विषाणू (व्हायरस) जन्य आजार, काही प्रश्न

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
10 Feb 2020 - 11:44 am
गाभा: 

** नमनाला घडाभर **
अगदी बर्‍याच सुशिक्षीतातही विषाणू म्हणजे व्हायरस आणि जिवाणू म्हणजे बॅक्टेरीया बद्दल गल्लत होऊन विचार आणि संभाषणे भरकटताना आणि त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या आप्तस्वकीयांच्या काही आरोग्य विषयक अडचणी सोडवल्या जाणे कठीण होताना दिसते त्याचे उदाहरण पुढे देईनच पण जिवाणू म्हणजे बॅक्टेरीया आणि संबंधीत प्रतिजैविके यांची चर्चा सहसा अधिक होत असते पण या धागाचर्चेतून त्यांची गल्लत टाळून विषाणू व्हायरस आणि प्रतिकार या बद्दल अधिक माहिती मिळावी अशी इच्छा आहे.

मानवास होणारे विषाणूजन्य - व्यक्तिगणिक आणि साथ स्वरुपातील - आजार, व्यक्तींपरत स्वतःची प्रतिकारक्षमता, विषाणु प्रतिरोधके, समज गैरसमज ह्या विषयाचा आवाका बराच मोठा आहे. अर्थात यातील काही मर्यादीत संवर्गा बद्दल विषयातील जाणकार व्यक्ती डॉक्टर्स कडून अधिक सखोल माहिती मिळू शकल्यास माझ्या सारख्या सामान्य व्यक्तींस पडणार्‍या काही प्रश्नांबद्दल चर्चा करुन हवी आहे ज्यामुळे माझ्या तसेच इतरांच्या समज गैरसमजांकडे पुन्हा एकदा पहाता येईल.

मिपावर सर्वसाधारणपणे स्वाईन फ्लूच्या काळात काही चर्चा झालेल्या दिसतात. मानवी आरोग्याबद्दल संशोधन आणि विकासामुळे अगदी जन्माच्या प्रक्रीये पासून डॉक्टर्स मंडळी इंजेक्शन देऊन बालकांचे डोळे ओलावत असली तरी जराशी समज येताना एकी कडे इंजेक्शन चुकवण्याचे हाणून पाडले जाणारे प्रयत्न दुसरी कडे शालेय अभ्यासक्रमातून विषाणू - जिवाणूंबद्दलचा करवला जाणारा किमान परिचय. मोठे झाल्या नंतर एवढी सगळी इंजेक्शन घेऊनही, होणारे विषाणूजन्य आजार-साथ त्याबाबत बातम्या आणि ते होऊ नयेत म्हणून परत इंजेक्शन आणि झाल्यास उपचार. तर एकुण एक सुशिक्षीत म्हणून सगळा माहितीचा मारा होऊनही काही समज गैरसमज आणि माहितीची पोकळी शिल्लक रहाताना दिसते. एकतर अती काळजी भितीचे क्षण - वातावरण ते किरकोळीकरण आणि दुर्लक्ष अशा सायकल मधून सर्वसामान्य म्हणून प्रवास होत असतो.

*** आंजावर उपलब्ध विषाणूंची त्रोटक ओळख ***
व्हायरस : (विषाणू). संसर्गजन्य रोगांना कारणीभूत होणाऱ्या अतिसूक्ष्म रोगकारकांचा मोठा गट. न्यूक्लिइक अम्लाचा गाभा व त्याभोवतीचे प्रथिनाचे आवरण (कवच) अशा रचनेचे हे रोगकारक सर्व प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजंतू यांमध्ये महत्त्वाचे विविध संसर्गजन्य रोग निर्माण करू शकतात. (संदर्भ मराठी विश्वकोश)

सर्वात महत्वाचे व्हायरस (विषाणू) हा गट जिवाणू (बॅक्टेरीया) गटापासून प्रभाव आणि उपचारांच्या दृष्टीने भिन्न आणि वेगळेपणाने गैरसमज रहीत आकलन करुन घेण्याच्या दृष्टीने महत्वाचा असतो. (माझे मत)

