वाचकमित्रहो.....

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
15 Sep 2020 - 11:11 am
गाभा: 

नुकताच मिपाचा १४वा वर्धापनदिन साजरा झाला. आपल्या लोकप्रिय संस्थळावर अनेक जण लिहीत असतात. या माध्यमाच्या रूपाने आपल्याला व्यक्त होण्यासाठी एक चांगले माध्यम मिळाले, हे निःसंशय. काही लेखक इथे अभ्यासपूर्ण अथवा रंजक लेखनही करत असतात. आपण लिहिलेले ‘कोणीतरी वाचतंय’, म्हणूनच अजून लेखक टिकून आहेत. या दुतर्फी व्यवहारात वाचक हा खरेतर अधिक महत्त्वाचा घटक आहे. इथल्या वाचकांचे दोन प्रकार आहेत- प्रतिसाद देणारे आणि मूक. काही वाचक हे क्वचित का होईना एखादे लेखन करतात, पण काही निष्ठावान वाचक हे कायम निव्वळ वाचक याच भूमिकेत अनेक वर्षे राहिलेले आहेत. मला अशा वाचकांचे नेहमीच कौतुक वाटते. या धाग्याद्वारे मी त्यांना एक आवाहन करतो.

इथे आतापर्यंत अनेकविध विषयांवर लेखन झालेले आहे. प्रत्येक लेखक हा आपापल्या आवड, गती आणि अभ्यास यानुसार विषयाची निवड करतो. प्रत्येक लेखकाचा एक ठराविक वाचक वर्गही तयार होतो. पण या सगळ्यात, निव्वळ वाचकांना अजून काय प्रकारचे वाचायला आवडेल, हा प्रश्न तसा दुर्लक्षित राहतो. तसेच काही विषयांवर नको इतके लेखनही झालेले असू शकते आणि त्यामुळे वाचकांना त्याचा कंटाळा आलेला असतो.

तर वाचकमित्रहो, या धाग्यात तुम्ही प्रतिसादातून तुम्हाला ज्या विषयांवर वाचायला आवडेल असे नवे विषय सुचवत रहा. त्यातून अशी यादी इथे तयार होईल. मग ती पाहून इच्छुक लेखकांना त्यातील त्यांच्या पसंतीचे आणि आवाक्यातले विषय निवडता येतील. याचबरोबर, ज्या विषयांवर आतापर्यंत नको इतके चर्वितचर्वण झालेले आहे, असे विषयही जरूर सांगा. त्यातून नवलेखकांना त्यांचा विषय निवडताना विचार करता येईल.

प्रत्येक लेखक हा देखील एक वाचक असतो. तेव्हा त्यांनीही (इतर लेखकांनी लिहावेत असे) त्यांच्या पसंतीचे वाचनविषय इथे जरूर लिहावेत. संबंधित लेखकांना ते मार्गदर्शक ठरेल. व्यापारातील ‘ग्राहकराजा’ प्रमाणेच वाचक हा लेखनविश्वातला ‘राजा’ आहे असे मी मानतो. म्हणून हे आवाहन.

धन्यवाद !
............................................................................................................................................................

प्रतिक्रिया

प्रयत्न चांगला आहे. पण ठराविक विषयाबाहेर मिपा जात नाही.

संस्कृती बुडते आहे का?

ज्योतिष शास्त्र आहे का?

राजकारण आणि राजकारणी ( या रणांगणात बरे धारातीर्थी पडले.)

शिक्षणाचा खेळखंडोबा.

युट्युब विडिओ चर्चा

ओटीटी सिनेमे आणि टीवी मालिका चर्चा

ओनलाइन पेमेंट गंडवागंडवी

बारावीनंतर पुढे काय

मराठी भाषेचं भवितव्य

मित्र आणि नातेवाईक अनुभव

अमचा गाव, अमच्या लहानपणी रुपयाला शेरभर तूप

भटकंती - डोंगर, किनारे, भारतात आणि बाहेर.

