डिसेंम्बरच्या तिसऱ्याआठवड्यात मलेशिया, सिंगापूरची एक आठवड्याची सहल आखतोय. कोणत्याही सहल आयोजकाशिवाय. मी आणि एक मित्र आणि दोघांच्याही गृह स्वामिनी असे चौघेही ज्येष्ठ नागरिक आहोत. विमानाची तिकिटे आणि दोन्ही देशातील हॉटेल्स आरक्षित केलेली आहेत.
याविषयी जाणकार मिपाकरांकडून अधिक मार्गदर्शन, सूचनांच्या अपेक्षेत. विशेषतः परदेशी चलन किती व कुठचे घ्यावे, स्थल दर्शनासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट ऐवजी खाजगी टॅक्सीने फिरल्यास खर्चात आणि सोयीत किती फरक पडू शकतो, इ.
इतरही काही सूचना असल्यास स्वागतच आहे.
प्रतिक्रिया
14 Nov 2019 - 10:58 pm | कोमल
मलेशिया क्वालालूंपुरमध्ये शहरातील ठिकाणे मेट्रो, ट्रेन वगैरेंनी जोडली असून तो पर्याय सोयीस्कर ठरू शकतो. मुख्यतः बाटु गुहांकडे जाण्यासाठी KL SENTRAL वरून थेट ट्रेन आहे. स्वस्त, आरामदायी आणि जेष्ठ नागरिक असाल तरी या मार्गावर गर्दी नसते त्यामुळे दगदग होणार नाही. पण शहरात फिरायला, ट्वीन टॉवर वगैरेसाठी टॅक्सी सोयीची पडेल.
आपले रुपये डॉलर मध्ये बदलून घेऊन लागतील तसे दोन्ही देशांत त्या त्या चलनानुसार बदलून घ्यावे. इथे डॉलर bookmyforex.com वर योग्य दरात उपलब्ध होतात आणि घरपोहोच मिळतात.
मलेशियन रिंगिट चायना टाऊन सारख्या भागांत छोट्या दुकानात चांगल्या दरात मिळतील. एअरपोर्टवर अगदी तिकीट किंवा टॅक्सी भाड्यापुरते बदलून घ्या कारण इथे दर चांगला देत नाहीत.
सिंगापूरबद्दल काहीच कल्पना नसल्याने माझा पास.
सहलीसाठी खूप शुभेच्छा!
15 Nov 2019 - 3:56 pm | Nitin Palkar
_/\_
15 Nov 2019 - 7:08 pm | Nitin Palkar
_/\_
15 Nov 2019 - 8:35 am | चौकस२१२
सिंगापोर संबंधी:
- कोणती स्थळ याबद्दल बहारपूर माहिती आंतरजालावर सापडेल , किंवा केसरी वैगरे मध्य काय दाखवतात त्याचा आराखडा बघा
- त्याशिवाय काही वेगळ्या गोष्टीत रस असेल आणि इच्छा असेल तर सांगा म्हणजे तास सल्ल्ला देऊ शकेन, उदाहरणरार्थ सिंगापोरेचाच भाग असलेल्या संत जॉन बेटाला बोटीने जाऊ शकता, (सोबत प्याचे पाणी व खाणे न्यावे बेटावर खाणे विकत घेण्यासाठी दुकाने नाहीत ) तसेच
- एम आर टी, बस टॅक्सी अकि उंबर आणि इतर रिडे शेर तिन्ही उत्तम आहे , हवा मात्र दंत असते आणि अंतरे फार नाहीत
- खावय्ये असाल तर हवकर स्टॉल वरील अन्न जरूर चाखून बघा अगदी काहीच नाही तरी मलेशिया किंवा सिंगापोर ला करी पफ ( सामोसा / करंजी तिखट ) आणि हायनीज चिकन राईस नक्की .
- के एल मध्ये किती दिवस आहेत? जमले तर " किलीप किलीप " काजवे Kampung Kuantan Firefly पार्क ला जाऊ शकता एक दिवस आणि रात्र आणि दुसर्यदिवशी लवकर परतणे
15 Nov 2019 - 4:00 pm | Nitin Palkar
धन्यवाद, चौकस२१२! मलेशिया मध्ये तीन दिवस, सिंगापूर मध्ये तीन दिवस असे आरक्षण केले आहे.
