'अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे'
अनिल अवचट
प्रास्ताविक-
(अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र – डिसेंबर 1995 मध्ये ही अनिल अवचटांची मुलाखत प्रकाशित झाली होती. मुलाखत घेणारे दोघेही माझे अंनिस चळवळीतील हितचिंतक आहेत. 2019 मधे म्हणजे मागील वर्षी या मुलाखतीच्या अनुषंगाने अवचटांशी गप्पा मारायला गेलो होतो. त्यांना या मुलाखतीची प्रत दिली व 24 वर्षांच्या कालावधीनंतर आपल्याला यात काही बदल करावासा वाटतो का? आपल्या विचारांच्या छटेत काही बदल करावा वाटतो का? हे अजमावणे हा हेतु बाळगून मी आलेलो आहे असे सुरवातीलाच सांगितले. एकूण गप्पांनतर असे जाणवले की अंधश्रद्धा निर्मूलन वा तत्सम विषयी त्यांना आज काही वेगळे म्हणायचे नाही.माणसांना समजून घेणे हा मूळ गाभा कायम आहे)
[अनिल अवचट आहेत सव्यसाची पत्रकार, कलाकार, लेखक, व्यसनमुक्ती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, पण आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते आमच्या चळवळीचे जिव्हाळ्याचे मित्र आहेत. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे विषय प्रभावीपणे लोकांसमोर आले ते अवचटांच्या लेखणीतून. त्या संदर्भात त्यांची संभ्रम, धार्मिक ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. प्रत्येक प्रश्नाकडे चिकित्सक आणि स्वत:च्या खास वेगळ्या दृष्टीने पहाचे हे अवचटांचे वैशिष्ट्य आहे. टी. बी. खिलारे आणि प्रभाकर नानावटी यांनी घेतलेल्या या मुलाखतीत तुम्हाला त्याला प्रत्यय येईलच..]
व्यसनमुक्तीचं कार्य करीत असताना अंधश्रध्देच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्याला काय आढळले?
अमली पदार्थाने दारुने व्यसनग्रस्त असे जे लोक येतात ते अनेक अंधश्रद्धेचे प्रकार करूनच आलेले असतात. देवऋषाकडे मांत्रिकाकडे जाऊन आलेले असतात. सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे या गावात एक बाबा आहे. त्याच्याकडे बरीच व्यसनग्रस्त माणसे जाऊन नंतर आमच्याकडे आलेली असतात, आम्ही जेंव्हा त्यांच्या पूर्वायुष्याची माहिती घेतो, तेव्हा त्यांना विचारतो, 'डोणजे रिटर्न का ?' तर ते 'हो' म्हणतात. 'काय झालं तेथे ? फायदा झाला का?' असे विचारल्यावर सांगतात की, 'बाबाकडे गेल्यावर सुटते असे ऐकले होते, त्यामुळे तिथ जायच्या अगोदर आम्ही भरपर पिऊन घेतली, त्यामुळे तिकडे काय झालं ते मला आठवत नाही. तिकडून आल्यानंतर काही जणाचे काही दिवस पिण बंद होतही. परंतु नंतर चालूच रहात. मला अस वाटत का सायकॉलोजिकल शॉकचा परिणाम म्हणून काही दिवस ते दारू घेत नाहीत. गळ्यात माळ घालणे, शपथ घेणे याचा मानसिक परिणाम होऊन सुटतही असेल, पण ते थोडे दिवस टिकत. पण व्यसनाच्या मागचं कारण शोधून काढणं किंवा प्रश्नाला स्वत: तोड द्यायला शिकवणं, नातेवाईक-मित्र याची मदत त्याला मिळवून देणं हे सगळं आम्ही करतो. ही प्रक्रिया काही तेथे झालेली नसते. बाबा, महाराज याच्याकडे गेल्यावर काहींना फायदा होतो काहींना होत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना तिकडे जाऊ नका असे सांगत नाही.
चळवळीचा आदर्श कार्यकर्ता कसा असावा असे आपल्याला वाटते?
हजारों वर्षे रूजलेल्या कल्पनांशी लढा देताना फार आक्रमक पद्धतीने बोलून चालत नाही. लोक अंधश्रद्धेचा एखादा प्रकार करतात तो का ? हे कार्यकर्त्याने समजून घेतले पाहिजे आणि त्यास पर्याय सुचवला पाहिजे, जे मांत्रिक, गुरू, महाराज आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही कडक बोला परंतु जे त्यात सापडलेले लोक आहेत, त्यांना तुम्ही शत्रू समजू नका. सर्वसामान्य लोकांविषयी जर प्रेम असेल तरच तो चांगला कार्यकर्ता होऊ शकतो, माणसं अंधश्रद्धेमधे का गुरफटतात, एका टोकाला का जातात, हा आपल्याला वरकरणी जरी वेडेपणा वाटत असला तरी त्यांचं जीवन आपल्याला काहीही माहिती नाही. तो कुठल्या परिस्थितीत एखाद्या बुवाकडे, एखाद्या विधीकडे आकर्षित झाला हे आपल्याला काहीही माहिती नसताना त्याची निर्भत्सना करण हे फार क्रूर आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे शास्त्रीय दृष्टी कशी उपयुक्त आहे हे लोकांना दाखवून देऊ शकले पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यात अभय बंग व राणी बंग यांनी जे आरोग्यविषयक काम केले आहे त्यामळे तेथील लोकांच्या नाही.'आरोग्यविषयक दृष्टिकोनात फारच बदल झालेला आहे. अरूण देशपांडे यांनी कणकवली येथे शेतीच्या कामात उत्कृष्ठ अशी प्रगती केली आहे
अभय बंग व राणी बंग यांच्या कार्याविषयी सांगा,
अभय बंग याने लहान मुलांच्या आजारांची पाहणी करून असा निष्कर्ष काढला की चालमत्यूचं प्रमाण न्यूमोनियामुळे सर्वात जास्त आहे. सरकार व WHO/ (जागतिक आरोग्य संघटना) यांच्या अहवालानुसार डायरिया (हगवण) हे बालमृत्यूचं प्रमख कारण आहे असं मानलं जात होतं. या निष्कर्षास धक्का देणारा असा हा निष्कर्ष होता, त्याने ९७ टक्के बालमृत्यूचं प्रमाण कमी केलं व अनेक न्यूमोनियाग्रस्त मुले वाचवली. राणी बंगने स्त्रियांच्या आरोग्याविषयी पाहणी केली. स्त्रियांचे आरोग्य हे नेहमीच दुर्लक्षित केलं जातं. सरकार किंवा WHO यांचे कार्यक्रमही प्रसूतिपूर्व व प्रसुतिनंतरची काळजी किंवा कुटुंबनियोजन यावर आधारलेले असतात. म्हणजे मुलाच्या जन्माशी संबंधित तेवढ स्त्रीचं क्षेत्र आहे अस मानलं गेलं आहे परंतु स्त्रीच्या आरोग्य विषयक ज्या समस्या असतात त्या बघितल्या जात नाहीत. दोन गावातील पाचशे-सहाशे स्त्रियांची त्यांनी पाहणी केली . प्रयोगशाळेतील चाचण्या करून असा निष्कर्ष काढला की ९२ टक्के स्त्रिया ह्या कुठल्या ना कुठल्या आरोग्य विषयक समस्येने ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी दवाखाना काढला.सुईणींना प्रशिक्षण देऊन त्याच्यामापत रोगनियंत्रण केले . लोकांच्या श्रद्धांचा आदरही ठेवला आणि त्याचबरोबर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्यही सहजगत्या केल.
