ही वाट भटकंतीची : आठवण आणि उजळणी २०१९

गणेशा's picture
गणेशा in भटकंती
31 Dec 2019 - 6:16 pm

आज २०१९ चा शेवटचा दिवस, या वर्षातल्या घटना मागे वळून पाहताना छान वाटते आहे. लिखानाचे म्हंटला तर राजकीय आणि त्याच बरोबर सामाजिक मुद्द्यांमुळे मी पुन्हा मनातले बरोबर चुकीचे विचार शब्दात उतरवू लागलो... कविता , लेख हे जरी मी लिहित असलो तरी लिखान हा माझा मेन छंद कधीच नव्हता आणि नसेलही.
त्यामुळेच कदाचीत, माझ्या लेखांवरील विरोधी मतांना मी कधी तावातावाने, हमरी तुमरीवर उत्तरे दिली नसतील. आणि हे माझ्या स्वभावाच्या कदाचीत उलटे आहे :).
शब्दांना कदाचीत चेहरा चिकटला की ते अहंकाराचे रुप बनत असावेत ... येथे शब्द, लेख आणि लिखान हे माझे विचार असले, तरी त्यावर माझाच चेहरा उमटला आहे असे माझे मतच नाही. शुद्धलेखन पण म्हणुनच कदाचीत माझे सुधरत नसेल हे नक्की.

तर माझी खरी आवड काय आहे तर ती आहे निसर्गात फिरणे , ट्रेकिंग , हायकिंग आणि सायकलिंग... आणि मी २०१९ चा मागोवा पाहतोय त्या माझ्या या लाडक्या छंदांबद्दल ...
खरे तर ' ही वाट भटकंतीची' म्हणुन मी प्रवासवर्णन पण येथेच लिहिलेत, पण २०१४ पासुन ते लिहिणे ही बंदच झाले त्याची आज आठवण येते , मागील काही प्रवासवर्णने ही आज वाचली, खास करून हिमाचल, वेरूळ आणि गोव्याची. मस्त वाटले, आणि त्यात लिहिल्याप्रमाणे कायम राजस्थान ला जायचे ठरवून जाता येत नव्हते हे ही मी बदलले आणि राजस्थान ची १२ दिवसाची निवांत ट्रीप पण केली हे आनंदाने येथे सांगतो आहे.
येथे २०१६ ते २०१९ या काळात नव्हतो आणि नेमक्या या काळात मी खुप फिरलो, सर्व सांगत नाही, पण २०१९ चा एक भटकंतीचा थोडासा आढावा घेतो आणि प्रत्येक वेळेस चा एखादा फोटो येथे देतो.

२०१९

खरे तर २०१९ चा वेध सुरु झाला तो हरिहर फोर्ट हायकिंग आणि पुणे ते कर्दे(दापोलि) सायकलिंग या गोष्टींपासून. आणि २०१९ पासून मनात असलेले भरपुर फिरणे करायचेच हे नक्की झाले.

१. सुरुवात झाली ती आराध्याच्या ५ व्या वाढदिवशी (२० जानेवारी), अंधारबन येथुन.
खरे तर जंगलात मनसोक्त फिरणे म्हणजे पर्वणीच, अंधारबनात पावसाळ्यात पावसाचा येथेच्छ मारा सहन करत खुपदा फिरलो, तेथील असंख्य धबधब्यात मनसोक्त न्हावून निघालो पण दरवेळी ठरवत होतो येथे पुन्हा हिवाळ्यात ही येवून बघु कसे वाटते हे बघु. आणि आराध्या बरोबर मी पुन्हा या जंगलात फिरलो. विशेष म्हणजे आम्ही सोडून या जंगलात कोणीच ट्रेकर आले नव्हते, ५ जनांचा एक रेंज ट्रेक वाला गृप उलटा कोकणातून वरती येताना भेटला तितकेच..

"Teaching a child about the nature is one of the important events in their lives"

अंधारबन
.
.
.

