गाभा:
आज लॉकडाऊनचा दुसरा दिवस.
सकाळी नेहमीप्रमाणेच लवकर उठून आवरुन बसलो, ऑफिसचे इमेल्स तपासून काहींना उत्तरे दिली मग अॅरोचा एक भाग पाहिला, मग chess.com वर जाउन बिरुटे सरांना आव्हान दिले. मोबाईलवर खेळत असल्याने माझ्या बर्याच चुका झाल्या. एकंदरीत खेळ जबरदस्त झाला. सर टाइम आउट वर पराभूत झाले. अन्यथा खेळ अजून खोलात गेला असता.
आपण तो खेळ येथे पाहू शकता.
window.addEventListener("message",e=>{e.data&&"6562654"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});
आपण सर्वांनीही काय काय केलंत आणि काय काय कराल आजच्या दिवशी ते सर्व इथे येऊ द्या.
प्रतिक्रिया
26 Mar 2020 - 11:03 am | आनन्दा
आयला तुम्चि मजा आहे राव.
आमच्या कंपनीत फुल्ल ऑन काम चालु आहे.
स्काइप, स्लॅक आणि जीमेल! धुमाकूळ!
26 Mar 2020 - 11:07 am | गवि
+१
उलट इमर्जन्सीमुळे अधिक टेन्शन. अपेक्षा वाढलेल्या, रिसॉर्सेस अपुरे, रोज नवीन अडचणी.
त्यापेक्षा कचेरीत जाणे अधिक मनःशांती देणारे ठरले असते. लोकांना छंद, खेळ, फ्यामिली टाईम, बागकाम, पुस्तकवाचन वगैरे करुन फोटो टाकताना पाहून मन जळत आहे. WFH म्हणजे सुट्टी असे असलेली क्षेत्रे किती भाग्यवान.
26 Mar 2020 - 1:47 pm | प्रशांत
सकाळी प्रॉड इशु बाजार उठला
26 Mar 2020 - 11:04 am | गवि
सरांच्या पट्टशिष्याकडून खुद्द सर हरले. कोणत्याही गुरूला सर्वोच्च गुरुदक्षिणा अपेक्षित असते ती हीच.. शिष्यादिच्छेत् पराजयम
26 Mar 2020 - 11:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आत्ता काही दिवसापूर्वी पुण्यात भेट झाली तेव्हाही एक डाव झाला तेव्हाही हरले. प्रशांतसेठ साक्षीला आहेत. पण तो पराभव त्यांना मान्य नाही. जाऊ देत, प्रचेतस चांगलं खेळत आहेत ही चांगली गोष्ट.
तुम्ही काय करताय गविसेठ ?
संक्षिसेठची आठवण येत आहे, आणा रे त्यांना कोणीतरी.
-दिलीप बिरुटे
26 Mar 2020 - 12:19 pm | कंजूस
मयत्री टिकवण्यासाठी वल्लीशेट (काहीही करतात) हरतातसुद्धा.
26 Mar 2020 - 12:55 pm | प्रचेतस
अगदी अगदी
26 Mar 2020 - 1:48 pm | प्रशांत
आज कसे काय हरले तुम्हि..
कमितकमी मारामारी करुन वल्लीला हरवल होतं, फोटो असेल ना तुमच्याकडे?
26 Mar 2020 - 11:12 am | कुमार१
खालील अक्षरांवरून ९ अक्षरी योग्य इंग्लीश शब्द बनवा :
१. E a c p k e m a r
२. F a h r l t e t e
जालाची मदत न घेता सोडवा ! वेळ छान जाईल आणि सुटल्यास आनंद मिळेल.
26 Mar 2020 - 11:16 am | प्रचेतस
पहिले तर pacemaker आहे.