पांडरंगशास्त्री आठवलेंनी लाखों लोक व्यसनमुक्त केली असं सांगतात. मोठ्या प्रमाणात माणस अशा व्यसनमुक्त करता येतात का?
खरोखरी व्यसनात ग्रस्त असलेले लोक मुक्त करणे आणि लोकांनी म्हणणे आम्ही व्यसनमुक्त झालो यात फरक आहे. व्यसनात सापडलेल्या माणसाला बाहेर काढणं ही फार कठीण गोष्ट असते. घाऊकपणे लोक व्यसनमुक्त होत नसतात. पण व्यसनविरोधी वातावरण निर्माण होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे..
ध्यानधारणा (meditation) आपण करता का? त्याबद्दल आपलं मत काय?
ध्यानधारणा म्हणजे माणसाचे स्वत:शी काही काळ असणे. स्वत:च्या वर्तनाच, जीवनशैलीचं एकातामध्ये तो निरीक्षण करतो. मग त्याला काही नवीन गोष्टी सुचतात, आपण जे केलं ते बरोबर केल का याचा तो विचार करू लागतो. कोणाला काही आपण बोललो असेल तर त्याचा आपणाला विचार करता येतो. ध्यानधारणा म्हणजे धार्मिक किंवा आत्म्याच्या जवळ जाणारी गोष्ट असेच समजायला पाहिजे असे नाही. ध्यानधारणा बसूनच करता येते असं काही नाही. तस्लीनता - मग ती कुठेही येऊ शकते - माणसाच्या जीवनातला एक मोठा आनंद आहे. इगतपुरीच्या आश्रमात विपध्वनामध्ये दहा दिवस लोक. न बोलता राहतात. पहिले काही दिवस मनामध्ये खूप विचार येतात. पत्तु नंतर मात्र मनाची एक वेगळीच अवस्था येते. त्याचा एक अनुभव माणसाने घ्यावा कधीतरी. त्यात बाईट काही नाही. आपले ब्यबहारातले जे आनंद असलात, त्याच्यापेक्षा वेगळ्या रीतीने आनंद घेण्याची ताकद आपल्या मनामध्ये असते. ती आपण स्वत पुरती. शोधून काढू शकतो, त्यातून आत्मविश्वासही येऊ शकतो.
योगासने आपणा करता का? त्याबद्दल आपले मत काय आहे?
योगासने मी करतो, ती एक जगण्याची वृत्ती आहे. आपल्या ज्या अतिरिक्त गरजा असतात, (उदा. टीव्ही मंग रिमोट कंटोलटी व्ही डी सी आर कार त्याला अंतच नाही आपल मन जे सैरभैर असतं त्यामुळे आपण निसर्गापासून आणि स्वत:पासून दूर राहतो. योग हे स्वत:ला स्थिर करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे शारीरही नीट राहतं आणि मनही. योग ही गोष्ट माणसाला व्यायामासारखी एकदम करता येत नाही. हळू हळू आत्मसात करावी लागते. यात स्पर्धा नसते. कुठल्याही खेळात जी स्पर्धा असते ती माणसाचं मन खाऊन टाकते. खेळ म्हणजे मनसोक्त आनंद, स्पर्धा असेल तर ती माफक असावी.
योगामुळे निरनिराळे रोग बरे होतात, सिध्दी प्राप्त होतात असा दावा केला जातो....
योगामुळे काही रोग बरे होतात, रोग न होण्याची शक्यता वाढते हे मला मान्य आहे. योगासनाच्या निरनिराळ्या आसनांमुळे आपले न वापरले गेलेले शारीराचे भाग आपण वापरतो. औषधाची गरजच भासू नये अशा त-हेची जी काय शारीरिक अवस्था ठेयायची असते ती योगासनामळे येऊ शकते. योगामळे सिडी प्राप्त होतात असे मी मानत नाही.
कुठल्या रोगासाठी कुठली पॅथी वापरावी हे कसं ठरवावं?
शास्त्राने सिद्ध झालेली असतात ती अॅलोपॅथिक औषधे असतात. परंतु अजून शास्त्राने सिद्ध झाल्या नाहीत अशा होमिओपॅथीपासून अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक पॅथीचे दावे खूप असतात. आणि त्या मानाने ते सिद्ध करू शकत नाहीत. त्यामध्ये काही नाही असेही म्हणता येत नाही, होमिओपथिचा काही तोटा तरी मला दिसत नाही. होमिओपॅथीने आजार बरे झालेले मी पाहिले आहेत.
जीवघेण्या आजारात, ज्या रोगाचे निदान झाले नाही अशा आजारात किंवा खात्रीचे ॲलोपॅथीचे उपाय उपलब्ध असताना केवळ रोग मुळातून बरा होतो या आधार नसलेल्या श्रध्देपायी होमिओपॅथी वापरावी का?
शेवटी प्रत्येकानं ठरवावं कोणती पॅथी थापराची, उलट अॅलोपंथीकडे जाणाऱ्यांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की विनाकारण ॲटीबायोटिक्स घेऊ नका वाट्टेल तशी ऑपरेशन्स् करू नका
रिकी (Reiki) उपचार पद्धतीचा आपण कोर्स केलेला आहे असे कळले. त्यातून आपल्याला काही फायदा झाला का?
रिकी उपचार पद्धतीचा कोर्स मी केला, परंतु मी ते सोडून दिलं. उपचार पद्धतीवाले असे म्हणत होते की वैश्विक उर्जा (cosmic energy) असते, ती आपण आपल्या शरीरात घेऊ शकतो. लहान मुलांना ती लवकर मिळू वायते, कारण त्यांची 'ओपनींगज् (शरीराची 'द्वारे') जास्त खुली असतात, मोठ्या माणसांची बुजलेली असतात. ही वैश्विक उर्जा आपल्या शरीरात न भिनल्यामुळे शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होतात,आपण जर ही बश्यिक उजो आपला चनल्स (मार्ग) खुली करून घेतली तर सर्व रोग दूर होतील असा त्यांचा सिद्धांत आहे. एकदा चैनेल्स खुली दोऊन वैश्विक उर्जा मिळाल्यानंतर तुम्ही ती दुसऱ्याला देऊ शकता. संबंध शरीरावरील प्रत्येक भागावर तीन-तीन मिनिटे हात ठेवून त्याचं अवस्थांतर करायचं असतं. त्यामुळे रोग निवारण होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे.
वैश्विक उर्जा असते. आणि तिचा आपला संपर्क तुटलेला असतो, इथपर्यंत ठीक होतं. त्या उर्जेचा संपर्क पुन्हा सुरू झाल्यावर रोग जाऊ शकतील हे एकवेळ आपण मान्य करू. परंतु या माणसाने माझी चॅनेल्स खुली केली. हा भाग न कळण्याजोगा आहे. ते असं म्हणतात की तुम्हाला आलेल्या परिणामावरून तम्ही ते ठरय शकता. आता या गोष्टी सिद्ध होणार नाहीत, परंस त्याचे जर परिणाम मिळत असतील तर तुम्ही का मान्य करीत नाही? असे ते म्हणतात. मला स्वत:ला आपण विशेष वेगळा अनुभव घेतला असे वाटले नाही. शरीराच्या निरनिराळ्या भागावर काही मिनिटं हात ठेवल्यामळे थोडं बरं वाटणं साहजिक आहे. ही रिकी उपचार पद्धती मला आता मिळणार आहे. त्यामुळे त्याचा मला फायदा होणार अशी लोकांची श्रद्धा झालेली असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या बरं वाटत असाव.
पब, बार याबद्दल काय म्हणता येईल?
