भाग ३ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचय.

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
23 Jun 2020 - 12:35 am
गाभा: 

भाग ३ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचय.

1

कै. ओकांच्या लेखनातून ताजमहालाच्या वास्तूतील काही भागावर भाष्य केले आहे. त्यातील खालील वास्तूंवर विचार मांडले होते.
६.गौशाळा- या वास्तुचे अस्तित्व असे दाखवत नाही का कि गोपालनातून त्या वास्तूशी निगडित लोकांना दुग्धजन्य पदार्थ आणि गोमय वगैरेचा पुरवठा केला जाणे अपेक्षित होते. म्हणून गोशाळा असणे स्वाभाविक होते.
७. नगारखाना - पहाटेच्या वेळी मंगलवाद्ये वाजवून दिनक्रम सुरू करण्याची प्रथा या वास्तूतील नगारखान्यातून पूर्ण केली जात होती. शिवाय महत्त्वाचे निर्णय, निरोप वगैरे कळवायला तिथून शक्य होते.
८. बावडी - पिण्याच्या व वापरायला पाण्याची सोय ही मानवाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे अशा भव्य वास्तूत त्याचे स्थान कुठे होते?
९. श्री दरवाजा - सामान्यतः वास्तूत प्रवेशद्वारावर श्री, ऋद्धिसिद्धींचे मंगल दर्शन घेतले जावे असा संकेत आहे. दक्षिणेकडील दरवाजातून ताजमहाल वास्तूत प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग आहे. तिथल्या दरवाजाचे नाव जर सिरी, सिरही, सिद्दी असे आजही असेल तर ते श्री या शब्दाचे अपभ्रंश नाव आहे हे मान्य करायला हवे.

एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तकात यावर काय प्रकाश टाकतात?

२८७ पानावर इंडेक्स मधील संदर्भ असा आहे.

1

६. गोशाला असे ग्रंथाच्या शेवटी इंडेक्स पान १२० पहा म्हटले आहे तिथे काय दिसते?

गोशाला ‘इथे’ असे तिथल्या चित्राखाली लिहिलेले नाही. फतेहपुरी गेटच्या परिसरातील महाल उर्फ बुर्ज हा सफेद घुमट असेल तर उरलेली इमारत गोशाला असे मानावे लागेल. पुर्वेकडील दरवाज्याच्या भागातील ही इमारत २००३ पर्यंत गोशाळा म्हणून नावाने ओळखली जाते असे त्यांनी म्हटले आहे. ह्या इमारतीत किती गाईंचा गोठा असावा? चारापाण्याची सोय कुठे असावी? असे प्रश्न पडू शकतात.

1

माझ्या मते ती इमारत दूध एकत्रित करून राजवाड्यातील लोकांना वितरण करायची सध्याच्या डेअरीप्रमाणे वापराची वास्तू असावी. फक्त हिंदूच गाईचे दूध पीत असत असेही नाही. म्हणून ताजमहाल हिंदूंची वास्तू असावी असा निश्कर्ष काढणे घाईचे होईल. शहाजहान पुर्व काळापासून ती ज्या कामाला वापरली जात असेल म्हणून ते नाव व काम तसेच राहिले. २००३ नंतर ती काय कामासाठी वापरली जाते ते यात लिहिलेले नाही पण माझ्या वाचनात आले की ती विदेशी पर्यटकांच्या सोईसाठी वापरात आणली जाते.

७. नगारखाना-
1

मशिद आवारात असताना, मृत व्यक्तीच्या कबर भेटीसाठी जाताना गांभीर्याने शांतता पाळणे हे ज्यानी त्याची निर्मिती केली त्यांची अपेक्षा असते असे मानले तर नगारखान्यातून वेळी अवेळी काढलेले ध्वनी बंद ठेवणे अपेक्षित होते. पण आधीच्या इमारती मधील मंगल ध्वनिंवर नियंत्रण आणले गेले तरीही पूर्वीचे संबोधन तसेच प्रचलित राहिले असावे.


८ बावली(डी) -
पान १९८वरील नकाशात बावडी दाखवलेली आहे. पण बावली वा बावडीच्या इमारतीचे आतून दर्वशणारे रंगीत चित्र दिसत नाही. मात्र दुसऱ्या ठिकाणच्या १६व्या शतकातील ११ पायऱ्यांची बावडी (ग्यारह सीढी) रंगीत फोटोत दिसते. त्या म्हणतात,
"The tower to the south of the mosque houses a baoli, or step well, built in red sandstone. Elaborate well constructions with staircases and galleries are a characteristics feature of Indian architecture throughout the centuries, and we're adopted by Muslim builders. The Taj baoli provides water independently of the waterworks outside the complex. It may have some symbolic connotation as a connection to the underworld, or to the mythical figure of Khwaja Khizr who is associated with wells, because according to Muslim lore he was found the water of life and gained immortality.
Other features mentioned … the octagonal chamber, descending three additional levels below ground".