वैद्यकीय सल्ला

नामवंत व्यक्ती - कलाकार लेखक इ आठवणी।

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2020 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१) 'फिडेल'आणि 'मोर' एक तुलनात्मक अभ्यास.
२) रोम आणि भारत एक सांस्कृतिक चिंतन.
३) भारत आणि रोम यांच्यातील व्यापार, काल आणि आज.
४)
५)
६)
७) आज पाकिस्तान भारतात असता तर ?
९) करोना, जगाच्या अंताची सुरुवात ?
१०) करोना काळातील मराठी साहित्य.
११)
१२)
१३)
१४) प्रसार माध्यमे आणि सामान्य माणूस.
१५)
१६) Android App हॅकिंग, एक नवे शिक्षण.
१७)
१८)
१९) मराठी संस्थळे, मोफत आणि प्रीमियम काळाची गरज ?
२०)
२१) लोकशाहीतील एक नवी पद्धत, हुकुमशाही.
२२)
२३)
२४)
२५) सर्व देशांच्या सीमा खुल्या असल्या पाहिजेत ?
२६)
२७) देव आणि विज्ञान, माणूस सुखी होण्यासाठी जगाचे दोन गटात विभाजन आवश्यक ?
२८)
२९)
३०)
३१)
३२)
३३)
३४)
३५)
३६) सर्वांना सर्व विषयांचे शिक्षण, काळाची गरज.
३७)
...
...

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

15 Sep 2020 - 12:35 pm | कुमार१

धन्यवाद.
अन्य काही सूचना येताहेत का बघू.
एक प्रयत्न !

डीप डाईव्हर's picture

15 Sep 2020 - 12:46 pm | डीप डाईव्हर

हेरगिरी, गूढ, विनोदी कथा
sci-fi कादंबर्या
सायन्स and टेक्नोलॉजी विषयक लेखन वाचायला आवडेल.

नीलस्वप्निल's picture

15 Sep 2020 - 10:41 pm | नीलस्वप्निल

+१

गवि's picture

15 Sep 2020 - 2:26 pm | गवि

स्पार्टाकस- डेड मँन्स हँड आणि त्यासम थ्रिलर्स
चाफा, पहाटवारा, बहुगुणी इत्यादींच्या कथा, फारएन्ड विनोदी अंगाने (it's so bad, it's good type चित्रपट घेऊन) चित्रपट परीक्षणे, ( ही उदाहरणे.. म्हणजे त्या प्रकारातील नवीन लेखन इतरही लोकांकडून) यांमुळे बहार येईल.

रातराणी's picture

18 Sep 2020 - 4:27 am | रातराणी

+1
हेच म्हणते, द स्केअर क्रो, त्यानंतर स्पार्टाकस यांच्या डेड मॅन्स हँड आणि अजून एक दोन कथा याशिवाय चांगल्या मिस्ट्री कथा मराठीत वाचल्याचं आठवत नाही इतक्यात. अशा प्रकारच्या कथा वाचायला आवडतील.

टवाळ कार्टा's picture

15 Sep 2020 - 4:31 pm | टवाळ कार्टा

अरेरे, चक्क हजार प्रतिसाद असलेल्या धाग्याचा उल्लेखपण नाही
पुमिराना कॉम्प्लेक्स आला

एक वाचक म्हणुन मला, ग्रामिण बाज धरून हलक्या फुलक्या कथा वाचायला जास्त आवडेल..

चौकस२१२'s picture

15 Sep 2020 - 5:41 pm | चौकस२१२

शंकर पाटील, माडगूळकर....
जत्रा मध्ये एक दीर्घ ग्रामीण कथा येत असे मिळेल का ती कुठे संकलित

गणेशा's picture

15 Sep 2020 - 9:16 pm | गणेशा

जरी आयटीत असलो तरी internet वर, pdf मध्ये किंवा किंडल वगैरे वर मी एकही पुस्तक वाचले नाहीये..
पुस्तक विकतच आणा मज्जा येते वाचायला.. आपलाच संग्रह पहायला पण (माझा निम्मा संग्रह मित्रांच्या घरी पडीक आहे :-))

वरील माझी ग्रामीण भाषेचा बाज आणि कथा हे मिपावरील लेख आणि कथा लिहिणाऱ्यांसाठी होते, म्हणजे त्यांनी ते लिहिलेले मला वाचायला आवडेल..