प्रजननासाठी सजीव कोशिकांवर (पेशींवर) पूर्णतया अवलंबून राहाणे व स्वतंत्र चयापयाचा (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींचा) अभाव ही यांची खास वैशिष्टे आहेत. म्हणून व्हायरस हे अतिशय साधे सूक्ष्मजीव किंवा अतिशय गुंतागुंतीचे रेणू मानले जातात. व्हायरस हे न्यूक्लिइक अम्लाचे रेणू असून ते सजीव कोशिकांमध्ये घुसू शकतात तेथे आपल्या प्रतिकृती निर्माण करू शकतात आणि आपले संरक्षक आवरण तयार करण्याची क्षमता असलेल्या प्रथिनांसाठी सांकेतिक लिपी तयार करू शकतात. या अतिसूक्ष्म रोगकारकांच्या अध्ययनाला व्हायरॉलॉजी किंवा विषाणुविज्ञान म्हणतात. -( संदर्भ मराठी विश्वकोश)

जैव गुणधर्म : कोशिकेबाहेर व्हायरसला स्वतंत्र चयापचय नसून त्याचे स्वयंप्रजनन होत नाही. फक्त सजीव कोशिकेत चयापचय आणि प्रजनन हा व्हायरसचा एक ठळक जैव गुणधर्म आहे. त्यात सुद्धा ग्रहणशील कोशिकेतच याची वाढ होते. यावरून फक्त पोषणासाठीच कोशिकांचा मर्यादित उपयोग ते करीत नाहीत, उलट त्या आश्रय कोशिकेमुळॆ संबंधित व्हायरसला पूर्णत्व येते, हे स्पष्ट होते. काही व्हायरस सुप्तावस्थेत कित्येक पिढ्यांपर्यंत राहू शकतात. पाश्चिरीकरणाच्या तापमानाला (६१० से., ३० मिनिटे) व्हायरस मरतात. काही तर ५६० से.ला मरतात. याला कावीळ रोगाचा व्हायरस मात्र अपवाद आहे. ते पाण्यच्या उत्कलनबिंदूवरही काही मिनिटे तग धरू शकतात. शीत तापमानाचा मात्र व्हायरसावर अनिष्ट परिणाम होत नाही. निर्वात शुष्क स्थितीत व्हायरस दीर्घ काळापर्यंत जतन करून ठेवता येतो. (संदर्भ मराठी विश्वकोश)

*** या चर्चेच्या परिघाची मर्यादा ***
काही विषाणूंचे अनुवंशिक तसेच लैंगिक संक्रमण हा स्वतंत्र मोठा विषय आहे तो अनुषंगिक ठरुन अत्यावश्यक झाल्यासच चर्चा करावा अन्यथा चर्चा उर्वरीत प्रकारच्या म्हणजे प्राणी / पर्यावरण ते मानवी आणि नंतर हवा तसेच अनाहुत स्पर्श कपडे वस्तु यांच्या मार्फत होणारे पसरणारे विषाणू संसर्ग याबाबत चर्चे केंद्रीत असावी अशी इच्छा आहे.

** काही अनुभव आणि माझे प्रश्न **

१) मला स्वतःला लहानपणी कांजण्यांचा आजार होऊन गेला. ( ज्यांना एकदा कांजण्या होऊन गेल्या त्यांना तोच विषाणू शरीरात अनेक दशके सुप्तावस्थेत राहून नैसर्गिक प्रतिकार शक्ती कमी झाल्या नंतर -सहसा पन्नाशी नंतर- नागीण म्हणजे शिंगल्स च्या स्वरुपात उलटतो असे कालच ऐकले आणि वाचले)

१.१) कांजण्या विषाणूंचा प्रादुर्भाव पहिल्यांदा होतो तेव्हा कसा होतो ? स्पर्शाने ? कांजण्या अथवा नागीण झालेल्या व्यक्तीच्या तोंडातून बाहेर पडलेल्या शिंका तुषार ते हवेतून श्वसना वाटे ? किंवा त्यांच्या खपल्यांमर्फत ? वापरलेल्या कपड्यांमर्फत ? एकमेकांचा साबण वापरल्याने ? अनुवंशिक ? कि इतर काही माध्यमाने ?

