मिसळपाव साइटवर लेखनात audio file देणे.

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
25 May 2020 - 11:33 am

मिपावर mp3 ओडिओ फाइल देणे.

ओडिओ फाईल्स या .wave / .wav / .mp3 / .aac / .ogg असू शकतात. पण काहीच वर्शन अपलोड होतात.
फाईल प्रथम कुठल्यातरी sharing साइटवर टाकून ( अपलोड करून) तिथून लिंक मिळवावी लागते. ती इथे द्यायची.
लिंक मिळवण्यासाठी तीन साईट्स ट्राई केल्या आहेत.

A )गूगल ड्राइव
गूगल ड्राइववर पूर्वी ओडिओ प्लेअरचा कोड मिळत असे. आता दिसत नाही. https://drive.google.com/drive/my-drive
हे उघडून sign in करणे जीमेल आइडीने.
- upload file
- share करणे. लिंक मिळेल.
ओडिओची लिंक >>>share+ >>> to people added किंवा to anyone पैकी दुसरा to anyone करणे >>> कॉपी करून साईटला देणे.
Google drive 1) secure , 2)15gb free storage आहे. . . . . पण लिंक मधून तुमचे नाव ओपन होते. एक वेगळा जीमेल आइडी अकाउंट यासाठी वापरता येईल.

B ) Clyp_ dot_ it ही साईट वापरून.
- https://clyp.it
- हे ओपन करणे,
- मोबाईलमधून करत असल्यास कदाचित डेस्कटॉप पेज उघडावे लागेल.
- upload
- save
- name, description भरून पुन्हा save केल्यावर
- खाली दोन लिंकस मिळतात. Direct आणि embed for player.
१) secure आहे, २) अकाऊंट करता येते, त्यात पाच सहा तासांचे रेकॉर्डिंग फ्री मिळते, ३) ओडिओ लिंक मिळते शेअरिंगची, ४) ओडिओ प्लेअर embed code ही मिळतो, ५) तुमची ओळख गुप्त राहते.

C ) Jumpshare site
- https://jumpshare.com उघडावी.
- अकाउंट करावे लागेल.
- ओडिओसह , फोटो, विडिओ, पिडिएफ अपलोड करून साठवता येतात. फ्री वर्शन 2GB.
- शेअरिंग लिंक काढून इथे देणे.

फेसबुकवर हे ओडिओ अपलोड सापडले नाही.
साइट्समध्ये सतत बदल केले जात असतात.
करून पाहा.
सूचना, सुधारणांचे स्वागत.

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

25 May 2020 - 12:03 pm | संजय क्षीरसागर

करुन पाहतो

पाषाणभेद's picture

25 May 2020 - 11:20 pm | पाषाणभेद

आभार.

प्रथमत: असे सांगावे वाटते की ऑडीओ फाईल्स हा आपला, मिपाचा युएसपी नाही. तसे अपलोड केल्याने बरेच जण लिखाणाचे ऑडीओ अपलोड करतील. जे अनाठाई.आहे.

दुसरे असे की वरील साईटसवर आपले ऑडीओ कायमचे जतन केले जातात का? की आहे ती लिंक टेंपररी असते?

संजय क्षीरसागर's picture

26 May 2020 - 12:11 am | संजय क्षीरसागर

साइटवर (निदान गुगल ड्राइववर तरी) डेटा आपण डिलीट करेपर्यंत राहतो.

कंजूस's picture

26 May 2020 - 6:01 am | कंजूस

मिपाचा युएसपी नाही. >> ?
ओडिओ हे सुद्धा माध्यम आहे. समजा दिक्षीत आहाराची माहिती द्यायची आहे, किंवा मुलाखत ऐकवायची आहे तर हे उपयोगी आहे कारण अर्धा एक तासाच्या विडिओत चित्र काही बदलत नाही, महत्त्व ओडिआलाच आहे. त्या मोठ्या विडिओची एमपी३ फाईल दिल्यास स्क्रीन बंद ठेवून ऐकता येते. शिवाय ओडिओ फाइल साइज तीनचार एमबी लहान होते.
एक वेळ दिवाळी / विशेष अंकात मिपावर या माध्यमाचा वापर केलेले लेखन घेतले होते.
मूळ सोर्स साईटमधून ती फाईल डिलीट केली की इकडची लिंक निकामी ठरते.
पक्ष्यांचे आवाज पहाटे ऐकू येतात त्यासाठी मी हे ओडिओज दिले होते.

