बेळगाव आणि कर्नाटक: सध्याच्या घटना

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
20 Nov 2020 - 8:03 pm
गाभा: 

बेळगाव आणि आजूबाजूचा कर्नाटकात समाविष्ट असलेला सीमाभाग मराठीबहूल असल्याने महाराष्ट्रात समाविष्ट करावा ही मागणी बर्‍याच वर्षांपासून होत अाहे.त्यासाठी वेळोवेळी आंदोलने,मारामार्‍या होत असतात.
पण गेल्या काही दिवसातल्या सीमाभागातल्या बातम्या/घडामोडी पाहिल्या तर बेळगाव नि सीमाभाग महाराष्ट्रात जाऊ नये यासाठी कर्नाटकने कंबर कसून तयारी केल्याचे दिसत आहे.सीमा आंदोलनातले एक शहर ही बेळगावची अोळख पुसून एक मोठे आणि विकसित शहर बनवून तिथे कन्नडिगांना बहुसंख्येने वसवून सीमाभागात मराठीभाषिकांना अल्पसंख्यक करणे हा उद्देश दिसतो आहे.मुंबईसारख्या मराठीभाषिक महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीबाबत अौदासीन्य असणारा मराठी माणूस दक्षिणेत सीमाभागात मात्र मराठीसाठी दमदारपणे आजही खिंड लढवत आहे.बेळगाव वेगाने मोठे आहे पण त्यावर भाषिक सत्ता कोणाची राहणार की असेच द्वंद्वयुद्ध सुरु राहणार हे येणारा काळच ठरवेल.

काळ्या दिनाची बातमी
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6188&tblId=6188

हा एक वेगळाच इश्यु
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6202&tblId=6202

बेळगावात भुमिगत गॅस लाईन.अद्याप शेजारच्या कोल्हापूरात किंवा सांगलीतही हे झालेले नाही.
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6296&tblId=6296

सीमाभागात कन्नडची सक्ती
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6334&tblId=6334

बँक कर्मचार्‍यांना कन्नडची सक्ती
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6417&tblId=6417

कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरण.
कर्नाटकात मराठा समाजाची लोकसंख्या भरपूर आहे.
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6468&tblId=6468

कर्नाटकात मराठा प्राधिकरणाला कन्नडिगांचा विरोध
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6490&tblId=6490

सीमाभाग महाराष्ट्रात आणू - अजित पवार
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6508&tblId=6508

अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6514&tblId=6514

मराठा प्राधिकरणाला विरोध दर्शवण्यासाठी ५ डिसेंबरला कर्नाटक बंद
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6515&tblId=6515

बेळगावात १०० एकर जागेत मेगा डेअरी
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6525&tblId=6525

बेळगाव जिल्हा विभाजनाची मागणी
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6550&tblId=6550

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

20 Nov 2020 - 9:28 pm | Rajesh188

जीवनमान उंचावेल अशी बेळगाव ची स्थिती असेल आणि मराठी भाषिक लोकांना कोणत्याच दूजा भावला सामना करावा लागत नसेल.
तर
बेळगाव मधील मराठी लोकांनी कर्नाटकात मध्ये मिसळून जावं.
तो पण भारताचाच हिस्सा आहे.
असे पण industrialization मुळे अनेक शहरातील भाषिक गणित बिघडत आहेत.
मुंबई त्याचे उदाहरण आहेच,बंगलोर पण त्याच मार्गावर आहे.
मुंबई मध्ये मराठी लोक कमी आहेत म्हणून ती महाराष्ट्रात नसावी.
ह्या प्रकारचा विचार बळावला तर देशभर च गोंधळ निर्माण होईल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Nov 2020 - 10:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बेळगावात किर्लोस्कर रोड आहे, टिळकवाडी आहे, पंचवटी सोन्या मारूती देवालय आहे, साठे कॉलोनी,रानडे कॉलोनी आहे. वडापाव, मिसळपावाची दुकाने आहेत, दुकानावरील अनेक फलक मराठित आहेत. असे वातावरण मुंबईतल्या कोणत्या उपनगरातही नाही. तेव्हा बेळगावची ओळख पुसुन टाकली वगैरे शुद्ध कांगावा आहे.
कर्नाटकात भाजपा सत्तेवर आहे त्यामुळे तेथील स्थानिकाना डिवचायचे व पोळी भाजून घ्यायची हा बारामतीकरांचा जुना डाव. अगदी १९८६ साली छगन भुजबळ/शरद पवारानी स्व्तःला अटक करुन घेतली तेव्हापासुन.
जून १९८६ मध्ये पवारानी आंदोलन केले व डिसेंबर १९८६ मध्ये पवार कॉन्ग्रेस्मध्ये प्रवेश करते झाले.
https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19860630-belgaum-bor...

https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19861231-sharad-pawa...

कंजूस's picture

21 Nov 2020 - 5:03 am | कंजूस

करायचे काहीच नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Nov 2020 - 7:27 am | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे तर हा बेळगाव ही समस्या नाहीच. तेथील बिगर-राजकीय मराठी स्थानिक ह्या कथित समस्येला हसण्यावारी नेतात. १९८०च्य दशकात जन्मलेल्या तेथील मराठी पिढीने मराठी बरोबर कन्नडही सहज आत्मसात केले. तेथील मराठी/कन्नडिगा स्थानिक मराठी/कन्नड्/हिंदी लिलया बोलतात.
मुंबई-पुण्यात स्थायिक झालेल्या बेळगावच्या मराठी लोकाना विचारा.. दक्षिण महारास्।ट्रातल्या मराठी राजकीय नेत्यांनी स्वतःच्या पोटासाठी निर्माण केलेली ही समस्या आहे.

पाषाणभेद's picture

21 Nov 2020 - 11:04 am | पाषाणभेद

कानडी जितके भाषाभिमानी आहेत तितके मराठी अन मराठी पुढारी नाहीत.

अगदी ऑनलाईन मध्ये तज्ञ असलेले मराठी, "आम्हाला त्रास होत नाही ना! मग सीमाभाग कुठे का असेना काय फरक पडतो", असली मानसीकता घेऊन असतात.

भाषिक संघर्ष ज्या साहित्यिकांच्या माध्यमातून सुरू झाला त्या साहित्यिकांची नवी पिढी संमेलनात केवळ ठराव करते झाले आहे.

गेल्या चार पिढ्या भाषेची अस्मिता घेऊन लढते आहे ते काहीच नाही.

कानडी टक्का तेथे वाढला की मग लोकशाही पद्धतीने मतदान घेतले तर दान कोणाच्या पदरात पडेल ते सांगायला नको.

आपल्याकडे हा प्रश्न सोडवायची राजकीय इच्छा नाही. केवळ सत्तेचे राजकारण चालते आहे. हा प्रश्न सामाजिक पातळीवर सोडवला जावा.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Nov 2020 - 11:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"अगदी ऑनलाईन मध्ये तज्ञ असलेले मराठी, "आम्हाला त्रास होत नाही ना! मग सीमाभाग कुठे का असेना काय फरक पडतो", असली मानसीकता घेऊन असतात."
असे काही नाही रे पाषाणा. आम्ही तेथे १०/१२ वेळा गेलो आहोत. स्थानिक मराठी लोकांशी बोलणेही झाले आहे. शहरातील अनेकांचे मत "आम्हाला काहीच फरक पडत नाही. " असे होते. अनेक मराठी स्थानिक लोक कन्नड शिकतात(त्याचप्रमाणे तेथेल अनेक कन्न्ड लोक मराठीही बोलतात). अन्याय वगैरे असता तर लोक ईतकी वर्शे राहिले असते का तेथे? कन्नड म्हणजे काही चीनी/जपानी नाही. अनेक वर्षे राहुन तेथील लोक अस्खलीत मराठी बोलतात.
सुधा मूर्तींची ही मराठीतील मुलाखत पहा- https://www.youtube.com/watch?v=GdWKzUVY0Rs
ह्यांचा जन्म कोल्हापूरचा. फक्त ५/६ वर्शे त्या तेथे होत्या पण जेवढे मराठी कानावर पडले त्या शिकल्या. नंतर हुबळीत शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने पुण्यात. पुण्यात असताना त्यानी मराठी नाटके पाहिली,पु.लंची/अनेकांची व्याख्याने ऐकली.नंतर बेंगळूरमध्ये आल्यावर कन्नडमध्ये लिखाण चालु केले. "कन्नडमध्ये लिखाण करत असले तरी तरूणपणी कानावर पडत असलेल्या पुणेरी मराठीचा प्रभाव अधुन मधुन पडतो.. हे ही त्या सांगतात. सांगायचा मुद्दा- कुरकुर न करता आजुबाजुच्या परिस्थितीशी जुळवुन घ्यायचे व पुढे जायचे हे आपण मराठी लोकानी त्यांच्याकडुन शिकण्यासारखे आहे.

