णमस्कार्स लोक्स ,
वाद टाळण्यासाठीच काही खुलासे :
१) स्वरबासकर काकांची माफी मागत आहे !
२) देव काकांचा आदर आहेत , पण त्यांनी लिहीलेल्या लेखमालेची खिल्ली उडवणे हा हेतू नाही .
३) सर्वांनीच हलके घ्यायचे आहे बरं .. अन्यथा मी काही करू शकत नाही
४) ह्यात फक्त टवाळखोरांचाच समावेश करण्यात आला आहे ,उरलेले सगळे सिद्धहस्त लेखक लेखिका आहेत.
५) काही सिद्धहस्त लेखक आमच्या दृष्टीने टवाळकी विभागात मोडतात ते त्यांना ही समाविष्ट करण्यात आले आहे ..
६) प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार लेखकांचे लेख शोधावेत .. लेखाची/प्रतिक्रियांची लिंक देण्यार येणार णाही, आम्हास माफ करावे !
७) सर्व मते लेखकाची आहेत , कोणाचा प्रभाव किंवा पगडा नाही.
मंडळी मिपावर एकापेक्षा एक सिद्धटवाळ लेखक/लेखिका(ह्यात विडंबक/विडंबिकाही मोडतात) आहेत. त्यातल्या काही उल्लेखनीय वाचकप्रिय टग्यांचा मी थोडक्यात समाचार घेणार आहे.
पिवळा डांबीस :-
हे सिद्धहस्त असून देखिल सिद्धटवाळ आहेत.
सर्वात पहिले नाव अर्थातच पिवळा डांबीस उर्फ कॅलिफोर्नियाधीश ह्या महाटवाळ लेखकाचे घ्यावे लागेल.(पिडा हे आमचे खास आहेत म्हणून त्याची पिवळी करतोय असे कुणाला वाटेलही तर तो तसे वाटणार्याचा स्वप्नदोष आहे. त्याने तंबुतल्या जडीबुटीवाल्याकडून उपचार करून घ्यावेत) मिपावर आल्या पासून मी पिडांचे लेखन वाचत आलोय. आज पर्यंत मिसळपाव वरचा "बेष्ट टवाळ आयडी" म्हणून आजही पिवळा डांबीस हे बहूमताने णिवडूण येतील .. प्रोफाईल मधल्या माहितीतही ते १ णंबर्स आहेत ह्यात कोणाला शंका णाही. मिपावरील हे व्यक्तीमत्व मी आणि तात्यापेक्षाही वजनी आहे :) आपल्या णावाची जाण ठेवत ह्यांनीच आम्हाला णविण आलो तेंव्हा मार्गदर्शण केले होते , सर्व टवाळांसाठी डांबिसराव हे आग्रमाणांकीत आहेत .
विसोबा खेचर :-
हे ही टवाळकुमारांमधले वाटले :)
ह्यांना अंतर्जालावरचे "सौरव गांगूली" म्हणावेसे वाटते ते काँट्राव्हर्सी मुळेच, पुर्व इतिहास नाही माहीत पण ह्यांचे हितशत्रूंची संख्या जरा अजूबाजूला पाहिलं की उठून दिसते, पण सगळ्यांना पुरून उरलेला विसोबा, कधी कधी अत्यंत मोजक्या शब्दांत समोरच्याच्या तोंडची चव खराब करण्यात माहिर वाटतो. दुनियेला फाट्यावर मारून आपल्याच तानपुर्याच्या वायरी खाजवण्यात मग्न तात्या आम्हाला आवडतो. प्रोफाईल मधली काही वाक्येही खासंच .. बाकीच्या संस्थळांवरचा अणुभव ऐकता ,मिसळपाव वर आमच्या सारख्या किटकांना पोषक असे वातावरण दिल्याबद्दल सर्व किटक समाजातर्फे मी त्यांचा "धुतलेली शॉल" आणि "सोललेला णारळ" देऊन सत्कार करतो , त्यांनी त्याचा स्विकार करावा.