उपभोगवाद घातक आहे. पण तो आता आपण स्वीकारलेला आहे. खुल्या आर्थिक धोरणातुन तो आलेला आहे.. आपल्या बिघडलेल्या तब्येतीवर आपण 'मल्टिनॅशनल कंपन्या' (बहुराष्ट्रीय कंपन्या) हे जहरी औषध आपण मागवलं आहे. त्याचा उपयोग होणार की नुकसानच जास्त होणार हे अजून ठरायचं आहे. पब, नग्न जाहिराती ही सर्व उपभोगवादाची अंग आहेत. प्रत्येकजण या उपभोग संस्कृतीमध्ये कुठे ना कुठे अडकलेलाच आहे. या संस्कृतीमधून तुम्हाला काही निवड करता आली पाहिजे, एखादी गोष्ट आवश्यक किती आहे? अमुक इतक्या मर्यादपर्यंत मी ते वापरेन असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे
तुम्ही आत्मसात केलेल्या निरनिराळ्या कलांविषयी सांगा ?
माणसांन स्वत:पुरत करायचं म्हंटले तर खूप करता येण्याजोग आहे. प्रत्येक माणस हा कमी-अधिक प्रमाणात कलावंत असतोच प्रत्येक माणसाच्या बाबतीत केलेल्या क्षेत्रात निर्मितीशील अशी वृत्ती असते. तिचं खच्चीकरण हे लहानपणी व पुढे शाळेत गेल्यावर होत असतं. ही वृत्ती जर जागी ठेवली तर स्वत:ला रमेल असं काही ना काही करता येतं. ओरिगामी, काष्ठतक्षण (Wood carving) बासरी यामध्ये मला आनंद मिळतो. विकणे प्रदर्शन करणे अशी वृत्ती मी कलेला आजपर्यंत लावलेली नाही, त्यामुळेच माझ्यातल्या कला स्वतंत्र आहेत असे मला वाटते. स्पर्धात्मक जगानं आपल्याला असं शिकवलंय की मुलं थोडी कुठं चित्र काढायला लागली की त्याला स्पर्धेत पाठवायची तयारी सुरू होते. स्पर्धेने तुम्ही त्याला झाकोळून टाकता. स्पर्धा मी माझ्या जीवनातून काढून टाकलेली आहे, त्यामुळे निर्भेळ आनंद मी घेऊ शकतो, तो कोणालाही घेता येईल. .
आतापर्यंत आपली किती पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि त्यातील अंधश्रद्धा निर्मूलनावर कोणती आहेत. ?
जवळपास माझी पंधराच्या आसपास पुस्तके प्रसिद्ध झाली त्यातील अंधश्रद्धा निर्मूलन विषयक दोन आहेत. – संभ्रम व धार्मिक,
दिवाळी अंकातच का लिहिता ? इतरत्र का लिहित नाही ?
दिवाळी अंकात मला भरपूर जागा मिळते आणि तो खूप काळ वाचला जातो, मासिके आता बंद पडली आहेत किंवा नीट चालत नाहीत.
या वर्षीच्या दिवाळी अंकात कोणकोणते लेख लिहिलेत ?
1) पाणी व माती - साप्ताहिक सकाळ
२) काका चव्हाणांचं व्यक्तिचित्र - महाराष्ट्र टाईम्स
३) Wood Carving - दीपावली
४) तेंदू- पत्ता- मौज, ५) डावं जग - लोकसत्ता
आपल्या मुलींना आपण शहरी प्रचलित कल्पनेच्या विरोधी अशा नगरपालिकेच्या शाळेतून शिकवलं, त्याची काय कारणे ?
आम्ही असं ठरवलं होतं की आमची मुलं मराठीत शिकावीत. पायी जाता येईल अशी जवळ शाळा असावी . तिसरं म्हणजे गरीब लोक जिथं शिकतात तिथं मुलं शिकावीत, त्यामुळे गरीबांबद्दल त्यांना प्रत्यक्ष माहिती कळेल. त्यांच्यातल्या काहींबरोबर मैत्री असेल, राम मनोहर लोहिया हे सरकारी रूग्णालयात मरण पावले होते. त्या घटनेचा माझ्या मनावर परिणाम झाला, राजकीय नेते जसे विमानाने परदेशात जातात व उपचार करून घेतात तसे त्यांनी केलं नाही. आम्ही दोघांनीही विचार करून दोन्ही मुलांना नगरपालिकेच्या शाळेत घातले त्यापैकीएक आर्टिस्ट झाली व सध्या संगणक शिकत आहे दुसरी मुक्ता, M.A. Clinical psychologist झाली. युनिव्हर्सिटीत पहिली आली. दहावीपासून वरच्या क्रमांकात येतच होती, त्या कुठल्याही. क्लासला गेल्या नाहीत. त्यांनी कुठलही गाईड वापरलं नाही, त्यांना जन्मात आम्ही अभ्यास कर असं म्हंटलं नाही. मुलांना स्वत:हून शिकावसं वाटलं तर ते खरे शिक्षण, आपल्या पोरांच भवितव्य हे आपण फार हातात घेऊ नये त्यांचा त्यांना मार्ग का द्यावा. एकदा मुल बाढल्यावर पुढे नातं हे मित्रासारखंच असतं.
______________________________________________________________________________
प्रतिक्रिया
19 Apr 2020 - 11:54 am | कंजूस
अंधश्रद्धाळूंची निर्भत्सना कोणीच करत नाही.
19 Apr 2020 - 12:30 pm | संगणकनंद
(पुन्हा आम्ही असें युक्तिवाद केले की "तुम्ही गुरुजी/पुरोहित असून(?) स्वतःच्याच धर्माविरुद्ध कसे बोलता?" हा मनभावी परंतु अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न येतोच! जणू काही पुरोहित जेव्हढा जास्तीत जास्त अंधश्रद्ध तेव्हढा तो धार्मिक जनतेला अधिक आदर्श,असा या लोकांचा {आत्मप्रतारक} समजच आहे... असो!)
मनभावी परंतु अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न ??? ही अंधश्रद्धाळूंची निर्भत्सना नव्हे तर काय?
यावर मी "सुधारक असणारी व्यक्ती कधीही लोकांप्रती अशा अपशब्दांचा वापर करणार नाही" असे विधान केले असता सदर धागाकर्त्याने "तुम्ही धूळफेक करत रहा. मी वाचत राहीन. पुढील धुळफेकीस शुभेच्छा! :) चालू द्या... :)" असे उत्तर दिले.
सच्चे सुधारक कसे असतात हे सांगणारा अतिशय सुंदर लेख या व्यासपिठावर लिहील्याबद्दल श्री प्रकाश घाटपांडे यांचे अनेकानेक आभार. या लेखाने सच्चे सुधारक आणि स्वयंघोषीत ढोंगी सुधारक यातील फरक लोकांस कळेल अशी मी आशा व्यक्त करतो.
19 Apr 2020 - 12:02 pm | चौथा कोनाडा
सुंदर लेख !
२५ वर्षांनंतर पुनः अवचटांची मुलाखत घेणे, मतांचा मागोवा घेणे भारी वाटले !
(डोणजे बाबांची व्यसनमुक्ती कधी कधी अयशस्वी होते याची कल्पना नव्हती)
19 Apr 2020 - 12:40 pm | सतिश गावडे
कॉलेजचं वय सरल्यानंतर कथा कादंबर्यांचं वाचन मागे पडलं. वास्तववादी, दैनंदिन जीवनाशी, त्याच्या समस्यांशी संबंधीत वाचन सुरु झालं. त्यातील सर्वात पहीलं पुस्तक होतं अनिल अवचटांचं "कार्यरत". त्या पुस्तकाने इतका भारावून गेलो की त्यांची सामाजिक समस्यांवरील रिपोर्टाज शैलीतील पुस्तकं विकत घेऊन झपाटल्यासारखी वाचून काढली. आज माझी जी काही विचारसरणी बनली आहे त्यावर डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांचा खुप प्रभाव आहे.
