'स्त्री' शब्द ऐकल्यावर तुम्हाला कोण आठवते? सतत आपली काळजी घेणारी आई, सतत आपल्याशी भांडणारी पण इतरांशी भांडताना ठामपणे आपल्या बाजूने उभी राहणारी बहीण, पारावरच्या खाऊ देणाऱ्या आजी की चेष्टा करणारी मैत्रीण? अगदी ऐतिहासिक किंवा पौराणिक आख्यायिकांतील एखादी स्त्री व्यक्तीरेखा सुद्धा नजरेसमोर तरळून जात असेल कदाचित. कोणीही आठवले तरी मनात भावनांचा ओलावा हा पसरतोच.
अश्याच मनात ठसलेल्या स्त्री व्यक्तीरेखेबद्दलच्या
तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करा कवितेतून, लेखातून अथवा कथेतून. आणि पाठवून द्या आमच्या email address वर:
facebookalwayson@gmail.com
आवाहनास कारण की, आम्ही, शब्दांकुर ग्रूप काढत आहोत E- महिला विशेषांक!
तुमच्या मनाला भिडलेल्या स्त्री व्यतिरेखा केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कथा, कविता आणि लेखांची आम्ही आतूरतेने वाट पाहतो आहोत.
अगदी 'ओ स्त्री कल आना' हे वाक्य आठवून तुम्ही 'स्त्री' सारख्या चित्रपटाची समीक्षा लिहिलीत तर ती ही स्वागतार्ह आहे आणि रुद्रम मालिकेतल्या रागिणी बद्दल लिहिलेत तर ते सुद्धा!
चाफेकळी नाकाची मस्तानी शब्द बद्ध करा किंवा शब्दांच्या पल्याडचे कर्तुत्व गाजवणारी झाशीची राणी तुमच्या लेखणीतून उमटू द्या.
आम्ही आतूर आहोत तुम्हाला समजलेल्या स्त्री व्यक्तीरेखे बद्दल किंवा व्यक्तीमत्वाबद्दल जाणून घ्यायला.
महत्त्वाच्या बाबी:
१. साहित्य स्वरचित हवे.
२. कुठल्याही ठिकाणी प्रकाशित झालेले नको.
या संदर्भात आम्हाला मिळालेले साहित्य E-अंकात समाविष्ट करण्याची परवानगी साहित्यिक स्वेछेने देत आहे, असे गृहीत धरले जाणार आहे. त्याच बरोबर, आम्ही स्वयंसेवी साहित्य संघ असल्या कारणाने अंक विनामूल्य वाचण्याकरिता उपलब्ध करून देत असतो. म्हणूनच साहित्यिकानेही कुठल्याही आर्थिक व्यवहाराची अपेक्षा ठेवू नये, ही नम्र विनंती आहे.
साहित्य पाठवायची अंतिम तारीख : १५ जानेवारी २०२०
प्रतिक्रिया
13 Dec 2019 - 2:59 pm | पाषाणभेद
मराठीत वाचन लेखन चळवळ वाढविण्यासाठी चांगला उपक्रम आहे. जेवढे जास्त साहित्य तेवढे चांगले. त्यातले चांगले वाईट नंतर ठरवा. अक्षयकुमार व्हा, अमीरखान नको.
अर्थातच अंकासाठी शुभेच्छा!!
14 Dec 2019 - 5:25 pm | मृणालिनी
:) दर्जेदार अंक काढता यावा म्हणून आधीच साहित्य आवाहन केले आहे. उत्तम साहित्य रसिकांकरता अंका मार्फत घेऊन येण्याकरता आम्ही पुर्ण प्रयत्न करू. :)
13 Dec 2019 - 4:27 pm | जॉनविक्क
रच्याकने 'स्त्री" मठल्या वर मला स्त्री चित्रपट व ज्यांच्या दरबारात देर आहे पण अंधेरी नाही असे चिचा बिरुटेजी ज्यांच्या बाबत कौतुकासने म्हणतात त्या मिपाकर यशो आठवल्या
13 Dec 2019 - 4:29 pm | जॉनविक्क
ते आयरीन अडलर सुद्धा आठवते पण असे पात्र आपल्या आजूबासजूला विरळाच
14 Dec 2019 - 5:30 pm | मृणालिनी
कदाचित तुम्हाला आठवले तसेच अजूनही कोण्या लेखकांना आठवेल आणि ते यावर काही लिहून पाठवतीलही.
:)
13 Dec 2019 - 6:01 pm | मुक्त विहारि
विषय छान आहे.
14 Dec 2019 - 5:31 pm | मृणालिनी
तुम्हीही लिहून पाठवू शकता.
facebookalwayson@gmail.com
14 Dec 2019 - 9:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषय चांगला आहे. लिहिण्याचा प्रयत्न करतो.
>>>>'स्त्री' शब्द ऐकल्यावर तुम्हाला कोण आठवते?
वयपरत्वे आठवण येणा-यांचे अनुक्रमांक बदलतात, ते अनुक्रमांक मागेपुढे होतील असे वाटते.
पण आता 'स्त्री' म्हटले की एकदम समुद्राच्या लाटा किना-यावर धडकाव्यात तशी 'ती' सारखी धडकतअसते, सॉरी आठवत असते. अजिबात ती दुस-या कोणाला आठवू देत नाही. समुद्रगाज आहे ती, मनाच्या बॅग्राउंडला सूरेल संगीत सतत चाललेलं असतं.
आता लिहिणे आले.
-दिलीप बिरुटे
( समस्त स्रियांचा आदर करणारा)
14 Dec 2019 - 5:32 pm | मृणालिनी
मस्त लिहिले आहेत. यावरूनच तुमचे साहित्य धमाकेदार असणार याचा अंदाज येतो आहे. :) नक्की पाठवा. वाट बघतो आहोत आम्ही!
15 Dec 2019 - 9:23 am | नूतन
हा उपक्रम मिसळपाव चा आहे का ?
15 Dec 2019 - 1:09 pm | मृणालिनी
हा उपक्रम आम्ही, म्हणजे शब्दांकुर साहित्य संघ राबवत आहोत. :)
27 Dec 2019 - 12:36 am | एस
अरे वा! अंकाची वाट पाहत आहे. अनेक शुभेच्छा!
3 Jan 2020 - 5:03 pm | मृणालिनी
:)