"स्पॉंजी दहीवडा "

Primary tabs

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
5 Jan 2020 - 5:50 pm

नमस्कार मंडळी , कसे आहात ?
सगळयांना हॅपी वाला न्यूइअर _/\_

एकेकाळी मिपाचा पाककृती विभाग नुसता ओसंडून वाहत होता. त्यात माझ्या पण बर्याच रेसेपी यायच्या लगोलग ;)
एकतर मिपावर नवीन त्यात भारीचा उत्साह ! केलं काही का टाक मिपावर ! आणि प्रतिसाद आले कि जाम भारी वाटायचं रात्री अपरात्री मोबाईल चेकवून किती प्रतिसाद आलेत ते पाहिलं जायचं, कमी असतील तर काउंट वाढवण्यासाठी लोकांच्या खरडीत जाऊन " ओ माझी रेसेपी नाही वाचली का ? प्रतिसाद द्याना हे पण सांगुण व्हायच :) :०
तेव्हा इतकी पकाऊगिरी केली आपलं हे पाककृती केली कि लोकांनी माझं "पियुशा "च "जिल्बुशा " असं बारस करून टाकलं ;) पण मी काही मनावर घेतलं नाही ती गोष्ट वेगळी ;) असो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ते जुने मिपाकर पण कुठे तरी हरवले :( असो नव्या लोकांबरोबर मिपा पुढे पुढे चालत राहावं नवे नवे सदस्य येत राहावे आणि मिपाचं नंदनवन असच फुलत राहावं असं बोलून (लिहून) मी आपली रेसेपी चालू करते .
आजची रेसेपी आहे "स्पॉंजी दहीवडा " थन्डीचे दिवस आणि दहिवडा ? असा प्रश्न पडू शकतो पण त्याला उत्तर " जब दिल चाहा बना लिया और खालिया बाकी मौसम गया तेल लेने "तर घ्या साहित्य लिहुन .
साहित्य -
१) १ वाटी उडीददाळ
२)चवीपुरते मीठ
३) तळण्यासाठी तेल
४)दही + साखर (तुम्हाला हवे तितके )
५) बारीक किंवा जाड शेव
६)चिंच गुळाची चटणी
७)चाट मसाला
८)लाल तिखट
* चिंच गुळ चटनी खूप सोप्पी एक वाटी चिंच घेऊन एक तास गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ करून घेणे त्यात गुळ किसून घालणे . एक चुटकी मीठ आणि एक चुटकी लाल तिखट मस्त एकजीव करून एक उकळी काढून घेणे थोडी घट्ट झाली कि चटणी तय्यार !

कृती -
उडीद डाळ ४ ते ५ तास पाण्यात भिजवून नंतर निथळून मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे .शकयतो पाणी न घालता वाटायची अगदीच गरज लागली तर एखादा चमचा पाणी घालून वाटावी . ही डाळ चिवट असल्यामुळे थोडी कठीण असते वाटायला त्या साठी टीप म्हणजे मिक्सर सलग न चालवता १० -१५ सेकंद चालवून ब्रेक घेऊन वाटून घेणे .आता मिश्रण बारीक झाले कि त्यात चवी पुरते मीठ घालून त्या मिश्रनाला हलंके होई पर्यन्त फेटून घेणे निदांन ७-८ मिनिट तरी लागतील मिश्रण हलकं व्हायला .तुम्ही नाजुका असाल तर ही अशी फेटायची "सोप्पी" काम नवरा , भाऊ , पप्पा अशा मंडळी कडे द्यावीत त्याने काय होत त्यांचे मसल्स बनतात मस्त पैकी !!! आणि बाप्ये मंडळीं बनवत असतील तर त्यांनी स्वता:ची कामे स्वतःच करावी ;)
जितकं मिश्रण हलक तितके वडे स्पॉंजी बनतील ,आता कस ओळखणार हलकं झालं कि नाही ? तर एक काम करा ,एक वाटी घ्या ,त्यात पाणी घ्या आणि त्यात मिश्रनाचा छोटुसा गोळा टाका तो वर तरंगला कि समजायचं काम फत्ते !!!
आता तेल गरम करून त्यात भजिच्या आकाराचे गोळे सोडून मस्त बदामि रंगावर तळून घ्या .
सर्व वडे तळून झाले की एका भांड्यात थोडं कोमट पाणी घेऊन त्यात चुटकीभर हिंग टाकून हे वडे त्या पाण्यात १०-१५ मिनिट भिजू द्या . हि भिजवण्याची कृती वडे सर्व्ह करणार असाल त्या आधी करा .
आता दही +साखर मऊसूत फेटून फ्रीज मध्ये ठेवून द्या ही कृती तुम्हाला कितपत थंड दही हवं आहे त्यानुसार ठरवा मी सर्व्ह करायच्या तासभर आधी ठेवलं होत
बस्स !!!
आता वडे पाण्यातून काढून थोडेसे हलके दाबून त्यातील पाणी काढून घ्या एका बाउल मध्ये वडे , त्यावर मस्त फेटलेले थंड गोड दही घाला , थोडा चाट मसाला आणि लाल तिखट भुरभुरवा . थोडी चिंच गुळ चटणी , आणि थोडी शेव अहाहा मस्त मस्त !!
यात डाळिंब दाणे , खजूर चटणी , हिरवी तिखट चटणी ही घालू शकता तुमची चॉईस !