२. खरे तर पुणे ते कर्दे (दापोली) हा २०० किमी चा टप्पा यशस्वी पार केला होता, हे सारे स्वप्नवत होते, आणि याचे पुर्ण श्रेय आपल्या मोदक आणि सरपंच प्रशांत यांना नक्कीच द्यावे लागेल, सायकल घेण्याचा माणस या दोघांमुळेच पुर्ण झाला .. आणि २०१९ ला पहिला सायक्लो ट्रेक, पुणे (पिंपरी चिंचवड) ते पन्हाळा, २७५ किमी मी २५ जानेवारी ला पुर्ण केला.

"A Little progress each day adds up to big results"
( या नंतरच २६ जानेवारीला हुबळी येथे जावून सांघिक Guinness World Record मध्ये मी माझे नाव कोरले)

पुणे ते कर्दे

पुणे ते पन्हाळा

.
.
.

३. हरिश्चंद्र गड या गडावर जायचे प्रत्येक ट्रेकर्स चे स्वप्न असते. आणि हा गड गेल्या ९ वर्षात मनात असुनही मला करता आला नव्हता.आणि या फेब मध्ये हा गड करण्याचे ठरले फेब्रुवारी मध्ये स्वताचा टेंट विकत घेतला,पुण्यातुन एकटाच आणि सिन्नर चा मित्र तिकडुन एकटा असे आम्ही डायरेक्ट हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यालच भेटलो. रात्र आणि ती ही स्वताच्या टेंट मध्ये म्हणजे क्या कहना.. त्यातून भारतात खुप कमी ठिकाणावरुन दिसणारे इंद्रवज्र आणि कोकणकडा म्हणजे क्या कहना... आणि या सर्वांवर कडी म्हणजे तो दिवस महाशिवरात्रीचा होता.. अनेक लोक त्यांच्याशी गप्पा मस्त वाटले एकदम.
मार्च मध्ये ही थंडी काय असते हे येथे येवून कळते, टेंट मध्ये पण अक्षरसा थंडीने मी १ वीत वर उडत होतो.. शेवटी बाहेर शेकोटी जवळ रात्र घालवली. आणि दूसर्‍या दिवशी येताना रस्त्यातच, एकाच्या शेतात दुपारी अंब्याच्या झाडाखाली मस्त झोप घेतली.

इंद्रवज्र आणि कोकणकडा

हरीश्चंद्रगड

.
.
.

४. वासोटा , हा गड पण असाच केंव्हा पासुन येथे जाण्याची वाट पहात होतो. कोयना धरणात , मध्ये पाणी कमी झाले तेथे टेंट टाकुन सकाळी वासोटा एका दमात केला होता.. हिरवागार निसर्ग आणि वासोटा यांच्या प्रेमात आपण नक्कीच पडतो.

" Life isn't about the number of breaths you take. It's the movements that take our breath away"

कोयना धरण, बामनोली

वासोटा
.
.
.

५. राजा रायगड मार्च, यावेळेस भलताच चांगला ठरला हरिश्चंद्रगड, वासोटा आणि ९ व्या वेळेस पुन्हा रायगड करण्याचे भाग्य याच महिण्यात मला मिळाले. काम चालु असल्याने या वेळेस पहिल्यांदाच जुण्या राजमार्गाने आम्ही ट्रेक केला. रायगड हा माझा आवडता गड, येथे जेंव्हा जेंव्हा मी येतो तेंव्हा येथील पावन माती मस्तकाला लावून सार्थक झाल्याचेच मनात येते.
विशेष म्हणजे माझे तीनही मार्च मधील ट्रेक हे एक रात्री तेथेच थांबणारे असल्याने ते सारे अनुभव अवर्णनिय आहेत.

स्वराच्याचा सुर्योदय

आमचे दैवत
.
.
.