सेंटिमेंटल आनंदयात्री :- "
आमचे अत्यंत जवळचे (वजनानेही बरं :) ) स्नेही , सडेतोड उत्तर देण्याच्या क्षमते मुळे आम्हास जवळचे वाटणारे , मात्र ह्यांचे व्यक्तिमत्व आणि प्रतिक्रियांची साईझ ह्यात काँट्रास्ट आहेच ... सेम थिंग अबाऊट डाण्या अल्सो .. तिकडे पण पर्सण्यालिटी आणि प्रतीक्रिया मॅच नाय करत, तर असो ... ह्यांना अंतरजालावर कोणी चिपकू मुहबोली बहेन भेटली की तळपायाची आग मस्तकी जाते आणि ते संपुर्ण शक्तीनीशी मैदाणात उतरतात , हजारो टिकाकार हे त्यांच्या आंगाखांद्यावर खेळवतात असं ऐकतो, टिकाकारांना एवढं मोठं मैदाण खेळण्यास उपलब्ध करून दिल्या बद्दल टिकाकारांना त्यांची निंदा करावी की स्तुती ? असा यक्षप्रश्ण पडतो .. असो , ह्यांचाही आम्ही "ओला णारळ" आणि "आजीची गोधडी" देउन सन्मान करणार आहोत , "पॅराडाईज" स्थळी त्यांनी ह्याचा स्विकार करावा .
थरमॉकॉलनरेश धम्या :-
हा टवाळ कमालीचा चपळ आहे . कॉफ्या प्यायच्या कमी आणि मॉणिटरवर उडवायच्या जास्त , हा त्यांचा उद्योग. ऑफिसबॉय ला मॉनिटर साफ करायच्या बहाण्याने वारंवार बोलवल्यामुळे त्याच्या मनात धम्या आपल्यावर लाईन मारतो की काय ? असा संशय येऊन आजपर्यंत कंपनीत ५ ऑफिसबॉईज ने पेपर टाकल्याची ब्रेकिंग ण्यूज आहे. "ठॉ करून फुटणे " ह्यासाठी प्रसिद्ध. सिगारेट पिताना कारखाण्यांच्या चिमणी सारखे आकाशात तोंड करून धूर सोडण्याची लकब , परंतू एकदा आमच्याच शेजारी उभे राहून हा फंडा वापरल्याने तो धूर खालून थेट आमच्या णाकपुड्यांत गेला .. आणि आम्हाला जोराचा ठसका लागला, आपली फ्रेंची कुरवाळणे (कृपया फ्रेंचीला दाढीमिशांची एक स्टाईल ह्याच अर्थाने घ्यावे ) मिपावर लिहीणे कमी आणि प्रतिसादवणे जास्ती. हे ही आहाला प्रिय आहेत , ह्यांना एक "रूमाल-सुपारी" देऊन सन्मानित करण्यात येते !
खत्रूड छोटा डॉण :-
मिसळपावाच्या सिद्धटवाळांमधे ह्यांच नाव घ्यावं की नाही ह्या मिलियण डॉलर प्रश्णामधे गुंतलेलो .. पण म्हंटलो घेउनच टाकू, कितीक जागा खाणार आहे ? कधीकधी श्वानमुका घेतल्यावर मरणाचं सिरीयस आणि प्रचंड खोलात म्हणजे पार्किंगच्या वजा ६व्या फ्लोर वर जाऊन लिहीतात, प्रतिक्रियांची साईझ म्हणाल तर ती बहुतांश वेळा लेखांपेक्षा मोठी असते , टायपिंगचा स्पिड जबरदस्त असावा, आपल्या टवालखोरीमुळे चालक/मालकांच्या "शरमेचे" कारण बर्याच वेळा बणले आहेत , परंतू हे पारतंत्र्य काळात स्वदेशींसाठी तुरूंगात जाण्यासारखे असल्याने सन्मानाचे चिन्ह आहे. ह्यांचा ही "रूमाल-सुपारी" देऊन सत्कार करण्यात येणार आहे .
तुरट ब्रिटिश टिंगी :-
टिपीकल पुणेरी शैलीची टिका , आपल्या नावास आणि कुळास जागतात. "किमाण शब्दात कमाल अपमाण " करण्यात माहीर .. जगाच्या उत्तर ध्रूव साईडने काऊंटर अटॅक करण्यासाठी सिद्धटवाळ संघटनेने त्यांना लंडणात बसवलं आहे. सर्व लेखांवर बारिक लक्ष !! गोडू बोलून मारण्यात हातखंडा, आपला खोबरं आणि खडिसाखर देऊन गौरवण्यात येत आहे .