चलत मुसाफिर's picture

22 Nov 2020 - 9:58 am | चलत मुसाफिर

या निमित्ताने पुन्हा वर काढत आहोत
-----
शंका: बेळगाव महाराष्ट्रातच हवे ही मागणी नक्की कशासाठी?

https://misalpav.com/node/30120

यसवायजी's picture

22 Nov 2020 - 8:27 pm | यसवायजी

F

उपयोजक's picture

22 Nov 2020 - 11:47 pm | उपयोजक

म्हणजे फॉलोईंग?
F लिहिल्यावर नोटीफिकेशन येतं? कुठे येतं? मेलवर?

यसवायजी's picture

23 Nov 2020 - 12:07 am | यसवायजी

होय, फोलॉइंग.
notification येत नाही.
1-2 महिन्यांनी कधीतरी एखादी चक्कर मारल्यावर आपण प्रतिसाद दिलेला धागा शोधता येतो त्यासाठी कमेंट केली आहे. (नवे लेखन - माझ्या प्रतिक्रिया)

त्यापेक्षा वाचनखूण साठवा की!!

यसवायजी's picture

23 Nov 2020 - 1:18 pm | यसवायजी

एका F साठी किती प्रतिसाद टायपायचे :D
असो.
वाचनखूण साठवली तर आपल्या प्रतिक्रिया (आणि त्यावरच्या प्रतिक्रिया) परत शोधाव्या लागतात. मी वर सांगितलेला ऑप्शन वापरल्यास थेट आपल्या प्रतिक्रियेला जाता येते.
हुश्श.

अनिरुद्ध.वैद्य's picture

24 Nov 2020 - 9:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

वाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे कळेना! ईंदुर भोपाळ रायपुर बडोदा सगळीकडे मराठी लोक व्यवस्थीत राहताय. इकडे काय इश्यु आहे?

उपयोजक's picture

26 Nov 2020 - 6:35 pm | उपयोजक

आपल्या महाराष्ट्राचा जवळपास ३ हजार चौरस मैलाचा भूभाग महाजन आयोगाने अन्यायीपणाने कर्नाटकला दिलाय.हा भाग महाराष्ट्रात असेल तर या भागातून मिळणारा महसूल महाराष्ट्राच्या खात्यात जमा होईल.महाराष्ट्राचे उत्पन्न वाढेल.हा फायदा आहे महाराष्ट्राचा.म्हणून मराठीवादी नेते लढतायत सीमाभागासाठी.

महाराष्ट्र चे प्रेमाचे संबंध हे सर्व साऊथ भारतीय राज्याशी असणे भवितव्य साठी खूप गरजेचे आहे.
बेळगाव मध्ये मराठी लोक सुखात आहे त्याचा इश्यू करायची गरज नाही.
आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या दोन्ही राज्यांना पुढे उत्तरेतील राज्याच्या दादागिरी चा सामना करायचंय ..
राज ठाकरे नी तसे प्रयत्न केले होत जय ललिता आणि बाकी नेत्या शी संबंध वाढवायचा प्रयत्न करून .
तेच शहाणपण बाकी मराठी नेत्या मध्ये यावे .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Nov 2020 - 11:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

दक्षिणेतले अनेक लोक मराठी लोकाना "उत्तर भारतीयांमध्येच' धरतात रे राजेशा. दादागिरीचा सामना वगैरे फक्त बोलायच्या गोष्टी. महाराष्ट्रातुन ४८ व तामिळनाडूतुन ३९ खासदार संसदेत जातात. ब्रिटिशानी उभ्या केलेल्या पायाभूत सुविधा आपल्या राज्याच्या नावावर ख्पवायची सवय प्रगत राज्याना आहे. उ,दा. मुंबई. शहराची कल्पना, बंदराचा विकास वगैरे हे सगळे ब्रिटिशांचे पण "मुंबईवर पहिला हक्क आमचा" असे शिवसेनावाले/मनसे म्हणणार.

मराठी_माणूस's picture

25 Nov 2020 - 10:40 am | मराठी_माणूस

हो. हिंदी चित्रपटात मुंबई दाखवण्यासाठी हमखास सीएसटी स्टेशन दाखवातात.

प्रगत राज्यांचा दबाव गट निर्माण होणे आवशक्याच आहे.
उत्तरेची सर्व राज्य एक होवून migration बाबंत दबाव आणतात.
केंद्रीय फंडा बाबत दबाव आणतात,हिंदी बाबत दबाव आणतात.
तेव्हा महाराष्ट्र नी दक्षिण मधील राज्य शी शक्य होईल तेवढे मतभेद टाळून त्यांच्या मध्ये सामील होणे गरजेचे आहे.
मी तर ह्याच्या पुढे जावून असे म्हणेन तमिळ,कन्नड,तेलगू,आणि मराठी ह्या भाषा ह्या राज्यात 2 वर्ष तरी शिकवल्या जाव्यात.
जुजबी माहिती तरी भाषेची असावी.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Nov 2020 - 8:01 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कोणी दबाव आणला रे राजेशा हिंदीबाबत? काही पुरावे? हिंदीला कितीही नाके मुरडली तरी देवाण-घेवाणीसाठी काही भाषा हवी की नको? आणी बाकीच्या राज्यांना दबाव आणण्यासाठी कोणी अड्वलय?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Nov 2020 - 8:38 pm | अमरेंद्र बाहुबली

बरोबर. पण प्रत्येक राज्यात भाषा आहे ना?? आणी ईंग्रजी देखील आहे. मग हिंदीच का लादावी?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Nov 2020 - 9:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मग कोणती भाषा असावी? इंग्रजी किती जण बोलतात? एकूण लोकसंख्येच्या ५/१०%? महाराश्ट्रातले बिल्डर्स जेव्हा बंगाली/बिहारी तरूणाना कामाला येथे बोलावतात, तेव्हा त्याना मराठीचे/इंग्रजीचे प्रशिक्षण द्यावे काय? मराठी व्यावसायिकाचा माल मदुराईत कोणाला हवा असेल, आणी इंग्रजी तेथील ग्राहकाना येत नसेल तर त्या मराठी व्यवसायिकाने तामिळ शिकावे काय?
भाषा लादता येत नाही हे सीमा प्रश्नावरून सिद्ध झालेच ना? बेळगावात शाळात कन्नड शिकवली जाते पण अनेक पिढ्या तेथे राहुन मराठे बोलतातच्/लिहितातच.

उपयोजक's picture

25 Nov 2020 - 10:12 pm | उपयोजक

महाराश्ट्रातले बिल्डर्स जेव्हा बंगाली/बिहारी तरूणाना कामाला येथे बोलावतात, तेव्हा त्याना मराठीचे/इंग्रजीचे प्रशिक्षण द्यावे काय?

द्यावे की.कामचलाऊ मराठी शिकवायला काय हरकत आहे?

तमिळनाडूतले बिल्डर्स जेव्हा युपि/बिहारी तरूणाना कामाला तमिळनाडूत बोलावतात तेव्हा काय करतात?

मराठी व्यावसायिकाचा माल मदुराईत कोणाला हवा असेल, आणी इंग्रजी तेथील ग्राहकाना येत नसेल तर त्या मराठी व्यवसायिकाने तामिळ शिकावे काय?

विकणार्‍याने थोडे तमिळ आणि डिस्ट्रिब्युटरशिप हवी असणार्‍याने थोडी मराठी शिकायला काय हरकत आहे? धंदा वाढवायचा तर ज‍ादा भाषा येणं फायद्याचं आहे ना? अन्यथा कामचलाऊ इंग्रजी चालेल की!

उपयोजक's picture

25 Nov 2020 - 9:08 pm | उपयोजक

देवाण-घेवाणीसाठी काही भाषा हवी की नको?

