India Deserves Better - ५. 'आरे'रावी : आरे जंगल, आदिवासी, न्यायालय आणि राजकारण

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
8 Oct 2019 - 4:01 am

नोटः
मुबंईत पवईला कामाला असताना आणि त्या आधीही मुंबईतील वास्तव्याच्या काळात(एकुन २००७ ते २०१४) जवळच्याच आरे जंगलामध्ये कित्येक दा जाण्याचा योग आला होता, त्यामुळे आता जे चालु आहे, ते खुपच क्लेषदायक आहे माझ्यासाठी, म्हणुन लिहिलेच पाहिजे, ५ ऑक्टोंबर ला झाड पाडलेला पहिला फोटो पाहुन डोळे ओलावले होते त्यामुळे लिहिलेच पाहिजे.

"The future will either be green or there will be no future at all"

'आरे वाचवा' आंदोलन आणि स्थानिक आदिवासी

आरे वाचवा आंदोलनावर बोलण्या अगोदर मी भारतातील या अगोदरील दोन आंदोलनांवर बोलु इच्छितो , आणि मग या आंदोलना बद्दल सांगतो.

वृक्ष संवर्धन किंवा पर्यावरणा बद्दल बोलताना त्याची सुरुवात नक्कीच 'अमृता देवी बिष्णोई' यांचे नाव घेवुन करावी लागेल. जोधपुर जवळील खेजडली गावात सन १७३७ मध्ये राजाच्या सैनिकांनी वृक्ष तोडु नयेत म्हणुन आपल्या ३ मुलींसह बलिदान दिले होते. आणि त्या नंतर एक एक करुन ३६३ लोकांनी तेथे वृक्ष तोडु नये म्हणुन बलिदान दिले. जोधपुर च्या राजाला जेंव्हा हे कळाले तेंव्हा त्याला आपल्या अधिकार्‍यांनी केलेल्या कृत्याचा पस्चाताप झाला आणि त्यानी वृक्षतोड आणि जंगली जनावर मारण्या विरोधात आदेश जारी केला, राजघराण्यातील व्यक्ती ही या क्षेत्रात शिकार करत नाहीत.
आज पण राजस्थान वन विभागा तर्फे पर्यावरण संरक्षणा मध्ये योगदान देणार्‍यास अमृता देवी विश्नोई स्मृति पुरुस्कार दिला जातो.

चिपको आंदोलन -

आज पासुन जवळजवळ ४५ वर्षा आधी उत्तराखंड(तेंव्हाचा उत्तरप्रदेशचाच एक भाग) चिपको आंदोलन झाले होते, चंडीप्रसाद भट्ट ,गौरा देवी आणि नंतर सुंदरलाल बहुगुणा यांनी याचे नेतृत्व केले होते .
या आंदोलनात वृक्षांना तोडण्यापासुन वाचवण्यासाठी लोग झाडाला चिकटत असत. या आंदोलनाची व्याप्ती हळु हळु आजुबाजुला सगळीकडे दिसुन आली. या सगळ्या प्रकारची धास्ती घेवुन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वन संरक्षण अधिनियम बनवुन हिमालयाच्या क्षेत्रातील वनांना तोडण्यासाठी १५ वर्षांची बंदी घातली होती.

आरे वाचवा आंदोलन ,
आरे वाचवा आंदोलना बद्दल मला एक सांगायचे आहे की सरकारी समर्थक जे सांगत आहेत की पर्यावरण वादी दिशाभुल करत आहेत आणि एनजीओ माफिया हे पसरवत आहेत तर हे साफ खोटे आहे, या आंदोलनाची सुरुवात स्थानिक आदिवसी रहिवाशांनी ४ वर्षापुर्वी सुरु केलेली आहे आणि पर्यावरण प्रेमी आणि आणि एनजीओ त्या आंदोलनात नंतर सहभागी झाले आहेत. वरील दोन्ही आंदोलने जशी तेथील नागरिकांनी केली होती, तसेच हे आंदोलन सुद्धा तेथील जनतेने केलेले आहे.
जे विशिष्ट मजकुर इतरत्र पसरवत आहेत त्यांना याची कल्पना तरी आहे का की हे आंदोलन स्थानिक लोकांनी ४ वर्षांपासुन केलेले आहे ?
अश्विनी भिडे, मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या मुख्य अधिकारी यांचं भलं मोठं पत्र नेट वर फिरतय आरे कसं जंगल नाही, मेट्रोमुळे काय काय होणार आहे, आरे वाचवा चळवळीतील पर्यावरणप्रेमी फक्त प्रसिद्धीसाठी सहभागी होत आहेत, विरोधक दिशाभुल करत आहेत हे सगळे कशासाठी हे कळात नाहिये का ? ४ वर्षे सुरु असलेल्या आंदोलनाची धार त्यांनी बोथट करायचा घाट , 'आरे एका ना' ही हॅशटॅग वापरुन रीतसर केली आहे.

