श्रीगणेश लेखमाला २०२०- प्रस्तावना

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
22 Aug 2020 - 7:22 am

1

नमस्कार मिपाकर्स..

सालाबादप्रमाणे गणरायांच्या आगमनाचा दिवस आला आहे.
आज आहे मिपा परिवाराचा १४वा वर्धापनदिन!

आणि हाच तो दिवस जेव्हा येते मिपाची श्री गणेश लेखमाला. दरवर्षी आपण एका संकल्पनेभोवती लेखमाला गुंफतो आणि ती वाचकांसमोर सादर करतो.
1
यंदाच्या नवव्या लेखमालेची संकल्पना आहे आठवणी, स्मृती, नॉस्टॅल्जिया. आपल्याला आठवणी किती प्रिय असतात, हे यंदाच्या श्रीगणेश लेखमालेच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात येते. गणेशोत्सवाचे दहा दिवस आपण साधारण दहा ते पंधरा लेख प्रकाशित करतो. यंदा चाळीसहून अधिक लेख व्य नि आणि ईमेलने प्राप्त झाले. त्यातून निवडक लेख घेणे हे तसे जिकिरीचे काम होते. सर्व चांगल्या लेखांना जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल, याचा प्रयत्न करत आहोत.

यानिमित्ताने काही नवे सदस्य आपल्या परिवारात सामील होत आहेत. त्यांचंही मनःपूर्वक स्वागत. तुम्ही लिहिते राहाल, याची खात्री आहे. मिपावर अनेक तरुण, उत्साही, नव्या विचारांचे सदस्य येत आहेत. त्याने आपल्या सर्वांचे मिपायुष्य जास्त समृद्ध होत राहील.

पुढचे दहा दिवस उत्साहाचे, चैतन्याचे, मांगल्याचे अन आपल्या मिपाच्या श्रीगणेश लेखमालेचे आहेत. आपलं मिपावरील प्रेम, लोभ असंच अखंडित राहू द्या.

तुम्हाला, तुमच्या परिवाराला, मित्रपरिवाराला गणेशोत्सवाच्या आणि चौदाव्या मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

22 Aug 2020 - 8:39 am | टर्मीनेटर

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपाच्या चौदाव्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री गणेश लेखमालेत उत्तमोत्तम लेखन वाचायला मिळेल अशी खात्री आहेच !

कुमार१'s picture

22 Aug 2020 - 9:23 am | कुमार१

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपाच्या चौदाव्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुषार काळभोर's picture

22 Aug 2020 - 9:54 am | तुषार काळभोर

मिपाचा चौदावा वर्धापनदिन!!

आणि लेखमालेलासुद्धा नऊ वर्षे झाली की.. मिपावर साहित्यिक समृद्धी दिवसेंदिवस बहरत राहो या शुभेच्छा!

प्रचेतस's picture

22 Aug 2020 - 10:33 am | प्रचेतस

गणेशोत्सव आणि मिपावर्धापनदिनाच्या सर्वांना शुभेच्छा.

उत्तमोत्तम लेखांची वाट पाहात आहे.

दुर्गविहारी's picture

22 Aug 2020 - 11:10 am | दुर्गविहारी

गणेशोत्सवाच्या आणि मिसळपाव संकेतस्थळाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा !

जव्हेरगंज's picture

22 Aug 2020 - 11:30 am | जव्हेरगंज

गणपती बाप्पा मोरया!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Aug 2020 - 2:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर्धापन दिनाच्या मालक, चालक, तंत्रज्ञ, मिपाकर लेखक, वाचक, सदस्य, सर्वांना खुप खुप शुभेच्छा.....! मिपाची प्रगती अशीच होत राहो, हीच त्या गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो.

गणेशलेखमालिकेत लेखन करणार्‍या सर्व लेखकांचंही कौतुक आहेच, आता एकेक लेख वेळ मिळेल तसे वाचत राहीन. दाद सर्वांनाच देईन असा माझा संकल्प आहे, बघुया कसे जमते ते....!

गंपती बप्पा मोरया....!

-दिलीप बिरुटे.
(कट्टर मिपाकर)

चौथा कोनाडा's picture

22 Aug 2020 - 5:53 pm | चौथा कोनाडा

सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि मिसळपावआणि मिपाच्या चौदाव्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री गणेश लेखमालेत उत्तमोत्तम लेखन वाचायला मिळतील ही मोठी मेजवानीच म्हणायची !

अनिंद्य's picture

22 Aug 2020 - 6:44 pm | अनिंद्य

गंपूच्या बर्थडेच्या आणि मिपाच्या चौदाव्या वर्धापनदिनाच्या सर्वांना शुभेच्छा _/\_

मदनबाण's picture

22 Aug 2020 - 6:45 pm | मदनबाण

रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्यरक्षकं। भक्तानामभयं कर्ता त्राता भव भवार्णवात्॥

सर्व मिपाचालकांचे आणि मिपाकरांचे अभिनंदन !
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ranjan gavala | Female version | new song | by kartiki

वामन देशमुख's picture

22 Aug 2020 - 7:38 pm | वामन देशमुख

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपाच्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

पाषाणभेद's picture

22 Aug 2020 - 10:06 pm | पाषाणभेद

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपाच्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणां सर्वांस आत्मिक आनंद, प्रेम आणि समाधान लाभावे हीच गणरायाकडे प्रार्थना!

मिपाच्या वर्धापनदिना निमित्त आणि लेखमालेसाठी सर्वांना अनेकानेक शुभेच्छा!

सस्नेह's picture

23 Aug 2020 - 3:20 pm | सस्नेह

सर्वांना श्रीगणेश आगमनानिमित्त शुभेच्छा आणि मिपाला वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
श्रीगणेश लेखमालेच्या रुपड्याबद्दल उत्सुकता.

बिपीन सुरेश सांगळे's picture

24 Aug 2020 - 11:40 pm | बिपीन सुरेश सांगळे

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपाच्या चौदाव्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व वाचकांना, लेखकांना , संयोजकांना गणेशोत्सव मंगलमय जावो !