निरो दादा फिड्ल बजाव 

वडगावकर's picture
वडगावकर in काथ्याकूट
11 Nov 2020 - 10:35 am
गाभा: 

आजच्या लोकसत्ता मधली एक माईंड रिफ्रेशिंग बातमी- 

बातमी सुरु- 
बिहारमध्ये काँग्रेसचा ‘निकाल’; राहुल गांधी जैसलमेरमध्ये करणार श्रमपरिहार,
दहा लोकांच्या राहण्याची तयारी करण्याच्या सूचना

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली. काँग्रेसला केवळ १९ जागाच मिळाल्या. तर महाआघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलानं दमदार प्रदर्शन सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. बिहार निवडणुकीतील निकालानंतर काँग्रेस नेतृत्वाला आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झालेली असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी श्रमपरिहार करण्यासाठी दोन दिवसांच्या सुटीवर आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मित्रांसोबत दोन दिवसांच्या खासगी पर्यटन दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी जैसलमेरमध्ये मुक्कामी असणार आहेत. बुधवारी (११ नोव्हेंबर) ते खासगी विमानानं जैसलमेरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या या सुटीचा कार्यक्रमही निश्चित झाला आहे.

राहुल गांधी यांच्या सुटीच्या कार्यक्रमाविषयी गुप्तता पाळण्यात आली आहे. जैमलमेरमध्ये एक दिवस राहुल गांधी टेंटमध्येही राहणार आहेत. राहुल गांधी यांच्या या सुटीच्या दौऱ्याची तयारीही सुरू झाली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफची तुकडीही जैसलमेर येथे पोहोचली आहे. राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत. तिथली सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे विमानतळावर त्यांचं स्वागत न करण्याच्या सूचना स्थानिक काँग्रेस नेत्यानं देण्यात आल्या आहेत.

राहुल गांधी दिल्लीतून विमानाने सकाळी जैसलमेर विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते पंचतारांकित सूर्यगढ फोर्ट हॉटेलमध्ये जाणार आहेत. याच सूर्यगढ हॉटेलमध्ये राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार १५ दिवसांसाठी मुक्कामी होते. या सुटीत राहुल गांधी वाळवंटातील टेंटमध्ये एक रात्र राहणार असल्याचंही वृत्त आहे. राहुल गांधी यांच्यासोबत दहा व्हीआयपी लोकांच्या राहण्याची तयारी करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. राहुल गांधी एक दिवस हॉटेलमध्ये राहणार आहेत. तर दुसरा दिवस टेंटमध्ये घालवणार आहेत - बातमी संपली , आता माझे विचार

बेचारी बुढी बेवा माँ कितने दिन ईसका बोझ सहेगी राम जाने - माझे विचार पण संपले 

तुम्हाला राहुल गांधींचे काही फिड्ल मोमेंट्स आठवत असतील वाचायला आवडेल  

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

11 Nov 2020 - 10:54 am | योगी९००

मी राहूल गांधी असतो तर राजकारणात पडण्याऐवजी हेच करत बसलो असतो. आहे तो पैसा उधळत बसलो असतो.
तसेच पैसा साठवून काही उपयोग नाही. कोणी नंतर वारसदार पण नाही. कशाला उगाच टेन्शन घ्यायचे नी काय...

कंजूस's picture

11 Nov 2020 - 11:55 am | कंजूस

निकालानंतर सुटीवर जात नाहीत. मतदानानंतर निकालापर्यंत जे भाकड दिवस असतात दोन तीन तेव्हा जातात. निश्चिंतपणा मिळतो तो तेव्हाच.

उपयोजक's picture

11 Nov 2020 - 11:58 am | उपयोजक

कोणास ठाऊक ६० व्या वर्षी लग्न करुन नि महागातल्या महाग ट्रीटमेंट घेऊन ६१ व्या वर्षी बाप होईलसुद्धा. ;)

चौथा कोनाडा's picture

11 Nov 2020 - 1:32 pm | चौथा कोनाडा

मज्जाच मज्जा ........ !
२०२४ ला फक्त वायनाड मधुन या राष्ट्रीय पक्षाचा एकच खासदार येईल ( तो देखील पैसे वाटून) तेव्हा ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अतीव करमणुकीचा विषय असेल.

निरो दादा और फिड्ल बजाव !

पुणेरी ढोल बजाव...

गामा पैलवान's picture

12 Nov 2020 - 1:32 am | गामा पैलवान

वडगावकर,

त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफची तुकडीही जैसलमेर येथे पोहोचली आहे. राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत. तिथली सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

रागा हा मोदींचा राजकीय विमा आहे. तो सांभाळायला हवाच !

आ.न.,
-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

12 Nov 2020 - 1:32 pm | चौथा कोनाडा

रागा हा मोदींचा राजकीय विमा आहे. तो सांभाळायला हवाच !

परफेक्ट गा.पै. !

