बिबटया....

चिंतामणी करंबेळकर's picture
चिंतामणी करंबेळकर in भटकंती
5 Jun 2020 - 9:17 pm

बिबट्या
मध्यंतरी south africa मध्ये johansburg बसून साधारण 500 km अंतरावर असणारं kruger national park ला जाण्याचा प्लॅन केला. माझा मित्र - अरुण राव ( काका च्या वयाचा असला तरी मित्रच) , तिथे गाईड आहे, तिथे सफारी पण तोच अरेंज करतो, माझी जयड तयारी झाली होती, 2 SLR, 500mm ,300mm वगैरे सगळं घेतलं आणि जोहान्सबर्ग ला थडकलो, अरुण आला होताच, त्या दिवशी जोहान्सबर्ग मध्ये मुक्काम करून सकाळी निवांत kruger ला जायला निघालो, संध्याकाळी hazyview नावाच्या छोट्या शहरात पोचलो,
दुसऱ्या दिवशी पास काढणे आतल्या बुकिंग चे वगैरे सगळे सोपस्कार करून सफारी सुरू केली, जिराफ, हत्तींनी दर्शन दिलं, पण मी एक स्वप्न घेऊन आलो होतो ते म्हणजे बिबटया चं दर्शन, कारण असं की wildlife फोटोग्राफी च्या छंदापाई भारतात अनेक वेळा सफारी करून पण मला ह्या अलौकिक सौंदर्य असलेल्या ह्या बिबट्याने प्रत्येक वेळा मला हुलकवणीच दिली होती, कधी अर्ध्या सेकंदाची झलक तर कधी फक्त पाऊलखुणा, त्याने मला इतक्या वेळ हुलकावणी दिली होती की त्याला डोळे भरून पहायचं आहे हे मी माझ्या बकेट लिस्ट मध्ये कधी टाकून दिले ते मलाही कळलंच नाही,
असं म्हणतात की बिबट्या जेव्हा तुम्हाला दिसतो तेव्हा त्याने तुम्हाला किमान 10 वेळा तरी बघितलेले असते, ठिपकेदार शरीर असल्यानं थोड्याफार झाडीत गेला तरी सहजासहजी तो दिसणे कठिणच, परत वाघासारखा दांडगा प्राणी पण नाही हा. बिबट्या तसा बराच adjusting nature चा प्राणी,त्यामुळे हा कुठेही आणि कसाही जगू शकतो त्यामुळे संख्या भरपूर पण दिसणे कठिणच. बिबट्याची body language म्हणाल तर आपल्या घरच्या मांजराच सक्ख मोठं भावंड शोभेल. मांजराला वाघाची मावशी म्हणण्यापेक्षा बिबट्याची सख्खी धाकटी बहीण म्हणलं पाहिजे, तर असा हा बिबट्या.
सफारी सुरू झाली पहिल्या दिवशीच एका ओढ्यातल्या दगडावर "साहेब" बसलेले दिसले पण खूप लांब होता तो, पण तरीही मी आणि अरुण ने दोघांनी फोटो काढले, पाहताना लक्षात आलं की तो बिबट्या दगडाच्या बाजूला झुडपात काहीतरी पाहतोय, काय असावे असं आम्ही म्हणतोय ना म्हणतोय तोच त्या झुडपातून मादी बिबट्या त्याच्या पुढ्यात दाखल झाली... yess ती mating pair होती, त्यानंतर नुसते नर आणि मादीच नाही तर त्यांच्या mating चे फोटो पण मिळाले, पण हे दोघे खूप लांब होते आणि सावलीत होते त्यामुळे खूप भारी फोटो नाही मिळाले पण एक दुर्मिळ दृश्य आज दिसलं यात समाधान होतं
