कॉनफिकर - १ एप्रिलचा महा-झटका !

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
1 Apr 2009 - 3:52 pm
गाभा: 

कॉनफिकर हा एक वायरस असून ह्यांने आता पर्यंत १ करोड वीस लाखाच्या वर संगणकांवर हल्ला केला आहे, ह्याला अश्या पध्दतीने कोड केला गेला आहे की हा स्वतःच १ एप्रिल ला कार्यरत होतो व आपले काम चालू करतो, अजून पर्यंत हे कळाले नाही आहे की हा कार्य कसे करतो डायरेक्ट हल्ला करतो की हळू हळू करतो हे अजून समजले नाही आहे,

हा आपल्या संगणकावर पुर्ण ताबा मिळवतो व आपल्या सर्वर वरुन आलेल्या आदेशांचे ( कमांन्डचे) पालन करतो. ह्याचा उद्देश तुमच्या संगणकाला त्रास देण व तुमची गोपनिय माहीती चोरणे ह्यासाठी केला जातो / जात आहे. तसेच हा तुमच्या संगणकावर असलेल्या इमेल अड्रेसना स्वतःच स्वतःला मेल करतो व आपली पैठ त्यासंगणकावर बसवतो, हा एक सुनीयोजित कार्य करणारा व्हायरस आहे.

हा व्हायरस एवढा खतरनाक आहे की मायक्रोसॉफ्ट ला पण फ्रेब. महिन्यात घोषणा करावी लागली होती की जो कोणी हा व्हायरस बनवनारा व्यक्ती / संघटन ह्यांची सत्य माहीती देईल त्याला १ करोड २७ लाखचे बक्षिस दिले जाणार.

तेव्हा आपला संगणक सुरक्षित ठेवा, अनोळखी मेल पासून सावध रहाच पण आपल्या मित्राने / माहितीतील व्यक्तीने पाठवलेल्या मेल कडे पण जरा संशयीत नजरेने पहा शक्यतो हा कॉनफिकर चा हल्लाच असून शकेल तुमच्या संगणकावर.

आपला एन्टीव्हायरस प्रणाली अपडेट ठेवा व इमेल विषयी काळजी घ्या.

ज्यांना हे एप्रिलफुल वाटत आहे त्यांनी जरा हे पण वाचा =)) नाही तर एप्रिलफुलच्या नादात संगणकावर व्हायरस कब्जा करुन बसेल :)

प्रतिक्रिया

सागर's picture

1 Apr 2009 - 3:55 pm | सागर

चांगले एप्रिल फूल करत आहात सगळ्यांना राजे ;)

लोक सगळे १ करोड २७ लाखच्या मागे लागतील :)

दशानन's picture

1 Apr 2009 - 3:58 pm | दशानन

अरे नाही एप्रिलफुल नाही आहे, एनडी टिव्ही लाव न्युज चालू आहे :(

धीस ईज नॉट अ जोक !

जोक नाही हो
मी व्हायरसच्या अस्तित्त्वापेक्षा त्यावरच्या बक्षिसाबद्दल एप्रिल फूल म्हणालो होतो
पण माहितीचा सोर्स आधी दिला नसल्याने असा गोंधळ होणे स्वाभाविक आहे - हा हा...

(व्हायरस प्रेमी ) सागर (जयंत नारळीकरांच्या एका कादंबरीचे हे नाव आहे... सुंदर पुस्तक... :) )

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Apr 2009 - 4:16 pm | घाशीराम कोतवाल १.२

१ करोड २० लाख डॉलर ईज नथिंग बिग अमाऊंट फोर मायक्रोसॉफ्ट
त्याच्यामुळे होणार नुकसाण ह्या पेक्षा जास्त आहे सागर राव
जर अमेरिकन सि़क्युरिटी फोर्स किवा भारतिय संरक्षण दलांचा डाटा हा फार अमुल्य आहे
जर तो चोरला गेला तर हाहाकार माजु शकतो
अवांतर संरक्षण दल अमेरिकन असो वा भारतीय त्यांचा डाटा महत्वाचा आहे
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सागर's picture

1 Apr 2009 - 4:21 pm | सागर

१ करोड २० लाख डॉलर ईज नथिंग बिग अमाऊंट फोर मायक्रोसॉफ्ट
त्याच्यामुळे होणार नुकसाण ह्या पेक्षा जास्त आहे

पूर्ण सहमत... पण गुगळले असता अशा प्रकारची अधिकृत माहिती मिळाली नाही
आत्ता मायक्रोसॉफ्ट वर शोधल्यावर मिळाला दुवा
http://blogs.technet.com/steriley/archive/2009/02/13/if-you-know-the-con...