कसली देवाणघेवाण?
१) व्यापारविषयक संवाद करायचा असेल तर इंग्रजी चालेल की.किंवा पैशाला जगात अनन्यसाधारण महत्व असल्याने दोन्ही पार्ट्या कामचलाऊ का असेना पण एकमेकांच्या भाषा शिकतील की! संपर्कासाठी फक्त हिंदीच चालणार असं कुठंय?
२) एकदा विविधतेत एकता मान्य केल्यावर हिंदीची जबरदस्ती केंद्राकडून का बरं होते?

उपयोजक's picture

25 Nov 2020 - 9:11 pm | उपयोजक

माझे तमिळ मित्र तर या हिंदीच्या जबरदस्तीला कडाडून विरोध करतात.(हिंदीला नव्हे.तिच्या जबरदस्तीला!)
मी तर त्यांना उपाय सुचवलाय की महाराष्ट्रासहित पाचही दक्षिण भारतीयांनी एकत्र येऊन एक सामाईक भाषा बनवावी आणि हिंदीला आव्हान द्यावे. :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Nov 2020 - 9:29 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

भाषा बनवावी? अशी ठरवुन भाषा बनवता येते का?
मराठी माणूस जेव्हा महाराष्ट्राबाहेर कामाला जातो, समजा बंगालला किंवा दिल्लिला, हिंदी येते म्हणूनच नोकरी/व्यवसाय करू शकतो ना? की मराठी माणूस बंगाली/गुजराती शिकुन बंगाल्/गुजरातला जातो?

संस्कृत राष्ट्रीय भाषा(किन्वा कमीत कमी व्यवहारात वापरायची भाषा) असावी का? कुठलाही राजकिय विचार बाजूला ठेऊन विचार करा.. तस झाल तर दक्षिणेतल्या राज्यान्चा पण टोकाचा विरोध( राजकिय सोडून) होणार नाही..प्रत्येक मुख्य भाषा संस्कृत प्रचूर असल्याने व्यवहारात एकदम शिकायला, वापरायला वेळ लागला तरी भाषिक भिन्ति कमी होतील...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Nov 2020 - 11:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ईतकी वर्शे हिंदी आहे. मुंबईत ती तर व्यवहाराची भाषा झाली आहे. पण असे असले तरी मुंबईचे लोक मराठी विसरले का? नागपूरचे मराठी लोक मराठीत लिखाण करतातच ना? सर्वात जास्त भाषिक पुस्तके/कादंबर्या ह्यात देशात मराठी पहिल्या तीन्/चार भाषात येते. साहित्य जत्रा/सम्मेलने ह्यात मराठीचा हात कोण धरणार?
मग हिंदीबद्दल एवढी भीती का? हिंग्लिशला मात्र आमचा विरोध आहे. ह्यात धड हिंदीही नाही आणी इंग्रजीही नाही.

उपयोजक's picture

26 Nov 2020 - 12:15 am | उपयोजक

मुंबईच्या व्यवहाराची भाषा हिंदी आहे यात कौतुकानं सांगण्यासारखं काय आहे? मुंबई उत्तरभारतात आहे का? मुंबई ज्या महाराष्ट्रात आहे त्या महाराष्ट्राची राज्यभाषा हीच मुंबईची व्यवहाराची भाषा व्हायला काय हरकत आहे? काय प्रॉब्लेम आहे मुंबईतल्या परप्रांतीयांना मराठी शिकायला? मराठी ही इतकी अवघड आहे शिकायला?

गोंदिया हा जिल्हा जवळपास हिंदीभाषिच झाला आहे.

उत्तरभारतातल्या काही राज्यांची भाषा ही सगळ्या देशाची भाषा कशी काय म्हणे?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Nov 2020 - 12:27 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"मुंबई ज्या महाराष्ट्रात आहे त्या महाराष्ट्राची राज्यभाषा हीच मुंबईची व्यवहाराची भाषा व्हायला काय हरकत आहे? मराठी ही इतकी अवघड आहे शिकायला?"
मुंबईत मराठी माणूस मराठीच बोलतो. गुजराती/मारवाडी दुकान्दार अनेक्वेळा मराठिच बोलताना दिसतात.
"काय प्रॉब्लेम आहे मुंबईतल्या परप्रांतीयांना मराठी शिकायला?"
एखाद्याने आपली भाषा शिकावी असे वाटत असेल तर त्याला शिकवायचा प्रयत्न का करू नये?
बाकी अमिताभ बच्चन,गुलजार्,जावेद अख्तर धर्मेण्द्र,रतन टाटा,आदी गोदरेज्,कुमारमंगलम बिर्ला,आनंद महिंद्रा,ऐश्वर्या राय,शहारूख हे ४०-५० वर्षे महाराष्ट्रात राहुन किती मराठी शिकले? कोपर्यावरच्या भेळपुरीवाल्याला किंवा रिक्षावाल्याला मराठी शिकवण्याआधी ह्या मंडळींपासुन सुरुवात करूया. काय बोलता?

उपयोजक's picture

26 Nov 2020 - 12:32 am | उपयोजक

चालतंय की. मुंबईतल्या सगळ्या अमराठी लोकांना मराठी शिकवावं.त्यांनीही ती मनापासून शिकावी.

उपयोजक's picture

26 Nov 2020 - 12:03 am | उपयोजक

प्रत्येक मुख्य भाषा संस्कृत प्रचूर असल्याने

१) दक्षिणेच्या चारही भाषा संस्कृतोद्भव नाहीत.तमिळांनी ठरवलं तर ते एकही संस्कृतोद्भव शब्द न वापरता देखील रोजचे संभाषण करु शकतील इतकी बेसिक शब्दसंपदा तमिळमधे नक्कीच आहे.शिवाय कितीतरी तमिळांचा संस्कृतला विरोध आहे.तमिळमधे वापरले जाणारे संस्कृतोद्भव शब्द हाकलायचे त्यांचे प्रयत्न सुरु असतात.
२) सर्वांना सहज जमेल इतकी संस्कृत सोपी आहे का?

उपयोजक's picture

25 Nov 2020 - 10:18 pm | उपयोजक

भाषा बनवावी? अशी ठरवुन भाषा बनवता येते का?

का येऊ नये? पाचही राज्यभाषांमधले सामाईक शब्द निवडून आणि काही नवीन शब्द घालून बनवता यायला काय हरकत आहे?

मराठी माणूस जेव्हा महाराष्ट्राबाहेर कामाला जातो, समजा बंगालला किंवा दिल्लिला, हिंदी येते म्हणूनच नोकरी/व्यवसाय करू शकतो ना? की मराठी माणूस बंगाली/गुजराती शिकुन बंगाल्/गुजरातला जातो?

म्हणजे दक्षिण भारतातले लोक बागाल/गुजरातमधे नोकरीला जातात ते हिंदी शिकून मगच बंगालमधे/गुजरातमधे नोकरीला जातात?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Nov 2020 - 10:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"म्हणजे दक्षिण भारतातले लोक बागाल/गुजरातमधे नोकरीला जातात ते हिंदी शिकून मगच बंगालमधे/गुजरातमधे नोकरीला जातात?"
तशी अडचण होउ नये म्हणून तर हिंदी आहे. शिवाय जबरदस्ती कोणीच करत नाही. गुजरात्मधिल गुजराती व्यापारी जर तामिळ शिकायला तयार असतील तर हरकत नाही. तसेच गुजरातला जाणारे तामिळ लोक गुजराती शिकायला तयार असतील तरीही हरकत नाही.
तामिळ लोकांचा हिंदी विरोध हा "तामिळ भाषा सर्वात जुनी. तुम्ही कोण आम्हाला शिकवणार?"ह्या भावनेतून आलेला आहे. शिवाय आर्य-द्रविड थियरीही आहे.
अनेक मराठी लोकांचा हिंदी विरोध हा उ.प्र.बिहारी लोक राज्यात येउन स्थानिक नोकर्या करतात म्हणून आहे.

उपयोजक's picture

26 Nov 2020 - 12:26 am | उपयोजक

१) शिवकाशीतल्या फटाका व्यापार्‍यांना आणि छपाई उद्योग चालवणार्‍या बर्‍याच उद्योजकांना हिंदी बोलता येतं.देशभर बिझनेस करतात ते.धंदा वाढवायचा असेल तर कामचलाऊ का होईना हिंदी आलीच पाहिजे हे व्यावसायिक गणित त्यांनाही चुकलेलं नाही.

