जुलै महिन्यात श्रीगणेश लेखमाला २०२० या विशेषांकासाठी सहभागी होण्यासाठी आवाहन केलं गेलं, आणि वाटलं आपणही सहभागी व्हावं.
२०१४ साली दिवाळी अंकाच्या निमित्ताने तलकाडू : एक प्रवास हा भटकंती लेख लिहिला होता, त्यानंतर विशेषांकासाठी लिहिणं काही जमलं नव्हतं.
विशेषांकाच्या 'आठवणी' या थीमसाठी मला स्वतःला काही विशेष सुचत नव्हतं.
(हे आपलं नेहमीचंचय.. पाहिजे तेव्हा हवं ते सुचत नाही आणि नको तेव्हा नको ते सुचतं!)
लॉकडाउन १.०, २.०, ३.०, ४.०, असं मारुतीच्या शेपटीसारखं वाढतच चाललं होतं. सगळेच व्यवहार जवळजवळ बंद पडले होते. नाटक, एकांकिका वगैरे कसं बघायचं हा प्रश्नच होता, तेव्हा ऑनलाइन प्रकरण सुरू झालं आणि ही एक सोय झाली, बरं वाटलं.
या दिवसांमध्ये विविध फेसबुक लाइव्ह, झूम मीटिंग्ज यांनी निर्माण झालेली पोकळी भरून काढायला मदत केली.
बरीच कथाकथनं ऐकली, अभिवाचनं पहिली, एक सुंदर दोन अंकी नाटकाचं सुंदर अभिवाचन पाहिलं-ऐकलं.
मग वाटलं, आपण श्रीगणेश लेखमाला विशेषांकासाठी का कथावाचन करू नये? आणि ती कथादेखील मिपावरचीच घेतली, तर? विचाराने उत्साह वाटला. मिपाच्या साहित्य संपादकांना कथावाचन (ऑडिओ फाइल) चालेल का? हे विचारलं आणि त्यांच्याकडून हिरवा झेंडा मिळाल्यावर हुरूप वाढला.
कथावाचनाच्या दृष्टीने मिपावरच्या कथा वाचायला सुरुवात केली. २०-२५ सुंदर कथा वाचल्या.
मला भावलेली "बाप" ही मला कथावाचनाच्या दृष्टीने चांगली वाटली (म्हणजे आपण ही सादर करू शकू असं वाटलं.) ही कथा 'आठवणी' थीमला कुठेतरी जुळणारी होती.
(शालेय विद्यार्थ्यांचं प्रातिनिधिक चित्र, आंजावरून साभार)
एका मुलाच्या शालेय जीवनात घडलेली, बालमनाला हादरवणारी, आपला कोणीतरी वाली आहे हे मनावर बिंबवणारी नाट्यमय 'आठवण'.
माझ्या वकूबाला पेलण्यासाठी काही छोटे बदल केले.
त्यात स्त्रीपात्राचा आवाज देण्याचं थोडंफार काम माझ्या पत्नीने आनंदाने स्वीकारलं. थोडा सराव केला आणि आणि काहीसं चुकतमाकत 'बाप'चं कथावाचन केलं. बघा कसं वाटतंय. कथा हेडफोन्स लावून ऐकल्यास उत्तम!
मित्रांनो, मी सादर केलेला हा कथावाचनाचा (हौशी) प्रयोग कसा वाटला, याची प्रतिक्रिया नक्की द्या!
धन्यवाद!
प्रतिक्रिया
28 Aug 2020 - 8:40 am | बबन ताम्बे
खूपच छान चौथा कोनाडा. सर्व पात्रे तुम्ही डोळ्यासमोर उभी केलीयेत. आवाजातील चढ उतार, प्रसंगानुरूप शाब्दिक अभिनय यामुळे कथा भावली. सोबत सौंचीही साथ उत्तम.
लगे रहो चौको.
30 Aug 2020 - 1:13 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, बबनजी ताम्बे !
28 Aug 2020 - 12:11 pm | तुषार काळभोर
मूळ कथेला साजेसं ध्वनिमुद्रण आवडलं!
अजून असे प्रयोग 'ऐकायला' आवडतील.
ता.क. पार्श्वसंगीत अतिशय उत्तम अन साजेसं आहे
28 Aug 2020 - 12:25 pm | प्रशांत
प्रयोग आवडेश
30 Aug 2020 - 1:39 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, प्रशांत !
30 Aug 2020 - 1:28 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, पैलवानजी ! पार्श्वसंगीता बद्दलच्या प्रतिक्रियेसाठी विशेष आभार !
येत्या काळात मिपाकर भीडू बरोबर असा वाचनाचा प्रयोग करावा असा विचार आहे !
