोपरत्वे बदलतात का?

अॅनिमेशन बनवणे किंवा फोटोग्राफी ही प्रतिभा आहे का? की ते तंत्र आहे?

प्रतिभा या क्षेत्रात केवळ भारतात करिअरच्या दृष्टीने किती स्कोप आहे? क्रिएटिव्हिटी या अंतर्गत करिअरचे पर्याय कोणते सुचवाल? प्रतिभा हा प्रकार उपजत असेल तर कोर्सेसची जोडणी हवीच का? एखाद्याने कोर्स पास केला पण प्रतिभा कमी असेल तर चालेल का?

सध्या केवळ प्रश्नच आहेत.त्यामुळेच निवेदन छोटे आहे.क्रिएटिव्हिटी या विषयावर चर्चा व्हावी. _/\_

प्रतिक्रिया

प्रतिभा ह्याला मराठीत टेलेन्ट म्हणतात. क्रिएटिव्हिटी नाही. क्रियेटिविटीला जुन्या भाषेंत सर्जनशीलता असे म्हणतात.

खालील उत्तरे प्रतिभा म्हणजे टेलेन्ट असे समजून दिली आहेत.

> भारतात सध्या किती महत्व आहे? पुढे किती असेल?

जिथे जिथे सरकारी लुडबुड कमी तिथे तिथे प्रतिभेला जास्त महत्व येते. चित्रपट क्षेत्र उत्तम उदाहरण आहे. जो पर्यंत सरकार थेटर आणि तिकिटांच्या किमती ह्यावर नियंत्रण ठेवत होते तो पर्यंत ठराविक लोकच ह्या उद्योगांत होते. मल्टिप्लेक्स च्या जमान्यात अनेक नवीन सामान्य पण प्रतिभाशाली लोकांना वाव मिळाला. वेब्सिरीस च्या दुनियेत आणखीन प्रचंड लोकांना वाव मिळाला.

महत्व किती आहे ती प्रतिभा कसली आहे ह्यावर अवलंबून आहे. शेवटी समाज म्हणजे बाजार व्यवस्था प्रतिभेचे महत्व ठरवते. जगांत काही ठिकाणी कानशिलात थपडा लावण्याची सुद्धा स्पर्धा घेतली जाते.

> मीम्स बनवणं,व्हिडिओ एक नि त्यावर गाणे भलतेच चढवून खसखस पिकवणे यांना प्रतिभा म्हणता येईल का?

होय.

> अॅनिमेशन बनवणे किंवा फोटोग्राफी ही प्रतिभा आहे का? की ते तंत्र आहे?

दोन्ही.

> प्रतिभा या क्षेत्रात केवळ भारतात करिअरच्या दृष्टीने किती स्कोप आहे?

प्रतिभा नावाचे काहीही क्षेत्र नाही. प्रत्येक क्षेत्रांत काही प्रमाणात प्रतिभा लागतेच. हल्ली क्रिएटिव्ह अकाऊंटिंग सुद्धा केले जाते.

> एखाद्याने कोर्स पास केला पण प्रतिभा कमी असेल तर चालेल का?

कोर्सवर अवलंबून आहे.

उपयोजक's picture

27 Jan 2021 - 2:03 am | उपयोजक

मुद्देसूद प्रतिसाद!

उपयोजक's picture

27 Jan 2021 - 2:08 am | उपयोजक

प्रतिभा हा टॅलंट असेल तर मग क्रिएटिव्हिटीची(सर्जनशीलता) उदाहरणे कोणती म्हणता येतील?

टवाळ कार्टा's picture

27 Jan 2021 - 2:22 am | टवाळ कार्टा

कुटुंबवत्सलता दाखवणे =))

उत्कृष्ट बुद्धिबळ खेळणे हि प्रतिभा आहे. गाडी व्यवस्थित चालवणे हि प्रतिभा आहे.