सुमो's picture

28 May 2020 - 10:19 am | सुमो

ही अजुन एक उपयोगी साईट. इथला ऑडीओ प्लेअर एम्बेड करता येतो.

rainbowc3 · Savare Aijaiyo Jamuna - Pandit Kumar Gandharva

कुमार गंधर्व

गूगल ड्राइव्ह वरच्या mp3 ची शेअर लिंक थोडी बदलून आपली ओळख न देता ऑडिओ प्लेयर एम्बेड करता येतो. त्याचा कोड देईन नंतर.

Nitin Palkar's picture

16 Jun 2020 - 8:01 pm | Nitin Palkar

सुंदरसा ऑडीओ शेअर केल्याबद्दल अभार्स.

निनाद's picture

28 May 2020 - 10:31 am | निनाद

एकुणच ध्वनिमुद्रण हे माध्यम जरा मागेच पडते असे वाटते. या निमित्तने त्याचा वापर होईल.

एका काळात मराठी मध्ये लिहिलेले लेखन ऐकण्याचा खुप आटापिटा केला होता. तशी सोय हियर २ रिड या Text-to-Speech (TTS) अ‍ॅप मध्ये उपलब्ध आहे. https://play.google.com/store/apps/details?id=org.hear2read.Marathi&hl=en पण त्यावर अजून बरेच काम व्हायला हवे. मराठी व्हॉइस सिंथेसिस साठी योग्य आवाज असलेले लोक त्या प्रकल्पाला मिळत नव्हते असे आठवते. सध्या काय स्थिती आहे माहीत नाही.

भारतात CDAC ने पण यावर काम केले आहे. https://tdil-dc.in/index.php?option=com_vertical&parentid=85&lang=en

गूगल ड्राइव्ह वर चढवलेली mp3 फाईल पब्लिक शेअर केली की ती लिंक साधारण अशी

https://drive.google.com/file/d/1p4ZYS6G4pzl1NU_820We9QEwum5EUEz3/view

किंवा अशी

https://drive.google.com/file/d/1p4ZYS6G4pzl1NU_820We9QEwum5EUEz3/view?u...

असते. ही लिंक थोडी बदलायची.
/file/d/ ऐवजी uc?export=download&id= ही ओळ पेस्टवायची म्हणजे ती लिंक अशी दिसेल.

>> https://drive.google.com/uc?export=download&id=1p4ZYS6G4pzl1NU_820We9QEw...

Audio tag वापरुन त्यात वरील बाणाने दर्शविलेली लिंक द्यायची.

<audio controls><source src="इथे बाणाने दर्शविलेली लिंक पेस्टवा">

आणि लेख किंवा प्रतिसादात द्या. ऑडिओ प्लेयर एम्बेड होईल.

हा असा....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jun 2020 - 7:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटी ऑडियो प्लेयर दिसतो दिसतो छान आहे. आता प्रयोग करणे आले.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

30 May 2020 - 8:23 am | प्रचेतस

उपयुक्त माहिती.

@सुमो, लिंक रिपेरिंग आइडिया आवडली. पण गूगलने ते बंद का केले माहित नाही.

साउंडक्लाउड बंद होणार अशी अफवा २०१६ मध्ये होती पण ती साईट अजून चालू दिसतेय. शिवाय ती साईट जरा मॉडन नवीन मोबल्यात बरी चालते.

चौथा कोनाडा's picture

30 May 2020 - 1:25 pm | चौथा कोनाडा

सध्या स्टोरीटेल सारख्या अ‍ॅप"ला मिळणारा प्रतिसाद पाहता येत्या काही काळात वाचण्या पेक्षा ऐकण्याला महत्व येणार हे नक्की !
मिपावर सुद्धा काही कालावधी नंतर असे "धागे" दिसू शकतील यात शंका नाही !

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jun 2020 - 11:40 am | अत्रुप्त आत्मा

यु ट्यूब व्हिडीओ इथे कसा लावावा?

कंजूस's picture

16 Jun 2020 - 9:14 pm | कंजूस

युट्युब विडिओ प्लेअर देण्यासाठी

Template
<iframe width="340" height="185" src="https://www.youtube.com/embed/12345678910" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

युट्युबची कोणत्याही प्रकारची लिंक मिळाली की त्यामध्ये एक आइडेंटिफायर कोड समान असतोच.
youtu_dot_be/इथे
किंवा
youtube_dot_com/watch?v=इथे

जी अकरा characters असतात ती कॉपी करून टेम्प्लेटात 12345678910 च्या जागी बदलायची आणि सर्व कॉपी पेस्ट करायचे.