1

वरील लेखनातून ताजमहालाच्या इमारत समूहाला एकूण किती मजले असावेत यावर त्यांनी भाष्य करणे अपेक्षित आहे. मुगलांचा पौराणिक ख्वाजा खिज्रशी काय संबंध? इंडियन म्हणजे कोण ते वाचकांनी समजून घ्यावे.
अन्य लोकांनी काढलेले त्या पायविहिरीचे रंगीत फोटो असल्यास कृपया सादर करावेत.
सध्याच्या काळात याच विहिरीला विजेचा पंप लावून पाणी बागेत फिरवून वनसंवर्धन केले जाते. आणि ठराविक वेळी ताज समोरील कारंजी उडवायला वापरले जाते असे मला तिथल्या हार्टिकल्चरच्या विभाग प्रमुखांनी २०१२ मधे भेटलो असता म्हटल्याचे स्मरते.
जेंव्हा विजेचा वापर केला जात नव्हता तेंव्हा बागेत, कारंजी उडवायला पाणीपुरवठा कसा केला जात होता? चर्चा पुढील भागात करता येईल.

९. श्री दरवाजाबाबत

This Sirhindi Tomb was built in the memory of another wife of Shah Jahan called Sirhindi begum. Due to this, the gate is known as ‘Sirhi Darwaza’.

1

याचे नाव सिरही कसे पडले? सरहिंदची बाई म्हणून सरहिंन्दीची कबर जवळ आहे. त्याचे इंग्रजीतील स्पेलिंग Sirhi म्हणून ते सिरही गेट. याच दरवाज्याला Sidhi (कि सिद्धी?) दरवाजा असेही म्हणतात. असे वर वाचायला मिळते. त्याचे स्पष्टीकरण मात्र दिलेले नाही.

पुढे चालू…

१०. यमुनेच्या पात्रातून इतक्यावरच्या पातळीवर खेचून पाणी पुरवठा करायची योजना कशी होती?
११. ताजमहाल प्रमाणे इतर कोणाच्या कबरी असलेल्या इमारती यमुनेकाठी आज आहेत का?
१२. त्या कबरींच्या तळघरातील मजल्यात खरी आणि वरच्या मजल्यावर ओघानेच खोटी कबर मिळते का?
१३. फारसी भाषेत कोरून लिहिलेल्या पट्टीवर कारागिरांनी आपली नावे त्यात लिहिली आहेत?

The beauty of Taj Mahal has inspired Dubai to build a bigger replica of it. खऱ्या ताजमहालापेक्षा जास्त भव्य वास्तूला भेट देऊन दुबईतील मिपारहिवासी आपला अभिप्राय देतील काय?

प्रतिक्रिया

योगविवेक's picture

24 Jun 2020 - 1:44 pm | योगविवेक

गोशाळा, नगारखाना, श्री दरवाजा, बावडी वगैरे महत्वपूर्ण बाबतीत उडवून लावलेले स्पष्टीकरण वाचून इंडियन (हिंदू न वापरून त्यांनी काय दर्शवले आहे? ) वास्तूंची वाट कशी लावायची याचा आदर्श घालून दिलेला आहे.

शशिकांत ओक's picture

24 Jun 2020 - 10:37 pm | शशिकांत ओक

आपण योग्य निष्कर्ष काढला आहेत.

कंजूस's picture

24 Jun 2020 - 11:04 pm | कंजूस

वाचतो आहे.
आपण ( आग्राजवळ न राहणारे) आयष्यात जक दोनदाच जाणारे. फारशी चौकशी, निरीक्षणं करत नाही.

शशिकांत ओक's picture

25 Jun 2020 - 7:46 pm | शशिकांत ओक

उन्हाळ्यात पायाला चटके सहन करत पटापट पुढे जाऊन जितके जास्त पाहता येईल तेवढे पाहून आल्याचे समाधान मानावे लागते.
खरी व खोटी अशा दोन कबरी का वगैरे प्रश्न निर्माण होतो पण नंतर असेल काही कारण म्हणून सोडून दिलं जातं

दुर्गविहारी's picture

26 Jun 2020 - 10:53 pm | दुर्गविहारी

खरतर हे संशोधन आग्र्यासारख्या ठिकाणी स्थायिक असणार्‍या व्यक्तिंनी केले तर अधिक सखोल प्रकाश पडेल.स्थानिकांना अनेक बारकावे माहिती असतात.

योगविवेक's picture

27 Jun 2020 - 9:53 pm | योगविवेक

ओक सर ज्या ऐतिहासिक वास्तूंना भेट देतात तिथल्या इतिहास प्रेमी तरुणांच्या ग्रुपमध्ये सामिल होतात. सापुतारा, वणी, कांचनबारीतील भागात फिरताना मी त्यांच्या बरोबर होतो. कळवणला त्यांना भेटायला तिथल्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य हॉटेल मध्ये आले होते. असे सरांनी पन्हाळ्यामधून, हळदीघाटीतील, सुरतेत, परांडा वगैरे भागातील गड आणि किल्ल्यांच्य प्रेमींशी नाते जोडले आहे.

शशिकांत ओक's picture

30 Jun 2020 - 9:15 am | शशिकांत ओक

योग विवेक
आता या लेखमालेच्या निमित्ताने कोणी दुबई, अबुधाबी, शारजाह शहरातील मिपाकरांनी मनावर घेतले तर तिथल्या ताजमहाल प्रतिकृतीची विशेष व ताजी माहिती संकलित होईल.

शशिकांत ओक's picture

27 Jun 2020 - 10:59 pm | शशिकांत ओक

तुझ्यासारख्या साहसी व बहुश्रुत तरुणाने नाडी ग्रंथांमुळे निर्माण झालेली आपुलकीची जवळीक आजही टिकवून ठेवली आहे..