19 Apr 2020 - 1:07 pm | प्रकाश घाटपांडे
मुलाखत घेणारे दोघेही यनावालापंथातील आहे :)
19 Apr 2020 - 1:12 pm | सतिश गावडे
यनावाला पंथीयांचे विचार अतिशय टोकाचे असतात असे त्यांच्या इथल्या लेखांवरुन, त्यांच्या पुस्तकांवरुन वाटते. त्यामानाने डॉ अवचट (आणि डॉ. दाभोलकर) यांची भुमिका लोकांप्रती सहानुभूतीची आहे जी या लेखातही व्यक्त झाली आहे.
19 Apr 2020 - 1:23 pm | प्रकाश घाटपांडे
अंनिसमधेही तो गट सुरवातीपासून आहे.काही आक्रमक लोक असायलाही लागतात चळवळींमधे
19 Apr 2020 - 1:35 pm | सतिश गावडे
मी वाचलेल्या माहितीनूसार, पूर्वी डॉ. दाभोलकर आणी श्याम मानव सोबत काम करायचे. मात्र पुढे त्यांचे याच मुद्द्यावरून मतभेद होऊन दोघे स्वतंत्र काम करु लागले.
19 Apr 2020 - 1:44 pm | प्रकाश घाटपांडे
नागपूरात मानवीय नास्तिक मंच या नावाने सुरु झालेल्या एका गटाचे पुढे अंनिस मधे रुपांतर झाले. मानवीय नास्तिक मंच या नावामुळे कार्यकत्ते वा सामाजिक स्विकार मिळण्यात नक्कीच मोठ्या अडचणी आल्या असत्या. भ्रम आणि निरास मधे तो उल्लेख आहे
19 Apr 2020 - 2:27 pm | चौकस२१२
डॉ अवचटांचे विचार खूपसे पटले .. ( वाचून बरे पण वाटले )
आपण हि मुलाखत मोठ्या माध्यमातून पण प्रसिद्ध करावी
अवचटनसारख्यांना पण एक/ दोन प्रश्न विचारावेसे वाटतात .. ते आपण त्यांचं पर्यंत पोचवलं का
असे कि"
- "आपण म्हणता तसे अंधश्रद्धा निर्मूलन हे व्हायला पाहजे या मतांशी अनेक सहमत आहेत त्यात शंका नाही पण हे करताना अनेक सर्वसामान्य हिंदूंना असे का वाटत राहते कि रोख फक्त एका धर्मावर आहे?
- तुम्ही चळवळ करताना इतर धर्मांना पण का नाही "तेवढ्याच" जोरकस पणे धारेवर धरत? तसे पुरेसे केलेत कि या अश्या प्रश्न पडलेल्या हिंदूंना हि वाटेल कि हा.. आहेत बाबा हे खरंच निपक्षपाती ", कधी विचार केलाय त्यांनी?
- प्रत्येक हिंदू काही मनुवादी नाही किंवा भोगलं अन्धश्रधाळू नाही हो डॉक्टर साहेब.. पण तुम्ही आणि तुमची चळवळ का वर्षनुवर्षे असा वागते .. स्पष्ट बोलायचं तर तुम्ही घाबरता का इस्लामिक वैषविक आक्रमक शक्तीला किंवा धूर्त आणि धनवान ख्रिस्ती समाजाला?
- दुसरे असे कि या चालवलाय ने मूळ काम कितीही चांगले आणि समाजउपयोगी असले तरी "अति दाव्याच्या ( मी यथे अति हा शब्द मुद्डमून मांडला आहे ) तंबूत का बसता ?
त्यांचाच हेतू आणि तुमचा हेतू यात फारकत असू शकतो असे वाटत नाही का?
आणि खास करून उजव्या विचारसरणीचे सरकार आल्यावर यात जास्त वाढ झालेली वाटते..
(मुस्लिम सत्यशोधक समाज आहे हे माहित आहे पण त्यांची संख्या अशी किती आणि प्रभाव तो किती ?
बरं बिगरमुस्लिमानी यात काही बोलायची सोय नाही कारण ते पडतात काफिर... हिंदू समाज एवढा निश्चितच सहिष्णू आहे कि अश्या चळवळीची गरज आहे हे मानतो ...आणि त्याला खतपाणी हि घालतो पण त्याचा अर्थ असा नव्हे कि त्याचाच गैरफायदा घयावा
इति
एक निधर्मी सर्वधर्मसमभावी गाय सुद्धा खाणारा हिंदू
19 Apr 2020 - 3:17 pm | प्रकाश घाटपांडे
डॉक्टर अवचट अंनिस चळवळित नाहीत
19 Apr 2020 - 3:26 pm | प्रकाश घाटपांडे
चौकस २१२, मिपावर उत्खनन करा यावर भरपूर चर्चा वितंडवाद वाद झालेले आहेत
19 Apr 2020 - 4:11 pm | चौकस२१२
ठीक आहे नसतील डॉ अवचट अनिस मध्ये मी गृहीत धरलं ते चुकलं .. मान्य.. पण ते त्या विचारसरणी च्या खूप जवळचे आहेत असे म्हणले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते ... आणि माझे त्यांना प्रश्न तेच राहतात ... आपण संपर्कात आहात असे लेखावरून दिसले म्हणून विचारावेसे वाटले... विचारले एवढेच
बाकी हा नेहमीच विषय आहे मिपावर हे हि माहित आहे
19 Apr 2020 - 4:39 pm | प्रकाश घाटपांडे
बाकी हा नेहमीच विषय आहे मिपावर हे हि माहित आहे >>> हो पण आपण ते वेळोवेळी वाचले आहेत का? आपले मुद्दे त्यात अनेकदा चर्चिले गेले आहेत. कारण ते अगदी टिपिकल आक्षेप आहेत.
21 Apr 2020 - 3:49 pm | प्रकाश घाटपांडे
श्रद्धा अंधश्रद्धा या विषयावर प्रा. य. ना. वालावलकर यांनी यनावाला नावाने भरपूर लेखन केले आहे.तुमच्या साठी व अन्य मिपावर नवीन आलेल्या लोकांसाठी त्या लिंक एकत्रित देतो आहे. काय आहे की रेडिमेड लिंक असल्या कि वाचले जाते.
मुर्तीपुजन म्हणजे मागसलेपणाचे लक्षण आहे का?
http://mr.upakram.org/node/2061
मूर्तीपूजन म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे कां? भाग - २
http://mr.upakram.org/node/2071
धर्म देवाने निर्माण केला काय?
http://mr.upakram.org/node/686
श्रद्धा-अंधश्रद्धा............ समालोचन !!
http://mr.upakram.org/node/1936
वैचारिक गोंधळ
http://mr.upakram.org/node/2077
नामस्मरणाची ताकद व चमत्कार.