आरे चे जंगल तोडल्यावर तेथील रहिवाशी बेघर होतील, मध्ये कुठल्याश्या चॅनेल वर तेथील लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या, त्यांचे सारे एकुन मन विषिन्न होत होते, रोजीरोटी साठी अजुनही पारंपारिक पद्धतीने जंगलावरच आणि त्यातील फळ फुलांवरच अवलंबुन असलेले त्यांचे जीवन, आपण त्यांचे पुनर्वसन कसे आणि कोठे करणार आहोत ? त्यांच्या आजपर्यंतच्या जीवनशैली आपण बिघडवत आहोत, तेथील पाडे च्या पाडे आपण विस्थापित करत आहोत, त्याचे काय ?

न्यायालय, सरकार आणि 'आरे' रावी

उच्च न्यायालयाने , बरोबर सरकारी सुट्ट्या पाहुन रात्री उशीरा आरे विरोधात निर्णय दिला, म्हणजे सुप्रिम कोर्टात जाण्याला लगेच मार्ग नसणार, आणि सरकारणे ही ज्या तत्पर्तेने त्या रात्रीच ४०० च्या वर झाडे तोडुन काम केले यावरुन असा प्रश्न पडतो आहे की न्यायालय हे नक्की स्वायत्त आहे की सरकारचा त्यावर अंकुश आहे ? कारण सुप्रिम कोर्टात जाण्याच्या अगोदर मिळणार्‍या अवधीत सरकार आपल्याला पाहिजेल तसेच करेल आणि त्यांनी केले ही तसेच आता जवळजवळ ९८ % काम फत्ते केल्यावर सुप्रिम कोर्टाचा आदेश आलेला आहे की पुढील बोलणी होयीपर्यंत झाडेतोड थांबवा.. पण ज्या तत्परतेने सरकारने काम केले येव्हडी तत्परता इतर कुठल्या कामात कोणाला दिसली असल्यास कृपया सांगा.

शिवसेना ही भाजप बरोबर सत्तेत आहे हे सगळे जाणतात, तरी शिवसेना म्हणते आम्ही सत्तेत आल्यावर आरे ला जंगल घोषित करु , आरे वृक्षतोड मान्य नाही आम्ही ह्याव करु आणि त्याव करु, असे म्हणताना आपण आता ही सत्तेतच आहोत हेच ते विसरले आहेत का? बर ते जावुद्या ऐकणारे, न्युजवाले हे सुद्धा असा प्रश्न शिवसेने ला का विचारत नाहियेत की सत्तेत आल्यावर ठिक आहे, पण तुम्ही आताही सत्तेतच आहात, का तुमचे सरकार युगांडा ला आहे ?. आणि दिशाभुल म्हणजे काय ,तर ही दिशाभुल नाही का ? सत्तेत असुन पुन्हा सत्तेत येवुद्या मग हे करेन ही खरी दिशाभुल. म्हणुन जे मुद्दे आयटी सेल मार्फत पसरवण्याचे जे काम करतात आणि पर्यावरण प्रेमी आणि एनजीओ ना दिशाभुल करणारे म्हणतात त्यांना ही दिशाभुल कळत नाही का ?
मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी सोडा, आता तर आपल्या मुख्यमंत्र्यांनीही सांगितलंय, की आरे जंगल नाहीये, कुरण आहे. कोणत्या कुरणात ४-५ लाख झाडं असतात ?