२)आर्य - द्रविड थेअरीतून विरोध होत असला तरी तो पूर्ण तमिळनाडूचा विचार नाही.आता हळूहळू परिस्थिती बदलतेय.हिंदी बोलता आली तर आपल्याला करिअरमधे फायदा होऊ शकतो हे आता बर्‍याच तमिळांना उमजू लागलंय.राष्ट्रभाषा प्रचार समितीमार्फत हिंदी शिकण्याचं प्रमाण आताशा तमिळनाडूत वाढू लागलंय.तमिळांचा विरोध हिंदीला नाहीये तर शाळेतून त्रिभाषासूत्रीमार्फत जबरदस्तीने हिंदी शिकवण्याला आहे. आर्य - द्रविड थेअरीचा वापर हा द्रमुकसारखा हिंदूद्वेष्टा पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे करत असतात.

प.बंगालमधेही शाळेत हिंदी शिकवत नाहीत.तिथेही हिंदीच्या सक्तीला पूर्वीपासूनच विरोध आहे.

महाराष्ट्र सहित दक्षिण भारतीय राज्यांनी आपसात असणारे सर्व प्रश्न शांतेत सोडवावेत.
मग तो बेळगाव प्रश्न असेल, खोऱ्या मधील पाण्याचा प्रश्न असेल.
भाषा सर्व राज्यांची वेगळी आहे त्या वर मात
करावी.
आता महाराष्ट्र उत्तरेच्या राज्यातील राजकारणात स्वतः ला व्यस्त करून घेत आहे ते राज्याच्या हिताचे नाही.
हेच मला सांगायचे आहे.

सुखीमाणूस's picture

26 Nov 2020 - 10:40 am | सुखीमाणूस

हिन्दी चा दुस्वास करणार्यानी आणि दक्षिणेला जवळ करा म्हणणार्यानी विचार केला आहे का?
हिन्दी भाषा देवनागरी लिपी वापरते आणि मराठी पण. उर्दुभाषिक पण हिन्दी समजु शकतात कारण बरेच शब्द सारखे आहेत.
दक्षिणेकडची बन्गलोर व हैदराबाद ही शहरे बहुभाषिक झाली आहेत.
शाळेत मुलाना इन्ग्लिश, हिन्दी व त्या राज्याची बोलली जाणारी प्रमाणित भाषा अवश्य शिकवली पाहिजे.लहान वयात भाषा शिकणे सोपे असते त्यामुळे शालेय स्तरावर पुर्ण भारतभर हिन्दी शिकवणे योग्य राहील.त्यामुळे निदान दक्षिणेतली पुढची पिढी तरी हिन्दी द्वेश करणार नाही.
मुळात हिन्दी शिकायला लागणे ही सक्ती न समजता सन्धी समजली तर विरोध कमी होइल. दिल्ली काबीज करायची तर तिथली भाषा आली पहिजे.
दक्षिणेचे लान्गुलचालन करण्यापेक्शा हिन्दी भाषा व तिथली लोक यान्च्यावर प्रभाव पाडणे हा राष्ट्रावर सत्ता स्थापित करण्याचा जास्त सोपा मार्ग आहे. (उगीच का बिहार मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवार उभी करुन आली)
शासकीय मराठी समजायला अवघड असते. भाषा दर मैलावर बदलते असे म्हणतात. प्रमाणित मराठीचा आग्रह धरला तर ग्रामीण जनता बाजुला पडते आणि अशुध्द मराठी कामकाजासाठी वापरणे योग्य नाही. भाषा सम्पते आहे म्हणुन काळजी करणे आणि एकदा बेळगाव मध्ये कानडी वस्ती वाढते आहे मराठी टक्का कमी होतो आहे असे म्हणुन नन्तर साउथ बरोबर नवीन भाषा तयार करुन मराठी पुर्णपणे सम्पवण्याचा विचार मान्डणे योग्य नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Nov 2020 - 11:18 am | माईसाहेब कुरसूंदीकर

अतिशय योग्य लिहिलेस रे सुखी माणसा. खरे तर ह्या मंडळीचा भाषेला विरोध नाहीच आहे. ईतर राज्यातील लोक आपल्या राज्यात येतात व नोकरी धंदे करतात हे खरे दुखणे आहे. भाषेला विरोध हे केवळ दाखवायचे कारण आहे.
आनंद महिंद्रा/रतन टाटा ह्यांना मराठी/तामिळ शिकण्याचा आग्रह मनसे/द्रमुक वगैरे करतील? नाही करणार. पुण्यात/चेन्नईत ह्यांना टाटा/महिंद्राने केलेली गुण्तवणूक पाहिजे आहे पण तिकडे चाकरी करायला मात्र आमचे स्थानिक लोक हवेत. हा दुटप्पीपणा आहे.
भाषेवर खरे प्रेम असेल तर "आमच्या राज्यात येणार्या गुण्तवणुक्दारानादेखिल आमची भाषा आली पाहिजे" अशी मागणी केली पाहिजे ह्यानी.

शा वि कु's picture

26 Nov 2020 - 11:26 am | शा वि कु

.

Rajesh188's picture

26 Nov 2020 - 1:46 pm | Rajesh188

गुंतवणूक ही फक्त भारतीय उद्योग पती करत नाहीत.
आणि गुंतवणूक ही समाजसेवा नक्कीच नाही ज्या राज्यात उद्योग स्थापित करून त्यांना रिटर्न मिळण्याची शक्यता असते त्याच राज्यात गुंतवणूक केली जाते.
उद्योग पती चा लोकांशी संबंध येत नाही त्या मुळे त्यांची भाषा कोणती ह्याला अर्थ नाही .
South ची राज्य,आणि महाराष्ट्र मध्ये उद्योग आहेत तर त्याचा अर्थ हा आहे ही राज्य गुंतवणूक करण्यास योग्य आहेत.
मग अशा गुंतवणूक करण्यास योग्य,राज्यांनी स्वतः च्या लोकांच्या कल्याणासाठी काही अटी ठेवल्या (भाषा हीच असावी अशा,किंवा ह्याच भाषेची लोक कामगार असावीत) तर त्या मध्ये काही वावग नाही.
महाराष्ट्र सहित दक्षिण भारत ह्यांची युती होणे हे अत्यंत गरजेचे आहे.
त्या बेळगाव मुद्धा कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या दोन्ही राज्यांनी जास्त ताणता कामाचा नाहीं

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Nov 2020 - 3:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"उद्योग पती चा लोकांशी संबंध येत नाही त्या मुळे त्यांची भाषा कोणती ह्याला अर्थ नाही ."
ह्या वाक्यावर हे एवढे जोरजोरात हसले की ठ्सका लागला. असो.
"South ची राज्य,आणि महाराष्ट्र मध्ये उद्योग आहेत तर त्याचा अर्थ हा आहे ही राज्य गुंतवणूक करण्यास योग्य आहेत."
ह्याच तालावर,
मुंबईत गुजराती लोक व्यापारात आहेत ह्याचा अर्थ हे लोक व्यापार करण्यास योग्य आहेत.
फेरीवाले,किरकोळ विक्रेते उत्तर भारतिय आहेत ह्याचा अर्थ हे लोक ते काम करण्यास योग्य आहेत. मग प्रॉब्लेम कुठे आहे?
गुंतवणूक समाजसेवा नाही तर मग उद्योगपतीना "अमूक भाषेचेच कामगार कामावर घ्या" हे सांगणे म्हणजे समाजसेवा करा/स्थानिक लोकांवर उपकार करा सांगण्यासारखे झाले ना? घटनेने प्रत्येक नागरिकाला कोठेही नोकरी-व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Nov 2020 - 3:13 pm | अमरेंद्र बाहुबली

हिंदी ईतर भाषांसारखीच सामान्य भाषा असताना हिंदी शिका चा धोशा का?? ऊत्तर भारतीयांची बेसुमार मानवी पैदास ईतर राज्यांवर लादावी म्हणूनच ना??आणी हिंदी मुळे विकास होतो तर ऊत्तर प्रदेश बिहार तामिळनाडू, कर्नाटक पेक्शा मागास का??
ऊद्या नागालॅंड चा माणूस तमीळनाडूत गेला तर हिंदी येत नाही म्हणून त्याचं काम अडनार आहे का?? लोक कसंही करून व्यवहार करतातच. त्यासाठी हिंदी लादायची गरज नाही.
हिंदी ही भाषा ईतर राज्यांवर लादन्याचं कारन फक्त बेसुमार मानवी पैदासाची सोय करणे एवढंच आहे. त्यात देश, संवादमाध्यम असं काहीही नाहीये. महाराष्ट्रातील मराठी लोकानी शंभर टक्के मराठीचा वापर करावा. त्याने मराठी माणसाच्या मुलांचीच नोकरीची सोय होणार आहे. मुंबईत ही सक्तीने मराठी बोलावे. ज्याला मुंबईत पोट भरायचेय तो मराठी शिकेल. नाहीतर आपल्या राज्यात जाऊन कलमडेल.