सूचना-
१) कॉपी पेस्ट केल्यावर वरती डोळ्याच्या चिन्हावर टिचकी मारून प्लेअर येतो का पाहा.
२) तो आला तरच 'पाठवा' / 'प्रकाशित करा' बटण दाबा.

कंजूस's picture

17 Jun 2020 - 9:18 am | कंजूस

@ अत्रुप्त आत्मा
तुम्हाला
https://youtu.be/Ff82XtV78xo

या लिंकचा प्लेअर द्यायचा आहे ना?

Template
<iframe width="340" height="185" src="https://www.youtube.com/embed/12345678910" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

तुमच्या लिंकमधली

Ff82XtV78xo

ही अकरा अक्षरे

टेम्प्लेटात 12345678910 च्या जागी बदलून

<iframe width="340" height="185" src="https://www.youtube.com/embed/Ff82XtV78xo" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

असे दिसेल.
ते
मिपावर

असं येईल.

कंजूस's picture

17 Jun 2020 - 9:34 am | कंजूस

दुरुस्ती.
Width ="100%"

तुम्हाला
https://youtu.be/Ff82XtV78xo

या लिंकचा प्लेअर द्यायचा आहे ना?

Template
<iframe width="100%" src="https://www.youtube.com/embed/12345678910" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

तुमच्या लिंकमधली

Ff82XtV78xo

ही अकरा अक्षरे

टेम्प्लेटात 12345678910 च्या जागी बदलून

<iframe width="100%" src="https://www.youtube.com/embed/Ff82XtV78xo" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

असे दिसेल.
ते
मिपावर

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2020 - 7:29 pm | अत्रुप्त आत्मा

राईट. हेच!
धन्यवाद.

सध्या काय चालू आहे गुरुजी?

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2020 - 7:52 pm | अत्रुप्त आत्मा

थोडे काम,बाकी आराम!

सुमो's picture

18 Jun 2020 - 5:55 am | सुमो

सुंदरसा ऑडीओ शेअर केल्याबद्दल अभार्स

धन्यवाद @Nitin Palkar

आता प्रयोग करणे आले.-दिलीप बिरुटे

करून बघा सर.

जालावरील इतरत्र असलेलं संगीत सुद्धा एंबेड करता येतं. अट एकच की त्या गाण्याची डाउनलोड लिंक ही .mp3 असा शेवट असलेली असली पाहिजे.

उदाहरणार्थ, www.archive.org या इंटरनेट आर्काइव्ह साईट वर किशोरी आमोणकरांच्या 'सहेला रे' ची लिंक अशी आहे.

https://archive.org/download/SahelaRe_201306/sahela_Re.mp3

ही लिंक <audio controls> टॅग मध्ये दिली की झालं.

सहेला रे - किशोरी आमोणकर.

लताजींचं 'बैंया ना धरो' हे ही तिथलंच.

मूळ साईट वर जोपर्यंत गाणी असतील तोवरच प्लेअर चालेल हे वे सां न.

कंजूस's picture

18 Jun 2020 - 6:49 am | कंजूस

१) Youtubeवर विडिओ असतात ते सर्च करून सापडतात. मग त्यातला आवाज फक्त ओडिओ mp3 मिळवण्यासाठी बऱ्याच साइट्स आहेत. त्यातील ही एक.

https://youtubemp3free.org/

२) ती mp3 file 5-6 MB असू शकते. ती आणखी कम्प्रेस करण्यासाठी apps वापरायची.
त्यापैकी एक
Music editor ( Pony Mobile )
( https://play.google.com/store/apps/details?id=com.binghuo.audioeditor.mp... )

३) नंतर ती धाग्यात दिलेल्या साइट्सवर अपलोड करायची.
- clyp.it
- google drive
- soundcloud.com

इथे गाण्याचा ओडिओ प्लेअर मिळतो शेअरिंगला.
-- jumpshare.com
इथे लिंक मिळते.
४) सध्या शिक्षक / इतर लोक ओनलाइन धडे पाठवण्याच्या खटपटीत आहेत. त्यांना या धाग्याचा उपयोग होइल बहुतेक.

prajaktatoongar's picture

22 Jul 2020 - 5:08 pm | prajaktatoongar

मला आपल्या टीम मधे येता आलं त्यासाठी धन्यवाद....
माझं मराठी वर अधिक प्रेम जडेल ही आशा.....