27 Mar 2020 - 2:13 pm | चिगो
१. Pacemaker
2. Heartfelt
26 Mar 2020 - 11:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवश्यक काळजी घेऊन दूधबॅग आणल्या. स्वच्छ साबण पाण्याने बॅग्स धुवून काढल्या. सॅनिटायजरने हात स्वच्छ केले. स्वत:च्या हाताकडे बोटांकडे पहिल्यांदाच टक लावून पाहिले. नंतर आवराआवरी करून दिवसभर उलट सुलट मेसेजेस टाकणारे दोन वाट्सएप ग्रुप सोडले. प्रचेतस काल बुद्धिबळ हरल्यामुळे त्यांना करमत नसेल हे मनोमन ओळखून त्यांच्या खेळायला या हट्टापुढे खेळलो. जानकारांनी माझ्या काळ्या सोंगट्या असून मी विजयाच्या उंबरठ्यावर होतो हे लक्षात येईलच. एक मिसकॉल आला तो पाहण्यात वेळ गेला. मला वेळ कमी पडल्यामुळे डाव सोडावा लागला. प्रचेतस अभिनंदन. हार हार होती है हे मान्य.
लाइट गेलीय. लॅपटॉप ब्याट्री संपलीय. नेटस्पीड स्लो झालाय. यूट्यूब बफरिंग करतेय. बातम्या पाहणे कमी केले. रुग्णांची संख्या वाढतेय काळजीचा विषय होतोय. पोलिसांचे फटके वाढले आहे. लोकांना अजुनही गांभीर्य नाही हे स्पष्ट दिसतेय.
बाकी मिपावर पडिक असेनच.
-दिलीप बिरुटे
26 Mar 2020 - 11:40 am | ऋतुराज चित्रे
२) Heartfelt,
Pacemaker मुळे अंदाज केला.
26 Mar 2020 - 12:15 pm | कुमार१
म्हणी ओळखा खेळ
एकूण ५ ओळखायच्या आहेत. प्रत्येक म्हणीसाठी ३ शब्द शोधसूत्र म्हणून देत आहे. ते शब्द उत्तरात जसेच्या तसे असणार नाहीत. फक्त त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा .तसेच त्यांचा क्रमही उत्तरात ओळीने नाही.
१. दौड, नकार, शरीर
२. भंग, अवयव, प्राणी
३. वाढ, बोट, पहाड
४. सम्राट, दाम, कप्पा
५. ईश्वर, कलत्र, ती
26 Mar 2020 - 12:38 pm | अभ्या..
माझ्या अपार्टमेंटाच्या ग्राउंडफ्लोरला कमर्शिअल गाळे आहेत. त्यात एकात मोठे वाईन शॉप आणि एक बीर शॉपी आहे. बहुतेक तिसऱ्या आठवड्यात मेहुणा आलेला. सोलापुरला कारने जाण्यासाठी रुमाल बांधून. रात्री थांबला. पार्टी करावी असा विचार होता. बायकोने तो प्लान हाणून पाडला. जेवण हाणून गप झोपलो. दुअसऱ्या दिवशीपासुन दारु दुकाने बंदची नोटीस लागली. सहज बाहेर जाऊन येतायेता रिलायन्स स्मार्टगिरी(सौदागरात नवीन झालेले असलेने) करुन आलो. महिन्याचे सामान १५ ला भरतो साधारण. ते उशीरा आणले. तेथेही कपड्याचा सेक्शन बंद होता. लोकं मास्क मिरवत होते. येताना गर्दी अजिब्यात नव्हती रात्री ९.