http://mr.upakram.org/node/1892
गुरू.. एक कोडे
http://mr.upakram.org/node/2289
अंगारकी चतुर्थी
http://mr.upakram.org/node/3844
गॅस गणराज
http://mr.upakram.org/node/3941
गुरुविण कोण लावितो वाट
http://mr.upakram.org/node/3789
विवेकवाद अध्यात्म आणि आत्मघात
http://mr.upakram.org/node/3719
कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प
http://mr.upakram.org/node/3665
नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स १८९०)
http://mr.upakram.org/node/3645
त्या मोरयाची कृपा
http://mr.upakram.org/node/3597
महाकाव्याचा विषय
http://mr.upakram.org/node/3579
ज्ञानेश्वरील अकरा ओव्या
http://mr.upakram.org/node/3526
चालविली भिंती मृत्तिकेची
http://mr.upakram.org/node/3474
बुद्धीदाता
http://mr.upakram.org/node/3379
अध्यात्मिक प्रवचन
http://mr.upakram.org/node/3356
बिनडोकपणाचा कळस
http://mr.upakram.org/node/3362
देव धर्म आणि गाजरचित्रे
http://mr.upakram.org/node/3323
उदकी अभंग रक्षिले
http://mr.upakram.org/node/3313
अशी एक शक्यता केवळ तर्क
http://mr.upakram.org/node/3276
भयसूचक बातमी
http://mr.upakram.org/node/3216
चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश
http://mr.upakram.org/node/3161
ईश्वरे तृणे करुन रक्षण केले
http://mr.upakram.org/node/2928
यात आश्चर्य ते काय?
http://mr.upakram.org/node/2883
हा खेळ बाहुल्यांचा
http://mr.upakram.org/node/2820
गूढ आश्चर्यकारक अनुभव
http://mr.upakram.org/node/2525
कार्यकारण भाव
http://mr.upakram.org/node/2503
विवेकवादी लेखनावर आक्षेप
http://mr.upakram.org/node/2580
भ्रमाचा भोपळा
http://mr.upakram.org/node/2388
सामान्य समज (कॉमनसेन्स)
http://mr.upakram.org/node/2450
सदसद्विवेक बुद्धी
http://www.misalpav.com/node/17008
दैव जाणिले कुणी |
http://www.misalpav.com/node/17364
अस्तंगत होणार्या अंधश्रद्धा
http://www.misalpav.com/node/21383
शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |
http://www.misalpav.com/node/24886
अध्यात्म-विज्ञान समन्वय ?
http://www.misalpav.com/node/33424
मंत्रसामर्थ्य
http://www.misalpav.com/node/33686
भावना दुखावणे
http://www.misalpav.com/node/33757
माझी भूमिका
http://www.misalpav.com/node/33826
आस्तिक वैज्ञानिक
http://www.misalpav.com/node/33950
सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक
http://www.misalpav.com/node/34081
मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म
http://www.misalpav.com/node/34344
श्री.जपे यांचा युक्तिवाद
http://www.misalpav.com/node/34727
विज्ञानदिनाच्या निमित्ताने
http://www.misalpav.com/node/35123
श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान
http://www.misalpav.com/node/41229
अठ्ठावीस लक्ष रुपये
http://www.misalpav.com/node/41400
आनंददायी इहलोक
http://www.misalpav.com/node/41497
श्रद्धेमुळे विकृती
http://www.misalpav.com/node/41567
भाव तेथे(च) देव:......यनावाला
http://www.misalpav.com/node/41667
मानवी ज्ञानभांडार
http://www.misalpav.com/node/41745
श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।.
http://www.misalpav.com/node/41821
विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला
http://www.misalpav.com/node/41913
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...
http://www.misalpav.com/node/42032
मूलभूत नीतितत्त्वे
http://www.misalpav.com/node/42134
22 Apr 2020 - 8:22 am | रविकिरण फडके
दाभोलकर हे हिंदूंचेच दोष दाखवीत असत, इतर धर्मामधील उणीवा, अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा, ह्याकडे ते दुर्लक्ष करीत, इ. सर्व हेत्वारोप आहेत. तुमच्यावर अन्याय होतोय, कुणीतरी तुमच्यावर विनाकारण टीका करतोय, तुमच्या औदार्याचा गैरफायदा घेतोय, असं म्हटलं की कुणालाही आवडतं/ पटतं. ह्या मानसिकतेचा टीकाकार फायदा घेतात.
दाभोलकरांवर अशा प्रकारच्या सदैव होणाऱ्या आरोपांमुळे 'हा काय प्रकार आहे, ह्या आरोपांत तथ्य आहे का, असल्यास किती', हा माझ्यासाठी एक कुतूहलाचा विषय होता. म्हणून, संधी मिळाली तेव्हा मी थोडा वेळ खर्च करून 'अंनिस'बद्दल, त्यांच्या कामाबद्दल माहिती करून घेतली. अंनिसचे कार्यकर्ते, आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दाभोलकरांनी लिहिलेली पुस्तिका, आणि अंनिसच्या मासिकाचे सुमारे ३०-४० अंक - काही जुने, काही अगदी अलीकडचे - हीच केवळ माझ्या अभ्यासाची सामग्री. झालंच तर, त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख, त्यांच्या प्रकाशित झालेल्या मुलाखती, हेही कुठेतरी डोक्यात होतंच. एवढाच अभ्यास.
निमित्त असं झालं, की एका परिचिताने दाभोलकरांवर आगपाखड करणारा एक लेख WhatsApp वर पाठविला आणि वर, 'तुमचं ह्याच्यावर काय मत आहे', असंही (खवचटपणे) विचारलं. हे गृहस्थ मला डावा समजतात. माझा एक दुसरा मित्र मला कट्टर उजवा, प्रतिगामी, इ. समजतो! (The Roots of Coincidence ह्या पुस्तकात Arthur Koestler लिहितात, की माझे अर्धे मित्र मला भयंकर रुक्ष शास्त्रीय विचारसरणीचा समजतात, तर अर्धेजण मला अतींद्रिय शक्तीसारख्या अशास्त्रीय, भाकड गोष्टींवर विश्वास ठेवणारा असा मानतात! हे वाचल्यानंतर, 'माझी भूमिका मांडण्यातच मी कमी पडतो की काय', हा माझा गंड नाहीसा झाला!)
तर त्याच सुमारास माझी अंनिसच्या एका कट्टर कार्यकर्त्याशी ओळख झाली होती. (मला convert करण्यासाठी तो अर्थातच उत्सुक होता. पुढे त्याने माझा नाद सोडला, कारण अंधश्रद्धा ही भारताची क्रमांक एकची समस्या आहे असं मला वाटत नाही. चळवळीतील लोकांची एक एकांगी भूमिका असते तीही मला रुचत नाही.) तर ह्या कार्यकर्त्याने अंनिसची त्याच्याकडे असलेली ग्रंथसंपदा माझ्यासाठी खुली केली. त्यातून मला समजलेली भूमिका खालीलप्रमाणे:
१) मी हिंदू आहे, आणि इतरांची घरं साफ करण्यापूर्वी मला माझे स्वतःचे घर नीट करायचे आहे.
२) ह्या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, आणि जर आपण आपल्यातील दोष काढले, तर तेवढ्या प्रमाणात आपसूकच देश सुधारणार आहे.
३) एकदा आपण हे केलं की इतरांना सुधारायला सांगण्याचा आपला नैतिक अधिकार वाढतो.
४) असं असल्यामुळे, मला आत्ता निष्कारण वाद ओढवून घ्यायचे नाहीत.
मला तरी ही भूमिका संयुक्तिक वाटते. अंनिसचे अंक चालल्यानंतर असं लक्षात आलं, की अन्य धर्मियात (इस्लाम व ख्रिश्चन) सुरु असलेली बुवाबाजी व त्याचीही किमान ४-५ उदाहरणे त्यांत होती, आणि अंनिसने त्यांचा पर्दाफाश कसा केला ह्याबद्दल साद्यन्त माहितीही. एकूण रोख असा दिसला, की जर अशा बुवाबाजीमुळे समाजाची फसवणूक, नुकसान होत असेल तर त्यावर कायदेशीर उपाय योजले पाहिजेत. ह्यातही मला काही गैर वाटत नाही.
