साहित्य :- जी मिळतील ती सर्व फळे , साखर , टिकवण्यासाठी सायट्रिक ऍसिड(पावडर) पाव चमचा, रंग व इसेन्स हवे असल्यास.
सगळी फळे स्वच्छ धुऊन लोणच्याला कैरीच्या करतो त्या आकारात फोडी करून घ्यावी. (मी 3चिक्कू, 3सफरचंद,4केळी,अर्धे टरबूज,पाव अननस,1पपई,2आंबे अशी फळे घेतली.)
जाड बुडाच्या पातेल्यात थोडे पाणी घेऊन सगळ्या फळफोडी त्यात टाकाव्या मंद ते मध्यम आचेवर गॅसवर झाकण टाकून शिजवून घ्याव्या. (साधारण 10 ते 15 मिनिटे)
मग फोडी डावेनी वरूनच दाबून पहाव्या. बटाटा शिजतो त्यापेक्षा थोड्या जास्त शिजल्या , मऊ झाल्या की नन्तर पाणी पूर्ण आटेपर्यंत मंद गॅसवर मिश्रण ढवळत राहावे. आटल्यानन्तर थंड होऊ द्यावे.
हे थंड मिश्रण मिक्सर/ब्लेंडर वर बारीक फिरवून घ्यावे. नन्तर पिठाची चाळणी एका मोकळ्या पातेल्यावर सेट करून बसवून घ्यावी. त्यावर हे फिरवून घेतलेले मिश्रण/पल्प थोडे थोडे घालून हाताने हलका दाब टाकत मळत रहावे. सर्व असेच करून मळून घ्यावे.वरती चाळणीला नाममात्र चोथा उरेल व वस्त्रगाळ पल्प खाली पातेल्यात येईल. हे मिश्रण पुन्हा जाड बुडाच्या पातेल्यात घ्यावे. जेव्हढे मिश्रण असेल तेव्हढीच साखर घालावी. व पातेले पुन्हा मंद आचेवर 10 मिनिटे गॅसवर चढवावे. थोडे गरम झाल्यावर सायट्रिक ऍसिड घालावे. रंग व इसेन्स हवे असल्यास घालावे. (मी वापरलेले नाहीत.)
डावेने मिश्रण पातेल्यात वरून खाली सोडावे. धार लागायची बंद झाली(म्हणजेच अधणाच्या पिठल्यासारखे थबथबित झाले)की गॅस बंद करावा.
दुसरीकडे लगेच एका पातेल्यात जॅम ठेवायची काचेची बरणी ठेऊन कडेने थंडगार पाणी घालून ठेवावे. व सगळा जॅम पातेल्यातून हळूहळू बरणीत सोडावा.
5 मिनिटांनी(च) बरणीचे झाकण लावावे. पुन्हा पातेल्यात पाण्यात 6/7 बर्फ खडे टाकावे. आणि पुढे 1 तासानी बरणी बाहेर काढून घ्यावी. हवी तर परत फ्रिजमध्येही ठेवता येईल.
हा जॅम बाजारू जॅम पेक्षा कित्येक पट चवीत व शुद्धतेत दर्जेदार असतो. महाग स्वस्त चा विचार केला तर स्वस्तातच बसतो. कारण बाजारू मिक्स फ्रुट जॅम करताना त्यात केळे चिक्कू पपई ह्याचाच मारा जास्त असतो.त्यातही केळीच जास्त असतात.बाकी फळं जवळपास नसतातच! रंग व इ-सेन्स वर सगळा खेळ होतो.
इसिलीये-घर मे बनाओ और बेहेतर खाओ! ..
---------–-----------------------------------------------------------------–-----------------------–-------------
मिश्रफलमधु हे आम्ही मिक्सफ्रुटजॅम ला दिलेले मायबोलीरुप आहे.
मनी प्रसवले l म्हणून दिधलेll
कैसे वाटले? ते कथावेl मम आत्म्याला जनहो!||
जय हिंद,जय को-रोना?
फिर मिलेंगे.
प्रतिक्रिया
2 Jun 2020 - 7:18 pm | कंजूस
झ्यकास.
-------
चाळणीवर पसरून गाळणे थोडे खटपटीचे वाटतेय पण तुम्ही जमवले म्हणजे सोपे असावे. तरीही विचारतो की फोडी तशाच राहू दिल्या तर?
2 Jun 2020 - 8:00 pm | अत्रुप्त आत्मा
@फोडी तशाच राहू दिल्या तर? >>> काहीहि हरकत नाही. मुरांबा टाईप होऊ शकेल.
2 Jun 2020 - 8:08 pm | कंजूस
अमची एक काचेची बरणी गरम जाम ओतल्यावर तडकली होती ते आठवले.
2 Jun 2020 - 9:11 pm | अत्रुप्त आत्मा
तडकू नये म्हणूनच बरणी-पातेलं-गार पाणी-जॅम ओतणे..परत पातेल्यातल्या पाण्यात बर्फ़ाचे खडे..इत्यादी योजना आहे.
2 Jun 2020 - 8:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नंबर एक.
-दिलीप बिरुटे
3 Jun 2020 - 8:20 pm | तुषार काळभोर
पाव चमचा म्हणजे 2-३ ग्राम सायट्रिक अॅसिड पावडर साठी त्याची पंचवीस तीस ग्राम ची डबी घ्यावी लागेल, ते वगळता सोपा प्रकार वाटतोय.
नाव आवडलं, हे विशेष नमूद करतो.
3 Jun 2020 - 8:27 pm | मदनबाण
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मंत्रभूमीची बदलणारी ओळख
4 Jun 2020 - 1:18 am | एस
वा वा वा! भारी पाकृ हो आत्मुस राव! क्या बात हय!
4 Jun 2020 - 6:33 am | प्रचेतस
चान चान
4 Jun 2020 - 11:01 am | सस्नेह
भारी दिसतोय जॅम. खटपटही भारीच हो !
4 Jun 2020 - 1:01 pm | अत्रुप्त आत्मा
@बिरुटे सर,पैलवान,मदनबाण,एस, स्नेहा ताई >>>
@पैलवान, #नाव आवडलं, हे विशेष नमूद करतो. >>>
@प्रचेतस >>>
6 Jun 2020 - 3:43 pm | जेम्स वांड
हे अन्नसुक्त पण फक्कड जमवलेत की हो तुम्ही !, काय पण हरहुन्नरी माणूस आहे च्यामारी लैच खास
6 Jun 2020 - 6:37 pm | अत्रुप्त आत्मा
6 Jun 2020 - 6:49 pm | अभ्या..
बुवा, ज्याम बेत जमलाव की.
लगे रहो
7 Jun 2020 - 1:15 am | जुइ
करुन बघण्यात येइल.
7 Jun 2020 - 10:26 pm | अत्रुप्त आत्मा
अभ्या, जुइ -