कॅनडा PR बाबत

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in काथ्याकूट
30 Apr 2020 - 8:25 pm
गाभा: 

इथे कोणी कॅनडात PR प्रोसेस करून गेले आहे का?
मी पुण्यात ऑथोराइज्ड प्रतिनिधींशी बोलले असता त्यांनी साधारण ६-८ महिने लागतील असे सांगितले कोणाला काही अनुभव आहे का?किंवा कोणी आत्ता प्रोसेस मध्ये आहे का ?

त्यांनी विविध क्षेत्रातील लोकांना पाठवले आहे साधारण IT चा भरणा जास्त आहे तसेच गूगल आणि युट्युब वर विविध माहिती मिळते पण त्याने अजून गोंधळ उडतो
कोणाला काही अनुभव असल्यास सांगावे
धन्यवाद

प्रतिक्रिया

Prajakta२१'s picture

30 Apr 2020 - 8:55 pm | Prajakta२१

तिथे बँकिंग क्षेत्रात काय संधी आहेत?
धाग्यात बरीच उपयुक्त माहिती मिळाली पण बहुतेक अमेरिकेतून तिकडे गेलेले आहेत भारतातून प्रोसेस करून कोणी गेले आहे का?
तसेच इथून जॉब ऑफर नसताना तिकडे जाऊन जॉब करणारे कोणी आहे का?
सध्या खूप दिवसांपासून SBI कॅनडा मध्ये ओपनिंग होती पण त्यांना तिकडेच राहणारे हवे होते

इथून तिकडे जॉब शोधणे खूप अवघड आहे हे बऱ्याच ठिकाणी लिहिले आहे त्यामुळे PR प्रोसेस करून तिकडे जाऊन जॉब शोधण्याची अनिश्चितीततेला पर्याय नाही

मला त्या प्रतिनिधींनी माझे एकंदर प्रोफाइल बघून ielts चा स्कोर एवढाच प्लस पॉईंट आहे असे सांगितले होते जॉब मध्ये गॅप्स आहेत त्यामुळे

नाहीतर आता वेळ निघून गेली असे म्हणून विसरायचे असे वाटतेय सध्या करोना मुळे अजूनच अवघड झाले आहे

कोणाला काही अनुभव असल्यास सांगावे
धन्यवाद

तुर्रमखान's picture

1 May 2020 - 2:13 am | तुर्रमखान

काही वर्षापुर्वी वाय अ‍ॅक्सीस बरोबर बोलणे झाले. माझ्या काही मित्रांशीसुद्धा बोलणं झालं. तिथे अनेक जण जाउन फजिती करून आले आहेत. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर (नोकरी, हवामान, आर्थिक वगैरे) लढावं लागतं. हे कन्सलटंट फक्त तिकडे पाठवायचं बघतात. नोकरी शोधायला मदत करतो म्हणतात पण करत नाहीत. तिथे गेल्यावर तुम्हालाच सगळे प्रयत्न करावे लागतात. तिथे कुणी अधिच ओळखिचं असेल तर बरं पडतं. तुमच्या क्षेत्रातली माहिती तुम्हालाच जास्त माहित असणार त्यामुळे कन्सलटंटना दोष देउ शकत नाही. तुम्हाला तिथल्या लोकांपेक्षा जास्त स्किल्ड असावं लागेल आणि कमी पैश्यात काम करावं लागेल. (कुणी काहिही म्हणो पण ही सत्य परिस्थि आहे). तिकडे जाउन श्रिमंत होण्याचं स्वप्न बघू नका. फक्त परदेशात रहाता येइल आणि वर्षातून एकदा भारतात येता येइल. पंजाबी आणि गुजराती कम्युनिटी फक्त त्यांच्या लोकांनाच मदत करतात. तुम्ही सुंदर असाल (पुरुष असाल तर अतिश्रिमंत) तर पटकन ओळखी होतात आणि भारतीय लोक मदत करतात. हा अनुभव एका तिथल्या मित्रानेच सांगितला होता.

नुमविय's picture

1 May 2020 - 3:16 am | नुमविय

Jar IT madhe nasal tar awaghad ahe.. job shodhna tricky hou shakta.... Indiat basun tumhala job shodhna shakya nahiye... tumhala thand weather chi savay nasel tar depressing pan hou shakta... its not a bad life here but dont expect everything to fall in place soon.... Non IT jobs are really difficult to get... lot of folks who have recently migrated with Non-IT background are struggling to get a job... Even IT market is becoming saturated.. the market is very small compared to US so opportunities are less...

Now having said all of that...i still think its a great place to live.. i recently moved here from US and its not bad at all...all i can tell you is to think hard, plan well and then come....You should come with a plan to sustain 6 months without job...If you are coming alone you can survive in $1500 CAD to $2000 CAD per month...with shared living, cooking, eating out less... Its also very expensive...propriety market is expensive than East coast...

I will be happy help if you have any questions....

Apologies for responding in English.. i am not used to type in Marathi...

