नसत्या उपद्व्यापांतून सुटका

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
27 Oct 2020 - 1:09 pm
गाभा: 

प्रेरणास्थान: http://www.misalpav.com/node/47778

सदर धाग्यावरुन सुचल्याने आभार मानतो. आता मला माझ्याच एका प्रॉब्लेमबद्दल कोणी मदत करु शकेल का पहा.

सदर धाग्यात गायनकला चांगली नसणार्‍यांचे स्वानंदासाठी गायन याबद्दल लिहिले आहे.ही कला माझ्याकडेही आहे.म्हणजे मलाही गायनाची आवड आहे.गाणी गुणगुणायला आवडतात.याउप्पर शीळही चांगली घालतो.यासोबतच मला चित्रेदेखील चांगली काढता येतात.कागदापासून विविध वस्तू बनवतो. सिद्धहस्त लेखक नसलो आणि लेखनाला साहित्यिक दर्जा नसला तरी स्वानंदासाठी लिहितो.विविध भारतीय भाषा शिकतो.मराठी भाषा शिकायला कोणी परप्रांतीय इच्छुक असेल तर त्यांना मला जमेल तितकी शिकवतोसुद्धा. अवांतर वाचनाचीही बर्‍यापैकी आवड आहे.असे बरेच आहेत.छंदीफंदीच आहे. ; )

पण हे सर्व मला बंद करायचे आहे.कारण या गोष्टींपासून आर्थिक फायदा काडीचाही नाही.होण्याची शक्यताही दुरापास्त वाटते.तस्मात पदरमोड करुन बाळगलेले हे छंद/आवडी वेळ आणि पैसा दोन्हीसाठी मारक आहेत.ते बंद करुन रोजीरोटीच्या क्षेत्रातले (अभियांत्रिकी) काही शिकण्याला वेळ देता येईल जेणेकरुन नोकरीत पगारवाढ किंवा प्रमोशन होईल किंवा स्किलसेट निदान अपडेट तरी करता येईल.

वर उल्लेखलेल्या काही छंदांना/आवडींना बर्‍यापैकी लगाम घातला आहे. उदा.चित्रकला जवळजवळ ९०% बंद केली आहे. कधीतरी हुक्की आलीच तर कागदावर चारदोन रेघोट्या. कागद/पुठ्ठ्यांपासून वस्तू बनवणे हे पण बंद केले. विशेषत: अभ्या... या आयडीने याचे वास्तव दर्शवले.त्यामुळे तो ही बंद करायला मदत झाली.त्याबद्दल अभ्या यांचे आभार!
पण काही छंद अजून टिकून आहेत.तर ते कायमचे किंवा निदान दीर्घकाळ तरी कसे बंद करता येतील? मनातून पूर्णपणे उतरावेत यासाठी काय करता येईल?

हे असे अनावश्यक उपद्व्याप आपल्यापैकी देखील काहीजणांना असू शकतात.उदा. इतिहासविषयक लेखन किंवा कविता लेखन इत्यादी.(बहुतेक लिहित्या मिपाकरांना लेखनाची आवड असतेच.म्हणून तसे म्हटले आहे.) यातल्या काहीजणांना आपल्या लेखनाचे पुस्तक छापावे असेही वाटू शकते.पण मराठी पुस्तक प्रकाशन हा तोट्याचा धंदा आहे.त्याबद्दलचा हा माझाच विस्तृत प्रतिसाद.http://www.misalpav.com/comment/1083558#comment-1083558

अशा वेळखाऊ नि पैसेखाऊ/कंडूशमनार्थ उपद्व्यापांकडे तुम्ही कसे पाहता? ते कमी किंवा मनातून नाहीसे करण्यासाठी काही प्रयत्न केलेत का? काय उपाय केलेत? कसं नियंत्रण ठेवता?