खवट शेंगदाणा अर्थात कुंदन :-
कधीतरी मधेच येऊन काही तरी खडा टाकून जाणार आणि बाकीच्यांना हसून लोटपोट करणार , इतरांचे विचार जिथे संपतात तिथे यांचे ही संपतात .. पण विचार सुरू कुठून होतात ह्यावर ते स्वतःच रिसर्च करत आहेत ! मितभाषी असल्याने आपले विचार बहुदा व्यनि ने किंवा प्रायव्हेट चाट वरंच कळवतात :) बहुदा आखाती देशांत कुठे चावटपणा केल्याने बोलल्यास कापून काढू (जिभ .. जिभ हो .. ) अशी धमकी मिळाली असाव. आपला "खारिक-खोबरं" देऊन गौरवण्यात येत आहे.
विडंबक परिकथेतील राजकुमार :-
लोकं जितकी पितात तेवढी हे पिताना सांडतात असं ऐकून आहे ! अत्यंत कमी कालावधीत आपल्या टवाळ आणि टूकारपणा मुळे लवकर प्रसिद्ध पावले आहेत. खडूस सदाशिवपेठी शैली! टार्गेट करून हमला करण्यात हातखंडा !! जुणे पुराणे लेख/कविता/प्रतिसाद/खरडी उकरून काढून विडंबण मारणे हा त्यांच्या कडे किती वेळ आहे ते दर्शवतो ,, म्हणूनच पंगे करताना संभाळून .. राजकुमाराप्रमाणेच पर्सणॅलिटी :) आपल्याला हॉर्लेक्स आणि सेलेलॅक देऊन गौरवण्यात येत आहे .
आवलिया :-
मिसळपाव वरची "वण मॅण आर्मी" . एकला चलो रे ह्या वाक्याने प्रचंड प्रेरित की प्रभावित काय ते .. वाटतात . कधी कधी सन्यासाच्या गोष्टी करतात , आतल्या गाठीचे , मिसळपाव वरची काँन्फेडेण्शियल प्रोफाईल, काऊंटर अटॅक करण्यात स्पेषॅलिटी ... हल्ल्ली चावटगुरू महाप्रभुंबरोबर चांगले सुत काततात . सिरीयस आणि स्वतःचं लिखाण ही मजबूत करतात पण त्याबद्दल बोलणे हे अवांतर ठरेल, विडंबणे , प्रतिसाद ह्या बाबद कंसिस्टंट आहेत. नादी लागताना विचार करावा , 'ह्यांना ढिगभर कागद रद्दी आणि एरिमेल्डचं शाईपेन देऊन गौरवण्यात येत आहे .
चावटगूरू विनायक महाप्रभू :-
ह्यांना आधी आडवा दंडवत , सेहवाग जसा सिनीयर झाला तरी खेळाची स्टाईल चेंज करत नाही तसं ह्यांनी देखिल आपलं एक व्यक्तिमत्व ठेवलं आहे. ह्यांच्या चावटपणाला काही सिमा नाही, डबलमिनींग वाक्यांत दुसरा अर्थ पहिला असतो आणि पहिला अर्थ ... तो अज्जिबात ऍप्लिकेबल नसतो हे आतापर्यंत आपण जाणताच , ह्यांचा पहिला लेख आला तेंव्हा आम्ही ह्यांच्या लेखणशैलीवर टिकेचा सुरू उठवला होता, पण त्याच शैलीचे आज फॅन आहोत , व्यनी/खरडींतून येणारा क्रिप्ट हा शेन बाँडच्या यॉर्कर प्रमाणे असतो, बहुतांश फलंदाज ह्यावर स्वतःच्याच पायावर बॅट मारून स्वत:लाच जखमी करून घेतात, मोफत समुपदेशन करतात. ह्यांना देण्यासारखे काहीच नाही , म्हणून आम्ही आपल्याला लवकरच "भेट देऊन" आपला गौरव करणार आहोत :)
डिडिटी बिप्स कार्यकर्ते
तरूण तुर्क मधले डिडिटी अर्थात "दिनानाथ दामोदर थत्ते" , लेख जरी अंमळ सिरीयस लिहीत असले तरी ह्यांचा समावेश टावाळांमधे होऊ शकतो , कारण "आमच्या आमच्या सारखे " असतात. ऐन टायमाला फोन करण्याची खोड... प्रसंगी सल्लागार प्रसंगी टवाळकी , आमच्यातले वयोवृद्ध "दधिच ऋषी" ... चाट वर कायम बिझी स्टेटस पण गप्पा आणि टाईमपास करत असतात , कंपनीचं नेटबिल वाढवतात , आपल्यालाही भेट देऊन गौरवण्यात येईल.