६. पुन्हा राजमाची
राजमाची ला २०१८ लाच भर जुलै च्या पावसाळ्यात जावून आलो होतो, पण यावेळेस वेगळ्या कारणासाठी तेथे गेलो. पावसाचा आरंभ म्हणजेच आमचा जन्मदिवस १० जून, त्याच्या पुर्व रात्री आम्ही आराध्या ला घेवून रात्री जंगलातील काजवे पहायला गेलो आणि नंतर दूसर्या दिवशी राजमाचीच्या दोन्ही किल्ल्यांवर जावून आलो.

raajmachi
.
.
.

७. मलेशिया राजमाची वरुन आलो आणि ७ दिवसातच मी कामानिमित्त मलेशिया ला गेलो असलो तरी ८०० किमि परिघात मी सुटटी असताना तेथे फिरलो. ज्या petronas tower साठी मलेशिया प्रसिद्ध आहे, त्या टॉवर मध्येच मी काम करत होतो :)
क्वालालुंपुर , मल्लाका, आणि पंग्कोर आयलँड येथे फिरुन झाल्यावर मात्र मी माझ्या मनातील लंकावी आयलँड ला भेट देण्याचे ठरवले.. त्या लंकावी आयलँड बद्दल च्या ट्रीप बद्दल येथे बोलतो फक्त.

Langkawi island

This was my first solo backpacking trip in Langkawi island, Malaysia.

Trekking in dense rain forest on Mount Mat Cincang, hiking to 7 wells waterfall, biking in heavy rain on malaysian roads..
Enjoying on cristal clear beaches , specially on tanjung rhu.
boating in the first UNESCO Kilim Geoforest Park in Southeast Asia.
Saw Eagles (after which Langkawi is named). Went in natural caves.Eating malaysian local food, and making friends with random strangers, all this ended up with me having crazy fun and enjoying utmost peace, both at the same time.
The happiness I found on this trip can never be expressed in words.
मलेशिया तील प्रसिद्ध ठिकाणांचे फोटो जे नेट वर अवेलेबल आहेत ते येथे देत नाही.

मँग्रोवनामध्ये

7 wells waterfall

1
.
.
.

८. पुन्हा पावसात अंधारबन
पावसात, तिसर्‍या वेळेस मी अंधारबन ला गेलो, कोसळणारा पाऊस, धबधब्यामध्ये मनसोक्त भिजणे आणि हिरव्यागार झाडांच्या घनदाट जंगलात फिरणे हे सगळे मला येथे अनुभवता येते, त्यामुळे पावसाळ्यात येथे मी जातोच जातो.आणि हा जुलै ही त्याला अपवाद नव्हता.

1

2

.
.
.

९. तुंग फोर्ट
तुंग फोर्ट ला पुन्हा जाण्याचे कारण म्हणजे १२ वर्षापुर्वी फ्रेंडशीप ला भेटलेलो आम्ही पुन्हा याच दिवशी ट्रेक ला जात होतो आणि म्हणुन आम्ही पुन्हा मावळप्रांत निवडला.

1
.
.
.

१०. कर्जत (खांडस) ते भिमाशंकर ट्रेक
"Dense Forest shows us how to live, love and grow alongside each other".
खरे तर या पावसाळ्यात पाऊस अतिच झाला, त्यामुळे बरेचसे ट्रेक कॅन्सल झाले माझे, त्यात असल्या पावसात कर्जत - भिमाशंकर ट्रेक करणे म्हणजे अवघड वाटत होते.. पण पाऊस अक्षरसा जगलो आम्ही या ट्रेक मध्ये ...

Trek path

trek path2
.
.
.

११. रायलिंग पठार (लिंगाणा),सायक्लोट्रेक २.

सिंहगड, राजगड, तोरणा या माझ्या स्वराज्याच्या अभेद्य किल्ल्यांच्या कुशीमधुन ,दुतर्फा सोनकीच्या पिवळ्या धमक फुलांनी सजलेल्या रस्त्यामधुन सायकल ने घाट वाटा पार करत असताना, पहाटेचा अल्हाददायक सूर्य हळुच सिंहगडावर डोकावत होता. त्याचबरोबर धुक्याच्या दुलई मधुन आणि ढगांच्या सानिध्यातुन पुढे जाताना, हिरव्यागार शेतामधुन, डोंगरामधुन सायकल प्रवास म्हणजे एक पर्वणीच..

