-© रोहित समुद्र
भारतात क्रिकेट हा धर्म झाला असल्यामुळे क्रिकेट मधून एखादा खेळाडू निवृत्त्त होण्या पूर्वी लोक त्याला निवृत्त करतात ही एक फार मोठी शोकांतिका आहे , अशीच शोकांतिका एका क्रिकेट पटू च्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल तो क्रिकेट पटू म्हणजे महेंद्र सिंह धोनी , ज्याने भारतीय क्रिकेट मधे सगळ्याच बाबतीत विशेषतः यष्टीरक्षण आणि कर्णधारपद या बाबतीत एक नवी जान आणली. त्याच्या पूर्वी अनेक चांगले क्रिकेटर भारतात होऊन गेले, पण अशक्य अश्या गोष्टी करण्यात ज्याचा हातखंडा होता असा बहुत करून हा एकच मला वाटतो. कारण जे त्याने २००७ मधे वीस षटकांच्या सामन्याच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये करून दाखवल ते थक्क करणार आहे. कारण ह्याच्या पूर्वी भारतात कसोटी क्रिकेट आणि एक दिवसीय ह्या पिढीतले क्रिकेटर होत होते आणि एकदम भारतापुढे ह्या छोट्या फॉरमॅट मधल्या विश्वचषक स्पर्धेचे आव्हान उभ राहील. सगळ्यांची पळापळ झाली ऐन वेळेला काही मोठ्या खेळाडूंनी स्पर्धेत उतरायची नापसंती दर्शवली निवड समिती पुढे पेच उभ राहिला गांगुली ने ही कर्णधारपद नाकारले तेंव्हा धोनी नी एक उपाय सुचवला की आपण देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगले कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना एक संधी देऊन बघू. निवड समिती ने ही धोनीची गोष्ट मान्य केली आणि संघ निवडीला प्रारंभ झाला बाकीच्या संघांच्या तुलनेत तेंव्हा भारताचा संघ फारच नवखा होता फक्त काही अनुभवी दोन तीन खेळाडू सोडले तर बाकीचे खेळाडूंना फार ह्या फॉरमॅट ची सवय नव्हती. संघ मधल्या कोणत्या ही खेळाडूला एका पेक्षा जास्त सामने खेळण्याचा अनुभव नव्हता . दुसऱ्या देशांमधील खेळाडू हे तुलनेने जास्त वीस शतकांचे सामने खेळले होते , म्हणून भारतीय संघ हा तेंव्हा विश्वचषक जिंकेल असे क्रिकेट मधील तज्ञ माणसांना ही वाटले नवते. पण साऊथ आफ्रिके मधे पाकिस्तान ला हरवून केवळ धोनी होता म्हणून ही विश्वचषक जिंकण्याची कामगिरी भारत करू शकला.भारत एक दिवसीय सामन्यांचा विश्वचषक हरल्यानंतर सगळ्यांनीच खांदे टाकले होते पण धोनी नी त्यांच्यात एक नवे प्राण फुंकले आणि कामगिरी फत्ते करून दाखवली
जेंव्हा विश्वचषक भारतात होणार होता तेंव्हा बरोबर परिस्थिती उलटी होती , भारतीय संघावर विश्वचषक विजयाचे दडपण होते कारण घरच्या प्रेक्षकांचे प्रत्येक मैदानावर दडपण होतेच. तेंव्हा धोनी नी त्याच्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी कर्णधारपद भूषवताना केली. इंग्लंड चा सामना वगळता सगळे बहुतेक सामने भारताने जिंकले , आणि विश्वचषका च्या उपांत्य सामन्यात धडक मारली , विशेष म्हणजे पाकिस्तानला पाचव्यांदा धूळ चारण्याचा पराक्रम धोनी च्या सेनेनी केला. लोकांना म वाटल की ह्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याला हरवल आता विश्वचषक आला नाही तरी चालेल तरीही भारतीय टीम गाफील राहिली नाही उप उपांत्य फेरी मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान बरोबर सामना होता आणि नुकताच युवराज सिंग ला कॅन्सर आहे अस डॉक्टरी रिपोर्ट सांगत होते इथे धोनी चा खरा कस लागला कारण त्याला टीम इंडियाचा समतोल बिघड व्हायचा नव्हता म्हणून ही गोष्ट त्याने प्रशिक्षक आणि काही ठराविक खेळाडू सोडले तर कोणाला कळू दिली नाही. इथे धोनी चे वेगळे पण सिद्ध होते , आणि एकदाची टीम इंडिया ही फायनल पर्यंत पोचली . अंतिम सामन्यात गाठ ही श्रीलंकेशी होणार होती , धोनी नी श्रीलंकेला हल्केत घेतल नाही पहिल्या इनिंग मधे श्रीलंकेने एक २७४ चे लक्ष ठेवले होते ते फार कमी ही आणि जास्ती ही नव्हते आणि सुरवाती चे खेळाडू पटापट बाद झाल्यावरही धोनी ने संयमी ९१ धावांची खेळी करून शेवटच्या चेंडू वर सिक्स मारून भारताला विश्वचषक जिंकला होता. तेंव्हा साऱ्या भारतीयांनी एप्रिल मध्ये दिवाळी साजरी केली होती लोक रात्री दहा साडेदहा च्या सुमाराला रस्त्यावर गाणी लावून नाचत होते , केक तर इतके लोकांनी कापले त्याचा खच फार रस्त्यावर दिसत होता हे साहजिकच होते कारण धोनी नी अठ्ठावीस वर्षांनी ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती मी त्या विश्व चषकाचा कोणताही सामना बघितला नाही पण अंतिम सामना मात्र बघायचा सोडला नाही.
