लॉकडाऊन: एकोणतिसावा दिवस

माझीही शॅम्पेन's picture
माझीही शॅम्पेन in काथ्याकूट
22 Apr 2020 - 10:41 am
गाभा: 

लॉक डाऊन मध्ये आवडलेले चित्रपट

गेल्या काही वर्षात नेहमीच्या कॅन्टीन , ऑफिस , मित्र परिवार ह्या मध्ये नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईमच्या अनेक चित्रपटावर आणि विशेतः मालिकांवर चर्चा होत असायच्या , ह्यातील काहीही पाहिलं न गेल्याने एकदा दारू न पिणारा अट्टल बेवड्यांच्या बार मध्ये गेल्यावर जी अवस्था व्हायची तशी माझी अवस्था व्हायची !!

आपआपल्या दैनंदिन व्यवहारातून मस्त पैकी मोठी सुट्टी मिळावी आणि जे जे म्हणून भारी विग्रजी चित्रपट बघायचे आहेत ते पाहावं अशी इच्छा चक्क चीनने कोरोना व्हायरसला जन्माला घालून अप्रत्याक्षरीत्या पूर्ण केली , खर तर सुट्टी नाही मिळाली पण ऑफिसच वर्क फ्रॉम होमच काम संपून वीकांताला एखाद चित्रपट टाकावं असा विचार करून सुरुवात केली , एका मिपाकर मित्राने चक्क नेट फ्लिक्स अकाउंट शेयर केल्यावर दोन्ही पर्याय हाताशी होतेच , आठवडाभर भरपूर व्यायाम , काम , घरातून दैनंदिन व्यवहार आणि विकांताला चित्रपट असे मजेत दिवस काढतो आहे

नमनाला एवढं घडाभर पाणी घालून मुद्द्यावर येतो , पुढे जी लिस्ट दिलीय ते चित्रपट पाहिलेत , माझा जॉनर थोडा थ्रिलर , रोलर कोस्टर , हेरगिरीच्या चित्रपटाकडे आहे , ह्यातले जवळपास ५०% चित्रपट तुम्ही नक्कीच पहिले असतील (नसतील तर नक्कीच पहा) , पुढील लिस्ट बिनधास्त वाचा स्टोरी किंवा कुठली सीक्रेट फोडलेले नाहीये , तसे अजूनही काही पाहिलेत पण हे टॉप ६ चित्रपट ह्याबद्दल सध्या लिहितोय

१) Contagion (२०११) प्राईमवर :- अर्थातच हा चित्रपट न पाहिलेला गेल्या दोन महिन्यात कोणी नसेल तर विरळाच , कोरोना व्हायरसने आज जे थैमान घातलं आहे ते २०११ सालीच चित्रपटात तस च्या तस दाखवलं आहे , चित्रपटातही वटवाघुळात आणि चीन (हो इथेपण हलकटपणा ) व्हायरस पसरतो आणि काय होत ते अर्थातच चित्रपटात पहा

२) Parasite (२०१९) प्राईम वर :- गेल्यावर्षीच ऑस्कर मिळालेला कोरियन भन्नाट चित्रपट , एकदम चकाचक फ्रेम मधील , नाविन्यपूर्ण कथा , एकाच वेळेस अति सामान्य आणि अति श्रीमंत वर्ग ह्यातील सुप्त संघर्ष , हव्यास , लालसा , प्रतिकूल परिस्थितीत जिवंत राहण्याची धडपड , आदर , भीती , हिंसा , प्रेम , फसवणूक असे नानाविध रंग आहेत , चित्रपटाचे संवाद सुद्धा अत्यंत सुंदर आहेत एक आवडलेला संवाद देतो आहे

You know what kind of plan never fails? No plan. No plan at all. You know why? Because life cannot be planned. Look around you

३) The Angel (२०१८) नेट फ्लिक्स वर :- सत्य घटनेवर आधारित ,अश्रफ मारवान नावाच्या इस्राईलच्या हेरांची / हेरांना मदत करणारा हा माणुस चक्क इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षचा जावई होता , एकाच वेळेस दोन्ही देशांना मदत कारण किंवा मदत करण्याच्या नावाखाली फसविणे , त्यातून वाढत जाणारी गुंतागुंत ह्याची अप्रतिम कथा आहे