३० ला. जरा घाबरलो. ४-५ दिवसात आटपेल वाटलेले. २२ ला मोदीकाकांनी सांगायच्या आतच बरीच दुकाने बंद झालेली. तीन चार दिवस आधीच बायकोलाही घरुन काम मिळालेले. सोलापुरात फारसे काही नसलेने तेथील काम निम्म्या प्रमाणात ऑनलाईन चाललेले होते. २३-२४ पासून खरी गेम सुरु झाली. किराणा, भाजी, डेअरी आणि बेकरी वगळता सर्व चिडीचुप बंद. एक मुलगा ॲक्टिव्हाच्या सीटखालील डिकित सिगारेट ठेवून ओळखीच्या घरी डिलिव्हऱ्या देत होता. पुढे हँडलला मात्र पिशवीत भाजी आणि ब्रेड होता. ही पिशवी आता बाहेर फिरायचा परवाना झाल्यात जमा आहे. आज उद्या हेही बंद होईल कारण काही पोलीस आणि मनपावाले हटकताना दिसू लागलेत. शौकीनांना छंद करायवयाला जरा मुरड घालावीच लागेल. पब्लिक मात्र बरेच शिस्तशीर वागत आहेत. दुकानात गर्दी नाही. पण धंदा होत आहे. एक दोघे सलग दिसतात. बंद पडत आलेल्या एका चिल्लर सुपरमार्केटला ह्या लॉकडाउनने संजीवनी मिळालीय. भाजीवाले भाज्या जराश्या कमी आहेत पण रेग्युलर रेटला देताहेत. दर्जा प्रचंड खराब आहे. जवळचा पेट्रोलपंप आठवडा झाला बंदच आहे. घरी दोन गाड्या आहेत. दोन्हीत अंदाजे ३-४ लिटर पेट्रोल आहे. पँट शर्ट घालून १० दिवस झालेत. टीशर्ट थ्रीफोर्थ हेच रुळले आहे. घरातले वायफाय १९ ला रिचार्ज केलेय. टीव्हीचे रिचार्ज संपून ६ महिने झालेत. बायको तिचा लॅपटोप घेऊन बसल्याने आणि माझ्या कामाचा टोटलच बोऱ्या वाजला असलेने स्वयंपाकातले प्रयोग नेहमीप्रमाणेच चालू आहेत.
हे झाले सध्याचे. मात्र गेले चार पाच महिने स्लीप डिस्कमुळे घरात लॉक डाउन असल्यासारखाच होतो. जानेवारी संपताना जरा बरे वाटू लागलेले. फेब्रुवारी सुरुवातील टीशर्ट डिझाईनच्या जरा टूर्नामेंतस वगरे कामे आलेली. शिवजयंती जरा समाधानकारक झालेली. आता स्कूल युनिफोर्मात लक्श घालावे असे वाटून फिराफिरी चालू केलेली ती बंद झाली. सोलापूरचे प्रॉडक्शन सध्या संपूर्ण बंद असलेने नवीन डिझाईन नाहीत गेले ८ दिवस. येत्या १४ एप्रिलला आंबेडकर जंयम्तीचे डिझाईन कर म्हणून ऑर्डर आलेली. दुसऱ्याच दिवशी होल्डवर गेली. हे अजुन महिनाभर चालणार. म्हणजे ते काम नसणारच. म्हणजे गेले ५ महिने विनापगार विनामोबदला. आताही तग धरणे हेच ध्येय. अर्धांगी खंबीरपणे उभी म्हणून हा वेळ निभावेल असे वाटते. पुढे मात्र काय होईल ते मात्र लोकांच्या शहाणपणावर आणि मोदीकाकाच्या उपायावर अवलंबून आहे. कोरोनाच्या इतक्या बातम्या एकल्यात की आता काहीच एइकावेसे वाटत नाही. काय होईल त्याचाही भरोसा वाटत नाही. शांतपणे आला दिवस ढकलणे चालू आहे. दोन कॅन्व्हास पेंट करायला घेतलेत. पण ब्रश हातात घेतला की नकोसे वाटते काम करायला. लॅपटोपवर काही डिझाईन्स करावे म्हणले तर मला ऑऱ्डर असल्याशिवाय डमी डिZआईन करायची सवय नसलेने होत नाहीत. मिपाचे दोन बॅनर तेवढे करुन दिले.
बघू आता. काय हुईल ते हुईल.
26 Mar 2020 - 12:58 pm | प्रचेतस
हे ही दिवस जातील. तग धरणे महत्त्वाचे.
