नवीन वर्षाचे संकल्प

मैत्र's picture
मैत्र in काथ्याकूट
27 Mar 2009 - 3:21 pm
गाभा: 

आज गुढी पाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक..
कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात करण्यास उत्तम दिवस. सर्व मिपाकरहो, चला काही संकल्प करूया -

१. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी कुठेही कुठल्याही स्वरुपात कचरा न टाकणे. अगदी चॉकलेटचा, मिंट किंवा त्या आकारच्या गोळीचा कागद, रॅपर इतका लहान कागदसुद्धा, प्लॅस्टिक कचरापेटीशिवाय इतरत्र कुठेही न टाकणे.
२. अनेक वेळेस आपण स्ट्रॉ वापरतो. ती कचरापेटीतच टाकणे.
३. गड किल्ले, पर्यटन स्थळे इथे फक्त पाऊलखुणाच मागे सोडणे. आपण नेलेल्या सर्व वस्तु आणि इतर कचरा जसे प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे परत आणणे व कचरा पेटीतच टाकणे.
४. शक्य तिथे खरं तर कायमच प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्ज न वापरणे. कापडी, ज्यूटच्या उत्तम पिशव्या मिळतात त्यांचा वापर करणे. विनाकारण प्लॅस्टिकची पिशवी देणार्‍या दुकानदाराला पिशवी परत करणे.
५. टिश्यु पेपर्सचा अतिवापर टाळणे. पूर्वीप्रमाणे रुमाल जवळ बाळगून त्याचाच उपयोग करणे. टिश्यु पेपर वापरणे आवश्यक असल्यास त्याचा वापर गरजेप्रमाणे व प्रमाणातच करणे.
६. वेळ व सोय या प्रमाणे शक्य असेल तेव्हा वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा उपयोग करणे.
७. जवळच्या अंतरासाठी (१ किलोमीटर पर्यंत तरी) वाहनाऐवजी चालत जाणे.
८. शक्य तेव्हा २ मजल्यांपर्यंत तरी लिफ्टचा वापर न करणे.
९. गरज नसेल तेव्हा सर्व प्रकारची वीजेवर चालणारी उपकरणे, दिवे इ. बंद ठेवणे.
१०. वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळणे. सिग्नल किंवा जिथे थांबावे लागेल अशा ठिकाणी वाहन बंद ठेवून इंधन वाचवणे.
११. पाण्याचा गरजे पेक्षा जास्त वापर न करणे. पाणी वाया जाऊ न देणे.
१२. अन्न वाया जाऊ न देणे. विशेषतः हॉटेल, कँटिन, मंगल कार्ये अशा ठिकाणी गरजेइतकेच घेऊन संपवणे. हॉटेल मध्ये शिल्लक राहिलेच तर उष्टे नसलेले अन्ने पॅक करुन घ्या. चक्क एखाद्या गरीबाला, रस्त्यावर, फुटपाथवर अर्धपोटी, उपाशी झोपलेल्या भिकार्‍याला द्या!.

यात कोणाही व्यक्तिला उपदेश करण्याचा अजिबात हेतू नाही. आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि इतरांना सांगा.
सर्व मिपाकर हे सूज्ञ आणि सुजाण नागरिक आहेत यावर माझा विश्वास आहे. यातल्या काही किंवा बर्‍याच गोष्टी अनेक जण करतही असतील. या यादीत भर घालता आली तर अतिशय उत्तम.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर स्वतःला, समाजाला, महाराष्ट्राला व आपल्या देशाला समृद्ध करण्याचा संकल्प करुया...
नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

प्रतिक्रिया

दशानन's picture

27 Mar 2009 - 3:24 pm | दशानन

तुमचे संकल्प आवडले ! काही मुद्दे तर खरोखर राष्ट्रीय गरज म्हनून सक्तीचे करायलाहवेत.

मराठमोळा's picture

27 Mar 2009 - 8:03 pm | मराठमोळा

तुमचा संकल्प अतिशय चांगला आहे. सर्वानी पाळला तर देशाचे व सर्वाचे हित नक्की आहे.

>>या यादीत भर घालता आली तर अतिशय उत्तम

वर केलेले संकल्प वर्षभर लक्षात ठेवणे :)

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

देवदत्त's picture

27 Mar 2009 - 8:13 pm | देवदत्त

चांगले संकल्प आहेत.
ह्यातील फक्त मुद्दा ६ आणि ७ पाळणेच मला कठिण जाते. :< बाकीच्या मुद्द्यातील संकल्प मी आधीपासून पाळतच आहे.

तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा :)

प्राजु's picture

27 Mar 2009 - 8:26 pm | प्राजु

उत्तम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

हेरंब's picture

27 Mar 2009 - 9:13 pm | हेरंब

अ. सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी न लावणे.
आ. लाऊडस्पीकरचा उपयोग टाळणे.
इ. रस्त्यात न थुंकणे.
ई. बोलताना आवाज न चढवणे(कितीही राग आला तरी)

यशोधरा's picture

27 Mar 2009 - 9:15 pm | यशोधरा

छानच आहेत संकल्प! हे संकल्प पार पाडण्यासाठी तुम्हा आम्हाला शुभेच्छा!

rajeshwar.nalbalwar's picture

28 Mar 2009 - 2:00 am | rajeshwar.nalbalwar

उत्तम आहेत सन्कल्प.

सहज's picture

28 Mar 2009 - 7:58 am | सहज

उत्तम संकल्प.

विसोबा खेचर's picture

28 Mar 2009 - 11:05 am | विसोबा खेचर

माझा संकल्प -

डाएट करणे.
सुंदर, आव्हानात्मक स्त्रियांचा विचार मनात न आणणे.
तंबाखू सोडणे, सॉरी, लौकरच तसा संकल्प करणे! ;)

आपला,
(संकल्पित) तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Mar 2009 - 12:06 pm | प्रकाश घाटपांडे

पर्याय ६ व ७ बाबत आम्हाला विकल्प द्यावा लागतो. बाकी आम्ही पाळतोच. ११ बाबत आमचे मत' घाणेरडे लोक आंघोळ करतात पण त्यांचा हेतु स्वच्छ असल्याने माफ.' १२ ला बुफे ही चांगली पद्धत आहे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा हे व्यंकटेश स्त्रोत्रातील वाक्य आठवते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

हरकाम्या's picture

29 Mar 2009 - 1:28 am | हरकाम्या

तुमचा ७ नंबरचा संकल्प मी गेले कित्येक वर्षॅ पाळतोय त्यामूळे माझे गुडघे आता राम म्हणायच्या बेतात आहेत
त्याचे काय ??????????

फक्त_ मोक्श's picture

29 Mar 2009 - 6:40 pm | फक्त_ मोक्श

खरच खुप सुंदर संकल्प !

नवीन नवलाइ नको मात्र . नेम करुया! संकल्प पार पाडण्यासाठी तुम्हा आम्हाला पर्मेश्वर शक्ति देवो ही च प्राथना व शुभेच्छा!

फक्त_ मोक्श's picture

29 Mar 2009 - 6:42 pm | फक्त_ मोक्श

खरच खुप सुंदर संकल्प !

नवीन नवलाइ नको मात्र . नेम करुया! संकल्प पार पाडण्यासाठी तुम्हा आम्हाला पर्मेश्वर शक्ति देवो ही च प्राथना व शुभेच्छा!