देशबांधव म्हणून न सुधारनार्या आणी बेसुमार माणसे पैदा करानार्या ऊत्तर भारतीयांची सोय म्हणून आपली भाषा न बोलनार्या काही मराठी माणसांसारखी मुर्ख जमात ह्या जगात दुसरी नसेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Nov 2020 - 3:50 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बेसुमार लोकसण्ख्येस जबाबदार राज्ये कोणती ह्यावर माहिती काढली तर उत्तर-प्रदेश्,बिहार्,महाराष्ट्र,बंगाल आघाडीवर आहेत!! अगदी १९५१ पासून.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_states_in_India_by_past_population
मध्य प्रदेश्/राजस्थान ह्या आकाराने मोठी राज्ये असलेल्यांची लोकसंख्या महाराष्ट्रापे़षा कमी आहे!

उपयोजक's picture

26 Nov 2020 - 6:30 pm | उपयोजक

हिन्दी चा दुस्वास करणार्यानी आणि दक्षिणेला जवळ करा म्हणणार्यानी

हिंदीचा कोणी दुस्वास करत नाहीये.तिच्या जबरदस्तीने लादण्याला विरोध आहे.ज्यांना स्वत:हून हिंदी शिकायचं असेल त्यांच्या शिकण्याला विरोध नाही.पण त्रिभाषासूत्राची जबरदस्ती करुन सगळ्यांच्या गळ्यात जबरदस्तीने हिंदी का मारायची? उत्तरप्रदेशात तमिळ का शिकवत नाहीत त्रिभाषासूत्राचा वापर करुन? भारताव्यतिरिक्त चार देशांची तमिळ ही अधिकृत तर कितीतरी देशांची अनधिकृत भाषा आहे.शिकवतील का आता भय्यांच्या राज्यात तमिळ? तेलुगू ही देशातली दुसरी मोठी भाषा आहे.बिहारमधे त्रिभाषासूत्राचा वापर करुन तेलुगू शिकवतील का?

भारतभर हिन्दी शिकवणे योग्य राहील
एकदा विविधतेत एकता असे संविधानात मान्य केल्यावर ८ राज्यांची (उत्तराखंड/युपि/बिहार/छत्तीसगड/म.प्र/दिल्ली/हिमाचल प्रदेश/झारखंड) भाषा सगळ्या देशावर जबरदस्तीने शिकवण्याचं कारण काय?

दिल्ली काबीज करायची तर तिथली भाषा आली पहिजे.
परत तेच! अहो ज्यांना धंदा वाढवायचाय ते स्वत:हूनच या ना त्या मार्गाने हिंदी शिकतातच.ते लोक शाळेत हिंदी शिकवायची वाट बघत बसत नाहीत.विरोध हिंदीच्या सक्तीला आहे हिंदीला नव्हे.

साउथ बरोबर नवीन भाषा तयार करुन मराठी पुर्णपणे सम्पवण्याचा विचार मान्डणे योग्य नाही.
मग ज्यांना गरज नाही त्यांना जबरदस्तीने हिंदी शिकवणे,त्यांच्या माथी मारणे हे सुद्धा योग्य नाही.

आणि फायदा मात्र पूर्ण हवा.
लोकसंख्या नियंत्रण करायचे नाही पण ह्यांची ही बेसुमार वाढलेली लोकसंख्या दुसऱ्या राज्यांनी पोसायची एकतर स्वतःच्या राज्याच्या प्रगतीती ह्यांना सामावून घेवून
किंवा
देशाचा जो टॅक्स जमा होतो त्या मधील सर्वात मोठा हिस्सा ह्या नाकाम राज्यांना देवून .

टॅक्स जमा करणार 1 रुपया आणि केंद्रीय सरकार कडून ह्यांना दिले जातात 10 रुपये.
जी राज्यात अनागोंदी माजलेली आहे,कोणी व्यावसायिक तिथे गुंतवणूक करायला तयार नाही.
त्यांच्या च राज्यातील आयएएस,आयपीएस ह्यांना त्यांच्याच राज्यात पोस्टिंग नको आहे तर मुंबई,पुणे ,बंगलोर,चेन्नई हवं आहे.
त्यांच्याच राज्यातील डॉक्टर्स तिथेच व्यवसाय करू इच्छित नाहीत.
अशा राज्यांची भाषा हिंदी रोजगार ची भाषा
केवढा मोठा जोक.
आणि अशा मागास राज्यांची भाषा प्रगत राज्यांनी k

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Nov 2020 - 5:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सामना,नवाकाळ वाचायचे बंद कर रे राजेशा.
आळस झटकून मराठी तरूणानी कामाला लागले पाहिजे. आमच्या बारामतीकरांनीही हे अनेकवेळा अधोरेखीत केले आहे की मराठी तरूण कष्टाची कामे करायला नाक मुरडतो. असो.
आपला व अनेकांचा हिंदीला विरोध नसून तेथील लोक येथे येण्यास विरोध आहे हे स्पष्ट झाले. भाषा विरोध फक्त दाखवण्यासाठी.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Nov 2020 - 7:25 pm | अमरेंद्र बाहुबली

माईसाहेब, ऊत्तर भारतीय मेहनती आहेत तर आपल्या राज्यात कलमडावे ना?? आळशी महाराष्ट्रात गरज काय त्यांची?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Nov 2020 - 8:43 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ब्रिटिशांनी जी काही थोडी शहरे विकसीत केली त्यात मुंबई होते. खालोखाल पुणे. रेल्वे/बंदर्/मुख्य अर्थसंस्था/शेयर बाजार ह्यात हातभार लागला तो ब्रिटिशांबरोबर पारशी व गुजराती धनिकांचा. नंतर आले बॉलिवूड. ह्यात सुरुवातीला मराठी होते नंतर प्रामुख्याने पंजाबी हिंदू व मुस्लिम.
तेव्हा मुंबईच्या व महाराष्ट्राच्या जडणघडणीत का काय म्हणतात त्यात मराठी लोकांबरोबर हे 'ईतर बाकीच्यांचाही वाटा आहे.
प्रत्येक राज्यात आळशी आहेत व कामसू आहेत.
"ऊत्तर भारतीय मेहनती आहेत तर आपल्या राज्यात कलमडावे ना?? आळशी महाराष्ट्रात गरज काय त्यांची?"
गरज नसेल तर आपसूक जातीलच. पण त्याना करोनाच्या काळात चार्टड फ्लाईटने पुन्हा बोलवावे लागले ह्यातच आळशी लोक कोण हे अधोरेखीत झाले.
https://indianexpress.com/article/business/economy/economy-re-opening-fi...
Skilled labourers like carpenters and benders are mostly fro West Bengal

https://timesofindia.indiatimes.com/city/mangaluru/builders-in-mangaluru...
some real-estate firms have approached them to operate chartered trains to Bihar to fetch these workers
https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/bengaluru-unlocked-to...
एक काम करा- कुशल सुतार/गवंडी/प्लंबर्स कोणत्या राज्यांतून आणाल ? हा प्रश्न देशातल्या मोठ्या बिल्डर्सना/फर्निचर,ईतर सामुग्री बनवणार्या व्यावसायिकाना विचारा.. मग उत्तर मिळेल.आळशी कोण व कामसू कोण ते..

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Nov 2020 - 10:06 pm | अमरेंद्र बाहुबली

कुशल सुतार/गवंडी/प्लंबर्स कोणत्या राज्यांतून आणाल ? >>>
का महाराष्ट्रातील मराठी सुतार/गवंडी मेलेत का?? पाहीजे तितके दाखवतो. ऊत्तर भारतीय कमी पैशात राबतात म्हणून त्याना बिल्डर्स प्राधान्य देतात. कमी पैशात का राबतात तर बेसुमार मानवी पैदाशी मुळे त्यांच्या राज्यात कामे मिळत नाही. त्यांच्या राज्यात प्रशासन आणी कायद्याचे अतिशय व्यवस्थीत पालन होत असल्याने बायका किती सुरक्शीत असतात हे माहीतीय. ह्या सर्वांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात कमी पैशात राबायचे.
आता त्यांच्या राज्यात बेसुमार पैदास आहे म्हणून मराठी माणसाने कमी पैशात काम करावे असं म्हणा.