मध्यंतरी मटाला संपादकीय पानावर लेख वाचला होता, त्यात म्हटले होते, मोदींचे भवितव्य तीन फॅक्टर्स वर अवलंबून आहे. १. राहूल गांधी २. डोनॉल्ड ट्रम्प आणि ३. अमित शहा. यात काही वरखाली झाले की मोदींचे स्थान डळमळीत झालेच समजा ! खुप रोचक लेख होता.
(त्या लेख ऑनलाईन सापडला नाही, त्यामुळे दुवा देता आला नाही)

शूकरोपम's picture

12 Nov 2020 - 3:59 am | शूकरोपम

जेसलमेर हे शहर थार वाळवंटाच्या अगदी मध्य भागी स्थित नसले तरी बऱ्यापैकी वाळवंटी भागात स्थित आहे. शहराच्या आजूबाजूला सर्वत्र वाळूच्या टेकड्या, छोट्या टेकड्या, डोंगर, संमिश्र काटेरी वने आहेत. चिंतन करायला यापेक्षा चांगली जागा कुठे असेल.
राहुलगांधीजी इतक्या सभा कुणी घेतल्या नाहीत. आपन अलिबाग हून मुंबई ला आलो तरी जाम होतो. हा माणूस बिहार मध्ये गावो गावी फिरला. सगळी कडे सभा घेतल्या भाषण केले. जनतेने नाकारले तर काय झाले. इलेक्स्कन येते आनि जाते.
एक दिवस राहुलगांधीजी भारताचे नेते होनार. अजून सगळे संपले नाही आणि संपनार पण नाही.

महासंग्राम's picture

12 Nov 2020 - 9:32 am | महासंग्राम

राहुल गांधी हे मित्रांसोबत दोन दिवसांच्या खासगी पर्यटन दौऱ्यावर आहेत.

रागा पटत नसले तरी त्यांनी पर्यटनासाठी कुठे जावं, केव्हा जावं हा त्यांचा अत्यंत खासगी प्रश्न आहे. माणूस त्याच्या खासगी पणा मध्ये काय करतो खरं तर या गोष्टीची चर्चा व्हायलाच नको.

बाप्पू's picture

12 Nov 2020 - 9:40 am | बाप्पू

बरोबर. मग त्याच न्यायाने मोदीजींची वाईफ, मोर , योगासने, त्यांचा कोट इ ची पण चर्चा व्हायला नाही पाहिजे.. बरोबर??
पण बहुतेक विरोधकांचे राजकारण याचं फालतू मुद्द्यावर बेस्ड असते. इथे देखील काही ID प्रत्येक धाग्यावर फक्त मोदींबद्दल असे काही लिहून काडी टाकून मजा बघत बसतात..

महासंग्राम's picture

12 Nov 2020 - 2:16 pm | महासंग्राम

माणूस त्याच्या खासगी पणा मध्ये काय करतो खरं तर या गोष्टीची चर्चा व्हायलाच नको.

बाप्पू, माणूस म्हणजे सगळेच आलेत त्यात मोदी,रागा,उठा, मोटाभाई, सल्लूमियाँ, दिपूडी, अर्णब सगळेच.

आता कोण कशी चर्चा करतो त्याला आपण रोखू शकत नाही ना. पण काल जस्टीस चंद्रचूड म्हणाले तसं "तुम्हांला अर्णब आवडत नसेल तर तुम्ही पाहू नका"
जितकं जमलं तितकं इग्नोर करायचं हेच आपल्या हातात आहे..

निनाद's picture

12 Nov 2020 - 10:00 am | निनाद

भाऊ तोरसेकर म्हणतात त्यांना सगळे विकून टाकयचे आहे. आज सुमारे ५५ हजार कोटीची प्रॉपर्टी आहे पक्षाची.
ती ताब्यात येईल.

रमेश आठवले's picture

12 Nov 2020 - 11:04 pm | रमेश आठवले

Rahul Gandhi has “a nervous, unformed quality about him, as if he were a student who’d done the coursework and was eager to impress the teacher but deep down lacked either the aptitude or the passion to master the subject.” Excerpt from forthcoming book- A promised land.

सुबोध खरे's picture

13 Nov 2020 - 12:14 pm | सुबोध खरे

आता फुरोगाम्यांची गोची झाली आहे.

त्यांचे आवडते ओबामा यांनी त्यांच्या आवडत्या रा गा ला घरचा आहेर दिला आहे.

तेजस्वी यादव यांच्या होणाऱ्या विजया बद्दल आनंद व्यक्त करताना त्यांच्या पराभवाची शोकसभा साजरी करायला लागली.

आजकाल फुरोगाम्यांचे दिवस फिरले आहेत हेच खरं.

रमेश आठवले's picture

14 Nov 2020 - 9:59 pm | रमेश आठवले

आता संजय राऊत राहुलच्या बचावात उतरले आहेत.
https://timesofindia.indiatimes.com/india/shiv-sena-defends-rahul-gandhi...