26 Mar 2020 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभ्यासेठ, दिवस बदलून जातात, दिवस बदलतच असतात. स्लीपडिस्क आणि सगळ्याच गोष्टीचं वाचतांना वाईट वाटलं. काळजी घ्या.
बाकी लॉकडाऊनमुळे ज्यांचे जगणे हातावर आहे त्यांच्यासाठी खुप मोठं लॉकडाऊन आहे. सर्वच गोष्टी कठीण आहेत, सर्व गोष्टीतून बाहेर पड़ायला खुप वेळ लागेल.
-दिलीप बिरुटे
26 Mar 2020 - 1:38 pm | चांदणे संदीप
चांगली कामं हातात आलेली फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्चच्या सुरुवातीला. पण वर्क ऑर्डर वगैरे निघेपर्यंत कोरोना ने सगळ होल्डवर आणून ठेवल. उसातली काही कामे आहेत हातात तेवढ्यावर एखादा महिना निघेल असे वाटते. बाकी बघूया पुढे कसं होईल तसं.
२०१९ खराब गेलेलं धंद्याच्या बाबतीत तेव्हा २०२० कडून फार अपेक्षा होत्या. :(
सं - दी - प
26 Mar 2020 - 5:39 pm | चौकटराजा
अभ्या , काही म्हण यार , तू येक पेशल ब्रेन हाय ! ती सिगरेट वाल्याची युक्ती मस्त. तसा किराणा एक महिन्याचा भरला आहे . बाकी दुकानेच बन्द आहेत तर बाहेर कशाला पडायचे .. तरीही एक आयडिया करायची आहे. खिशात प्रिस्क्रिप्शन ठेवली आहे. एक दोन गोळ्यान्ची पाकिटे ठेवायची . जाताना अडवले तर प्रिस्क्रिप्शन दाखवायची, येताना अडवले तर पाकिटे दाखवायची म्हण्जे कुल्ल्याला सूज नको ! .... कसे ... ? या वयात सूज परवडणारी नाय !
ता क... अगदीच कंटाळा आला तर मला व्होटस आप वर व्होईस कॉल दे , मी मनोरन्जनाला उत्तम माणूस आहे !
26 Mar 2020 - 2:19 pm | कंजूस
'घरून काम करू शकणारे ' असा एक नवीन एकस्ट्रा व्हाइट कॉलर्ड स्तर समाजात निर्माण झाला आहे.
( मत्सराने लिहित नाहीये पण खरी स्थिती आहे.)
पुढे लग्न जमवताना पगार प्याकेज , दुसराचौथा शनिवारी सुट्टी , हेसुद्धा विचारण्यात येईल."तुमच्याकडे घरून काम आहे का?"
पूर्वी नोकरी कुठे आणि तिथे युनिअन कोणती हे विचारत कसत.
26 Mar 2020 - 3:12 pm | तुषार काळभोर
ठीक वाटला. लगेच दुसरा चालू करावा असं नाही वाटलं.
किराणा पुरेल १५ पर्यंत. किराणाची काळजी नाही. मध्ये दोन घरं सोडून मित्राचं किराणा दुकान आहे.
आज तीन पर्यंत काम सुरू होतं. एक प्रोजेक्ट गो लाईव्ह होईल उद्या. निम्मी काळजी संपेल.
आता चहापाणी करून थोडी खरेदी करून येतो. मग पती सगळे उचापती बघायचा विचार आहे.
26 Mar 2020 - 4:07 pm | प्रचेतस
बिरुटे सरांशी अजून एक डाव खेळलो. त्याचे पृथक्करण
window.addEventListener("message",e=>{e.data&&"6563100"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});
26 Mar 2020 - 4:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही चांगले खेळता. मी फार चांगला खेळतो, माझे माझ्या बद्दलचे गैरसमज दूर झाले. धन्यवाद.