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Apr 2009 - 4:03 pm | घाशीराम कोतवाल १.२

राजे म्हणता आहेत ते खरे आहे कॉन्फिकर १ एप्रिललाच ऍक्टीव्हेट होणार आता तो झाला ही असेल
आणी जगातले करोडो संगणक तो बर्बाद करु शकतो ईथे त्याबद्दल माहिति दिलेली आहे ती वाचा आणी ठरवा कि राजे एप्रिल फूल करता आहेत का ते

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

घाशीरामजी.. सहमत...

कॉनफिकर बद्दल http://en.wikipedia.org/wiki/Conficker विकीवर तांत्रिक माहिती चांगली आहे...

मि माझी's picture

1 Apr 2009 - 4:05 pm | मि माझी

माझ्या office मधे पण काल या वायरस संबंधीची warning आली आहे.. हे खर आहे.. एप्रिलफुल नाही.. काळजी घ्या.

राजे हे देखील वाचा :-- http://www.indianexpress.com/news/russian-phone-virus-that-steals-money-...

http://www.dnaindia.com/report.asp?newsid=1228811

मदनबाण.....

जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीला अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
जालावरुन सभार...

दशानन's picture

1 Apr 2009 - 4:10 pm | दशानन

भयानक आहे हे तर... !

सायबर वॉर म्हणावे एवढा हाल खराब करु शकता हे व्हायरस :(

अवलिया's picture

1 Apr 2009 - 4:07 pm | अवलिया

राजे,

फार घाबरवता बुवा तुम्ही !!

--अवलिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Apr 2009 - 4:10 pm | घाशीराम कोतवाल १.२

हा व्हायरस आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडणार आहे आणि खळबळ माजवणार सायबरविश्वात
न जाणो सकाळि मिपा बंद होते न जाणो जर मिपाच्या सर्व्हर वर जर हा ऍक्टीव्हेट झाला असेल तर
अहो ह्याची कोड सोर्स अजुन सायबर ऍक्सपर्टना कळलेलेच नाहित

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

चिरोटा's picture

1 Apr 2009 - 4:11 pm | चिरोटा

सन्गणक बन्दच ठेवला पाहिजे १/२ दिवस. मग काय करायचे तर करा.राजे, तो व्हायरस एक एप्रिल ला चालू होतो पण दमुन भागुन झोपतो केव्हा?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

दशानन's picture

1 Apr 2009 - 4:14 pm | दशानन

हाच तर मेन गेम आहे, हे कुणालाच माहीत नाही आहे, हे असं आहे की समोर काही तरी वस्तू आहे हे दिसत आहे, त्यांची हालचाल कळत आहे पण ते काय आहे, कश्याने तयार झाले आहे, काय वापरले आहे व कधी ह्यावर उपाय निघणार हे काहीच सध्या कुणाला ही माहीत नसावे :(

http://www.technolibya.com/security/how-to-remove-confiker-virus.html

मदनबाण.....

मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी

जालावरुन सभार...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Apr 2009 - 4:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लिनक्स वापरा, काळजी विसरा.

फुकटचा सल्ला: नवीनतम उबुंटू लिनक्स संगणकावर चढवायलादेखील सोपं आहे आणि वापरायलाही!

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Apr 2009 - 4:34 pm | घाशीराम कोतवाल १.२

लिनक्स वापरा, काळजी विसरा.
अदितीतै लिनक्सवर सुध्दा व्हायरस अटॅक होतात बर
पन त्याची तीव्रता विंडोजपेक्षा कमी असते एव्हडेच

अतीअवांतर आम्ही लाल टोपी लिनक्स वापरतो

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

क्रान्ति's picture

2 Apr 2009 - 7:21 pm | क्रान्ति

सगळी माहिती, लेखामधले तसेच प्रतिसादामधले दुवे खूप महत्त्वाचे आहेत. इतक्या विस्तृत माहितीबद्दल सगळ्या लेखकांना धन्यवाद.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}