मार्गदर्शकांचे आधीच आभार! _/\_

प्रतिक्रिया

आणि मिपावरती पडीक राहुन पिंका टाकणे या सवयीचं काय करायचे? :प

Gk's picture

27 Oct 2020 - 5:52 pm | Gk

छान

जो पर्यंत लोकांनी स्वखुशीने विवाह केला आहे तो पर्यंत नवदांपत्यांना आम्ही शुभेच्छा देणे इतकेच आमच्या हातांत आहे. तिथे नावे ठेवून काहीही फायदा नाही. आपट्यांची राधिका हि इतर मुलींसारखी नाही. तिच्या रिटेनर वर असतील ४-५ वकील साहेब. आम्हाला तिची चिंता करायची गरज नाही.

उपयोजक's picture

28 Oct 2020 - 9:32 am | उपयोजक

याच धाग्यावर द्यायचा होता का? की दुसर्‍या धाग्यावर ? : )

कंजूस's picture

28 Oct 2020 - 7:44 am | कंजूस

माझे बरेच छंद लहानपणी काही हेतू ठेवून सुरू केलेले नव्हते. ते अजूनही सुरू आहेत.
आता मोठेपणी तुम्हाला तुमच्या छंदांत आवक / प्राप्ती किती हा प्रश्न पडलाय। पण छंदाला हा मुद्दाच गौण असतो.
नंतर वाढत्या वयात घरातल्या तरुण वर्गाची अशी इच्छा असते की म्हातारे, ज्येषठ नागरिकांनी कशात तरी मन गुंतवावे ( आणि दिवसात दोन तीन तास बाहेर टळावे. अगदी देवदर्शनही यात मोडते. ) म्हणजे थोडक्यात सांगायचे तर वयापरत्वे छंदांचे लक्ष्य बदलते.

उपयोजक's picture

28 Oct 2020 - 11:22 am | उपयोजक

छंदाला हा मुद्दाच गौण असतो.

हो मान्य. पण य‍ा छंदाफंदापायी वेळ नि पैसा घालवणे हे काहीजणांना न परवडणारे असू शकते.

कानडाऊ योगेशु's picture

28 Oct 2020 - 9:23 pm | कानडाऊ योगेशु

पण य‍ा छंदाफंदापायी वेळ नि पैसा घालवणे हे काहीजणांना न परवडणारे असू शकते.

ह्या गोष्टीला व्यसन म्हणतात. मुळात छंद ही फावल्या वेळेत करायची गोष्ट आहे आणि ह्याचा अर्थ ही दुय्यम गोष्ट आहे आणि जर इतर प्राथमिक गोष्टी ह्या दुय्यम गोष्टीमुळे कोलमडणार असतील तर असल्या छंदांकडे गांभीर्याने पाहायची गरज आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Oct 2020 - 10:38 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"ते कायमचे किंवा निदान दीर्घकाळ तरी कसे बंद करता येतील? मनातून पूर्णपणे उतरावेत यासाठी काय करता येईल?"

अंबानी ,अदानी ह्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावेत असे ह्यांचे मत. अगदीच जमले नाही तर शेजारच्या मिनी/सुपरमार्केट चालवणार्या मारवाडी दुकानदाराचा आदर्श ठेवावा.
दुर्मिळ ग्रंथ,जगाचा ईतिहास्, दुसरे महायुद्ध,जर्मन पाणबुड्या,गांधी विरुद्ध सावरकर वगैरे वाचून काहीही आर्थिक फायदा होणार नसतो हे त्यांना लहानपणीच उमजलेले असते.

उपयोजक's picture

28 Oct 2020 - 11:15 am | उपयोजक

भारी! : )
खरंय. मारवाडी दुकानदार या बाबतीत आदर्श ठरावेत. ज्यातून आर्थिक फायदा नाही अशा गोष्टींपासून लांब राहण्याचे कौशल्य मारवाड्यांनी भारी जमवले आहे.

रात्रीचे चांदणे's picture

28 Oct 2020 - 1:57 pm | रात्रीचे चांदणे

तुम्हाला मिसळ पाव पासून काय आर्थिक फायदा आहे का?

संजय क्षीरसागर's picture

28 Oct 2020 - 11:21 am | संजय क्षीरसागर

एखाद्या अस्सल राजस्थानी बनीयाच्या संगतीत रात्रं-दिवस रहा. काही दिवसात तुम्हाला प्रत्येक क्षणाचा पैसा करणं हेच जीवन सार्थक करण्याचं ऐकमेव ध्येय आहे असं वाटायला लागेल.