ता.क. प्रत्येक वेळी मला काळ्या मोह-यांनी खेळावे लागते. :(
-दिलीप बिरुटे
26 Mar 2020 - 4:13 pm | प्रचेतस
Chess.com वर जाऊन सदस्यत्व घ्या. आणि मला आव्हान द्या त्यामुळे तुम्हाला पांढरे मोहरे घेता येतील.
26 Mar 2020 - 7:17 pm | उगा काहितरीच
मस्त झाला डाव ! ते हत्तीचं बलिदान देऊन वजिर मिळवला ते आवडलं.
(मीही कदाचित् हेच केलं असतं)
26 Mar 2020 - 8:45 pm | फुटूवाला
हे मिपावर कसं ढकलता आहात? रोजच येउद्या असं ___/\___
किती वेळाचा गेम लावता?
26 Mar 2020 - 9:04 pm | प्रचेतस
चेस डॉट कॉम वर डाव संपला की तुम्हाला शेअर आणि एम्बेडची लिंक मिळते, ती इथे पेस्ट केली की संपलं.
जनरली ब्लिट्झ प्रकारचा गेम खेळतो, जास्तीत जास्त १० मिनिटे प्रत्येक खेळाडूला.
इतरही ऑप्शन भरपूर आहेत.
26 Mar 2020 - 9:06 pm | प्रचेतस
धन्यवाद.
एकंदरीत हा डाव माझा बऱ्यापैकी निर्दोष झाला. पहिल्या गेममध्ये खूपच चुका झाल्या होत्या.
26 Mar 2020 - 9:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वत:चं कौतुक संपलं असेल तर मीठ मिरची-मोह-या उतरवून घ्या एकदा शांत झोप लागेल. पाहताय ना प्रशांतसेठ एकदा जिंकल्याचा आनंद.
अवघड आहे.
-दिलीप बिरुटे
26 Mar 2020 - 10:17 pm | प्रचेतस
=))
27 Mar 2020 - 6:21 am | कंजूस
तुमच्या सूक्ष्म विनोदी प्रतिक्रिया आवडतात.
26 Mar 2020 - 9:11 pm | प्रचेतस
कुणाला आता खेळायचे असल्यास इथे क्लिक करू शकता.
१५ मिनिटेच ही लिंक चालेल.
https://play.chess.com/gaHh
26 Mar 2020 - 10:52 pm | फुटूवाला
मी आत्ता पाहतोय हा मेसेज...
नंतर कधी..
26 Mar 2020 - 11:32 pm | सुबोध खरे
बाहेर परिस्थिती गंभीर आहे. एक दिवस (सोमवारी) मी दवाखाना बंद ठेवला होता. फोन करणाऱ्या सर्वांना दवाखाना बंद ठेवण्यासाठी IMA ची नोटीस आहे म्हणून सांगितले पण दुसऱ्याच दिवशी(मंगळवारी) एक तातडीचा रुग्ण आहेत म्हणून फोन आला म्हटल्यावर गेलो.
नऊ महिने पूर्ण व्हायला आलेल्या एका स्त्रीला बाळाची हालचाल जाणवत नव्हती. तिचे आगीदारचे बाळ असेच नवव्या महिन्यात पोटात गेले होते त्यामुळे ती प्रचंड तणावाखाली होती.
सोनोग्राफी मध्ये बाळाच्या नाळेतून रक्त पुरवठा कमी होत असल्याचे आढळले. ताबडतोब अहवाल देऊन पाठवले आणि स्त्रीरोग तज्ज्ञांना फोन ही केला. दुसरी 36 वयाची स्त्री वंध्यत्वावर उपचार घेऊन (टेस्ट ट्यूब बेबी) गरोदर होती तिला थोडासा रक्तस्त्राव होत होता तिने फोन केला की प्लिज सोनिग्राफी करून द्या. तिचे स्त्री रोग तज्ज्ञ बांदर्याला आहेत. तिथे जाणे तिला शक्यच नाही.
