आता परवाच आमच्या इथल्या जवळच्या सुपरमार्केटमध्ये किरकोळ किराणा आलायला गेलो होतो. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचे दुकान असल्यामुळे दुकान अर्थातच उघडे होते, सकाळी लवकर गेलो असल्याने गर्दीही नव्हती. गरजेच्या वस्तू घेता घेताच नजर मॅकरोनीवर पडली आणि इतर सामानासहित ती देखिल घेऊन आलो. आज अचानक पास्ता खायची लहर आली. अनायासे बहुतेक सर्व साहित्यही घरात होतेच मग काय केली सुरुवात मॅकरोनी चीजी रेड पास्ता बनवायला.
साहित्यः
मॅकरोनी पास्ता: २ मोठे कप
१ वाटी बारीक चिरलेला कांदा
१ वाटी बारीक चिरलेला टॉमेटो
१ वाटी मध्यम चिरलेली ढोबळी मिरची
अर्धा वाटी मटार
अर्धा वाटी किसलेले चीज
रेड पास्ता मसाला १० ग्राम पाकीट
काळी मिरी ग्राईण्डरसहित.
कृती:
प्रथम २ मोठे कप मॅकरोनी सुमारे दिड लिटर पाण्यात चमचाभर मीठ टाकून ते मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवले. पाणी उकळून त्यात पास्ता शिजायला सुमारे २० मिनिटे लागतात. मग चाळणीच्या साहाय्याने उर्वरित पाणी गाळून व शिजलेल्या पास्त्यावर चमचाभर तेल टाकून पास्ता बाजूला ठेवला.
कढईत २ चमचे तेल टाकून ते तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, ढोबळी मिरची आणि मटार घालून ती भाजी पाच्/सात मिनिटे परतली आणि नंतर रेड पास्ता मसाला टाकून मिक्स केली.
मग ह्या कढईत आधी शिजलेला मॅकरोनी पास्ता टाकला, त्यात ताजी ग्राइण्ड केलेली काळी मिरी आणि पास्ता मसाला टाकून मिश्रण परतले.
परत ह्यात कपभर गरम पाणी टाकून पास्ता ५ मिनिटे परतला आणि त्यावर किसलेले चीज पसरले
हे परत मिक्स करुन २/३ मिनिटे परतले, प्लेटमध्ये पास्ता भरुन आणि त्यावर चिली फ्लेक्स आणि ताजी भरडलेली काळी मिरी टाकून गार्निशिंग केले. पास्ता तयार.
/>
प्रतिक्रिया
30 Mar 2020 - 6:40 pm | गणपा
30 Mar 2020 - 6:40 pm | गवि
मस्त मस्त..
कोणी बनवला?
30 Mar 2020 - 6:44 pm | प्रचेतस
१००% मी स्वतः, भाज्या चिरणे, परतणे, पास्ता चिजवणे, परतणे, प्लेटीत काढून सर्व्ह करणे सगळे माझेच.
30 Mar 2020 - 8:02 pm | गवि
कौतुकास्पद..
2 Apr 2020 - 1:14 am | अत्रुप्त आत्मा
@१००% मी स्वतः, भाज्या चिरणे, परतणे, पास्ता चिजवणे, परतणे, प्लेटीत काढून सर्व्ह करणे सगळे माझेच. ---.
--------------------------
कुकर आगोबा!
30 Mar 2020 - 6:40 pm | गणपा
वाह बेटाजी, या क्षेत्रातही मजल मारलीस... वेल्कम..
30 Mar 2020 - 6:45 pm | प्रचेतस
धन्यवाद गुरुवर्य.
30 Mar 2020 - 7:17 pm | प्रशांत
चक्क गणपा ने असा प्रतिसाद दिल्यावर आपण काय बोलायचे.
लवकरच भेटु वल्ली
1 Apr 2020 - 11:58 am | प्रचेतस
कधी येताय?
30 Mar 2020 - 6:42 pm | किसन शिंदे
खतरा झालेय बे रेसिपी. होपफूली तू स्वतः तयार केली असावीस. ;)
30 Mar 2020 - 6:44 pm | प्रचेतस
हो, फुल्ली मीच :))
30 Mar 2020 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वल्लीचं,पाकृ क्षेत्रात पाऊल ! वाह वल्लीसेठ वाह.
पाकृ दिसतेय भारी. आस्वादावर परीक्षण राहील.
पण अभिनंदन. आवडला उपक्रम.
-दिलीप बिरुटे
30 Mar 2020 - 9:50 pm | सस्नेह
दर्पणसुंदरीने शिकवला का पास्ता ? (ह घ्यावे )
1 Apr 2020 - 11:58 am | प्रचेतस
नै हो, माझा मीच केला.:)
30 Mar 2020 - 11:24 pm | सौंदाळा
उत्कृष्ट, पुलावरून उतरून पलीकडे आलं पाहिजे पास्ता खायला
1 Apr 2020 - 11:59 am | प्रचेतस
कधीपण, चालत ५/७ मिनिटं
31 Mar 2020 - 6:21 am | कंजूस
छान. { आणखी एक } वेगळ्या क्षेत्रातला वल्लीचा लेख. जमलं आहे छान.
____________________________________
दोन कप पास्ता तिघांसाठी पुरेल.
ही बहुतेक भारतीय ( = पंजाबी ) पद्धत असेल. ( कांदा टोमाटो परतून त्यात काही घालणे)
----
चीज- मकरोनी, बीन्स, व्हाईट सॉसमध्ये हे तिकडचा सामान्य पदार्थ असावा. ते बरेच चांगले लागते.
1 Apr 2020 - 12:00 pm | प्रचेतस
ग्रेव्ही अशी नाही केली, भाज्या होत्या म्हणून त्यानुसार करत गेलो.
1 Apr 2020 - 11:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अंडं टाकून करता येईल का ?
-दिलीप बिरुटे
1 Apr 2020 - 12:01 pm | प्रचेतस
अंडेही खात नसल्याने सांगता येणार नै, तुम्ही तुमचे व्हेरिएशन करून बघा :)
1 Apr 2020 - 12:26 pm | सतिश गावडे
जवळच्या मित्रांना बळेच डोंगर-दर्या, गड-किल्ले आणि लेणी फिरवून आणणार्या माणसाची ही वेगळीच बाजू दिसत आहे.
3 Apr 2020 - 6:48 pm | स्वाती दिनेश
मस्त दिसतो आहे पास्ता..
आणि हो, स्वागत आहे ह्या विभागात ,:)
गड किल्ले फिरणारा बल्लव असणारच , फक्त ह्या विभागात आत्ता आला , :)
स्वाती
3 Apr 2020 - 9:11 pm | प्रचेतस
धन्यवाद. :)
तेव्हा फिरतानाचं खाद्य असायचं ते म्हणजे मॅगी आणि उपम्याचे घरीच रवा भाजून त्यात शेंगदाणे, फोडणी, मीठ मिरची टाकून केलेले कोरडे प्रीमिक्स. मुक्कामाच्या ठिकाणी पातेल्यात पाणी उकळून मिसळले की तयार :)