उपयोजक's picture

27 Nov 2020 - 7:24 pm | उपयोजक

उगाच प्रतिसादाला उपप्रतिसाद रेटून दम नसलेली विधाने नकोत.

मराठी माणसाने भले इतिहासात असेना का पण पाऊण भारत आपल्या अधिपत्याखाली आणला होता.पार अफगाणिस्तानपर्यंत.भय्यांनी लढाया करुन कधी असा पराक्रम केलाय का? हमाली टाईपची कामं करायला देशभरातून बोलावलं जाणं हा काही पराक्रम नव्हे.स्वस्त मजूर इतकीच यांची लायकी. मजूर भय्ये जे काम करतात ते काही रॉकेट सायन्स नव्हे फक्त त्यांनाच जमायला.पण स्वत:च वाढवून ठेवलेली लोकसंख्या पोसायला हवी.ती जबाबदारी टाळता येणार नाही म्हणून हे लोक १५-१६ तास काम करतात.हे सगळं करताना यांचा विकास काय झाला? गेली अनेक वर्षे हे भय्ये ही मजूर कामे करतात.पण लॉकडाऊनदरम्यान चालत चालत उत्तरप्रदेशात जावं लागलं.१५-१६ तास काम करुन आत्तापर्यंत मिळालेल्या पैशांचं काय केलं म्हणे? पण अजूनही यांना पैशाचं नियोजन जमत नाहीये.यांना स्वत:ला काय उपयोग झाला यांच्या 'कष्टाळूपणाचा?'

मराठी माणसाने भाषा, साहित्य, कला अशा विविध विषयांमधे स्वकर्तृत्वाने प्रगती केलीय बरं का! (तुमचे ब्रिटीश आले नव्हते बरं का यासाठी.)
भय्यांनी अशी काय प्रगती केलीय सांगा बघू? यांचे सिनेमे म्हणजे चावटपणाचे नमुने असलेले कंबरेखालची करमणूक असलेले भोजपुरी सिनेमे.ज्याला कलात्मक दर्जा अभावानेच असतो.
जिकडेतिकडे हिंदी पसरवत असतात.ज्या राज्यात जातील तिथली स्थानिक भाषा शिकणे तर सोडाच पण स्वत:च्याच भोजपुरी,ब्रज,मैथिली,अवधि अशा बोलींसाठी लढण्याऐवजी दिल्लीतली खड़ी बोली उर्फ हिंदी डोक्यावर घेऊन फिरु लागले.
मुसलमान आक्रमकांनी इतक्या अरबी,फार्सी,तुर्की शब्दांचा मारा केला,जबरदस्ती केली.महाराष्ट्रात शिवरायांनी या विरोधात राज्यव्यवहारकोश आणला,सावरकरांनी भाषाशुद्धी केली.भय्यांच्या राज्यात असं काही शुद्धीकरण घडलंय का? काही भाषाभिमानी आंदोलनं झालीयत का? हा यांचा मातृभाषेबद्दलचा अभिमान.
बहुतांश भय्ये आर्थिक दर्जा चांगला असणार्‍यांसाठी इमारती बांधणे, नंतर त्याच इमारतीसाठी वॉचमन , माळी ,लिफ्टमन , सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणे हेच करु शकतात.यापुढे जायला जी अक्कल लागते ती यांच्याकडे नसते.तस्मात हमालीचे कौतुक ते कितीसे?
यांच्यातलेच 'काही हुशार' नग (सगळे नव्हे) स्पर्धा परीक्षा वगैरे पास होतात.पण त्यातल्या कितीजणांनी स्वत:च्याच राज्याला सुधारण्यासाठी प्रयत्न केले? यांना शिक्षण,नोकर्‍या यांसाठी पंजाब ,गुजरात किंवा महाराष्ट्रासहित दक्षिण भारतच का लागतो म्हणे? तुम्ही म्हणता ब्रिटीशांनी केलेल्या सुधारणांच्या जीवावर मराठी माणूस बोलतो.मग युपि/बिहारमधे इंग्रज विकास करत नव्हते का? काहीच केलं नाही का इंग्रजांनी युपी/बिहारमधे? इंग्रजांचंच चुकलं.इंग्रजांनी कुटूंबनियोजनाचं महत्व जरी या भय्यांना पटवून सांगितलं असतं तरी भरपूर फायदा झाला असता देशाचा.

उपयोजक's picture

26 Nov 2020 - 6:31 pm | उपयोजक

नेमका प्रतिसाद!!!

उपयोजक's picture

26 Nov 2020 - 8:02 pm | उपयोजक

महाराष्ट्राचा कर्नाटकसोबतचा सीमावाद नक्की काय आहे.महाजन आयोगाने यात महाराष्ट्रावर कसा अन्याय केला आहे ते समजण्याच्या उद्देशाने हा जास्तीचा धागा.

http://www.misalpav.com/node/47914

मुंबई मध्ये दंगल होवू, बाँब ब्लास्ट होवू किंवा अतिरेकी हल्ला लोक दुसऱ्या दिवशी त्याच ओढी नी ऑफिस मध्ये,रोजगाराला जातात.
का मुंबई कर मोठे धाडसी आणि कामसू आहेत म्हणून?
तर नाही तर त्यांची पोट कामावर गेले नाही तर 1 चालणार नाही,नोकरी टिकणार नाही
ही खरी कारणे आहेत.
मराठी लोक आळशी नाहीत त्यांना संध्या जास्त असल्या मुळे बेसावध आहेत.
गरीब राज्यातील लोक कामसू नाहीत त्यांची मजबूरी आहे त्यांना पडेल ते काम करावेच लागते त्यांच्या राज्यात काहीच संध्या नाहीत.
साधी रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी सुद्धा दुसऱ्या राज्यात जावे लागते.
बिगारी काम सुद्धा त्यांना त्यांच्या राज्यात योग्य मोबदला देवू शकत नाहीत तिथे 50 रुपये मिळत असतील तर इथे 400 रुपये मिळतात .
त्या मुळे बिगारी काम करायला सुद्धा प्रगत राज्यात जण्या शिवाय पर्याय नाही.
बंगलोर प्रगत झाले आणि मुंबई मधील शेट्टी लोकांच्या हॉटेल मधील वेटर आता कानडी नाहीत छत्तीसगड ,बंगाल ची लोक आहेत ह्याचा अर्थ कानडी लोक आळशी आहेत असा होत नाही.
शीख लोक परदेशी जायला लागले आणि जो टॅक्सी उद्योग शीख लोकांच्या हातात होता तो up aani बिहारी कडे गेला म्हणजे शीख लोक आळशी आणि बिहारी कामसू असा होत नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Nov 2020 - 8:58 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सरसकट कोणालाच मी आळशी वगैरे म्हणत नाही पण "तुम्ही तुमच्या राज्यात जाव ते राज्य सुधारा" वगैरे जे कोणी म्हणतात ते अयोग्य आहे.
चेन्नईच्या तीन बिल्डर्सनी बिहारमधील १५० लोकाना परत आणण्यासाठी चार्टर्ड फ्लाईट पाठवली. तिप्पट पगार व विमान प्रवास.
https://timesofindia.indiatimes.com/india/3-times-more-pay-air-travel-ho...
काहीतरी आहे ना विशेष त्यांच्यात? की अजूनही "भय्ये भय्ये" म्हणून चिडवत बसणार त्याना?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Nov 2020 - 10:09 pm | अमरेंद्र बाहुबली

बेसुमार पैदास, जनावरांसारखं राबन्याची मजबूरी हे वैशिष्ट्यात मोडते का??