खडकवासला- पाबे घाट - वेल्हे - भट्टी - केळद घाट - सिंगापुर - मोहरी गाव - रायलिंग पठार (लिंगाणा). असा हा खडतर घाटवाटेंचा , खडकाळ अवघड रस्ता.

मिपा सदस्य आणि सायकल सायकल गृप मधले आम्ही ५ जन, बहुतेक आम्ही सायकल वर रायलिंग पठारावर जाणारे पहिलेच असू.
माझ्या आतापर्यंतच्या सायकल प्रवासातील सर्वात अवघड सायकल ट्रीप .. पहाटे ३:३० पासुन रात्रीच्या ९ वाजले तरी न संपणारा हा प्रवास खरेच हवाहवासा होता.
या बद्दल सिद्दु पाटील या मित्राचे आभार, त्यानेच हा प्लॅन आखला होता.

तोरणा आणि सोनकीची फुले

असाच क्लिक

रायलिंग पठार, लिंगाना

अति पावसामुळे दोन ट्रेक कमी झाले आणि सायकल च्या पुणे लोनावळा साध्या फेर्‍या सोडल्या , तर मोठ्या अश्या आनखिन फेर्या झाल्या नाहीत. येणारे २०२० हे वर्षे फिरण्यासाठी कसे असेल माहीत नाही. परंतु, नविन टेक्नॉलोजी मध्ये गेल्याने, आणि त्याच्या क्लास मुळे पुढचे ४ महिने शनिवार रविवार ब्लॉक असल्याने कसा वेळ काढता येइल हे पहावयास लागेल. या लावलेल्या क्लास मुळेच, या वेळेस चा मोठा प्लॅन - चादर ट्रेक, लडाख कॅन्सल केला आहे. बघु निदान ऑगस्ट मध्ये लेह लडाख करता येइल का ते.
उद्या मात्र १ तारखेला मुलीला घेवून लोहगड करतो आहे.. नविन वर्षे नविन सुरुवात...

प्रतिक्रिया

फोटो फार आवडले . मुलीलाही भटकंती आवडते, छान.
अंधारबन म्हणजे कोणता भाग?
कर्नाटकातला सह्याद्री - केमन्नागुडी, बाबाबुदनगिरी, काकाबे, बीआर हिल्स, इकडे जाणार आहे का?

मनो's picture

1 Jan 2020 - 4:58 am | मनो

मुळशीच्या घाटात रस्ता कड्यावरून खाली उतरणीला लागण्याच्या जरा आधी, एक रस्ता उजवीकडून लोणावळ्याकडे घुटका तेलबैला मार्गे जातो. त्या रस्त्यावर एक योग आश्रम गेला की दोन्ही बाजूने वरून रस्ता झाकून टाकणारी झाडी आहे. ती जागा संपली की थोडं मोकळवण आहे, तिथून सुंदर दृश्य दिसते, खाली हजार फुटांवर एवढीशी कुंडलिका नदी आणि समोर प्रचंड डोंगर. त्या जागेला आनंद पाळंदे यांच्या 'डोंगरयात्रा' पुस्तकात अंधारबन असं म्हणलं आहे.

२० वर्षांपूर्वी, मुळशी घाट होण्याआधी अप्रतिम आणि एकांत असणारी ही जागा होती, जवळच एक (बहुदा पासलकर) स्मारक आणि डोंगरपलीकडच्या गावाला जाणारी पायवाट आहे. गेल्या ४-५ वर्षात प्रसिद्धीमुळे बाजारीकरण झाले असण्याची शक्यता आहे.