१.२) कांजण्या विषयक प्रतोरोधक लसींचा प्रभाव कालावधी किती असतो ? लहानपणी कांजण्या झाल्या होत्या की नाही किंवा कांजण्या प्रतिरोधक लस घेतली होती की नाही हे लक्षात नसलेल्यांनी आणि कांजण्या होऊन गेलेल्यांना मोठेपणी नागीण होऊ नये म्हणून काय काळजी किंवा लसीकरण करता येऊ शकेल ?

२.१) माझ्या एका आत्ये बहीणीचे लहानपणी टिबी नसतानाही डॉक्टरांकडून तसे चुकीचे निदान होऊन चुकीची औषधी दिली गेल्याने वाचा आणि त्वचेवर अनाठायी दुष्परीणाम प्रदीर्घ काळाने दूर झाल्याचे पाहीले
२.२) दुसरीकडे बर्‍याच मोठ्या लोकसंख्येत टिबीचा प्रादुर्भाव सुप्तावस्थेत असतो असे ऐकुन आहे.

२.३) इतरही असंख्य विषाणू व्हायरस शरीरात सुप्तावस्थेत असतात आणि प्रतिकार कमी असलेल्या व्यक्तीपर्यंत संक्रमीत झाल्यानंतर प्रभाव दाखवतात असे ऐकुन आहे.

२.४) प्रत्यक्षात रुग्ण डोक्टर कडे गेल्यानंतर अथवा अगदी हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट झाल्यानंतरही प्रत्यक्ष नेमके विषाणू अथवा जिवाणू कोणते याचे शास्त्रीय चाचणी आधारीत निदान, तो रुग्णापर्यंत कसा पोहोचला असेल आणि इतर कुणाकडे पोहोचला असण्याचा साथ चालू असण्याची चर्चा करताना डॉक्टर दिसत नाहीत. अशी अपेक्षा करणारा मी चुकतोय की आरोग्य सुविधा आणि व्यवस्था कमी पडत आहेत ? नेमक्या कोणत्या विशीष्ट विषाणू अथवा जिवाणूची बाधा झाली हे समजण्याचा माहितीचा आधिकार रुग्णास का असू नये ?

२.५) ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे त्यांना विषाणूंचा त्रास अधिक होतो हे खरे असेल प्रतिकार शक्ती कमी असलेले आणि विषाणू बाधीतांना वेगळे रहाण्यास साहाय्यक व्यवस्थांवर विचार होताना का दिसत नाही ?

२.६) - तर कँसर / फुफ्फुस-अस्थमा सारख्या गंभिर स्थिती आजारी व्यक्तीसोबतच्या अटेंडंट किंवा सोबतच्या व्यक्तींना शक्यतोवर विषाणू बाधा शक्यतो असू नये या बद्दल मेडीकल अ‍ॅडवायजरी सूचनांचा अभाव का दिसून येतो अशा सूचनांचा अभाव खरेच योग्य आहे का ?

३) माझ्या एका अस्थमाग्रस्थ परिचितांचा -दोनदा आयसीयू पर्यंतची वारी होऊनही- आयुर्वेद वैद्यांवर खूप विश्वास आणि अ‍ॅलोपॅथीवर (साईडैफेक्ट्सच्या भितीमुळे ) अत्यंत अविश्वास आहे. परिणामी व्हायरल बॅक्टेरीअल प्रादुर्भावाचा मोठा कालावधी आंगावर काढला जाऊन थेट आयसीयू गाठण्याची वेळ आली असण्याची शक्यता वाटते.
३.१) नैसर्गिक प्रतिकारशक्तीत भर घालू शकेल अशा कोणत्या आयुर्वेदीय प्रथांवर अ‍ॅलोपॅथीस मान्य असलेले काही संशोधन झाले आहे का ?
३.२) विषाणू जन्य आजार बाबत अ‍ॅलोपथीचे कोणते किमान संशोधन, चाचण्या आणि उपचार आयुर्वेदाने स्विकारणे गरजेचे आहे ?

