लाॅकडाऊन : चाैथा दिवस

गणपा's picture
गणपा in काथ्याकूट
28 Mar 2020 - 9:50 am
गाभा: 

दिवस चाैथा.

काय मंडळी? कसे आहात?
घरात बसताय ना? बसायलाच पाहिजे.

आज जरी देशासाठी लाॅकडाऊनचा चाैथा दिवस असला तरी आमचा सहावा दिवस आहे. गेल्या आठवड्यात गावी गेलेलो, अन अचानक रविवारी जनता कर्फ्यु लागला. काही महत्वाच्या कामांमुळे परत येणं भाग होतं. सोमवारी पहाटे पाचला कर्फ्यु संपताच परत निघालो. रस्ते तसे मोकळेच होते. नेहमीपेक्षा अर्धातास लवकरच घरी पोहोचलो.

11च्या सुमारास कामासाठी स्टेशनवर गेलो तर तिथे पोलिसांनी रोड ब्लाॅक केलेले. शहरातुन बाहेर पडण्याचे आत येण्याचे मार्ग पोलिसांनी रोखुन ठेवलेले. नशीब तेव्हा पोलिसांना फ्री हँड दिला नव्हता. हाडं शाबुत राखुन माघारी फिरलो. डिमार्ट अन् बिगबझारच्या बाहेर लोकांच्या रांगा दिसल्या. साैला म्हटलं सकाळी आठला गर्दी कमी असते तेव्हा उद्या सकाळीच जाईन.(या शहाणपणाचा दुसऱ्या दिवशी बराच त्रास सहन करावा लागला.) तो दिवस बातम्यां बघण्यात अन कोरोनाला चीनला शिव्या घालण्यात घालवला. ज्या कामासाठी खास गावाहुन आलो ते तर झालं नाहीच,अन् त्याचाच राग जास्त होता. उगा इथे येऊन अडकल्याची भावना मनाला टोचु लागली.

होता होता दुसऱ्या दिवशी लगेच 144 लागु झालं. पंप्रनी 21 दिवसांच लाॅकडाऊन घोशीत केलं. आज त्याचा चाैथा दिवस. थोडं बहुत जुजबी सामान भरलेलं आहे. त्यामुळे लगेच बाहेर पडण्याची गरज नाहीये.
मला तशी परदेशी असताना एकटं, एकांतात राहायची सवय होती. त्यामुळे लाॅकडाऊनचा मला फार बाऊ वाटत नाही. पण लेकीची नुकतीच दहावीची बोर्डाची परिक्षा आटोपली. (तेही मोठं नशिबच म्हणायच. तिचा शेवटचा पेपर झाला अन रात्री सर्क्युलर आलं की बाकी उर्वरीत पेपर/परिक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत.) तीचे बरेच प्लॅन्स होते सुट्टीचे. ते सगळे बोंबलले. त्यामुळे तिनेही चीनचा उद्धार करून रागाला थोडी वाट करून दिली. सध्या खा, प्या, झोपा, टिव्ही बघा & रिपीट यया आवडत्या गोष्टींवर जोर. पण आवडत्या असल्या तरी त्याच त्याच गोष्टींचाही एका ठराविक काळाने कंटाळा येऊ लागतो. इथे तर तिसऱ्या दिवशीच ही लक्षणं आहेत. तरी बरं जोडीला संगीत आहे तिच्या.

या सुट्टीत तिचा गिटार शिकायचा प्लॅन होता पण सध्या तो बोंबलला आहे. घरात गिटार नाही नाहीतर आॅनलाईन धडे गिरवले असते. त्यातल्या त्यात लाॅकडाऊनी चांगी बाजु म्हणजे काल बऱ्याच महिन्यांनी संवादिनी बाहेर आली. सिंथेसायजर वरची धुळ झटकली गेली. कोपऱ्यातला तंबोरा गवसणीतुन बाहेर आला. बाबाचा तबला बाहेर आला. सध्या माय लेकीची एक नवीन नाट्यगीत ऎकुन ते बसवण्याची तयारी चालू आहे. हा विरंगुळा नक्कीच मनाला आनंद देणारा आहे.

ही सगळी मंडळी बाहेर आलेली पाहुन टिव्ही खालच्या शेल्फमधे पडलेला तो karaoke हाका मारतोय. त्याला म्हलटं 'आयेगा, तेरा भी नंबर आयेगा.'