18 Nov 2019 - 5:53 am | चौकस२१२
३ दिवसच असल्यामुळे फार काही वेगळे बघता येईल असे वाटत नाही, यात्रा कंपनी तील स्टॉक स्टॅंडर्ड , , आणि आपण याआधी काय बघितले आहे त्यावर हि अवलंबून आहे, सिंगापोर मध्ये बहुतेक मनुष्यनिर्मित, नैसर्गिक असे काही नाही,, मरिना बे सॅण्ड च्या जवळ रात्री लेसर शो असतो तो चांगला आहे
सिंगापोर झू ची रात्रीची सफारी हा वेगळा अनुभव आहे
भारतातील मंदिरे आपण बघितली असतील त्यामुळे ३ दिवसात वेळ काढून बाटु केव्ह मधील मंदिर बघण्यात एवढे काही wishehs नाही , त्याऐवजी जर ओरँग उटान वैगरे बघायला मिळाले तर उत्तम
26 Nov 2019 - 12:24 pm | Nitin Palkar
_/\_
26 Nov 2019 - 3:42 pm | बेकार तरुण
सिंगापूर मधे ३ दिवसात सगळे बघुन होणे अवघड आहे.
तेव्हा तुमच्या चॉईसप्रमाणे आखणी करा. साधारण सँटोसा आयलंड व युनिव्हर्सल ला १ दिवस लागतो.
तसेच झू (नाईट सफारी सकट) आणी बर्ड पार्क एका दिवसात होउ शकतो.
बाकी बघण्यासारखे बरेच आहे, पण आपल्या आवडीनुसार निवड करु शकता.
करंन्सी - ठीक ठीकाणी खोपट्यातुन मिळते बदलुन. साधारण प्रत्येक मॉल मधे एक असतोच. मुस्तफा (तिकडील मोठे बिग बझार सारखे दुकान) मधे रेट बरा मिळतो.
फिरायला बस व एम आर टी (लोकल ट्रेन) पर्याय सगळ्यात स्वस्त आणि मस्त. ट्रेन चे रूट वगैरे समजणे फारच सोपे आहे. बसचे थोडस (फार नाही) अवघड आहे.
टॅक्सी मिळण्यास कुठेही फारसा त्रास होणार नाही (अनलेस प्रचंड पाउस असेल तर, तेव्हा जरा त्रास होतो टॅक्सी मिळायला).
उबर वगैरे आरामात मिळतात. ऑफिसच्या वेळा वगैरे सोडता बरेच रीझनेबल असतात.
खर्च - टॅक्सीचे भाडे कुठल्या रूटने जाणार ह्यावर पण अवलंबुन असते (ऐन शहरात टोल वगैरे जास्ती आहेत). पण साधारण जर ट्रेनने जायला डॉलर २ - ३ (दर माणशी) होत असतील तर टॅक्सीने जायला डॉलर १५ - २० होतील (हा हिशोब अगदीच रफ आहे, फक्त थोडीशी कल्पना येण्यासाठी दिला आहे).
अजुन काही माहिती हवी असेल तर जरुर सांगा.
4 Dec 2019 - 7:41 pm | Nitin Palkar
खूप छान माहिती दिलीत, आभार्स.
28 Nov 2019 - 12:04 pm | आकाश खोत
सिंगापुर आणि मलेशिया एकाच आठवड्यात करणे ज्येष्ठ नागरिकांना खुप जास्त होऊ शकते. सर्वांची प्रकृती आणि शारीरिक क्षमता उत्तम असल्यास चालुन जाईल.
इथे कोणी म्हटल्याप्रमाणे सिंगापूरला मानवनिर्मित आकर्षणे जास्त आहेत. पण त्यातली बरीचशी अचाट आहेत. आवर्जून बघण्यासारखी आहेत.
मी नुकताच सिंगापूरला जाऊन आलो आणि ८ दिवस सिंगापूरलाच फिरलो. आणि त्यातही काही आकर्षणे सोडलीच. त्यामुळे बघायचं म्हटलं तर एकाच ठिकाणीसुद्धा भरपूर काही आहे.