सृजनशीलता म्हणजे कल्पनाशक्ती वापरून नवीन काही करणे. बहुतेक कला क्षेत्रांत सृजनशीलता आणि प्रतिभा दोन्हीची सांगड लागते. कथा लेखनासाठी योग्य शब्द वापराने, वाचकाची उत्कंठा वगैरे वाढविणे ह्याला प्रतिभा लागते पण कथेत पत्रे उभी करणे, कथानक निर्माण करणे इत्यादींचा सृजनशीलता लागते. प्रतिभा आहे पण सृजनशीलता नाही तर आपण भाषांतर करू शकता. सृजनशीलता आहे पण प्रतिभा नाही तर मग आपण शब्दांकन करायला कुणाला घेऊ शकता.

व्यवसायांत प्रतिभेपेक्षा सृजनशीलता महत्वाची आहे. फायदा करण्याचे नवीन मार्ग शोधणे, कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवीन वाटा शोधणे हे सर्व प्रतिभे पेक्षा सृजनशीलतेत जास्त मोडते.

हरवलेला's picture

27 Jan 2021 - 3:19 am | हरवलेला

मुद्देसूद आणि उत्कृष्ट प्रतिसाद देणे हि प्रतिभा आहे.

चौकस२१२'s picture

27 Jan 2021 - 4:49 am | चौकस२१२

प्रतिभा आणि सृजनशीलता यात वेगळेपण आहे हे लक्षात आलं नव्हते ! "कल्पकता" असे सुद्धा वर्णन करता येईल का ?
स्टीव्ह जॉब्स कडे सृजनशीलता होती आणि वोझनीयक कडे प्रतिभा होती असे म्हणता येईल का? कारण AAPLE ची कथा बघितली तर स्टिव्ह जॉब्स ने गरज ओळखून उत्पादन म्हणा किंवा त्या गरजेला पूर्ण करण्यासाठी उत्पादन / सेवा निर्माण केली असे दिसते.. म्हणजे सृजनशीलता?
स्मार्ट फोन किंवा संगणक स्वस्त होण्या आधी जगभरातून भारतात पत्र पाठवण्यासाठी कोणे एके काळी एक सेवा कोणी तरी शोधून काढली कि तुम्ही भारताबाहेरून त्यांना इमेल कर्यचे , ते ते छापून पत्र म्हणून तुमच्या मित्र / नातेवाईक यांना पाठवायचे ! भारतीय टपाल खाते वापरून .. !
असो सध्या तरी सोप्पे ठेवण्यासाठी प्रतिभा आणि सृजनशीलता आणि कल्पकता हे एका समजून पुढे लिहितो

प्रतिभा म्हणजे मराठीत ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात त्याला भारतात सध्या किती महत्व आहे? पुढे किती असेल?
फक्त फियाट आणि अँबॅसिडर आणि बजाज, हाकिन्स आणि प्रेस्टिज असतानाचा काळ अथवा आणि आताचा काळ , सोयी सुविधा आणि उत्पादने केवढी आहेत ती निर्माण करण्यासाठी निश्चितच या क्षेत्रात भारतात प्रचंड प्रमाणात उलाढाल झालि आहे म्हणजेच या क्षेत्राला वाव आहे आणि राहील !
विचार करा पूर्वी आर्किटेक्त्त बहुतेकदा इमारती वैगरे ची रचना आर्याचा आता किती तरी आर्किटेक्त्त चित्रपट आणि टीव्ही सेट रायणते गुंतले असतील

भारतात आज फक्त संगणक क्षेत्रात नाही तर गृहपयोगी वस्तू ( वैद्यकीय उपकरणे , कपडे धुण्याची यंत्रे, वाहन उत्पादन, विमाने इत्यादी) यात जे डिझाईन चे काम चालते ते बरेच भारताबाहेरील बाजारपेठेसाठी असते यात टाटा इलेक्सि किंवा लार्सन अँड टुब्रो किंवा टाटा टेकेनॉलॉजी येथे असे काम चालते फिलिप्स आणि जीई मेडिकल यांची मोठी रिसर्च अँड डेव्हलोपमेंट कार्यालये भारतात आहेत जगभरचं बाजारपेठेसाठी !

