आंबा कलाकंद

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in पाककृती
9 May 2020 - 10:13 pm

घरात एकच आंबा उरला होता त्याचे काहीतरी प्रयोग करावे असे सारखे मनात येत होते आंबा खीर,शिरा ह्यासाठी सुकामेवा आणि रवा नव्हता आंबा दलिया शिरा/खीर करावी असे पण वाटत होते गूगल केले तर त्याच्या ठिकठिकाणच्या पाककृती वाचून एकतर आंब्याचा रव्याचा शिरा किंवा साधा दलिया शिरा/खीर अशी माहिती मिळत होती आणि इंग्लिश मध्ये काही ठिकाणी आंबा दलिया खीर/शिरा माहिती मिळाली ती वाचून तेवढे सगळे करण्याचा पेशन्स नव्हता स्वतःहून try करायचे म्हणाले तर मागच्यासारखे फसायला नको म्हणून हात चालत नव्हते आंबा तसाच खाऊन संपवला जाणार बहुधा अशी तयारी केली होती अशातच दूध नासले

आता त्याचे दही/पनीर/कलाकंद ह्यातले काहीतरी करणे भाग होते कलाकंद मागच्याच आठवड्यात झाला होता

तरी पण बनवायला सोपा (वेळखाऊ असला तरी ) तोच एक option होता

थोडेसे कंटाळूनच दुधातले पाणी काढून टाकले फक्त घट्ट नासकवणी दूध ठेवले गॅस वर साखर आणि वेलदोड्याचे दोन दाणे /पाकळ्या घातल्या आणि ढवळायला लागले अचानकच त्या आंब्याचा विचार आला आणि करून पाहूया म्हटले मग काय एकीकडे गॅस वर कलाकंद मंद आचेवर ठेवलाच होता एकीकडे तो मध्यम आकाराचा आंबा पिळून त्याचा रस काढला थोडासा चमच्याने सारखा केला आणि गॅसवर ठेवलेल्या कलाकंदात दिला घालून साधारण १५-२० मिनटे आटवले आणि झाला मँगो कलाकंद तयार !

खाताना थोडीशी बर्फीसारखी चव लागली आज गरम खाल्ला उद्या फ्रीज्ड version खाऊन बघू

हे बनवून खाऊन झाल्यावर परत गूगल केले (हाताला चाळा )तर ह्याच्या पण बऱ्याच फॅन्सी आणि सजवलेल्या कलाकृती मिळाल्या आणि कलाकंद हा मूळचा राजस्थानी पदार्थ आहे हि माहिती पण मिळाली असो

नमनाला घडाभर तेल झाले आहे आता कलाकंद करूया

आंबा कलाकंद

साहित्य -

१. अर्धा लिटर नासलेले नासकवणी दूध (पाणी काढून टाकायचे )

२. चार चमचे साखर किंवा चवीनुसार

३. दोन वेलदोड्याच्या पाकळ्या सोलून

४. एका माध्यम/छोट्या आंब्याचा रस

कृती -

१. नासलेले दूध मंद आचेवर ठेवून त्यात साखर आणि वेलदोडा घालून ढवळायचे

२. साधारण ५-७ मिनिटे ते दूध आटवत ठेवायचे

३. एकीकडे आंबा पिळून त्याचा रस काढायचा

४. आंब्याचा रस दुधात घालून हलवायचे

५. १५-२०मिनिटे ठेवायचे मध्ये मध्ये हलवत राहायचे

६. साधारण घट्ट आणि व्यवस्थित आटून (नेहमीच्या कलाकंदाप्रमाणे) झाला कि गॅस बंद करायचा आणि खायचा
amba kalakand

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 May 2020 - 10:36 pm | प्रचेतस

वा, लैच भारी.
आवडीचा पदार्थ

Prajakta२१'s picture

9 May 2020 - 11:24 pm | Prajakta२१

धन्यवाद

मन्या ऽ's picture

10 May 2020 - 12:32 am | मन्या ऽ

मस्त दिसतोय!