हे झालं आमचं.. तुमचं काय मंडळी?
तुम्ही काय करताय घरी बसुन?
वेळ कसा सत्कारणी लावताय?
काही चांगल्या आयडिया असतील तर जरूर शेयर करा.

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

28 Mar 2020 - 9:54 am | चौकटराजा

https://www.youtube.com/watch?v=jj1jQrkPuzE

जेम्स बॉन्डचा नवीन सिनेमा येत आहे... नो टाईम टू डाय...... इटालीतील मातेरा इथे त्याचे शुटिंग झाले. ते कसे हे दिलेल्या लिंक मधे पहा !

प्रचेतस's picture

28 Mar 2020 - 9:55 am | प्रचेतस

सव्वाआठ ते ९ arrow चा एक भाग पाहिला मग घरच्यांना डीडी नॅशनलवर रामायण लावून दिलं आणि अगदी जवळच्या सुपरमार्केटला जाऊन आटा आणि काही किरकोळ किराणा घेऊन आलो, वाटेत पोलिसांनी हटकले पण पिशव्या दाखवून घरी आलो. आता प्राडॉ सरांची वाट बघतोय कधी चेस खेळायला येतात ते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2020 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घरच्यांना डीडी नॅशनलवर रामायण लावून दिलं

मी पण.....

आता प्राडॉ सरांची वाट बघतोय कधी चेस खेळायला येतात ते.

तुम्ही चांगलं खेळताय सध्या. मेंटलीही तुम्ही खेळतांना माझ्यावर हावी होता त्यामुळे आता नको. धन्यवाद.

बाकी, कोणा नव्या मैत्रीणीचे मेसेज बिसेज ?

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

28 Mar 2020 - 10:45 am | प्रचेतस

तुम्ही चांगलं खेळताय सध्या. मेंटलीही तुम्ही खेळतांना माझ्यावर हावी होता त्यामुळे आता नको. धन्यवाद.

खेळा ना भो.

बाकी, कोणा नव्या मैत्रीणीचे मेसेज बिसेज ?

मैत्रिणीचे नाही, मैत्रिणींचे.
त्याही सर्वच घरी असल्याने सतत चालूच असतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2020 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त हो गंपासेठ, खरं तर लॉकडाऊनच्या परिस्थितीत कोणाचं काय चालू आहे याची उत्सुकता असते. तुम्ही गावाकडे अडकून गेला असता, आणि जर वेळेत पोचला नसता तर हालच झाले असते. बाकी, खा,प्या, झोपा, टीव्ही आणि मोबाईल आणि वरच्यावर नैसर्गिक विधी या गोष्टी सारख्याच. बाकी, भावनांचा बोळा अडकला होता त्यामुळे एक कच्ची बची कविता पानावर खरडली. आकार दिला की डकवेनच.

बाकी, काल निद्रादेवीच्या अधीन होण्यापूर्वी मेडीकल एजुकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट महाराष्ट्रचा रिपोर्ट पाहात होतो. कालच्या तारखेपर्यंत आपल्याकडे पहिल्या रुग्णाची नोंद एक फेब्रुवारीची दिसते आणि सव्वीसला तो आकडा ७२८ पर्यंत गेलेला होता. बाकी, देशांची तुलना पाहता नवव्या आठवड्यात जगातील इतर देशांची संख्या अचानक आणि भयंकर वाढलेली दिसते. एप्रीलच्या पहिल्या तारखेपासून नववा आठवडा सुरु होतोय. आपल्या सर्वांनाच जर त्या भयंकर आकड्यांपासून वाचायचं असेल तर घराबाहेर न पडणेच हा उपाय आहे. काही होत नाही, इकडे कोणाला लागण नाही, अशा कोणत्याच गैरसमजात कोणीही राहू नये असे आवर्जून सांगावे वाटते.

बाकी, आमच्याकडे रुटीन सुरु. आता दुधाच्या बॅग्ज आणायला जात होतो, त्याचीही भीती वाटते. कोरा चहा घेईन आणि सर्वांनीच तसा घ्यावा असा अलिखित फर्मान काढले. आत्ता आवराआवरी करेन. एक मित्र कादंबरी लिहितोय त्याला शुभेच्छा दिल्या. लोक अशा भयान शांततेतही शांत राहतात याचं कौतुक वाटलं. पोरं सध्या बोर होत आहेत, सारखं अभ्यास करा, वाचन करा असेही कितीवेळा म्हणावे. रोज हातावर ज्यांचं जगणे आहे त्यांचं कसं असा प्रश्नही पडतो. काही फ्रेंडली वाट्सॅप ग्रुपवर आहे, फूल्टू गप्पा. बाकी मिपावर आहेच. बोलत राहीन.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Mar 2020 - 11:49 am | ज्ञानोबाचे पैजार

घरी बसून चेस खेळणार्‍या आणि वेब सीरीज बघणार्‍या लोकांचा हेवा वाटतो आहे.