४) Shutter Island (२०१०) प्राईम वर :- लियोनार्डो दि कॅप्रिओ चा अप्रतिम सायको थ्रिलर , टेडी डॅनियल्स आणि चक ऑल एका बेटावर जिथे अत्यंत जातील मानसिक कैदी किंवा रुग्ण ठेवलेले आहेत अश्या ठिकाणी एका पळून गेलेल्या महिलेचा तपास करण्यासाठी येतात , तिथून टेडी मध्ये झालेली मानसिक स्थित्यंतर , बेन किंग्जले आणि मार्क राफालोची अप्रतिम साथ , टेडीचा भूतकाळ त्याला कसा गुंतवून ठेवतो हे नक्की पहाच

५) Argo (२०१२) नेट फ्लिक्स वर :- बेन अफ्लाकचा सत्य घटनेवर आधारित अर्गो एक रोलर कोस्टर चित्रपट आहे , इराणी शाहला ७०च्या दशकात राजाश्रय दिल्याने इराणी जनतेत रागाचा स्फोट होतो आणि अमेरिकन वकिलातीवर रिबेल आर्मी हल्ला करते त्यातून ६ अमेरिकन अधिकारी पळून कॅनडाच्या वकिलातीत आश्रय घेतात , तिथून त्यांना सोडवण्यासाठी एक चित्तथरारक मिशन आखलं जात , क्षणक्षणाला उत्कंठा वाढीविणारा प्लॉट आणि पुढे काय होत ते नक्की पहा

६) Operation Finale (२०१८) नेट फ्लिक्स वर : - दुसरं महायुद्ध संपल्यावर लाखो ज्यू लोकांचं हत्यांच्या आयोजक (Architect ) आणि अर्जेंटिनात लपून बसलेल्या ऍडॉल्फ आइकमनच्या मोसादने केलेल्या अपहरणाची अफलातून कथा , बेन किंग्जले आणि ऑस्कर आइसाक ह्यांची जुगलबंदी ह्यासाठी हा चित्रपट आवडल्या गेला आहे , अक्षयच्या बेबी (हिंदी) सारखे फालतू चित्रपट पाहण्यापेक्षा हा चित्रपट नक्की पहा

ह्या व्यतिरिक्त दा विंची कोड , ब्रिज ऑफ स्पाइज सारखे चांगले चित्रपट पहिले गेलेत , त्याबद्दल नंतर कधीतरी :)

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

22 Apr 2020 - 12:06 pm | कुमार१

छान माहिती. तुमच्या यादीतील Parasite पाहिला. मस्तच
मला आवडलेले prime वरील अन्य काही:

If something happens
The gift
A beautiful mind
ते आठ दिवस
प्रेमसूत्र
सोहळा.

माझीही शॅम्पेन's picture

22 Apr 2020 - 1:46 pm | माझीही शॅम्पेन

धन्यवाद !!!
शेवटचे ३ कधी ऐकले नाहीत

चौकटराजा's picture

22 Apr 2020 - 12:30 pm | चौकटराजा

happening
exam
teenage bank heist
Paris express
the dark hour
Hacker
Net
महारथी
टेबल नं २१
राईट ऑर रॉन्ग
एन एच १०

मी-सौरभ's picture

22 Apr 2020 - 12:55 pm | मी-सौरभ

वेळ मिळेल तसा बघतो
कोर्ट रूम ड्रामा आवडत असेल तर आर्टिकल ३७५ चांगला वाटला मला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Apr 2020 - 1:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण सुचवलेले चित्रपट नक्की पाहतो. आवडले. अजून सुचवा.

-दिलीप बिरुटे

मोदक's picture

22 Apr 2020 - 1:02 pm | मोदक

३) The Angel (२०१८) नेट फ्लिक्स वर :- सत्य घटनेवर आधारित ,अश्रफ मारवान नावाच्या इस्राईलच्या हेरांची / हेरांना मदत करणारा हा माणुस चक्क इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षचा जावई होता

या अश्रफ मारवान वर बोक्याने लिहिलेला एक लेख. मोसाद भाग १३

रघुनाथ.केरकर's picture

22 Apr 2020 - 6:06 pm | रघुनाथ.केरकर

जेन्व्हा जेन्व्हा मिपावर मोसाद चा उल्लेख होइल तेन्वा तेन्व्हा बोकाशेट ची आठवण आल्यशिवाय रहाणार नाहि.