एकदा आमचा सीए ग्रुप महाबळेश्वरला ट्रीपला गेला होता. सगळ्यांच्या कार्स, बरोबर दारु, भन्नाट अर्वाच्य गप्पा असा एकंदरीत महान कल्ला चालू होता. तीसर्‍या पॉइंटला गेल्यावर आमच्यातला एक बनीया ज्याम रेस्टलेस झाला; म्हणाला " भें... यात काय शा... बघण्यासारखं आहे ? हे सगळीकडून सारखंच दिसतंय. मला कुणीतरी एसटी स्टँडला सोडा, ऑफिसला जाऊन काम तरी संपवतो !"

उपयोजक's picture

28 Oct 2020 - 11:24 am | उपयोजक

@संजयजी

भारी अनुभव! :))

संजय क्षीरसागर's picture

28 Oct 2020 - 11:40 am | संजय क्षीरसागर

तो म्हणाला स्त्रीसंगाचा फक्त एकच उपयोग आहे, लगेच झोप लागते. दुसर्‍या दिवशी उठून परत कामाला जायला मोकळे !

सुबोध खरे's picture

29 Oct 2020 - 9:59 am | सुबोध खरे

स्त्रीसंगाचा फक्त एकच उपयोग आहे,

त्याला एक सेक्स टॉय असलेली बाहुली आणून द्या.

किंवा

२ रुपयात मिळणाऱ्या झोपेच्या गोळ्या द्या.

बायकोवर होणार अफाट खर्च वाचेल.

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2020 - 5:14 am | टवाळ कार्टा

"बायकोवर होणार अफाट खर्च वाचेल."

या एका वाक्यात हजारी धाग्याचेआपोटेंशियल आहे =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2020 - 1:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) आवरा रे त्याला कोणीतरी.

-दिलीप बिरुटे

रानरेडा's picture

5 Nov 2020 - 12:56 am | रानरेडा

या लोकांपासून काहीतरी शिकला असता तर आतापर्यंत आपली साईट आली असती

ताजे प्रेत's picture

5 Nov 2020 - 11:45 am | ताजे प्रेत

संजय क्षीरसागर तो तुम्हाला पकला असेल आणि तुमच्यापासून पळून जायला कारण शोधत असेल

संजय क्षीरसागर's picture

6 Nov 2020 - 11:32 am | संजय क्षीरसागर

त्यामुळे ज्यातून अर्थ निष्पत्ती नाही त्यात अर्थ नाही या विचारानं तो पछाडलेला होता आणि अजूनही तसाच आहे.

तुमचा गलिच्छ आयडी बघावा सुद्धा वाटत नाही. तो बदलला तरच इथून पुढे संवाद होईल. तुम्ही सुद्धा माझ्या लेखनावर किंवा प्रतिसादांवर उप-प्रतिसाद टाळलेत तर बरं.

भीमराव's picture

28 Oct 2020 - 3:14 pm | भीमराव

ते विविध कायप्पा समुहनिर्माणकार्य आटोपलं का आहे चालू अजून?

विचार करायला भाग पाडणारा लेख . अनेक हौशी श्रीमंतांनी आपल्या ईस्टेटी या गाणे , शेरो शायरी अशा छंदांपायी उधळल्या आहेत . याबद्दलचेच "अशा शेरा पावशेरातच इस्टेटी गेल्या " हे एक गाजलेले वाक्य आठवले .

हा सुद्धा प्रचंड वेळ खाणारा छंद आहे असे बर्‍याच मिपाकरांचे मत अाहे असे जाणवले आहे.कितीतरी मिपाकर हे फेसबुक वापरतच नाहीत.किंवा फेबुवर असले तरी अनेक महिने किंवा वर्षे तिकडे फिरकलेलेच नाहीयेत.कारण काय? तर बहुतांशी एकच 'नॉन एंडिंग स्क्रोलिंग' त्यामुळे फेबुवर 'अडकून राहिले जाते' वर विविध जाहिरातींचा मारा.त्यांना बळी जाणे.
हे सर्व टाळण्यासाठी फेबुच टाळले जाते.