२१ तारखे पासून घरातुन बाहेत पाऊल टाकले नाही. पण घरी बसून सुध्दा डोके वर काढायला अजिबात वेळ मिळाला नाही.

आमच्या हापिसातल्या नाठाळ घोड्यांना नुसते पाण्याजवळ नेउन भागले नाही तर त्यांना आडवे घालून त्यांच्या नरड्यात पाणी ओतायचे काम गेले सहा सात दिवस करतो आहे. सतत मोबाईल आणि मेल ला उत्तरे देउन बोटे आणि कान दुखायला लागले. हे कमी म्हणून रोज किमान ३ ते चार स्काईप मिटींगांनी हैराण केले आहे.

आज थोडी शांतता मिळाली आणि रामायण बघता आले. फार भारी वाटले बघताना बाळ धुरी, जयश्री गडकर, ललिता पवार, सुधिर दळवी बघताना मजा आली.
आता १२ वाजता महाभारत आहे ते ही पहाणार

आणि रात्री या दोन्ही मालिकांचे पुढचे भाग दाखवणार आहेत ते पण पहाणारच.

सोमवार पासुन ह्या वेळा वगळून मिटींगा करणार आहे.

आज जमले तर चेस चा पण एक डाव टाकतोच जो भेटेल त्या बरोबर. (मधे मिपावर अशी चेसची स्पर्धा पण झाली होती असे अंधुकसे आठवते आहे)

पैजारबुवा,

११ वाजता व्योमकेश बक्षी लागलं, ते पाहिलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2020 - 12:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विक्रम वेताळ आणि दादा दादी की कहानी आठवण झाली.मला आवड़ायचं राव ते... आमच्याकडे टीव्ही नव्हता तेव्हा सायंकाळी पाच साडेपाच वाजता लोकांच्या टीव्ही असलेल्या घरासमोर घुटमळायचो. मालिका बघुन जाम खुश व्हायचो. ब-याच मालिका तेव्हा अशा लोकांच्या घरी जाऊन पाहिल्या. आज हजार एक चायनल्स असतील पण ती मजा वेगळी होती.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

28 Mar 2020 - 12:40 pm | प्रचेतस

विक्रम और वेताल पण रामानंद सागरची सिरीयल होती, त्यात विक्रमाची भूमिकाअरुण गोविल तर वेताळाची भूमिका सज्जनने केली होती.

रच्याकने, वेताळपंचविशी मधला विक्रमादित्य म्हणजे उज्जैनचा पराक्रमी राजा विक्रमादित्य अर्थात गुप्त साम्राज्याचा चंद्रगुप्त दुसरा. ह्यानेच भडोचपर्यंत धडक मारून शकांचा (पश्चिमी क्षत्रपांचा)संपूर्ण विनाश केला म्हणून गौतमीपुत्राप्रमाणेच ह्यालाही शकारी म्हंटल्या गेले. हा समुद्रगुप्ताचा पुत्र.
ह्याच्याच पुढे लिजेन्ड्स बनल्या. सिंहासन बत्तीशी मधला भोजराजा परमार ज्या सिंहासनावर बसू इच्छितो ते सिंहासन विक्रमादित्याचेच.