तर हे सगळं मी लिहून काढलं आणि त्या माझ्या परिचित गृहस्थांना पाठवलं. अगदी फोटो, अवतरणे, इ. सहित. "शेवटी तुम्ही तुमचंच खरं करणार" असं म्हणून त्यांनी संवाद संपविला.
गोष्ट संपली!
22 Apr 2020 - 8:52 am | चौकस२१२
हे चारही मुद्दे कळले आणि त्यात पाचवा दाभोल्कारांर्नी एका खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मांडला होता तो म्हणजे देशात ८०%+ अधिक हिंदू आहेत आणि त्यामुळे अनिस च्या कार्यात हिंदू धर्मातील "केसेस" असण्याची संख्या ८०% च्या आसपास असली तर त्यात गैर ते काय.
- तांत्रिक दृष्ट्या हे ५ हि मुद्दे खरे आहेत पण ते फक्त मला तरी असे वाटते त्यांना सोयीचे होतात म्हणून वापरले आहेत.
अनेक अनिस चे महत्व ओळखणाऱ्या आणि पटणाऱ्या माझ्यासारख्यांना २ मूलभूत प्रश्न आहेत आणि ते खास करून सध्याच्या वातावरणात
- अनिस वरील एकांगी ( म्हणजे सर्वधर्म समभाव च्या दृशीतकोणातून बघितला तर ) पणाचा आरोप अगदीच खोटा आहे का? आणि असे अनेक हिंदूंना का वाटते काहीतरी कारण असेल ना? त्यांच्यावर टीका करणारे काय सगळे आंधळे संधी मनुवादी आणि कर्मठ नाहीयेत.. याचा अनिस ची आंधळी भलावण करणाऱ्यांनी जरा विचार करावा ..
- अनिस च्या आणि दाभोकारांच्या मूळ उद्देशाबद्दल कोणालाच शंका घ्यायला कारण नाही पण सध्या जे अर्बन नक्षलवाद/ अवॉर्ड वापसी ग्यांग/ देश के तुकडे तुकडे चालू आहेत त्यांचं आणि अनिस च्या मूळ धोरणात / मनोवृत्तीत फार मोठा फरक आहे आणि अनिस ला "हायजॅक" तर हे अति जाहली कारणात नाहीत ना याची भीती वाटते
त्यांनी एका व्यासपीठावर हि बसू नयेत .. अनिस च्य बरोबर बसण्याची अरुंधती रॉय/ वागले वैगरे सारखानची अजिबात लायकी नाही
हे दोन मुद्दे सर्वांनी गंभीर पणे लक्षात घावे
(खुपते तिथे गुप्ते मधील त्यांची मुलखात पहिली काल आणि अक्षरशः रडू आलं , सुस्पष्ट विचार आणि प्रामाणिक .. हुशारी.... अश्या भल्या माणसाची हत्या करणारे आणि सध्याचे अर्बन नक्षलस दोन्ही हरामखोरच )
22 Apr 2020 - 9:29 am | प्रकाश घाटपांडे
सहमत आहे. आपली एकूण संयत प्रतिक्रिया पटली. अगदी प्रारंभीच्या काळात मला वाटायच कि या समस्येमधे अनेक समस्या दडल्या आहेत. अंधश्रद्धा ही मूळ समस्या आहे.ती एकदा दुर झाली की बाकी प्रश्न आपोआप सुटतील
20 Apr 2020 - 6:11 am | चौकस२१२
अलीकडचे वाचले आहेत... अगदी मिपाचीसुरुवातीपासूनचे नाही......
आणि "टिपिकल आक्षेप आहेत...." हो पण म्हणजे मी हे प्रश्न पुनुरावृत्ती होते म्हणून विचारूच नयेत असे म्हणणे आहे कि काय आपले?
जर डॉ अवचट. अनिस च्या बाजूने भलावण करणारे "टिपिकल " लेख येत परत असतील तर ते चालेल ..! पण त्याला प्रश्न विचारणारे म्हणजे मात्र पुनुरावृत्ती करणे! अजब न्याय आहे हा !
असेल इच्छा तर मांडलेल्या प्रश्न उत्तर द्या ..किंवा पूर्वीची एखादी लिंक द्या .. नसेल इच्छा तर सोडून द्या पण हे सांगू नका कि "टिपिकल" आहेत म्हणून विचारूच नयेत!
एक खुलासा,,, माझा विरोध अनिस/ अवचट यांचं कार्याला अजिबात नाही प्रश्न त्यांचं सारख्यांच्या एकांगी पणा वर आहे .. भोंदू बाबानं पेक्षा मी कधीही अनिस लाच पाठोंबा देईन
20 Apr 2020 - 7:18 am | प्रकाश घाटपांडे
टिपिकल आहेत म्हणुन विचारुच नये असे मी म्हटले नाही.
पुनरावृत्ती प्रश्नांची असते विचारणारे वेगवेगळे असतात. त्यांच्यासाठी ती पहिली वेळ असू शकते.
तेच तेच लिहिण्याचा कंटाळा येतोच. गेल्या तेरा वर्षात यावर भरपूर चर्चा झाली आहे. जेन्युईन लोक उत्खनन करुन ती शोधून काढतातच. वेळोवेळी लिंक दिल्या आहेत. इतर उत्साही वाचक ही त्या देतात. उत्तरे विखुरलेली असतात ती वेळोवेळी शोधून काढणे व एकत्रित करणे कंटाळवाणे होते. मिपावर नवनवीन सभासद येत असतात. प्रत्येकाला रेडीमेड उत्तरे देत बसणे हा मंत्रचळ होउन बसतो. शिवाय तो किती जिनियस आहे हे सुरवातीला समजत नाही
आपणही उत्खनन केले तर त्यात गुरफटुन जाल काही काळानंतर.
20 Apr 2020 - 7:34 am | चौकस२१२
मग साहेब एकच बाजू मांडणारे लेख हि लिहू नका ना ! त्याची पुनरावृत्ती वाचून पण कंटाळा येतो.. जर कोणी बघा हे अनिस / अवचट वैगरे कसे चांगले काम करीत आहेत ( आशय, प्रत्यक्ष शब्द तसे नसतील ) अर्थाचे लेख टाकत असेल तर मग प्रश्न विचारणारा पण विचारू शकतो ना? "टिपिकल प्रश्न "
आणि कदाचित आपल्या हे लक्षात आले असेल कि मी एक वेगळा मुद्दा पण मांडला आहे तो हा कि "पाठिंबा देणारे पण वैतागू लागले आहेत" .. हा तो मुद्दा , पुरोगामी असण्याचं मक्ता काही फक्त अवचटांनी घेतला नाहीये ना अनिस ने !
खुलासा: डॉ अवचांची अशी मुलखात हे स्वागतार्थच आहे हे मी आधीच नमूद केले आहे पण मग विचारलेले प्रश्न किंवा नवीन दृष्टिकोनातून हे प्रश्न विचारले गेले असतील किंवा नवीन परिस्थिती हे प्रश्न विचारले गेले असतील ( उदा: अनिस/पुरोगामींची काँग्रेस काळातील चळवळ आणि संघ परिवार सत्तेत असतानाची परिस्थिती , अति डावयाचें जास्त कडवे ध्रुवीकरण इत्यादी .. हि ती "वेगळी" परिस्थिती "
ऐकून जिय्याची पण तयारी लेख लिहिणार्याची असली पाहिजे ! हे तर्कसंगत नाही का ?