रानरेडा's picture

5 Nov 2020 - 12:57 am | रानरेडा

ही टाळणाऱ्या लोकांनी केलेली काही महान कार्य सांगाल का ?

हो.
इतिहासकारांनी वर्णनं लिहिली आहेत. दिल्लीत नाचणाऱ्यांच्या घराजवळचा रस्ता ट्राफिक जाम व्हायचा. सरदार उमरावांचे हत्ती पार्किंग मध्ये असत. हत्तीही जियचे आणि चालत घरी जायचे.

रानरेडा's picture

5 Nov 2020 - 12:59 am | रानरेडा

म्हणजे घोडा लावायच्या ऐवजी डायरेक्ट हत्ती लावायचे?

कंजूस's picture

5 Nov 2020 - 5:47 am | कंजूस

तिकडे तिरप्या चालींचे उंटं चालत नाहीत. एक उमरावाने माणकांची खैरात कैली की त्यापेक्षा अधिक रत्नांची उधळण दुसरा करणार. ( म्हणजे असं लिहिलेलं मी वाचलंयय. मी तिथे नव्हतो.)

चौकटराजा's picture

5 Nov 2020 - 9:37 am | चौकटराजा

खरेतर तात्त्विक पातळीवर यश ,कृतकृत्यता यांचे अगदी निरपेक्ष मूल्यमापन कठीण आहे. ! " मला आयुष्याकडून काय हवे याचे उत्तर माझे संचित व माझ्या परिसरातून माझ्यावर झालेले संस्कार ठरवीत असतात . सबब या प्रष्णाचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते नव्हे तसे ते असतेच ! दुसऱ्याना मी श्रीमंत वाटतो की नाही यापेक्षा मला मी श्रीमंत वाटतो की नाही हे महत्वाचे असते ! तुम्ही पैसा व छंद यांना आपल्या आयुष्यात कितपत महत्ता देता यावर तुमची श्रीमंतीची व्याख्या बदलत जाते. असा माझा तरी अनुभव आहे !

" Man's Search for Meaning "By Viktor E. Frankl हे पुस्तक वाचा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. नित्झे म्हणतो तुम्ही का जगता याचे उत्तर तुमच्या कडे असेल तर तुम्ही कशाचाही सामना करू शकता. एखादा छंद किवा कला हि तुमच्या जीवनाचे कारण असू शकेल ....आणि ते करायला मिळावे म्हणून तुम्ही नोकरी किवा धंदा करत असाल .

उपयोजक's picture

7 Nov 2020 - 12:23 pm | उपयोजक

नक्की वाचेन.धन्यवाद!

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

5 Nov 2020 - 4:54 pm | हणमंतअण्णा शंकर...

माझ्याबद्दलचे माझे पूर्वग्रह/(मला असं वाटतं) : माझी दृश्यात्मक-बुद्धिमत्ता (विज्युअल इंटेलिजन्स) लहानपणापासून जास्त आहे. (उदा. उत्तम चित्रं काढता येणं, अगदी लहानपणीच आलेले मितींचे तारतम्य). त्यामुळे मी आधीपासूनच उत्तम स्केचेस, पोट्रेट्स करत असे. (परंतु कलात्मक जाण खूप उशीरा म्हणजे आठवी-नववीपासून यायला लागली.) रूढार्थाने स्कॉलर म्हणून पाव्हण्यारावळ्यांच्यात कोडकौतुक होत असे. म्हणजे मी अभ्यासू, विविध-गुण-दर्शन-छाप, आताच्या भाषेत नर्ड म्हणता येईल असा बहुतांश घरकोंबडा वाढलो आहे. तरीही बेताची परिस्थिती असल्याने ह्या गोष्टी जाता जाता करण्यासाठीच होत्या. संगीताची काही विशेष आवड आधीपासून नव्हती. आताही मला संगीतात नॉस्टॅल्जिक प्रकारची वगळता फारशी रूची नाही. माझ्यात भाषिक-बुद्धिमत्ता जन्मजात असावी. परंतु तिला योग्य असे वातावरण मिळाले नाही. शाळेची लायब्ररी मोठी असली तरी ती मी शिक्षक नसल्यामुळे मला कधीही खुली झाली नाही (निमशहरी आणि ग्रामीण माध्यमिक शाळांमध्ये बहुतांशी असेच चित्र असते, शोभेची/प्रतिबंधित वाचनालये). वाचन मुख्यत्त्वे पुढारी वर्तमानपत्र आणि पुरवण्या. आपल्या 'लिहावसं' वाटतं आणि साहित्य हे मराठीच्या धड्यांपुरतं मर्यादित नाही हे पहिल्यांदा जाणवलं जी.एंची राणी ही कथा मराठीच्या पुस्तकात वाचल्यावर.