आरे, मेट्रो कारशेड आणि काही प्रश्न उत्तरे

मुंबईत संजय गांधी नॅशनल पार्क आणि आरे ही जंगले सोडली तर कुठे ग्रीन बेल्ट आहे का ? मग हा ग्रीन बेल्ट संभाळण्याचे उत्तर दायीत्व आपले नाही का? प्रश्न आधी काय झाले हा नाहिये, प्रश्न आता काय होते आहे हा आहे, आज २७०० झाडे तोडली म्हणुन येणार्या काळात अशीच झाडे तोडत राहिल्यावर शेवटी काय ? का शेवटचे झाड तोडेपर्यंत आपण आधीच्याच जंगलतोडीचे दाखले देत राहणार आहे.

प्रश्नः मेट्रो आल्याने कार्बन ची बचत

बर जे पसरवले जाते की मेट्रो आल्याने कार्बन ची येव्हडी बचत होयील, एव्हड्या गाड्या त्यांचे प्रदुषण वाचेल, ते प्रदुषण वाचेलच, पण म्हणुन एकुनच मुंबईचे प्रदुषण कमी होयील काय ?, माझ्या पुढे दिल्लीचे उदाहरण आहे, तेथे ही मेट्रो आहेच, मग दिल्ली जगातील (होये फक्त भारतातील नाही, जगातील) २ नंबरचे प्रदुषित शहर आहे, मग तेथे मेट्रो आहे तरी प्रदुषण, गाड्या कमी झाल्या आहेत का ?मग मुंबईतच असे काय दिवे लागणार आहेत ?

बर आरे बचाव आंदोलनाचा मेट्रोला विरोध आहे का ? तर नाही त्यांचा मेट्रोला विरोध नाहीये तर विरोध आहे मेट्रो कारशेड जी २७०० झाडे तोडुन जंगलात होणार आहे त्याला आहे. म्हणजे ते बिचारे रहिवाशी तुमच्या विकासाच्या आड येत नाहियेत, तुम्ही त्यांच्या आड येतायेत मग नक्की चुक कोणाची आहे ?

प्रश्नः एनजीओ माफिया आणि पर्यावरण वाद्यांच्या प्रपोगंडा ला बळी पडु नका , हे जंगल नाही तर कॉलनी आहे

उलट सरकार प्रपोगंडा पसरवते आहे, समर्थक प्रश्न विचारत आहेत की तुम्ही झाड कधी तोडले नाही का? तुम्ही का कार वापरता ? तुमच्या घराचे जागी जंगल होते ..
अरे आरे जंगल हे पुर्णपणे ecosystem आहे , त्यात लेपर्ड आहेत, ५ लाख झाडं, 76 जातींचे पक्षी वगैरे वगैरे प्रचंड वनसंपदा आहे. आदिवासी लोक राहतात, ते आणखी वेगळंच.
आणि प्रपोगंडा म्हणजे काय ? सेव्ह आरे ला ४ वर्षात जेव्हडा प्रतिसाद मिळत नाही, त्याच्या कितीतरी पट अश्वीनी भिडे यांच्या 'आरे एका ना' ह्या टॅग लाईन ला मिळतो आणि कितीतरी ट्विटर वर मोठ्या मोठ्या लोकांकडुन , एजन्सी कडुन तो रीट्वीट केला जातो, मग ह्याला प्रपोगंडा म्हणतात, ना की पर्यावरण रक्षणाला एकत्र आलेल्या लोकांना, बुद्धीभेद करणारे असे असंख्य मेसेजेस जेंव्हा भाडोत्री संस्थे मार्फत, आयटीसेल मार्फत पसरवले जातात त्याला प्रपोगंडा म्हणतात ... प्रती हेक्टर २५-३० हेक्टर मध्ये २७०० झाडे असतील तर एका हेक्टर मध्ये जवळजवळ १०० झाडे , म्हणजे ते जंगलच होय .