30 Aug 2020 - 2:22 pm | तुषार काळभोर
तुमच्या प्रयोगांची मेजवानी आम्हाला मिळत राहो!!
28 Aug 2020 - 12:18 pm | कंजूस
जमली की!
31 Aug 2020 - 12:48 pm | चौथा कोनाडा
पहिल्याच वेळेस "जमलं की" चा आनंदच वेगळा असतो !
कंजूसजी, धन्यवाद !
29 Aug 2020 - 10:59 am | महासंग्राम
क्या बात जबरदस्त शैली आहे वाचनाची
31 Aug 2020 - 12:59 pm | चौथा कोनाडा
तुमच्या कौतुकपर "जबरदस्त शैली" या शब्दात आपुलकीने धप्पाक्किनी पाठीवर थाप मारल्याचा रोमांचक आवाज आला !
महासंग्राम धन्यवाद !
29 Aug 2020 - 11:15 am | अनिंद्य
@ चौथा कोनाडा,
श्री-सौ कथावाचकांची जोडी छान जमली आहे.
नवा प्रयोग जमून आलाय, अगदी रजिस्टर आपटण्याच्या बारीकसारीक आवाजांसकट !
31 Aug 2020 - 1:03 pm | चौथा कोनाडा
श्री-सौ कथावाचकांची जोडी छान जमली आहे.
मस्त गुलाबी गुलाबी वाटलं ! ;-)
पेशल कौतुकासाठी पेशल धन्यवाद अनिंद्य !
29 Aug 2020 - 12:13 pm | गणेशा
रामदासजींच्या कथा, लेख मिपावर 2010 ला पुन्हा आल्यावर झपाट्याने वाचले होते, मस्त. काटेकोरांटीची फुले हा खुप आवडला होता लेख.
---
तुमचं मी पहिलच कथावाचन ऐकले.. अतिशय छान, छोटे छोटे बारीक प्रसंग, आवाज.. त्यातील चढउतार आवडले.
कथा ऐकताना मला मात्र ह्या कथेची making कशी रंजक असेल असे वाटत राहिले..
म्हणजे..
कथा वाचण्यासाठी त्याचा सराव करताना आवाज कसे कुठे वापरले पाहिजेत, सरांचा आवाज कसा काढला पाहिजे हे ठरवणे.
सौ ने कुठले वाक्य झाल्यावर मध्ये बोलायचे हे तुम्ही सांगितले असेल.
कथा वाचन करताना, खुर्ची टेबलावर किंवा खिडकीच्या बाजूला बसून कथा वाचन करत असाल असे उगाच वाटले.
रजिस्टर चा आवाज ठेवल्याचा आवाज बाईंनी केला तेंव्हा सौं नी तो आवाज केला असे वाटला.
सरांच्या रजिस्टर तुम्ही आपटले असे वाटले.. :-))
मग मध्येच खोकण्याचा आवाज आल्यावर, तो दूरच्या आवाजाकडे दुर्लक्ष करताना, तरीही एका हाताने अरे थांबा असा इशारा केला असेल..
बाकी' मी चौथा कोनाडा 'हे नाव तुम्ही सुरवातीलाच इतके भारी घेतले की चौथा कोनाडा म्हणुन मीपा वर तुम्हाला वाचताना जी प्रतिमा डोळयांसमोर यायची ती पुसून आता वेगळीच प्रतिमा डोळयांसमोर आली..
वाचत रहा.. आम्ही ऐकतो :-))
31 Aug 2020 - 5:18 pm | चौथा कोनाडा
गणेशा, काय जबरदस्त प्रतिसाद दिलाय !
सगळेच छोटे-छोटे तपशिल पकडलेत, दाद द्यायलाच हवी !
रामदासजींचे लेखन अप्रतिम आहे म्हणुन त्यांची कथा निवडावी वाटली.
कथा वाचनाची मेकींग अगदी अशीच होती. सरावाच्या वेळा जुळवायला कसरत झाली, मनासारखा पुरेसा सराव झाला नाही असे शेवट पर्यन्त वाटत राहिले.
शेवटची तारिख जवळ यायला लागग्ल्यावर रेकॉर्ड करावेच लागले. ( .... आणि असे छान प्रतिसाद आल्यावर चीज झाल्यासारखे अर्थातच वाटले ! )
वाचत रहा.. आम्ही ऐकतो :-))
व्वा, किती छान अॅप्रिसियेशन ! थॅन्क्यू गणेशा !
29 Aug 2020 - 10:25 pm | Bhakti
क्या बात!उतार चढाव,सौं ची उत्तम साथ .छान प्रयोग आहे.
31 Aug 2020 - 5:23 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद भक्ति !
शेवटी ... प्रत्येक यशस्वी मिपाकराच्या मागे एक अनाहिता असते ! :-)
30 Aug 2020 - 3:32 pm | टर्मीनेटर
प्रयोग: कथावाचन-बाप
निरीक्षण:
१) रामदास लिखीत ‘बाप’ ही कथा फार छान आहे.