स्वतःचे वाहन असणे आवश्यक आहे इथे, एखादी बस दिवासून एकदा जात असावी बहुतेक, ते पण पावसाळा सोडून. पलीकडून लोणावळ्याला जाताना एकदा खडकाळ ओढ्यातून हातानेच उचलून कंबरभर पाण्यातून दुचाकी पलीकडे न्यावी लागली होती, आता बरा रस्ता झाला आहे असे वल्ली एकदा म्हणल्याचे आठवते.

Google Maps-
https://maps.app.goo.gl/WW429XHnq9Dmum3z8

जवळच एक (बहुदा पासलकर) स्मारक

ते सरदार नावजी बलकवडे ह्यांचे स्मारक आहे. पांडुरंग बलकवडे ह्यांचे ते पूर्वज. अंधारबन परिसर दरीच्या पलीकडच्या बाजूस आहे. तेथे जाण्यासाठी सिनेर खिंडीतून जावे लागते. सिनेर खिंडीतच ते स्मारक आहे.

धन्यवाद. नकाशा कामाचा दिलात.

श्वेता२४'s picture

1 Jan 2020 - 10:22 pm | श्वेता२४

हे फोटो तुम्हीच काढले का? तसे असेल तर तुम्ही संवेदनशील लेखक व कवी आहातच पण उत्कृष्ट फोटोग्राफर ही आहात असं म्हणायला हवं

सहीच रे गणेशा. भरपूर फिरलास. वर्णन आणि फोटो पाहून छान वाटले खूप.

गुजराती रवी's picture

2 Jan 2020 - 4:30 pm | गुजराती रवी

सुन्दर फोटो

Nitin Palkar's picture

2 Jan 2020 - 6:00 pm | Nitin Palkar

सुंदर लेखन, सुंदर फोटोज.

स्वोर्डफिश's picture

2 Jan 2020 - 6:58 pm | स्वोर्डफिश

स्वोर्डफिश's picture

2 Jan 2020 - 7:02 pm | स्वोर्डफिश

विषय संपला

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jan 2020 - 8:50 am | ज्ञानोबाचे पैजार

फारच मस्त लेख व फोटू लैच आवडले
महत्वाचे म्हणजे फोटो पहाताना माझा गणेशा झाला नाही
पैजारबुवा,

दुर्गविहारी's picture

3 Jan 2020 - 5:51 pm | दुर्गविहारी

उत्कृष्ट लिखाण आणि हेवा वाटावी अशी भटकंती ! ;-)
बाकी फोटो आम्हाला मात्र दिसत आहेत.

सुबोध खरे's picture

4 Jan 2020 - 9:43 am | सुबोध खरे

फोटो फार आवडले .

उमेश पाटिल's picture

4 Jan 2020 - 11:54 am | उमेश पाटिल

मस्त

ट्रम्प's picture

5 Jan 2020 - 7:44 am | ट्रम्प

ऐहिक सुखे झिडकारून निसर्गाच्या सानिध्यात फिरणाऱ्याचां मला खूपच हेवा वाटतो !!

Rajesh188's picture

5 Jan 2020 - 12:42 pm | Rajesh188

मस्त लिखाण आणि फोटो.
खूप आवडले.
निसर्गाचे भव्य दिव्य रूप निसर्गात जावून .
अनुभव ने म्हणजे अनुभतीच सुखाची.

प्रमोद देर्देकर's picture

5 Jan 2020 - 2:17 pm | प्रमोद देर्देकर

हायला गणोजी तुम्ही खूप भाग्यवान.
आमच्या नशिबी असं फिरणं येतंच नाही.
बघुया या मार्च मध्ये परीक्षा संपल्या की मुलाला घेवून नव्यानं सुरुवात करेन म्हणतोय.
पण मग तुम्हां मिपाकरांची हर अडचणीत मदत लागणार.

सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद !

