लॉकडाऊन: अठरावा दिवस

amol gawali's picture
amol gawali in काथ्याकूट
11 Apr 2020 - 9:00 am
गाभा: 

नमस्कार ... मिपाकर !!

न भूतो न भविष्यती ...प्रसंग म्हणजे लॉकडाउन....अगदी कल्पनातीत. मी त्यादिवशी नेहमी प्रमाणे ऑफिस मध्ये होतो ( मुंबई मध्ये ) . "लॉकडाउन " ची चिन्हे दिसत होती . मनात अगणित प्रश्न फेर धरून नाचायला लागले. मी तसाच ऑफीस मधून निघालो . घरी कस पोहचायच हा " यक्ष " प्रश्न होता . गावाकडून सारखे फोन येत होते , घरी येण्यासंबधी सारखा आग्रह होत होता . वर्क फ्रॉम होम ची इच्छा होती पण , मला स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे मुंबईत रहायचं कस ? सर्व बंद होत. रोजच्या खाण्या पिण्याचा ही प्रश्न होता.

औरंगाबादला येण्याविषयी आग्रह होत होता . अशातच शेवटच्या क्षणी मोबाइल वर बघितलं शेवटच्या ट्रेन च शेवटच तिकीट होत . शेवटी ईश्वरा ला स्मरून तिकिट बुक केलं शेवटी जीव भांडयात पडला. एकदाचा प्रवास सुरु झाला....

हा प्रवास नेहमीचा नक्कीच नव्हता. भय , चिंता , काळजी व तणाव सोबत घेऊन प्रवास सुरु झाला, अखेर रात्री १ वाजता औरंगाबाद स्टेशन ला उतरलो. माझा भाऊ एवढ्या रात्री मला घ्यायला आला होता.
जीवनात आलेल्या प्रसंगाला धीरानं , सयंमान तोंड दयाव लागतं. मार्ग निघत असतो ह्या आई च्या शिकवणीन अलगद डोळयाच्या कडा ओल्या झाल्या.

ते निश्चितच नकळत ओघळणारे "आनंद अश्रू " होते ....

- अमोल गवळी
========================================================================================
========================================================================================
मी काढलेली व्यंगचित्रे.

1

2

3

4

5

6

8

7

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

11 Apr 2020 - 9:29 am | चौकटराजा

लेखकाच्या शम्भर शब्दापेक्षा हास्यचित्रकाराची एक सफाईदार रेषा पार मनाच्या गाभार्यापर्यंत पोहोचते ! सलाम अमोल साहेबा !

चौकटराजा's picture

11 Apr 2020 - 9:32 am | चौकटराजा

देशी विदेशी कोणतीच न मिळाल्याने विड्रावल सिम्पटम मुळे 300 दारुड्याना रुग्णालयात भरती करावे लागले म्हणे !

प्रसाद_१९८२'s picture

12 Apr 2020 - 9:31 am | प्रसाद_१९८२

हे "विड्रावल सिम्पटम" म्हणजे नक्की काय असते ?

चौकटराजा's picture

13 Apr 2020 - 8:31 am | चौकटराजा

व्यसन सुटताना होणारा मानसिक वा शारीरिक त्रास. दारूड्या माणसाला हळू हळू दारू कमी करूनच तिच्या पाशातून सोडवावे लागते .

चौकटराजा's picture

13 Apr 2020 - 8:36 am | चौकटराजा

एरवी दुचाकी व चारचाकी वाहनावर धावून जाणारे आमच्या सोसायटी समोरचे एक कुत्रे " लॉक्डाउन " मुळे फार अस्वस्थ येरझार्या घालीत असलेले लोकानी पाहिले आहे. याला म्हणतात विड्रोअल सिम्पटम !!

गुल्लू दादा's picture

13 Apr 2020 - 9:12 am | गुल्लू दादा

काय उदा. दिलात जबरदस्त. हाहाहा.

प्रसाद_१९८२'s picture

13 Apr 2020 - 9:38 am | प्रसाद_१९८२

धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2020 - 8:37 pm | चौथा कोनाडा

चौराजी,

+१

कुमार१'s picture

11 Apr 2020 - 9:40 am | कुमार१

खूप सुंदर !
भावली.