४) मला व्यक्तीश: माझ्या कफाचे दोन स्तर जाणवतात एक सुप्त माईल्ड कायम स्वरुपी जाणवतो दुसरा प्रत्येक सिझन बदलाला अवघडस्थिती सायनस.
४.१) मी माझ्या सुप्त माईल्ड अवस्थेत घशात येणार्‍या कफाबद्दल डॉक्टरांना विचारतो तेव्हा स्टेथस्कोप लावून छातीत कफ नसल्याचे सांगतात पण मग सायनस क्लिअर असते मग हा विषय नेमका कोणत्या विशेषज्ञाच्या कक्षेत येतो फुफ्फुस / छाती की नाक कान घसा ?

४.२) सुप्त आणि सिझनल या दोन्हींनी त्रस्त होऊन मी एका एम.डी. डॉक्टरांचा सल्ला घेतला तर त्यांच्या मते आधी व्हायरल आणि मग बॅक्टेरीअल अशी सहसा स्थिती असते म्हणून एकदा कफ पूर्ण क्लिअर झाला की वार्षीक स्वरुपाची अँटी व्हायरल इंजेक्शन घ्यावे ज्यामुळे त्रस्त स्थिती पासून अधिक चांगला बचाव होऊ शकेल - पण नित्याच्या फॅमिली डॉक्टरच्या म्हणण्यानुसार मी एकदा कफ गेल्या नंतर अँटी अ‍ॅलर्जी औषधे घेणे अधिक उत्तम आणि पुरेसे असावे. (मी प्रत्यक्षात दोन्ही केलेले नाही) यातील अधिक उत्तम मार्ग कोणता

५) व्यक्तीगत प्रतिकारशक्ती चांगली आहे हे तपासण्यासाठी कोण कोणत्या चाचण्या उपयूक्त ठरू शकतात.

५.१) व्हाईट ब्लड सेल, प्लेटलेट, आयर्न, बी १२ यांचा प्रतिकारशक्तीशी संबंध असतो का ? चाचणीतून तो कसा अभ्यासला जातो ? आयर्न, व्हाईट ब्लड सेल, प्लेटलेट व प्रतिकारशक्ती हे उत्तम राहण्यासाठी उत्तम आहार कोणता ? आयर्न लेव्हल आणि व्हायरल इन्फेक्शन या संबंधाने माझा डोक्यात काही गोंधळ समज-गैरसमज असण्याचा संभव आहे असे वाटते आहे अधिक माहिती झाल्यास उत्तम.

६) विषाणू जन्य आजारातून बरे होऊ लागलेल्या व्यक्तीने किती काळ पब्लिक संपर्क टाळलेला इतरांना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून टाळलेले सयुक्तीक असू शकते.

७) तंबाखू खाणार्‍यांमध्ये थुंकण्याचे प्रमाण बरेच दिसते - त्यांच्या थुंकीतून विषाणूंचा प्रसार होऊ शकतो का ? तंबाखु उत्पादन आणि उपलब्धतेवर बंदी असणे सयुक्तीक असू शकते का?

८) रस्त्यावरुन चालताना नाका घशातील कफ थुंकण्याची अथवा अप्रीय दृश्य पाहील्या नंतर थुंकण्याची अनेकांना सवय दिसते -मिपाकरांपैकी अशी सवय कुणास आहे का? असल्यास मोकळेपणाने सांगितल्यास त्यांच्या अडचणी समजून घेणे सुलभ होईल- थुंकण्याच्या मार्गाने विषाणूंचा प्रसार होतो का ? त्यांना त्यांची थुंकण्याची सवय आणि कफ टाळण्यासाठी नेमके काय करता येऊ शकेल?

९) प्राणी - मानव सहसंबंधातून विषाणू प्रसार कसे होतात ? प्राण्यांना हाताळणार्‍यांनी प्राण्यांना खाणार्‍यांनी आणि त्यांच्या सहवासातील लोकांनी विषाणू संसर्ग होऊ नयेत आणि पसरु नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी.

१०) एकमेकांचा साबण वापरला गेल्याने विषाणू संसर्ग पसरु शकतात का?

११) विषाणूंचा अधिक प्रसार होऊ नये म्हणून कफाचा त्रास होताना (शिंका खोकला इत्यादी वेळी) हात रुमाल वापरणे अधिक सयुक्तिक की पेपर नॅपकीन वापरणे अधिक सयुक्तीक.