उदा. अलीकडे जेम्स वांड यांची एसटी ची वाचलेली कथा.. मस्तच होती..

हो बाई , हलकं फुलकं Happy Endings असलेलं.:)

राजकीय आणि सामाजिक धागे मला आवडतात,
पण आपण ज्या पक्षाला समर्थन देतो त्याचीच री ओढायची किंवा जो आवडत नाही त्याचीच फक्त राळ उडवायची असे मला जास्त आवडत नाही..
त्यात आपल्याला काय वाटते ते बोलले पाहिजे, असो.
म्हणजे शेती आणि राजकारण.. कुठलेही सरकारे असुद्या यातील परिस्थिती आली पाहीजे मग त्यात दोन बाजू असुद्या पण आपला आवडता पक्ष भारी इतर चुकीचे असे धरल्यास मुळ मुद्दा काय उरतो?

असो..
राजकीय धागे आवडतील पण एकांगी विचारांचे नाही

चौकस२१२'s picture

15 Sep 2020 - 5:45 pm | चौकस२१२

मी आपल्याला पूर्वी एक विषय सुचवला होता...
"बारा बलुतेदार ..."
कल्पना अशी कि
विविध वयसायातील लोकांनी आपल्या काम/ वयसाबाद्ल रंजक माहिती ठरविक शब्दांच्या मर्यादेत सांगेन ( चित्र विदागार पण जोडावी )
बघा जमाल तर घ्या ऐरणीवर

चौकटराजा's picture

15 Sep 2020 - 7:40 pm | चौकटराजा

मिपावर मला येऊन आता आठेक वर्षे झाली .धागे व प्रतिसाद याबाबत माझे येथील अस्तित्व बऱ्यापैकी आहे व ते बर्यापैकी चौफेर आहे ! माझा धागा याविषयीचा निकषच मिपाशी मेळ खात नाही. याविषयी मी ट्रिप ऍडव्हायझर या साईट कडे आदर्श म्हणून पाहातो. तिथे विषयवार डिरेक्टरी आहेत .त्यात एखाद्या विषयाशी विविध अंगानी माहिती देणारे लोक आहेत. तिथे ट्रोलिंग ला वाव नाही . संपादक हे काही बाबतीत साईट्शी बांधील आहेत.

मिपावर धागे कसे असतात हे पाहू .
समजा एकाद्या ने दुर्ग भ्रमणाविषयी व लिहिले तर त्यावर प्रतीसाद मिपावर कसा येईल ते पाहू !
मस्तच धागा रे रे ***
जबराट रे ***
तुझ्या बरोबर ***ला गेलो ना की ....
फटू लई भारी आलेत

समजा वरील धागा रायगड विषयी आहे व धागा कर्त्यांचे काही तपशील चुकले आहेत वा राहिले आहेत त्याची माहिती येणे आवश्यक आहे धागा कर्त्यांची स्तुती वा टवाळ खोरी करणे नव्हे उदा . रोपवे सध्या करोनामुळे बंद आहे . तरी त्यावर अवलंबून जाऊन इथे जाऊ नये असे सुचविणे ! ही झाली ट्रीप अडवायझर ची शैली. अर्थात मिपाची स्थापनाच मुळी माहिती बरोबर मत अशी असेल तर बात वेगळी !
आता बाब राहिली की फक्त माहितीचेच धागे यावेत का ? तर तसे म्हणता येणार नाही . पण एखाद्या धाग्याची कुळी कसली आहे हे अगोदर स्पष्ट असावे . व चर्चा त्मक धाग्यावर व्यक्तिगत कमेंट आलया की त्या संपादक मंडळाने निदर्यपणे उडवून लावाव्यात. तर स्वतः: चे मत कसे व्यक्त करावे याची एक संहिता इथे तयार होईल .

