झटपट लेअर्स तिरंगा दम बिर्याणी ( चिकन )

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
28 Jan 2020 - 3:05 pm

राम राम मिपाकर्स ,
बिर्याणीच नुसतं नाव काढलं की खाणाऱ्यांच्या तोंडाला बदाबदा पाणी सुटत एखाद्या विकेंडला तिकडून ऑर्डर सोडली जाते " आज बिर्यानी होज्जाय ?
बायको सुगरण असेल तर ठीक, माझ्यासारखी असेल तर आधी कपाळावर आठ्या येतात भुवया उंचावतात " बिर्याणी म्हणजे अर्धा दिवस गेला असा एक दीर्घ उसासा टाकून ती बनवायला घेतली जाते आणि साग्रसंगीत करता करता जीव अर्धमेला होतो ती गोष्ट वेगळीच !
वर चविच एक लेबल लागलेले जे ,आपणच (लग्न नवीन असल्यामुळे )जीव ओतून कौतुकाचे ४ शब्द ऐकून घेण्याच्या उपद्व्यापायी लावून घेतलेलं असतंय तशी झाली तर ठीक नाहीतर " गेल्या वेळची भन्नाट होती अग" मग आपला एक तीक्ष्ण कटाक्ष पडल्यावर "नाही नाही ही पण मस्तच आहे बर का" असं भितीवजा कौतुक ;)
ह्यावर मग डोक्याचा किस पाडून ,आईची मदत घेऊन थोडे फार बदल करून, कमी साहित्यात जास्त तामझाम न करता सोप्यात सोपी"लेअर्स दम बिर्यानी रेसेपी " पण चवीला तितकीच अफलातून ! कधी बायकोला/ मातोश्रीला कंटाळा आला असेल तर तुम्ही पण तुमचा हात आजमाऊन घेऊ शकाल अशी बिर्याणी रेसेपी खास मिपाकरांसाठी !
विशेष म्हणजे मी ही " स्टिम कोलम " राईस पासून बनवली आहे . अगदी दाणा दाणा खिले टाईप होते :) तुम्ही बासमती वापरा तुमची चॉईस :)
चला तर मग लागा तयारीला
मी तुम्हांला साहित्य स्टेप बाय स्टेप देते म्हणजे समजायला सोप्प !
साहित्य: (माझं प्रमाण )
१.. १ किलो तांदूळ ( मी कोलम घेतलाय याला तासभर भिजवण्याची गरज नाही , तुम्ही बासमती घ्या पण मग तो किमान ३० मिनिट भिजवून घ्या बाकी कृती सेमच राहील )
२.. दीड किलो चिकन
३. आलं / लसूण पेस्ट - ४ चमचे
४. मोठे टोम्यॅटो - ४
५. मोठे कांदे -६
६. सुहाना बिर्याणी मसाला - ३ pkt ( हे १० rs मिळतात ते छोटे )
७. दही - ५ चमचे
८. लालतिखट - २ चमचा
९. गरम मसाला -२ चमचे
मॅरिनेशन करीता कृती :
चिकन स्वछ धुवून त्याला १ चमचा हळद , दही , चवीपुरते मीठ , आलं लसूण पेस्ट (२ चमचे ),एक सुहाना मसालाच पॅकेट, आणि एक चमचा लालतिखट लावून ३० मिनिट मॅरिनेशन साठी ठेवून द्यावे हातात वेळ असेल तर जास्तीत जास्त ठेवले तरी उत्तम!
आता तोवर दुसरे उद्योग करून घेऊ
वाटणासाठी साहित्य :
१. हिरव्या मिरच्या -४ ( मी लवंगी वापरलीय, तुम्ही तिखट सोयीनुसार वापरा )
२ कोथिंबीर - १ मोठी वाटी

* लेअर्ससाठी कांदा बारीक पातळ चिरून कडकडीत तेलात तळून घेणे , काजू तळून घेणे सध्या कांदा ओला असल्यामुळे नीट तळला जात नाही

कृती : एका मोठ्या पातेल्यात / कढईत पाणी उकळायला ठेवा त्यात अनुक्रमे चवीनुसार मीठ , ७-८ छोट्या इलायची , १ मोठा दालचिनी तुकडा , २-३ तमालपत्र , ५-६ लवंगा आणि तितकेच काळेमिरे , एक चमचा शहाजिरे , २ कर्णफुले , आणि दोन मोठे वेलदोडे बस्स इतकच घालून तांदूळ शिजवायला ठेवून द्या या मसाल्यांचा छान अरोमा उतरतो भातात जर तुम्हाला दाताखाली खडे मसाले आवडत नसतील तर या सर्व मसाल्यांची पोटली बनवून ती पाण्यात सोडा