प्रतिभा नक्की कशाला म्हणावं? मीम्स बनवणं,व्हिडिओ एक नि त्यावर गाणे भलतेच चढवून खसखस पिकवणे यांना प्रतिभा म्हणता येईल का?
हो का नाही?

क्रिएटिव्हिटी आणि फालतूपणा यांना अोळखण्याच्या खूणा कोणत्या? त्या कालपरत्वे,वयोपरत्वे बदलतात का?
क्रिएटिव्हिटी तुम्ही कुठी वापरू शकता चांगला आणि फालतू दोन्ही हि .. पण "चांगल्या दर्जाचे" फालतू बनवण्यस्तही सुद्धा प्रतिभालागतेच

अॅनिमेशन बनवणे किंवा फोटोग्राफी ही प्रतिभा आहे का? की ते तंत्र आहे?
दोन्ही ..

प्रतिभा या क्षेत्रात केवळ भारतात करिअरच्या दृष्टीने किती स्कोप आहे?
- इंडस्ट्रियल डिझाईन
- आर्किटेकत परंतु त्यातील अंतर्गत ( इंटिरियर डिझाईन मध्ये खास असणे)
- वेब साठी यूजर इंटरफेस डिझाईन
- जाहिरात क्षेत्र
- डिझाईन या खाली मोडणारी अनेक क्षेत्रे ,भौतिक गोष्टींपासून ते शिक्षण या सारखया शेतारततील किंवा सार्वजनिक स्वास्थ्य या क्षेत्रात त्याचा वापर , उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या पुस्तकाल्यात किंवा स्टेडियम मध्ये "माहिती पाट्या" कश्या असाव्यात यात , तंत्र, शास्त्र आणि प्रतिभा आणि कल्पकता सगळे लागते
-
खालील लिंक वरून आपल्याला काही कल्पना येईल
https://www.design.org.au/about-us/पुरपोसे
https://www.design.org.au/news-information/designers-australia-2021-अवॉर्ड्स
https://www.youtube.com/watch?v=Aq22pjvdQa8 आणि असे अनेक भाग

https://designawards.core77.com/2020

क्रिएटिव्हिटी या अंतर्गत करिअरचे पर्याय कोणते सुचवाल?
वरील यादी पहा

प्रतिभा हा प्रकार उपजत असेल तर कोर्सेसची जोडणी हवीच का?
फायदा निश्चित होतो .कारण असे शिक्षण घेताना त्यातील तंत्र, इतर लोकांबरोबर झालेला संवाद , बाजरपेठातील अनुभव इत्यादी कळते

एखाद्याने कोर्स पास केला पण प्रतिभा कमी असेल तर चालेल का?
मुळात आवड आणि थोडीतरी प्रतिभा किंवा त्यात रस असला पाहिजे ... !

उपयोजक's picture

27 Jan 2021 - 8:58 am | उपयोजक

छान माहिती मिळाली!

चौथा कोनाडा's picture

28 Jan 2021 - 9:04 pm | चौथा कोनाडा

एखाद्याने कोर्स पास केला पण प्रतिभा कमी असेल तर चालेल का?
मुळात आवड आणि थोडीतरी प्रतिभा किंवा त्यात रस असला पाहिजे ... !