माझीही शॅम्पेन's picture

23 Apr 2020 - 6:03 pm | माझीही शॅम्पेन

धन्यवाद , मोदक राव डायरेक्ट लिंकच दिलीत ते बरे झाले , हरहुन्नरी बोका कसला ताकदीने लिहायचा _/\_

चौथा कोनाडा's picture

22 Apr 2020 - 1:12 pm | चौथा कोनाडा

काल पंजाब १९८४ हा पंजाबी सिनेमा (इंग्रजी उपशीर्षकासह) पहिला.
या सिनेमाला २०१९ चा सर्वोत्कृष्ट पंजाबी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
भारतीय लष्कराने १९८४ मध्ये सुवर्ण मंदिर कारवाई ऑपरेशन ब्लू स्टार केली, त्यात अजाणतेपणी बळी पडलेल्या बचनसिंह याची पत्नी सतवंत कौर आणि मुलगा शिवजीतसिंह दुर्दैवी कहाणी यात मांडलीय.
सामाजिक अत्याचाराने खलिस्तान चळवळीत ओढल्या हा शिवजीतसिंह परिस्थितीशी कसा झगडतो याचे दाहक चित्रण या सिनेमात आहे !
दिलजीत दोसांझ, किरण खेर, पवन मल्होत्रा यांची जबरदस्त अदाकारी आणि पंजाबच्या ग्रामीण भागाचे अस्सल चित्रण यामुळे सिनेमा खिळवून ठेवण्यात यशस्वी तर होतोच, नंतरही मनात रेंगाळत राहतो.

चौकस२१२'s picture

22 Apr 2020 - 3:02 pm | चौकस२१२

सध्याच्या भावलेल्या मलिक म्हणजे पंचायत आणि जामातारा (डा)
जुने turning ब्रेन चित्रपट
- मकबूल
- एक रुका हुआ फैसला
- हासील
- द गेम
- इन द लाईन ऑफ फायर
- बीइंग जॉन मालकोविच

जव्हेरगंज's picture

22 Apr 2020 - 3:39 pm | जव्हेरगंज

The platform आला आहे पाहा नेटफ्लिक्स वर. वेगळा आणि जबरदस्त!!

लेखाचा व प्रतिसादांचा सिनेमा निवडताना उपयोग होईल.
नेटफ्लिक्स वर The Boy Who Harnessed the Wind,
2019 ‧ Drama ‧ 1h 53m बघितला. भडक न करताही समस्या नीटपणे मांडल्या आहेत. नायकाच्या आईचं काम विशेष दखल घ्यायला लावतं. सिनेमा आवडला.

चिमी's picture

22 Apr 2020 - 4:23 pm | चिमी

व्वा ..
१. चित्रपटांची थोडक्यात आणि आटोपशीर ओळख आवडली.
२. नेट फ्लिक्स अकाउंट शेयर करणारा मिपाकर मित्र कोण बरे? त्याचे नाव गुलदस्त्यात ठेवल्याबद्दल त्रिवार णीशेध...
३. हिंदी आणि मराठी चित्रपट काही एवढेही टाकाऊ नसतात हो.. बघत चला अधून मधून..
४. बाकी "शॅम्पेन" बारमध्ये जात नाही ह्या पहिल्याच वाक्याला आम्ही हसून हसून लोटपोट झालो.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा...

माझीही शॅम्पेन's picture

22 Apr 2020 - 9:44 pm | माझीही शॅम्पेन

वाह अश्या प्रतिक्रिया पहिल्या कि पूर्वीचे मिपाकर आठवतात

१. चित्रपटांची थोडक्यात आणि आटोपशीर ओळख आवडली.

धन्यवाद

२. नेट फ्लिक्स अकाउंट शेयर करणारा मिपाकर मित्र कोण बरे? त्याचे नाव गुलदस्त्यात ठेवल्याबद्दल त्रिवार णीशेध...

असं पब्लिक नाही ह करायचं नाव !!

३. हिंदी आणि मराठी चित्रपट काही एवढेही टाकाऊ नसतात हो.. बघत चला अधून मधून..

आम्ही तरी सध्या इंग्रजी वर जोर दिलाय , काही अफलातून चित्रपटसजेस्ट केल्यास मंडळ आभारी राहील

४. बाकी "शॅम्पेन" बारमध्ये जात नाही ह्या पहिल्याच वाक्याला आम्ही हसून हसून लोटपोट झालो.