सध्या मी काय करतो - चित्रकलेच्या वाट्याला जायचे नाही हे शाळेतल्या चित्रकलेच्या सरांच्या दयनीय आयुष्यावरून आधीच ठरवले होते. उत्तम पैसे लवकर कमवणे ही प्राथमिक गरज राहिल्याने मेडिकलला प्रवेश मिळूनही इंजिनिअरिंग केले. सल्ले द्यायलासुद्धा आसपास लायकीचे लोक नव्हते हे एका अर्थी बरेच झाले म्हणायचे. नो रिग्रेट्स. साहित्यिक मूल्य असलेलं लिहिण्याचा गंभीरपणे प्रयत्न करतो.

माझी गृहीतके अर्थात तत्त्वाच्या बाता - आपल्याइथे कलेचा ॲप्टीट्यूड जन्माला घेऊन येणे ही तीव्र फरफट असते. पहिलं म्हणजे स्वतःशी सतत होणारं आणि खूपदा मानसिक थकवा देणारं द्वंद्व. दुसरं म्हणजे मुलुखाशी झगडा. कलानिर्मितीतून येणारी कामपूर्ती ही नशीली आणि निरोगी व्यसन लावणारी असते. त्यासाठी मात्र खूप कष्ट करावे लागतात. शिवाय ती वेळखाऊ प्रक्रिया असते.

तथ्याच्या बाता - तुम्ही जो इतरत्र प्रतिसाद दिला आहे तोच इथे संदर्भासाठी पुन्हा लिहितो. साहित्याच्या बाबतीच म्हणायचे तर, लेखन करून जगता येणं हे कोणत्याही भारतीय भाषेत शक्य नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात लेखनावर जीवितासाठी अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण जवळजवळ शून्य आहे. काही प्रमाणात आता संधी आहे परंतु तिथे कसलेही स्थैर्य नाही. शिवाय मराठीसारख्या बोलीभाषेत लिहिणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. (निक टीव्हीवर जे कार्टून लागतात ते आता मराठीतही उपलब्ध असतात. माझी मराठी माध्यमात शिकणारी लहान भाचरे/पुतणे कार्टूनची हिंदी भाषा बदलू देत नाहीत. कारण त्यातली मराठी ही त्यांना हिंदीपेक्षा अवघड वाटते. महाराष्ट्रातली बहुतेक मुलं मराठीपासून, विशेषतः लेखनापासून दुरावत चालली आहेत. कारण- मराठी मोबाईलवर/कामासाठी टाईप करणं येत नाही. त्यापेक्षा रोमन लिपित टाईप करणं सोप्पं असतं. आणि सेमी इंग्लिशमुळं झालेलं भजं.) त्यामुळे जेव्हा रोजीरोटीचा प्रश्न निकालात निघाल्यावर लेखनाकडे यावे हे बरं. आता, जरी तुम्ही रोजीरोटीचा प्रश्न सोडवून गंभीर मराठी लेखनाकडे वळलात तरी ज्येष्ठ नागरिक सोडल्यास कुणीही तुमचं वाचणार नाही. बहुतांशी वाचणाऱ्या लोकांना पुलं वपु शिवाजी सावंत सात पिढ्या पुरतात. ही पिढी पुढच्या साथीपर्यंत जवळ जवळ संपून जाईल. सध्याची कॉलेजकार्टी विश्वास नांगरे पाटील छाप सोडून काहीही वाचायला तयार नाही. साहित्यिक मराठी वाचन हे तसलंच लिहिणाऱ्या लेखकांपुरतंच मर्यादित राहिल. हे ओलांडून तुम्ही स्वांतसुखाय लेखन करायला गेलात तरीदेखील तुम्हाला तुमच्याशीच झगडत बसावं लागतंच.
हा झगडादेखील तुम्हाला मान्य असेल आणि तो तुमच्या कौटुंबिक, आर्थिक स्थैर्याला अहितकारक नसेल तर मग कोणताही छंद जोपासायला काहीच अडचण नाही. त्यातून मिळणारा आनंद नेहमीच मोजता येण्यासारखा नसतो आणि तो खूपदा मानसिक स्वास्थ्यासाठी पोषक असतो. म्हणजे छंद टिकवण्याचा प्रमुख निकष - कौटुंबिक, आर्थिक आणि मानसिक स्थैर्याला अहितकारक नसावा. (शारिरिक आरोग्याला अहितकारक असलेला छंदही यात जमेस धरावा). हा निकष मानायचाच नसेल तर बेफिकीरी आणि वेडेपणा कोणताही छंद तोलू शकतात. फक्त इतकंच, त्या छंदातलं ॲप्टीट्यूड हवं.