@ कंजुस राव - मनो यांनी सांगितले आहेच, त्यांच्यायेव्हदी माहीती मला नाहीच :). तरी सोप्प्या भाषेत, पुण्यावरुन अंधारबनात जाणार असाल, तर निवे गावाच्या घाटानंतर उजवीकडे वळाळ्यावर पिंप्री गावाच्या छोट्याश्या डॅम पासुन आत जावा.
मुंबई वरुन आल्यास पाटणुस, भिरा इकडून वरती या.

@ श्वेता जी,
- हो , निसर्गाचे फोटो मीच काढलेत, फोटो काढायला आवडतात, पण मी फोटोग्राफर नाही. यात दिलेल्या फोटो पेक्षा ही अजुन खुप छानफोटो आहेत पण येथे एकत्र देणे योग्य वाटले नाही. (हे फोटो फेसबुक वरुन घेतलेत)

@ प्रमोद जी,
नक्कीच, करा सुरुवात.
परीक्षा वगैरे चालुच असतात, सुरुवात आता हिवाळ्यात करणे जास्त चांगले असे वाटते.
मला पावसाळ्यात ट्रेक जास्त आवडतात,
एकच ठिकाण वेगवेगळ्या मोसम मध्ये वेग वेगळे वाटते , आणि पुन्हा नव्याने भेटते.
मदत लागेल तेंव्हा समस्त मिपाकर मदत करतीलच..

मुक्त विहारि's picture

6 Jan 2020 - 6:26 pm | मुक्त विहारि

आता ह्या वर्षी कुठे कुठे जाणार?

गणेशा's picture

6 Jan 2020 - 7:15 pm | गणेशा

Something wrong happened

गणेशा's picture

6 Jan 2020 - 11:11 pm | गणेशा

आता ह्या वर्षी कुठे कुठे जाणार?

मुवि,
तुमच्या या प्रश्नाला उत्तर देण्याचा शेवटचा प्रयत्न , जर आता एरर आला तर जाउद्या.

--- या वर्षीचे म्हणाल तर आराध्याला घेवून २ ट्रेक झाले पण :) आणि १५ फेब ला विसापुर फोर्ट (जुने ओर्कुट फ्रेंडस बरोबर, १२ वर्षांनी भेटेन) ला जतोय हे नक्की.

खरे तर स्पार्क बिग डाटा चा क्लास शनिवार रविवार संध्याकाळी पुढील ४ महिने आहे अजुन, आणि त्यामुळे चादर ट्रेक कॅन्सल करावा लागला, याचे खुप वाईट वाटते, त्याची भरपाई, लेह - लडाख बाईक ने करुन करता येइल का या विचारात आहे.

ट्रेक चे म्हणाल तर , या वर्षी प्लॅन मध्ये खालील किल्ले करायचा मानस आहे,

१. सुधागड आणि सरस गड ( पुणे ते पाली सायकलने, मग टेंट घेवून वरती गडावर)
२. विसापूर
३. रतनगड ( दुसर्‍यांदा)
४. तोरणा नाईट ट्रेक
५. कलावंतीन( २ वर्षे झाले मनात असून नाही करता आला)
६. कमळगड
७ ब्रम्हगिरी
८ देवकुंड

बघु कुठले आणि कसे होतात ते ..

दोन फोटो या शनिवारच्या ट्रेक चे
lohagad

2

गणेशा's picture

7 Jan 2020 - 11:08 am | गणेशा

आपल्याच धाग्यावर आपलेच धन्यवाद व इतर चर्चेचे आपलेच रिप्लाय कमी असावेत असे मला वाटते, म्हणून सर्वाना मिळून एकच धन्यवाद मेसेज लिहिला..

नंतर मुविंच्या प्रश्नाला उत्तर द्यायला गेलो, तर मला error आले आणि हे एव्हडे मेसेज येथे पडले..

हे मेसेज डिलीट करता येतील का?

एक रिप्लाय देताना mobile वरून क्रोम वापरले with image त्यामुळे हा प्रॉब्लेम आला आहे का?

असो, हे मेसेज बॉडी वरच्या माणसांना डिलीट करता येईल का?