नका हो आठवण काढू , सध्या कुठेही स्टॉक उपलब्ध नाहीये आणि तुम्ही तर थेट कात्रजचा घाट दाखवलात मला

रघुनाथ.केरकर's picture

22 Apr 2020 - 6:09 pm | रघुनाथ.केरकर

एकदा पहावा असा सिनेमा आहे.

तुषार काळभोर's picture

22 Apr 2020 - 6:30 pm | तुषार काळभोर

बरेचसे आवडते परत परत पाहिले. सोनी मराठी वर हास्य जत्रा रिपीट होतंय, ते एक भारी प्रकरण आहे.

सत्या परत पाहिला. रामगोपाल वर्मा कुठं बिघडला ते कळेना.
एक हसीना थी पाहिला. अतिशय सुंदर पिक्चर.
ओंकारा पाहिला. त्यानंतर हैदर पाहिला. दोन्ही भारी. मकबूल नाही पाहिला अजून. लई कौतुक ऐकलंय मकबूल च.
शाहीदचा कमीने पाहिला. प्रियांका लई गोड दिसलिये त्यात.
अर्शद वारसी चा सेहर बघायचा राहिलाय.

काल HBO var The Terminal पाहिला. स्टीवन स्पीलबर्ग दिग्दर्शित. टॉम हँक्स ची प्रमुख भूमिका. आवडला.
तो बघितल्यावर टोरंट वर म्युनिक डाऊनलोड करून आज सकाळी पाहिला.
पुस्तकात हॅरी पॉटर चं सातवे पुस्तक परत वाचलं. डिजिटल fortress वाचलं परत. सिडनी शेल्डन ची दोन पुस्तकं वाचली. त्यातलं विंडमिल्स ऑफ द गॉड आवडलं. मराठीत बाबा कदम यांचं अजिंक्य वाचलं, याआधी शाळेत असताना वाचलेलं वीसेक वर्षांपूर्वी.
अजून हेट स्टोरी मालिका बघायचा विचार आहे.

डिजिटल फॉर्ट्रेस डॅन ब्राऊनचं पहिलं पुस्तक. त्याचं सर्वाधिक आवडतं म्हणजे एंजल्स अँड डेमन्स.

सिडने शेल्डन आणि डॅन ब्राऊनची सर्वच पुस्तके वाचली आहेत, शेल्डनचं सर्वात आवडतं मास्टर ऑफ द गेम.

तुषार काळभोर's picture

22 Apr 2020 - 7:23 pm | तुषार काळभोर

रॉबर्ट Langdon मालिकेमध्ये एंजल अँड demons आवडतं. पण दा विंची कोड सगळ्यात जास्त आवडतं.
Diception पॉइंट चांगलं आहे.
लॉस्ट सिम्बॉल लईच बोअरिंग होतं. Inferno ठीक वाटलं. नवं आलेलं ओरिजिन सुद्धा खास नाही.
चित्रपटांत पहिले दोन चांगले आहेत. इन्फर्नो खास नाही.

डिजिटल fortress var चित्रपट पाहिला आवडेल.

माझीही शॅम्पेन's picture

22 Apr 2020 - 9:46 pm | माझीही शॅम्पेन

वल्लि , एंजल्स अँड डेमन्स
कुठे पाहता येईल ? , नेटफ्लिक्स आणि प्राईम दोन्हीवर नाही ये

प्रचेतस's picture

22 Apr 2020 - 11:35 pm | प्रचेतस

बघू पण नकोस, एंजल्स आणि दा विंची चित्रपटात आणताना त्यांचा आत्माच हरवून गेलाय, अगदी टॉम हँक्स सुद्धा वाचवू शकला नाही सिनेमा. इन्फर्नो तर अजूनच रद्दी आहे.