दुसऱ्या दिवशी जंगलातील सगळ्यात जुनं झाड पाहण्या साठी जाताना अचानकपणे एक बिबट्या मादी बाजूच्या झुडपात जाताना दिसली, गाडी थांबवून मागे घेई पर्यंत कुणास ठाऊक पण अचानक पणे दिसली. रस्त्याला अगदी खेटून असलेल्या झुडपातच बसली होती, इतकी जवळ होती की आमच्या दोघांची नजरानजर झाली. ती पण बिचकलेलीच होती त्या वेळी ती मला अगदी आमच्या घरच्या मांजरासारखीच वाटली.इतक्या जवळून मी निसर्गात बिबट्याला कधीच पाहिलं नव्हतं, केवळ अप्रतिम!! हे सगळं असूनही माझ्यातला फोटोग्राफर चा हावरटपणा काही कमी होत नव्हता, मला अजून छान फोटो हवे होते.
1
तिसऱ्या दिवशी भरपूर फिरलो सगळे प्राणी दिसले पण बिबट्या नाही दिसला मी अरुण ला म्हणलं ओण की बिबट्या नाही दिसला आज.... त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला... त्याच्या त्या नजरेत , एवढं चांगलं सायटिंग झालं ना अजून किती हावरे पणा करशील असं स्पष्ट दिसत होतं, आणि मला ही ते माहीत होतं जंगलात गेलं की कधी काय दिसेल हे सांगता येत नाही आणि कधी अनेक दिवस भटकून पण काहीच दिसत नाही. पण मी माझी इच्छा का सोडू? पण माझं नशीब जोरावर होत,एक बिबट्या दिसला त्याने इम्पला हरणाची शिकार केली होती आणि ते छिन्न विच्छिन्न हरीण त्याने झाडावर नेलं होतं कारण खाली तरसं आली होती. बिबट्याच्या त्याने केलेल्या शिकारी सोबत फोटो मिळणे दुर्मिळच... मग मी अरुण कडे कटाक्ष टाकला, तो ही हसला,म्हणला काय नशीब घेऊन आला आहेस तू....
2
तो दिवस होता 7 सप्टेंबर दोन दिवस आधी क्रूगर मध्ये पाऊस झाला होता, थंडी वाढली होती, गार वारा वाहत होता, अशा थंडीत जंगल सुद्धा गराठतेच, प्राणी कमी दिसतात, त्यावेळी ही तसच झालं होतं विशेष असं काही ह दिसलं नव्हतं, आम्ही फक्त भटकत होतो काहीतरी छान दिसेल या आशेने, आणि..... अचानकपणे समोरच्या झाडावर बिबट्या झोपलेला दिसला असा की मला जशी पोझ हवी होती अगदी तस्सा.... मी ते सुंदर दृश्य पाहून शून्यातच गेलो,अनेक वर्षांच्या वाट पाहण्यानंतर जे दृश्य मला दिसत होतं ते म्हणजे मेजवानीच होती. भानावर येऊन मी फोटो काढले, किती फोटो काढू आणि किती नको असं झालं होतं, पण नंतर मी कॅमेरा बाजूला ठेवला आणि डोळे भरून त्याला पाहिलं आणि मनात साठवून ठेवलं.
3
अनेक वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न आज चक्क पूर्ण झालं होतं ...
5:45 वाजले होते 6 वाजेपर्यंत गेटवर पोचायला लागतं..... . अरुणनी गाडी वळवली, गाडीत शांतता होती मी निःशब्द झालो होतो, डोळ्यातून धारा लागल्या होत्या, अतिशयोक्ती नाही पण त्या वेळेस आयुष्याकडून काहीच अपेक्षा राहिल्या नव्हत्या, अगदी मृत्यू जरी आला असता तरी मी आनंदाने सामोरा गेलो असतो. आजवर इतकं तृप्त मला कधीच वाटलं नव्हतं..…पूर्णपणे तृप्त मनानी मी भारतात परतलो, ह्या बिबट्याच्या दर्शनाने मला एक वेगळंच समाधान दिलं, ते कसं ते मला शब्दात नीटसं सांगता येत नाहीये, समजून घेता आलं तर बघा.