चौकस२१२'s picture

28 Mar 2020 - 1:09 pm | चौकस२१२

अजून देशभर लोकडवून नाही ,, बाकी राज्यात होईल अशी शक्यता आहे
त्यामुळे २१ दिवसांची प्रतीक्षा आहे !
थिजलेल्या कापलेल्या भाज्या आणायची सवय असल्यामुळे तसे "कोपर्यावरून ताजी भाजी नाही" याची सध्या तरी फारशी खंत नाही..थोड्या दिवसात जाणवेल
घरी पाव बनवणे सुरु केले पाहिजे , भारतीय दुकाने भरलेली होती पण भारतातून येणारा माल हळू हळू कमी होईल काय कदाचित असे वाटते
बाकी खादाडी बाहेर बंद , टेक अवे ( पार्सल ) मिळते ...
बाजारात कमीत कमी कसे जायचे याचाच विचार चालू ...
काम घरून असते बहुतेक, त्यामुळे त्यात काही नवल नाही पण एक विचित्र उदासीनता आली आहे...(परीक्षा संपणार कधी अशी काहीशी ) घरातील असंख्य कामे पडली आहेत त्यशियाव वर्षाचे आय कराचे हिशोब...
आणि भटकंती, त्यातील भटकंती बंद ..(डिसेम्बर महिन्यात चीन च्या जवळ होतो ...)
काम नगरपालिका वर अवलंबून असल्यामुळे बहुतेक काळजी नाही पण नगरपालिका कार्यालयच जर बंद झाली तर परिणाम होईल
भारताएवढी १००० चॅनेल्स नाहीत , बाकी नेटफ्लिक्स परत सुरु करेन म्हणतो . भारतातील नेटफ्लिक्स आणि इतर देशातील यातील " कन्टेन्ट" मध्ये फरक असतो काय?
कारण मराठी चित्रपट बघण्याचे दुसरे साधन नाही ?असल्यास मिपाकर कळवा व्यनि करून
दरवर्षी चा ऑस्कर सोहळा पाहणे हा सणाचा दिवस असतो.. तो विसरलो... आता बघेन
मिर्झापूर २ ची वाट, क्राऊन २ पण

चांगली हिंदी चित्रपटांची यादी जरूर पाठवा ,,, अनवट, विनोदी आणि गंभीर आवडतात ( आंखो देखी , चलो दिल्ली , सारखे )
बाकी ३०४ आंतरजालावर शोधतोय...

चौथा कोनाडा's picture

28 Mar 2020 - 1:19 pm | चौथा कोनाडा

लॉक डाऊनचा चाैथा दिवस निवांत सुरु झाला. सकाळी डीडीला रामायण लावले, त्यावेळी एकही भाग पाहू शकलो नव्हतो. आज घरकामात मदत करता करता जमेल तसा पहिला (बाकी रामायण-महाभारत यात मला तितपतच रस असल्यामुळे फार काही उत्सुकता वाटणार नाही)
गेले काही "कोटा फॅक्टरी" ही गाजलेली वेब्सिरीज पहिली. अप्रतिम आहे. प्रत्येक पात्राने, प्रसंगाने मनात घर केले, तरुणपणातील आठवणींशी रिलेट होत राहिलो. शेवटचा भाग अफलातून हुरहूर लावणारा होता. मग त्या कलाकारांच्या मुलाखती, मेकिंग ऑफ देखील बघितले. आता कोटाचा हँगओव्हर संपत आलाय.
बऱ्याच दिवसांपासूनचा पेंडिंग भटकंती धागा लिहायला सुरुवात केलीय, बघू कधी पूर्ण होतंय ते.

कुमार१'s picture

28 Mar 2020 - 2:01 pm | कुमार१

सध्या छापील पेपर बंद आहेत. सक्तीच्या स्थानबद्धतेमुळे कोड्यांची गरज अजूनच वाढली आहे. म्हणून मग जालावरच्या क्रॉसवर्ड्सकडे वळलो. टिचकी मारून सोडवायची पद्धत छान असते. आपण बरोबर अक्षर टंकलेकीच ते काळ्या रंगात पडते. चुकीचे असल्यास लाल रंगात.

पण सतत पडद्याकडे पहावे लागल्याने डोळ्यांना ताण येतो.
ज्यांना एकट्याने ऑनलाइन खेल्याचे असेल त्यांच्यासाठी कोडी उत्तम.

मराठी मनोगत .कॉम वर जुनी आहेत.
इंग्लिश हवी तेवढी मिळतात.
anagramची कोडी कागदावर उतरवून घेता येतात.