१२) डोक्टर किंवा हॉस्पीटल केमीस्ट शॉप मधून विषाणूंची देवाण घेवाण फारशी नसल्याचे गृहीत धरले जाते हे गृहीतक प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना कसे लागू पडते ?

१३) हँड सॅनिटायझर हे विषाणूंवरही प्रभावी असतात की केवळ जिवाणूंवरही प्रभावी असतात, हँड सॅनिटायझरची नेमक्या उपयूक्ततात आणि मर्यादा कोणत्या ?

१४) लोक बर्‍याचदा विषाणू (व्हायरस) आणि जिवाणू ( बॅक्टेरीया) यांची गल्लत करताना दिसतात यामुळे उपचार घेताना करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, विषाणू (व्हायरस) आणि जिवाणू ( बॅक्टेरीया) यांची गल्लत जनमानसातून कमी कशी करता येऊ शकेल ?

१५) विषाणू बाधीत व्यक्तींचा रहाणे वावर झालेल्या जागा आणि परिसर तसेच कपडे आणि वस्तुंचे निर्जंतुकरण निर्विषाणूकरणाचे काही प्रभावी मार्ग उपलब्ध असू शकतात का ? असतील तर कोणते ?

१६) विषाणू बाधीत व्यक्तींचा वावर झालेल्या परिसरात किती अंतर आणि किती कालावधी पर्यंत विषांणूंचा प्रभाव असण्याची शक्यता असू शकते? कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तिंनी माहित असलेल्या आणि माहित नसलेल्या परिक्षेत्रात आपल्याला विषाणू बाधा होण्याची शक्यता कमी राहण्याच्या दृश्टीने कोणती काळजी अथवा प्रतिबंधात्मक उपाय करणे श्रेयस्कर असू शकते?

१७) गर्भार स्त्रीया, बाळंतीण, नवजात बालके, पाळणा घरे, शाळा, कार्यालये, गर्दी व प्रवास या बाबत विषाणू प्रसार टाळण्याच्या दृष्टीने कोणत्या काळजी घेतल्या जाव्यात?

* शेवटचा प्रश्न : शेवटी पण कमी महत्वाचा नसलेला, ज्या विषाणू आजारांबद्दल लसीकरण उपलब्ध नाही, असूनही लसीकरण केले गेले नाही आणि औषधे उपलब्ध नाहीत त्यांचा प्रतिकार करण्यास सध्या कोणत्या आदर्श पद्धती अवलंबल्या जातात / जाव्यात ?

* अजूनही प्रश्न आहेत ते आठवतील तसे जोडतो. इतरांनीही त्यांना वर नमुद परिघासंदर्भाने प्रश्न पडत असतील तर ते विचारावेत काळाच्या ओघात जाणकार आणि डॉक्टरांकडून उत्तरे मिळती अशी विनंती आणि अपेक्षा.

* अनुषंगिका व्यतरीक्त विषयांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन व्याकरण चर्चा टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

** मिपा बाह्य आंतरजालीय दुवे **

* मराठी विश्वकोश https://vishwakosh.marathi.gov.in/33193/

** काही जुन्या मिपा चर्चा दुवे **

* व्हिटॆमिन बी काही प्रश्न माहितगार https://www.misalpav.com/node/35981
* प्रतिजैविके समज आणि गैर समज सुबोध खरे https://www.misalpav.com/node/36588
* थैमान जयंत माळी -स्वाईनफ्लू काळजी https://www.misalpav.com/node/30593
* व्हायरस हंटर - हारून शेख - नॅथन वूल्फ यांचे प्राणीतेमानव विषाणू संक्रमण संशोधन https://www.misalpav.com/node/22313
* स्वाईनफ्लू चा विळखा - विसोबाखेचर चर्चा धागा https://www.misalpav.com/node/8891
* काही वैज्ञानिक प्रश्न सुरवंट विषाणूंचे पूर्णसजीवात उत्क्रांती काहोऊशकलीनाही https://www.misalpav.com/node/34898
* डुक्करताप मीआणिघबराट अनुभव वर्णनलेख प्रसन्नकेतकर https://www.misalpav.com/node/8971
*भय इथले संपत नाही अभिज्ञ स्वाईनफ्लू चर्चा https://www.misalpav.com/node/8929

* करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019) डॉ. सुबोध खरे

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

14 Feb 2020 - 12:53 pm | जालिम लोशन

जे जे होईल ते ते पहावे शांत चित्त.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Feb 2020 - 1:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि चर्चा व्हावी.