स्टेप बाय स्टेप फोटो देत आहे
फेट्लेल मिश्रण :
a

तळुन भिजवलेले वडे :
b

बाउल मध्ये :
e

दही / मसाला /तिखट/चटनी/शेव
f

रेडी टु ईट
g

प्रतिक्रिया

पैलवान's picture

5 Jan 2020 - 6:29 pm | पैलवान

या पदार्थामुळे मला दही आवडायला लागलं!
आधी मी दही समोर आलं तरी तोंड वाकडं करायचो. अगदी सत्यनारायण पुजेलाही तीर्थ ना घेता फक्त प्रसाद घ्यायचो.
सातवी आठवीला असताना एकदा घरी दहीवडे केले होते. उडीद वडा असाही आवडायचा. मग दही वड्यातला वडा दही पिळून पिळून खाल्ला आणि चक्क आवडला!! मग दह्यासह खाल्ला आणि मजा आ गया!!

दह्याचं टेक्ष्चर, योग्य प्रमाणात आंबट गोड असणं यावर दहीवड्याचं यश अवलंबून असतं. शेवटच्या फोटोत ते परफेक्षन जमल्याचं दिसतंय.

मदनबाण's picture

5 Jan 2020 - 8:59 pm | मदनबाण

या पदार्थामुळे मला दही आवडायला लागलं!
अगदी हेच म्हणतो...

बादवे... जिल्बुशा असेच मस्त पदार्थ करत रहा आणि त्यांची पाकृ देत रहा ! [ जिल्बुशा म्हंटलेल चालल नव्हं ? ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nainowale Ne Full Video Song

व्हय व्हय चालल तशी बी मी एकच जिल्बुषा हाय न्हव मिपावर ;) आनी रेसेपी बी येत राहतील नव्या नव्या :)

यश राज's picture

5 Jan 2020 - 6:32 pm | यश राज

तोंपासु...

मुक्त विहारि's picture

5 Jan 2020 - 6:58 pm | मुक्त विहारि

उडीद वडा आणि झणझणीत सांबार, हे मला अतिशय आवडते....उत्तम सांबारात चिंच-गूळ नसतो आणि टोमॅटो पण नसतो...

खिमा आणि उडीद वडा पण अतिशय चविष्ट लागतो. ..

दही आणि साखरे बरोबर वडे खाण्या पेक्षा मग ते श्रीखंडा बरोबरच खाल्ले तर काय वाईट?

मुक्त विहारी जी, तुम्ही हे वड़े सांबर सोबत खाता मस्त लागतात हे वरचे पन भन्नाट कॉम्बो आहे ट्राय केले का ? पण शेवटी काय ज्याची त्याची आवड़ !अपुन को तो बेस्ट लगते :)

मुक्त विहारि's picture

6 Jan 2020 - 5:46 pm | मुक्त विहारि

आणि खजूराची पण नाही.

आणि दही-साखर नुसतेच छान लागते, अर्थात भरपूर साय मात्र हवीच...साई शिवाय दही म्हणजे, फोटो शिवायची पाककृती...

आमच्या जीभेला झणझणीत पदार्थच जास्त आवडतात...त्यामुळे पनीर पेक्षा खिमा जास्त आवडतो.

मुक्त विहारि's picture

5 Jan 2020 - 6:59 pm | मुक्त विहारि

फोटो छान आहेत. ..

उदयगिरी's picture

5 Jan 2020 - 7:06 pm | उदयगिरी

एकदम मस्त दिसत आहेत.
फक्त मी एक बदल करतो. दही मध्ये हिरवी मिरची वाटून मिक्स करून, दहीवडे सर्व करताना खाली एक थर ह्या मिश्रणाचा देतो त्या मुळे एक वेगळी चव येते.

चौथा कोनाडा's picture

5 Jan 2020 - 9:48 pm | चौथा कोनाडा

मस्त, झक्कास, फक्कड ! ज्याम तोंपासु !

फेटायची "सोप्पी" काम नवरा , भाऊ , पप्पा अशा मंडळी कडे द्यावीत त्याने काय होत त्यांचे मसल्स बनतात मस्त पैकी !!!

बायकोपासून लपवली पाहिजे ही पाकृ !

पहाटवारा's picture

6 Jan 2020 - 1:48 am | पहाटवारा

एक्दम आवडीचा प्रकार ..

