दिसतील ती झाडे, कापीत चाललो मी
होऊन मेघ काळा, शापित चाललो मी
श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष
पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी
झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने
ओले अधीर अश्रू, कुरवाळीत चाललो मी
पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत
दिशाहीन प्रवासात, ऐटीत चाललो मी
डागाळला चंद्र उरी, नभास का खंत आहे
आपुलेच खोटे नाणे, घाशीत चाललो मी
-------- शब्दमेघ (Edited)
प्रतिक्रिया
27 Dec 2019 - 1:46 pm | ज्ञानोबाचे पैजार
दूर्दैवाने ही सत्य परीस्थिती आहे.
पैजारबुवा,
27 Dec 2019 - 3:27 pm | प्रचेतस
उत्तम कविता रे गणेशा
27 Dec 2019 - 3:57 pm | खिलजि
बोलले ते शोल्लीड राम का बाण ...
================================
आजकाल चंद्र खूप खूप मोठा दिसतो
सूर्य तर अगदी जवळ आल्यासारखा वाटतो
डोगर दर्या खोर्यात हे सर्व दूर दूर भासायचे
आता कुणीच वाली नाही गड्या,, सर्व गेले उडून
हळूहळू आपणपण उडायचे
28 Dec 2019 - 5:19 pm | पाषाणभेद
दिवसेंदिवस तुम्ही सामाजिक काव्य लेखन करत आहात. छान आहे.
28 Dec 2019 - 7:56 pm | कुमार१
उत्तम कविता
29 Dec 2019 - 3:16 am | जॉनविक्क
29 Dec 2019 - 3:16 am | जॉनविक्क