Prajakta२१'s picture

10 May 2020 - 12:54 pm | Prajakta२१

धन्यवाद

जेम्स वांड's picture

10 May 2020 - 4:47 pm | जेम्स वांड

एकंदरीतच खूप आवडले आहे, सोपी सुलभ अन फंटास्टिक पाककृती.

चौकस२१२'s picture

13 May 2020 - 4:42 am | चौकस२१२

कलाकंद हा असा नासकवणी परतून करतात हे माहिती नवहते .. सांगली बेळगाव कडे मस्त मिळतो .. मला वाटायचे कि खवा जास्त परतून त्याचा रंग बदलून होतो तो कलाकंद कि काय ! डोके मी कन्फयुजन

प्रशांत's picture

13 May 2020 - 3:41 pm | प्रशांत

आवडीचा पदार्थ आहे.

आंबे आहेत, पण नासलेले दूध नाही त्यामुळे नंतर कधीतरी ही पाकृ करायचा प्रयत्न करेल (तेव्हा आंबा असायला पाहिजे फक्त)

प्रचेतस's picture

13 May 2020 - 4:20 pm | प्रचेतस

दूधात फक्त लिंबू पिळ, नासून जाईल, हाकानाका.

प्रशांत's picture

13 May 2020 - 5:08 pm | प्रशांत

तु बनवलं की सांग येईल मी खायला

प्रचेतस's picture

13 May 2020 - 5:43 pm | प्रचेतस

मला नै बनवता येत रे.

Prajakta२१'s picture

13 May 2020 - 4:12 pm | Prajakta२१

धन्यवाद

@चौकस २१२
सांगली बेळगावकडे कुंदा हा पदार्थ मिळतो साधारण चॉकलेटी कलरचा असतो
https://www.maharashtratoday.co.in/recipe-belgaum-kunda/ रेसिपीसाठी (गूगल वरून साभार )
कलाकंद वेगळा . घरगुती कलाकंदात खवा नाही घालत फक्त नासलेले दूध आणि साखर (सुकामेवा,वेलदोडे इ सजावटीचे किंवा addon घटक)
कलाकंद परतून नाही करत नासलेले दूध आटवून फक्त मध्ये मध्ये हलवत राहायचे

@प्रशांत
आंबे नसले तरी मँगो पल्प घालू शकता
नेटवर बऱयाच ठिकाणी कंडेन्सड मिल्क ,पनीर आणि मँगो पल्प हे मुख्य घटक सांगितले आहेत आणि फोटोज मध्ये आंबा बर्फीसारखे फोटो आहेत

थोडीशी बर्फीसारखी चव येते (आटवण्यावर अवलम्बून )

आज freezed version खाल्ले पण आंब्याचा स्वाद कमी झाला होता आणि कलाकंद जास्त लागत होता
गरम/ताजाच खाणे चांगले

चौकस२१२'s picture

13 May 2020 - 4:47 pm | चौकस२१२

ओह हो कुंदा .. कलाकंद नाही... धन्यवाद माहिती बद्दल

तुषार काळभोर's picture

13 May 2020 - 4:14 pm | तुषार काळभोर

कलाकंद एक्दम आवडता प्रकार! त्यात मॅन्गो फ्लेवर कलाकंद म्हणजे दुधात साखर, नासलेल्या दुधात आंबा, इ. इ.

सिरुसेरि's picture

16 May 2020 - 2:23 pm | सिरुसेरि

छान . भगवानलाल कंदी , लांजेकर बंधु यांच्याकडील कलाकंदाची आठवण झाली .

मदनबाण's picture

18 May 2020 - 4:43 pm | मदनबाण

छान !

[बेळगावी कुंदा प्रेमी ] :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Samjho Na Kuch To Samjho Na...