काठियावाडी मिरच्या

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
24 Aug 2020 - 9:50 am

मिपाकर तुम्हाला वाटत असेल गणपतीमध्ये गोडधोड सोडून हे काय तिखट मिरची?खूप खूप मोदक करून,खाऊन झाले.

तेव्हा अशाच लोळत पडलेल्या दोन पोपटी लांब लांब मिर्च्यांकडे लक्ष गेले.आल्या तेव्हा चांगल्या तरतरीत होत्या,आता पार आळसावल्या होत्या.चिडून कि काय लाल व्ह्यायला लागल्या होत्या.विचार करीत असतील आम्हाला ही घेते की म्हाताऱ्या झाल्यावर फेकते.

तेव्हा डोक्यात आलं,ते काठीयावाडी पद्धतीने बेसन पिठ पेरून खूप दिवसांपासून मिरच्या करायच्या होत्या.तेव्हा आजचा मुहूर्त चांगला आहे.तसही यापूर्वी नोकरी सांभाळून २० मिनिटांत स्वयंपाक करण्याची कला मी आत्मसात केली होती.ती मोडली ,पण हे यु ट्यूब वर पाककृती पाहून करण्यात एक शोधनिबंध वाटतो मस्त...

तेव्हा यु ट्यूब मावशीकडे गेले.शोधाशोध सुरु केली.एक पाककृती पाहून कधीच मी सुरुवात करत नाही.चांगल्या दहाबारा पाककृती पाहते.आपल्याकडे असलेले जिन्नस पूरक असतील तर सुरुवात करते.आणि स्वत:चीच एक अनोखी पाककृती तय्यार होते.माझी पद्धत पुढील प्रमाणे आहे.
साहित्य
१.दोन लांब पोपटी मिरच्या(ह्या तिखट नसतात.)
२.एक वाटी बेसन(घरच दळलेल नको,हिरा बेसन पाहिजे,(एक जीव होते.)
३.अर्धा वाटी चिरलेला कांदा(कांदा पाहिजेच ह ..नाहीतर मज्जा नाय)
४.आलं –लसून-मिरची वाटण
५.फोडणीसाठी-चमचाभर जिरे,ओवा,हळद,हिंग
६.दोन चमचे लिंबाचा रस(
७.एक चमाचा साखर

कृती:
प्रथम मिरच्यांचे उभे काप करा.काप करतांना दांडीच्या समोर न करता बाजूला काप करा.त्याने सारण नीट राहते. आतील बिया काढून टाका.

सारण करण्यासाठी कढईत दोन मोठे चमचे तेल घ्या.छान तापल्यावर जिरे,ओवा ,हळद ,आलं-लसूण-मिरची वाटण टाकावे.आता कांदा टाकावा .चांगला परतून घ्यावा.
आता मुख्य नायक बेसन पीठ अर्धी वाटीच टाकावे परतून परतून घ्यावे,जाळण्याचे टाळावे ..फक्त कच्चे राहता कामी नये.परत उरलेले पीठ टाकावे.

लिंबू रस टाकावा आणि एक चमचा साखर टाकावी..सगळ्या चवी एकीकडे आणि आंबट –गोड चव एकीकडे ..जिभेवरच सुख म्हणजे हेच ..अहाहा .
तर अशाप्रकारे सारण कढईतून काढून घ्यावे आणि थंड होऊ द्यावे.

अधीर झालेल्या मिरच्यांमध्ये हे सारण भरावे.अलगद पुन्हा तेल असलेल्या कढईत त्यांना सोडावे.मुक्तपणे तळून तळून द्यावे .कढईवर झाकण ठेवावे त्यात पाणी टाकावे म्हणजे आत मिरच्या शिजतील.(लक्ष असू द्या नाहीतर कोळसा होईल अनुभवाचे बोल).

शेवटी मस्तपणे आनंदाने भाकरी वा पोळीसोबत ताव मारावा.

पहिलीच वेळ आहे अशा काठियावाडी मिरच्या करण्याचा तेव्हा चलचित्र कसेही असले तरी चव अप्रतिम झाली आहे.:)
-भक्ती
https://drive.google.com/file/d/1bccbuGICZKZJrcfxMojnkBkZdXUASRMJ/view?u...

फोटो उपलोड करणे शिकतेय सध्या हाच गुगल वर उपलोड झाला आहे.

प्रतिक्रिया

फ़ोटो लिंक ओपन करून डॉनलोड करा म्हणतोय , एक सोप्पी आयडिया सांगते आपले रेसेपी फ़ोटो फेसबुक वर अपलोड करुन सेटिंग ओन्ली मी करुन त्या फोटोची लिंक कॉपी पेस्ट करुन इमेज सोर्से मध्ये दया , एकदम easy पड़त

Bhakti's picture

24 Aug 2020 - 2:46 pm | Bhakti

..

Bhakti's picture

24 Aug 2020 - 2:49 pm | Bhakti

.

मला फोटो दिसत नाहीयेत (बरं आहे नाही दिसत ते :P ), पण अशा मिरच्या मिळाल्या कि नक्की करून बघेन.

इथे देण्यासाठी गूगल ड्राइव्हची शेअर्ड लिंक थोडी दुरुस्त करुन वापरावी.

ही फोटोची मूळ धाग्यात दिलेली लिंक.(क्र.१) https://drive.google.com/file/d/1bccbuGICZKZJrcfxMojnkBkZdXUASRMJ/view?u...

या लिंकमधील file/d/ ह्याजागी uc?export=download&id= हे टाकायचे. तसंच शेवटीचा /view?usp=sharing हा भाग काढायचा.

आता लिंक अशी दिसेल.(क्र.२) https://drive.google.com/uc?export=download&id=1bccbuGICZKZJrcfxMojnkBkZ... ही तुमच्या गूगल ड्राइव्ह फोटोची डायरेक्ट लिंक.

हा सगळा उपद्‌व्याप करायचा नसेल तर हे वेबपेज उघडा

पहिल्या रकान्यात लिंक क्र.१ टाका. Generate बटन क्लिक करा.दुसर्‍या रकान्यात डायरेक्ट लिंक मिळेल.

हीच डायरेक्ट लिंक मिपावर फोटो देण्यासाठी वापरायची.

लेखन किंवा प्रतिसाद खिडकीच्या वरच्या बाजूस सूर्योदयाचे चित्र क्लिक करायचे. फोटो चिकटवण्यासाठीचा एक फॉर्म उघडेल.

Mipa

पहिल्या रकान्यात [image url] गूगल ड्राइव्ह फोटोची डायरेक्ट लिंक पेस्टवा.
दुसर्‍या रकान्यात width इथे 500 टाका. Height हा बॉक्स रिकामा ठेवा.
तिसर्‍या रकान्यात फोटोसंबंधी एक शब्द टाका. उदा. Mirchi
Ok बटन क्लिकवा.

लेखन/प्रतिसाद खिडकीच्या वर डोळ्याचे चित्र असलेला आयकॉन क्लिक करा. फोटो दिसत असल्याची खात्री करुन घ्या.

Eye

प्रसिद्ध करा.

फोटो असा दिसेल.

Mirchi

हे फारच बेसिक पासून लिहिले आहे. जुन्याजाणत्यांनी दुर्लक्ष करावे.

Bhakti's picture

25 Aug 2020 - 11:55 am | Bhakti

खरच थंक्यु!!

गणेशा's picture

25 Aug 2020 - 9:08 am | गणेशा

मस्त..

पियुशा,वीणा, गणेशा,सुमो :)