+ १ हे फार महत्वाचे आहे.
माझ्या पाहण्यात एक दोघेजण आहेत ज्यांनी कोर्स केला आहे पण प्रतिभे अभावी त्यांना मोठ्या संधींना मुकावे लागले
(असे त्यांनीच मला सांगितले)

चौकस२१२'s picture

27 Jan 2021 - 4:54 am | चौकस२१२

https://matterport.com/?utm_source=Marketo-Email&utm_medium=Marketo-Emai...
वरील तिन्ही गोष्टींचा उपयोग करून कोणतरी हा उद्योग उभा केला त्याचा वापर विविध क्षेत्रात होत आहे एकूणच ३डी ( त्रिमित ) जग आहे
आयफोन १२ असेल तर त्यात असा ३डी स्कॅनर उपलब्ध आहे

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 10:05 am | मुक्त विहारि

उत्तम भरतकाम करता येणे ही प्रतिभा ....

तर,

भरतकाम करता येते, ह्या प्रतिभेचा वापर करून, नवीन नवीन, कलाकुसर शोधणे ही, सृजनशीलता,.... असे वाटते....

एक उदाहरण देतो ...

प्रतिभेचा आणि सृजनशीलतेचा, समन्वय साधणारा, कधीच उपाशी पोटी नसतो...

डोंबिवली मध्ये, एक लाकडी वस्तू बनवून देणारा कारागिर आहे. तुमच्या बजेट नुसार, घरानुसार, तुमच्या डिझाइन प्रमाणे, सुतारकाम करून देतो.

चौकस२१२'s picture

27 Jan 2021 - 10:38 am | चौकस२१२

मेक इन इंडिया / इन इंडिया बरेच वर्षे चालू आहे परंतु ब्रँड इंडिया म्हणावे तसे मात्र नाहि ते पुढे वाढेल अशी अशा करूयात , याला कारण त्यासाठी मोठे मार्केटिंग साठी पैसे आणि मूळ संशोधन यावर भर द्यावा लागतो तिथे सरकार आणि खाजगी उद्योग दोघांनी कंबर कसली पाहिजे ...

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 10:53 am | मुक्त विहारि

1. अफाट लोकसंख्या
2. राजकारण

प्रतिभा म्हणजे मराठीत ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात त्याला भारतात सध्या किती महत्व आहे? पुढे किती असेल?
व --महत्व कायमच राहिल,पण नवं नवीन गोष्टी शिकत राहिला तरच!

प्रतिभा नक्की कशाला म्हणावं? मीम्स बनवणं,व्हिडिओ एक नि त्यावर गाणे भलतेच चढवून खसखस पिकवणे यांना प्रतिभा म्हणता येईल का?
--मी याला प्रतिभा मानत नाही.

क्रिएटिव्हिटी आणि फालतूपणा यांना अोळखण्याच्या खूणा कोणत्या? त्या कालपरत्वे,वयोपरत्वे बदलतात का?
--हा करतो म्हणून मी करतो,करते हा व फालतूपणा,वेळ आहे म्हणून करणे हा फालतूपणा.... वयानुसार प्रगल्भता यायलाच हवी नाही तर अवघड आहे या क्षेत्रात..

अॅनिमेशन बनवणे किंवा फोटोग्राफी ही प्रतिभा आहे का? की ते तंत्र आहे?
हो तंत्र आहे.

माझ्या अल्प अनुभवाने ही वैयक्तिक मत मांडली आहेत.

उपयोजक's picture

27 Jan 2021 - 7:43 pm | उपयोजक

हे क्रिएटीव्ह क्षेत्र आहे का?

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 9:22 am | मुक्त विहारि

77 साली, कोका कोला, परत गेल्या नंतर, Thums Up ने, जास्त प्रमाणात, बाजारपेठ ताब्यात घेतली...

90 च्या सुमारास, विजय मल्ल्याने, दारूच्या धंद्यात उडी घेऊन, बियरच्या बाजारपेठेत, Kingfisherचा, चांगला खप सुरू केला ...