फक्त भलावण / कौतिक करणारे लिहायचे आणि प्रश्न विचारले कि म्हणायचे " आधीचे धागे शोधा"
असो मूळ प्रश्न ( आरोप म्हणा हवेतर ) तेच राहतात,,
20 Apr 2020 - 8:15 am | प्रकाश घाटपांडे
पुरोगामी असण्याचं मक्ता काही फक्त अवचटांनी घेतला नाहीये ना अनिस ने !>>>>> अगदी बरोबर आहे. या लिंक मधे मी तेच म्हटले आहे
https://www.misalpav.com/node/8889
20 Apr 2020 - 8:12 am | प्रकाश घाटपांडे
मला लेख लिहून नका असे सांगण्यापेक्षा आपण वेगळी बाजू मांडणारे लेख लिहा. ते जास्त संयुक्तिक आहे. इथल्या सजग वाचकांना लेखनातील तर तम भाव समजतात. एकच व्यक्ति सर्व बाजू कशा मांडू शकेल.
दुसरी गोष्ट म्हणजे इतरांना लिहू नका असे सांगण्या पेक्षा इतरांचे न वाचणे हे आपल्या हातात आहे
20 Apr 2020 - 8:46 am | चौकस२१२
परत तुम्ही माझ्या प्रतिक्रियेचा चुकीचाअर्थ घेतलात परत खुलासा करतो
तुम्ही लेख किंतू नका हे केव्हा म्हणले जेव्हा तुम्ही माझ्य प्रश्न विचारण्यावर " टिपिकल" हा शिक्के मारून चुकवलेत तेव्हाच
ती एक प्रतिक्रिया होती .. परत वाचा मी काय लिहिलंय ते.. लेख स्वघर्टच आहे पण त्यावर प्रश्न विचारल्यावर तुम्ही करणे देऊ लागलात ते सयुक्तिक वाटले नाही
इथे लोकशाही आहे तेव्हा मी कोण होणार तुम्हाला सांगणार लिहू नका म्हणून
एवढा वेळ वाद घातलात पण एका तरी प्रश्नल भिडला असतात तर फायदा झाला असता.. !
21 Apr 2020 - 3:44 pm | प्रकाश घाटपांडे
हा तुमचा मुख्य मुद्दा आहे आणि हा चळवळीवर असलेला जास्तीजास्त स्वरुपाचा मोठा आक्षेप आहे. इतर धाग्याची लिंक देण्यापेक्षा मी
अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे ही लिंक देतो इथे भरपूर वाद आहेत. तुमचा मुद्दाही आहे. धागा वाचणे जरा वेळखाउ होईल पण तो खर्च करायला हरकत नाही.
22 Apr 2020 - 11:43 am | प्रकाश घाटपांडे
चळवळ जरी दोन्ही धर्माना समान लेखत असली तरी जन्माधिष्ठित चिकटलेल्या धर्मामुळे हिंदू कार्यकर्ते हिंदूत्ववाद्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त जवळचे वाटण्यची शक्यता अधिक. हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हिंदू धर्मात असलेले विविध, प्रसंगी परस्पर विरोधी विचार प्रवाह ही बाब. ग्रंथप्रामाण्य असलं तरी विशिष्ठ धर्मग्रंथ हाच एक प्रमाण हा भाग नाही. धर्मसंस्थापक ही कुणी एक व्यक्ती नाही. चार्वाक दर्शनाला सुद्धा मानाचे स्थान आहे या अर्थाने हा धर्म सर्वसमावेशक आहे. धर्मचिकित्सेलाही एक परंपरा लाभली असल्याने अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो. त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे.जरा सुसरबाई तुझी पाठ मउ म्हणुन जरा समाज प्रबोधन च्या दिशेने जात असेल तर जरा तडजोड करायला काय हरकत आहे. मुस्लिम समाज हा तुलनेने कडवा व अधिक धर्मांध आहे. अगोदरच धर्मचिकित्सा हा संवेदनाशिल विषय असल्याने सोयीचा असलेला भाग हा प्राधान्यक्रमात असणं स्वाभाविक आहे.मुस्लिम सत्यशोधक आपल्या परीने काम करत आहेत. त्यांना अंनिसाचा पाठींबा असतो. संयुक्त विद्यमाने काही कार्यक्रम घेतात
22 Apr 2020 - 12:11 pm | चौकस२१२
चळवळ जरी दोन्ही धर्माना समान... काय ?
22 Apr 2020 - 1:00 pm | प्रकाश घाटपांडे
देवाधर्माविषयी तटस्थ असल्याने एखाद्या धर्माबाबत विशेष आकस व प्रेम असे नाही अशा अर्थाने. बोली अर्थ घ्या.
20 Apr 2020 - 11:57 am | मोदक
बाकी सगळे ठीक आहे... पण
ब्यबहारातले
योगामळे
सिडी
प्राप्त होतात असे मी मानत नाही.हे सहजी लक्षात येण्यासारखे आहे... बदलायला हवे होते.
20 Apr 2020 - 12:14 pm | प्रकाश घाटपांडे
हो.पण आता काय करता येईल?
20 Apr 2020 - 3:57 pm | धर्मराजमुटके
आता सिडी चे युग संपले आहे त्यामुळे योगामुळे पेन ड्राईव्ह प्राप्त होईल अशी दुरुस्ती करता येईल उपप्रतिसाद देऊन :)
20 Apr 2020 - 4:07 pm | प्रकाश घाटपांडे
हो, पण मी जरा काळजी घ्यायला हवी होती. माझ्या पुस्तकात एका ठिकाणी जुळ्या मुलींच्यावर लिहिताना एकीचे ’नक्षत्र ’ बदलले असे होते ते छापताना”वस्त्र’ बदलले असे झाले. :)
20 Apr 2020 - 12:15 pm | वामन देशमुख
या तथाकथित सुधारणावादी मंडळींशी वाद घालण्याआधी
यत्न वाळूचे कण रगडीता तेल ही गळे परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी.
हे समजून घ्यावे.
! Caution ! हे लोक मूर्ख नाहीत... अट्टल दुटप्पी, दांभिक, बदमाश यांचे मिश्रण आहेत!
20 Apr 2020 - 12:59 pm | धर्मराजमुटके
अनिल अवचटांची अनेक पुस्तक वाचली आहेत. जे वाचलं त्यावरुन तर पाय जमिनीवर असणारा माणूस असचं त्यांचं वर्णन करावं लागेल. त्यांचं "छंदाविषयी' हे पुस्तक देखील वाचनिय आहे.
शब्दरचना थोडीशी अधिक समर्पक असती तर बरे झाले असे वाटते. शक्यतो लोक अंधश्रध्दाळूंची चेष्टा / कुचेच्ष्टा करतात. निर्भत्सना करण्याची पात्रता / अधिकार असणारे फारच थोडे असावेत. बाकी लेखाच्या आशयाशी सहमत.
सतिश गावडेंच्या यनापंथाविषयीच्या प्रतिसादाबद्द्ल १००% सहमत आहेत. मी वेळोवेळी त्यांची अनेक संस्थळांवर चेष्टा देखील केली आहेत.
ते धर्माविषयी जे लिहितात ते सोडून इतर विषयावर लिहितात ते मात्र अतिशय सुंदर असते. त्याबद्द्ल ते 'तारीफ के काबिल' आहेतच.
अलिकडे ते 'ऐसीवर' जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं' ही लेखमाला लिहित आहेत ती अतिशय वाचनिय आहे. इच्छुकांनी जरुर एकदा वाचावी.
बाकी हिंदू धर्माविषयीच सुधारणा का ? मुसलमानांना का बोलायचे नाही ह्या आर्ग्युमेंटचा मलादेखील कंटाळा आलेला आहे. मी अतिशय स्वार्थी आणि संकुचित विचारांचा आहे. मी / माझा धर्म सुधारला , प्रगत झाला तर मला आनंदच आहे. बाकीच्यांनी सुधरा नाहीतर बिघडा. मला काय त्याचे ? मात्र तथाकथित सुधारणांच्या आडून आपला धार्मिक अजेंडा रेटणार्यांना समर्थन नाहीच.