एक महत्वाचा धोनी चा पैलू म्हणजे यष्टीरक्षण करणं आधी जेवढे यष्टी रक्षक होऊन गेले त्यात बर्याच प्रमाणात चपळाई ची कमी दिसत होती कारण तज्ज्ञांच्या मते साधे साधे झेल ही आधीचे यष्टी रक्षक सोडत होते, पण धोनी च्या येण्यामुळे विकेट मागे एक नवी जान आली तसेच जेंव्हा सामना सुरू असतो तेंव्हा एखाद्या बॉलर ची कामगिरी सुमार होतेच त्याला धीर देणे हे विकेट मागून प्रामुख्याने धोनी करायचा नंतर च्या काळात जेंव्हा डी आर एस ही अंपायर ला धडकी भरवणारी सिस्टिम सुरू झाली तेंव्हा सरा संघ हा धोनी कडे जायचा कारण सहसा धोनी चे लेग बिफोर चे निर्णय चुकायचे नाहीत. एकदा डी आर एस घेतला की बॅटिंग करत असलेला फलंदाज हा मान खाली घालून ड्रेसिंग रूम कडे हताश नजरेने बघायचा कारण त्याला माहित असायचं की विकेट्स मागे धोनी आहे अपल काही खरं नाही. धोनी सारखे अनेक समकालीन यष्टी रक्षक वेगवेगळ्या देशांचे होऊन गेले पण अनेक बाबतीत म्हणजे झेल , डी आर एस , बॅटिंग , कर्णधारपद ह्यात धोनी च्या तोडी चा कोणी नाहीये
आज धोनी भारतीय संघात स्थान मिळवत नाही त्यामुळे तो टीकेचे लक्ष बनत चाललेला आहे. बरीच उलटी सुल्ट्टी चर्चा धोनी च्या बाबतीत लोक करतात. कारण भारतीय क्रिकेट फॅन्स हे दोनच ठिकाणी संघाला स्थान देतात जिंकले तर डोक्यावर चढवतात आणि हरले तर पायदळी तुडवतात हे काही योग्य नाही . धोनी हा त्याच्या उमेदवारी च्या काळात रेल्वे मधे नोकरी करायचा रांची सारखं छोट गाव हे त्याचा कर्तृत्वामुळे उजळून निघालं आहे पूर्वी ही मुंबई , दिल्ली , कलकत्ता ही क्रिकेट ची पॉवर सेंटर्स म्हणून ओळखली जायची पण धोनी नी ही संकल्पना पूर्णपणे बदलून टाकली त्यानंतर भारतातल्या खेडो पाड्यातून लोकांचा क्रिकेट कडे ओढा वाढू लागला . मला धोनी घड्याळा मधील बरावर जेंव्हा दोन्ही काटे येतात त्याप्रमाणे वाटतो म्हणजे आगे भी जाने ना तू आणि पीछे भी जाने ना तू कारण धोनी हा आत्ताच्या करंट टीम च्या परफॉर्मन्स कडे लक्ष देतो. आणि आहे तो संघ बांधून कोणत्या ही स्पर्धेला सामोरे जातो एका लढ्वय्या प्रमाणे तेंव्हा तो मला वाटतो. म्हणून आपणच त्याच्या निवृत्त्ती ची चर्चा न करता त्याच्या वरच सोपवा व त्याला जेंव्हा मनातून वाटेल तेंव्हा तो नक्की नीवृत्त्ती चा विचार करीन . तो पर्यंत मात्र मीडिया नी संयम ठेवणं ही योग्य गोष्ट आहे
प्रतिक्रिया
13 Feb 2020 - 9:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण... प्रतिसादासाठी रुमाल टाकून ठेवतो.
-दिलीप बिरुटे
14 Feb 2020 - 1:17 am | गामा पैलवान
युवराज सिंगांचे वडील योगराज सिंग यांचं धोनीबद्दलचं हे मत आठवलं : https://www.youtube.com/watch?v=CBwsJyS0KOg
योगराज सिंगांचं म्हणणं मला प्रथमदर्शनी तरी पटतंय. ते जर खरं असेल तर धोनीचं पुनरागमन अशक्य आहे.