मृगणयणी :-
वाटेला जाल तर याद राखा, आपली व्यवस्थित गेम वाजवली जाईल :) ग्रंथांच्या लांबीच्या कविता , प्रासंगिक कविता, विनोदी कविता, प्रेमकविता , आणि कविता लाड .. अर्रर्र सॉरी .. कविता करतात एवढंच पुरे .. करडफळ्यावर कधीकाळी बोलबाला होता, अत्यंत गोड आवाज आणि हसण्याची स्टाईलही ~!~ असो , टवालपणात आम्हाला ह्यांची बर्याच ठिकाणी मदत झाली आहे !
राज जैन :-
हे एक टवाळ .. अति टवाळ म्हनावं का ? लहाण पणा पासून पळण्याची सवय अजुन सुटलेली नाही, एकदा सुरू झाले की पळत सुटतात ... मिसळपाव वरचे "अकला बुकल" आणि "डेव डी" .. खरडवह्या भरवने ,.,,,, चेन सेरिज मधे प्रतिसाद देणे , कंपुहल्ला करणे ह्यात रस ... लहाणपणापासूनच एक प्रॉब्लेम चाईल्ड ..
हिडिस टारझन :-
ह्याच्या विषयी आमच्यातलंच कोणीतरी लिहू शकेल =)) ( ते काय .. खाली आंद्या म्हणतो तसंच ) अंमळ येडपट आहोत ह्याची कल्पना आहेच :)
समारोप :
काही नावं राहिली आहेत !!
प्रतिक्रिया
29 Mar 2009 - 3:04 pm | विसोबा खेचर
पिडा हे आमचे खास आहेत म्हणून त्याची पिवळी करतोय असे कुणाला वाटेलही तर तो तसे वाटणार्याचा स्वप्नदोष आहे.
स्वप्नदोष?? अरे फोकलिच्या टार्या, तुला शब्दांचे अर्थ कळतात का रे? :)
असो,
टार्या, तुला कितीही सुधरवायचा प्रयत्न केला तरी तू सुधरणार नाहीस! शिवाय तात्याच्या आपण खास मर्जीतले आहोत त्यामुळे तात्या आपलं काय बिघडवणार? ह्याचीही तुला कल्पना आहे त्यामुळे तुझं फावतं आहे!
साला, अगदी सुरवातीपासूनच तुझ्यावर काही वचक ठेवला नाही याचा आता मला पस्तावा होतो आहे! :)
असो,
तूर्तास तुझ्या "धुतलेली शॉल" आणि "सोललेला णारळ"च्या सत्काराचा मुकट्याने स्वीकार करतो! :)
तात्या.
29 Mar 2009 - 3:14 pm | टारझन
:) ओ तात्या ... शब्दांचे अर्थ कलतात हो ..
बाकी तरी बी बराच सुधारलो की हो ... ह्या लेखात जवळ जवळ ९०% सुधारलोय असं माझं मत आहे =))
बाकी सत्कार स्विकारल्याबद्दल आभारी आहे :)
असो,
तुर्तास एवढेच पुरे !
टार्या
30 Mar 2009 - 7:14 pm | विजुभाऊ
शन्का: तात्या ती शॉल स्वप्नदोशाच्या असरमुळे धुवावी लागली नाही ना
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
29 Mar 2009 - 3:14 pm | आनंदयात्री
भाड्या मारझणा !!
=)) =))
पार हसुन हसुन पुरेवाट झाली.
बाकी हिडीस टारझण ला खर्रच ठ्ठो करुन फुटलो .. घरची भाजलेली बडीशेप हावरटासारखी बचकाभर खाल्ली होती .. ती कळफलकावर आणी मॉनिटरवर उडाली !!