-दिलीप बिरुटे

kool.amol's picture

15 Feb 2020 - 1:46 pm | kool.amol

तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक स्वतंत्र धागा आवश्यक आहे मी एखादी मालिका सुरू करू शकतो. मी स्वतः विज्ञान विषयात लिखाण करतो. koolamol.wordpress.com हा माझा ब्लॉग आहे. इथे काही माहिती नक्की मिळेल.

कंजूस's picture

15 Feb 2020 - 2:27 pm | कंजूस

सर्दी खोकला हे शरीराची धुळीसाठीची संरक्षक योजना आहे ना? कफात तो कचरा लगडून शरीरातल्या नाजूक कोषांना वाचवले जाते.
गरम पाणी हाच उपाय असतो. त्या जागेपासून दूर जाणे आवश्यक असते पण आपण जात नाही.
त्यावर प्रतिजैविके उपाय चुकीचा असणार. टिबीचा खोकला हा वेगळा असतो.
पण त्या अनाठायी प्रतिजैवकांनी सुप्त विषाणु जीवाणू सोकावतात, कोडगे होतात आणि ते पुढे कशालाच दाद देत नाहीत. औषध हे औषध राहात नाही.

असो. विषय फारच मोठा आहे.

माहितगार's picture

15 Feb 2020 - 3:06 pm | माहितगार

विषाणु = जीवाणू अथवा नव्हे इतर विषाणु प्रतिरोधके = जीवाणू प्रतिजैविके नव्हे
जन सामान्यांकमध्ये दोन्हींना एकाच पारड्यात / बास्केटमध्ये टाकण्याची उपरोक्त गल्लत टाळणे आणि या धाग्यापुरते विषाणु व त्यांची प्रतिरोधके यावर अधिक फोकस असावा असा या धागा चर्चेचा उद्देश कारण मिपावर त्यांची चर्चा कमी झाली आहे.

आनन्दा's picture

16 Feb 2020 - 10:45 am | आनन्दा

टीबी जिवाणूंमुळे होतो अशी माझी मर्यादित माहिती सांगते

कंजूस's picture

16 Feb 2020 - 7:14 am | कंजूस

जे काय औषध असेल त्यांचा गैरवापर किंवा अतिरेक वापर फार होत असावा.

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Feb 2020 - 11:41 pm | अनिरुद्ध.वैद्य

वस्तू इम्पोर्ट केला तर करोना व्हायरस प्रसार त्या मधून होऊ शकेल काय?

माहितगार's picture

17 Feb 2020 - 7:35 am | माहितगार

आपला प्रश्न अवांतर नव्हे अनुषंगिकच आहे. जाणकार आणि तज्ञांच्या प्रतिसादांची प्रतिक्षा करुया.

धागा चर्चेस अनुषंगिक प्रश्न उपस्थित करण्याबद्दल अनेक आभार

चौकटराजा's picture

18 Feb 2020 - 7:13 pm | चौकटराजा

अशी माहिती मिळत आहे की ,पेशी विना याची मारकता अर्ध्या तासात नष्ट होते ! चीन देशातून वस्तू भारत देशात यायला यापेक्षा जास्त वेळ नक्कीच लागतो. सर्वसाधारण पणे व्हायरस असलेल्या जागी लागलेला हात नाकात किंवा तोंडात गेला की व्हायरस चा प्रवेश शरीरात होतो . सबब सतत हात धुवा व भरपूर पाणी प्या असा सल्ला दिला जातो. माणूस हा व्हायरसचा वाहक आहे वस्तू नव्हे ! कारण व्हायरसला " जगायला " पेशीप्रवेश आवश्यकी आहे !