उलट याव्यतिरिक्त ज्या जागा कारशेड साठी सुचविल्या गेल्या त्या नाकारल्या गेल्या पण त्यातही बरेच राजकारण असेल असे मला तरी वाटत आहे, बि.के.सी जवळील जागा तर फक्त उद्योगधंद्यामुळेच नाकारली का नसेल असा मला प्रश्न पडतो ?. पण या बद्दल ठोक असे सामान्य माणसाकडे काय असते ?
असे वाचनात आले होते की, २०१५ च्या MMRDA commissioner , BMC MC & UDD principal secretory यांनी 2015 TCR ( Technical Committee Report) मध्ये नमुद केले होते की अलटरनेटीव्ह साईट लक्षात घेतल्याच नाहित म्हणुन. आणि अलिकडेच अश्विनी भिडे यांनी पण एका विडीओ मध्ये सांगितले आहे की कुलाबा डेपो ऑप्शन चा कधी विचार केला नाही म्हणुन .
ह्या अश्या गोष्टी मेडिया ने तरी शोधुन व्यवस्थीत माहिती पुरवली पाहिजे, पण असे होताना दिसत नाही, त्यामुळे सोशल मेडिया वर पेड आयटी सेल च्या बातम्या जास्त पसरतात.

प्रस्तावित प्रकल्प आणि जवळील पुर सदृष्य स्तिथी आणि नविन झाडे लावण्याचा संकल्प
आता कारशेड व्यतिरिक्त आरे मध्ये पुढील प्रस्तावित प्लॅन आहेत १. स्लम डेव्हलपोमेन्ट, २. rto सेंटर ,आणि ३. मेट्रो भवन, या साठी कीती झाडांचा बळी द्यायचा हे अजुन ठरलेले नसेलच
५० ते १०० वर्षे वय असलेल्या, माती आणि पाणी सहज रोखू शकणाऱ्या झाडांच्या बदल्यात बिया आणि रोपं लावणार आणि त्यालाच २३००० झाडे लावली म्हणुन जाहिरात करणार यात काही तथ्य आहे असे वाटत नाही. उलट मुंबईत पाऊस जास्त पडतो, त्यामुळे येणार्या काळात पवई, चकाला, चांदिवली आणि एअरपोर्ट पुरात अडकले नाही तर नवल.. आणि ते होयीलच असे मला वाटते, तेंव्हा मुंबई स्पिरीट नावाखाली, कसलेही पुर व्यवथापण नसलेले आपले सरकार पुन्हा झाकुन जाईल आणि आरे चे हे जंगल तेंव्हा कोणाला आठवणार ही नाही.

मेट्रो प्रकल्प मुंबई साठी चांगला असेलच पण त्यासाठी रोडवर कार नसतील, पेट्रोल वाचेल, प्रदुषण वाचेल असल्या गोष्टी सांगणे म्हणजे दुसर्याला वेड्यात काडण्यासारखे आणि प्रपोगंडा पसरवण्यासारखे नाहि का वाटत तुम्हाला ?

सोबत एक फोटो अपलोड करतो जो २०१४ आणि आताचे तेथील चित्र दाखवेल , तरी आताच्य झाडांच्या कत्तली नंतरचा तो फोटो नाहिये, चित्र अजुनच विदारक असेल.

माझ्या मनातले
मला तर साध्या ट्रेकिंगला जंगलात ,डोंगरावर, किल्ल्यांवर गेल्यावर तेथे फक्त लोकेशन टॅगसाठी किंवा गळ्यात गळे घालुन सोशल मेडिया वर फोटो टाकण्यासाठी येणार्‍या लोकांचा राग येतो, असे वाटते हे व्हाटसअ‍ॅप, सोशल मेडिया नसता तर ७० % गर्दी कमी झाली असती,
तर अश्या जंगलात स्वता राहणार्‍या आदिवासींना आपण तेथुन विस्थापित करत आहोत , हाकलुन लावतोय असे पण का म्हणु नये ? जंगलातील प्राणी आणि पक्षी यावर तर मी काहीच बोलत नाहिये.
मग आता तुम्ही सरकार समर्थक असु वा नसु पण आपल्याला स्वताला मनात काहीच वाटत नाही का? की विकास ह्या शब्दामागे आपण झाडांच्या कत्तलीला पण मान्यता देत आहोत याचे आश्चर्य पण वाटत नाहिये का ?