सध्याच्या परिस्थितीत अजिबात विचार करू नका. माझ्या ओळखीत गेलेले बरेचजण अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत. केवळ घरची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे तरून जात आहेत.
सध्या युस मधून खूप चांगली लोक कानडा मध्ये जात आहेत त्यामुळे स्कोर खूप वर गेला आहे. वय लहान असेल म्हणजे २७ चा आत तरच प्रयत्न करा अथवा आहे तिथेच सुखी रहा. जास्त फंदात पडू नका. स्वानुभवातून सल्ला देतोय.

Prajakta२१'s picture

1 May 2020 - 2:11 pm | Prajakta२१

सर्वांना धन्यवाद

@बोलघेवडा -आपल्या अनुभवाबद्दल वाचायला आवडेल सध्याची परिस्थिती पाहता विसरायचाच प्रयत्न करतीये नैराश्य येतेय त्यामुळे पण
@तुर्र्मखान - हो माझ्या त्या कंन्सल्टंट ने पण असेच सांगितले आहे १० दिवसांचा assistance देतात राहायचा तिथून पुढे आपले आपण
फक्त ते प्रोफाईल बघून जाणे शक्य आहे कि नाही ते लगेच सांगतात

त्यामुळे PR प्रोसेस करून तिकडे जाऊन जॉब शोधण्याची अनिश्चितीततेला पर्याय नाही

ही फार मोठी रिस्क आहे.
आजपर्यंत माझ्या माहितीतले २ च जण successfully (त्यांनी सांगितलं त्यानुसार) canada मध्ये settle झालेत.
त्यातल्या एकाला लगेच job लागला कारण त्याचा एक नातेवाईक आधीपासूनच तिथे स्थायिक आहे ज्यानं त्याला नोकरी शोधायला आणि पहिले काही महिने with family राहायला मदत केली.
दुसरा एकजण आहे तो seattle मध्ये आधीच ३ ते ४ वर्ष नोकरी करत होता.

माझ्या काही मित्रांना "बोलघेवडा" म्हणतात त्याप्रमाणे अनुभव आलेत
२ जणांनी तर त्या score च्या नादात परत परत परीक्षा देऊन पैसे घालवून शेवटी थांबवले प्रयत्न.
एकजण इथे भारतात IT त चांगल्या post वर होता. पण तिथे म्हणे त्यानं काही दिवस IT नोकरी सह uber पण चालवली म्हणाला.

यातला एकही अनुभव माझा स्वतः चा नाही.
त्यामुळं जे काही संबंधित लोकांकडून समजलं ते तसंच्या तसं मांडायचा प्रयत्न केलाय.
discourage करण्याचा किंवा घाबरवण्याचा हेतू नाही.

आणि कुठेतरी वाचलं पण होतं की म्हणे immigration देणं हा canada आणि Australia सरकारचा व्यवसाय पण आहे ( खरं खोटं माहिती नाही )

त्यामुळं हातात तिकडच्या Govt . Approved कंपनी ची offer असेल तरच risk घेणं उत्तम

चौकस२१२'s picture

4 May 2020 - 9:31 am | चौकस२१२

आणि कुठेतरी वाचलं पण होतं की म्हणे immigration देणं हा canada आणि Australia सरकारचा व्यवसाय पण आहे ( खरं खोटं माहिती नाही )

? कळलं नाही आपल्याला काय म्हणायचे ते ? असे स्थलांतर हा एक जोडीदारीतला उद्योग म्हणू शकता आपण हवे तर यात दोघन्च फायदा आहे
कारण यात येथील जनतेला आव्यश्यक असलेला शिकलेलअ समाज मिळतो आणि स्थलांतरीतला येथील राहणीमानाची फायदे मिळतात
एक मात्र खरे कि येथील सरकार "स्वस्तात बाहेरून मानस आणतात" हे काही खरे नाही...
असे करता येत नाही .. येथे येणाऱ्याला समान पगार आणि अधिकर असतात
आखाती देशात किंवा सिंगापोरे सरकाह्य ठिकाणी भारत, बांगलादेश, इंडोनेशिया येथून जसे तात्पुरते कामगार आणले जातात तसे येथे नाही ( करावे किंवा नाही हा त्या त्या देशाचा प्रश्न आहे ) पण येथे तसे नाही हे नमूद करू इच्छितो

Prajakta२१'s picture

1 May 2020 - 3:14 pm | Prajakta२१

पण इथून आता तिकडे नोकरी मिल्ने अवघड आहे बऱ्याच ठिकाणी तुमचे लोकेशन पाहून पुढे सरकत नाही माझ्या माहितीतल्या एकाचे सगळे workout झाले होते फक्त शेवटच्या स्टेज ला भारतात आहे म्हणून कंपनीने अपॉइंटमेंट नाही दिली असे काहीसे
त्यामुळे PR प्रोसेसिंग एवढेच राहते नाहीतर मग इथल्या mnc त जॉब करून कंपनी थ्रू तिकडे जाणे पण सध्या मेन्टेनन्स प्रोजेक्ट जास्त आहेत IT त आणि ऑफशोरींग ने काम होत असल्याने तिकडे पाठवायची गरज उरली नाही कंपन्यांना
हे विसरायचाच प्रयत्न करतीये पण मग नैराश्य येतेय असे काहीसे त्रांगडे आहे

निनाद's picture

4 May 2020 - 7:07 am | निनाद

हिंमत हरू नका! प्रयत्न करत रहा.