हे करतो :
म्हणून मी लेखन हा छंद माझ्या कुटुंबापासून लपवून वेळ मिळेल तेव्हाच आणि इतर व्यवधानं नसतील तेव्हाच पण पूर्ण मन लावून जोपासतो. आणि बाकीचा वेळ व्यवस्थित वापरला तर वर्षातून एखादा आठवडा पूर्ण मोकळा मिळतोही. तेव्हढा मी पुरेसा मानला आहे. ही तारेवरची कसरत जेव्हा जमणार नाही तेव्हा ते मी कोणत्याही पश्चातापाशिवाय लेखन बंद करेन.
मला पॅराग्लाईडिंगचा अतिशय खर्चिक असा अजून एक छंद आहे. परंतू तो माझ्या कौटुंबिक, आर्थिक आणि मानसिक स्थैर्याच्या आड येत नाही म्हणून मला तो करणे परवडते. तरीही, संधीची अनुपलब्धता आणि नैसर्गिक मर्यांदांमुळे त्याच्यावर अंकुश आहेच.
बेसुमार परदेशी चित्रपट पाहणे, बिंज वॉचिंग, फिल्म फेस्टिवल्स, कलावंत मित्रांशी जवळीक, टोकाचे जपानप्रेम इत्यादी गोष्टी वेळखाऊ आणि पैसाखाऊ होत्या. त्या सध्या मी पूर्णपणे बंद केल्या आहेत. फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी सामाजिक माध्यमे मी वापरत नाही. त्याऐवजी जास्तीत जास्त moocs करणे, करियरला साहाय्यभूत होतील अशा गोष्टी करणे उदा. github प्रोफाईल सुस्थितीत ठेवणे, विविध परीक्षा देत राहणे, ज्या परदेशी भाषेचा करियरला उपयोग नाही त्या भाषेच्या वाट्याला न जाणे इत्यादी गोष्टी आवर्जून करतो. कोणत्याही प्रकारच्या बातम्या पाहत नाही, वर्तमानपत्रं वाचत नाही, टीव्ही पूर्णपणे बंद केलेली आहे. परस्पर कानावर आलेली बातमी पूर्णपणे सत्य मानतो. मिसळपाव आठवड्यातून एखादवेळेस नजरेखालून घालतो. क्वचित प्रतिसाद देतो. त्यासाठी सुद्धा लीचब्लॉकसारखी प्लगिन लावलेली आहेत. सर्व प्रकारचे सामाजिक वादविवाद टाळतो. कारण त्यातून फक्त आणि फक्त वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप इतकंच होतं. क्वचित रेडिट वरती हवी ती माहिती विचारतो. लेखनासाठी आणि कामासाठी मात्र इंटरनेट भरपूर वापरतो.

अर्धवटराव's picture

5 Nov 2020 - 8:34 pm | अर्धवटराव

_/\_

मराठी_माणूस's picture

6 Nov 2020 - 9:46 am | मराठी_माणूस

कुटुंबापासून लपवून

लपवून का ?

उपयोजक's picture

7 Nov 2020 - 12:26 pm | उपयोजक

प्रतिसाद आवडला.