पनीर उत्तप्पा (फसलेला)

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in पाककृती
27 Apr 2020 - 3:17 pm

पनीर उत्तप्पा (फसलेला)

आज रविवार सामान आणण्याचा दिवस थोडे उशिराच बाहेर पडले (१० ते १२ वेळ )

नेहमीच्या दुकानासमोर मोठी रांग (कधी नव्हे ते ) तरी हिम्मत न हारता संयमाने उभी राहिले आपल्या सर्वांच्या एका स्वभावैशिष्ट्यानुसार मध्ये मध्ये शिरणाऱ्या बायका,त्यांना हॅन्डल करणारा तो महान सिद्ध दुकानदार असे सगळे एन्जॉय करत असताना तिथे डोशाचे आयते पीठ दिसले मग काय घेऊन टाकले (खिशाचा विचार न करता)

डोसे /उत्तप्पे कधीतरी करू असा विचार केला पण मग नंतर म्हटले आजचा सुट्टीचा अक्षय तृतीयेचा दिवस आजच करून बघूया पनीर पण आणले होते तर पनीर उत्तप्पे करायचे ठरवले

तेल नसल्यामुळे तुपाचे मोहन घालून करून बघायचे ठरवले पण कुठेतरी फसले

साहित्य-

१. डोशाचे आयते पीठ

२. कांदे

३. कसुरी मेथी

४. कांदा लसूण मसाला

५. धने पावडर

६. पनीर

७. तूप

८. जिरे

९. हळद

कृती-

१. कांदे कसुरी मेथी चिरून डोशाच्या पिठात घातले. (पिठात थोडे पाणी घालून सरबरीत मिश्रण केले )

२. त्याच पिठात मीठ,कांदा लसूण मसाला,धने पावडर घालून हलवून घेतले.

३. पनीर किसून घातले. थोडा वेळ (५ मिनिटे)ठेवले

४. तूप गरम करून त्यात जिरे आणि एकदम थोडी हळद घालून फोडणी केली

५. डोशाच्या मिश्रणात हि फोडणी वरून घालून चांगले हलवून १० मिनिटे ठेवले

६. तवा गरम करून त्यावर एक डाव इतके प्रमाण घेऊन घातले (थोडेसे गोलाकार येईल एवढेच फिरवले)

७. पहिले २ उत्तप्पे चांगले निघाले पण नंतर सगळे चिकटून बसायला लागले

८. शेवटी होतील तेवढे आणि जमतील तसे केले आणि खाल्ले

तर ह्यात काय चुकले असावे?

१. पनीर पिठात घातल्याबद्दल doubt येतोय कारण गूगल वर बऱ्याच ठिकाणी तव्यावर डोसा टाकल्यावर एका बाजूला कांदा ,पनीर इ. घालण्यास सांगितले होते पण ते पण चिकटण्याच्या भीतीने मी आधीच मिश्रणात टाकले

२. पिठातच तुपाचे मोहन घातले पण मागे पण असे डोसे केलेले आहेत उलट असे मोहन घातल्याने नंतर मुळीच तेल घालावे लागत नाही बाजूने

पहिले २ व्यवस्थित झाले होते पण नंतर काय फसले काहीच काळात नाही

फसलेली पाककृती असल्याने फोटो अर्थातच नाहीत उरलेले पीठ तसेच ठेवून दिलेय फ्रिज मध्ये त्याचे काय करता येईल?

तरी एक्स्पर्ट सल्ल्यांच्या प्रतीक्षेत

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Apr 2020 - 3:28 pm | प्रचेतस

पनीर कदाचित उत्तपा तव्यावर टाकल्यावर पेरले असतेत तर कदाचित उत्तपा फसला नसता.

दुसऱ्या बाजूने उलटल्यावर चिकटू नये म्हणून आधीच मिश्रणात टाकले आणि तसे पेरल्यावर बनायला किती वेळ लागेल का कच्चे राहील असे पण वाटले

पनीर टाकून उलटायची गरज नव्हती, सर्व्ह करायच्या वेळी पेरले असते तरी चालले असते, बाय द वे, ह्यावर चीज जास्त भारी लागते मात्र.

आज जमली पण धिरडी म्हणून .....

आज प्रत्येक वेळी तव्यावर टाकायच्या आधी थोडे तूप लाकडी उलथन्याने तव्यावर पसरवून घेतले आणि डावाने पसरवताना धिरड्यासारखी consistency ठेवली उत्तप्यापेक्षा कमी जाड आणि डोशापेक्षा कमी पातळ

आज जमली finally panner

Prajakta२१'s picture

27 Apr 2020 - 9:54 pm | Prajakta२१

एकावर एक अशी दोन ठेवली आहेत सोबत कलाकंद,mayonese आणि जवसाची चटणी तोंडीलावणे म्हणून ....
पनीर एवढे चिकटत नव्हते पण double तूप वापरावे लागले (पिठाला मोहन म्हणून आणि तव्यावर पण )

माहितगार's picture

8 May 2020 - 6:35 am | माहितगार

सोबत कलाकंद,mayonese आणि जवसाची चटणी तोंडीलावणे म्हणून

यातले कलाकंदची सोबतची आयडीया आवडली, उतप्प्यात हिरव्या मिरचीचे प्रमाण वाढवून बॅलन्स साधता येईल.

बाकी टॉमॅटो आम्लेटचे घटक टोमॅटो प्युरी आणि जरासा रवा हे जर अ‍ॅडवले तर चिटकणे टाळता येऊ शकेल का ? ( करुन पाहिलेले नाही पण सहज सुचले म्हणून )

Prajakta२१'s picture

8 May 2020 - 11:11 pm | Prajakta२१

धन्यवाद
टोमॅटो प्युरी आणि रव्याचे माहिती नाही
डोशाच्या पिठात रवा असतोच बऱयाचदा (रवा डोसा ,रवा आणि मैदा/तांदुळाच्या पिठाची पण धिरडी होतात)
टोमॅटो प्युरी ने चवीत फरक पडेल चिरलेल्या टोमॅटो पेक्षा
मी जे आयते आणले होते ते तांदूळ आणि उडीद डाळ मिक्स होते (jaypee's)
चिकटणे/न चिकटणे हे तव्याच्या गुणवत्तेवर /नवे जुनेपणावर आणि पिठाच्या घटकांवर,पाणी घालण्याच्या आणि तेला तुपाच्या सोडण्यावर पण अवलंबून असते
चिकटू नये म्हणून मी बऱ्याचदा पिठातच सगळे घालते तव्यावर नाही घालत
घावन /मिश्र पिठाच्या धिरड्यात डाळीचे पीठ मिक्स करतात चिकटू नये म्हणून आणि सरबरीत मिश्रणासाठी