-चिंतामणी

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

5 Jun 2020 - 9:23 pm | सौंदाळा

फोटू दिसत नाय

सौंदाळा's picture

5 Jun 2020 - 11:39 pm | सौंदाळा

दिसले, झकास एकदम

वीणा३'s picture

5 Jun 2020 - 11:10 pm | वीणा३

सगळेच फोटो जबरदस्त !!!

प्रशांत's picture

5 Jun 2020 - 11:23 pm | प्रशांत

किती ते प्रेम बिबट्या वर...

सर्व फोटो एक नंबर...

लक्की आहेस. झक्कास अनुभव..!

असेच लिहित रहा..

पुढचा धागा पेंटिंग बद्दल...

नंतर गाड्या रंगवल्या आहेस त्याची प्रोसेस आणि फोटो...

चिंतामणी करंबेळकर's picture

6 Jun 2020 - 10:18 am | चिंतामणी करंबेळकर

लवकरच करतो डोक्यात जवळजवळ पुर्ण झाला आहे लेख

अर्धवटराव's picture

6 Jun 2020 - 12:34 am | अर्धवटराव

झपाटुन टाकणारा छंद असा मनमुराद अलगद पुरा झाला कि डोळ्यातुन अश्रू येणारच. भाग्यवान आहात.

प्रमोद देर्देकर's picture

6 Jun 2020 - 8:12 am | प्रमोद देर्देकर

सगळे फोटो कातिल आहेत.
तुम्ही छायाचित्रकार आहात का ?

चिंतामणी करंबेळकर's picture

6 Jun 2020 - 10:17 am | चिंतामणी करंबेळकर

Hobby आहे फोटोग्राफी ची थोडीफार, जास्त वेळ देता येत नाही

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Jun 2020 - 8:59 am | अनिरुद्ध.वैद्य

अप्रतिम क्लिकस!

शेवटचा फोटो म्हणजे बाप शॉट!!

चिंतामणी करंबेळकर's picture

6 Jun 2020 - 10:17 am | चिंतामणी करंबेळकर

धन्यवाद!!

Nitin Palkar's picture

6 Jun 2020 - 1:07 pm | Nitin Palkar
Nitin Palkar's picture

6 Jun 2020 - 1:13 pm | Nitin Palkar

सर्वच फोटोज आणि लेख सुंदर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jun 2020 - 1:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो सुरेख.

-दिलीप बिरुटे

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

6 Jun 2020 - 3:31 pm | सौ मृदुला धनंजय...

अप्रतिम लेख .सर्व फोटो जबरदस्त

भारीच. शेवटचा फोटो पाहून सुधीर शिवराम यांच्या "स्लीपिंग ब्युटी" ची आठवण झाली.

राघव's picture

9 Jun 2020 - 2:54 pm | राघव

काय फोटू आहेत राव. केवळ त्यांचेच नाहीत.. बाकीचे सुद्धा! खूप धन्यवाद. :-)

अनिंद्य's picture

11 Jun 2020 - 9:57 pm | अनिंद्य

सुपर से भी ऊपर फोटो आहेत !

चौथा कोनाडा's picture

8 Jun 2020 - 12:43 pm | चौथा कोनाडा

थरारक लेखन, फोटो सुंदर !
"बिबटया...." आवडला !

मन्या ऽ's picture

8 Jun 2020 - 3:02 pm | मन्या ऽ

जबरा आलेत फोटोज!!

मस्त आलेत फोटो.
झकास लेख.

राघव's picture

9 Jun 2020 - 2:53 pm | राघव

ज ब र द स्त! मस्त लेख आणि फोटू.

मनासारखा शॉट मिळणं आणि तो मनासारखा निघणं म्हणजे एक जमलेली कलाकृती! त्यातलं समाधान निराळंच!! अभिनंदन. :-)

लिहिते रहा साहेब.

चिंतामणी करंबेळकर's picture

10 Jun 2020 - 8:32 pm | चिंतामणी करंबेळकर

धन्यवाद

चिगो's picture

10 Jun 2020 - 12:26 pm | चिगो

अतिशय सुंदर छायाचित्रे..

फोटो खुपच आवडले, लेख सुद्धा खुप आवडला.

चिंतामणी करंबेळकर's picture

10 Jun 2020 - 8:31 pm | चिंतामणी करंबेळकर

धन्यवाद

अनिंद्य's picture

11 Jun 2020 - 9:58 pm | अनिंद्य

फोटो फार सुंदर आलेत !

सतीश विष्णू जाधव's picture

11 Jun 2020 - 10:20 pm | सतीश विष्णू जाधव

खूपच छान आणि अप्रतिम अनुभव आहे.
लेख आवडला.

जेम्स वांड's picture

19 Jun 2020 - 12:00 pm | जेम्स वांड

करंबेळकर काय पण मज्जा आहे हो तुमच्या कॅमेरात!. आजकाल खिशात पैसा खुळखुळतोय म्हणून कॅमेरे घेऊन ताम्हिणी घाट ते युरोप फिरणाऱ्या जत्रेत तुमची अंगभूत कला उठून दिसतेय बरंका. हा आमचा मानाचा मुजरा घ्या साहेब.

बिबट्या हा "बिग कॅट्स" फॅमिलीतला सगळ्यात यशस्वी नमुना आहे प्रसंगी निधडा, प्रसंगी संधीसाधू, ह्याचं एक आपलं "कॅरेक्टर" असतं अन तुमच्या फोटोत ते बिबट्याचं बिबटेपण पुरेपूर कैद झालं आहे...

पुढील क्लीकक्लीकाटास असंख्य शुभेच्छा.

-(स्थिरचित्रण श्रोता रसिक) वांडो