माझीही शॅम्पेन's picture

23 Apr 2020 - 6:01 pm | माझीही शॅम्पेन

धन्यवाद , वेळ आणि श्रम दोन्ही वाचवलेत माझे :) टॉम हँक्सला वाया घालवायला बरेच कष्ट पडले असतील दिग्दर्शकाला :) :)

माझीही शॅम्पेन's picture

22 Apr 2020 - 9:45 pm | माझीही शॅम्पेन

सोनी मराठी वर हास्य जत्रा रिपीट होतंय

त्यातील प्राजु वर आमचा लै म्हणजे लै जीव आहे :)

शा वि कु's picture

22 Apr 2020 - 6:53 pm | शा वि कु

Death note नावाची ऍनिमे सिरीज पाहतोय, भारी आहे. सिनेमांमध्ये थ्रिलर/मिस्टरी/हॉरर सिनेमे जे लॉकडाऊन मध्ये पहिले-
गेट आउट
द डिपार्टेड
नाईव्हस आउट
Se7en (सेवन- हा फारच भयावह)
द युजुअल सस्पेक्ट्स
गॉन गर्ल
मेमेंटो
हेरेडिटरी

त्याखेरीज "द ग्रेव ऑफ द फायरफ्लायस" नावाची सुदंर ऍनिमे फिल्म पहिली.

प्रचेतस's picture

22 Apr 2020 - 6:56 pm | प्रचेतस

सध्या द वॉकिंग डेड बघतोय, दुसरा सीजन संपत आलाय. सिरीज मस्त आणि उत्कंठावर्धक आहे, स्टोरी जबरदस्त आहे पण अंगावर येते, पराकोटीची हिंसकता आहे. काल कंटेजियन पाहिला, ठीकठाक आहे.

ज्योति अळवणी's picture

22 Apr 2020 - 8:17 pm | ज्योति अळवणी

वा. मस्त लिस्ट आहे.

आता जमेल तसे बघण्याचा प्रयत्न नक्की करेन

ज्योति अळवणी's picture

22 Apr 2020 - 8:17 pm | ज्योति अळवणी

वा. मस्त लिस्ट आहे.

आता जमेल तसे बघण्याचा प्रयत्न नक्की करेन

चौकटराजा's picture

22 Apr 2020 - 8:36 pm | चौकटराजा

1953 साली डी एन ए चा शोध लागला.
संदीप वासलेकर यानी एक मुलाखत नुकतीच दिलेली पाहिली. त्यांचे मते जग फारसे बदल्णार नाही दीड वर्ष बेकारी मात्र वाढेल. माझ्या मते मात्र संरक्षण व अवकाश संशोधनाला कात्री लावावी लागेलव आरोग्याला प्रधान्य द्यावे लागेल. 1957 साली आलेल्या साथीत जगात एकून 25 लाख लोक मरण पावले. त्यावेळी हे जेनोम सिक्वेंसिंग हे काही मानवाला ठाउक नव्हते. तरीही काही बळी येत्या वर्शात अजूनही जातील. करोनाचा "जेनोम सिक्वेंसिंग " डिकोड करण्यात जगात 3 जणाना यश आले आहे. मुख्य म्हणजे सर्व राष्ट्रे कोणतेही गुपित न ठेवता त्यावर काम करीत आहेत. तरीही 2022 च्या अगोदर सर्वजिनिक प्रतिकर शक्ती हाच एक आशेचा किरण आहे !

सौंदाळा's picture

22 Apr 2020 - 11:14 pm | सौंदाळा

मस्त
अजून बाकी उत्तमोत्तम चित्रपटांची पण माहीती येऊ द्या

मित्रहो's picture

23 Apr 2020 - 12:06 pm | मित्रहो

पॅरासाइट बघायचा आहे. नक्की बघतो
माझे काही आवडते चित्रपट , काही परत बघितले
Apollo 13
Zero Dark 30 ओसामा लादेनचा पत्ता शोधायची कथा. मला हा चित्रपट तिथपर्यंतच आवडतो. चित्रपटात दाखविलेले torture भयंकर आहे. प्रश्न तोच राहतो हे योग्य कि अयोग्य
Forrest Gump - My mom says that life is like box of chocolate. you never know what you going to get.
Catch me if you can

नेटफ्लिक्सवर बिबिसीच्या शेरलॉक होम्स मालिकेचे काही भाग बघितले. फार आवडले नाही. खूप जास्त मेलोड्रामा वाटला.

करमचंद (१० एपिसोड फक्त) ब्योमकेश बक्षी लॉरडाउन सुरु व्हायच्या आधीच संपले होते. मग तहकीकात बघायचा प्रयत्न केला पण विजय आनंद आणि सौरभ शुक्ला असूनही अजिबात आवडले नाही.

भारतात पिकं पँथर (स्टिव्ह मार्टिन) चित्रपट का दिसत नाही माहीत नाही. प्राईम वर भारताबाहेर आहे. भारतात नाही.