आता तांदूळ शिजेपर्यन्त मॅरीनेट केलेल चिकन कुकर मध्ये घालून अगदी अर्धा ग्लास पाणी घालून ३ शिट्ट्या काढून घ्या ( आता शिट्ट्याचं प्रमाण तुमचे चिकन पीस किती मोठे छोटे यावर अवलंबून आहे )
आता तांदूळ किती शिजवावा ? लेअर बिरयानी साठी मोट्ठे मोट्ठे शेफ सांगतात ९० % शिजवा कोणी म्हणतय ७०% कोणी म्हणतंय ६०% हे असं टक्क्यानुसार शिजवणं मला अगदीच " घंटा " कळत नाही म्हणून मी काय करते भात चावून बघते अगदी किंचित कसर राहते ना म्हणजे २-३ मिनिटांनी भात होणार त्या आधीच्या लेवलला भात वेळून घ्यायचा जास्ती टक्क्या बिक्क्यांचा शॉट नाही ठेवायचा डोक्याला !

भात वेळून झालाय अन चिकन पण शिजलंय आता पुढची स्टेप
फोडणीसाठी
१. तेल मोठे - ५ चमचे (तुम्ही जास्त पण वापरू शकता )
२ तूप - ५ चमचे ( साजूक असेल तर उत्तम नसेल तर वनस्पती आहेच )
३ गरम मसाले - २-३ तमालपत्र , ४-५ लवंगा आणि तितकेच काळेमिरे , एक दालचिनी तुकडा , एक मोठा वेलदोडा ,४-५ छोटे वेलदोडे बस्स बस्स

कृती :
मोठ्या पातेल्यात /भांड्यात तेल आणि तूप एकत्र तापवून त्यात अनुक्रमे वरचे खडे मसाले , २ मोठे कांदे (पातळ चिरलेले ) छाण परतून घ्यावे त्यात उरलेली २ चमचे आले लसूण पेस्ट परतावी ,याचा कच्चा वास जाऊन एक खतरनाक सुगंध यायला लागला की , मिरची आणि कोथिंबीर चे वाटण घालून परतावे . नंतर टोम्यटो , गरम मसाला , लाल तिखटआणि उरलेले बिर्याणी मसाल्याचे २ पाकीट घालून छान परतून घ्यावे आता मीठ घालताना खबरदारी कारण भात शिजवताना आणि चिकन शिजवताना मीठ घातलं होत आपण आता चव पाहून पाहून च मीठ घालावे जेणे करून मीठ प्रमाणात टाकले जाईल आणि बिर्याणीची चव बिघडणार नाही . झाला मसाला छान परतून की त्यात शिजवलेलं चिकन घालून मस्त ५ मिनिट वाफ काढून घ्यावी म्हणजे सर्व मसाले आणि चिकन एकजीव होईल

आता शेवटची स्टेप बिर्याणी लेअर्स लावून त्याला तिला दम द्यायची
यासाठी लागेलं
१ तळलेला कांदा ( ४ मोठे कांदे पातळ चिरलेले , आपले तेच वरचे उरलेले )
२ खूप सारी कोथिंबीर आणि पुदिना (मी पुदीना नाही वापरला )
३ खाण्याचा रंग केशरी आणि हिरवा (ऑप्शनल आहे , तुम्ही गरम दुधात केशर घालून हि वापरू शकता )
४ बटाट्याचे काप
५ साजूक तूप (तुमच्या मनाप्रमाणे )
६ तळलेले काजू

आता लेअर्स कसे लावायचे
प्रथम आधी मोठं पातेलं / कढई घेऊन सर्वात खाली बटाटा काप पसरून घेऊ त्यावर भाता चा एक थर लावून घेऊ त्यावर शिजवलेलं चिकन मसाला पसरून घेउ वर तळलेला कांदा , कोथिंबीर आणि २ चमचे साजूक तूप छान पसरून घेउ अशा पद्धतीने भात आणि चिकन चे थर लावत जायचे शेवटचा थर भाताचा यायला हवा मग त्या थरावर खूप सारी कोथिंबीर , पुदीना ,तळलेला कांदा , काजु , खाण्याचा रंग आणि छानपैकी सढळ हाताने साजूक तूप पेरावे आणि घट्ट बसेल असेल झाकण ठेवून त्यावर वजन ठेवावे किंवा कडेला कणिक लावून सिलबंद करावे मी कणिक वापरत नाही एक तर ती वाया जाते आणि भांड ही खराब होत "सिल्वर फॉईल" लावणे हा बेस्ट ऑप्शन आहे
आता तवा गरम करून त्यावर १० मिनिट हाय फ्लेम वर हे भांड ठेवून द्यावं १० मिनिटांनी फ्लेम लो करावी आणि २० मिनिट अजून मस्त पैकी दम देऊन घ्यावा आपली बिर्याणी तयार आहे ,

बनवा खाऊन बघा आणि सांगा कशी आहे ते आमच्याकडे (माहेरी आनी सासरी ) ही सुपरहिट झाली आहे " याची टेस्ट बघून नवरा म्हणाला आजपर्यँत हॉटेल मध्ये बिर्याणी च्या नावाखाली काय काय खाल्लं आहे ;) यातच आल सगळं ते कवतिक :)