एक अजुन वेरिएशन, फेटुन झाल्यावर छोट्या काचेच्या बाउल मधे एका वड्यापुरते पीठ घेउन मायक्रोवेव मधे एक मिनिट ठेवले तर छान वाफवुन वडा बनतो.. बाकि सर्व क्रुती सारखीच ..

बाकि लेख एक नंबर चटकदार जमलाय !

-पहाटवारा

कंजूस's picture

6 Jan 2020 - 6:06 am | कंजूस

वा वा फारच छान फोटो आणि पकावगिरी.
दहीवडा आवडतो पण उडदाचा. कुणी कडक बटरपाव पाण्यात भिजवून करतात तेही आवडतात पण त्यास वेगळे नाव हवे.
---
एकदा बस बदलायची म्हणून जुईनगर स्टेशन ( नवी मुंबई) स्टॉपला उभे होतो. भूक लागली होती म्हणून स्टेशनात काही मिळते का पाहायला आत गेलो. तिथे होता एक चा स्टॉल. त्याच्याकडे दहीवडा होता. रेल्वे स्टेशनला इतका छान दहीवडा मिळाल्याने आश्चर्य वाटले.
(जुनी गोष्ट आहे. आताचं माहीत नाही.)

उपेक्षित's picture

6 Jan 2020 - 1:13 pm | उपेक्षित

उत्तम पाक्रु पियू ताई,

पूर्वी मोठ्ठे बटर असायचे ते दह्यात भिजत ठेवून तसला दही वडा करून खाल्लेला आहे. :)

गणेशा's picture

6 Jan 2020 - 4:09 pm | गणेशा

पियुशा
फोटो पाहुनच तोंडाला पाणी सुटले.. बोलव एकदा खायलाच.

बाकी पाककृती शी माझा जास्त संबंध नाही , जरी मला पुर्ण स्वयंपाक येतो. पण जुने लोक विशेष करुन, गणपा, कच्ची कैरी आणि निवेदिता ताई आणि अर्थातच आमची त्यावेळेसची फेवरेट पियुशा यांच्यामुळे आम्ही पाक़कृती विभागात डोकवत असू.
जुने दिवस भारीच होते.. त्यातले अजुनही वल्ली (प्रचतेस, काय ते नाव लिहिता पण येइना) शी भेट होते.. बाकी काही नाही :)

विजुभाऊ's picture

10 Jan 2020 - 7:40 am | विजुभाऊ

आहाहा.
झकास

श्वेता२४'s picture

10 Jan 2020 - 2:37 pm | श्वेता२४

फोटो तर खूपच छान. माझा फेवरिट्ट पदार्थ. नेहमी करते.

दिपक.कुवेत's picture

11 Jan 2020 - 12:38 am | दिपक.कुवेत

पण शेवेने घात केला....ह्यावर झीरो (नायलॉन शेवच) हवी. बाकि झकस रेसेपी.

प्रचेतस's picture

11 Jan 2020 - 3:56 pm | प्रचेतस

जीवघेणा फोटो आहे. खल्लास पाककृती

व्वा पिवशेताई. क्या बात!!!! यम्मी का काय म्हणतात ते.

सविता००१'s picture

28 Jan 2020 - 12:46 pm | सविता००१

झकास ग पिवशे

सविता००१'s picture

28 Jan 2020 - 12:56 pm | सविता००१
सस्नेह's picture

29 Jan 2020 - 8:17 pm | सस्नेह

मस्तंच गं पिवशे !
फोटो तर जीवघेणेच !!

@ मुक्त विहारी & पियुशा

माझ्या घरी लहानपणापासून प्रथा साखर विरहीत खमंग दहीवड्याचीच. गोड दहिवडा पुण्यातल्या रेस्तारंतात ट्राय करे पर्यंत अपरीचीतच होता. रेस्ट्रांतातील पहिल्यांदा ट्राय केलेला गोड दहिवडा श्रीखंड आणि वडे दोन्ही वेगळे आवडत असूनही खाणे शक्य झाले नाही. पियुशांची चिंचगूळ चटणीच्या सिझनींगची टिप मस्त दिसते. गोड दही वड्या सोबत सिझनींगला लाल तिखटा पेक्षा काळ्या मिर्‍यांची पूड टाकून गोड दहीवडा रेस्क्युकरणे (म्हणजे खाणे ) मला अधिक सुसह्य .

खमंत दहीवड्यात वड्याची पाकृ वरचीच पण दह्यात आले हिरवी मिरची कोथींबीर मीठ आणि आवडी नुसार वरून लाल तिखट . मिरेपूड टाकून गोड वड्याला अल्पसे जमवून घेतले तरी खमंग तिखट आवडणार्‍यांसाठी दही खमंग तिखटच हवे.

माहीत गारांनी छान माहिती दिली आहे धन्यवाद :)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Feb 2020 - 4:23 pm | अत्रुप्त आत्मा

जिल्बुशा चे दहिवडे!