मुंबई-पुणे-मुंबई

सौरभ नेवगी's picture
सौरभ नेवगी in भटकंती
29 Jan 2020 - 10:46 pm

३१/०१/२०१९
घरच्यांचा विरोध पत्करून ३१ जानेवारीला पुण्यासाठी सायकल घेऊन पहाटे ५:४५ ला बदलापूर सोडल. अचानक पुण्याला जाण्यास कारण असे की, लंगोटी याराच्या बहिणीचं लग्न. या आधी पुण्याला ४ / २ चाकी घेऊन न गेलेला मी आता direct सायकल ने जाणार तेही एकटाच, याच सगळ्यांना tension (अगदी मलासुद्धा). तरिही मनाशी निश्चय पक्का करून सायकल घराबाहेर काढली.
मधे ४-५ स्टॉप घेणार होतो. पहाटे रस्ता नीट दिसत नव्हता, परंतु कर्जत पर्यंतचा रस्ता तोंडपाठ होता. गुलाबी थंडी enjoy करत २ तासात कर्जतला पोहोचलो. चारफाट्याला १५ मिनीटं विश्रांती घेऊन चहा टाकला. आता खोपोलीला जायला पळसदरीचा रस्ता निवडला (८ km वाचले).
सूर्य वर आलेला, रस्ता दिसत असल्यामुळे १७-२० चा speed आता शक्य होता. खोपोली घाटाच्या पायथ्याशी ९:१५ ला टच झालो. मावशीचं घर जवळच होता, म्हणून चेहरा दाखवायला तिकडे गेलो. यात १ तास गेला, पण घाट पार करायला सज्ज झालो. रस्ता पुन्हा confirm करून, सायकल वर टांग टाकली तेव्हा १०:३० झाले होते, घाट पार करायला दीड तास लागेल असा अंदाज होता. ५ मिनीट घाटात थांबलो. एव्हाना Harley Davidson च्या १०-१२ गाड्या गडगडाट करत घाटात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासोबत हाताचे/ मानेचे इशारे करत तासाभरात express way ला चिकटलोसुद्धा. रस्त्याची condition उत्तम असल्याने इथे वेग पकडला. ११:३० च्या सुमारास मगनलाल स्टेशन ( अर्थात लोनावळा) मागे टाकले.
आता मात्र सूर्य देव तळपत होते. पोटात कावळे नुकतेच जागे झाले होते, त्यामुळे जमेल तितका अंतर कांव-कांव सुरू होण्याआधी उडवायच ठरवल. १२:३० ला ढाब्यावर सायकल पार्क करून सोबत घेतलेला खाऊ संपवला, मसाला पापड आणि ताक घेऊन थोडावेळ ऊताणा पडलो. १३:४५ ला ओला रूमाल डोक्याला लावला, ऊन्हाला ठेंगा दाखवित पुढची journey सुरू केली. कात्रज ७०-८० km दूर होते. दर ३०km नंतर ब्रेक घ्यायचा असे ठरवले, त्यानुसार १६:३०-१७:०० वाजता पोहोचेल असा संदेश forward केला. ज्या वेगाने कात्रज जवळ येत होतं, त्याच्या दूप्पट वेगाने पाणी संपत होता. पिंपरी-चिंचवड ला traffic लागेल म्हणुन NH४८ ची सोबत मी कायम ठेवली. देहुरोड फाट्याला सोबतच सगळं पाणी संपलं. अजुन ४०km बाकी होते. सायकल शिस्तीत लेफ्ट लेन ला ठेवून पुढे सरकत होतो. आता प्रवासाचा थकवा जाणवत होता, त्यात ४८ वरचे बेढब पूल, पुणेरी RIDERs, नको तितके लांब सर्व्हिस रोड, असंख्य हायवे exit/entry यामुळे २ तासाच्या शेवटच्या टप्प्याने माझा अंत पाहिला. अगदी बिंधास्त पणे काही लोक wrong लेन मधे गाड्या कशा टाकतात याच नवल वाटत होता मला. मुंबईचा असल्याने जे चालू होत ते सहन करत होतो. वारजे सोडल्या नंतर मात्र मी नडायला सुरूवात केली. एका सरळ लाईन मधे सायकल चालवायला सुरूवात केली, समोरुन येणारे off-road 'एन्जॉय' करू लागले. या सगळ्या प्रकारात मी भारती स्कूल ऑफ फोटोग्राफी ला १८:३० वाजता आलो (दीड तास उशीरा). इथून पुढे माझा दुसरा मित्र आणि मी त्याच्या घरी जाणार होतो. तो दुचाकीवर, मी सायकल वर असे १९:०० च्या सुमारास नारायण पेठेतल्या घरी पोहोचलो. घरी आल्याचे msg कॉपी पेस्ट केल्यावर अर्धी शर्यत पूर्ण केल्याचा आनंद मी निद्रादेवी सोबत साजरा केला.
To be continued...
-सौरभ

प्रतिक्रिया

जुना बोरघाट फार चढणीचा(१/८ ) आहे. एक्सप्रेस वे 'चा (१/२० )बराय.
ट्रिप आवडली. पुढचा भाग अपेक्षित. एखादा फोटो?

सौरभ नेवगी's picture

2 Feb 2020 - 11:32 am | सौरभ नेवगी
सौरभ नेवगी's picture

2 Feb 2020 - 11:32 am | सौरभ नेवगी
सौरभ नेवगी's picture

2 Feb 2020 - 11:32 am | सौरभ नेवगी

हो, पण भारी वाटत ..
फोटो या पुर्ण प्रवासात नव्हते काढले खास.. (मला ती कलाच अवगत नाही अस म्हणायला हरकत नाही :P)

mayu4u's picture

30 Jan 2020 - 10:56 am | mayu4u

पु भा ल टा

सौरभ नेवगी's picture

2 Feb 2020 - 11:34 am | सौरभ नेवगी

धन्यवाद, पु भा टा आ

चौथा कोनाडा's picture

30 Jan 2020 - 4:19 pm | चौथा कोनाडा

वाह, खुप भारी ! एक्सायटिंग अनुभव आहे ! फोटो टाकले असते आणखी थरार !

पुभाप्र !

सौरभ नेवगी's picture

2 Feb 2020 - 11:35 am | सौरभ नेवगी

धन्यवाद, )

सतीश विष्णू जाधव's picture

13 May 2020 - 1:47 pm | सतीश विष्णू जाधव

सौरभ,

लेख आवडला.....

छान लिहिता...