हे घे तुझ्यासाठी काही:
आपल्या खरडवहीत लोकांचे डाउनलोड लिमिट आणी पेशन्स लिमिट चेक करणारे चित्रविचित्र,अगडबंब,रंगित बनियान मधले,पक्क्या रंगाच्या माणसांबरोबरचे हिडीस फोटो टाकण्यात यांचा हातखंडा आहे. किंबहुना खरडवह्यांची क्यालंडरे करण्याची फ्याशन यांनीच आणली. आता त्याच्या मारझण सेणेतल्या काही विदुषी ती फ्याशन नेटाने पुढे चालवत आहेत :)
आंतरजालावर भगिणी मंडळ जमवुण एकेक किलोमीटर लांबीच्या खरडा टाकुन त्यांच्याशी गप्पा मारणे (५०० किमी प्रतितास गाडी चालवली, १०० जिलेब्या खाल्ल्या इ.इ.). या भंगिणीमंडळाशी मैत्री करणार्या गोर गरिब आयडींणा पाणी पाजणे हा यांच्या डाव्या हाताचा मळ !!
आंतरजालीय बालपण कुबड्या खवीस या नावाने गेले. त्यांच्या कुबडावर कोणीतरी हिण आणी हिडीस टिका केल्यावर २-४ दिवस त्यांनी लादेन आंतरजालावर उतरवला होता .. हातापाय शाबित ठेवायला तो आयडी बिचारा कायमचाच गुपत झाला.
नंतर काहीदिवस अस्थीविमा दंतविमा एजण्सी चालवली. काही बोळे कायमचे काढले :)
आता सध्या हिण आणी हिडीस धंदे करत आहेत ... हॅ हॅ हॅ ...
टार्या तु हिट्ट आहेस रे, हा फॉर्म्युला तु कसा वापरलास ?
आपण जरा पब्लिकच्या नजरेआड गेलो की पुन्हा फॉर्मात यायचा हा जुनाच फॉर्म्युला आहे हे तोंड खवट करण्यासाठी सांगावे वाटले बाकी काही नाही !!
:)
-
(एकहलकट ठारझणचा दहाहलकट हिण आणी हिडीस मित्र)
आंद्या हलकट
29 Mar 2009 - 3:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=))
आंद्या, तुझा प्रतिसाद एक लंबर आहे रे! =)) =))
मूळ लेखातच 'ही & ही'पणा कमी करून आणखी जास्त हुच्च आणि विनोदी बनवता आला असता. असो. चालायचंच.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
29 Mar 2009 - 3:19 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत ! (अंद्या काकांच्या टार्याविषयीच्या व स्वतः विषयीच्या मतांशीही)
विस्तृत प्रतिसाद लवकरच.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
29 Mar 2009 - 4:11 pm | टारझन
=)) =)) =))
धन्यवाद रे आंद्याबैला ... तुझ्या साठीच लिहायला एक जागा मोकळी ठेवलेली :) आपल्या भगिनीमंडळाबरोबर आता गप्पा मारायला टाईम नाही... ;)
प्रतिक्रियेत काही त्रूटी आहेत .. पण ऍडज्स्ट करून घेतलंय .. जिलब्या जास्त लिहील्यात .. मी अंमळ कमी खातो हो .. ९७च जिलब्या खाल्लेल्या .. आणि गुलाबजांबूंचं कोण लिहीणार रे ?
(बाईकराईडर आणि खादाड)
टारानंदयात्री
29 Mar 2009 - 11:56 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
आज टार्या आणि आंद्या.... हसवून हसवून मारलं साल्यांनो तुम्ही.... मगाशी हापिसातून घाई घाईत वाचलं रे.... आता मनसोक्त वाचलं परत. एकच शब्द...
अ प्र ति म ह ल क ट प णा
बिपिन कार्यकर्ते
29 Mar 2009 - 3:42 pm | जेन
खूपच छान लिहीले आहे
आणखी लिहीले पाहिजे होते जास्त लोक्स विषयी..
पण मला अवलिया हा कॅरेक्टरचे डिसक्रीपशन आवडले..
वन मॅन आर्मि
मग पाठ्वा ह्याला लशकरेत...
अजून लिही इतरां विषयी....
कीप राईटिंग......
29 Mar 2009 - 7:51 pm | वाहीदा
NOT A BIG DEAL . ठेका च घेतला आहे ना बोलायचा ..