म्हणुन मी पुन्हा म्हणु इच्छितो, India Deserves Better

-------- गणेश जगताप
#India_Deserves_Better

फोटो: 

प्रतिक्रिया

गणेशा's picture

2 Dec 2019 - 8:15 pm | गणेशा

Ok ताई

गामा पैलवान's picture

2 Dec 2019 - 6:19 pm | गामा पैलवान

गणेशा,

आरे देखभालकेंद्र (कारशेड) साठी जेव्हढी वृक्षतोड आवश्यक होती तेव्हढी करून झालीये. बातमी : https://www.loksatta.com/desh-videsh-news/maharashtra-government-says-in...

मग केंद्राच्या बांधकामाला स्थगिती कशासाठी? उद्धव यांचा हेतू स्वच्छ आहे ना, अशी शंका येते.

आ.न.,
-गा.पै.

तुमची शंका रास्त वाटत आहे, मला ही ती आली आहे.
पण पुढे काय होते ते पाहू... लगेच यावर मी रिअक्ट होत नाही..

फक्त फुल नाही फुलाची पाकळी या साठी बोललो कि, आंदोलन
करणारे बरेचसे तरुण होते, आणि त्यांना गुन्हेगार म्हणून पाहिले जाणार नाही. हा निर्णय योग्य आहे.

कारशेड थांबवून, तो विनासायास पुन्हा सुरु झाला तर आपल्या शंका च खऱ्या ठरू शकतात. त्या वर बोलण्या पेक्षा वाट पाहुयात. काय ते

तुमची शंका रास्त वाटत आहे, मला ही ती आली आहे.
पण पुढे काय होते ते पाहू... लगेच यावर मी रिअक्ट होत नाही..

फक्त फुल नाही फुलाची पाकळी या साठी बोललो कि, आंदोलन
करणारे बरेचसे तरुण होते, आणि त्यांना गुन्हेगार म्हणून पाहिले जाणार नाही. हा निर्णय योग्य आहे.

कारशेड थांबवून, तो विनासायास पुन्हा सुरु झाला तर आपल्या शंका च खऱ्या ठरू शकतात. त्या वर बोलण्या पेक्षा वाट पाहुयात. काय ते

गणेशा's picture

2 Dec 2019 - 8:23 pm | गणेशा

चुकून दोन रिप्लाय आले.
तरी जाताजाता सांगतो, bjp चा जिथे जिथे वयक्तिक हस्त असेल तेथे तेथे शिवसेना हात ठेवणार.. आणि त्यानंतर एकतर काम स्वच्छ होईल, किंवा शिवसेना ही वाटा मागेल अशी शंका आहे,

पण शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या कडून माझी अपेक्षा आहे, मला वाटते त्यांनी अस्तित्वाची लढाई लढून चांगलीच कामे करावीत

जॉनविक्क's picture

2 Dec 2019 - 8:30 pm | जॉनविक्क

पण सेना राजकीय लढाई मस्त देणार.

शिवसेना आणि bjp हे सारख्या विचारांचे पक्ष.. त्यामुळे मतदार, केंद्रात bjp व मोदी आहे म्हणून शिवसेना आणि bjp यात निवडायला सांगितले तर bjp निवडू शकत होते..
त्यात शिवसेनेचि bjp बरोबरची फरफट पाहून यांचे अस्तित्वच bjp संपवेल किंवा सगळे निर्णय bjp घेईल आणि सेना फक्त मागे मागे येण्यासाठी वापरली जाईल असेच चित्र होते.

त्यामुळे शिवसेनेला अस्तित्व टिकवायला ही सोनेरी अक्षरांत लिहिता येतील अशी 5 वर्षे मिळालीत, त्याचे त्यांनी सोनेच करावे असे मला वाटते.
राजकीय फाईट मात्र सेना देणार... आणि त्यांची ती गरज आहे.
यामुळे मला तर उद्धव ठाकरें नि लोकाभिमुख निर्णय घेतलेले पहिला आवडेल. आणि राज्याच्या विकासाचे राजकारण अपेक्षित

मुक्त विहारि's picture

6 Apr 2021 - 3:33 am | मुक्त विहारि

आता पुढे काय?

मुक्त विहारि's picture

25 May 2022 - 7:24 pm | मुक्त विहारि