अनन्त्_यात्री's picture

28 Mar 2020 - 2:07 pm | अनन्त्_यात्री

जनता कर्फ्यूच्या आदल्या दिवशी २१ मार्चला सेकंड होम (इगतपुरी जवळचं एक खेडं) ला तिघे पोचलो. रिफायनरीतल्या चाकरीमुळे फुफुसात ठाण मांडून बसलेली काजळी खरवडण्याचा माफक हेतू ठेवून अधी मधी जातो तसा तिथे आठवडाभर सहकुटुंब र्‍हायच्या तयारीने गेलो होतो.
वाटेत अन् मुक्कामी पब्लिकचे सर्व वेव्हार नेहमीसारखे चालू होते. २४ मार्चला पंप्र गुगली टाकेपर्यंत बिंधास होतो. २५ च्या दुपारपर्यंत कुलुपबंदीची टोटल गावकर्‍यांना लागली नव्हती. मात्र दुपारी गावफुडार्‍यांनी वेशीवर अडथळे उभारून प्रवेशबंदी केली. आता हाताशी वाणसामान व गॅस मर्यादित असल्याने सकाळी इंस्टंट वाघबकरी अमृततुल्य चहा, नाश्त्याला फाटा, वरण/भात/बटाटा भाजीचे लंच, बटाटा भाजी/भात/वरणाचे डिनर असं २१ दिवसाचे पॅकेज डिझाईन केलंय. दूध/अंडी/भाज्यांसाठी १-२ ठिकाणी वशिले लावलेयत.
मात्र अवकाळी पावसानं आलेला गारवा, बंद पडलेली गावकर्‍यांची कंठाळी भजनं / बांगा, घराभवतीच्या बागेत फुलून आलेले सोनचाफा, मधुमालती, रातराणी, मोगरा, कंठ फुटू लागलेल्या कोकिळा, रात्री गच्चीतून चांदण्या मोजता येतील इतका भवतालचा अंधार या सगळ्यामुळे कुलुपबंदी सुसह्यच नव्हे तर आवडू लागेल की काय अशी भीती वाटू लागलीय.

गामा पैलवान's picture

28 Mar 2020 - 4:38 pm | गामा पैलवान

घरी जुना व्हिस्टा जानुगणक ( = ल्यापटाप) आहे. त्याच्यावर विंडोजची पीई चढवेन अशी भीष्मप्रतिज्ञा केली. रामाने शिवधनुष्य उचलून जशी दोरी लावली अगदी तस्संच कार्य आहे म्हणून स्वत:ची पाठ थोपटली.

हल्लीच्या नव्या दसनंबरी पीई ( = Windows PE 10) निर्मितीसाठी दयाळू मायक्रोसॉफ्टने अनेक हत्यारे उपलब्ध करून दिली आहेत. निर्मितीप्रक्रिया बऱ्यापैकी मानांकित ( = standerdised) आहे. मात्र आमचा जानुगणक पाषाणयुगीन असल्याने त्यास दसनंबरी भारी पडतेय. त्यामुळे एकनंबरी पीई बनवतोय.

बनवतांना हजार लफडी व कटकटी उत्पन्न होताहेत. पण सोडवायला मजा येते. ऐन जवानीच्या दिनांची परत उजळणी होतेय.

एकदा का पीई बनली की चुंबकचकती ( = हार्डडिस्क) वरची जुनी व्हिस्टा उडवून त्याचे छोटेखानी विदावहन सरोवर ( = स्ट्रीमिंग मीडिया सर्व्हर) बनवेन. मात्र त्यासाठी बिनतारी ( = वायफाय) कार्यान्वित करणे आवश्यक आहे. हा आजूनेक उपप्रकल्प आहे.

-गा.पै.

त्या पेक्षा लिनक्स का नाही टाकत. मी सध्या कुबंतु टाकले आहे, एकदम मख्खन चालू आहे लॅपटॉप.

माझ्या जुन्या (13 वर्ष) लॅपटॉप वर लुबंतू टाकले आहे, डेव्हलपमेंट नसेल करायची तर तो पण मस्त चालतो. रोजची सगळी कामे काहीही त्रास न होता पार पडतात. लिब्र ऑफिस लेटेस्ट व्हर्जन 6.4 टाकले की काम झाले.
मी कधीच गेम खेळत नाही त्या मुळे मला विंडोज नसले तरी चालते.

बघा वापरून.

गामा पैलवान's picture

29 Mar 2020 - 2:20 pm | गामा पैलवान

टीपीके,

विचार आहे लिनक्स टाकायचा. फक्त दूरस्थ विहार ( = रिमोट अॅक्सेस) हवाय. जसा विंडोज मध्ये आर.डी.पी. असतो तसा. म्हणजे बसल्या जागी फोनवरनं ल्यापटाप बघता येईल.

आ.न.,
-गा.पै.

ते पण सहज शक्य आहे, एस एस एच क्लायंट ने शेल ॲक्स॓स मिळेल किंवा व्ही एन सी (किंवा तत्सम) क्लायंट ने फुल डेस्कटॉप ॲक्स॓स मिळेल.

गामा पैलवान's picture

30 Mar 2020 - 12:50 am | गामा पैलवान

व्हीएनसी चांगला पर्याय दिसतोय. बघतो कसं ते. माहितीबद्दल धन्यवाद! :-)
-गा.पै.