29 Mar 2009 - 3:56 pm | घाटावरचे भट
लैच भारी रे टार्या. इतकं अचूक वर्णन कोणाला करता आलं नसतं. आंद्याभौंचा प्रतिसाद पण झकास! (मग तुझं गुणवर्णन कोण करणार नायतर???) ;)
29 Mar 2009 - 4:19 pm | प्रमोद देव
टारुशेठ,मस्तच लिहीलंय.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
29 Mar 2009 - 4:46 pm | चतुरंग
टार्या, जबराट हसलो!! लेका तू अजूनही 'बोळे क्लब'मधून बाहेर यायचं नाव घेत नाहीस! ;)
काय एकेकाचे गुणवर्णन केले आहेस, वा वा! तुला शब्दही कसले सापडतात, "थरमॉकॉलनरेश" आणि 'इतरांचे विचार जिथे संपतात तिथे यांचेही संपतात..' ह्या दोन्हीला माझा ठ्यॉ..झाला! :D
आंद्यानेही सडेतोड गुणवर्णन करुन तुझा शब्द खाली पडू दिलेला नाही!
लहानपणी हरवलेला जुळा भाऊ सापडला की काय, असे आफ्रिकन आडदांड सांडांना वाटावे म्हणून तुझी पहिली परदेशवारी आफ्रिकेत ठेवणारा तुझा माजी मॅनेंजर हा महान असावा ह्याची मला खात्री आहे! ;)
गुणांची चाड असणे म्हणतात ते हेच!! B)
तुझ्या नवीन कंपनीत सध्या कलीग लोक्सचे कार्टूण (श्या.. हल्ली न चा ण कधी होतो समजत देखील नाही! ~X( ) काढून त्यांना ट्रेनिंग इन ट्रेनिंग (पिक्चर इन पिक्चर सारखे) देतोस हे नुकतेच समजले.
नवीन कंपनीतल्या कारकीर्दीबद्दल तुला शुभेच्छा आणि तुझ्या नव्या मॅनेजरला खंडोबा, मरीआई, मल्हारी मार्तंड ह्यांचं एकत्रित कवच लाभो ही प्रार्थना! ;)
(इट्स ब्वाना आफ्रिका सारखे एखादे फर्मास लेखन येऊदे वाट पहातोय!)
(काका) चतुरंग
29 Mar 2009 - 5:13 pm | बिपिन कार्यकर्ते
टार्या, लेका महान उच्च हलकटोत्तम वैगेरे वैगेरे लिहिलं आहेस रे. नमन तुला. छप्परफाड.
=)) =)) =)) =)) =))
दिनानाथ दामोदर थत्ते
29 Mar 2009 - 8:40 pm | प्राजु
एकदम छप्परफाड के.... धो.. धो.. धो....!
टारझन बद्दल एक राहिलं आंद्याभाऊ..
ते म्हणजे दर महिन्याला एक नवी खरेदी करणे,... आणि मोबाईल हरवणे.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Mar 2009 - 5:16 pm | योगी९००
हहपुवा..
काही नावे राहिली आहेत..
एक महत्वाचे नाव विसरलात का हो?
(आमचा आम्हालाच खेद वाटतो कारण आमचे देव काकांनी कौतूक केले नाही की टारझन भाऊंनीही आमची खेचायचा प्रयत्न केला नाही..बहुतेक आम्ही पु.लं.च्या भाषेतले 'बोलट' राहणार आयूष्यभर..)
खादाडमाऊ उर्फ जनार्दन नारो शिंगणापुरकर
29 Mar 2009 - 6:52 pm | निखिल देशपांडे
टार्या मस्तच ओळख करुन दिलि आहेस ......
आता टवाळक्या करायला सोपे जाइल इकडे......
29 Mar 2009 - 6:55 pm | धमाल मुलगा
सगळ्यांच्या धोतराला हात घातलाय मेल्यानं...
>>थरमॉकॉलनरेश धम्या :-
=)) =))
कर कर...माझ्या अब्रुच्या चिंधड्या कर!
आईशप्पथ्थ!!! लेका खरंच आता कॉफीचा फवारा उडवला _/\_
सत्कारात "रुमाल-सुपारी" ??????
