पंचमदाच्या गाण्यांवरून घेतलेली चित्रपटांची नावे

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in काथ्याकूट
13 Apr 2020 - 9:50 am
गाभा: 

करोना लॉकडाऊनमुळे मिपाकरांजवळ चिकार मोकळा वेळ असणार असे गृहीत धरून ही किंचितचर्चा सुरू करत आहे. प्रतिसादांतून ती पुढे न्यावी ही विनंती.

*******

पंचम (आर डी बर्मन)चे समकालीन असलेले लक्ष्मीकांत- प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, राजेश रोशन, बप्पी लाहिरी हे (मोजकी काही गाणी वगळता) बरेचसे विस्मृतीत गेलेले आहेत. इतकेच काय, नंतरच्या जमान्यातील आनंद- मिलिंद, नदीम- श्रवण, आदेश श्रीवास्तव यांच्याशीही नव्या पिढीचे फार नाते जुळताना दिसत नाही (जतिन ललित आणि ए आर रहमान हे काहीसे अपवाद).

पंचमची असंख्य गाणी मात्र आजही आवडीने ऐकली जातात. आजच्या पिढीलाही ती कालबाह्य वाटत नाहीत. अर्थात पंचमने एकेकाळी (विशेषतः 80च्या दशकात) आनेक सुमार चित्रपटांतून रोहयोवर मजुरी केल्यासारखे घाऊक संगीत दिले होते. उचलाउचलीही त्याने अनेकदा केलेली आहे. त्यामुळे सगळी गाणी दर्जेदार आहेतच असे नाही. पण त्याची सदाबहार गाणी अजूनही निःसंशय लोकप्रिय आहेत.

*******

तर हे असे काही चित्रपट, ज्यांची नावे पंचमच्या लोकप्रिय गाण्यांवरून घेतलेली आहेत.:

दिल ने जिसे अपना कहा (सलमान खान)

दम मारो दम (अभिषेक बच्चन)

बचना ऐ हसीनो (रणबीर कपूर. हेच गाणे या चित्रपटासाठी रीमिक्सही करण्यात आले होते.)

चुरा लिया है तुमने (इशा देओल)

जब तक है जान (शाहरुख खान)

ये जवानी है दिवानी (रणबीर कपूर)

दीवाना मुझसा नही (आमिर खान)

आ देखे जरा (नील नितिन मुकेश)

जाने तू या जाने ना (जेनेलिया डिसूझा)

एक मै और एक तू (या नावाचे दोन चित्रपट निघालेले आहेत)

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे (गोविंदा)

नाम गुम जाएगा (दिया मिर्झा. हा चित्रपटआपले नाव सार्थ करत पार विस्मृतीत गेला आहे)

फिर वोही रात (राजेश खन्ना. दिग्दर्शक- डॕनी)

क्या यही प्यार है (आफताब शिवदासानी)

लाल रंग (रणदीप हुडा)

लो मै आ गया (हा महेश कोठारेने आपल्याच 'दे दणादण'वरून काढलेला हिंदी सिनेमा.)

प्रतिक्रिया

चलत मुसाफिर's picture

13 Apr 2020 - 10:02 am | चलत मुसाफिर

एक लडकी को देखा तो ऐसा लगा (सोनम कपूर).
हा यादीत जोडायचा राहून गेला.

हुप्प्या's picture

14 Apr 2020 - 9:54 pm | हुप्प्या

लाल रंग हे कुठले गाणे? प्रेमनगर मधील? ते तर एस डी बर्मनचे आहे ना?

चलत मुसाफिर's picture

14 Apr 2020 - 9:59 pm | चलत मुसाफिर

हो, चूक झाली. ते गाणं पंचमदाचं नाही.