जर प्रयोग केलात आणि यशस्वी झाला तर नक्की कळवा, जमले तर एक धागा पण टाका म्हणजे मराठीतही थोडेफार तांत्रिक ज्ञान उपलब्ध होईल :)

मी लॉकडाऊन फोल्डर बनवून त्यात वाचायचा माल ठेवला आहे. तोच चवीचवीने संपवणार.

प्रचेतस's picture

28 Mar 2020 - 5:50 pm | प्रचेतस

सरांशी परत एक डाव खेळता आला. मजा आली.

window.addEventListener("message",e=>{e.data&&"6567302"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2020 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रिजाइन करणार होतो वजीर जाण्या अगोदर, पण खेळलो.मस्त झाला डाव. वेळ दिला आपण आभारी आहे.

-दिलीप बिरुटे

वकील साहेब's picture

28 Mar 2020 - 6:15 pm | वकील साहेब

नुकताच contagion नावाचा एक पिक्चर संपवला.
२०१७ मध्ये बनलेला आणि आपल्या भारतीय प्रेक्षक नजरेतून बघितले तर कोणताही ड्रामा, थ्रील, इमोशन, मसाला नसलेला हा एक सरळसोट पिक्चर होता. एरवी मी पूर्ण बघितलाही नसता. पण कोरोनाच्या पार्श्वभूमी वर आणि लॉकडाऊन मुळे असलेला रिकामटेकडे पणा म्हणून बघितला.
contagion म्हणजे संसर्ग.
अशाच एका संसर्गजन्य रोगाने संपूर्ण जगात थैमान घातलेले असल्याची पार्श्वभूमी त्याला आहे. त्यातील घडामोडी मला तरी एरवी अति रंजक वाटल्या असत्या पण सध्या जे काही घडतं आहे ते त्या पेक्षा जास्त भयावह आहे. या पिक्चर मध्ये दाखवलेला आजार वटवाघुलांपासूनच पसरतो हे एक विशेष. वारंवार हात धुवा, चेहऱ्याला सारखा स्पर्श करू नका. एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा आदी सूचना असे अनेक साम्य यात आहेत.
या पिक्चर मध्ये पहिल्या व्यक्तीला लागण झाल्यापासून साधारण १३६ दिवसात त्या आजाराची लस शोधली जाते. (आपल्याकडे अजून तरी अस काही घडलेलं नाहीये ) पण मध्यंतरीच्या काळात प्रगत समजल्या जाणाऱ्या देशात मॉल मध्ये लुटमार होते, लोक अन्नपाण्या साठी एकमेकाचे मुडदे पडायला कमी करत नाहीत असही दाखवलं आहे.
(आपल्याकडे हे हि अजून घडलेलं नाहीये. हे आशादायक आहे)

प्रशांत's picture

28 Mar 2020 - 6:48 pm | प्रशांत

आज WFH नसल्याने सकाळी उशीरा उठलो, चहा पित / गप्पा मारत आई सोबत रामायण बघितल. नंतर थोडा व्यायाम केला. दुपारी जेवण करुन मस्त झोप काढली.

लॉस्ट परत एकदा बघायला सुरुवात करायची आहे.

गणपाचा धागा आहे म्हणजे कुठलीतरी पाकृ असेल असे वाटले, किचण मधे आज काहितरी लुडबुड करु असा विचार होता.

वोडाफोन मोबाइलमधलं इंटरनेट चार दिवस झाले पार गंडलं आहे. ४ g बंद झालं की ३ जीवर चेंज करतो. तरीही केविलवाणे. मग एक जियो कार्ड होतं ते रिचार्ज केलं. मख्खन इंटरनेट.

Nitin Palkar's picture

28 Mar 2020 - 9:14 pm | Nitin Palkar

आज माझ्याकडे जिओचं नेटवर्क दिवसभर नव्हतं... त्या मुळे आत्ता संगणकावर बसलोय ....

शुक्रवार दि. २० मार्च ...रोजी संध्याकाळी ०७.०० वा. घराबाहेर पडलो होतो. नैमित्तिक गरजेच्या आठवड्याच्या वस्तू घेऊन आलो. त्यानंतर अद्याप बाहेर पडलो नाही. अजून दोन, तीन दिवस बाहेर पडण्याची गरज पडेल असं वाटत नाही...

गणेशा's picture

14 May 2020 - 8:31 pm | गणेशा

गणपा शेठ,
पाक कृती काही केल्या का नाही?