* ह्या सर्व कारभाराला तास ते दीड तास वेळ लागतो
* ह्याचे वाटण आदल्या दिवशी करून फ्रिज मध्ये ठेवू शकता
* चिकन मॅरीनेट करून आदल्या रात्री फ्रिज मध्ये ठेवू शकता
* गरम मसाले कमी असल्यामुळे जळजळणे वैगेरे प्रकार होत नाही
* तिखट योग्य असल्यामुळे लहान मुलं / वयस्कर पण आवडीने खातील
मुख्य म्हण्जे वेळ वाचतो त्यामुळे खानार्या बरोबर करणाऱ्यालाही मजा येईल .

आता फोटो सलग स्टेप बाय स्टेप देतं आहे

वेळुन घेत्लेला भात
a
शिज्वुन घेतलेल चिकन
b

लेअर लावताना
d

शेवट्चा थर
e
f
g
h
i

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

28 Jan 2020 - 8:22 pm | श्वेता२४

आवडली

वामन देशमुख's picture

28 Jan 2020 - 9:15 pm | वामन देशमुख

क्या कातिल बिरियानी बनाये, आपा!
शा ग़ोस होटल कू बैंगन में मिला दिये तुम्म।

पियुशा's picture

28 Jan 2020 - 9:19 pm | पियुशा

"शा ग़ोस होटल कू बैंगन में मिला दिये तुम्म।" मतलब क्या हुवा भाइजान इत्ता हैदराबादी नय आता मेरेकू ;)

वामन देशमुख's picture

29 Jan 2020 - 9:10 am | वामन देशमुख

क्या बातां कर्रे पियुशा आपा!
इत्ते अच्छे-अच्छे बिरियानीयां, पुलावां, कबाबां, जलेब्यां बनारें, होर उप्पर से ऐसा बोलरें, नई होता ऐसा.

...

शाह ग़ौस हॉटेलची चिकन बिर्याणी माझ्या मते जगातील सर्वोत्तम चिकन बिर्याणी आहे.
तुमच्या पाककृतीनं त्या बिर्याणीची कीर्ती धुळीस मिळवली (= बैंगन में मिला दिये) आहे.

मिया तुमने तो चने के झाड़ पर चढ़ा दी मेरेकू ; ) हौसला अफजाई का बहुत बहुत शुक्रिया भाईजान :)

रमेश आठवले's picture

29 Jan 2020 - 1:13 am | रमेश आठवले

आपण आपल्या वैयक्तिक माहितीत नॉन-ह्वेज सोडुन सर्व खाता असे लिहिले आहे आणि या लेखात लग्न झाल्यापासून नॉन-ह्वेज पदार्थ करता असे लिहिले आहे. कुतुहल.

मैं तो शादी से पैले से बनाती नॉन वेज :)ये मेरी अम्मा ने पैले से सीखा रक्खा मेरेकू नॉन वेज बनाना ये बोली तू नय खाती पर तेरा दूल्हा खानेवाला निकला तो क्या करेगी न ? वैसाच हुवा मेरा दूल्हा पक्का नॉन वेजटेरियन अब्बी रोज रोज होटल में कौन जाएगा ? और वैसेभी में अभी थोड़ा थोड़ा चिकन खाना स्टार्ट किया भाई :)

विंजिनेर's picture

29 Jan 2020 - 3:18 am | विंजिनेर

रंग छान खुलून आले आहेत.

१.. १ किलो तांदूळ
२.. दीड किलो चिकन

बाबौ... आमा पूरे मोहल्ले को दावत थी क्या मोहतरमा!

प्रचेतस's picture

29 Jan 2020 - 9:21 am | प्रचेतस

सुगरण पिवशी :)

शेम टू शेम... फक्त चिकन ऐवजी मटण वापरतो आणि सुहाना न वापरता मसला बनवतो

कधीतरी व्हेज बिर्याणी उर्फ पुलाव तरी बनव. तितकीच माझ्यासारख्या शाकाहारींची सोय..

पियुशा's picture

2 Feb 2020 - 8:23 pm | पियुशा

बॉर्रर्रर्रर्र !!!

मन्दरस्जोशि's picture

3 Feb 2020 - 3:57 pm | मन्दरस्जोशि

जबर्दस्त

अत्रुप्त आत्मा's picture

20 Feb 2020 - 4:26 pm | अत्रुप्त आत्मा

हम्मम्म!

मुक्त विहारि's picture

21 Feb 2020 - 7:37 pm | मुक्त विहारि

अंडी वापरते.

मला, चिकन बिर्याणी पेक्षा, मटण बिर्याणी किंवा प्राॅन्स बिर्याणी जास्त आवडते.

अर्थात, बिर्याणी घरीच बनवलेली उत्तम.