एकूणात इथे पुणेकर , देवाचे अस्तिव, पदार्थ , मोदी विरुद्ध इतर ,किल्ले ( मुख्यात: फक्त महाराष्ट्रातील ) इतकेच विषय वाचकांना रोचक वाटावेत का असा मला प्रश्न पडतो !

उपयोजक's picture

18 Sep 2020 - 12:28 pm | उपयोजक

उपयुक्त प्रतिसाद!!

कुमार१'s picture

15 Sep 2020 - 8:04 pm | कुमार१

सर्वांना धन्यवाद.
चांगल्या सूचना येत आहेत.

गणेशा, चौरा,
तुमचे विश्लेषण आवडले.

अथांग आकाश's picture

15 Sep 2020 - 9:47 pm | अथांग आकाश

अशुद्ध भाषेतील लेखन आणी राजकीय धुळवडीचे धागे सोडून काहीही वाचायला आवडेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Sep 2020 - 12:04 am | अमरेंद्र बाहुबली

मिपावर अनेक ऊत्तमोत्तम लेख आहेत. पण १९९४ सालचं जळगाव सेक्स स्कॅंडल बद्दल आंतरजालावर कुठेच माहिती मिळत नाही. त्यावर आधारीत लेख किंवा लेखमाला आली तर छानच.

१) कौशल्य विकसन कसे करावे?
२) कौशल्याचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी कसा करावा?
३) पैसे कुठे गुंतवावेत?
४) पैसे कसे वाचवावेत?
५) आळस कसा सोडावा?
६) पालकनिती
७) स्मरणशक्ती कशी सुधारावी?
८) समस्या सोडवण्याची तंत्रे
९) भेसळ कशी अोळखावी?
१०) फसवणूक कशी टाळावी?
११) अॉफिसातल्या राजकारणात आपण कितपत सहभागी व्हावे?
१२) चांगल्या सवयी सुटणे कसे टाळावे?
१३) नुकसानकारक सवयींपासून लांब कसे रहावे?
१४) आरोग्य चांगले कसे राखावे?
१५) मानसिक ताण कसा नियंत्रित करावा?
१६) संवादकौशल्याचा विकास
१७) न्यूनगंड कसा टाळावा?
१८) आक्रस्ताळेपणा किंवा अयोग्य भाषा न वापरता आपला मुद्दा कसा पटवून द्यावा?
१९) संयम कसा बाळगावा? कितपत ठेवावा?
२०) मोह कसा टाळावा?
२१) तर्कक्षमतेचे विकसन
२२) बहुतांची अंतरे कशी राखावीत?
२३) स्त्रियांना डेलिसोप्स पाहण्यापासून कसे रोखावे?किंवा त्यासाठी त्यांचे प्रबोधन कसे करावे?
२४) पतीने पत्नीला आपला मुद्दा पटवून देण्याचे कौशल्य विकसन
२५) आपली शासकीय कामे संबंधितांकडून वेगाने कशी पूर्ण करुन घ्यावीत?
२६) इंग्रजीतून बोलणे, वाचन,लेखन या कौशल्यांचे विकसन.
२७) प्रमोशन कसे मिळवावे?
२८) आयुष्य शांततेत कसे घालवावे?
२९) दुसऱ्याबद्दलचा द्वेष/मत्सर कसा टाळावा?
३०) एखादयाला मानसोपचाराची गरज आहे, हे कसे ओळखावे?
३१) आयुष्यात लहान लहान सुधारणा (Kaizen) कशा कराव्यात?
३२) पुरुषांना web series, मारधाड, हिंसा इत्यादी आणि काही प्रमाणात डेलिसोप्स पाहण्यापासून कसे रोखावे?

चौकटराजा's picture

17 Sep 2020 - 4:05 pm | चौकटराजा

माझे आवडते सन्त दोन १ .रामदास २. कबीर
या दोन्ही सन्तानी जो आलेख मानवी मनाचा मांडला आहे त्यात हे वरचे ३२ मुद्दे येतात !