व्हायरस हे जीव नव्हेत हे प्रथम समजून घेतले पाहिजे . सामान्य लोक हे दोन्ही एकमेकांना परस्पर पर्याय म्ह्णून वापरतात हे भयानक आहे ! व्हायरस हे जेनेटिक मटिरिअल असलेले एक युनिट आहे ! पेशी त्याना आत येऊ देतात म्हणून ते प्रवेश करू शकतात. त्यामुळे ठराविक व्हायरस हे ठराविक पेशीमध्येच शिरू शकतात असे माझे तरी वाचनात आहे .त्यावरची प्रोटीनची टोपी ते बदलण्यात माणसाच्या एकाद्या प्रगत संशोधन केन्द्राला मागे सारतील इतके ते हुशार असतात . कारण त्यांना तितकेच येते . एखादे इन्फकेशन व्हायरल आहे की बॅकटिरिअल यात डॉ लोकांत देखील फारसा आत्मविश्स्वास मला तरी दिसून आलेला नाही. सर्व ट्रायल एरर वर चालते. व्हायरस हे पेशीत शिरकाव होण्यापासून वंचीत राहिले तर बरेचसे व्हायरस " मारकता" अर्ध्या तासात गमावून बसतात असे ही एक डॉ म्हणतात ! एअर बॉर्न( हवेतून पसरणारा ) व्हायरस हा सर्वात धोकादायक समजाला जातो. त्यांचे म्हणे " मारकता " व संक्रमिकता असे निकष धरून सात एक पातळ्यांमध्ये वर्गीकरण होते .

त्यांची प्रोटीनची टोपी "वाचून " तिला बिघडवणे यासाठी प्रतिकार शक्तीला काही वेळ संशोधनास आवश्यक असतो. सबब एका तासात ताप उतरला तसा व्हायरस निष्प्रभ लगेच झाला असं होत नाही. यावरचे पुस्तक " बॉडी ऍट वॉर " वाचून खूप काळ लोटला असल्याने कदाचित एखादा मुद्दा भरकटला असेल.

मला जे थोडेफार समजले ते वर दिले आहे.

Nitin Palkar's picture

15 Mar 2020 - 7:39 pm | Nitin Palkar

७) तंबाखू खाणार्‍यांमध्ये थुंकण्याचे प्रमाण बरेच दिसते - त्यांच्या थुंकीतून विषाणूंचा प्रसार होऊ शकतो का ? तंबाखु उत्पादन आणि उपलब्धतेवर बंदी असणे सयुक्तीक असू शकते का?
: राजकीय इच्छाशक्ती असल्यास हे अशक्य नक्की नाही हे वैम. काही वर्षांपुर्वी मुंबईत रेल्वे स्थानकांवर सर्रास तंबाखू, सिगारेट, गुटखा मिळत असे, लोकल आणि थेट गाड्यांमध्ये धुम्रपान चालत असे. आता ते पूर्णपणे बंद आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांपासून कराद्वारे मिळणारी रक्कम आणि या पेक्षा अधिक महत्वाचे इतर विषय यांमुळे गुटखा, तंबाखू, सिगारेट बंदी होत नाही.
८) रस्त्यावरुन चालताना नाका घशातील कफ थुंकण्याची अथवा अप्रीय दृश्य पाहील्या नंतर थुंकण्याची अनेकांना सवय दिसते -मिपाकरांपैकी अशी सवय कुणास आहे का? असल्यास मोकळेपणाने सांगितल्यास त्यांच्या अडचणी समजून घेणे सुलभ होईल- थुंकण्याच्या मार्गाने विषाणूंचा प्रसार होतो का ? त्यांना त्यांची थुंकण्याची सवय आणि कफ टाळण्यासाठी नेमके काय करता येऊ शकेल?
: मी स्वतः काही काळ तंबाखू, गुटखा, तंबाखू पान अथवा सिगारेट या पैकी कोणतेही एक अथवा दोन व्यसने आळीपाळीने करत होतो. त्या वेळेस थुंकणे जास्तीतजास्त टाळत होतो, तरी कधीतरी रस्त्याच्या कडेला पिंक टाकण्याची वेळ यायचीच. त्या वेळेस मनात अपराधीपणाची भावना येत असेच... अखेर मनाचा दृढ निश्चय करून प्रयत्नपूर्वक तंबाखू सोडला.
रस्त्यांवर न थुंकण्यासाठी लोक शिक्षण आणि कठोर शासन या बाबी आवश्यक आहेत असे वाटते.