देश बदलणे ही मोठी गोष्ट आहे. पण प्रयत्न केले तर अशक्य नाही.

कॅनडा (च) का असा प्रश्न आहे. अर्थात तेथे अजून कुणी नातेवाईक रहात असल्यास तेच ठिक आहे. पण वातावरण फार थंड आहे. तेथे नोकर्‍या आहेत आणि असतात. प्रयत्न करावे लागतात. माझ्या माहितीत उत्तम नोकर्‍या मिळालेले पण उदाहरणे आहेत. सुरुवातीला थोडी मेहेनत आवश्यक असतेच.

कॅनडाच जाणे आवश्यक नसल्यास नसल्यास ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड हे पर्यायही आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये ब्रिस्बेन, सिडनी आणि पर्थ येथील वातावरण चांगले आहे. अडेलेड आणि मेल्बर्न जरा थंड प्रदेश आहेत, म्हणजे हिवाळे कडक असतात. पण शहरात बर्फ वगैरे पडत नाही.

कोणतीही माहिती घेतांना फक्त सरकारी संकेतस्थळावर(च) विश्वास ठेवा.
रेसिडेंसी आधी जमवा ते महत्त्वाचे आहे.

एकदा रेसिडेंसी असेल तर नोकरी मिळते हे ही खरे.
हे दिवस बदलतील आणि काही दिवसात अर्थव्यवस्था परत सुरू होईल - वेगळया प्रकारे असेल पण होणार आहे.
प्रयत्न सोडू नका!

चौकस२१२'s picture

4 May 2020 - 9:23 am | चौकस२१२

सहमत आहे +१

Prajakta२१'s picture

4 May 2020 - 8:54 pm | Prajakta२१

धन्यवाद
कॅनडा च का ? असे सांगता येणार नाही
कदाचित तिथले समाजमन अधिक शांत आहे म्हणून आणि इमिग्रण्टस ने बनलेला आहे तरी अमेरिकेपेक्षा जास्त acceptive आहे
अमेरिकेत दोन टोके बघावयास मिळतात पण इथे मध्यममार्गी बॅलन्सड जीवनमान वाटते म्हणून
आणि सुरवातीपासून बर्फाचे आकर्षण

Prajakta२१'s picture

4 May 2020 - 8:55 pm | Prajakta२१

खूप आभार आणि शुभेच्छा

खूप आभार आणि शुभेच्छा

निनाद's picture

5 May 2020 - 8:00 am | निनाद

प्रतिसादावरून तुमचा PR प्रोसेसिंग झालेले दिसत नाही. रेसिडेन्सि व्हिसा नसल्याने नोकरी मिळणे अवघड आहे.

सर्वात आधी मागे लागून PR घ्या. बाकी सर्व काही नंतर पाहता येईल. अर्थव्यवस्था, नोकरी कोव्हिडची परिस्थिती असा काहीही विचार करू नका. एखादा प्रोजेक्ट हातात घेतल्या सारखे PR प्रोसेसिंग करून रेसिडेन्सि व्हिसा घ्या.
ही पहिली पायरी आहे. हे झाल्यावर नोकरी तर निश्चित मिळेल. थोडाफार अनुभव झाला की उत्तम नोकरी पण मिळेल. मात्र काही लोकांना नवीन देशात गेल्या गेल्या सरळ मॅनेजर किंवा डायरेक्टर अशीच नोकरी हवी असते. असे काही प्रत्यक्षात घडत नाही!
तेव्हा अपेक्षा नियंत्रित ठेवल्या तर अनुभव पण चांगला असतो.

चौकस२१२'s picture

5 May 2020 - 8:11 am | चौकस२१२

निनाद म्हणता आहेत ते बरोबर आहे .. असे फार थोडे देश आहेत कि जिथे नोकरी नसताना सुद्धा कायमचा राहण्याचा परवाना मिळतो ...
अर्थात हा प्रयत्न सोपा नाहीये.. पण हजारो लोकांनी केलं आहे आणि काहीजण हळू हळू किंवा काही जण लगेच चांगले स्थयिक झाले आहेत ..
आता प्रश्न आहे कोणता देश ?
साधारण पणे कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारखे आहेत साधारण तेवढीच लोकसंखय आणि साधारण समाजरचना सारखी .. नू झीलंड त्यामानाने खूप लहान आहे पण तिकडे गेल्क्त कि तुम्हाला ऑस्ट्रेलियात जाणे थोडे सोपे होऊ शकते ...
चा फायदा अकादाचित असा असावा कि अमेरीकन मार्केट जवळ असल्याने कदाचित उद्योग धंदे ऑस्ट्रेलिया पेक्षा जास्त असावेत फक्त थन्डी मॅटर जबरदस्त ...
आणि कॅनडा पी आर म्हणजे अम्रीकेत जाणे सोपे असे हि होत नाही ...

Prajakta२१'s picture

5 May 2020 - 2:58 pm | Prajakta२१

खूप आभार आणि शुभेच्छा