=)) =)) =))
च्यायला, इतके दिवस तुझ्या लेखनाचा बोळा तुंबलेला असा अचानक मोकळा झाल्यामुळंच हा महापूर आलेला दिसतोय.
अवांतरः त्या प.रा.ला जास्त नडायचं नाय, कळ्ळं ना? नायतर आम्ही दोन्ही पैलवान मिळून तुला निंबाळकर तालमीजवळ पिसून काढू...काय समजलास?
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
29 Mar 2009 - 8:08 pm | रेवती
काहीच्या काही छान लिहिलयस.
काय काय शब्द वापरलेस. धन्य आहे तुझी!
रेवती
29 Mar 2009 - 8:20 pm | शितल
=))
ज्यांना ज्यांना टा-या स्वतः भेट देऊन गौरवणार आहे त्यांच्यासाठी वि.सु., टा-याने तुमचा असा गौरव केली की तुमच्या पासुन लोक आपोआप दुर जातील सांभाळून.;)
टवाळपणावाचुन जाम हसले, आनंदयात्रीचा प्रतिसाद ही उच्च. :)
29 Mar 2009 - 10:05 pm | ऋषिकेश
ह. ह. पो.दु.
(:)) ऋषिकेश
29 Mar 2009 - 11:22 pm | चंद्रशेखर महामुनी
मी मिपा वर नविन आहे.... पण आपल्या लेखाने मिपा वर काय अगाध... नग आणी नमुने... आहेत हे समजले....
जय ! टवाळ्खोर.... !
30 Mar 2009 - 1:00 am | भाग्यश्री
हेहे भारी लिहीलय!!! =))
30 Mar 2009 - 1:07 am | विसोबा खेचर
>>पुर्व इतिहास नाही माहीत पण ह्यांचे हितशत्रूंची संख्या जरा अजूबाजूला पाहिलं की उठून दिसते,
हा हा हा! सध्या मिपा तडीपार असलेल्या काही हितशत्रूंना अन्यत्र चाळवतो आहे, खेळवतो आहे! :)
पित्तच खवळलंय त्यांचं! तात्याविरुद्ध व्यक्तिगत ताशेरे ओढणारे प्रतिसाद तावातावाने लिहीत आहेत बापडे! :)
आपला,
(खेळणारा आणि खेळवणारा) तात्या.
30 Mar 2009 - 6:59 am | मनीषा
मंडळाचा एक स्तुत्य उपक्रम .
सर्व सत्कारमुर्तीं चे अभिनंदन !!
आणि ... सत्कार करणार्यांना शुभेच्छा !
अवांतर : लेख मस्त जमलाय
30 Mar 2009 - 7:46 am | अनिल हटेला
"ण महामंडळ"
=)) =))
सर्व सत्कारमुर्तीं चे अभिनंदन !!
आणि ... सत्कार करणार्यांना शुभेच्छा !
आमच्या तर्फे ही शुभेच्छा !!! ;-)
अवांतरः टारा-टीरी-टुरुटुरु !!!
शॉल्लीट रे !!!! ~~~~~~!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
30 Mar 2009 - 8:52 am | सँडी
आपली फ्रेंची कुरवाळणे (कृपया फ्रेंचीला दाढीमिशांची एक स्टाईल ह्याच अर्थाने घ्यावे )
=))
सह्ही लिवलयं, टारगट टारझण! ;)
- सँडी
नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.
30 Mar 2009 - 9:17 am | दशानन
=))
=))
=))
निशब्द :)
__/|\__
30 Mar 2009 - 9:54 am | मृगनयनी
टारझणा.... लय भारी आहे तुझं ऑबझर्वेशण! :)
मस्त! :)
सगळ्यांन्ची गुणवर्णनं आवडली! ;)
_____________
-
सग'ळ्या चा गेम वाजवणारी, ;)
मृगनयनी परशुराम लिमये.
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
30 Mar 2009 - 1:30 pm | टारझन
सर्वांचे आभार !!! हा असला पहिलाच प्रयत्न होता , मस्करीची कुस्करी होऊन कोणाला वाईट वाटू णये म्हणून बर्रेच हातचे राखुन लिहिलंय , अर्थात त्यामुळे रोचकता कमी झाली , पण चालायचंच .. उत्तमोत्तम लेखण प्रत्येकाला जमेलंच असं नाही , सर्व टिकांचे आणि स्तुत्यांचे स्वागत आहे ..