सोनोग्राफी मध्ये दोन पैकी एकच गर्भ रुजलेला आहे हे समजले परंतु तो व्यवस्थित आहे. मंगळवारी रात्री फार अस्वस्थ होतो. दवाखाना बंद ठेवण्याचा निर्णय बरोबर नाही असे वाटत होते. शेवटी रात्री साडे तीन पर्यंत विचार करून दवाखाना उघडा ठेवण्याचा निर्णय घेतला.
सफाई कर्मचारी पोलीस लष्कर बँकेचे लोक हे काम करत आहेत तर मी स्वतःला धोका आहे म्हणून दवाखाना बंद ठेवणे म्हणजे भेकड पणा वाटत होता.
निर्णय घेतल्यावर पहाटे चार वाजता झोपलो.सकाळी घरच्यांबरोबर ताणा ताणी झाली. माझ्यामुळे आई वडिलांना संसर्ग होईल इ. परंतु मी साफ नकार दिला.
आता निर्जंतुकीकरणाचीपूर्ण काळजी घेऊन सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास दवाखाना उघडा ठेवतो आहे.
काल आज आलेले रुग्ण खरंच गरजू आणि तणावाखाली होते.
पळपुटेपणा केल्याची भावना गेली आणि
दुपारी आणि रात्री शांत झोप लागते आहे.
26 Mar 2020 - 11:33 pm | सुबोध खरे
बाहेर परिस्थिती गंभीर आहे. एक दिवस (सोमवारी) मी दवाखाना बंद ठेवला होता. फोन करणाऱ्या सर्वांना दवाखाना बंद ठेवण्यासाठी IMA ची नोटीस आहे म्हणून सांगितले पण दुसऱ्याच दिवशी(मंगळवारी) एक तातडीचा रुग्ण आहेत म्हणून फोन आला म्हटल्यावर गेलो.
नऊ महिने पूर्ण व्हायला आलेल्या एका स्त्रीला बाळाची हालचाल जाणवत नव्हती. तिचे आगीदारचे बाळ असेच नवव्या महिन्यात पोटात गेले होते त्यामुळे ती प्रचंड तणावाखाली होती.
सोनोग्राफी मध्ये बाळाच्या नाळेतून रक्त पुरवठा कमी होत असल्याचे आढळले. ताबडतोब अहवाल देऊन पाठवले आणि स्त्रीरोग तज्ज्ञांना फोन ही केला. दुसरी 36 वयाची स्त्री वंध्यत्वावर उपचार घेऊन (टेस्ट ट्यूब बेबी) गरोदर होती तिला थोडासा रक्तस्त्राव होत होता तिने फोन केला की प्लिज सोनिग्राफी करून द्या. तिचे स्त्री रोग तज्ज्ञ बांदर्याला आहेत. तिथे जाणे तिला शक्यच नाही.
सोनोग्राफी मध्ये दोन पैकी एकच गर्भ रुजलेला आहे हे समजले परंतु तो व्यवस्थित आहे. मंगळवारी रात्री फार अस्वस्थ होतो. दवाखाना बंद ठेवण्याचा निर्णय बरोबर नाही असे वाटत होते. शेवटी रात्री साडे तीन पर्यंत विचार करून दवाखाना उघडा ठेवण्याचा निर्णय घेतला.
सफाई कर्मचारी पोलीस लष्कर बँकेचे लोक हे काम करत आहेत तर मी स्वतःला धोका आहे म्हणून दवाखाना बंद ठेवणे म्हणजे भेकड पणा वाटत होता.
निर्णय घेतल्यावर पहाटे चार वाजता झोपलो.सकाळी घरच्यांबरोबर ताणा ताणी झाली. माझ्यामुळे आई वडिलांना संसर्ग होईल इ. परंतु मी साफ नकार दिला.
आता निर्जंतुकीकरणाचीपूर्ण काळजी घेऊन सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास दवाखाना उघडा ठेवतो आहे.
काल आज आलेले रुग्ण खरंच गरजू आणि तणावाखाली होते.