कंजूस's picture

11 Apr 2020 - 9:45 am | कंजूस

हाहाहा.

प्रचेतस's picture

11 Apr 2020 - 10:09 am | प्रचेतस

एकदम समर्पक व्यंगचित्रे.
लॉकडाऊनमध्येदेखील ह्या धाग्यांमुळे आणि एकंदरीतच ह्या लेखमालिकेमुळे विरंगुळा मिळाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2020 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमोल सर, सगळीच व्यंगचित्रे आवडली. लॉकडाऊनच्या काळात आपण उत्तम व्यंगचित्रे काढली आहेत. आपण मिपासदस्य आहात त्याचाही अभिमान आहे.

-दिलीप बिरुटे

झेन's picture

11 Apr 2020 - 11:39 am | झेन

छान गंमत आणलीत

प्रमोद देर्देकर's picture

11 Apr 2020 - 11:56 am | प्रमोद देर्देकर

खुप छान !

चांदणे संदीप's picture

11 Apr 2020 - 12:08 pm | चांदणे संदीप

लॉकडाऊन लेखमालेमुळे दिवाळी अंक वाचल्याचा फील येत आहे.
सर्व व्यंगचित्रे मस्त.

सं - दी - प

जालिम लोशन's picture

11 Apr 2020 - 1:33 pm | जालिम लोशन

ऊत्तम

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

11 Apr 2020 - 2:48 pm | सौ मृदुला धनंजय...

खूप छान.

शाम भागवत's picture

11 Apr 2020 - 3:09 pm | शाम भागवत

सर्व व्यंगचित्रे मस्त.
यानंतरच्या लॉकडाऊनच्या प्रत्येक दिवशी तुमचे एक तरी व्यंगचित्र पाहिजेच बॉ.
रोजच्या व्यंगचित्रासाठी, कोणीतरी दररोज त्यांच्या मागे लागा रे.
:)

amol gawali's picture

11 Apr 2020 - 3:37 pm | amol gawali

नमस्कार ... मिपाकर !!

न भूतो न भविष्यती ...प्रसंग म्हणजे लॉकडाउन....अगदी कल्पनातीत. मी त्यादिवशी नेहमी प्रमाणे ऑफिस मध्ये होतो ( मुंबई मध्ये ) . "लॉकडाउन " ची चिन्हे दिसत होती . मनात अगणित प्रश्न फेर धरून नाचायला लागले. मी तसाच ऑफीस मधून निघालो . घरी कस पोहचायच हा " यक्ष " प्रश्न होता . गावाकडून सारखे फोन येत होते , घरी येण्यासंबधी सारखा आग्रह होत होता . वर्क फ्रॉम होम ची इच्छा होती पण , मला स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे मुंबईत रहायचं कस ? सर्व बंद होत. रोजच्या खाण्या पिण्याचा ही प्रश्न होता.

औरंगाबादला येण्याविषयी आग्रह होत होता . अशातच शेवटच्या क्षणी मोबाइल वर बघितलं शेवटच्या ट्रेन च शेवटच तिकीट होत . शेवटी ईश्वरा ला स्मरून तिकिट बुक केलं शेवटी जीव भांडयात पडला. एकदाचा प्रवास सुरु झाला....

हा प्रवास नेहमीचा नक्कीच नव्हता. भय , चिंता , काळजी व तणाव सोबत घेऊन प्रवास सुरु झाला, अखेर रात्री १ वाजता औरंगाबाद स्टेशन ला उतरलो. माझा भाऊ एवढ्या रात्री मला घ्यायला आला होता.
जीवनात आलेल्या प्रसंगाला धीरानं , सयंमान तोंड दयाव लागतं. मार्ग निघत असतो ह्या आई च्या शिकवणीन अलगद डोळयाच्या कडा ओल्या झाल्या.

ते निश्चितच नकळत ओघळणारे "आनंद अश्रू " होते ....

- अमोल गवळी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2020 - 5:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमोल सर चांगलं लिहिलं. खरं तर अचानक लॉकडाऊनमुळे अनेकांची अडचणी झाल्या. आपल्याला सुखरुप औरंगाबादला येता आलं हे वाचून छान वाटलं.
आता वर्क फ्रॉम होम व्यंगचित्र आणि ऑफीस काम करत राहाल. काळजी घ्या, बोलत राहू या.