20 Apr 2020 - 1:00 pm | धर्मराजमुटके
' जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं' ही मालिका प्रभाकर नानावटींची आहे. यनावालांची नाही. याची नोंद घ्यावी.
यानिमित्ताने संपादक मंड्ळी स्वसंपादनाची सोय उपलब्ध करुन देऊ शकतील काय ही जुनीच विचारणा पुन्हा एकदा करतो.
20 Apr 2020 - 1:16 pm | प्रकाश घाटपांडे
ही वार्तापत्रातील मुलाखत जशीच्या तशी दिली आहे. शीर्षक हे संपादकांचे आहे. त्यामुळे मी ही तेच ठेवले आहे. मला स्वत:ला ते समर्पक वाटते. काही कडव्या अंधश्रद्धा निर्मूलकांकडून अंधश्रद्धाळू लोकांची निर्भत्सना होत असते. कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणतेपणी.
20 Apr 2020 - 1:20 pm | प्रकाश घाटपांडे
अनेकदा हा प्रतिसाद मी दिला आहे.
https://www.misalpav.com/comment/881456#comment-881456
20 Apr 2020 - 2:55 pm | चौकस२१२
"बाकीच्यांनी सुधरा नाहीतर बिघडा."
जेव्हा बहुधर्मीय देश असतो तेव्हा एकूण देशाच्या दृष्टितने "इतरांच्या " धर्मातील चुकीच्या प्रथांबद्दल इतर धर्माच्या नागरिकांना हि बोलण्याचाच अधिकार असतो..
याचे अजून एक कारण कि धार्मिक प्रथा काही धर्म राष्ट्रीय कायद्ययात रूपांतर करू पाहतात .. तेवहा पण काय गप्प बसायचं?
उद्या बहुधर्मीय देशात जर "हलाल " मास पाहिजेच असा आग्रह धरला तर ?
- सती ( हिंदू) आग्रह धरला तर काय गप्प बसायचं?
- तीन तलाक योग्यच आहे ( मुस्लिम) आग्रह धरला तर काय गप्प बसायचं?
- गर्भपात बंदी करा ( ख्रिस्ती खास करून कॅथॉलिक ) आग्रह धरला तर काय गप्प बसायचं?
माझ्या पुरते उद्धरण देतो ... मी एका बहुधर्मीय परंतु प्रामुख्याने ख्रिस्ती देशात राहतो .. उद्या जर येथे कोणी शरिया चा आग्रह धरला किंवा बुरखा जबरदस्ती किंवा गाय खाऊ नका असा धार्मिक आग्रह धरला तर मी त्याला विरोध करीनच आणि त्याच बरोबर ख्रिस्ती बहुसंख्यकांनी मुसलमानांवर विनाकारण त्रास दिला तर मी मुसलमानांच्या खांद्याला खांदा लावून निषेध कारेन.. कारण खऱ्या सर्वधर्म समभाववार १००% विषवास आहे आणि तो म्हणजे एक देश एक कायदा .
करा ना अन्ध्श्रध निर्मुलन १००% पन ते सगळ्याना लागू करा
20 Apr 2020 - 3:35 pm | धर्मराजमुटके
अंधश्रद्धा निर्मुलन ही कायद्याने होणारी गोष्ट नव्हे. तसे असते तर आज जगात कोठेच अंधश्रद्धा दिसल्या नसत्या. ती एक अत्यंत संथ वेगाने होणारी, सतत चालणारी प्रक्रिया आहे. दुर्दैवाने ही प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्याचा मार्ग अजून कोणाला सापडलेला नाही. त्यामुळे अंधश्रद्धा पार नाहिश्या होणार नाहीतच. त्या फारतर कमी होतील किंवा त्याजागी नवीन अंधश्रद्धा येतील पण त्यासाठी जगाच्या अंता:पर्यंत वाट बघणे एवढेच आपल्या हातात आहे. आपण आपल्यापुरते सुधारक होण्याचा प्रयत्न करणे आणि त्यात यशस्वी होणे हेच शक्य आहे. कदाचित आपले वर्तन पाहून अजून २-४ जण सुधरतील. मात्र सांगवून / शिकवून कोणी शहाणे होतील अशी शक्यता कमी आहे.
20 Apr 2020 - 3:09 pm | चौकस२१२
" तथाकथित सुधारणांच्या आडून आपला धार्मिक अजेंडा रेटणार्यांना समर्थन नाहीच."
चार जण करीत असतील तसे पण सगळे नाहीत..
गाय सुद्धा खाणारा/ पूजा ना करणारा किंवा पूजेची जरुरी नाही असे मानणारा/ कोणत्याही गुरु बाबा ची भक्ती ना करणारा , या प्रश्न कडे एक सामाजिक आणि नागरिकशास्त्रीय प्रश्न म्हणून बघणारा माझ्या सारखा हिंदू कसा काय हो "धार्मिक अजेंड पुढे करतो?
उगाच सगळ्यांना "मनुवादी" हे लेबल चिकटवला कि आपण पुरोगामी ठरतो अशी समजूत दिसतीय
20 Apr 2020 - 3:17 pm | धर्मराजमुटके
तो प्रतिसाद तुमच्या कोणत्याही प्रतिसादाबद्द्ल नव्हता. सबब माझ्याकडून पास !
मी स्वतः कपाळावर भला मोठा टिळा लावतो, मी गाय आणि इतर कोणताच प्राणीही खात नाही, गुरु आणि बाबांची भक्ती अनेक वर्षांपासून करतोय, पुजा केल्याशिवाय अन्न आणि पाणी ग्रहण करीत नाही त्यामुळे खरा मनुवादी मीच आहे, तुम्ही नाही. मी स्वतःला पुरोगामी देखील समजत नाही. घटनेने ठरवून दिलेल्या चौकटीत मी माझ्या धर्माचे पालन करतो. मात्र मला अनिष्ट वाटणार्या प्रथांचा विरोध करण्यात मला माझा रुढीवादीपणा, मनुत्व बिलकूल आड येत नाही.
धन्यवाद !
20 Apr 2020 - 4:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगली मूलाखत झाली आहे, आभार.
-दिलीप बिरुटे
20 Apr 2020 - 4:13 pm | विजुभाऊ
तबलीगी समाज हा पैगंबराच्या इस्लामचे समर्थन करतो.
ते त्यावर श्रद्धा ठेवतात आणि त्यामुळे इतरांना आपल्यापेक्षा हलके मान्तात.
जैन समाज हा ही साधारण तसाच मांसाहारी समाजाला ते आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतात.
वैष्णव संप्रदायातील पुष्टी मार्गीय हे देखील असेच.
हे लोक त्यांच्या समजाना अंधश्रद्धा मानतच नाहीत.
पण त्यामुळॅ ते नवे कोणतेच विचार ऐकून घ्यायच्याही मनस्थितीत नसतात.
अशावेळेस त्याना जे काही सांगू ते पालथ्या घड्यावर पाणी होते. त्यांच्या मते त्याना जे माहीत आहे फक्त ते आणि तेच योग्य आहे आणि आपणही त्यांच्याप्रमाणे व्हावे असा आग्रह ठेवतात. समाज अश अलोकांच्या विरोधात जायचे टाळतो. हा अनुभव आहे. किंबहुना अशा दुराग्रही धार्मीक लोकाम्चा जरा आदरच करतो.
अशांबद्दल काय करायचे.