पळपुटेपणा केल्याची भावना गेली आणि
दुपारी आणि रात्री शांत झोप लागते आहे.
27 Mar 2020 - 6:50 am | चौकस२१२
याला म्हणतात जागरूक नागरिक... आपल्या कामास शुभेच्छा
27 Mar 2020 - 9:46 am | प्रशांत
+१
27 Mar 2020 - 9:36 am | चौकटराजा
डॉ खरे आपण अगदी स्पष्टवक्ते व तितकेच तळमळीचे वैद्यकीय व्यावसायिक आहात हे वारंवार कळून आलेय पण सद्य परिस्थीतीत शेवटी जीवाच्या भीतीने मैदान सोडून पळून जाणे ही शक्य आहे .तरीही आपला विवेक जागा आहे अतः वयाने मोठा असूनही माझ्याकडून साष्टांग दन्डवत !
27 Mar 2020 - 10:58 am | सुबोध खरे
साहेब,
लाजवू नका.
बाहेर साधे सफाई कर्मचारी केमिस्टकडे किराणा दुकानात काम करणारे दूधवाले सुद्धा काम करत आहेत या परिस्थितीत मी काम करतोय यात कोणतेही मोठे पण नाही.
मी कोणी असामान्य माणूस नाही
__/\__
27 Mar 2020 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्हाला तुमचा अभिमान आहे, आपण डॉक्टर आहात. योग्य काळजी घ्या.
-दिलीप बिरुटे
27 Mar 2020 - 9:45 am | प्रचेतस
हेच म्हणतो.
14 May 2020 - 8:43 pm | गणेशा
सलाम
27 Mar 2020 - 6:24 am | कंजूस
जपानच्या फुकुशिमाची आठवण करून दिलीत सर. तिथे असंच काम चालू आहे धोक्यात जाऊन.
27 Mar 2020 - 10:44 am | अनिरुद्ध.वैद्य
!!
27 Mar 2020 - 11:19 am | कंजूस
लॉकडाऊन संपला की भेटू पुण्याच्या मेट्रोमध्ये. मेट्रोतच कट्टा करायचा.
27 Mar 2020 - 11:36 am | प्रसाद गोडबोले
पहिला डाव पाहिला:
घोडा ह ६ ला गेल्या नंतर घोडा सी ३ ला घ्यायची गरज नव्हती, लागलीच ई ५ चे प्यादे खायचे आणि फ६ आले तर सोन्यावुन पिवळे डी ४ खेळायचे फ६ च्या प्याद्याने ई ५ चा घोडा खाऊ दे मग आपण आपल्या सी ३ च्या ऊंटाने ह६ चा घोडा खायचा ग७ च्या प्याद्याने आपला ह६ चा उंट खाल्ल्यास, प्रधान ह५ चे शह , राजाला झक मारत ई७ वर याचे लागते मग प्रधानाने ई५ चे प्यादे खाऊन शह मग राजाला झक मारत फ७ ला जावे लागते अन आपल्याला कोपच्यातला हत्ती फुकत मिळतो .
ओपनिंग मध्ये काळ्याने फ६ खेळल्यास ती गंभीर चुक असते अन तेव्हा पांढरा जिंकायलाच हवा !
27 Mar 2020 - 12:22 pm | प्रचेतस
हे नंतर पाहताना लक्षात येते. पण ब्लिट्झमध्ये सतत वेळेचे घड्याळ टिकटिकत असते त्यामुळे प्रत्यक्ष खेळताना बऱ्याच चुका होतात.
14 May 2020 - 8:37 pm | गणेशा
गेला बाजार, तो डाव तर शब्दात सांगायचा...
अन मला पण चेस येतो आहे..
शनिवारी रविवारी खेळ कि..
बुद्धी बळ खेळतांना पण मी बोलू शकेल, तेव्हडेच टाइम पास आणखिन..
चारोळ्या चारोळ्या कोणी खेळत नाही अजून तेच नशिब त्या शब्दांचे अन वाचकांचे