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Nov 2020 - 10:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पुन्हा तेच? महाराष्ट्र पण पैदाशीत १९५१ पासुन टॉप-३ मध्ये आहेच.
"जनावरांसारखं राबन्याची मजबूरी "
मग वापरावी ईतरानी आपली 'कुशाग्र बुद्धी' पणाला आणी करून दाखवावी दैदिप्यमान कामगिरी..
मराठी तरूणानी जागतिक स्तरावर नेलेली एखादी स्टार-टप ? जगाकडुन वाखाणले गेलेले अभियांत्रिकी काम?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Nov 2020 - 10:43 pm | अमरेंद्र बाहुबली

अच्छा म्हणजे जनावरांसारखे राबनारे ऊत्तर भारतीय टाॅपच्या स्टार्टअप चालवताहेत का?? की अभियांत्रीकी.
आणी राहीला प्रश्न मराठी लोकसंख्येचा तर लाॅकडाऊन वेळी परराज्यातून मराठी लोकांचे लटांबर नाही आले कुठें. पण ऊत्तर भारतीय किती कलमडले पाहीलं देशाने. महाराष्ट्र आपली लोकसंख्या पोसायला समर्थ आहे. ह्या जनावरांसारखं राबनार्यानी तिकडेच आपल्या राजेयात कलमडावे. मुंबई/महाराष्ट्रात रहायचं असेल तर मराठी शिका. नाहीतर आपली हिंदी घेऊन आपल्या दरीद्री राज्यात कलमडा.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Nov 2020 - 11:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"अच्छा म्हणजे जनावरांसारखे राबनारे ऊत्तर भारतीय टाॅपच्या स्टार्टअप चालवताहेत का?? की अभियांत्रीकी."
स्टारटप चालवन्यार्या लोकांची जरा यादी बघा.
शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक मिळालेल्यांची यादी बघा जरा. मराठी लोक अभावानेच आहेत.
म्हणजे बुद्धी असो वा 'जनावरासारखे कष्ट' आपण मराठी ना धड इथे ना तिथे.

Rajesh188's picture

26 Nov 2020 - 11:36 pm | Rajesh188

Startup साठी त्या महान उत्तर भारतीय लोकांनी कोणती राज्य निवडली आहेत ते पण सांगा.
त्यांना दुसऱ्या राज्यांची भूमी च का लागते उद्योग व्यवसाय साठी.
ह्याची कारणे पण सांगा.

Rajesh188's picture

26 Nov 2020 - 11:36 pm | Rajesh188

Startup साठी त्या महान उत्तर भारतीय लोकांनी कोणती राज्य निवडली आहेत ते पण सांगा.
त्यांना दुसऱ्या राज्यांची भूमी च का लागते उद्योग व्यवसाय साठी.
ह्याची कारणे पण सांगा.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Nov 2020 - 11:47 pm | अमरेंद्र बाहुबली

ईतके बुध्दीमान आणी कष्टाळू आहेत तरी त्यांचं राज्य दरिद्री का?? का “धड कशातही नसलेल्या मराठी लोकांच्या राज्यात कलमडतात?? स्वतच दरीद्री राज्य सुधारावे ना??

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Nov 2020 - 12:01 am | माईसाहेब कुरसूंदीकर

पुन्हा तेच. ब्रिटिशांनी वसवलेल्या व बनवलेल्या सुविधांवर उभे राहुन किती दिवस आपणच आपली पाठ थोपटायची?अमराठी उद्योगपतींच्या संपत्तीच्या कुबड्यांवर किती दिवस काढ्णार अजून?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Nov 2020 - 11:17 am | अमरेंद्र बाहुबली

ब्रिटीश जाऊन ७० वर्षे झाली. पुलाखालून बरंच पाणई वाहून गेलंय. अमराठी ऊद्योगपती महाराष्ट्रात का कलमडले?? स्वतच्या दरीद्री राज्यात कलमडावे ना???

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Nov 2020 - 12:58 pm | अमरेंद्र बाहुबली

तुमचे “हे” ऊत्तर भारतीय आहेत का?? फार राबतात का?? ;)

अर्धवटराव's picture

9 Dec 2020 - 1:46 am | अर्धवटराव

मुंबई साहेबाने वसवली. गुज्जू, पारशी, मराठी (त्यात 'घाटी' सुद्धा आले) या सर्वांनी मिळुन मुंबईला मोठं केलं. उर्वरीत महाराष्ट्रात दुसरी मुंबई उभी करु शकला नाहि मराठी माणुस. उप-राजधानी आत्ताआत्ता पर्यंत बोंबलत होती. पुण्याला मुंबईच्या जवळकीचा फायदा मिळाला. कोकणचं कॅलिफॉर्नीया करायच्या फक्त बाता ऐकल्या. नाशीक सारखी काहि शहरं नाहि म्हणायला थोडी पुढारलीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Nov 2020 - 10:09 pm | अमरेंद्र बाहुबली

हेच म्हणतो

देशातील कोणत्याच प्रगत राज्यांना आता उत्तर भारतीय लोकांचे कष्ट नको आहे त्यांनी त्यांच्या कष्ट नी त्यांचीच राज्य सुधरावित.
राज्याचं काय प्रगत देशांना सुध्धा मागास देशातील लोक आता नकोशी झाली आहेत.
त्यांच्या देशाची सुरक्षा,आणि शांतता धोक्यात येते..
ह्याला कारण अप्रगत भाग मग ते राज्य असेल किंवा देश स्वतः विकास करत नाहीत आणि त्यांच्या चुकीच्या कारभार मुळे अमर्याद पलायन त्या भागातून होते आणि त्याचा त्रास सुव्यवस्थित असलेल्या देशांना किंवा राज्यांना होतो.
हे नाकारणे शहाणपणाचे नक्कीच नाही.
आता तरी उत्तरे मधील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण मध्ये आणावी
त्यांच्या राज्यांचा राज्य कारभार सुधारावा .
नाही तर एक दिवस सर्वच राज्यातून उघड विरोध होईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Nov 2020 - 11:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

१९५१ पासुन महाराष्ट्र टॉप-३ मध्ये आहे लोकसंख्येत.
"देशातील कोणत्याच प्रगत राज्यांना आता उत्तर भारतीय लोकांचे कष्ट नको आहे त्यांनी त्यांच्या कष्ट नी त्यांचीच राज्य सुधरावित."
हे तुझे मत की प्रगत राज्यांच्या मुख्य सचिवानी सांगितले रे राजेशा तुला?
दारिद्र्य सगळीकडेच आहे. मुंबई-पुण्याच्या बाहेर ते समजते.
A grocery shopkeeper in Jawhar tehsil of Thane district told that his customers can't afford grocery in kilos or in litres. "They can give only Rs. 5 or 10. Their entire grocery expenditure per week is not more than Rs. 50."
https://www.newsclick.in/poverty-rich-state

भागातलं अपवादात्मक उदाहरण आणि बहुतांश अत्यल्प उत्पन्न असणारे+भरमसाठ मुले असणारे भय्ये हे दोन्ही एकाच तराजूत तोलू नयेत.

सुखीमाणूस's picture

27 Nov 2020 - 9:36 am | सुखीमाणूस

की मुम्बै मध्ये आधी शिवसेनेला मद्रासी त्रासचे झाले मग बिहारी आणि आता गुजरात विरुध्द बोम्ब मारतात.

गुजरात मध्ये आहे का हिन्दी ला विरोध?की त्यानी गुपचुप देशाला पन्त्प्रधान पुरवला आणि गुजरातचा मान वाढवला
शिवसेनेशी जवळीक करुन कौन्ग्रेस्ने मात्र बिहार मध्ये मतदार नक्कीच गमावले.
जागतिकीकरण आणि सन्गणक युगात दुफळी वाढवुन कमजोर होण्यापेक्शा सर्व भारतभर सामाइक वातावरण निर्माण करणे आणि त्याचवेळी प्रादेशिक सन्स्क्रुती व भाषा सन्वर्धन होणे आवश्यक आहे. त्यामुळे हिन्दी ला विरोध करण्यापेक्शा भारतभर आवश्यक तितके शासकिय हिन्दी आणि शासकीय वापरातली व साहीत्यीक वैविध्य समजवेल अशी प्रादेशिक भाषा शाळेतून शिकवली पाहिजे...

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Nov 2020 - 11:20 am | अमरेंद्र बाहुबली

का शिकवावी पण हिंदी??