चौकस२१२'s picture

28 Jan 2021 - 7:06 am | चौकस२१२

क्रिएटीव्ह म्हणजे कल्पकता ...म्हणत असाल तर उत्तर माझ्यामते हो ...निश्चित या क्षेत्रातही कल्पकता लागते आणि यात जाहिरात हे क्षेत्र निगडित आहे
२ उदाहरणे देतो
१) - भारतात पूर्वी चांगली दर्जाचे प्लास्टिक चे साठवणुकीसाठी डबे फार मिळत नसत एका तर धातूचे जाड किंवा चिनीमातीचं बरण्या ... मग कोणत्यातरी तेलाच्या किंवा दारूच्या निर्मात्यांनी आपली उत्पदनाची बाटली चांगल्या दर्जाची काढली .. आणि असा प्रचार केलं ( प्रत्यक्ष कि अप्रत्यक्ष हे आठवत नाही _ कि घेणारच ( दारू ) तर माची घ्या म्हणजे त्यातील "माळ" संपल्यावर घरात वापरयाला एक चांगली बाटली तरी पदरात पडेल!
२) मुझीलँड मध्ये निसान ने एकदा देश भर घर्मगे एक ( एकुन लोकसंख्या ४५ लाख) प्लास्टिक किल्ल्या टपालाने पाठवल्या आणि आवाहन केलं कि या शनिवारी जवळचं निसान विक्रेत्याकडे जा आणि जर तेथिल कुलुपात ठेवलेली गाडी तुम्हाला तुमच्या किल्लीने उघडता आली तर ती गाडी तुमची ... याला म्हणतात कल्पकता.. अर्थात यात गडबड अशी झाली कि एकूण देशभरात २-३ कुलुपे उघडणार अशी मांडणी होती पण उघडली गेली २५-३० आणि मग निसान ला त्या गाड्या करार प्रमाणे फुकट द्यव्य लागली ... गडबड झाली

उपयोजक's picture

1 Feb 2021 - 9:28 pm | उपयोजक

छान माहिती!

सिरुसेरि's picture

31 Jan 2021 - 6:49 pm | सिरुसेरि

या लेखावर आधारीत उदाहरण म्हणजे , चित्रकला ( हि प्रतिभा ) + अ‍ॅनिमेशन संगणकीय तंत्रज्ञान ( हे तंत्र ) = ग्राफीक डीझायनर हे करीअर .

उपयोजक's picture

1 Feb 2021 - 9:32 pm | उपयोजक

हो. पण याला भारतात फारसा स्कोप नाही. :(

https://youtu.be/ij-qLLGWGH8

सुबोध खरे's picture

3 Feb 2021 - 11:36 am | सुबोध खरे

माझ्या मनात प्रतिभा आणि सृजनशीलता यात गोंधळ आहे.

सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यात जो फरक आहे त्याला काय म्हणता येईल?

राहुल द्रविड याना प्रतिभा असेल तर श्री सचिन तेंडुलकर याना सृजनशीलता म्हणता येईल का?

तसे वाटत नाही.

मिपा वर लिखाण केलं आहे ते संपूर्ण पणे अनुभवावर अवलंबून होते. त्यात सिद्धहस्तते चा पूर्ण अभाव आहे.

म्हणजे कदाचित माझ्याकडे लेखनाची प्रतिभा आहे पण सृजनशीलता नाही.

कोणी मदत करेल का?

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 1:22 pm | मुक्त विहारि

व.पु. काळे, दमा,शंकर पाटील, यांचे लेखन, म्हणजे प्रतिभा ....

पुल,गदिमा, आचार्य अत्रे, यांचे लेखन म्हणजे सृजनशीलता ...

प्रतिभा आणि सृजनशीलता, यांच्या फरकातील, सीमारेषा अत्यंत धूसर असते...

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 1:24 pm | मुक्त विहारि

स्वानुभवावर आणि मनापासून लिहीत असल्याने, मनाला भिडतात...

उपयोजक's picture

13 Feb 2021 - 7:02 pm | उपयोजक

प्रतिभा आणि कौशल्य(skill) यांच्यात फरक काय? कसा करावा?