२) श्री व सौ ‘चौथा कोनाडा’ ह्यांनी साजेशा पार्श्वसंगीताचा वापर करून सदर कथेचे अभिवाचन उत्तम प्रकारे केले आहे.
अनुमान: प्रयोग १००% यशस्वी झाला असुन श्रोत्यांच्या पसंतीस उतरल्याने चौथा कोनाडा ह्यांनी मिपावरील अनेक दर्जेदार कथांचे अभिवाचन करून त्याचा एक संग्रह मिपावर प्रकाशीत केल्यास त्यास वाचक/श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद नक्कीच मिळेल.
31 Aug 2020 - 12:08 am | स्मिताके
अभिवाचन उत्तम जमले आहे. टर्मीनेटर यांच्या सूचनेला +१
5 Sep 2020 - 12:28 pm | चौथा कोनाडा
@स्मिताके, खुप खुप धन्यवाद !
5 Sep 2020 - 12:26 pm | चौथा कोनाडा
व्वा, छान प्रतिक्रिया ! धन्यवाद, टर्मीनेटर !
खरंच रामदासजी यांची ही कथा जबरदस्तच आहे !
आम्हा उभयतांचे कौतुक केल्या बद्दल पेशल आभार्स !
अभिवाचन संग्रह : भारी आयडिया पण लै मोट्टं टारगेट ! :-)
31 Aug 2020 - 7:16 am | सुमो
सुरेख झाले आहे. रामदासांच्या उत्तम कथेला श्राव्य माध्यमात आणण्याचा हा प्रयोग यशस्वी झालाय हे नक्की.
ऑडिओबुक्स हा अलिकडे लोकप्रिय होत चाललेला माध्यमप्रकार. मिपाचे या नवीन माध्यमात पहिले पाऊल तुमच्यामार्फत पडले आहे. अभिनंदन.
5 Sep 2020 - 5:12 pm | चौथा कोनाडा
@सुमो, धन्यवाद !
खुप भारी वाटले !
5 Sep 2020 - 9:37 am | मोगरा
खुपच सुंदर.
5 Sep 2020 - 5:12 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, मोगरा !
5 Sep 2020 - 9:43 am | प्रचेतस
क्या बात..!
हा अभिनव प्रयोग खूप आवडला. आवाजातला चढउतार उत्तम आहे.
5 Sep 2020 - 5:13 pm | चौथा कोनाडा
थॅन्क्यू प्रचेतस !
7 Sep 2020 - 8:16 pm | नूतन
अभिवाचन खूप सुंदर!
13 Sep 2020 - 12:57 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, नूतन जी !
16 Sep 2020 - 1:54 pm | jo_s
खूपच छान , सर्व पात्रे तुम्ही डोळ्यासमोर उभी राहिली.
आवाजातील चढ उतार एकदम परिणाम कारक.
सौंचेही संवाद उत्तम
उचित आणि आवश्यक तेवढाच पार्श्वसंगीताचा वापर अगदी परिणाम कारक
एकुणच सुंदर कलाकृती
18 Sep 2020 - 5:18 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, जो_एस सर, या दिलखुलास कौतुकासाठी !
🙏
18 Sep 2020 - 5:42 pm | सौंदाळा
उत्तम प्रयोग.
आवाजातले चढ-उतार, पार्श्व सन्गीत मस्तच
20 Sep 2020 - 8:27 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, सौंदाळा साहेब !
18 Sep 2020 - 7:32 pm | मदनबाण
पहिलाच प्रयोग छान जमला आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू
20 Sep 2020 - 8:28 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, मदनबाण !
26 Jun 2021 - 1:47 pm | चेतन सुभाष गुगळे
ऑडिओ फाईलमध्ये १५ व्या मिनिटानंतर बॅनरवर नाव वाचण्याचा प्रसंग आहे तिथे विक्रम भट्टे असा आवाज का येतोय? मूळ कथेत नाव विश्राम असं आहे ना? अभिवाचनातल्या मथुरे सरांनी लॉकडाऊन मध्ये विक्रम भट्टचे सिनेमे आणि वेब सिरीज फार बघायचेत का?
26 Jun 2021 - 10:34 pm | चौथा कोनाडा
अभिप्रायासाठी धन्यवाद, चेतन सुभाष गुगळेजी !
अभिवाचनासाठी काही बदल केले होते, हा ही त्यातलाच एक !
आपल्या निरिक्षणशक्तीचे कौतुक आहे !
😂
नाही, त्यांना जुन्या ज्युली सिनेमातला "विक्रम" आठवत असावा !