उपयुक्त सल्ले हे चौकात मिळतात का घरात?

टर्मीनेटर's picture

17 Sep 2020 - 4:58 pm | टर्मीनेटर

व्यापारातील ‘ग्राहकराजा’ प्रमाणेच वाचक हा लेखनविश्वातला ‘राजा’ आहे असे मी मानतो.

👍

मला ज्या विषयांवर वाचायला आवडेल असे काही विषय. नवीन लेखक/लेखिकांची शैली भिन्न असली तर स्वागतच आहे. तरी बेंचमार्क म्हणून तसे लेखन करणाऱ्या मिपाकर लेखक/लेखीकांची नावे कंसात देत आहे.:

  • भाषेचा बाज सांभाळून लिहिलेल्या ग्रामीण भाषेतील कथा वाचायला आवडतील. (जव्हेरगंज, अभ्या.., जेम्स वांड यांच्या प्रमाणे)
  • सत्यघटनांवर आधारित लेखमालिका (हुप्प्या ह्यांनी लिहिलेल्या 'मक्केतील उठाव' आणि बोका-ए-आझम ह्यांनी लिहिलेल्या 'मोसाद' प्रमाणे.)
  • अनुवादित कथा (जयंत कुलकर्णी आणि स्मिताके जसा उत्तम अनुवाद करतात त्या प्रमाणे )
  • अनुवादित कादंबऱ्या (बोका-ए-आझम ह्यांनी लिहिलेल्या 'द स्केअरक्रो' प्रमाणे)
  • प्रवास वर्णन (डॉ. सुहास म्हात्रे. अनिद्य, सुधीर कांदळकर यांच्या प्रमाणे)
  • आरोग्य विषयक लेखन (कुमार१ आणि आनंदिनी यांच्याप्रमाणे.)
  • विनोदी कथा, गूढ/रहस्य कथा (अनेक मिपाकर चांगल्या लिहितात)
  • कुठल्याही विषयावरील लघु/दीर्घ लेख. (अनेक मिपाकर चांगले लिहितात)
  • विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित कथा, कादंबरी.
कुमार१'s picture

17 Sep 2020 - 5:26 pm | कुमार१

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

अनेक चांगल्या सुचवणी आलेल्या आहेत.
लेखकांसाठी त्या मार्गदर्शक ठराव्यात.

कंजूस's picture

18 Sep 2020 - 10:07 am | कंजूस

पण लेखक दूरदूर चाललेत ओटीटीकडे.

चौकटराजा's picture

18 Sep 2020 - 12:33 pm | चौकटराजा

)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Sep 2020 - 9:33 pm | अमरेंद्र बाहुबली

श्रिगुरूजींसारखे राजकारणाची जाण असणारे लोक पुन्हा आणले जावेत.

कट्टे,समारंभ,डिनरपार्ट्यांना आणि संसंस्थळांवरही दुसरे आणखी कोण येतात यावरही हजेरी वाढते. शाइनिंग मारणे वाया जाते ना.

दुर्गविहारी's picture

19 Sep 2020 - 7:36 pm | दुर्गविहारी

वास्तविक अनेक मि.पा.कर आय.टी.त आहेत.पण आय.टी.त नेमके काम कसे चालते ? अनेक गोष्टींचा अर्थ काय ?तिथे होणार्‍या धमाल गंमतीजमंती यावर लेख यावेत. आय.टी.त करियर करायचे असेल तर नेमके कोणते स्किलसेट वाढवावेत याविषयी सविस्तर लिखाण असावे हि अपेक्षा आहे.

रागो's picture

20 Sep 2020 - 12:23 pm | रागो

मला खालील विषयांवर वाचायला आवडेल
1. आरोग्य विषयक विशेषतः मधुमेह
2. किटो(Keto / LCHF) आहारशास्त्र आणि रेसिपीज
3. अँड्रॉइड, विंडोज तंत्रज्ञानावर माहिती आणि सल्ला
4. गूढ, रहस्य, विज्ञानकथा