मरिना बे सँड्स, स्कायपार्क, स्पेक्ट्रा म्युसिकल शो, रिव्हर क्रूझ, मरलायन, आर्ट अँड सायन्स म्युझिअम, चायना टाऊन, बुद्धाज टूथ रेलिक टेम्पल, बर्ड पार्क, झू, नाईट सफारी, रिव्हर सफारी, लुमीना, गार्डन्स बाय दि बे, सुपर ट्री हि सर्व शहरातील आकर्षणे.
त्यांनी चंगी विमानतळ सुद्धा दिवसभर वेळ घालवता येईल इतक्या छान पद्धतीने सुशोभित केले आहे.
सेंटोसा आयलंड वर २-३ दिवस सहज जातील इतकी आकर्षणे आहेत. पण त्यातली बरीचशी अम्युझमेंट आणि ऍडव्हेंचर प्रकारात मोडतात. युनिवर्सल स्टुडिओज हे आपल्या इमॅजिका सारखं आहे. तिथे एक दिवस पूर्ण लागतो. आता ह्यापैकी ज्येष्ठ नागरिकांना काय काय आवडेल आणि काय काय जमेल हे सांगणं अवघड आहे.
सिंगापूरमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. बहुतकरून ठिकाणी मेट्रोने जाता येते. काही ठिकाणी बस लागेल. पण सिंगापूरची आकर्षानेच ऐसपैस जागेत पसरली आहेत. बरेच चालावे लागते. त्यात जर मेट्रोने फिरायचे म्हटले तर बरीच भर पडेल. कारण स्टेशन आणि प्लॅटफॉर्म सुद्धा बरेच मोठे असतात. लिफ्ट आणि एस्कलेटर असले तरी चालावे बरेच लागते. त्यामुळे हवे तर पहिल्या दिवशी फिरून पहा, सोसवलं नाही तर टॅक्सी ने फिरा.
मलेशिया बद्दल कल्पना नाही.
पण मी माझ्या सिंगापूरच्या अनुभवावर व्हिडीओज बनवत आहे. लवकरच ते माझ्या युट्युब चॅनल वर प्रकाशित करणार आहे. तुम्ही सहलीला निघाल तोपर्यंत सर्व नाही पण काही व्हिडीओज आलेले असतील.
चॅनेल ची लिंक: https://www.youtube.com/channel/UC6rWGgCmEaIc-5SoQQL4WjA
4 Dec 2019 - 7:44 pm | Nitin Palkar
विमानाची तिकिटे काढल्यानंतर जाणवले, असो, आता तीन दिवसांचे स्थळ दर्शन आखतोय...
3 Dec 2019 - 1:56 pm | माझीही शॅम्पेन
धाग्यावर नजर ठेवून आहे मी सुद्धा सिंगापूर ३ दिवस आणि मलेशिया २ दिवस असा प्लॅन ठरवलं
कोणाला सिंगापोर हुन KL मलेशियाला अतिशय सुकर कस जाता येईल हैच कृपया मार्गदर्शन करावे
5 Dec 2019 - 6:58 pm | बेकार तरुण
सिंगापूर ते के एल जायला भरपूर बस सेवा उपलब्ध आहेत. बस चांगल्याही असतात आणी बर्यापैकी वेळेवर धावतात. नेटवर भरपूर माहिती मिळेल बसविषयी.
पण २च दिवस जाणार असाल तर विमानाने जाणे उत्तम.
4 Dec 2019 - 11:22 am | चौकस२१२
सिंगापोरे ते क्वाला लंपूर साधारण ५५० किमी आहे उत्तम रस्ता आहे, सेल्फ ड्राईव्ह करू शकता पण त्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्राइवर परमिट लागते कि स्मार्ट चिप असलेला महाराष्ट्र्र परवाना चालतो हि चौकशी करावी लागेल
सिंगापोरे हुन गाडी भाड्याने घेऊन जाणे सोपे असले तरी कदाचित महाग होईल , कॉजवे ओलांडून जोहोर बारू या मलेशियन गावात जाऊन तेथून गाडी भाड्याने घेणे बहुतेक स्वस्त पडेल पण सुरळीत नसेल पण जर २/३ दिवस च आहेत तर मग विमान हाच उपाय नाहीतर मग बस भरपूर आणि थोड्या ट्रेन पण आहेत