पिंजरा
दहा बाय दहाच्या खोलीत येऊन पडली तेव्हाही तिच्या हातात काहीच नव्हतं आणि आजही काहीच नाही. तिचं नाव फक्त बिस्तर गरम करण्यापुरतं मर्यादित असायचं.
कोवळी होती तेव्हा पांढरपेशांनी तिचा उपभोग घेतला. थोडी कोमलता काय लोप पावली तो मिळेल त्याच्या खाली ती झोपली. वेळ पडल्यास दोन-दोन जणांना उरावर घ्यावं लागायचं. श्वास घ्यायचीही उसंत मिळत नसायची. हुंकार, उसासे, खोट्या आणाभाका, उग्र वास, नवीन-जुने गिऱ्हाईक, भांडणे एवढंच तिच्या नशिबी.
तिला सकाळच्या कोवळ्या उन्हात अंग शेकायला विशेष आवडे पण तिच्या वाट्याला होता फक्त अंधार. याच अंधारात निपचित पडून मोजत होती ती शेवटच्या घटका.
.
.
.
....शारीरिक भुकेल्यांची भूक भागवून भागवून जीर्ण झालेली कमाठीपुऱ्यातील एक गादी...
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
18 Apr 2020 - 2:01 pm | कुमार१
+१
18 Apr 2020 - 2:27 pm | गामा पैलवान
+१.
कथेला चांगली म्हणवंत नाही.
-गा.पै.
18 Apr 2020 - 2:58 pm | चांदणे संदीप
शिर्षकाचा काय संबंध लागला नाही. पहिल्या ओळीनेही वेगळे चित्र निर्माण केले होते.
सं - दी - प
18 Apr 2020 - 6:41 pm | प्रचेतस
+१
18 Apr 2020 - 9:43 pm | जव्हेरगंज
+१
18 Apr 2020 - 11:26 pm | ज्योति अळवणी
आवडली
19 Apr 2020 - 1:05 pm | तुषार काळभोर
दोन जण तर नॉर्मल च ना?
वेळ पडल्यास तीन तीन जणांना उरावर घ्यावं लागायचं. असं हवं.
(गादीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने)
21 Apr 2020 - 3:18 pm | बेंगुताई
अनपेक्षित शेवट
24 Apr 2020 - 10:35 am | डोरू
+1
27 Apr 2020 - 4:56 pm | हॅरी पॉटर
+१
27 Apr 2020 - 9:27 pm | मनस्विता
+१
28 Apr 2020 - 5:10 pm | गुल्लू दादा
+1
29 Apr 2020 - 11:39 pm | ऊर्जा
+1
1 May 2020 - 6:49 pm | Rockstar
आवडली नाही...
5 May 2020 - 8:08 pm | गुल्लू दादा
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार...
6 May 2020 - 9:06 am | Nupur Padekar
छान आहे