टारझण
अध्यक्ष , ण महामंडळ
31 Mar 2009 - 12:29 am | वाहीदा
व्यक्तीगत हेवेदावे, भांडणं यांच्यासाठी मिपाच्या व्यासपीठाचा उपयोग करू नये अशी नम्र विनंती. -- संपादक
30 Mar 2009 - 7:20 pm | सूहास (not verified)
सही ...
धन्यवाद,
आपण आपल्या आमच्यासारख्या "अतिसामान्य" पख्या॑साठी असेच लेख पाडत रहावे ,हि विन॑ती,
सुहास..
भले-बुरे जे घडुन गेले || विसरून जाऊ सारे क्षणभर ||
जरा विसावु या वळणावर || या वळणावर ||
30 Mar 2009 - 9:33 pm | लिखाळ
लेख मस्त आहे :) फार हसलो !!
सत्कारासाठी निवडलेल्या वस्तू, लिखाणावरच्या टिप्पण्या आणि अनेक वाक्ये फार जोरदार :)
आनंदयात्रीने लिहिलेला प्रतिसाद सुद्धा लै भारी :)
फार मजा आली :)
-- लिखाळ.
30 Mar 2009 - 9:43 pm | संजय अभ्यंकर
हा कार्यक्रम जाहीरपणे केला तर जॉनी लिवर पेक्षा उत्तम होईल!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
30 Mar 2009 - 9:53 pm | मराठमोळा
हा लेख तुमच्या "टारझण" णावाला शोभुन दिसतो.. खासच जमलाय...
साऊथ अफ्रिकेतला टारझण पणा चांगला कामाला येतोय तर....
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
31 Mar 2009 - 3:56 pm | विसोबा खेचर
काही व्यवस्थापकीय कारणांमुळे लवकरच हा धागा अप्रकाशित केला जाईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी..
तात्या.
1 Apr 2009 - 2:00 pm | विनायक प्रभू
उडायच्या आधी वाचला बॉ. मजा आली.
1 Apr 2009 - 3:02 pm | केवळ_विशेष
पा व र बा झ
१ लंबर
2 Apr 2009 - 3:16 am | पिवळा डांबिस
सर्व टवाळांसाठी डांबिसराव हे आग्रमाणांकीत आहेत .
असं वाटतं ना तुला?
मग शिंच्या, सगळ्यांना शाल, गोधड्या, रुमाल, चादरी वगैरे दिल्यास...
मला काहीच नाही?
तुझा णिषेध, णिषेध, त्रिवार णिषेध!!!!
:)
सध्या देवकाकाहस्त श्रीखंड फस्त करण्यात व्यस्त,
मस्त पिवळा डांबिस
2 Apr 2009 - 9:59 am | आपला अभिजित
काही व्यवस्थापकीय कारणांमुळे लवकरच हा धागा अप्रकाशित केला जाईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी..
अरे, तात्या `एप्रिलफूल' करतायंत! जास्त मनावर घेऊ नका!
बाकी टार्या, लगे रहो!
2 Apr 2009 - 2:02 pm | टारझन
च्यायला .. एप्रिल फूल .. खरच की ... =))
असो ... डांबिसाचार्यांना काय भेट द्यावी ते ण सुचल्याने रकाणा मोकळा ठेवला आहे ..
आपल्याला काही डंब-बेल्स, वेट बार्स आणी वेट प्लेट्स देऊ :)
27 Aug 2009 - 1:35 pm | झकासराव
=)) =)) =)) =)) =))
जहबर्या, ठ्ठो........
सगळ अपुर पडेल.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
27 Aug 2009 - 3:13 pm | तेन्नालीराम
मी नवा असल्याने जास्त कळले नाही पण लिहायची शैली आवडली.
ते. रा.
27 Aug 2009 - 5:41 pm | फ्रॅक्चर बंड्या
मस्तच जबरा लिहलय
5 Dec 2010 - 6:03 pm | इंटरनेटस्नेही
मस्त लेख!
6 Dec 2010 - 10:46 am | विजुभाऊ
समारोप :
काही नावं राहिली आहेत !!
होऊन जाउदेत णव्या इनिंगची सुर्वात