-गा.पै.
17 Feb 2020 - 12:45 pm | अमरेंद्र बाहुबली
काय कौतुक त्या खेळाचं आणि धोनीचं₹ इनमिन सहा सात देश( भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, आणी मेल्यात जमा झालेला वेस्ट इंडिज) हा भंगार खेळ खेळतात. इतकंच टॅलेंट दाखवायचय तर फुटबॉल मध्ये निदान क्वालिफाय होऊन दाखवा. विश्वचषक दुरच.
क्रिकेटला भारताबाहेर कुत्रं विचारत नाही हे मारियाबाई शारापोव्हाने "कोण तो सचिन तेंडुलकर, मला नै माहीत बाई असा कोणी" बोलुन हे सिद्ध केलंच.
कायबते कौतुक धोनी म्हणे, तेंडुलकर म्हणे.
17 Feb 2020 - 12:52 pm | अमरेंद्र बाहुबली
https://www.misalpav.com/node/40630
हे घ्या.
तसही धोनी म्हतारा झालाय. न्यूझीलंड बरोबर सेमिफायनल हरवली worldcup 2019 ची ते पाहिलंच जगाने. कसा थकले सारखे शॉट मार्ट होता आणी एकेक दोन दोन रन काढत होता सिक्स चौके मारायचे सोडून. एकंदरित हा स्वतः निवृत्ती घेईल ह्याचे कुठलेच लक्षण दिसत नाहीये. Bcci ने लवकरच काढावा बाहेर. गांगुली आहेच.
17 Feb 2020 - 1:36 pm | महासंग्राम
गांगुली बदला घेणारच, ज्या पद्धतीने धोनीच्या कारकिर्दीच्या सुरवातीला त्या काळच्या सिनियर्स ना बाहेर काढलं, तसेच याला पण बाहेर काढलं जाईल
सबका बदला लेगा तेरा गांगुली
17 Feb 2020 - 2:14 pm | अमरेंद्र बाहुबली
आठ देशात वर्ल्डकप होतो म्हणे ;)
20 Feb 2020 - 11:52 am | शशिकांत ओक
गॉल्फ, क्रिकेट हे पुर्वीपासूनचे इंग्रजांचे टाईमपास करायचे साधन म्हणून सुरु झाले. सर्व्हिसेसमधे आम्ही खेळत असू तेंव्हा अशी चर्चा होत असे. ऑफिसर्स मेसच्या बारच्या शेजारी क्लबरुममधे ब्रिजचे डाव रंगात येत. कधी चेस, तर नंतर नंतर रमी, तीन पत्ती, यांना उत येत असे. प्रत्येकाच्या मुखात पाईप किंवा सिगारेट्सची धुराडी असत. (आत्ता आत्ता पर्यंत मेन ना रम आणि सिगारेट एलौंन्स मिळत होता.)
अशा माहौल मधे रविवारी पिकनिक मूडमधे पांढरे फ्लॅनेलचा ड्रेस घालून बॉसने बरासा शॉट मारला की टाळ्यांचा कडकडाट करून त्याच्या हॅटधारी मिसेसला खुष करायची चढाओढ लागे... असो.
असा लेझर गेम आता माध्यामांना मधे मधे जाहिराती घालायला भरपूर वेळ मिळतो म्हणून आजकाल जोमात आहे. त्यात व्यायामपटूंनी क्षेत्ररक्षणाला भर देऊन खेळाडूंची गुणवत्ता सुधारली. कमी कपड्यातल्या ललनांना खेळपट्टीवर जाऊन गप्पा ठोकायला चान्स मिळतात. नाचऱ्या मुलींना ग्राऊंडबाहेर भाव मिळतो. तर महिलांनी बॅट उगारत आपले कौशल्य या खेळातून दाखवायला सुरवात केली आहे, म्हणून आता तो आरामाचा खेळ राहिला नाही हे खरे...
20 Feb 2020 - 8:19 pm | अमरेंद्र बाहुबली
ओक साहेब बरोबर, व भारतात क्रिकेट आणी क्रिकेटपटू ह्यांचं फार अति उदात्तीकरण होतं. ते डोक्यात जातं. क्रिकेटला देशप्रेमाशी जोडनार्यांना इत खेळात देश हरो किंवा जिंको काही फरक पडत नाही.