माझ्या ऑफिसजवळ एक शेरेटन आहे. आमच्या बर्याच मीटिंग तिथे होत असतात. कधी कधी जेवण पण तिथेच असतं. त्यांच्या जेवणात हमखास ब्रेड पुडिंग असतं अन ते एकदम 'फिंगर्लिकिंगडेलिशस' असतं.
ऑफिसमधल्या दोन चार लोकांना त्यांच्या रेसिपीज विचारून , ट्रायल ऍन्ड टेरर करून शेवटी या पाककृतीपर्यंत आलंय गाडं. हे घरच्या सगळ्यांना आवडतं.
एका स्टिलच्या पातेल्यात अर्धा कप साखर करपवून घ्यावी व हे करपलेले मिश्रण ( कॅरमेल ) एका ९ इंच व्यासाच्या ओव्हनप्रूफ भांड्याच्या तळाला व कडांना एक इंच पर्यंत पसरवून घ्यावे. हे गोल भांडे थोडावेळ ( ३० मिनिटे पुरतील ) फ्रीझमधे ठेवावे.
एक दिवसाचा शिळा ब्रिओश किंवा हाला ब्रेड (किंवा अंडं घातलेला कुठलाही गोडसर ब्रेड ) च्या अर्धा इंच जाडीच्या स्लाइसेस कराव्यात.
एका भांड्यात ६ अंडी , अर्धा कप मस्कारपोने चीझ( किंवा साधं सॉफ्टन केलेलं क्रीम चीझ ) २ -३ टे स्पून साखर एकत्र फेटावं. २टिस्पून व्हनिला इसेंस किंवा आल्मंड इसेंस घालावा. त्यात हळू हळू अर्धा कप दूध घालून फेटावं. ब्रेडच्या स्लाइसेस एकेक करून या मिश्रणात २-३ बुडवून मग तळाशी कॅरमेल लावलेल्या भांडयात रचाव्या . उभ्या, रेडियल टायर सारख्या दिसतील अशा रचल्या तर छान दिसते हे पुडिंग. मग उरलेलं दुध, अंड्याचं मिश्रण या स्लाइसेसवर ओतून , प्लास्टिक रॅप लावून हे भांडं फ्रीझ मधे १०-१२ तास ठेवावं.
नंतर ३२५ डिग्री फॅ वर १५-२० मिनिटे बेक करावं
मग यावर थोडे बदामाचे पातळ काप भुरभुर्वून परत १५ ते वीस मिनिटे बेक करावं.
ओव्हन मधून काढल्यावर कडांना सुरी फिरवून घ्यावी अन मग एका प्लेट वर हे भांडं उपडं करावं. ( हे करताना सांभाळून, ओव्हन मिटस घालावे व हे काम सिंकपाशी करावे )
प्रत्येक स्लाइस वर थोडे थोडे फ्रेश व्हिप्पड क्रीम घालून खावे .
पुढच्या वेळेस केलं की फोटो टाकीन.
प्रतिक्रिया
3 Apr 2009 - 10:53 am | भाग्यश्री
फोटो नक्की टाक शोनू.. आता खावसं वाटतंय..
बाकी, फिंगर्लिकिंग्डेलिशस आणि व्हीप्पड क्रिम जाम आवडलं!! =))
http://bhagyashreee.blogspot.com/
3 Apr 2009 - 6:39 pm | चकली
वाचायला मजा आली. रेसिपी लिहयची पद्धत छान आहे :)
चकली
http://chakali.blogspot.com
3 Apr 2009 - 6:53 pm | रेवती
वेगळीच पाकृ आहे.
फोटो दिला नाहीस ते बरं झालं ;)
नाहीतर लगेच करावसं वाटलं असतं.
तसंही करणार आहे हे पुडींग पण (वजनाच्या) सवडीने.;)
बाही पाकृ व लिहिण्याची पद्धत छानच!
रेवती
27 Apr 2009 - 1:44 pm | काजुकतली
प्लास्टिक रॅप लावून हे भांडं फ्रीझ मधे १०-१२ तास ठेवावं.
नंतर ३२५ डिग्री फॅ वर १५-२० मिनिटे बेक करावं
फ्रिजमधुन काढल्यावर लगेच ओवन मध्ये ठेवावं की रुम टेंपरेचरला यायची वाट पाहावी??
साधना
3 May 2009 - 6:53 pm | शोनू
ठेवायचं. प्लॅस्टिक रॅप काढायला विसरू नये फक्त :-)