भारतीय म्हणून कोणतीच बंधन नकोत.
सर्वांना रोजगार व्यवसाय साठी देशभर फिरण्याची मुफा असावी .
देशभर एकच सोयीची भाषा असावी जेणे करून देश एक राहील ,भक्कम होईल.
हे सर्व योग्य च आहे आणि ह्या मता शी सहमत पण आहे.
पण प्रतेक गोष्टीला काही तरी मर्यादा नक्कीच असते मर्यादा ओलांडली गेली की सकरतमक स्थिती निर्माण न होता विपरीत परिस्थिती निर्माण होते.
अगदी पोष्टीक म्हणून प्रमाण च्या बाहेर काजू बदाम खाल्ले तर शरीरात रोग निर्माण होतात .
आणि अगदी तसेच झाले आहे यूपी,बिहार,झारखंड,ह्या राज्यातून प्रचंड प्रमाणात लोक स्थलांतरित होत असून ते महाराष्ट्र मध्ये येवून स्थायिक होत आहेत .
आणि त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्र वर होत आहे .पुढे राज्य संकटात सापडू शकते.
महाराष्ट्र पाठोपाठ गुजरात,कर्नाटक,तमिळ nadu, punjab,haryana, दिल्ली ह्यांची त्याच दिशेने वाटचाल चालू आहे.
सर्व राज्यात ह्या अनियंत्रित स्थलांतर विषयी रोष निर्माण होत आहे.
पंजाब,गुजरात,तमिळ nadu,asam मध्ये लोकांनी रस्त्यावर येवून विरोध केला आहे.
तरी डोळे उघडणार नसतील तर पुढे स्थिती नक्कीच गंभीर वळण घेईल.
आणि जो पर्यंत स्थिती गंभीर होत नाही तो पर्यंत तिकडे दुर्लक्ष करायचं हा आपला ,भारतीय लोकांचा विशेष खास गुण आहे.

*बेळगाव : Belgaum लिहल्याने आणि बॅनरवर कन्नड नसल्याने जप्तीची कारवाई* ९/१२/२०

बेळगाव : एका फलकावर इंग्रजीत बेलगाम असे लिहिले होते. त्याचा पोटशूळ उठलेल्या कथित कन्नड नेत्याच्या सांगण्यावरून आणि Facebook वरील विरोधामुळे महापालिकेने फलक जप्त केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. शहरात एका मंगल कार्यालयात आयोजित खाजगी कार्यक्रमाची माहिती देणारा इंग्रजी भाषेतील फलक विनायकनगर गणपती मंदिराच्या मागे लावण्यात आला होता. त्यावर Belgaum असे इंग्रजीत लिहिले होते.

पण, भाषाव्देषाने पछाडलेल्या एका कन्नड नेत्याने याबाबत महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांनी तो फलक ताब्यात घेतला. लोकभावना लक्षात न घेता बेळगावचे नामांतर करण्यात आले आहे. या नामांतराला मराठी जनतेचा तीव्र विरोध आहे. इंग्रजीत Belgaum असे लिहिण्यात येते. राजकीय पक्ष सोयीची भूमिका घेतात.

मराठी लोकांत बेळगाव असा आणि कन्नड लोकांत बेळगावी असा उल्लेख करतात. एकीकडे कानडीकरणाचा फतवा काढणे, भाषिक अल्पसंख्याकांचे हक्क डावलणाऱ्या मराठीव्देष्ट्ये आणि प्रशासनाला आता इंग्रजीमधील बेलगामही खुपू लागले आहे. त्यातूनच मंगळवारी विनायकनगरातील इंग्रजी भाषेतील फलक हटवण्यात आला आहे.

उपयोजक's picture

9 Dec 2020 - 3:16 pm | उपयोजक

कर्नाटक सरकारची दडपशाही; निवडणूकीचे अर्ज मराठीतून देण्यास नकार.

बेळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज कन्नडमधून दिले जात असल्याने मराठी भाषकांची अडचण होत आहे. निवडणुकीचे अर्ज मराठी भाषेतून मिळावेत, तो आमचा हक्क आहे . यासाठी आज शुक्रवारी (4 डिसेंबर) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय तालुका म. ए. समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला . तसेच, निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच समितीचे तिकीट देण्याचे ठरले. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते . येत्या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अर्ज व इतर माहिती मराठीतून उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी तहसीलदारांकडे केली होती. मात्र तहसीलदारांनी फक्‍त कन्नडमधूनच अर्ज व माहिती पाठविण्यात आली आहे. त्यामुळे मराठीतून अर्ज देता येणार नाही अशी दर्पोक्‍ती केली आहे. याबाबत मराठी भाषिकांमधून तिव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.

मराठीतून अर्ज व माहिती मिळालीच पाहीजे अशी मागणी जोर धरु लागली आहे. सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या मोठ्‌या प्रमाणात आहे. त्यामुळे निवडणुकीबाबतची माहिती मराठीतून देणे आवश्‍यक आहे. याबाबत माजी आमदार किणेकर यांनी तहसीलदारांना निवडणुक जवळ आली आहे. त्यामुळे मराठीतून माहिती देण्याबाबत विचारणा केली असता सरकारच्या आदेशाप्रमाणे फक्‍त कन्नडमधूनच माहिती दिली जाईल असे सांगत उडवाउडवी करण्याचा प्रयत्न केला, तसेच यावेळी फक्‍त कन्नडमधून माहिती आली आहे. असे सांगत तहसीलदारांनी सरकारची री ओढण्याचा प्रयत्न करीत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला तर बघू असे सांगण्याचा प्रयत्न केला. याबाबत किणेकर यांनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरले व दरवेळी प्रमाणेच यावेळी मराठीतून अर्ज देणे आवश्‍यक असून ते द्यावेच लागतील असे स्पष्टपणे सांगितले. प्रशासनाला सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या अधिक प्रमाणात आहे.

याची जाणीव असून देखील सातत्याने मराठी भाषिकांचे हक्‍क डावलण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. तसेच मराठी भाषिकांच्या मतांवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधीनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत एक शब्दही उच्चारत नाहीत. उलट सरकारची बाजू घेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे मराठी भाषिकांकडे मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधीला दूर ठेवणे आवश्‍यक आहे. तसेच ग्राम पंचायत निवडणुकीत सर्रास जागांवर समितीचा भगवा फडकविने आवश्‍यक आहे. तरच अन्याय करणाऱ्या कर्नाटकी सरकारला सणसणीत चपराक बसणार असल्याच्या भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

मराठीतून अर्ज देण्याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधला होता. मात्र दरवेळी प्रमाणेच उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. मात्र मराठीतून माहिती मिळावी यावर आम्ही ठाम असून मराठी भाषिक बहुसंख्येने असुनही कशा प्रकारची दुय्यम वागणूक दिली जाते, याचा विचार सीमावाशीयांनी करणे आवश्‍यक आहे.
-मनोहर किणेकर, माजी आमदार कार्याध्यक्ष म. ए. समिती

पुष्करिणी's picture

9 Dec 2020 - 3:54 pm | पुष्करिणी

हिंदीची जबरदस्ती नको - हे बरोबर आहे.
माझ्या ओळखीच्या बहुतांश मध्यमवर्गीय शहरी मराठी लोकांच्या घरात फक्त काम करायला येणार्‍या लोकांशीच ( भांडी/धुणी करायला येणारे, माळीकाका इ.) मराठीतून बोलतात. मराठी बोलणं कमी दर्जाचं समजतात. तुटक-फुटकं हिंदी किंवा इंग्रजी बोलण्यात धन्यता मानतात. आणि त्यांच्याशी मराठीतून बोलायचा प्रयत्न केल्यास उत्तरं हिंदी, इंग्रजीतूनच मिळतात. प्रत्येक वाक्याच्या शेवटी 'यू नोम व्हॉट आय मिन ना..' असं अगम्य काहीतरी बोलतात.

पालकांचीच अशी अवस्था तर मुलांकडून काय अपेक्षा ठेवणार. त्यापेक्षा मला मातृभाषेचा अभिमान असणारे दक्षिण - उत्तर भारतीय आवडतात

अहो हे तर काहीच नाही.
हुच्चभ्रू मराठी मंडळी तर श्वानाशी देखील आंग्ल भाषेत बोलतात.
आत्ता बोला !

Rajesh188's picture

9 Dec 2020 - 4:35 pm | Rajesh188

मी आणि माझा मराठी नसलेला मुस्लिम मित्र आणि 2 मराठी च व्यक्ती नी टॅक्सी शेअर केली होती ते दोघे मराठी असून हिंदी मध्ये बोलत होते आणि माझा मित्र मराठी नसून आम्ही दिघे मराठीच बोलत होतो .
त्यांनी मला ते बोलून दाखवले मी मराठी नसून मराठी मध्ये बोलत आहे आणि हे दोघे मराठी च असून हिंदी बोलत आहेत.

मराठी_माणूस's picture

10 Dec 2020 - 9:20 am | मराठी_माणूस

असे तर ऑफिस मधे खुपदा पाहीलेले आहे.
त्याला कारण इतर लोक मराठी ला "downmarket" समजतात असे काही मराठी लोकांनाच वाटते.