प्रशांत's picture

24 Apr 2020 - 1:27 pm | प्रशांत

याच आठवड्यात Parasite बघितला. - आवडला

या विकांतला LOTR बघायचा विचार आहे

माझीही शॅम्पेन's picture

24 Apr 2020 - 5:37 pm | माझीही शॅम्पेन

LOTR म्हणजे काय हे काही वेळ कळलंच नाही , गूगल बाबाला साकडं घालाव लागलं :)

प्रचेतस's picture

24 Apr 2020 - 5:46 pm | प्रचेतस

ये पीएसपीओ नही जानता ह्या चालीवर पाह्यलं. अद्भुत आहे ही त्रिधारा.

भारी लिहिले आहे,, अजून लिहीत रहा..
मी एक महिन्यात एव्हडे पाहिल्यात..(हिंदी डब, फक्त suits english पाहण्याचा प्रयत्न केलाय )

** म्हणजे खूप आवडले, * म्हणजे छान.
आता कंटाळा आलाय पण बघण्याचा.

Netflix :

Series -
1.**Sacread games(s1, s2)
2.**NARCOS (s1, s2)
3.**The Crown(S1, S2, S3)
4.*यह मेरी फॅमिली.. (S1)
5.*SUITS (s1)
6.*Stranger things(s1)
7. You (S1)
8. Laila series (S1, बकवास)
9. Bard of blood(S1)

pictures -
1.**अंधाधून
2.*Queen
3.*Cast away
4.*बदला
5.*पान सिंग तोमर.
6. Bareli ki barfi
7.*Dolemite is my name
8.*Out of Africa (1985, Oscar)
9. उडता पंजाब
10. गफळा
11.*American Beauty (2000, Oscar)
12.**Forrest Gump

Airtel Xstrem:
1.**Gladiator(2001, Oscar)

TVF :
1. The pitchers (S1)

PRIME VEDIO:

Series-
1.*The family man
2. Mirzhapur

Pictures-
1.*Parasite (2019, Oscar)
2.*dum lagake haisha

गणेशा's picture

26 Apr 2020 - 11:20 pm | गणेशा

तुम्ही सांगितलेला shutter island पाहिला.. एकदम आवडला वा मस्त मज्जा आली.. **

आता A beautiful mind पाहतोय.. नंतर एकत्र रिप्लाय देतो खूप पाहिल्यावर

राघवेंद्र's picture

27 Apr 2020 - 4:39 am | राघवेंद्र

बघितला आणि आवडला

मित्रहो's picture

27 Apr 2020 - 11:53 pm | मित्रहो

काही बघण्यासारख्या डॉक्युमेंटरी
Afghanistan the Great Game by Rory stewart हा माणूस ब्रिटिश संसद पटू आहे अफगाणिस्तान खूप फिरला. त्या एकोणवीसावे शतक आणि विसावे शतकात अफगाणिस्तानात काय झाले. त्यात काय साम्य होते ते सांगितले आहे. तसे Great Game हे पुसत्तक सुद्धा तितकेच वाचनीय आहे. You tube

WW-II काही महत्वाच्या लढाईंची सविस्तर माहिती आहे. ब्रिटन विरुद्ध जर्मनीच्या वायुदलातील युद्धात लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे हिटलरचा वायुदल प्रमुख गोरींग हिटलरला तेच सांगत होता जे त्याला ऐकायचे होते. गोरींगचा गुप्तहेर त्याला तेच सांगत होता जे गोरींगला ऐकायचे होते. नेटफ्लिक्स

Test बॉल टॅप्मरींग नंतर ऑस्ट्रेलियाने टिम कशी उभी केली त्याचा इतिहास.

मला विजय तेंडुलकर यांची ही मुलाखत आवडली.
https://youtu.be/rTqj3GVs6bM

टर्मीनेटर's picture

14 May 2020 - 1:56 am | टर्मीनेटर

छान लिहिलंय, लेख आवडला.
netflix, Prime, Zee5 अशी सगळी सब्स्क्रिप्शन्स असूनही फक्त बघितले जातात यूट्यूब प्रीमियम वरचे चित्रपट. हॉलीवूड चित्रपटांचा शौकीन आहेच पण खास करून बघितले जातात तेलगू, तामीळ, मल्याळम किंवा कन्नड भाषेतील हिन्दी मध्ये डब्ड चित्रपट.
मजा येते बघायला!