युती ची माती

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
13 Feb 2020 - 7:46 am

नुकत्याच एका धाग्यात असे म्हणले गेलं कि " ..जसे ५६ या संख्येंवरुन उद्धव यांनी मुख्यमंत्री पद मागणे चुकीचे वाटत असले.."

एक उदाहरण देतो ( क्षमा, यात भारतावर टीका होत असेल कदाचित पण कधी कधी "आपल्या तो बाल्यआ" ऐवजी "आपलं ते कार्ट" असू शकत एवढं मान्य करण्याचा मोठेपणा असावा .."
हे उदाहरण म्हणजे भारतात केंद्र आणि राज्य अशी ब्रिटिश संसदीय लोकशाही आहे तशीच ऑस्ट्रेलिया पण आहे .. फरक थोडा असा कि राज्य पातळीवर स्थानिक पक्ष त्यामानाने खूप कमी आणि सर्वसाधारण पाने धर्म आणि राजय याची फारकत बऱ्यापैकी आहे. तर ऑस्ट्रेलियातील केंद्रात आणि बहुतेक राज्यात डावे ( लेबर ) आणि उजवे हे युती ( लिबरल आणि नॅशनल पक्ष यांची ) असे चित्र असते ... यातील लिबरल हा उजवा मधय विचारसरणी चा पक्ष/ मोठा भाऊ आणि गावात / शेतकऱ्यांचं प्रभाव असलेला नॅशनल पक्ष हा धाकटा भाऊ.
हि जी युती आहे तिचे सरकार जर आले तर "नेहमीच " धाकल्याला उप पंतप्रधान पद मिलते.. एवढी वर्षे झाली पण कधी त्यांनी "आम्ही फरफटलो जातो" असे म्हणले नाही?
जर १०५ लिबरल + ५६ नॅशनल असे तिथे झाले आणि "आम्ही सडतोय आणि "हीच वेळ" म्हणून जर नॅशनल नि पंतप्रधान आमचाच असं हट्ट धरला तर सगळेच त्यांना वेड्यात काढतील.. मग तिथे असे का होत नाही?
कारण एक तर पक्षांतर्गत लोकशाही आणि २ मुरलेली लोकशाही
असो हे उदाहरण एवढया साठी दिले कि एक वेगळ्या दृशीतकोणातून या प्रश्न कडे पाहावे म्हणून..
असेही म्हणतो कि ऑस्ट्रेलियातील राजकारण हे काही धुतलाय तांदूळ सारखेच स्वच्छ नाही परंतु काही तरी तारतम्य आहे .असे वाटते

ऑस्ट्रेलियातील लोकशाही काही चांगले आणि विचित्र नमुने
१) "लोंबकणारी परिस्थिती" डावे ७२ आणि उलवे ७२ अशी परिस्थिती केंद्रात ३ स्वतंत्र .. त्या तिघांनी आठवडा घेतला आणि शेवटी dawyanna पाठिंबा दिला आणि तो निभावून नेला, जो काही धोंडबाजार झाला असले त्यात खासदारांना डांबून ठेवणे , शाळेसारखी हजेरी , या हॉटेलातून त्या हॉटेलात असले प्रकार नवहते
२) २०१८ साली दुहेरी नागरिकत्व सिद्ध झाल्याने अनेक खासदारानं ना रातोरात राजीनामा द्यावा लागला हायकोर्टाने ताबडतोब निर्णय दिला
३) " कॅपिटल ऑफ इंटर्नल कु इन वेस्टर्न वर्ल्ड " अशी लाजिरवाणी बिरुदावली २ वेळा लागली .. पक्षांतर नाही तर पक्षातील अंतर्गत उठावामुळे परंतु राजमान्य लोकशाही पद्धतीने निवडेलाल पंतप्रधानाचे उच्चाटन करण्याचाच विक्रम दोन्ही पक्षाने केला लेबर मध्ये श्री केविन रड ना पडायच्युत, लिबरल मध्ये टोनी अबॉट ना त्यांच्याच पक्षाने "उडवले" आणि ते काही भ्रष्टचारामुळे नाही तर फक्त अंतर्गत बाबींमुळे !
लेबर नि नंतर कहर केला रड बाबा नंन्तर गिलार्ड बाई पंतप्रधान झाल्या आणि पुढायचंय निवडणुकीत निवडणुकी आधी अगदी ऐन तोंडावर परत कु होऊन रड बाबांना लेबर चा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले, कोलांट्या उड्या महागात पडल्या आणि जनतेने लेबर ना शिकवलं ..
-तिथे जर कोणी लालू किया भुजबळ झाला तर तिथे परत राजकीय " वापसी " जवळ जवळ नाहीच .. त्याची अनेक उदाहरणे आहेत

प्रतिक्रिया

कंजूस's picture

13 Feb 2020 - 8:59 am | कंजूस

ढेकळं साठवणीची आहेत.

चौकस२१२'s picture

13 Feb 2020 - 9:05 am | चौकस२१२

???

म्हणजे लक्षात ठेवण्याचे मुद्दे ( मातीची ढेकळे) मांडले आहेत.