आपलं महाराष्ट्राचं लॉकडाऊन ३० एप्रील पर्यंत राहणार आहे. तेव्हा आपण या संकटावर विजय मिळविणारच!!

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

11 Apr 2020 - 6:00 pm | धर्मराजमुटके

लॉकडाऊनचे अजून १५ धागे काढायची सोय झाली.

प्रचेतस's picture

11 Apr 2020 - 8:00 pm | प्रचेतस

आजचा चेस गेम एकदम जबरदस्त झाला.
माझी बाजू वरचढ असतानाही सरांनी जबरदस्त कलाटणी दिली आणि धक्कादायकरित्या त्यांनी चेकमेट केलं.

window.addEventListener("message",e=>{e.data&&"6598972"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});

चांदणे संदीप's picture

11 Apr 2020 - 8:20 pm | चांदणे संदीप

राजाच्या आजूबाजूला नेहमी हवा खेळती राहिली पाहिजे. ;)

सं - दी - प

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2020 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरांनी जबरदस्त कलाटणी दिली आणि धक्कादायकरित्या त्यांनी चेकमेट केलं.

वरील वाक्यातून माझा जो दनदनीत विजय झाला आहे, तो निदर्शनास येत नाही. 'सरांनी आज मला लैच बेक्कार हरवलं' असं बोल्ड अक्षरात पाहिजे होतं.

बाय द वे, वल्लीसर पूर्ण डावावर तुमचं वर्चस्व होतं. तुम्ही अप्रतिम खेळत होता. माझा बचावही नावापुरता शिल्लक राहिला होता. हे मी कबूल करतो. पण, शेवटच्या तुमच्या तीन चाली वृथा आत्मविश्वासाने भरलेल्या स्पष्ट दिसत होत्या, गर्व ,अभिमान बियरच्या फसफसणा-या फेसाप्रमाने फसफसत होत्या, मी मात्र रामायण मालिकेतल्या रामाप्रमाणे शांत आणि स्थितप्रज्ञ होतो.

आणि मी संधीचं सोनं केलं. Thanks.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

11 Apr 2020 - 9:09 pm | प्रचेतस

=))
खरं आहे, माझं बचावाकडे दुर्लक्ष झालं, तुम्ही पुढच्या २ चालीत चेकमेट होणार ह्या आनंदातच मी होतो आणि हरलो.

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2020 - 8:35 pm | चौथा कोनाडा

व्वा. अमोल गवळी सुपर !
व्यंगचित्रे पाहून मजा आली.
आजचा लॉक डाउनचा दिवस वेगळा ठरला !
शेवटी कोरोनावर "लस" शोधलीच
आणि शेवटचे "तराजू'चे भाष्यचित्र खूप आवडले !

MipaPremiYogesh's picture

13 Apr 2020 - 4:16 pm | MipaPremiYogesh

अमोल सर, काय सुन्दर चित्रे अप्रतिम...

आज आॅफिसला जातांना (4-5 दिवसांनी एकदा
जवळच्या शाखेत जाते) रस्त्यावर गर्दी नसून सुध्दा
मूर्ख लोक हाॅर्न वाजवत होते. असा संताप होत होता. मनाला वाटेल तसे वागायची या देशातल्या
लोकांना सवय झाली आहे. कोणीतरी हुकूमशहाच
यायला हवा .

गणेशा's picture

29 Apr 2020 - 4:58 pm | गणेशा

वा वा.

व्यंगचित्रे भारीच आहेत..
रेषांच्या फटकाऱ्यांची भाषा कित्येक शब्दांपेक्षा भारी ठरते

आणखीन येऊद्या

Prajakta२१'s picture

29 Apr 2020 - 5:01 pm | Prajakta२१

+१११

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2020 - 5:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपले मिपाचे व्यंगचित्र कलाकार amol सेठ यांना जागतिक व्यंगचित्रदिनाच्या खुप खुप शुभेच्छा...!

आपलं व्यंगचित्राच्या बाबतीत मोठं नाव व्हावे ही सदिच्छा....!

-दिलीप बिरुटे